Skip to main content

यथा शास्त्रप्रमाणेनं...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 02/05/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली. वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही. पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात. हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं. 2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:- वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! ) ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई @यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल. (ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21412
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

ठीक आहे. मुंज्या मुलाला दुसरी अंघोळ घडली. काय बिघडलं? एरवी होळी खेळताना वाटेल ते रंग वापरुन अनेकवेळा नहात असेल!

In reply to by विजय पुरोहित

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. बुवेश माझ्या मुंजीत तरी हे घडलेलं नाही. क्वचित कुठेतरी घडलेलं असेल णून सर्वा धर्म येडा समजायची गरज नाही.

In reply to by विजय पुरोहित

पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते हे कुठे पाहिलेत. किरकोळ घडत असेल हिंदु धर्मात. बाकी प्रसिद्ध धर्मांचे पाहिलेत काय?

In reply to by विजय पुरोहित

जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. हे कुठे घडले? माझ्या तरी पाहण्यात नाही. असो. जर तुम्ही पाहिले असेल तर त्यांना समजावून सांगणे हा पर्याय आहे. उगाच कुठे तरी क्षुल्लक घडलेल्या घटनांसाठी पुरा हिंदु धर्म जबाबदार धरू नये.

यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा हे सर्व मानवी स्वार्थ आहे जो प्रत्येक व्यवसायात दिसून येतो. त्याला केवळ हिंदु धर्माशी निगडीत करु नका ही विनंती.

In reply to by विजय पुरोहित

हिंदूधर्माला मी यात कुठेही आणलेलं नाहिये. तुम्हीही आणू नका. धन्यवाद. तसेच हा काथ्याकूट नाही. पुनश्च धन्यवाद.

In reply to by अत्रुप्त आत्मा

वा! ठीक आहे की मौजीबंधन हिंदु धर्माशी निगडीत नाही ते!!! नवीनच माहिती कळली हो बुवा!!! आभार आपले!!!

टनाटनी लोकांच्या टनटनाटी प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. बाकी बुवा लेख अजिबात पटला नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा असं अरेतुरे नाही म्हणायचं! आपण देवतांचे सेवक आहोत ना! असे भान घसरु नाहि द्यायचे!

In reply to by विजय पुरोहित

असो. इतके एकेरीवर येणार असाल तर जौ देत! आम्ही पण प्रतिसाद नै देत! माझं काय बिघडतंय! तुमच्याच व्यवसायाचे तीनतेरा वाजवताय! खिक्क!!!

In reply to by विजय पुरोहित

बुवा एक प्रामाणिक माणूस आहे. आपल्याच व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते. मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही. पण यापुढे खास बुवाकडून पूजा पाठ करून घेतला जाईल.

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

भीपि सर... तुम्हाला पाहीजे तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा बांधून घ्या. हरकत नाही. कसे आहे? आपण जो व्यवसाय करतो त्याच्या नीतिमत्वांशी थोडे तरी प्रामाणिक असावे. असो...

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>>>>>> आपल्या बाजूने बोलणारे सगळे प्रामाणिक असतात. व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते.>>>>>>>> उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का? मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही.>>>>>>>>> यावरून आपले धर्मविचार कळून येतात.

In reply to by DEADPOOL

@उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का?››› नाहीच चालणार . मी काही अंध:श्रद्धेवर प्रवचन देत नाहिये. उलट श्रद्धाच लबाडीनी पाऴतात, आणी तिचा वापर करुन दुसय्रांचा छळ करतात. हे दाखवतोय.

"हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा यापेक्षा त्या पार्टीला "अरेबाबा हे सगळे पूजाविधी फेक आहेत. ते नाही केले तरी काही बिघडणार नाही!" हे सांगणं जास्त समयोचित नाहि का? तसंही यातूनच जास्त अपेक्षित समाजप्रबोधन घडेल नाही?

बुआ हजारदा विचारलं आधुनिक सत्यनारायण कसा घालतात? म्हणजे नेहमीसारखा घरी घालतात कि 'काशी' घालतात? काशी- काशीक्षेत्र गैरसमज नकोत!

बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण 'घालताना' तुमच्या ग्राहकांना जर उशीर होत असेल तर तुम्ही काय करतात? जर एखाद्या क्लायंटने कमी दक्षिणा दिली तर तुम्ही काय करतात? बरं टम्रेल, बुलुक, पुचुक ही तुमच्या आधुनिक सत्यनारायनातील खास मंत्रावळी का?

बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर लगेच, तुझा हेतू कऴला . अता तुला या मुद्द्यावर मी एकही प्रतिसाद देणार नाही, असे म्हणतात का?

In reply to by DEADPOOL

बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर वडिलांनी ??? इथे वडील कसे आले? जरा आवरा साहेब ...

In reply to by DEADPOOL

डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची कुठल्याच पातऴीवर दखल घेतली जाणार नाही,.त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करायचाही प्रश्नच नाही . मग ते स्वत:ला काहिही समजोत. असतात शिखंडीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे दु आयडी वाल्यांविषयी असल्याने आम्हास वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. असो आमचे बुआ भीष्माचार्यासारखे धारातीर्थी पडले तर नाहीत.

पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो!>>>>>>>> बुआ मग ज्यांना हे पटत नाही त्यानी 'पाक'स्थानात जायला हवं असं आमच प्रांजल मत आहे

बुवांनी त्यांच्या व्यवसायातले अनुभव मांडलेत जसे इतर त्यांच्या दुसय्राकोणत्या संदर्भातले मांडतात.मिपा लेखमाला पाहा.बारीकसारीक नियमांवरून काहीजण वाद घालतात. सहमत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

=))

In reply to by प्रचेतस

अता तुम्ही नवकाव्याकडे वळा पाहू !!! ता.क. भावविष्वचे पुढील भाग कधी???

सर्वोच्च न्यायालयाचा एखाद्या केसमधला निकाल हा भविष्यात थेट 'प्रत्यक्ष कायदा' म्हणून समजला जातो.

In reply to by तुषार काळभोर

हरकतंही नाही. कारण त्याची लायकताही असते. इथे लायकता असण्याचाही प्रश्न नाहिये. जी आहे ती सोयच आहे. त्याची धर्माचा आधार घेऊन जाणिवपूर्वक गैरसोय करणाय्रांचा पंचनामा मांडावा.... म्हणून हे लिहिलय

साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात
हजारो वर्षापूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे . तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो. ( गोष्ट नेटवरून चोप्य पस्ते)

In reply to by कपिलमुनी

तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो.
››› बुल्स आय! हाच मुद्दा आहे.

In reply to by नाखु

इथे गुद्दा मरण शक्य नाही . फारतर गुद्देसूद स्माएल्या अंगावर सोडता येतील. गुद्दा मारायचा तर कट्टा आला व कट्टा आला की खर्च आला.

जर हे सगळं खरं असेल , तर तुम्ही करत असलेला व्यवसाय म्हणजे लोकांची फसवणूक होत नाही का ? जर सगळ्या प्रथा / रूढी / परंपरा या कुठल्या न कुठल्या अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरु झाल्या असतील . तर एकुणातच सगळेच "पंडित " "बुवा" "भडजी " हे शुद्ध फसवणूक करती आहेत सगळ्यांची असं म्हणताय का तुम्ही ? याच प्रथांच्या नावाखाली घडलेले किस्से सांगण्यासारखे खूप आहेत , पण विषयांतर होईल.

In reply to by अद्द्या

मला वाटले की एक गुरूजी लिहित आहेत तर, लक्ष्मीपूजन का करतात? त्यामागे कोणता हेतू असतो? नववधूला लक्ष्मी का समजायचे? वगैरे कळेल म्हणून वाचायला घेतले तर.. जाऊ दे.

In reply to by अद्द्या

सगळ्या प्रथा अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरू झाल्या नाहीत. हिंदू धर्मामधल्या ज्या प्रथा आहेत त्या पुराणांमध्ये , ग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत. त्या प्रमाणे त्या केल्या जातात. ज्यांचा या गोष्टीवर ( देवावर आणि कर्मकांडावर) विश्वास आहे ते या गोष्टी करतात. कोणताही पंडित सांगितलेले विधी करत असतो. यात फसवणूक कुठे आली ?

In reply to by कपिलमुनी

धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
इथून आली , कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय म्हणून ते अंतिम सत्य असतं का ? एखादी पद्धत /परंपरा त्या काळात "साधी व्यवहाराची " म्हणून त्यांनी लिहून ठेवली असेल , आणि आत्ता हे सो कॉल्ड पंडित लोक त्यांना धार्मिक गोष्टींचा मुलामा देऊन असच केलं पाहिजे तसाच केलं पाहिजे म्हणत कैच्याकाय वेळ काढत असतील आणि काही तरी फालतू कारण काढून "धर्मात सांगितलंय " च्या नावाखाली गल्लाभारून "दक्षिणा " उकळत असतील तर ती फसवणूक नाही का ? ( सगळेच बुवा असं करतात म्हणत नाहीये )

In reply to by अद्द्या

असे असेल तर ते तर त्यांच्या पुस्तकाला अंतिम आदेश/डायरेक्ट कायदाच मानतात त्यांना बदलून दाखवा

In reply to by टवाळ कार्टा

मी कोणालाही बदलायला सांगत नाहीये , प्रत्येक जण आपापल्या धंद्यात येनकेन प्रकारे चुना लावताच असतो . त्याची वारंवारिता आणि आकार बदलू शकतो एवढंच . मी फक्त विचारतोय , कि हे असं हि असू शकतं का , आणि नसेल तर का

In reply to by अद्द्या

का करायच व कस करायच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. का ते प्रथम समजावून घेऊया. मग कस करायच याला किती महत्व द्यायचे ते कळेलच की. पण कसे करायचे यावरच भर द्यायचा असेल तर फक्त टीआरपी वाढेल.

In reply to by शाम भागवत

का करायचं याचं उत्तर आहे तयार , पुस्तकात सांगितलंय , आई वडील - आज्जी आजोबा हे करत होते , आजूबाजूचे करतात , आमच्या गावात हे असं करतात . pick your choice