Skip to main content

अवघा महाराष्ट्र सैराटमय

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 28/04/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत. अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल. कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात. अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 67199
प्रतिक्रिया 231

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम,
>> कुणी माणूस जर चित्रपट बघून त्यावरुन गुन्हेगार बनायचं ठरवत असेल तर त्याच्यात मूळ गुन्हेगारी >> वृत्ती असते आणि म्हणूनच त्याने असा अर्थ काढला असं म्हणता येईल.
मीही नेमकं हेच म्हणतोय. चित्रपट पाहणारे सर्वजण गुन्हेगार नसतात. त्यातले अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. मात्र अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू द्यावं का? असा प्रश्न आहे. गुन्ह्यांची जबाबदारी चित्रपटांवर ढकलणे हा माझ्या चर्चेचा हेतू नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चित्रपट पाहणारे सर्वजण गुन्हेगार नसतात. त्यातले अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. मात्र अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू द्यावं का? असा प्रश्न आहे
अगदी पटतय. मला तर वाटतं त्या अत्यल्प लोकांचा विचार करुन हे सिनेमे वैगेरे बनवणं बंदच केलं पाहिजे. नस्ते धंदे करतात. तिन्हीत्रिकाळ रामायण महाभारताचा रतीब घालायला हवा. हो, त्या रामायणातून रावणाचं पात्र ही काढून टाकावं. उगाच वाईट संस्कार नको व्हायला. हे सगळं कसं राबवायचं त्याचं काही वर्षांपूर्वीचं अफ़गाणी मॉडेलही आहे आपल्या समोर.

In reply to by अंतरा आनंद

कुंभकर्ण, मेघनाद, शूर्पणखा वगैरे सगळे काढा. उगाचच टेन्शन नको. दादासाहेब फाळके चुकलेच. उगाचच चित्रपटसृष्टीची सुरुवात केली.

सैराट आवडलाय , गारुड केलंय मनावर पण एके ठिकाणी सैराट च्या निमित्ताने जुन्या आठवणी लिहिल्या आहेत त्या वाचल्या. ती बाजूही पटली. त्यासाठी पुढील लिंक पहा. https://www.facebook.com/priya.prabhudesai.9/posts/1066214120115948

In reply to by पूर्वाविवेक

चित्रपट न पाहताच केलेले परिक्षण, भन्नाट आहे. ह्या ताइंचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते नाही कळले.

कुठल्या ताई? कसला नेमका प्रॉब्लेम ? तुम्हाला काय कळत नाहीये ? का एवढा त्रास करताय जीवाला? पिक्चर हाय तो शेवटी.......... :):)

In reply to by पूर्वाविवेक

तुम्हीच लिंक दिलीय ना फेबुवरची. ते समग्र लिखाण म्हणजे चित्रपट न पाहता अंदाजे पंचे आपली मते, आठवणींच्या स्वरुपात मांडली आहेत. आता प्रेमप्रकरणांबद्दल प्रत्येकाला आपली मते असण्याचा अधिकार आहे. ज्याच्या नशिबी जसे आयुष्य येते तसे त्याचे विचार होतात. पण त्याला न पाहिलेल्या चित्रपटाशी जोडून नकारात्मक, हिणवल्यासारखे लिहिणे पटले नाही. हिणवणं हा ही विरोधाचाच एक प्रकार असतो. ट्रेलरमधे ताईंना हिरोईनचे उन्नत उरोज दिसले, जे आम्हाला पुरुष असून आख्खा पिच्चर पाहतांना कधी जाणवले नाही.

In reply to by तर्राट जोकर

ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई', मी तिला अनेक दिवसापासून फोलो करते. ती जे लिहिते ते मला आवडत, पटत. तिने आजवर अनेक नव्या -जुन्या हिंदी, इग्रजी सिनेमाची परीक्षणे लिहिली आहेत. तिच्यामुळे मी अनेक जुने सिनेमे शोधून शोधून पहिले. हे माझे व्ययक्तिक मत आहे. असो...... आपल्याला वाटते हे लिहिण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. कुणाला काय आवडले? कुणाला काय खटकले ? कुणाला काय दिसले? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मान्य तुम्ही 'सैराट' fan क्लब चे सदस्य झाले आहात म्हणून तुम्हाला आवडेल असेच दुसऱ्याने बोलावे का? मलाही सैराट अत्यंत आवडला. प्रोमो पण आवडले, पहिल्याच दिवशी बघितला आम्ही. गाणी अजूनही सतत ऐकत आहे. पण म्हणून या निमित्ताने जर दुसरी बाजू कुणी मांडत असेल तर ती समजवूनही घ्यायची नाही का? इथेही मिपा वर 'सैराट : माझीही एक भर' या लेखावर अंतरा आनंद यांनी लिहिलंय........ 'नक्की बघा. मुलांनाही दाखवा. मुलगी पसंत, सासू हवी, आणि लाडकी सून या मालिकांमधल्या किंवा नुस्त्या पाठांतरावरल्या संस्कारांपेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं सुद्धा.' हे पण पटलं. कारण सैराट हा मला सिनेमा म्हणून खूप आवडला असला तरी मी दोन मुलींची आई पण आहे. माझ्या आई असलेल्या मनाला दुसऱ्या बाजू विचार करायला भाग पडतात. ही काळजी सैराट बघितला आणि मनात अचानक निर्माण झाली असे नाही, ती असतेच कायम. सैराटच्या निमित्ताने लोक लिहू लागलीत. वेगवेगळे पैलू समोर आले. वाचून ज्या गोष्टी पटल्या त्या मान्य करणे म्हणजे गुन्हा आहे कि काय?

In reply to by पूर्वाविवेक

त्यांनी जे लिहिले तो लिहिण्याचा अधिकार मी कुठे अमान्य केलाय का? त्यावर मीही त्यांचे लेखन 'माझे न आवडल्याचे मत मांडले' तर जो तुम्ही त्यांच्या "न आवडण्याच्या अधिकारा"साठी पवित्रा घेत आहात तोच माझ्यासाठी का नाही? आपल्याला वाटते हे लिहिण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. कुणाला काय आवडले? कुणाला काय खटकले ? कुणाला काय दिसले? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मान्य तुम्ही 'प्रिया प्रभुदेसाई' fan क्लब चे सदस्य झाले आहात म्हणून तुम्हाला आवडेल असेच दुसऱ्याने बोलावे का?

In reply to by पूर्वाविवेक

माझ्या लिखाणाच्या पद्धतीमुळे मला म्हणायचे आहे त्याचा चुकीचा अर्थ घेतलात आपण. हा पॅरा मला असा लिहायला आवडेल बेगडी संस्कार शिकवण्यापेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं एकमेकांना समजून घेत किती सुंदर होऊ शकतं हेसुध्दा (आणि त्या सुंदरतेचा आपल्या अंहभावाने कसा विचका होऊ शकतो हे आपणही बघावं) . मला वाटतं हे जास्त स्पष्ट आहे.

खिक्क्क ....... बोला बोला हवे ते बोला :) :P

अंतरा आनंद, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
>> मला तर वाटतं त्या अत्यल्प लोकांचा विचार करुन हे सिनेमे वैगेरे बनवणं बंदच केलं पाहिजे. नस्ते धंदे >> करतात. तिन्हीत्रिकाळ रामायण महाभारताचा रतीब घालायला हवा.
उत्तम कल्पना आहे. फक्त व्यासवाल्मिकींची प्रतिभा अंगी बाणवायची. हाय काय नाय काय! २.
>> हो, त्या रामायणातून रावणाचं पात्र ही काढून टाकावं. उगाच वाईट संस्कार नको व्हायला.
एकदा का प्रतिभेचा दुष्काळ संपला की अशा अडचणी चुटकीसरशी दूर होतील. चिंता नसावी. ३.
>> हे सगळं कसं राबवायचं त्याचं काही वर्षांपूर्वीचं अफ़गाणी मॉडेलही आहे आपल्या समोर.
अफगाण मॉडेल? हे कशाशी खातात? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अहो, व्यासवाल्मिकींची प्रतिभा अंगी बाणवायची काय गरज आहे, तयारच आहे ना रामायण म्हाभारत? तालिबान्यांसारखे सर्व च्यानेल्वरुन, सर्व थेटरात, सर्व भारतात तेच ८०च्या दशकातल्या रामायण म्हाभारत शिरेली दाखवायच्या

लोकहो, आज एक बातमी वाचण्यात आली : बीड जिल्ह्यातून १३ अल्पवयीन आणि अंबड (जिल्हा जालना) येथून १० प्रेमीयुगुल यांचे पलायन ! थोडक्यात काय की, सैराट पिक्चर चांगलं आहे. फक्त पळून जाणाऱ्यांत आपलं मूल नसेल तरंच. आ.न., -गा.पै.