Skip to main content

जनक हा जगाचा...

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 04/05/2016 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर : १. सदर धागा कोणत्याही वैचारिक विरोधासाठी काढलेला नाही. २. सदर धागा कशाचेही विडंबन नाही. ३. सदर धाग्याचा सांसदीय भाषेत काथ्या कुटणेस / दंगा घालणेस मुक्त परवानगी आहे. गेले चार-पाच दिवस मिपावर आलं की मनोमनी काही उन्मळून येत होते. जनीच्या तळीचे कळकळीने कंठाच्या गळी येत होते...! ...कंठाशी म्हणेस्तोवर ओठाशी येत होते ! ..आणि अखेर चार दिवसांच्या प्रतिसाद-मंथनानंतर आज ती विचार मौक्तिके मुक्तकरूपे साकार होऊन धागारूपे मूर्त झाली ! ते अनमोल मुक्तक मायबाप मिपाकरांसमोर पेश आहे... जनक हा जगाचा... बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता ! वात्सल्यसागर बाप ! कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती ! पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे. वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! पोटाची माया खरी बापाची ! रक्ताचे नाते बापसाचेच ! हम्म.. आता कसं गार गार वाटलं !! =)) =)) =))

वाचने 9441
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

अश्वमत्स्यांमध्ये नर पिलं जन्माला घालतात म्हणे. मिपाबायकांनी देवाकडे पुढचा जन्म अश्वमत्स्याचा मागावा.

In reply to by सतिश गावडे

अंड्याची पिशवी नराच्या पोटी घेतली जाते, थोडक्यात नर हा सरोगेट मदर असतो पिल्लांचा

मिपाबायकांनी देवाकडे पुढचा जन्म अश्वमत्स्याचा मागावा.
कशासाठी ? बाप होण्याची बिलकुल हौस नाही मिपाबायकांना !

In reply to by सस्नेह

बाबौ.. मिपाबायकांचा प्रतिवाद कोण करत बसणार? हे आधीच वाचलं असतं तर!... असो, शंभरी गाठायला आपद्ग्रस्तांसाठी

In reply to by सायकलस्वार

मदत