Skip to main content

जनक हा जगाचा...

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 04/05/2016 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर : १. सदर धागा कोणत्याही वैचारिक विरोधासाठी काढलेला नाही. २. सदर धागा कशाचेही विडंबन नाही. ३. सदर धाग्याचा सांसदीय भाषेत काथ्या कुटणेस / दंगा घालणेस मुक्त परवानगी आहे. गेले चार-पाच दिवस मिपावर आलं की मनोमनी काही उन्मळून येत होते. जनीच्या तळीचे कळकळीने कंठाच्या गळी येत होते...! ...कंठाशी म्हणेस्तोवर ओठाशी येत होते ! ..आणि अखेर चार दिवसांच्या प्रतिसाद-मंथनानंतर आज ती विचार मौक्तिके मुक्तकरूपे साकार होऊन धागारूपे मूर्त झाली ! ते अनमोल मुक्तक मायबाप मिपाकरांसमोर पेश आहे... जनक हा जगाचा... बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता ! वात्सल्यसागर बाप ! कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती ! पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे. वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! पोटाची माया खरी बापाची ! रक्ताचे नाते बापसाचेच ! हम्म.. आता कसं गार गार वाटलं !! =)) =)) =))

वाचने 9486
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

ही मौक्तिके वाचून माझे डोळे खाडकन उघडले आहेत. निदान आजचा दिवस तरी माझ्या आयुष्यातल्या एका पुरुषाला छळणार नाही असा निर्धार या ठिकाणी करण्यात येत आहे. असे निसर्गसुलभ वरदान असताना लोक आयुष्यभर अविवाहित राहू का असे धागे काढतात हे बघून ड्वाले पाणावले. अशाने संस्कृती बुडेल की हो! (अजून बुडाली नसली तर!)

In reply to by प्रचेतस

गरीब बिचारी! तिला मिपा बायका बुडवायला निघाल्या आहेत म्हणे. निदान पुर्शांनी तरी वाचवायला नको?

In reply to by सतिश गावडे

संस्क्रुती बुडवायचा मक्ता/ठेका/हक्क नक्की कुणाकडे आहे? बायका की पुरुष? आण्खी खोलात पुरुषी बाया कि बाय्की बाप्प्ये ? एक्दा खुलासा करा म्हणजे निषेध्/समर्थन्/प्रतिवाद्/अनुवाद्/साम्यवाद्/राष्ट्रवाद्/हटवाद्/वादावाद करण्याचा विचार केला जाईल. अखिल मिपा बघता काय धागा काढा रे संघ संचालित लेखक प्रोत्साहन आणि संगोपन चळवळ उपक्रमांतर्गत वाचक हितार्थ जारी.

"मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ !" हा मुद्दा स्त्रियांकडूनच जास्ती मांडला जातो.प्रत्येकीला वरमाय व्हायचं असतं वधुमाय नव्हे. वरमाय होण्यात बय्राच जणींना गारगार वाटतं पण पुरुषांच्या खांद्याचा दमदमा करायला सोपं पडतं.

In reply to by कंजूस

आता हा धागा काही गंभीर चर्चेचा धागा नाही तरीही... काका तुमचे बरोबर आहे.. पण असंही आहे ना की लग्नामध्ये नवर्‍यामुलाचे आणि त्याच्या कुटूंबीयांचे पाय धुणे, त्यांचा मानपान, त्यांना हुंडा, मुलीला दान देणे, मुलीने त्यांच्या कुळात आपले सर्व काही मागे सोडून जाणे, मुलीचे घर-नाव-कुळ सगळेच बदलणे, पुढेही सासरच्या कलाने घेत रहाणे इ इ अनेक गोष्टी विधीचा / रुढींचा भाग म्हणुनच अस्तित्वात आहेत. हे विधी अथवा रुढी काही केवळ स्त्रीयांनी एकत्र येऊन बनवल्या नव्हत्या आणि सामान्यतः त्या मोडणेही सर्वसामान्य व्य्क्तिच्या (त्यातही अशाच परंपरेत वाढलेल्या आणि स्वतःचे डोके चालवु न दिलेल्या बाईच्या) आवाक्यातली गोष्ट नाही. असे असताना त्या बाईस असेच दिसते की वरमाय मागण्या करत आहे आणि वधुमाय मान खाली घालुन मागण्या पुर्ण करत आहे. मग तिला आपण वरमायच व्हावे असे आपसुकच वाटणार नाही का? म्हणजे पोटी मुलगाच यावा असेही वाटणार नाही का? आजही मुलीच्या घरी रहाणेच काय तर तिच्याकडचे अन्न पाणीही वर्ज्य समजणारे लोक आहेत. अशा वेळेस म्हातारपणी "जावयाच्या दारात जाऊन पडण्यापेक्षा" लाथा खात का होईना आपल्या मुलाकडे रहाणे लोकांना श्रेयस्कर वाटते. हे सर्व एक चक्र आहे. जी बाई कधी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करु शकते, प्रथा मोडण्याची धमक दाखवु शकते, ती हे चक्र तिच्यापुरते तरी मोडतेच. मग तिला फरक पडत नाही वधुमाय की वरमाय ह्याने.. हळुहळु गोष्टी बदलत आहेत. बायका चक्र मोडत आहेत. वेळ लागेल पण होईल.. मला फक्त एखाद्या गोष्टीला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, मानसिक इ इ अनेक पैलु असताना केवळ मुलगा हवा म्हणणार्‍या बाईला एकटीलाच दोष देणे योग्य नाही असे वाटते. तिला तसं वाटायला समाजरचना कारणीभुत आहे. अनेकदा तिला हे वाटणे चुक आहे ह्याची सुद्धा जाणीव नसते. तिच्या समोर जस जशी उदाहरणे येतील, तशी ती बदलेले.. तस तसा समाजही बदलेल...

In reply to by पिलीयन रायडर

तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके चालवणे जमायला लाग्ले का? =)) या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच द्या...त्यानंतर पुढचा प्रश्न विचारतो

In reply to by पिलीयन रायडर

कोणिही असू की...कि फर्क पैंदा...उत्तर नाहीये ना तुम्च्याकडे =))

In reply to by टवाळ कार्टा

आमच्याकडे लाख उत्तर असेल.. तुमची कुवत आहे का समजण्याची? =)) चला जागेवर जाऊन बसा..

In reply to by पिलीयन रायडर

आधी एक उत्तर द्यायला जमत असेल तर द्या की...उरलेल्या ९९९९९ उत्तरांचे नंतर बघू...आणि बघा बघा दुसर्यांची कुवत पहिल्यांदी कोण काढते ते रच्याकने इथे बसण्याइतकाही हा विषय महत्वाचा नाहीये =)) *अत्ता जिमला जायचे आहे...वेळ नसेल...खाली तजोबरोबरची म्याच पण डिक्लेर केलीत...ब्याट्याला बदली खेळाडू म्हणून बोल्वायचे का? ;)

निसर्गाने पुरुष मनाची रचनाच अशी केली आहे की अपत्यप्राप्ती शिवाय त्याला पुर्णत्व नाही. आता मनाची जरी केली असली तरी देहाची तशी केलेली नसल्याने मग स्त्री देहाच्या मागे त्या देहाचे नखरे सहन करत फिरण्या वाचुन उपाय नाही. स्त्री देहाचा सर्वात मोठा नखरा म्हणजे लग्न! म्हणुन मग पुरुष देहास लग्न करावे लागते. आणि अपत्यप्राप्तीतुन पुर्णत्व मिळवावे लागते. पण हे करताना तो लग्न नावाच्या भुलभुलैयात अडकतो. आणि स्त्री देह त्यास आजन्म बोटाच्या इशार्‍यावर नाचवत रहातो. लोकांना वाटते की तो "ताटाखालचे मांजर" आहे किंवा "बायकोच्या मुठीत" आहे. पण त्याला पर्याय नसतो हे त्यांना कळत नाही. शेवटी निसर्गाचा उद्देशच ह्या देहाचे पुर्णत्व आहे.

बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता! देव कृपेने जे बाप बनू शकले, त्यांनी प्रथम देवाचे आभार मानून, देवाने सोपवलेले अपत्य संगोपनाचे कार्य हसत-खेळत पुर्ण करावे आणि मग नातवंडांच्या सानिध्यात रमावे. काही करणांमुळे बाप बनू शकला नाहीत तर एखाद्या अनाथालयाला देणगी द्यावी आणि तिथल्या मुलांचे संगोपन करण्यात हातभार लावावा. स्वहस्ते लावलेले रोपटे वाढतांना फार आनंद होतो. --------------------------------------- वात्सल्यसागर बाप! हो. बाप असाच असतो. --------------------------------- कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती! संस्कृत कच्चे असल्याने आपला पास. ------------------------------------- पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. असे अजिबात नाही. मुळात मानव जात ही पृथ्वीतलावरील सगळ्यात स्वार्थी जात. देवाने मानवाला पृथ्वीवर पाठवले आणि पृथ्वीचा विनाश सुरु झाला. --------------------------------------------- बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे.वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. काहीही..... ---------------------------------------------- बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. हो. १००% सत्य. -------------------------------------- मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक!मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! ज्याचा त्याचा कौटुंबिक प्रश्र्न. -------------------------------------- पोटाची माया खरी बापाची!रक्ताचे नाते बापसाचेच! थोडा बदल "पोटाची माया खरी आई-बापाची!रक्ताचे नाते आई-बापसाचेच!" ====================================================== बाप ह्या विषयावरील " अभिजित थिटे" ह्यांची एक मस्त कविता. (http://www.esakal.com/esakal/20100620/4633423062601051076.htm) बाप ह्या विषयावरील अज्जुन एक कविता...ही कविता नक्की कुणी लिहिली ते माहीत नाही.... http://maharashtramajha.com/poems/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE…

हे काय पटलं नाही पिराताई, इथल्या एका महापुरुषासाठी समस्त पुरुषांना तुम्ही टोमणे मारत आहात.

In reply to by तर्राट जोकर

"माझ्या" बघण्यात जी उदाहरणे आहेत त्यावरुन मी लिहीते. मी फक्त माझा अनुभव लिहीत आहे. मला कुणाला टोमणे मारायची गरज नाही.

In reply to by पिलीयन रायडर

गरज असते म्हणून टोमणे मारत असतात हे नविनच कळले. तुमचा अनुभव म्हणजे नक्की काय समजावे?

In reply to by तर्राट जोकर

गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं.. पण हे आपल्याला कळणॅ अवघडच.. माझा अनुभव म्हणजे अंतिम सत्य.. संपला विषय..

In reply to by पिलीयन रायडर

स्क्रीनशॉट घ्यारे...नंतर पुरावा म्हणून चिटकवता येईल =))

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्या विचारांमधे विसंगती आहे हे तुम्हाला कळत नाही का, वर म्हणताय मला टोमणे मारायची गरज नाही खाली म्हणता आहे. तुमच्या अशा खेळात पुरुषांना खेळणं बनवण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही.

In reply to by तर्राट जोकर

"मला" टोमणे मारायची गरज नाहीच्चे.. "मला" पुर्णत्वाचा साक्षात्कार झालाय. मनाला बरं वाटायला वगैरे तुमच्या सारख्यांना...

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही एक स्त्री असून पुरुषांना असे टोमणे कसे मारु शकता. स्त्रीदेह पुरुषाला झुलवतो की पुरुष स्त्रीदेहाला अन्न-वस्त्र-निवार्‍या-सन्मानाची आमिषं दाखवून फसवतो ह्याबद्दल तुम्हाला काडीचीही माहिती नाही, तुमच्या अंधाराचा चांगला उजेड पडलाय. पुरुषांच्या देहाबद्दल तुम्हाला असलेलं आकलन तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट दिसतंय. आता असले भंकस प्रतिसाद बंद केलेत तर बरं.

In reply to by तर्राट जोकर

ओक्के! (दिले असते हो अजुन प्रतिसाद पण आता घरी जायची वेळ झाली.. भुकही लागली आहे.. त्यात बेअरिंग सांभाळत कुठे डोकं शिणवु!! जात आता घरी..!)

In reply to by पिलीयन रायडर

श्या, असं काय करताय? आजून सेट नै झालो तर तुम्ही म्याच डिक्लेअर केली. चीटींग है राव.

In reply to by पिलीयन रायडर

गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं
या वाक्यांशी सहमत.

लेखिकेला आपण काय लिहिलंय त्याचा पत्ता नाही आणि साक्षात्कार वगैरे होतो म्हणे... आठवा म्हणजे सातव्यानंतरचा नाही, स्मरण करा बोगदा! बाकी प्रतिसादकांना तर काहीही करुन खिदळण्याचीच संधी हवी असते. एकीने पान भरुन लिहिलंय पण त्यापेक्षा त्यावर टवाळ कार्टा ने दिलेला प्रतिसाद काहीसा योग्य नि विषयाला धरुन. तस्मात हा धागा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.... मिपा वर चे ज्येष्ठ लोक असे वाहवत चाललेले बघून वाईट वाटले. - पे ठा

In reply to by वैभव जाधव

आपणास मुद्दा समजलेला नाही. कनिष्ठांनी ज्येष्ठांचा आदर करण्यास शिकावे. तुमची समज फार जुनाट आहे. मोठे व्हा ;)

In reply to by सस्नेह

समज हि समज असते. जुनाट किंवा नवीन नसते. असो, तुमच्याशी काय चर्चा करणार? उगाच मला साक्षात्कार झाला म्हणायचं आणि इकडे सत्काराची वाट बघायची.

In reply to by सतिश गावडे

ज्या व्यक्तीशी संबंधित चर्चा आहे, ते कधी परस्परसंबंध असलेलं काही लिहीतात का?

फक्त 40 प्रतिसाद ? श्शी बै ! अशानं माझा सत्कार कधी होणार ? (काळजीत) स्नेहा

In reply to by सस्नेह

मक्कायतर, त्या पिरातैंनी एकतर्फी म्याच डिक्लेअर केली नाहीतर दिडशे पार आरामात दोघांनीच धावफलक पोचवला असता. गांगुलीने द्रविडसोबत जे केले आक्षी त्याचेच स्मरण झालें.

In reply to by तर्राट जोकर

यावरून स्त्रीच स्त्रीला पुढे जाण्याची संधी मिळू देत नाही असे मानावे काय?????

हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ती ला, 'जनक राजाची गोष्ट' या पुस्तकाचा संच ,एक नारळ,एक शाल,एक पालखी ,एक आब्दगिरी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम अजाण कार्यकर्ते..

In reply to by जेपी

सत्कारात देण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये एक 'पुरूष सूक्तम' ची प्रत पण अ‍ॅडऑन करा

करायचे असतील तर आत्मबंध याना इथे ओढा मग निरर्थक .....आगोबा ,नाखु......झालाच तर पान्दुब्बा अभ्या . ह्भप सर,सुड्राव यांची बंध ची लाइन लावतो.

In reply to by चौकटराजा

सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी, अंकल नाखुन, पान्दूबा, सर वगैरे इथे येउन इथे २०० करतील हा तुमचा समज आहे. ;)

In reply to by नाखु

आता दोनशे कारायचेच आहेत तेंव्हा सर म्हणजे काय? ह भ प याचा पर्यायी लॉन्गफॉर्म काय,? ज्ञानेश्वरी ज्या निर्मितीचा काळ काय ? असे प्रश्न सुचवितो . तूर्तास सर म्हण्जे सर इतकेच सुचवितो. म्हजे ज्यानी सिंहगड रस्ता सर केला आहे ते !