✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सैराट आन सैराटच

अ
अभ्या.. यांनी
गुरुवार, 05/05/2016 - 15:37  ·  लेख
लेख
रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली. म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय. परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी. आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला. आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती. खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती. एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्‍या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्‍याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव. . आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग... आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल. परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार. होतेत...... अगदी असल्या स्टोर्‍या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
59588 वाचन

💬 प्रतिसाद (219)

प्रतिक्रिया

वरील भावांशी सहमत

स्पा
गुरुवार, 05/05/2016 - 15:43 नवीन
वरील भावनांशी सहमत पण पिक्चर नाय आवडला . न आवडण्याचे कारण एकच साला रोजची जिंदगी असली रडकी असताना निदान पिक्चर मध्ये तरी शेवट गोड झाला पायजे. करमणूक व्हायचे सोडून डोक्याला शॉट लागतो
  • Log in or register to post comments

सहमत...

वैभवजोशि
गुरुवार, 05/05/2016 - 16:32 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अगदी अगदी मनातलच बोल्लास भो ,

पियुशा
Fri, 05/06/2016 - 14:30 नवीन
अगदी अगदी मनातलच बोल्लास भो , कालच पाहीला , काय आरची न काय परशा , त्याची येन्ट्री लय आवडली आपल्याला , येक डाव तरी बघावाच असा गावरान पिच्चर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

लाईन ने या लाईन ने या...

वैभव जाधव
Fri, 05/06/2016 - 14:48 नवीन
लाईन ने या लाईन ने या... लै लोक आहेत बारी ला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

निदान पिक्चर मध्ये तरी शेवट गोड झाला पायजे.

मुक्त विहारि
Sun, 05/08/2016 - 23:22 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आयला...जाम भारी!

चांदणे संदीप
गुरुवार, 05/05/2016 - 15:53 नवीन
प्रा. डॉ. सर स्वारी बरका...मी अभ्यादादाच्या टीममध्ये! ;) दादानु...येतो भागवतला! पिच्चर झाल्यावर गार सरबत पाजणार ना? ;) एकेक परीक्षण/अनुभव वाचाव/ऐकाव तसतशी उत्कंठा वाढतच चाललीये....पण जिनगानीच सैराट सुटलेलं चकार काय केल्या थांबना! :( Sandy
  • Log in or register to post comments

सॉरी बिरी काय नाय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/05/2016 - 18:35 नवीन
अभ्यानं भन्नाट लिहिलय. मिपा सैराटमय झालंच पाहिजे, अजुन दहा तरी समीक्षन आली पाहिजेत. :) अभ्यासेठ लय भारी ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

भिडलं रं भावड्या.... आरपार.

तर्राट जोकर
गुरुवार, 05/05/2016 - 15:56 नवीन
भिडलं रं भावड्या.... आरपार.
  • Log in or register to post comments

आपला मानुस बोलला च्या मायले

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 05/05/2016 - 16:05 नवीन
आपला मानुस बोलला च्या मायले आता पिच्चर पाहाच लागते बातच!!
  • Log in or register to post comments

तंतोतंत

सोत्रि
गुरुवार, 05/05/2016 - 16:09 नवीन
>> स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अभ्या... Image removed. - (स्टोरी टेलर) सोकाजी
  • Log in or register to post comments

आनभव टेलींग म्हनत्यात का नाय या कलेला....

तुषार काळभोर
गुरुवार, 05/05/2016 - 16:53 नवीन
अभ्या..... ह्ये माझ्या कडनं एक.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

बापूसाब, सोकाजीनाना आणि

अभ्या..
गुरुवार, 05/05/2016 - 23:39 नवीन
बापूसाब, सोकाजीनाना आणि हिंदकेसरी. लै लै धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

@अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/05/2016 - 16:47 नवीन
@अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. ››› ह्येच ! ह्येच यायलय मनात. त्या व्हाट्सपा पासून त्ये त्या फेसबुका परेंत.. जिकडं तिकडं ह्या अस्मिता, प्रतिष्ठा आनी गॉगलवाल्यांणी नाच चालवलाय. फुगवतेत फुगा, आनी घेतेत फोडून मग! बाकी लय कडू लिवलय रं बेन्या ! शिनेमा येक, आनी ह्ये श्टुरीट्येलिंग दुसरं म्हनाव वाटायलय..!
  • Log in or register to post comments

एकदम धिंगाणा लिहिलंय.

प्रचेतस
गुरुवार, 05/05/2016 - 16:47 नवीन
एकदम धिंगाणा लिहिलंय. चित्रपट कदाचित पाहणार नाहीच, अगदी कुठल्यातरी च्यानलला आला तरी, 'झी'लाच येईल म्हणा. शेवट तर तुझ्याकडुनच विचारून घेतला.
  • Log in or register to post comments

जबराट परीक्षण.

बोका-ए-आझम
गुरुवार, 05/05/2016 - 16:53 नवीन
पण मिपालोकनाथ खुसपटं काढून राह्यले ना बे!
  • Log in or register to post comments

बघनार बघनार....

आदूबाळ
गुरुवार, 05/05/2016 - 17:06 नवीन
बघनार बघनार....
  • Log in or register to post comments

+११

नाखु
गुरुवार, 05/05/2016 - 17:33 नवीन
फक्त बेस्तवार बघणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बघायलाच हवाय आता.

सूड
गुरुवार, 05/05/2016 - 17:15 नवीन
बघायलाच हवाय आता.
  • Log in or register to post comments

सहमत

विनू
गुरुवार, 05/05/2016 - 17:16 नवीन
स्पा भावा १००% सहमत
  • Log in or register to post comments

पिक्चर एकदम मस्त आहे पण शेवटी

विनू
गुरुवार, 05/05/2016 - 17:19 नवीन
पिक्चर एकदम मस्त आहे पण शेवटी मनाला रुखरुख लागून राहते
  • Log in or register to post comments

+१००००

एकनाथ जाधव
Mon, 05/09/2016 - 12:37 नवीन
+१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनू

केवळ क्लास लिहिलंय!

वेल्लाभट
गुरुवार, 05/05/2016 - 17:27 नवीन
केवळ क्लास लिहिलंय!
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय भाऊ.

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 05/05/2016 - 17:42 नवीन
मस्त लिहिलंय भाऊ. पण एक कळल नाही. नायक-नायिका शेवटी मरतात असे ऐकले आहे. तसे दाखवल्याशिवाय नेशनल अवोर्ड मिळालेच नसते का ? नाही म्हणजे जात वास्तव, ओनर किलिंग वगैरे भारतात आहे हे खरंच. पण नातवंडांना पाहिल्यावर विरघळणारे पालकसुद्धा असतात भारतात. आणि स्वत:च्या चुका आठवून हळहळ्णारे भाऊसुद्धा असतात भारतात. अन प्रेमात पडताना केलेला आततायीपणा आठवून पालकांच्या गळ्यात पडनारी पोर-पोरीदेखील असतात भारतात. कधी कधी हिंदी पिच्चरचा गोग्गोड शेवटच लोजिकल वाटतो.
  • Log in or register to post comments

नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय

तर्राट जोकर
गुरुवार, 05/05/2016 - 17:54 नवीन
नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय तो विशेष दखल म्हणून आर्चीची व्यक्तिरेखा ज्या ताकदीने रिंकुने निभावली त्यासाठी. बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड संपत नाहीत. त्या गोड संपतात ह्या स्वप्नातून बाहेर येणेच उत्तम. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 05/05/2016 - 17:58 नवीन
बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड संपत नाहीत. त्या गोड संपतात ह्या स्वप्नातून बाहेर येणेच उत्तम. एक अतिशय रोकड़ी पण थोड़ी अश्लीलतेकड़े झुकणारी आंग्लभाषिक म्हण आठवली बघा एकदम =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 05/05/2016 - 18:24 नवीन
बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड संपत नाहीत. त्या गोड संपतात ह्या स्वप्नातून बाहेर येणेच उत्तम. हं. मंजुळेचे फ़ेण्ड्री तले दिग्दर्शन आवडले होते. सैराट बद्दल पण ऐकून आहे. फक्त आणखीन एक 'विजय तेंडुलकर' व्हायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

a) SPECIAL MENTION

तर्राट जोकर
गुरुवार, 05/05/2016 - 17:55 नवीन
a) SPECIAL MENTION SAIRAT RINKU RAJGURU CERTIFICATE For her effective portrayal of a lively girl who defies societal norms but ultimately has to face the wrath of her family.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

CERTIFICATE For her effective

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 05/05/2016 - 18:25 नवीन
CERTIFICATE For her effective portrayal of a lively girl who defies societal norms but ultimately has to face the wrath of her family. ==> राजगुरु यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आप्पा साहेब

एकनाथ जाधव
Mon, 05/09/2016 - 12:39 नवीन
सैराट भाग २ येणार बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

जिंदगीच्या उन्हातान्हात

अस्वस्थामा
गुरुवार, 05/05/2016 - 17:58 नवीन
जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
आणि
जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय.
एक नंबर भावा.. :)
  • Log in or register to post comments

लय भारी लिवलं

लालगरूड
गुरुवार, 05/05/2016 - 18:05 नवीन
लय भारी लिवलं
  • Log in or register to post comments

लय भारी !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/05/2016 - 18:25 नवीन
लय भारी !
  • Log in or register to post comments

अभ्या भावड्या

बाबा योगिराज
गुरुवार, 05/05/2016 - 18:34 नवीन
मायला जिंकलस रे, पण सगळी ष्टुरी सांगीतलीस रे भावा. जैन जैन म्या बी थेटरात जैन. मायला काल एकजण सलीमाला जाऊन आला, लोक हिथ बी थेट्रात नाचत हुते सांगत हुता. मायला आमच्याच नशिबात तिकीट नै ना. भेष्ट लिवलस भावा. लगोलग इनु पिलूया.
  • Log in or register to post comments

मराठी पिक्चर म्हणजे रडकथा

स्पा
गुरुवार, 05/05/2016 - 18:54 नवीन
मराठी पिक्चर म्हणजे रडकथा किंवा झ दर्जाचे विनोदपट हे समीकरण फिक्स आहे काही अपवाद सोडता. ते तसेच राहणार, मंजुळे पण चाकोरीबाहेर नाही जाणार, इथल्या पब्लिक ची नस अचुक गावलिये त्यांना. अवांतर: चला उद्या सिविल वाॅर रिलीज होतोय हुश्श
  • Log in or register to post comments

अवांतर: चला उद्या सिविल वाॅर

सच्चिदानंद
गुरुवार, 05/05/2016 - 19:32 नवीन
अवांतर: चला उद्या सिविल वाॅर रिलीज होतोय हुश्श
(वल्लींचे इतरत्र असेच प्रतिसाद पाहून, स्पा आणि वल्ली/प्रचेतस यांना मिळूनच प्रतिसाद) पहिली गोष्ट सिविल वॉरसारखे Y-Z दर्जाचे चित्रपट येतायत म्हणून "हुश्श" करण्यासारखे काय आहे? ते पण सैराटच्या धाग्यावर ? म्हणजे कितीही टुकार असला तरी शारुखचा आहे म्हणून "रावन" चांगलाच म्हणणार्‍या लोकांसारखं झालं ते. वरुन सैराटसारख्या एका चांगल्या प्रयत्नाशी तुलना करण्याचं प्रयोजनच काय ?
मराठी पिक्चर म्हणजे रडकथा किंवा झ दर्जाचे विनोदपट हे समीकरण फिक्स आहे काही अपवाद सोडता.
हे मान्यच आहे की. कोण नाही म्हणतंय. पण जसे लोक तसे राजकारणी आणि तशाच कलाकृती. पण जरा एखादी चांगली कलाकृती बनत असेल, तसा प्रयत्न होत असेल तर थोडे तरी चांगले म्हणावे की. लगेच "ते तसेच राहणार, मंजुळे पण चाकोरीबाहेर नाही जाणार, इथल्या पब्लिक ची नस अचुक गावलिये त्यांना." हे असले प्रेडिक्शन काय दर्शवते ? किमान या दोन आयडींकडून ही अपेक्षा नव्हती. बरीच मार्वल कॉमिक्स चांगली आहेत पण हा "सिविल वॉर" तद्दन टुकार चित्रपट आहे. बघायचाय त्यांनी बघावा. धागे पण काढावेत पण 'सैराट'च्या धाग्यावर येऊन "हुश्श" करुन उगी मानभावीपणा अथवा तसलं काही करुन दाखवण्याचे काही पटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सच्चिदानंद! !!!

स्पा
गुरुवार, 05/05/2016 - 19:34 नवीन
सच्चिदानंद! !!! सच्चिदानंद! !! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद

आम्हाला टुकारच चित्रपट

प्रचेतस
गुरुवार, 05/05/2016 - 20:01 नवीन
आम्हाला टुकारच चित्रपट पाहण्यास आवडतात. - अतिटुकार (प्रचेतस)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद

नाही हो वल्ली, आम्हाला पण

सच्चिदानंद
गुरुवार, 05/05/2016 - 20:06 नवीन
नाही हो वल्ली, आम्हाला पण टुकार पिच्चर आवडतातच पण म्हणून इतर धाग्यांवर जाऊन त्याची अशी हिणवल्यासारखी जाहिरात केलेली पटली नाही. तुमचा तिरकस प्रतिसाद पाहून तुम्हाला मुद्दा समजूनच घ्यायचा नाही असं दिसतंय तेव्हा असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्लीबोवा स्पापंत हे मोठे

