✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जनक हा जगाचा...

स
सस्नेह यांनी
Wed, 05/04/2016 - 17:21  ·  लेख
लेख
ढिस्क्लेमर : १. सदर धागा कोणत्याही वैचारिक विरोधासाठी काढलेला नाही. २. सदर धागा कशाचेही विडंबन नाही. ३. सदर धाग्याचा सांसदीय भाषेत काथ्या कुटणेस / दंगा घालणेस मुक्त परवानगी आहे. गेले चार-पाच दिवस मिपावर आलं की मनोमनी काही उन्मळून येत होते. जनीच्या तळीचे कळकळीने कंठाच्या गळी येत होते...! ...कंठाशी म्हणेस्तोवर ओठाशी येत होते ! ..आणि अखेर चार दिवसांच्या प्रतिसाद-मंथनानंतर आज ती विचार मौक्तिके मुक्तकरूपे साकार होऊन धागारूपे मूर्त झाली ! ते अनमोल मुक्तक मायबाप मिपाकरांसमोर पेश आहे... जनक हा जगाचा... बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता ! वात्सल्यसागर बाप ! कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती ! पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे. वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! पोटाची माया खरी बापाची ! रक्ताचे नाते बापसाचेच ! हम्म.. आता कसं गार गार वाटलं !! =)) =)) =))
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9412 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

२००..?

मोदक
Wed, 05/04/2016 - 17:27 नवीन
२००..?
  • Log in or register to post comments

=))

मन१
Wed, 05/04/2016 - 17:28 नवीन
आवरा...
  • Log in or register to post comments

हे देवा

नाखु
Wed, 05/04/2016 - 17:30 नवीन
वाचेल तर वाचेल का वाचेल या चळवळीचा सदस्य नाखु बापुस
  • Log in or register to post comments

उगाच?

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 17:34 नवीन
उगाच?
  • Log in or register to post comments

उगाच असे विचारून या

सस्नेह
Wed, 05/04/2016 - 18:59 नवीन
उगाच असे विचारून या विचारधनाचा अव्हेर करू नये. जमल्यास प्रतिवाद करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बाबौ..

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 21:07 नवीन
बाबौ.. मिपाबायकांचा प्रतिवाद कोण करत बसणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अहाहा!

पैसा
Wed, 05/04/2016 - 17:37 नवीन
ही मौक्तिके वाचून माझे डोळे खाडकन उघडले आहेत. निदान आजचा दिवस तरी माझ्या आयुष्यातल्या एका पुरुषाला छळणार नाही असा निर्धार या ठिकाणी करण्यात येत आहे. असे निसर्गसुलभ वरदान असताना लोक आयुष्यभर अविवाहित राहू का असे धागे काढतात हे बघून ड्वाले पाणावले. अशाने संस्कृती बुडेल की हो! (अजून बुडाली नसली तर!)
  • Log in or register to post comments

ही संस्कृती कोण?

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 17:38 नवीन
ही संस्कृती कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तीच ती

पैसा
Wed, 05/04/2016 - 17:42 नवीन
गरीब बिचारी! तिला मिपा बायका बुडवायला निघाल्या आहेत म्हणे. निदान पुर्शांनी तरी वाचवायला नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कोणी संस्कृतीरक्षक नैत का

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 17:43 नवीन
कोणी संस्कृतीरक्षक नैत का आजूबाजूला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिपावर आहेत म्हणे

पैसा
Wed, 05/04/2016 - 17:45 नवीन
मिपावर आहेत म्हणे! पण ते शनिदेवाच्या देवळात गेलेत बहुतेक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

साडेसाती सोडवायला का?

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 17:47 नवीन
साडेसाती सोडवायला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Wed, 05/04/2016 - 17:50 नवीन
=)) नै नै! तिथल्या बायका पण संस्कृतीला बुडवतात ना म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 17:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तिथल्या नै हो. बाहेरच्या.

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 18:21 नवीन
तिथल्या नै हो. बाहेरच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तीव्र आक्षेप

नाखु
गुरुवार, 05/05/2016 - 08:30 नवीन
संस्क्रुती बुडवायचा मक्ता/ठेका/हक्क नक्की कुणाकडे आहे? बायका की पुरुष? आण्खी खोलात पुरुषी बाया कि बाय्की बाप्प्ये ? एक्दा खुलासा करा म्हणजे निषेध्/समर्थन्/प्रतिवाद्/अनुवाद्/साम्यवाद्/राष्ट्रवाद्/हटवाद्/वादावाद करण्याचा विचार केला जाईल. अखिल मिपा बघता काय धागा काढा रे संघ संचालित लेखक प्रोत्साहन आणि संगोपन चळवळ उपक्रमांतर्गत वाचक हितार्थ जारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे काय आहे ?

जेपी
Wed, 05/04/2016 - 17:39 नवीन
हे काय आहे ? हे समजुन सांगितल्यास अजुन एक प्रतिसाद देईन.!
  • Log in or register to post comments

पितृस्तवन :)

मितान
Wed, 05/04/2016 - 17:42 नवीन
पितृस्तवन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

स्वामी तिन्ही जगाचा बापाविना

मितान
Wed, 05/04/2016 - 17:41 नवीन
स्वामी तिन्ही जगाचा बापाविना भिकारी हे राहिलं बघ =))
  • Log in or register to post comments

"मुलगी होणे शक्य असून होऊ न

कंजूस
Wed, 05/04/2016 - 17:42 नवीन
"मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ !" हा मुद्दा स्त्रियांकडूनच जास्ती मांडला जातो.प्रत्येकीला वरमाय व्हायचं असतं वधुमाय नव्हे. वरमाय होण्यात बय्राच जणींना गारगार वाटतं पण पुरुषांच्या खांद्याचा दमदमा करायला सोपं पडतं.
  • Log in or register to post comments

आता हा धागा काही गंभीर

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 18:00 नवीन
आता हा धागा काही गंभीर चर्चेचा धागा नाही तरीही... काका तुमचे बरोबर आहे.. पण असंही आहे ना की लग्नामध्ये नवर्‍यामुलाचे आणि त्याच्या कुटूंबीयांचे पाय धुणे, त्यांचा मानपान, त्यांना हुंडा, मुलीला दान देणे, मुलीने त्यांच्या कुळात आपले सर्व काही मागे सोडून जाणे, मुलीचे घर-नाव-कुळ सगळेच बदलणे, पुढेही सासरच्या कलाने घेत रहाणे इ इ अनेक गोष्टी विधीचा / रुढींचा भाग म्हणुनच अस्तित्वात आहेत. हे विधी अथवा रुढी काही केवळ स्त्रीयांनी एकत्र येऊन बनवल्या नव्हत्या आणि सामान्यतः त्या मोडणेही सर्वसामान्य व्य्क्तिच्या (त्यातही अशाच परंपरेत वाढलेल्या आणि स्वतःचे डोके चालवु न दिलेल्या बाईच्या) आवाक्यातली गोष्ट नाही. असे असताना त्या बाईस असेच दिसते की वरमाय मागण्या करत आहे आणि वधुमाय मान खाली घालुन मागण्या पुर्ण करत आहे. मग तिला आपण वरमायच व्हावे असे आपसुकच वाटणार नाही का? म्हणजे पोटी मुलगाच यावा असेही वाटणार नाही का? आजही मुलीच्या घरी रहाणेच काय तर तिच्याकडचे अन्न पाणीही वर्ज्य समजणारे लोक आहेत. अशा वेळेस म्हातारपणी "जावयाच्या दारात जाऊन पडण्यापेक्षा" लाथा खात का होईना आपल्या मुलाकडे रहाणे लोकांना श्रेयस्कर वाटते. हे सर्व एक चक्र आहे. जी बाई कधी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करु शकते, प्रथा मोडण्याची धमक दाखवु शकते, ती हे चक्र तिच्यापुरते तरी मोडतेच. मग तिला फरक पडत नाही वधुमाय की वरमाय ह्याने.. हळुहळु गोष्टी बदलत आहेत. बायका चक्र मोडत आहेत. वेळ लागेल पण होईल.. मला फक्त एखाद्या गोष्टीला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, मानसिक इ इ अनेक पैलु असताना केवळ मुलगा हवा म्हणणार्‍या बाईला एकटीलाच दोष देणे योग्य नाही असे वाटते. तिला तसं वाटायला समाजरचना कारणीभुत आहे. अनेकदा तिला हे वाटणे चुक आहे ह्याची सुद्धा जाणीव नसते. तिच्या समोर जस जशी उदाहरणे येतील, तशी ती बदलेले.. तस तसा समाजही बदलेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके

टवाळ कार्टा
Wed, 05/04/2016 - 18:06 नवीन
तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके चालवणे जमायला लाग्ले का? =)) या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच द्या...त्यानंतर पुढचा प्रश्न विचारतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुम्ही कोण लागुन गेलात म्हणे

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 18:08 नवीन
तुम्ही कोण लागुन गेलात म्हणे आणि?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कोणिही असू की...कि फर्क पैंदा

टवाळ कार्टा
Wed, 05/04/2016 - 18:15 नवीन
कोणिही असू की...कि फर्क पैंदा...उत्तर नाहीये ना तुम्च्याकडे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आमच्याकडे लाख उत्तर असेल..

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 18:30 नवीन
आमच्याकडे लाख उत्तर असेल.. तुमची कुवत आहे का समजण्याची? =)) चला जागेवर जाऊन बसा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आधी एक उत्तर द्यायला जमत असेल

टवाळ कार्टा
Wed, 05/04/2016 - 18:51 नवीन
आधी एक उत्तर द्यायला जमत असेल तर द्या की...उरलेल्या ९९९९९ उत्तरांचे नंतर बघू...आणि बघा बघा दुसर्यांची कुवत पहिल्यांदी कोण काढते ते रच्याकने इथे बसण्याइतकाही हा विषय महत्वाचा नाहीये =)) *अत्ता जिमला जायचे आहे...वेळ नसेल...खाली तजोबरोबरची म्याच पण डिक्लेर केलीत...ब्याट्याला बदली खेळाडू म्हणून बोल्वायचे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

निसर्गाने पुरुष मनाची रचनाच

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 17:48 नवीन
निसर्गाने पुरुष मनाची रचनाच अशी केली आहे की अपत्यप्राप्ती शिवाय त्याला पुर्णत्व नाही. आता मनाची जरी केली असली तरी देहाची तशी केलेली नसल्याने मग स्त्री देहाच्या मागे त्या देहाचे नखरे सहन करत फिरण्या वाचुन उपाय नाही. स्त्री देहाचा सर्वात मोठा नखरा म्हणजे लग्न! म्हणुन मग पुरुष देहास लग्न करावे लागते. आणि अपत्यप्राप्तीतुन पुर्णत्व मिळवावे लागते. पण हे करताना तो लग्न नावाच्या भुलभुलैयात अडकतो. आणि स्त्री देह त्यास आजन्म बोटाच्या इशार्‍यावर नाचवत रहातो. लोकांना वाटते की तो "ताटाखालचे मांजर" आहे किंवा "बायकोच्या मुठीत" आहे. पण त्याला पर्याय नसतो हे त्यांना कळत नाही. शेवटी निसर्गाचा उद्देशच ह्या देहाचे पुर्णत्व आहे.
  • Log in or register to post comments

हेच ते! या मिपाबायका फार्फार

रेवती
Wed, 05/04/2016 - 17:51 नवीन
हेच ते! या मिपाबायका फार्फार त्रास देतात.
  • Log in or register to post comments

काही गोष्टी पटल्या....काही पटल्या नाहीत......

मुक्त विहारि
Wed, 05/04/2016 - 17:54 नवीन
बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता! देव कृपेने जे बाप बनू शकले, त्यांनी प्रथम देवाचे आभार मानून, देवाने सोपवलेले अपत्य संगोपनाचे कार्य हसत-खेळत पुर्ण करावे आणि मग नातवंडांच्या सानिध्यात रमावे. काही करणांमुळे बाप बनू शकला नाहीत तर एखाद्या अनाथालयाला देणगी द्यावी आणि तिथल्या मुलांचे संगोपन करण्यात हातभार लावावा. स्वहस्ते लावलेले रोपटे वाढतांना फार आनंद होतो. --------------------------------------- वात्सल्यसागर बाप! हो. बाप असाच असतो. --------------------------------- कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती! संस्कृत कच्चे असल्याने आपला पास. ------------------------------------- पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. असे अजिबात नाही. मुळात मानव जात ही पृथ्वीतलावरील सगळ्यात स्वार्थी जात. देवाने मानवाला पृथ्वीवर पाठवले आणि पृथ्वीचा विनाश सुरु झाला. --------------------------------------------- बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे.वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. काहीही..... ---------------------------------------------- बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. हो. १००% सत्य. -------------------------------------- मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक!मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! ज्याचा त्याचा कौटुंबिक प्रश्र्न. -------------------------------------- पोटाची माया खरी बापाची!रक्ताचे नाते बापसाचेच! थोडा बदल "पोटाची माया खरी आई-बापाची!रक्ताचे नाते आई-बापसाचेच!" ====================================================== बाप ह्या विषयावरील " अभिजित थिटे" ह्यांची एक मस्त कविता. (http://www.esakal.com/esakal/20100620/4633423062601051076.htm) बाप ह्या विषयावरील अज्जुन एक कविता...ही कविता नक्की कुणी लिहिली ते माहीत नाही.... http://maharashtramajha.com/poems/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B/
  • Log in or register to post comments

हे काय पटलं नाही पिराताई,

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 17:56 नवीन
हे काय पटलं नाही पिराताई, इथल्या एका महापुरुषासाठी समस्त पुरुषांना तुम्ही टोमणे मारत आहात.
  • Log in or register to post comments

"माझ्या" बघण्यात जी उदाहरणे

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 18:02 नवीन
"माझ्या" बघण्यात जी उदाहरणे आहेत त्यावरुन मी लिहीते. मी फक्त माझा अनुभव लिहीत आहे. मला कुणाला टोमणे मारायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गरज असते म्हणून टोमणे मारत

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 18:11 नवीन
गरज असते म्हणून टोमणे मारत असतात हे नविनच कळले. तुमचा अनुभव म्हणजे नक्की काय समजावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गरज असतेच म्हणुनच टोमणे

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 18:14 नवीन
गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं.. पण हे आपल्याला कळणॅ अवघडच.. माझा अनुभव म्हणजे अंतिम सत्य.. संपला विषय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्क्रीनशॉट घ्यारे...नंतर

टवाळ कार्टा
Wed, 05/04/2016 - 18:16 नवीन
स्क्रीनशॉट घ्यारे...नंतर पुरावा म्हणून चिटकवता येईल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुमच्या विचारांमधे विसंगती

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 18:20 नवीन
तुमच्या विचारांमधे विसंगती आहे हे तुम्हाला कळत नाही का, वर म्हणताय मला टोमणे मारायची गरज नाही खाली म्हणता आहे. तुमच्या अशा खेळात पुरुषांना खेळणं बनवण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

विसंगती??? इम्पॉसिबल!!!

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 18:29 नवीन
"मला" टोमणे मारायची गरज नाहीच्चे.. "मला" पुर्णत्वाचा साक्षात्कार झालाय. मनाला बरं वाटायला वगैरे तुमच्या सारख्यांना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्ही एक स्त्री असून

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 18:36 नवीन
तुम्ही एक स्त्री असून पुरुषांना असे टोमणे कसे मारु शकता. स्त्रीदेह पुरुषाला झुलवतो की पुरुष स्त्रीदेहाला अन्न-वस्त्र-निवार्‍या-सन्मानाची आमिषं दाखवून फसवतो ह्याबद्दल तुम्हाला काडीचीही माहिती नाही, तुमच्या अंधाराचा चांगला उजेड पडलाय. पुरुषांच्या देहाबद्दल तुम्हाला असलेलं आकलन तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट दिसतंय. आता असले भंकस प्रतिसाद बंद केलेत तर बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओक्के!

पिलीयन रायडर
Wed, 05/04/2016 - 18:39 नवीन
ओक्के! (दिले असते हो अजुन प्रतिसाद पण आता घरी जायची वेळ झाली.. भुकही लागली आहे.. त्यात बेअरिंग सांभाळत कुठे डोकं शिणवु!! जात आता घरी..!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

श्या, असं काय करताय? आजून सेट

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 18:41 नवीन
श्या, असं काय करताय? आजून सेट नै झालो तर तुम्ही म्याच डिक्लेअर केली. चीटींग है राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गरज असतेच म्हणुनच टोमणे

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 18:24 नवीन
गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं
या वाक्यांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

............

नीलमोहर
Wed, 05/04/2016 - 17:57 नवीन
कृपया इथे माँ-बाप ऐवजी फक्त 'बाप' असे ऐकावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

लेखिकेला आपण काय लिहिलंय

वैभव जाधव
Wed, 05/04/2016 - 18:15 नवीन
लेखिकेला आपण काय लिहिलंय त्याचा पत्ता नाही आणि साक्षात्कार वगैरे होतो म्हणे... आठवा म्हणजे सातव्यानंतरचा नाही, स्मरण करा बोगदा! बाकी प्रतिसादकांना तर काहीही करुन खिदळण्याचीच संधी हवी असते. एकीने पान भरुन लिहिलंय पण त्यापेक्षा त्यावर टवाळ कार्टा ने दिलेला प्रतिसाद काहीसा योग्य नि विषयाला धरुन. तस्मात हा धागा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.... मिपा वर चे ज्येष्ठ लोक असे वाहवत चाललेले बघून वाईट वाटले. - पे ठा
  • Log in or register to post comments

आपणास मुद्दा समजलेला नाही.

सस्नेह
Wed, 05/04/2016 - 19:04 नवीन
आपणास मुद्दा समजलेला नाही. कनिष्ठांनी ज्येष्ठांचा आदर करण्यास शिकावे. तुमची समज फार जुनाट आहे. मोठे व्हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

समज हि समज असते. जुनाट किंवा

वैभव जाधव
Wed, 05/04/2016 - 20:32 नवीन
समज हि समज असते. जुनाट किंवा नवीन नसते. असो, तुमच्याशी काय चर्चा करणार? उगाच मला साक्षात्कार झाला म्हणायचं आणि इकडे सत्काराची वाट बघायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अरेरे, मासळीबाजार मांडलाय

सूड
Wed, 05/04/2016 - 18:24 नवीन
मिपाबायकांना मॅनर्स कधी येणार, ओन्ली गॉड क्नोज!! -गोठा
  • Log in or register to post comments

मासळीबाजार आणि गोठयाचा काय

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 18:26 नवीन
मासळीबाजार आणि गोठयाचा काय संबंध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ज्या व्यक्तीशी संबंधित चर्चा

सूड
Wed, 05/04/2016 - 20:11 नवीन
ज्या व्यक्तीशी संबंधित चर्चा आहे, ते कधी परस्परसंबंध असलेलं काही लिहीतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बहुधा..

नीलमोहर
Wed, 05/04/2016 - 20:41 नवीन
'गाई'ज ना मासोळी.. म्हणजेच मासळी आवडते ना, त्याबद्दल असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

स्नेहांकिता तै,_/\_

नूतन सावंत
Wed, 05/04/2016 - 18:29 नवीन
स्नेहांकिता तै,_/\_
  • Log in or register to post comments

शास्त्र काय सांगतं ...?

चौकटराजा
Wed, 05/04/2016 - 18:34 नवीन
मग..... शास्त्र काय सांगतं ..... बाप व्हावं की नाय ...? ....ओ ओ ओ ओ ओ बुवा....?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा