✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अवघा महाराष्ट्र सैराटमय

प
प्रमोद देर्देकर यांनी
गुरुवार, 04/28/2016 - 09:27  ·  लेख
लेख
नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत. अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल. कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात. अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन
आस्वाद
बातमी

प्रतिक्रिया द्या
66868 वाचन

💬 प्रतिसाद (231)

प्रतिक्रिया

ई स्क्वेअर ला हाच अनुभव आला

सत्याचे प्रयोग
Fri, 04/29/2016 - 19:02 नवीन
सकाळी ९ च्या शोला फुल्ल धिंगाणा घातला लोकांनी प्रथमच अनुभव आला असा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी अगदी,

अभ्या..
Fri, 04/29/2016 - 18:34 नवीन
अगदी अगदी, आमच्या हिकडं अ‍ॅडलॅबचा आणी प्रभातचा रस्ता ब्लॉक चक्क. सगळं पब्लिक सैराट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हे राडा घालणारं पब्लिक

सतिश गावडे
Fri, 04/29/2016 - 20:24 नवीन
हे राडा घालणारं पब्लिक नेहमीचंच राडा घालणारं पब्लिक असेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

नेहमीचंच म्हणजे?

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 22:03 नवीन
नेहमीचंच म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आताच थोड्यावेळापुर्वी फॅनची

मराठी कथालेखक
Fri, 04/29/2016 - 15:54 नवीन
आताच थोड्यावेळापुर्वी फॅनची तिकिटं घ्यायला मल्टीप्लेक्सला गेलो तेव्हा सैराट हाऊसफूल्ल चाललाय अस दिसलं. मी वगळता बाकीचे सगळेच जण सैराटच्या तिकिटांचीच मागणि करत होते. आणि सैराटमध्ये फारसा रस नसतानाही तिकिटबारीवरील ते दृश्य सुखावलो. संगीत अजून अगदी नीट ऐकलं नाही. पण एकूणात अजय-अतुलचं संगीत अनेकदा आवडतंच (मी कुणाचाही भक्त नाही , हिंदी मध्ये SEL चा चाहता आहे पण तरी त्यांचीही काही गाणि नाही आवडली तर नाही आवडली असंच म्हणतो).
  • Log in or register to post comments

शालेय मुलांच्या

हेमंत लाटकर
Fri, 04/29/2016 - 23:40 नवीन
शालेय मुलांच्या प्रेमप्रकरणावर आधारित पिक्चर काढून मुलांच्या मनावर वाईट संस्कार होत आहेत. अभ्यास करण्याच्या वयात प्रेम त्यावरून मुलात भांडणे या गोष्टीत वाढ होत आहे.
  • Log in or register to post comments

काका,

पुणेकर भामटा
Sat, 04/30/2016 - 01:18 नवीन
लवकर चांगल्या डाॅक्टरचा सल्ला घ्या, अपचन आरोग्याला हानीकारक असते। आपला नम्र पुतण्या, भामटा।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

उच्च कलाकृती. हॅट्स ऑफ

मितभाषी
Sat, 04/30/2016 - 12:27 नवीन
उच्च कलाकृती. हॅट्स ऑफ नागराज. चला हवा येउ द्या मधे अरविंद जगताप ने म्हटल्याप्रमाणे नागराज हा दिवानखान्यातला मनिप्लांट नाही तर पडक्या भिंतीवर आपसूक उगवणारा , कुणाच्या खतपाण्यावर अवलंबून नसणारा "स्वयंभू" आहे. हे परत एकदा सिध्द झाले.
  • Log in or register to post comments

सैराटच्या लॉसएंजिलीसमधे झालेल्या रेकॉर्डींगची क्लीप!

विवेक ठाकूर
Sat, 04/30/2016 - 16:23 नवीन
वॉट अ ग्रेट सिंफनी ! आणि मराठी मनाला भावेल असा, ग्रामीण मातीचा (फोक) स्वर पाश्चात्य ऑरकेस्ट्रेशनमधून इतक्या प्रभावीपणे मिळवणं. ते ही नोटेशन्स न लिहीता येणार्‍या संगीतकारांनी... अजय-अतुल केवळ सलाम!
  • Log in or register to post comments

काल च सैराट पहिला

rahul ghate
Sat, 04/30/2016 - 17:34 नवीन
उत्सुकते पोटी १स्त दिवस 1st day 1st show , आणि सर्व नकारात्मक प्रतिक्रिया देणार्यांची कीव वाटली , अतिशय वास्तवदर्शी कथा चं प्रकारे रंगवली आहे , खरच शेवटचा १ तास चित्रपट बघायला कठीण आहे ,
  • Log in or register to post comments

उत्तम संगीत व सादरीकरण

सिरुसेरि
Sat, 04/30/2016 - 20:15 नवीन
सैराट मधील गाण्यांचे संगीत व सादरीकरण , चित्रिकरण अप्रतीम आहे . अजय-अतुल , यांतील कलाकार , दिग्दर्शक नागराज मंजुळे , निर्माते झी टिवी या सर्वच टिमने आपापली कामगिरि चोख बजावली आहे . साउथमध्ये ग्रामीण बाज असलेले चित्रपट खुप पुर्वीपासुन बनत असल्याने कदाचित सैराट मधील गाण्यांवर साउथची छाप वाटु शकते ( उदाहरणादाखल खालील लिंक्स ). पण सैराट मधील गाण्यांनी स्वताची वेगळी , तोडीस तोड , सरस ओळख निर्माण केली आहे . सैराट मधील गाण्यांचे सादरीकरण , चित्रिकरण खुप संयमित , वास्तववादी आहे . https://www.youtube.com/watch?v=A0BPkm95-dc https://www.youtube.com/watch?v=_Mjr3rDvQtg https://www.youtube.com/watch?v=H6rUress3Q8
  • Log in or register to post comments

मराठ्यांनो....जे वास्तव आहे

खटपट्या
Sun, 05/01/2016 - 01:20 नवीन
मराठ्यांनो....जे वास्तव आहे ते स्विकारा अन् चुका सुधारुन प्रगती करा !!!! - अमरजित पाटील.(९८५०९८१००९) "सैराट"ने मराठा समाजातील सरंमजामशाही मानसिकता आजही कायम असलेले वास्तव अधोरेखित केले आहे."सैराट"ला केला जाणारा विरोध हा सरंमजामशाही मानसिकता आज बदली गेली नसल्याचा पुरावाच आहे. मराठा समाजात पोरीने जातीबाहेर प्रेम अथवा लग्न केले तर पोटच्या पोरीचा मुडदा पाडणारी अनेक प्रकरणे घडली आहेत.घडत आहेत.हे कडवट सत्य कितीही नाकारायचे नाटक केले तरी वास्तव बदलत नाही.आपल्या देशात जातीव्यवस्था जरी ब्राम्हणांनी निर्माण केलेली असली तरी ती कट्टरपणे जोपासण्यात मराठ्यांचा नंबर बराच वरचा आहे.आणि हिच सरंमजामशाही मानसिकता मराठा समाजाच्या सामाजिक,सांस्कृ तिक,शैक्षणिक,अर्थिक अशा अनेक क्षेत्रातील अधोगतीचे कारण आहे. नागराज मंजुळेंनी मराठा समाजाच्या या ठसठसत्या बेंडावरतीच नेमके भाष्य करणारे "सैराट" सादरीकरण केल्यामुळेच अनेक मराठ्यांना र्मिच्या झोंबल्या आहेत.मराठा समाजाची सार्वजनिक वागणूक कायम दुटप्पी राहिली आहे.उदा :- आम्हाला शरद पवार मराठा आहेत म्हणून अभिमान असतो, पण याच शरद पवारांच्या घरातील "सोशल इंजिनियरींग" आम्ही मरेपर्यंत स्विकारायला तयार नसतो.दुसरे उदाहरण म्हणजे,आम्हाला ओ.बी.सी.मधून आरक्षण पाहिजे पण आम्ही आमचा वर्णवर्चस्वातून आलेला उच्चपणा सोडायला तयार नसतो.येवढेच काय ? आपल्याला या वास्तवाची ठसठसणारी जखम उघडी करुन दाखवली तरी आम्ही त्याला सरंमजामशाही मानसिकता दाखवत शिव्या घालणारच...मग तो नागराज मंजुळे असो वा अमरजित पाटील !!! निळू फुले म्हणतात त्यावर माझा कायम विश्वास आहे. "समाज कधी तमाशाने बिघडत नसतो अन् किर्तनांने सुधरत नसतो."हे एक सार्वकालिक सत्य आहे.
  • Log in or register to post comments

+१ अमराजीत पाटील आणि निळू फुले

तुषार काळभोर
Sun, 05/01/2016 - 06:18 नवीन
पण असली अस्मितेची गळवे सगळ्यांनाच असतात. जातीय व धार्मिक अस्मिता (सगळ्यांच्याच) ठेचायला हव्यात. कारण त्यात एकाची समर्थनीय व दुसऱ्याची निंदनीय असा भेद करता येत नाही. बाकी, निळू फुलेंचं वाक्य "समाज तमाशाने बिघडत नाही अन किर्तनाने सुधारत नाही", हे मिपावरच्या काही 'अलोकनाथांना' कसे समजावून सांगता येईल? @खटपट्या: यातला एकही शब्द वैयक्तिक तुमच्यासाठी नाहीये. मी फक्त मिपावर कधीकधी (आजकाल बऱ्याचदा) दिसणारी सर्वधर्मीय, सर्वजातीय, सर्वस्तरीय असहिष्णुता पाहून वैतागलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

नो प्रोब्लेम पैलवान, आय कॅन

खटपट्या
Sun, 05/01/2016 - 07:59 नवीन
नो प्रोब्लेम पैलवान, आय कॅन अंडरस्टँड...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

असे वाच्नात आले कि...........

अविनाशकुलकर्णी
Sun, 05/01/2016 - 06:25 नवीन
असे वाच्नात आले कि............... तेलगू मधील बारा वर्षापूर्वी आलेल्या प्रेमिस्ते चित्रपट आहे त्या वर हा शिणेमा आधारित आहे
  • Log in or register to post comments

टाईमपास आणि सैराट या दोन

हेमंत लाटकर
Sun, 05/01/2016 - 07:33 नवीन
टाईमपास आणि सैराट या दोन पिक्चर मधील शेवट एकदम भिन्न आहे.
  • Log in or register to post comments

सैराट चित्रपट परिक्षणः

तर्राट जोकर
Sun, 05/01/2016 - 20:48 नवीन
सैराट चित्रपट परिक्षणः आधी अधीर झालुया | मग बधीर झालुया [ह्या चित्रपटाचे परिक्षण लिहू नये असे मी ठरवले आहे. प्रत्येकाने मिळेल तेव्हा मिळेल तसा मूळ चित्रपटच बघून घ्यावा. नको असलेल्यांना बघण्याची काही एक आवश्यकता नाही. वरणभातावर एक चमचा तूप अजून ओतून घ्या आणि टीवी चे रिमोट हाती घ्या.] जमले तर भाष्य लिहीन कधीतरी उशिरा. आता जाता जाता एवढेच. की मंजुळेने एक नवाच प्रकार निर्माण केला आहे चित्रपटसंस्कृतीत (इतर भाषेत झाला असल्यास नै माहित). प्रेक्षक हे सिनेमाचा भाग बनवणे तेही चित्रगॄहात येण्याच्या कैक काळाआधीपासून आणि मग चित्रपटाला प्रेक्षकांचा भाग बनवणे थिएटर सोडल्यानंतर कैक काळ. -अर्थात संवेदनाशील मनांस लागू.
  • Log in or register to post comments

फँड्री अफाट होता.

बोका-ए-आझम
Mon, 05/02/2016 - 00:58 नवीन
त्या मानाने सैराट ठीक आहे. फँड्रीची कथाच जबरदस्त होती. कदाचित म्हणूनच नागराज मंजुळेनं तेव्हा संगीत हा एवढा महत्त्वाचा मुद्दा केला नव्हता. सैराटच्या कथेत तसं नाविन्य नाहीये. फँड्रीला मी ५ पैकी ५ मार्क दिले होते. सैराटला ५ पैकी ३. पण सैराटची गाणी मस्त आहेत. पंजाबी गाण्यांना ठेका धरणाऱ्यांना आवडेल असं संगीत आहे. ज्याचे पाय आपसूक ताल धरणार नाहीत त्याचा काहीतरी problem आहे किंवा मग तो औरंगजेबाचा पुनर्जन्म आहे. बाकी मिपालोकनाथांचा त्रागा बघून गंमत वाटली. १९७२ च्या बाॅबी पासून आपल्याकडे teen ager प्रेमकथा येताहेत. राज कपूरने हिंदीत केलेलं चालतं आणि नागराजने मराठीत केलेलं चालत नाही? मुळात ज्याला बिघडायचं आहे तो शिवमहिम्नस्तोत्र आणि रामरक्षा वाचूनही बिघडू शकतोच की.
  • Log in or register to post comments

बर्‍याच अंशी सहमत.

तर्राट जोकर
Mon, 05/02/2016 - 01:11 नवीन
बर्‍याच अंशी सहमत. रसग्रहणाबद्दल टेस्टबड्स वेगळ्या असू शकतात. बाकी मिपालोकनाथांचा प्रश्न नाही. कुणीतरी फेसबुक फॉरवर्ड इकडे चिटकवलं. ती मुलगी रीअल लाईफमधे ७वीत असतांना सिलेक्ट झाली, तीला वजन वाढवून यायला सांगितले ती आठवीत असतांना शूटींग झालं, ही बातमी मोडून्तोडुन अफवा झाली की "हिरोईन फक्त सातवीतली आहे" म्हणजे सातवीतल्या पोरापोरींचे लफडे दाखवले काय इ. इ. खरे तर ती दोघं मस्त एफवायबीएला म्हणजे सज्ञान दाखवलीत. फुफाटा उडवणारे साप समजून काठी धोपटत बसलेत. बाद्वे, हिरवीनला नववीत ८१% पडले म्हणे, यंदा दहावी. मिपालोकनाथो, प्रेमात पडुनही मार्क चांगले मिळतात. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

च्यायला

नाखु
Mon, 05/02/2016 - 08:16 नवीन
मग या आलोकनाथांना थ्री इडीयट कसा पचला... सिनेमातला विद्यार्थी अमिरखान तर त्यावेळी फक्त ४०+ होता..... चालायचेच सम आर एक्वल स्म आर मोअर एक्वल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मिपालोकनाथ :-)

बबन ताम्बे
Mon, 05/02/2016 - 12:30 नवीन
भारी शब्द शोधून काढलाय :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सुन्न!

लई भारी
Mon, 05/02/2016 - 09:55 नवीन
नुसते प्रोमो बघून चित्रपट न बघता चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही आहे. विषय तोच असला तरी त्याची ट्रीटमेंट जबरी आहे. ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी शेवट सांगणाऱ्या पोस्टस पासून दूर राहावे. बाहेर आल्या नंतर सुद्धा कितीतरी वेळ डोक्यातला भुंगा जात नाही. काय होतंय कळत नाही. आणि ही जादू प्रोमो मध्ये जे दाखवले आहे त्याच्या पलीकडच्या चित्रपटाची आहे.
  • Log in or register to post comments

‘सैराट’ बघून पौगंडावस्थेतील

लालगरूड
Mon, 05/02/2016 - 11:42 नवीन
‘सैराट’ बघून पौगंडावस्थेतील मुले बिघडतील अशी भीती आता काही समाजहितचिंतकांना वाटू लागलीय म्हणे. पहिल्यांदा ज्यावेळी ‘शाळा’ सिनेमात किशोरवयीन मुलांचे प्रेम दाखवले त्यावेळी कधी कुणाला भीती वाटली नाही. ‘बी.पी.’ सिनेमात लहान मुलांना porn film पाहताना दाखवले त्यावेळी कुणाला मुले बिघडण्याची भीती वाटली नाही. त्यानंतर ‘टाइमपास’ मध्ये पौगंडावस्थेतील मुलांचे प्रेम दाखवले त्यावेळी कुणाला मुले बिघडण्याची भीती वाटली नाही. १२-१३ वर्षांची मुले नेट कॅफे आणि मोबाईलवर porn films बघतात तेव्हा कुणाला मुले बिघडण्याची भीती वाटत नाही. पण जसा ‘फॅन्ड्री’ येऊन गेला तशी या समाजहितचिंतकांना पौगंडावस्थेतील मुले बिघडण्याची भीती वाटू लागली. आणि आता अजून ‘सैराट’ रिलीज व्हायचा आहे, त्यात काय आहे हे अजून समजायचे आहे तोवरच हे समाजहितचिंतक जागे झाले. लगेच ओरड सुरु झाली. कारण स्पष्ट आहे. ‘फॅन्ड्री’मध्ये मारलेला दगड वर्मी लागला आहे. ‘फॅन्ड्री’मधून जातीव्यवस्थेवर केलेला हल्ला पचनी पडलेला नाही. म्हणूनच आता ही ओरड सुरु झालीय. ही फक्त मळमळ आहे. समाजहिताची तळमळ नाही. तेव्हा सर्वांनी बिनधास्तपणे सैराट होऊन चित्रपटाला प्रतिसाद द्या. ........ whatsapp ती 'सैराट' ची शेवटची दोन मिनिटे डोकं सुन्न करणारी आणि ह्रदयाचे ठोके चुकवणारी ......(सोडून) या जात पाती ने बरबटलेला समाज कुठल्याही थराला जावून असंविधानिक रूपाने पोटच्या अपत्याला कश्या प्रकारे बळी देतो याचं खुपच छान विश्लेशण मा नागराज पोपटराव मंजुळे यांनी सैराट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपट छान वाटला पण चित्रपटाची चिकित्सा करत करत बघायला आणखी छान नक्की वाटेल...! आम्ही पाहिलेल्या पिंपरी मधील ई~स्कवेर सिनेमा हाॅल फुल्ल होता प्रेक्षक 2 तास 48 मिनिटं फक्त शिट्या, टाळ्या, आणि आरडा ओरड आनंदाने करत होते पण 170 मिनिटाच्या शेवटच्या 2 मिनिटा मध्ये जे दाखवलं गेलं अख्खा च्या अख्खा चित्रपट विसरून गंभीरपणे प्रतेक प्रेक्षक चित्रपट हाॅल मधून बाहेर पडत होता ... त्याला मी ही अपवाद नव्हतो असो......... आवश्य बघा छान चित्रपट आहे ....... ....... ...........
  • Log in or register to post comments

पिंजरा

shawshanky
Mon, 05/02/2016 - 22:05 नवीन
शाळेतली पोरं बिघडतील म्हणुन सैराटला विरोध करण्याऱ्यांनी.... मास्तर बिघडतील म्हणुन पिंजरा ला विरोध का केला नाही.....
  • Log in or register to post comments

नाय तर काय!!

पुंबा
Wed, 05/04/2016 - 12:57 नवीन
नाय तर काय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shawshanky

आर उर्रात होती धडधड लाली

मितभाषी
Tue, 05/03/2016 - 10:37 नवीन
आर उर्रात होती धडधड लाली अंगावर आली अन अंगात भरली हि प्रीतीची बाधा झाली आता अधीर झालोया.. मग बधीर झालोया अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया आन उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग…झिंगाट फार उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल तुझ्या नावच मी इनिशिअल tattoo न गोंदल हात भरून आलोया लई दुरून आलोया अन करून दाढी भारी perfume मारून आलोया आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग…झिंगाट समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई आता तर्राट झालुया … तुझ्या घरात आलुया लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया आगं धीन्च्याक जोरात , टेक्नो वरात … दारात
  • Log in or register to post comments

आर उर्रात होती धडधड लाली

मितभाषी
Tue, 05/03/2016 - 10:37 नवीन
आर उर्रात होती धडधड लाली अंगावर आली अन अंगात भरली हि प्रीतीची बाधा झाली आता अधीर झालोया.. मग बधीर झालोया अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया आन उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग…झिंगाट फार उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल तुझ्या नावच मी इनिशिअल tattoo न गोंदल हात भरून आलोया लई दुरून आलोया अन करून दाढी भारी perfume मारून आलोया आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग…झिंगाट समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई आता तर्राट झालुया … तुझ्या घरात आलुया लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया आगं धीन्च्याक जोरात , टेक्नो वरात … दारात
  • Log in or register to post comments

आज सैराट पाहिला . चांगला

मंदार कात्रे
Tue, 05/03/2016 - 20:41 नवीन
आज सैराट पाहिला . चांगला चित्रपट आहे . पण एवढा गवगवा केलाय तसा भिडला नाही मनाला . सिनेमॉटोग्राफी उत्तम आहें . दाक्षिणात्य प्रभाव जाणवतो . माझ्याकडून ३*
  • Log in or register to post comments

चित्रपट पाहिला,पाहण्याआधी

याॅर्कर
Tue, 05/03/2016 - 21:59 नवीन
चित्रपट पाहिला,पाहण्याआधी समर्थन करत होतो,पण पाहिल्यावर त्रुटी जाणावल्या. अतिरंजितपणा दाखवून एखाद्या समाजाला सरळसरळ टार्गेट केलं आहे. राजकीय/आर्थिक/सामाजिक उन्माद दाखवलेला आहे.काही ठिकाणी उन्माद आहेच,आणि त्याचं वास्तव दर्शन घडवलेलं आहे. शेवटची दोन मिनटे सुन्न करणारी आहेत. माझं वैयक्तिक मत असं आहे कि ग्रामीण भागामध्ये असणारं जे प्रेम असतं ते प्रेम नसून आकर्षण असतं,शारिरीक गरज भागली कि गाशा गुंडाळला जातो,ही डोळ्यासमोर घडलेली उदाहारणे आहेत. बाकि,कलाकृती उत्तम आहेच,विरोधाचा प्रश्नच नाही,फक्त आपलं मत मांडलं एवढचं! ["निळा दहशतवाद" यावरसुद्धा पुढे नागराज चित्रपट बनवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.]
  • Log in or register to post comments