अभ्या..
गुरुवार, 05/05/2016 - 23:50 नवीन
वल्लीबोवा स्पापंत हे मोठे लोक्स. त्यांची अ‍ॅटॅचमेंट डिरेक्ट न्युयोर्कला वाचवणार्‍या अ‍ॅव्हेंजर्सशी. शिवाय ते टेक्निकली हायफाय. करमाळा, सोलापूर तसे लै लांब. रिलेटच होत नै ना....यू नो..... असो. आमच्या दोस्ताला स्पावड्याला एक इनंती. डोक्याला शॉट तर तुझ्या भयकथा बी लावतेत रे. कशाला चांगल्या जिंदगीत पडके वाडे आन काळी मांजरे. तरीबी कौतुक करतोच ना. करावं तसं कधीतरी दुसर्‍याच्या बी स्टोरीचं. जबरदस्ती नाही. उगी दोस्तान्यात म्हणलो हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद

कसा चुकीचा अर्थ लावावा याचे

स्पा
Fri, 05/06/2016 - 07:22 नवीन
कसा चुकीचा अर्थ लावावा याचे उत्तम उदाहरण, शहर आणि गावाचा प्रश्न नाये भाऊ. असो सोलापूर दाखवलय म्हणून काहीही दाखवलं तरी चांगलच असे मत असेल तर बोलणे खुंटले. माझा शेवटचा प्रतिसाद, राहता राहिला प्रश्न माझ्या लिखाणाचा माझी कुणावरही जबरदस्ती नाही.नाही पटलं द्या सोडून,नाही आवडले लिहा बिनधास्त, उगा खोटे चान चान म्हणायला मला जमत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नै ब्वा.

प्रचेतस
Fri, 05/06/2016 - 09:37 नवीन
नै ब्वा. आम्ही पिटातले सामान्य प्रेक्षक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एक नंबर मित्रा!!!

राघवेंद्र
गुरुवार, 05/05/2016 - 19:02 नवीन
भारी लिहीले आहेस.
  • Log in or register to post comments

नागराज मंजुळेचा " जब्बार पटेल

चंद्रनील मुल्हेरकर
गुरुवार, 05/05/2016 - 19:17 नवीन
नागराज मंजुळेचा " जब्बार पटेल "व्हायला नको
  • Log in or register to post comments

ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला

वैभव जाधव
गुरुवार, 05/05/2016 - 19:34 नवीन
ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला... बाकी पॅक अप झाल्यावर प्रिन्स, पाटील, आर्ची परशा आणि सगळे एकत्र असतेत. कॅमेरा जिवंत करतो हे सगळं मान्य पण लै मनाला लाऊन घिऊ नका कुणी!
  • Log in or register to post comments

ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला

वैभव जाधव
गुरुवार, 05/05/2016 - 19:34 नवीन
ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला... बाकी पॅक अप झाल्यावर प्रिन्स, पाटील, आर्ची परशा आणि सगळे एकत्र असतेत. कॅमेरा जिवंत करतो हे सगळं मान्य पण लै मनाला लाऊन घिऊ नका कुणी!
  • Log in or register to post comments

'मेल्यावर सगळे मातीतच जातेत'

तर्राट जोकर
गुरुवार, 05/05/2016 - 19:52 नवीन
'मेल्यावर सगळे मातीतच जातेत' ह्याची आठवण झाली बघा. पूर्णत्वास पोचलेले तुम्ही अजून एक मेंबर दिसताय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

आपण च आमचे गुरु.

वैभव जाधव
गुरुवार, 05/05/2016 - 19:59 नवीन
आपण च आमचे गुरु. आमचं अभ्या लै इमोशनल हाय ओ. आर्टिष्ट गाबडी आसलीच. तेला समजून सांगायला अस्लं कायतरी, कवातरी. बाकी आपण 'फुल्ल' नाय कटींग वाले. नंतर गायछाप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

घे डब्बल.

अभ्या..
गुरुवार, 05/05/2016 - 23:50 नवीन
घे डब्बल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

आय मिस गायछाप :'(

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 05/06/2016 - 07:42 नवीन
आय मिस गायछाप :'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मायकेल एंजेलो शिल्पकार का

कंजूस
गुरुवार, 05/05/2016 - 20:44 नवीन
मायकेल एंजेलो शिल्पकार का चित्रकार असा प्रश्न पडू लागलाय मला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा