✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यथा शास्त्रप्रमाणेनं...

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Mon, 05/02/2016 - 22:06  ·  लेख
लेख
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली. वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही. पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात. हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं. 2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:- वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! ) ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई @यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल. (ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
21115 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

ठीक आहे. मुंज्या मुलाला दुसरी

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:12 नवीन
ठीक आहे. मुंज्या मुलाला दुसरी अंघोळ घडली. काय बिघडलं? एरवी होळी खेळताना वाटेल ते रंग वापरुन अनेकवेळा नहात असेल!
  • Log in or register to post comments

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:14 नवीन
पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. बुवेश माझ्या मुंजीत तरी हे घडलेलं नाही. क्वचित कुठेतरी घडलेलं असेल णून सर्वा धर्म येडा समजायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

पण आमच्या धर्मशास्त्रात

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:16 नवीन
पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते हे कुठे पाहिलेत. किरकोळ घडत असेल हिंदु धर्मात. बाकी प्रसिद्ध धर्मांचे पाहिलेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

जणू तेच शास्त्र आहे. यावरून

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:20 नवीन
जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. हे कुठे घडले? माझ्या तरी पाहण्यात नाही. असो. जर तुम्ही पाहिले असेल तर त्यांना समजावून सांगणे हा पर्याय आहे. उगाच कुठे तरी क्षुल्लक घडलेल्या घटनांसाठी पुरा हिंदु धर्म जबाबदार धरू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

कै च्या कै लोजिक

स्पा
Mon, 05/02/2016 - 22:19 नवीन
कै च्या कै लोजिक
  • Log in or register to post comments

पांडूशी सहमत - पांडुबंध

प्रचेतस
Mon, 05/02/2016 - 22:26 नवीन
पांडूशी सहमत - पांडुबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१ -धरबंध

सूड
Mon, 05/02/2016 - 22:58 नवीन
+१ -धरबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्ल्स प्लस

चौकटराजा
Tue, 05/03/2016 - 08:53 नवीन
+११ ( शास्त्र) धर सोड बंध !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+सहमत

नाखु
Tue, 05/03/2016 - 08:55 नवीन
त्रस्तबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हे बंध रेशमाचे...

खटपट्या
Tue, 05/03/2016 - 10:46 नवीन
हे बंध रेशमाचे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

यजमान पुरोहितात आधी काय "ठरले

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:25 नवीन
यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा हे सर्व मानवी स्वार्थ आहे जो प्रत्येक व्यवसायात दिसून येतो. त्याला केवळ हिंदु धर्माशी निगडीत करु नका ही विनंती.
  • Log in or register to post comments

हिंदूधर्माला मी यात कुठेही

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 22:32 नवीन
हिंदूधर्माला मी यात कुठेही आणलेलं नाहिये. तुम्हीही आणू नका. धन्यवाद. तसेच हा काथ्याकूट नाही. पुनश्च धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

मग मौजीबंधन कुठल्या धर्मात

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:49 नवीन
मग मौजीबंधन कुठल्या धर्मात करतात बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुम्हाला प्रतिसाद आकलन झालेला

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 22:55 नवीन
तुम्हाला प्रतिसाद आकलन झालेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

वा! ठीक आहे की मौजीबंधन हिंदु

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 23:55 नवीन
वा! ठीक आहे की मौजीबंधन हिंदु धर्माशी निगडीत नाही ते!!! नवीनच माहिती कळली हो बुवा!!! आभार आपले!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

छान किस्से आहेत. अजून येऊद्या

एस
Mon, 05/02/2016 - 22:27 नवीन
छान किस्से आहेत. अजून येऊद्या.
  • Log in or register to post comments

टनाटनी लोकांच्या टनटनाटी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/02/2016 - 22:30 नवीन
टनाटनी लोकांच्या टनटनाटी प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. बाकी बुवा लेख अजिबात पटला नाही.
  • Log in or register to post comments

नो प्राब्लेम्स!

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 22:34 नवीन
नो प्राब्लेम्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

टमरेल लेख

सुरवंट
Mon, 05/02/2016 - 22:36 नवीन
टमरेल लेख
  • Log in or register to post comments

मटरेल प्रतिसाद!

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 22:47 नवीन
मटरेल प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट

मटरेल = material = strong and

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:54 नवीन
मटरेल = material = strong and physical... धन्यवाद बुवेश. इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुझा हेतू कऴला . अता तुला

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 22:57 नवीन
तुझा हेतू कऴला . अता तुला या धाग्यावर मी एकही प्रतिसाद देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

बुवा असं अरेतुरे नाही

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:59 नवीन
बुवा असं अरेतुरे नाही म्हणायचं! आपण देवतांचे सेवक आहोत ना! असे भान घसरु नाहि द्यायचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असो. इतके एकेरीवर येणार असाल

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 23:02 नवीन
असो. इतके एकेरीवर येणार असाल तर जौ देत! आम्ही पण प्रतिसाद नै देत! माझं काय बिघडतंय! तुमच्याच व्यवसायाचे तीनतेरा वाजवताय! खिक्क!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

तीनतेरानाय....

भीमाईचा पिपळ्या.
Mon, 05/02/2016 - 23:21 नवीन
बुवा एक प्रामाणिक माणूस आहे. आपल्याच व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते. मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही. पण यापुढे खास बुवाकडून पूजा पाठ करून घेतला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

भीपि सर... तुम्हाला पाहीजे तर

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 23:29 नवीन
भीपि सर... तुम्हाला पाहीजे तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा बांधून घ्या. हरकत नाही. कसे आहे? आपण जो व्यवसाय करतो त्याच्या नीतिमत्वांशी थोडे तरी प्रामाणिक असावे. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

आणी न्यून अधिक बाजू ठरवणारे

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 23:31 नवीन
आणी न्यून अधिक बाजू ठरवणारे तुम्ही आम्ही कोण हो! आपण तर सामान्य माणसेच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>>

DEADPOOL
Tue, 05/03/2016 - 07:29 नवीन
बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>>>>>> आपल्या बाजूने बोलणारे सगळे प्रामाणिक असतात. व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते.>>>>>>>> उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का? मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही.>>>>>>>>> यावरून आपले धर्मविचार कळून येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

..

mugdhagode
Tue, 05/03/2016 - 09:41 नवीन
हिंदु धर्माचा अभ्यास वाढवा. हिंदु धर्मात एका व्याधाने व्याध गीता सांगितली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

@उद्या कोणी खाटीक हातात सुरा

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 09:45 नवीन
@उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का?››› नाहीच चालणार . मी काही अंध:श्रद्धेवर प्रवचन देत नाहिये. उलट श्रद्धाच लबाडीनी पाऴतात, आणी तिचा वापर करुन दुसय्रांचा छळ करतात. हे दाखवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

"हे नंतर(च) करायचं असतं..! "

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 22:58 नवीन
"हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा यापेक्षा त्या पार्टीला "अरेबाबा हे सगळे पूजाविधी फेक आहेत. ते नाही केले तरी काही बिघडणार नाही!" हे सांगणं जास्त समयोचित नाहि का? तसंही यातूनच जास्त अपेक्षित समाजप्रबोधन घडेल नाही?
  • Log in or register to post comments

बुआ हजारदा विचारलं आधुनिक

DEADPOOL
Mon, 05/02/2016 - 23:14 नवीन
बुआ हजारदा विचारलं आधुनिक सत्यनारायण कसा घालतात? म्हणजे नेहमीसारखा घरी घालतात कि 'काशी' घालतात? काशी- काशीक्षेत्र गैरसमज नकोत!
  • Log in or register to post comments

खिक्क...

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 23:15 नवीन
खिक्क...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण

DEADPOOL
Mon, 05/02/2016 - 23:30 नवीन
बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण 'घालताना' तुमच्या ग्राहकांना जर उशीर होत असेल तर तुम्ही काय करतात? जर एखाद्या क्लायंटने कमी दक्षिणा दिली तर तुम्ही काय करतात? बरं टम्रेल, बुलुक, पुचुक ही तुमच्या आधुनिक सत्यनारायनातील खास मंत्रावळी का?
  • Log in or register to post comments

हे हे हे...

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 23:35 नवीन
हे हे हे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

बुआ जर तुमच्या वडिलांनी

DEADPOOL
Mon, 05/02/2016 - 23:35 नवीन
बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर लगेच, तुझा हेतू कऴला . अता तुला या मुद्द्यावर मी एकही प्रतिसाद देणार नाही, असे म्हणतात का?
  • Log in or register to post comments

बुआ जर तुमच्या वडिलांनी

नाव आडनाव
Tue, 05/03/2016 - 10:57 नवीन
बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर वडिलांनी ??? इथे वडील कसे आले? जरा आवरा साहेब ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

इथे जर असा शब्द वापरला आहे.

DEADPOOL
Tue, 05/03/2016 - 11:02 नवीन
इथे जर असा शब्द वापरला आहे. आमच्या भाषेत ही कंडीशनल प्रॉबबिलिटी आहे. वडील फक्त रूपक म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 11:59 नवीन
डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची कुठल्याच पातऴीवर दखल घेतली जाणार नाही,.त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करायचाही प्रश्नच नाही . मग ते स्वत:ला काहिही समजोत. असतात शिखंडीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

हे दु आयडी वाल्यांविषयी

DEADPOOL
Tue, 05/03/2016 - 12:20 नवीन
हे दु आयडी वाल्यांविषयी असल्याने आम्हास वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. असो आमचे बुआ भीष्माचार्यासारखे धारातीर्थी पडले तर नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

स्पष्टीकरण द्यायची गरज भासली,

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 13:37 नवीन
स्पष्टीकरण द्यायची गरज भासली, यातच सर्वकाही आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

पण आमच्या धर्मशास्त्रात

DEADPOOL
Mon, 05/02/2016 - 23:40 नवीन
पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो!>>>>>>>> बुआ मग ज्यांना हे पटत नाही त्यानी 'पाक'स्थानात जायला हवं असं आमच प्रांजल मत आहे
  • Log in or register to post comments

बर्याच दिवसांनी मोकळा वेळ

टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 00:53 नवीन
बर्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळालेला दिसतोय =))
  • Log in or register to post comments

बुवांनी त्यांच्या व्यवसायातले

कंजूस
Tue, 05/03/2016 - 07:19 नवीन
बुवांनी त्यांच्या व्यवसायातले अनुभव मांडलेत जसे इतर त्यांच्या दुसय्राकोणत्या संदर्भातले मांडतात.मिपा लेखमाला पाहा.बारीकसारीक नियमांवरून काहीजण वाद घालतात. सहमत.
  • Log in or register to post comments

कंजूसकाकांना बरोब्बर समजले.

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 09:33 नवीन
कंजूसकाकांना बरोब्बर समजले. धन्यवाद काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बरोबर आहे

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 09:40 नवीन
कारण ते तुमच्या बाजूने बोललेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असो!

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 09:46 नवीन
असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 09:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा

नाखु
Tue, 05/03/2016 - 09:52 नवीन
अता तुम्ही नवकाव्याकडे वळा पाहू !!! ता.क. भावविष्वचे पुढील भाग कधी???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हम्म कथा कोणाची , व्यथा

सनईचौघडा
Tue, 05/03/2016 - 09:01 नवीन
हम्म कथा कोणाची , व्यथा कोणाला?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा