✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यथा शास्त्रप्रमाणेनं...

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Mon, 05/02/2016 - 22:06  ·  लेख
लेख
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली. वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही. पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात. हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं. 2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:- वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! ) ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई @यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल. (ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
21115 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

हे थोडं कायद्यासारखं झालं

तुषार काळभोर
Tue, 05/03/2016 - 11:21 नवीन
सर्वोच्च न्यायालयाचा एखाद्या केसमधला निकाल हा भविष्यात थेट 'प्रत्यक्ष कायदा' म्हणून समजला जातो.
  • Log in or register to post comments

हरकतंही नाही. कारण त्याची

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 12:04 नवीन
हरकतंही नाही. कारण त्याची लायकताही असते. इथे लायकता असण्याचाही प्रश्न नाहिये. जी आहे ती सोयच आहे. त्याची धर्माचा आधार घेऊन जाणिवपूर्वक गैरसोय करणाय्रांचा पंचनामा मांडावा.... म्हणून हे लिहिलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

तात्पर्य

कपिलमुनी
Tue, 05/03/2016 - 12:23 नवीन
साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात
हजारो वर्षापूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे . तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो. ( गोष्ट नेटवरून चोप्य पस्ते)
  • Log in or register to post comments

तात्पर्य : मांजर बांधणे

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 13:35 नवीन
तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो.
››› बुल्स आय! हाच मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

म्हणजे फ़क्त कपिलमुनी आणि

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 13:46 नवीन
म्हणजे फ़क्त कपिलमुनी आणि कंजूस यांनाच मुद्दा समजलेला आहे तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मुद्दा

नाखु
Tue, 05/03/2016 - 14:05 नवीन
सम्जला असे मान्य करा नाही तर गुद्दा खावा हा का ना का . मुद्देसूद नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गुद्दा द्यायचा कसा ?

चौकटराजा
Wed, 05/04/2016 - 07:20 नवीन
इथे गुद्दा मरण शक्य नाही . फारतर गुद्देसूद स्माएल्या अंगावर सोडता येतील. गुद्दा मारायचा तर कट्टा आला व कट्टा आला की खर्च आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जर हे सगळं खरं असेल ,

अद्द्या
Tue, 05/03/2016 - 14:06 नवीन
जर हे सगळं खरं असेल , तर तुम्ही करत असलेला व्यवसाय म्हणजे लोकांची फसवणूक होत नाही का ? जर सगळ्या प्रथा / रूढी / परंपरा या कुठल्या न कुठल्या अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरु झाल्या असतील . तर एकुणातच सगळेच "पंडित " "बुवा" "भडजी " हे शुद्ध फसवणूक करती आहेत सगळ्यांची असं म्हणताय का तुम्ही ? याच प्रथांच्या नावाखाली घडलेले किस्से सांगण्यासारखे खूप आहेत , पण विषयांतर होईल.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म्म्

शाम भागवत
Tue, 05/03/2016 - 14:26 नवीन
मला वाटले की एक गुरूजी लिहित आहेत तर, लक्ष्मीपूजन का करतात? त्यामागे कोणता हेतू असतो? नववधूला लक्ष्मी का समजायचे? वगैरे कळेल म्हणून वाचायला घेतले तर.. जाऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

फसवणूक ??

कपिलमुनी
Tue, 05/03/2016 - 14:27 नवीन
सगळ्या प्रथा अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरू झाल्या नाहीत. हिंदू धर्मामधल्या ज्या प्रथा आहेत त्या पुराणांमध्ये , ग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत. त्या प्रमाणे त्या केल्या जातात. ज्यांचा या गोष्टीवर ( देवावर आणि कर्मकांडावर) विश्वास आहे ते या गोष्टी करतात. कोणताही पंडित सांगितलेले विधी करत असतो. यात फसवणूक कुठे आली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

दॅट्स इट मुनिवर. धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 14:34 नवीन
दॅट्स इट मुनिवर. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धार्मिकविधींमध्ये साध्या

अद्द्या
Tue, 05/03/2016 - 14:44 नवीन
धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
इथून आली , कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय म्हणून ते अंतिम सत्य असतं का ? एखादी पद्धत /परंपरा त्या काळात "साधी व्यवहाराची " म्हणून त्यांनी लिहून ठेवली असेल , आणि आत्ता हे सो कॉल्ड पंडित लोक त्यांना धार्मिक गोष्टींचा मुलामा देऊन असच केलं पाहिजे तसाच केलं पाहिजे म्हणत कैच्याकाय वेळ काढत असतील आणि काही तरी फालतू कारण काढून "धर्मात सांगितलंय " च्या नावाखाली गल्लाभारून "दक्षिणा " उकळत असतील तर ती फसवणूक नाही का ? ( सगळेच बुवा असं करतात म्हणत नाहीये )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

असे असेल तर ते तर त्यांच्या

टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 14:47 नवीन
असे असेल तर ते तर त्यांच्या पुस्तकाला अंतिम आदेश/डायरेक्ट कायदाच मानतात त्यांना बदलून दाखवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मी कोणालाही बदलायला सांगत

अद्द्या
Tue, 05/03/2016 - 14:50 नवीन
मी कोणालाही बदलायला सांगत नाहीये , प्रत्येक जण आपापल्या धंद्यात येनकेन प्रकारे चुना लावताच असतो . त्याची वारंवारिता आणि आकार बदलू शकतो एवढंच . मी फक्त विचारतोय , कि हे असं हि असू शकतं का , आणि नसेल तर का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

का? आणि कस?

शाम भागवत
Tue, 05/03/2016 - 14:59 नवीन
का करायच व कस करायच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. का ते प्रथम समजावून घेऊया. मग कस करायच याला किती महत्व द्यायचे ते कळेलच की. पण कसे करायचे यावरच भर द्यायचा असेल तर फक्त टीआरपी वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

आज ऑफिस मध्ये काम नाहीये म्हणून आणि म्हणून फक्त

अद्द्या
Tue, 05/03/2016 - 15:19 नवीन
का करायचं याचं उत्तर आहे तयार , पुस्तकात सांगितलंय , आई वडील - आज्जी आजोबा हे करत होते , आजूबाजूचे करतात , आमच्या गावात हे असं करतात . pick your choice
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

:-))

शाम भागवत
Tue, 05/03/2016 - 15:21 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

काडी होती रे =))

टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 15:11 नवीन
काडी होती रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

ते समजलं ,

अद्द्या
Tue, 05/03/2016 - 15:13 नवीन
ते समजलं , मी पाणी ओतलं या वेळी =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

:-))

शाम भागवत
Tue, 05/03/2016 - 15:16 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मूळ

कपिलमुनी
Tue, 05/03/2016 - 15:34 नवीन
या प्रथांच्या मुळाशी जावे लागेल. माझा अंदाज असा: पूर्वी पंचमहाभूतांची पूजा व्ह्यायची. नंतर मातृपूजन,लिंगपूजन सुरू झाले. नंतर पावसासाठी इंद्र , धनधान्यासाठी लक्ष्मी ईई. पूजा सुरू झाल्या ( बहुतांशी मंत्रांमध्ये देवांची स्तुती केली आहे. जेणेकरून त्या प्रसन्न होतील.) मूर्तीपूजा सुरु झाल्यावर त्या मूर्तीची सजावट, तिची स्वच्छता या साठीचे मंत्र तयार झाले. काळानुरूप या पूजा पद्धतीत बदल होत गेले आहेत . मूळ संहीता / ग्रंथ मौखिक परंपरेने जपली जात असल्याने त्यात बरेच प्रथा अ‍ॅड होत गेल्या. तशाच बर्‍याच कालबाह्य काढल्या गेल्या. आजदेखील एखादी गोष्ट कालबाह्य वाटली तर काढून टाकायला हवी. पण लोकांची त्या प्रथा, कर्मकांडावर श्रद्धा आहे. राखी बांधली नाही तर फार फरक पडत नाही, पण बहिणीने राखी बांधली तर आनंद वाटतो , कारण पद्धत, प्रथा , आपल्यामधे हे संस्कार खूप खोल रुजले आहेत. (नंतर सविस्तर लिहिन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

आत्मूसबुवांचा धागा आला की

सुरवंट
Tue, 05/03/2016 - 14:31 नवीन
आत्मूसबुवांचा धागा आला की त्यावर प्रतिसाद खरडायचा. का खरडायचा माहीत नाही. पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ती. मग धागा कितीही टमरेल असो
  • Log in or register to post comments

सुरवंट म्हणालं धागा टमरेल आहे

वैभव जाधव
Tue, 05/03/2016 - 14:35 नवीन
सुरवंट म्हणालं धागा टमरेल आहे आणि जिलब्यांची रांग लागली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट

इतकी अक्कल चालली तर!

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 14:36 नवीन
इतकी अक्कल चालली तर! तेव्हढीच आहे म्हणायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट

यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी

कंजूस
Tue, 05/03/2016 - 15:01 नवीन
यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी बुवा विरुद्ध नवग्रह बोलर असा सामना खेळवला जातोय. यातले कितीजण बिनबुवांचे लग्न उरकणारे आहेत हे पाताळेश्वरालाच म्हैत.
  • Log in or register to post comments

हेच कंजुशकाका एकच मारा पर

प्रमोद देर्देकर
Tue, 05/03/2016 - 15:27 नवीन
हेच कंजुशकाका एकच मारा पर सॉलीड मारा, भटजी असे करतात , भटजी असे लुटतात असा सुर कायम ऐकु येतो अरे मग कशाला बारशापासुन अगदी वर गेल्ल्यावर सुध्द्दा भटजी लागतो सगळ्याला. तुमचे तुम्ही करा की ही सगळी कामे भटजी शिवाय. आणि भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन. एक नविन प्रथा करा ना सुरु स्वागतच केलं जाईल.
  • Log in or register to post comments

ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ

टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 15:40 नवीन
ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ पुणेकराकडून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

खीऽ क .

प्रमोद देर्देकर
Tue, 05/03/2016 - 17:04 नवीन
खीऽ क . आधीची जी बाकी ती तर मिळु दे. मग नविन साठी क्लेम लावेन. पुणेकर नेहमी थकबाकी ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

छ्या

नाखु
Wed, 05/04/2016 - 09:16 नवीन
"उकळ"लेली मस्तानी कशी लागेल चवीला?? काहीही टक्या श्री !!! जा नवी (आण) अत्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

ऊकळलेली म्हणजे

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 09:33 नवीन
फुकट मिळवलेली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

तो

नाखु
Wed, 05/04/2016 - 09:39 नवीन
(क्षीण) कोटी विनोद होता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

भटजी काय घरी येवुन तुमच्या

मोदक
Tue, 05/03/2016 - 15:52 नवीन
भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन हेच लॉजीक पेशंट लोकांना पण लागू होते. डॉक्टर म्हणत नाहीत की माझ्याकडून उपचार करून घ्या म्हणून. तरीपण लोक्स डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेतात, व परत त्याच डॉक्टरचा शक्य होईल त्या ठिकाणी उद्धार करत बसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

चुकीचे विधी

कपिलमुनी
Tue, 05/03/2016 - 16:03 नवीन
विधी चुकीचा झाला किंवा शॉर्टकट मारला तर भटजीचा सुद्धा उद्धार होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

विधी चुकीचा झाला किंवा

सूड
Tue, 05/03/2016 - 16:39 नवीन
विधी चुकीचा झाला किंवा शॉर्टकट मारला
भटजी विधी चुकीचा करतोय किंवा शॉर्टकट मारतोय हे किती जणांना लक्षात येतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भयंकर फरक आहे. धार्मिक विधी

संदीप डांगे
Tue, 05/03/2016 - 16:16 नवीन
भयंकर फरक आहे. धार्मिक विधी ऐच्छिक व अनावश्यक बाब आहे, तसेच सरकारने भटजींना लायसन्स दिलेले नाही, लायसन्स नसलेले व्यक्ती भटजीगीरी करु शकत नाहीत असा काही दंडक नाही. उपचाराची गरज पेशंटलोकांना हौस म्हणून नसते. त्यामुळे डॉक्टर जर लुबाडत असतील तर त्याविरुद्ध मिळेल तिथे उद्धार करण्याचा हक्क पेशंटला आहेच. तुमच्याकडून अशा सरमिसळीची अपेक्षा नव्हती, सरसकटीकरणाचीही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१

स्पा
Tue, 05/03/2016 - 16:32 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एकतर मोदकने टाईमपास म्हणून

टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 16:49 नवीन
एकतर मोदकने टाईमपास म्हणून काडी टाकलीये नैतर प्रतिसाद प्रचंड हुकलेला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

:)) काडी होती रे. :D

मोदक
Tue, 05/03/2016 - 16:53 नवीन
:)) काडी होती रे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 17:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भटजीने आता एकदोन विधिक्रम

कंजूस
Tue, 05/03/2016 - 18:12 नवीन
भटजीने आता एकदोन विधिक्रम बदलले अथवा गाळले तरी एवढं मनावर घेऊ नये कारण तेवढ्याने एक दोघांच्या मीपणाला हुशारीला ठेच बसली तरी लग्न काही अवैध ठरत नाही.शिवाय सध्या पुर्वीसारखे एक पिवळ्या कागदावर नोंदणीचे प्रमाणपत्र मिळत नाही परस्पर.त्यासाठी दोनदोन साक्षीदार पॅनकार्ड ओळखपत्रासह सर्वांना निबंधकासमोर हजर राहून सह्या फोटो द्यावे लागतातच.
  • Log in or register to post comments

किस्से आवडले

पैसा
Tue, 05/03/2016 - 22:08 नवीन
किस्से आवडले. धाग्याचे शंभर झाले की सत्कार करायचा ही प्रंपरा मिपावर जेपीने सुरू केली. आता त्याचा नेटपॅक संपला तर दुसरा कोणतरी करतो. काही वर्षानी सत्कार झाला नाही तर संपादक लोक धागे वाचनमात्र करतील. =)) असो. बुवा, शनीच नव्हे तर सगळे पापग्रह तुमच्या कुंडलीत जमा झालेले दिसत आहेत. =))
  • Log in or register to post comments

बुवा धर्मसुधारक पुरोहित आहे.

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 22:10 नवीन
बुवा धर्मसुधारक पुरोहित आहे. कुंडली वगैरे त्याचे लेखी टनाटनी आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅहॅ!

पैसा
Tue, 05/03/2016 - 22:13 नवीन
कुंडली तयार केली नाही तरी साडेसाती कधी चुकते काय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते खरं.

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 22:16 नवीन
ते खरं. एकटा शनिदेवच काफ़ी है. बुवांनी मारुतीची उपासना केली नै वाट्टं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मारुती कशाला अता?

पैसा
Tue, 05/03/2016 - 22:20 नवीन
मारुती कशाला अता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तोच शनिदेवाचा कोप शांत करू

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 22:22 नवीन
तोच शनिदेवाचा कोप शांत करू शकतो ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बेक्कार पंच आहे हा =))

सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 22:29 नवीन
बेक्कार पंच आहे हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

सूड
Tue, 05/03/2016 - 22:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 22:45 नवीन
माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल एक हत्ती एक डुक्कर एक बोकड एक खोकड एक माकड आणी काही लांडगे , कोल्हे असे अनेक प्राणी आहेत. त्यांची मी व्यापकशांत नेहमीच करित असतो! ल्लूल्लूल्लूल्लू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तरिही तुमच्यावर अशी वेळ यावी

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 22:47 नवीन
तरिही तुमच्यावर अशी वेळ यावी हेच दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा