रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली.
म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय.
परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी.
आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला.
आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती.
खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती.
एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव.
.
आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल.
परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार.
होतेत...... अगदी असल्या स्टोर्या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.
वाचने
59761
प्रतिक्रिया
219
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरील भावांशी सहमत
सहमत...
In reply to वरील भावांशी सहमत by स्पा
अगदी अगदी मनातलच बोल्लास भो ,
In reply to वरील भावांशी सहमत by स्पा
लाईन ने या लाईन ने या...
In reply to अगदी अगदी मनातलच बोल्लास भो , by पियुशा
निदान पिक्चर मध्ये तरी शेवट गोड झाला पायजे.
In reply to वरील भावांशी सहमत by स्पा
आयला...जाम भारी!
सॉरी बिरी काय नाय ?
In reply to आयला...जाम भारी! by चांदणे संदीप
भिडलं रं भावड्या.... आरपार.
आपला मानुस बोलला च्या मायले
तंतोतंत
आनभव टेलींग म्हनत्यात का नाय या कलेला....
In reply to तंतोतंत by सोत्रि
बापूसाब, सोकाजीनाना आणि
In reply to आनभव टेलींग म्हनत्यात का नाय या कलेला.... by तुषार काळभोर
@अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन
एकदम धिंगाणा लिहिलंय.
जबराट परीक्षण.
बघनार बघनार....
+११
In reply to बघनार बघनार.... by आदूबाळ
बघायलाच हवाय आता.
सहमत
पिक्चर एकदम मस्त आहे पण शेवटी
+१००००
In reply to पिक्चर एकदम मस्त आहे पण शेवटी by विनू
केवळ क्लास लिहिलंय!
मस्त लिहिलंय भाऊ.
नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय
In reply to मस्त लिहिलंय भाऊ. by अप्पा जोगळेकर
बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड
In reply to नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय by तर्राट जोकर
बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड
In reply to नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय by तर्राट जोकर
a) SPECIAL MENTION
In reply to मस्त लिहिलंय भाऊ. by अप्पा जोगळेकर
CERTIFICATE For her effective
In reply to a) SPECIAL MENTION by तर्राट जोकर
आप्पा साहेब
In reply to मस्त लिहिलंय भाऊ. by अप्पा जोगळेकर
जिंदगीच्या उन्हातान्हात
लय भारी लिवलं
लय भारी !
अभ्या भावड्या
मराठी पिक्चर म्हणजे रडकथा
अवांतर: चला उद्या सिविल वाॅर
In reply to मराठी पिक्चर म्हणजे रडकथा by स्पा
सच्चिदानंद! !!!
In reply to अवांतर: चला उद्या सिविल वाॅर by सच्चिदानंद
आम्हाला टुकारच चित्रपट
In reply to अवांतर: चला उद्या सिविल वाॅर by सच्चिदानंद
नाही हो वल्ली, आम्हाला पण
In reply to आम्हाला टुकारच चित्रपट by प्रचेतस
वल्लीबोवा स्पापंत हे मोठे
In reply to नाही हो वल्ली, आम्हाला पण by सच्चिदानंद
कसा चुकीचा अर्थ लावावा याचे
In reply to वल्लीबोवा स्पापंत हे मोठे by अभ्या..
नै ब्वा.
In reply to वल्लीबोवा स्पापंत हे मोठे by अभ्या..
एक नंबर मित्रा!!!
नागराज मंजुळेचा " जब्बार पटेल
ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला
ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला
'मेल्यावर सगळे मातीतच जातेत'
In reply to ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला by वैभव जाधव
आपण च आमचे गुरु.
In reply to 'मेल्यावर सगळे मातीतच जातेत' by तर्राट जोकर
घे डब्बल.
In reply to आपण च आमचे गुरु. by वैभव जाधव
आय मिस गायछाप :'(
In reply to घे डब्बल. by अभ्या..
मायकेल एंजेलो शिल्पकार का
अभ्या, परिक्षण सुरेख लिहीलयंस
क्या बात वि ठा
In reply to अभ्या, परिक्षण सुरेख लिहीलयंस by विवेक ठाकूर
जातपात व सैराट ह्यावर संजय
In reply to अभ्या, परिक्षण सुरेख लिहीलयंस by विवेक ठाकूर
चित्रपटात तर जातीयवादावर
In reply to जातपात व सैराट ह्यावर संजय by कानडाऊ योगेशु
मग सिनेमाचा विषय काय आहे ?
In reply to चित्रपटात तर जातीयवादावर by तर्राट जोकर
सोनवणींनीच लिहलंय ना.
In reply to मग सिनेमाचा विषय काय आहे ? by विवेक ठाकूर
बापाचा अपमान होण्याचं कारण काय ?
In reply to सोनवणींनीच लिहलंय ना. by तर्राट जोकर
कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता
In reply to बापाचा अपमान होण्याचं कारण काय ? by विवेक ठाकूर
सैराटबद्दल स्वतः नागराज काय म्हणतो ते वाचा
In reply to कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता by तर्राट जोकर
आपला विषय काय आहे नक्की हे
In reply to सैराटबद्दल स्वतः नागराज काय म्हणतो ते वाचा by विवेक ठाकूर
मी कमीत कमी तीस उदाहरणे देईन.
In reply to आपला विषय काय आहे नक्की हे by तर्राट जोकर
सेम हिअर!!
In reply to मी कमीत कमी तीस उदाहरणे देईन. by अभ्या..
तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्ष करतायं
In reply to आपला विषय काय आहे नक्की हे by तर्राट जोकर
विठामाउली, नागराज काही
In reply to तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्ष करतायं by विवेक ठाकूर
तजो,
In reply to विठामाउली, नागराज काही by तर्राट जोकर
विवेकजी विवेकजी,
In reply to तजो, by विवेक ठाकूर
तुझ्या या विचाराशी
In reply to विवेकजी विवेकजी, by अभ्या..
उलट त्याने तसे पेटून घेतलेला
In reply to तुझ्या या विचाराशी by विवेक ठाकूर
जोकर भाऊ
In reply to आपला विषय काय आहे नक्की हे by तर्राट जोकर
सिनेमात पालकांचा अहंकार डिवजायला जात हेच कारण आहे
In reply to जोकर भाऊ by सुबोध खरे