["निळा दहशतवाद" यावरसुद्धा

तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 22:14 नवीन
["निळा दहशतवाद" यावरसुद्धा पुढे नागराज चित्रपट बनवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.] >> तुम्हीच बनवा ना तो चित्रपट. त्याची कशाला वाट बघताय? बाकी तुमचं ग्रामिण भागातल्या प्रेमाबद्दलचं मत वाचुन अंमळ करमणुक झाली. त्रुटी असलेली कलाकृती उत्तम आहेचही म्हणत आहात. तुमचं मत मनोरंजक आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

.

याॅर्कर
Tue, 05/03/2016 - 22:29 नवीन
त्रुटी म्हणजे जातीय चष्मा बाजूला सारून चित्रपट पाहता येत नाही,कितीही प्रयत्न केला तरी. बाकि चित्रपट मस्तच आहे,
बाकी तुमचं ग्रामिण भागातल्या प्रेमाबद्दलचं मत वाचुन अंमळ करमणुक झाली.
100 % खात्री देवू शकणार नाही,पण 70 % प्रेमप्रकरणं फेल गेली आहेत गावात.रोजरास धुडगूस चालू आहे नुस्ता.
>> तुम्हीच बनवा ना तो चित्रपट. त्याची कशाला वाट बघताय?
हे काय बरोबर नाही,तुम्ही अभ्यासू आहात,उच्चभ्रूंना जातीय उन्माद आहे,तसा राजकिय उन्मादही आहे आणि भगवा उन्माद आहे तसाच निळा उन्मादही आहेच, हे कोणीही अभ्यासू माणूस नकारू शकत नाही.पण नागराज त्यावर चित्रपट बनवणार नाही याची गॅरंटी मी देतो,नाईलाजाने तो मलाच बनवावा लागेल पण तो प्रदर्शित होऊ दिला जाईल कि नाही याची गॅरंटी मी देवू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मला तरी कोण्या एका जातीबद्दलच

तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 23:30 नवीन
मला तरी कोण्या एका जातीबद्दलच आहे असे वाटले नाही. पार्श्वभूमी बघितली तर पुरुषप्रधान, सरंजामीवृत्ती, स्त्रियांना मालमत्ता ठरवणारी मानसिकता अशी आहे. हॉनर किलिंग हा प्रकार फक्त भारतात होत नाही किंवा भारतातल्या एखाद्याच समाजात होत नाही. जगभरात दर साल सुमारे ५ हजार हत्या होतात. त्यातल्या हजारेक भारतात होतात. प्रत्येक जातीत प्रेमसंबंध, आंतरजातीय लग्न टबू आहेत. तुम्ही चष्मा घालताय हा तुमचा चॉइस आहे. ग्रामिण काय की शहर काय प्रेमप्रकरणे ९० टक्के फेल जातात हो. शहर्/ग्रामिन असा काही भेद नै त्यात. वरचा मी दिलेला सॅम्पलगृपचा निष्कर्ष सर्वमिश्रित आहे. तुम्ही बनवा हो, प्रदर्शित होऊ दिला जाईल / नाही ह्याची चिंता करु नये. नागराज पिस्तुल्या बनवण्याआधी कोण होता हे बघून घ्या. जिगरात आग असेल तर पुचाट कारणं द्यावी लागत नाही. माणुस करुन दाखवतो. बाकी, जातायेता उगाच खोचक टिप्पणी करायला फार काही लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

तजो लयच फारमात आलेत.

आनंदराव
Wed, 05/04/2016 - 00:17 नवीन
तजो लयच फारमात आलेत. जाऊ द्या. जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं. बाकी आपल्याला सैराट आवडला. गाणी तर लयच ब्येष्ट.
  • Log in or register to post comments

तजो लयच फारमात आलेत.

आनंदराव
Wed, 05/04/2016 - 00:18 नवीन
तजो लयच फारमात आलेत. जाऊ द्या. जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं. बाकी आपल्याला सैराट आवडला. गाणी तर लयच ब्येष्ट.
  • Log in or register to post comments

तजो लयच फारमात आलेत.

आनंदराव
Wed, 05/04/2016 - 00:18 नवीन
तजो लयच फारमात आलेत. जाऊ द्या. जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं. बाकी आपल्याला सैराट आवडला. गाणी तर लयच ब्येष्ट.
  • Log in or register to post comments

सैराट रविवारी पाहिला .. एकदा

गणेशा
Wed, 05/04/2016 - 11:32 नवीन
सैराट रविवारी पाहिला .. एकदा पाहण्यासारखा नक्कीच .. अभिनय छान .. सांगित लाजवाब .. कथा मात्र जास्त मोठी .. पण रिअल्यास्टीक गोष्टी बरोबर दाखवल्या आहेत.. फक्त सिनेमा म्हनुन काहीही कथेत मिसळवलेले नाही.. वयक्तीक रित्या मला सैराट झाल जी हे गाणे खुप आवडले ..
  • Log in or register to post comments

माध्यमांचा समाजमनावरील परिणाम

गामा पैलवान
Wed, 05/04/2016 - 12:53 नवीन
लोकहो, मला चित्रपटांतलं फारकाही कळंत नाही. पण जे दाखवलंय त्याचा लोकांवर परिणाम मात्र खोलवर होतो एव्हढंच माहितीये. सैराटच्या निमित्ताने भाऊ तोरसेकरांचा हा लेख आठवला : http://jagatapahara.blogspot.co.uk/2015/11/blog-post_5.html सिनेमात पौगंडावस्थेतली प्रेमप्रकरणं दाखवल्याने किती टक्के मुलं वाहवत जाणारेत? अगदी अत्यल्प. पण जेव्हा कोणी एखाददुसरा वाहवत जातो तेव्हा बळी कोणाचा जातो? माझ्या आजच्या मनोरंजनासाठी भविष्यात संभाव्य बळी गेलेला चालेल का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

तुम्हाला जगण्यास गरज असलेल्या

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 13:01 नवीन
तुम्हाला जगण्यास गरज असलेल्या गोष्टी वापरत असल्यामुळे कुणाचाही बळी जात नाही ह्याची खात्री करुन जगत आहात काय? जसे नॉनव्हेज, वेज, कागद, कपडे, इमारती, इमारती बांधतांनाच कित्येक बळी जातात, तुम्हाला भविष्यात राहायला मिलावं म्हणुन आत्ताच कितीतरी लोकांचे बळी जातात, काय करताव त्येंसाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सिनेमात पौगंडावस्थेतली

खटपट्या
Wed, 05/04/2016 - 21:24 नवीन
सिनेमात पौगंडावस्थेतली प्रेमप्रकरणं दाखवल्याने किती टक्के मुलं वाहवत जाणारेत? अगदी अत्यल्प.
सहमत पुर्ण चित्रपट पाहुन सर्वांनी मते द्यावीत असे वाटते. मी हा चित्रपट पाहीला. जी मुले हा चित्रपट पहातील त्यांना वास्तवाचे भान येण्याची जास्त शक्यता आहे. प्रेमविवाहानंतरची कुत्तरओढ जबरद्स्त दाखवली आहे. क्रुपया कोणी चित्रपटाचा शेवट विचारुन नागराज मंजूळेचे कष्ट वाया घालवू नयेत. खाली कोणीतरी म्हणल्याप्रमाणे संपूर्ण चित्रपट पाहील्यावरच शेवट परीणामकारक वाटतो. आधीच शेवट माहीत असेल तर मजा नाही. थोडक्यात - पहावाच असा चित्रपट...संस्क्रुतीच्या नावाने बोंबा मारणार्‍यांनी तर पहावाच पहावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकाराकडून अशा तपशीलातल्या चुकांची

बोका-ए-आझम
Sat, 05/07/2016 - 00:42 नवीन
अपेक्षा नव्हती. रिंकू पाटील हत्याकांड - ४ एप्रिल १९९० बाजीगर प्रदर्शित झाला - ७ आॅगस्ट १९९३ डर प्रदर्शित झाला - २४ डिसेंबर १९९३ अंजाम प्रदर्शित झाला - १७ एप्रिल १९९४ हरेश पटेल जिवंत असताना मैने प्यार किया release झाला होता. त्यातला हीरो स्वतःची कमाई करुन नायिकेच्या वडिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. ते का नाही पाहिलं त्याने? चित्रपटात दाखवली जाते त्याच्या १०० पटीने हिंसाचार आज बातम्यांमध्ये दाखवला जातो, तोही खराखुरा. पण बातम्यांवर कोणी टीकेची झोड उडवलेली पाहिली नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तपशील बरोबर आहे

गामा पैलवान
Sat, 05/07/2016 - 11:39 नवीन
बोका-ए-आझम, तपशीलात चूक नाहीये. कृपया हे वाक्य पाहावे : >> पण दोनतीन वर्षांनी शहारुखने तोच हरीश पटेल आपल्या तीन लोकप्रिय चित्रपटातून अप्रतिम रंगवला आणि >> त्याचा भिन्न नावाने रंगवलेला हरीश पटेल लोकांनी डोक्यावर घेतला. त् प्रत्यक्षातला घृणास्पद माणूस सिनेमातून नायकासारखा दाखवला तर लोकप्रिय होतो. चित्रपटाचा समाजावरील परिणाम बराच खोलवर जात असावा. त्यास अनेक आयामही असावेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हा २ मिनिटाचा शेवट नक्की काय

काळा पहाड
Wed, 05/04/2016 - 13:04 नवीन
हा २ मिनिटाचा शेवट नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments

बाकी, गा.पै. एखाद्या

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 13:05 नवीन
बाकी, गा.पै. एखाद्या चित्रपटामुळे भविष्यात केल्या जाणार्‍या दहा प्रतिष्ठा-हत्या टळल्या तरी हेतू सिद्ध होईल असे नाही वाटले? नकारात्मक बाजूकडेच का झुकावेसे वाटले? तेही चित्रपट न बघता सांगोवांगीच्या गोष्टीवरुन?
  • Log in or register to post comments

प्रश्न आहे खरा !

गामा पैलवान
Wed, 05/04/2016 - 19:57 नवीन
तजो, >> नकारात्मक बाजूकडेच का झुकावेसे वाटले? मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय. रिंकू पाटीलला जाळणाऱ्या हरीश पटेलला नकारात्मक बाजूकडेच का वळावंसं वाटलं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 20:04 नवीन
अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस जाळून मारावे अशी कोणत्या चित्रपटाने प्रेरणा दिलिय ते सांगाल का? रिंकुपाटील जळीत प्रकरण किंवा अशीच एकतर्फी प्रेमप्रकरणांतून प्रेयसीची हत्या करणे हे पुरुषी मनोवॄत्तीचे निदर्शक आहे की चित्रपटाचे परिणाम ह्यात तुमची गल्लत होत नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड...

बबन ताम्बे
Wed, 05/04/2016 - 20:22 नवीन
मला आठवते त्याप्रमाणे या घटनेतील गुन्हेगारांवर हिंदी चित्रपटांचा देखील प्रभाव होता. एक चोरी त्यांनी हिंदी पिक्चर स्टाईलने केली होती असे बहुतेक मुनावर शहाच्या आत्मचरीत्रात वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 20:39 नवीन
असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव होण्याची वाट बघतोय एका सदस्यावर... पण ते फक्त नकारात्मक प्रभाव बघतात बहुतेक. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

आंतरिक वैधता

गामा पैलवान
Wed, 05/04/2016 - 21:39 नवीन
तजो, जेव्हा प्रेक्षक एखादी कलाकृती बघतो तेव्हा सकारात्मक की नकारात्मक असा विचार करंत नसतो. जे दिसेल ते स्वीकारतच जातो. त्याचे उचित वा अनुचित परिणाम कालांतराने दृग्गोचर होत जातात. डरसारख्या चित्रपटांमुळे खलनायकी वृत्तीस एक प्रकारची आंतरिक वैधता लाभते. जी बरोबर नाही. सैराट आजून बघितला नाहीये. त्यात उलट संदेश नसेल अशी आशा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तेच ना, स्वदेस किंवा तत्सम

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 21:57 नवीन
तेच ना, स्वदेस किंवा तत्सम उत्तम संदेश, वैधता देणारे चित्रपटांनी घडवलेले परिणाम दृग्गोचर व्हायची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मीही हेच म्हणतो.

गामा पैलवान
Wed, 05/04/2016 - 23:31 नवीन
तजो, मीसुद्धा तुमच्यासारखीच वाट बघतोय. पण लोकं नेमकी नको तो संदेश का घेतात ते कळंत नाही. :-( आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा