सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)
(केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली.
वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही.
पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते.
अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात.
हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं.
2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:-
वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! )
ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई
@यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे?
@बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का?
@कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे?
@पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे?
इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात!
सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल.
(ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )
वाचने
21414
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ
In reply to धार्मिकविधींमध्ये साध्या by अद्द्या
आत्मूसबुवांचा धागा आला की
सुरवंट म्हणालं धागा टमरेल आहे
In reply to आत्मूसबुवांचा धागा आला की by सुरवंट
इतकी अक्कल चालली तर!
In reply to आत्मूसबुवांचा धागा आला की by सुरवंट
यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी
हेच कंजुशकाका एकच मारा पर
ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ
In reply to हेच कंजुशकाका एकच मारा पर by प्रमोद देर्देकर
खीऽ क .
In reply to ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ by टवाळ कार्टा
छ्या
In reply to खीऽ क . by प्रमोद देर्देकर
ऊकळलेली म्हणजे
In reply to छ्या by नाखु
तो
In reply to ऊकळलेली म्हणजे by शाम भागवत
भटजी काय घरी येवुन तुमच्या
In reply to हेच कंजुशकाका एकच मारा पर by प्रमोद देर्देकर
भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुनहेच लॉजीक पेशंट लोकांना पण लागू होते. डॉक्टर म्हणत नाहीत की माझ्याकडून उपचार करून घ्या म्हणून. तरीपण लोक्स डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेतात, व परत त्याच डॉक्टरचा शक्य होईल त्या ठिकाणी उद्धार करत बसतात.चुकीचे विधी
In reply to भटजी काय घरी येवुन तुमच्या by मोदक
विधी चुकीचा झाला किंवा
In reply to चुकीचे विधी by कपिलमुनी
भयंकर फरक आहे. धार्मिक विधी
In reply to भटजी काय घरी येवुन तुमच्या by मोदक
+१
In reply to भयंकर फरक आहे. धार्मिक विधी by संदीप डांगे
एकतर मोदकने टाईमपास म्हणून
In reply to भटजी काय घरी येवुन तुमच्या by मोदक
:)) काडी होती रे. :D
In reply to एकतर मोदकने टाईमपास म्हणून by टवाळ कार्टा
=))
In reply to :)) काडी होती रे. :D by मोदक
भटजीने आता एकदोन विधिक्रम
किस्से आवडले
बुवा धर्मसुधारक पुरोहित आहे.
In reply to किस्से आवडले by पैसा
हॅहॅ!
In reply to बुवा धर्मसुधारक पुरोहित आहे. by प्रचेतस
ते खरं.
In reply to हॅहॅ! by पैसा
मारुती कशाला अता?
In reply to ते खरं. by प्रचेतस
तोच शनिदेवाचा कोप शांत करू
In reply to मारुती कशाला अता? by पैसा
बेक्कार पंच आहे हा =))
In reply to हॅहॅ! by पैसा
=))
In reply to बेक्कार पंच आहे हा =)) by सतिश गावडे
माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल
In reply to बेक्कार पंच आहे हा =)) by सतिश गावडे
तरिही तुमच्यावर अशी वेळ यावी
In reply to माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल by अत्रुप्त आत्मा
@हेच दुर्दैव.››› असोच्च असो!
In reply to तरिही तुमच्यावर अशी वेळ यावी by प्रचेतस
बघा बघा.
In reply to @हेच दुर्दैव.››› असोच्च असो! by अत्रुप्त आत्मा
अग्गाग्गा बुवा...
In reply to माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल by अत्रुप्त आत्मा
हायला, कुंडली आहे का सर्कस?
In reply to माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल by अत्रुप्त आत्मा
१००. हुश्श!
खीक्क
शतक झाल्याबद्दल बुवांना
ताम्रकलशऐवजी टम्रेल दिलं तर?
In reply to शतक झाल्याबद्दल बुवांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
.
In reply to ताम्रकलशऐवजी टम्रेल दिलं तर? by DEADPOOL
.
In reply to ताम्रकलशऐवजी टम्रेल दिलं तर? by DEADPOOL
निलकांत साहेब,
मी या शरम आलीला अणू मोडण देत
In reply to निलकांत साहेब, by सुरवंट
बुवा एकदाच येउन सर्व बॉल
एकदाच येऊन इतकेच नाही, तर
In reply to बुवा एकदाच येउन सर्व बॉल by खटपट्या
आत्मू शेठ लेख पटला. भावना
+१ सहमत...
In reply to आत्मू शेठ लेख पटला. भावना by इष्टुर फाकडा
@आत्मू शेठ लेख पटला. भावना
In reply to आत्मू शेठ लेख पटला. भावना by इष्टुर फाकडा
हे दू आयडी कोणते हो?
In reply to @आत्मू शेठ लेख पटला. भावना by अत्रुप्त आत्मा
दू आयडी कोणते असतील ते असतील.
In reply to हे दू आयडी कोणते हो? by प्रचेतस
तो तुमचा समज आहे.
In reply to दू आयडी कोणते असतील ते असतील. by सतिश गावडे
चालू दे तुमचं निरर्थक
In reply to तो तुमचा समज आहे. by प्रचेतस
हे 'हुंब..हुंब.
In reply to चालू दे तुमचं निरर्थक by सतिश गावडे
पुन्हा तुमच्यासाठीच
In reply to हे 'हुंब..हुंब. by प्रचेतस
=))
In reply to पुन्हा तुमच्यासाठीच by नाखु
@ कुंडलीतील पापग्रह
In reply to दू आयडी कोणते असतील ते असतील. by सतिश गावडे
बाकी मुंज वगैरे कालबाह्य आणि
In reply to आत्मू शेठ लेख पटला. भावना by इष्टुर फाकडा
लोक बरेच विधी अनेक
In reply to बाकी मुंज वगैरे कालबाह्य आणि by सतिश गावडे
चला.. .., पुन्हा एकदा तेच
In reply to लोक बरेच विधी अनेक by सूड
मुळात मुंज आताच्या काळात
In reply to चला.. .., पुन्हा एकदा तेच by अत्रुप्त आत्मा
धर्मसुधारक आणि धर्मउच्छेदक
In reply to चला.. .., पुन्हा एकदा तेच by अत्रुप्त आत्मा
जैसे कर्म तैसे कांड घडते येथे
ज्ञानी असो की अज्ञान
In reply to जैसे कर्म तैसे कांड घडते येथे by तर्राट जोकर
आम्हालाही एक सुचले
In reply to ज्ञानी असो की अज्ञान by सतिश गावडे
काडी ही सारावी
In reply to आम्हालाही एक सुचले by चौकटराजा
आत्मुबुवा, पण 'कर्मकांड
@कर्मकांड म्हनजे धर्म नाही'
In reply to आत्मुबुवा, पण 'कर्मकांड by तर्राट जोकर
मेलेला माणुसही जंगलात फेकुन
लेख खुपच छोटा वाटला. म
मुळात संपुर्ण केस काढुन गोटा