✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

क
किल्लेदार यांनी
Tue, 01/20/2015 - 11:55  ·  लेख
लेख
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा. स्टीफन किंग किंवा रस्किन बॉंड यांच्या भयकथा , रत्नाकर मतकरी आणि हिचकॉकच्या शेवटी "पंच" असलेल्या भयकथापण घाबरवून टाकणाऱ्या असल्या तरी धारपांची भुतावळ ही पोटात गोळा आणणारी होती. तर आज ही सत्य-नारायणाची आरती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल :) तर ते म्हणजे कुठे ही पुस्तके ऑनलाइन वाचता येतील का हे इथे विचारायचे आहे. मिपावर बरेच भयकथाकार आहेत आणि त्यांना कदाचित याबद्दल माहिती असावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
71041 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

http://bookganga.com/ येथे

आनन्दा
Tue, 01/20/2015 - 12:05 नवीन
http://bookganga.com/ येथे बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. अर्थात विकत.
  • Log in or register to post comments

:)

किल्लेदार
Tue, 01/20/2015 - 12:07 नवीन
हे माहीत आहे हो. मला फुकट वाचायची आहेत :)
  • Log in or register to post comments

माझ्या माहितीत तरी धारपांची

स्पा
Tue, 01/20/2015 - 12:10 नवीन
माझ्या माहितीत तरी धारपांची ओंलीन पुस्तके उपलब्ध नाहीत, विकत किंवा लायब्ररी लावून वाचा अजुनहि धारपांची पत्नी त्यांचे अप्रकाशित झालेले लिखाण प्रकाशित करत असतात धारपांची एकूण एक पुस्तके वाचून झालेला (इस्पा)
  • Log in or register to post comments

जरा तुम्हाला आवडलेली पुस्तके

सौंदाळा
Tue, 01/20/2015 - 14:02 नवीन
जरा तुम्हाला आवडलेली पुस्तके सांगा की वाचनालयातुन मिळवुन वाचेन अनोळखी दिशा दोन खंड, प्रा. वाईकरांची कथा, चेटकीण, ४४० चंदनवाडी, दस्त, माटी कहे कुम्हारको, संसर्ग, देवाज्ञा आणि धारपांची सुप्रसिध्द समर्थ सिरिज वाचली आहे. धारपांचा पंखा - सौंदाळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

नारायण धारप यांची कल्पनाशक्ती

सस्नेह
Tue, 01/20/2015 - 16:10 नवीन
नारायण धारप यांची कल्पनाशक्ती विलक्षण तर होतीच, पण त्या कल्पना प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित असत. शब्दांचे पाल्हाळ, वर्णनाची अतिशयोक्ती कधीच नसे. साधेच शब्द पण जबरदस्त परिणामकारक. वाचल्यानंतर कित्येक दिवस (काहीवेळा तर महिनेसुद्धा !) मनावर त्यांच्या कथांची विलक्षण पकड राहते. पुष्कळ जणांना त्यांच्या कथा दुर्बोधही वाटतात. मराठीत तरी अशा विषयांवरचा असा लेखक दुसरा सध्या नाही. त्यांच्या काही विज्ञानकथा/कादंबऱ्या नेनचिम युगपुरुष कंताचा मनोरा ऐसी रत्ने मेळवीन पारंब्यांचे जग अंधारयात्रा आकाशाशी जडले नाते स्वप्नमोहिनी विधाता ? ग्रोग्रॅमचा चितार सुवर्णाचे विश्व बहुमनी काही भयकथा/ कादंबऱ्या पाठलाग दस्त अघटित सावधान ग्रास भुकेली रात्र दरवाजे अंधारयात्रा व्दैत माणकाचे डोळे समर्थ समर्थांचे प्रयाण समर्थांचे पुनरागमन काळ्या कपारी आनंदमहल नवी माणस इक्माई कृष्णचंद्र ...माझ्या मिपावरील लेखनातील ‘एका नव्या इतिहासाची सुरुवात’ या कथेवर नारायण धारपांच्या शैलीची प्रचंड छाप आहे, हे इथे कबूल केले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

धन्यवाद

सौंदाळा
Tue, 01/20/2015 - 16:16 नवीन
धन्यवाद साठे फायकस नावाची अजुन एक कादंबरी वाचली होती त्यांची झाडांच्या भावना मनोव्यापाराबद्दल खुपच जबरदस्त होती. द. पां. खांबेट्यांची पण एक दोन पुस्तके वाचली होती पुर्वी, थरारक. परत नविन पुस्तके मिळाली नाहीत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

फायकस म्हणजेच 'पारंब्यांचे जग

सस्नेह
Tue, 01/20/2015 - 16:21 नवीन
फायकस म्हणजेच 'पारंब्यांचे जग'. खांबेट्यांच्या पण चांगल्या आहेत, पण धारपांच्या कथांना जी तर्कसंगती आणि शास्त्रीय बैठक असायची ती खांबेट्यांच्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

आपल्याकडे आहे...? मी फार

असंका
Tue, 01/20/2015 - 17:16 नवीन
आपल्याकडे आहे...? मी फार शोधली..मला सापडत नाहिये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ही नाही माझ्याकडे. लायब्ररीत

सस्नेह
Tue, 01/20/2015 - 17:18 नवीन
ही नाही माझ्याकडे. लायब्ररीत मिळते. 'पारंब्यांचे जग' याचाच उत्तरार्ध 'फायकसची अखेर' नावाचा आहे. तोही वाचनीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

हो. फार पूर्वी पुण्याला

असंका
Tue, 01/20/2015 - 17:25 नवीन
हो. फार पूर्वी पुण्याला लायब्ररीत मिळाली होती. तीन भाग होते. लोकांनी तर आता ह्या कादंबरीचं नावही ऐकलं नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कोल्हापूरात नगर वाचनालयात आहे

असंका
Tue, 01/20/2015 - 17:28 नवीन
कोल्हापूरात नगर वाचनालयात आहे पण वाचायला देत नाहीत. खराब झालंय म्हणून देत नाहीत म्हणतात.... :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

पूजा करा म्हणाव त्याची हळदी

काळा पहाड
Tue, 01/27/2015 - 13:32 नवीन
पूजा करा म्हणाव त्याची हळदी कुंकू लावून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

साठे फायकस

अजिंक्य विश्वास
Wed, 04/27/2016 - 01:21 नवीन
साठे फायकस हे पुस्तक दिलीप प्रकाशनाने प्रकाशित केले असून पुण्यात शुभम साहित्य किंवा रसिक साहित्य समोर सिद्धार्थ चेंबर्स आहे, तेथील पाटील बुक सेलर्सकडे मिळू शकेल. ३ रा मजला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बघतो. अनेक धन्यवाद.

असंका
Sat, 04/30/2016 - 10:16 नवीन
बघतो. अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

वरच्या यादीमध्ये

सस्नेह
Wed, 01/21/2015 - 11:41 नवीन
आणखी काही नावे अ‍ॅडवली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अगग - जवळ जवळ सर्व पुस्तके

अनुनाद
Sat, 03/17/2018 - 12:59 नवीन
अगग - जवळ जवळ सर्व पुस्तके आली यात... मस्त यादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

डेलिहंट ऍप वर बरीच पुस्तके

उल्हास आठवले
Sat, 04/23/2016 - 22:59 नवीन
डेलिहंट ऍप वर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत धारप यांची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुमच्याकडे आहेत का काही ?

किल्लेदार
Tue, 01/20/2015 - 12:14 नवीन
तुमच्याकडे आहेत का काही ? माझ्याकडे आहे थोडे कलेक्शन.
  • Log in or register to post comments

नारायण धारप

सस्नेह
Tue, 01/20/2015 - 12:15 नवीन
फेवरिट ! त्यांची बरीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. पण भयकथांपेक्षा मला त्यांच्या विज्ञानकथा आवडतात. त्यांनी लिहिलेली अखेरची विज्ञानकथा, 'विधाता' आत्ता हातात आहे..
  • Log in or register to post comments

विधाता ही त्यांची शेवटची विज्ञानकथा नाहीये.

अजिंक्य विश्वास
Wed, 04/27/2016 - 01:23 नवीन
विधाता ही त्यांची शेवटची विज्ञानकथा नाहीये. ती पूर्वी १९९० च्या सुमारास स्वतंत्र प्रकाशित झाली होती. रू १० किंमत होती. आता त्यांनी महावीर आर्य ची कथा अपूर्ण ठेवल्यामुळे महावीर आर्य़ आणि विधाता ह्या एकत्र प्रकाशित कराव्या लागल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अरे वा !!!

किल्लेदार
Tue, 01/20/2015 - 12:23 नवीन
मिळतील का मला काही वाचायला ? :)
  • Log in or register to post comments

धारपांची काही पुस्तकं ₹५०

आदूबाळ
Tue, 01/20/2015 - 12:33 नवीन
धारपांची काही पुस्तकं ₹५० मध्ये टिळक स्मारक मंदिरासमोरच्या श्रीनाथ ग्यालरीमध्ये मिळतात.
  • Log in or register to post comments

अनेक धन्यवाद. अजब चं प्रदर्शन

असंका
Wed, 05/04/2016 - 07:11 नवीन
अनेक धन्यवाद. अजब चं प्रदर्शन असणार ते पण. इथे कोल्हापूरात पण मिळतील या अंदाजाने काल गेलेलो. पाच सहा पुस्तकं आहेत. त्यातलं एक काल घेतलं. फक्त पन्नास रुपयाला! लैच भारी. आठवड्याभरात सगळी घरी येतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

:)

किल्लेदार
Sat, 05/28/2016 - 20:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

भेट.

कलंत्री
Tue, 01/20/2015 - 12:59 नवीन
धारप साहेब पुण्यातच असतात. कोणे काळी मराठी -> भयकथा यांच्या विश्वात साहेबांचे मोठे नाव होते. आजच्या काळात मराठीमध्ये असे प्रयोग होतात की नाही हे मला ठाऊक नाही. अश्या व्यक्तिंना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या कडुन प्रत्येक कथेची पार्श्वभूमी ऐकणे खूपच मनोरंजक आणि अविस्मरणीय असेल.
  • Log in or register to post comments

नाहीत ते आता.

सस्नेह
Tue, 01/20/2015 - 13:16 नवीन
नाहीत ते आता. २०११ला त्यांचे निधन झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

निधन

पा पा
Tue, 01/20/2015 - 13:24 नवीन
ऑगस्ट १८, इ.स. २००८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले ईति विकि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ओह

सस्नेह
Tue, 01/20/2015 - 16:11 नवीन
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पा पा

क्षमस्व.

कलंत्री
Tue, 01/20/2015 - 17:39 नवीन
माझ्या स्मरणशक्तीने बरीच गफलत केली हे खरेच. मी चुकून रत्नाकर मतकरी यांचा संदर्भ दिला. त्यांनी सुद्धा बर्‍याच भयकथा लिहिल्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आजच्या काळात मराठीमध्ये असे

आदूबाळ
Tue, 01/20/2015 - 13:32 नवीन
आजच्या काळात मराठीमध्ये असे प्रयोग होतात की नाही हे मला ठाऊक नाही.
नव्या लेखकांपैकी हृषिकेश गुप्ते यांचा "अंधारवारी" हा भयकथासंग्रह अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

पारंब्यांचे जग वाचली आहे का

असंका
Tue, 01/20/2015 - 13:46 नवीन
पारंब्यांचे जग वाचली आहे का कुणी?
  • Log in or register to post comments

धारपांच्या कथाचे एखादे ऑडियो

विजुभाऊ
Tue, 01/20/2015 - 14:48 नवीन
धारपांच्या कथाचे एखादे ऑडियो बोक तयार करुयात का?
  • Log in or register to post comments

एकच वाचली

विटेकर
Tue, 01/20/2015 - 15:16 नवीन
आठवीत असताना आमचे पी टी चे मास्तर धारपांची " लुचाई " ही कथा वर्गात जाहीर वाचून दाखवत होते .... आणि ती ते अन्य वर्गात / अन्य तुकड्यांमध्ये पण वाचून दाखवत होते .. त्यांची वाचनाची शैली देखील उत्तम होती ... जाम टरकलो होतो...म्हणजे सगळी शाळाच टरकली होती. त्यानंतर धारपांच्या वाटेला गेलो नाही !!
  • Log in or register to post comments

रोचक धागा!

बॅटमॅन
Tue, 01/20/2015 - 18:00 नवीन
रोचक धागा! आम्ही धारप वाचले नाहीत. पण स्पारायण गाळपांच्या कथा वाचून थोडा काही अंदाज येतो त्यांचा. ;)
  • Log in or register to post comments

@स्पारायण गाळप >>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/28/2015 - 13:14 नवीन
@स्पारायण गाळप >>> =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तरी म्हटलं तुमचा कसा

सूड
Wed, 01/28/2015 - 14:31 नवीन
तरी म्हटलं तुमचा कसा उपप्रतिसाद नाही !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आधीच स्पा आणि त्यात गाळप, मग

बॅटमॅन
गुरुवार, 01/29/2015 - 02:04 नवीन
आधीच स्पा आणि त्यात गाळप, मग तर झालंच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पण हा शब्दप्रयोग मुळात

बॅटमॅन
गुरुवार, 01/29/2015 - 02:05 नवीन
पण हा शब्दप्रयोग मुळात सातवाहनकालीन आहे याची नोंद घेण्यात यावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नारायण धारप ....

चौकटराजा
Tue, 01/20/2015 - 19:50 नवीन
मी स्वत: एकदा नारायण धारप यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या दुकानात गेलो होतो. होय त्यांचा मुख्य व्यवसाय फनिचर भाड्याने देण्याचा होता. माझ्या लहानपणीच ( सुमारे १४ वर्षाचा असताना ) समर्थाचिया सेवका ही पहिली कथा वाचली. नारायण धारप हे गोरटेले मध्यम बांध्याचे मिस्कील गृहस्थ. बोलण्यात आपल्या काही कंथांची बीजे परकीय पुस्तकातील आहेत हे त्यानीच स्वतः सांगितले होते. त्याला ते बाज मात्र आपल्याकडचा मस्त द्यायचे. त्यांच्या दुकानात अशा पुस्तकानी भरलेले एक कपाटच होते. अर्थात मला नारायण धारप यांच्या पेक्षा भयकथाकार म्हणून रत्नाकर मतकरी अधिक आवडले. मानवी मन , त्यातील अनिवार भीति , सल हा मतकरींच्या कथेचा पाया असे तर नारायण धारप हे घातकी, किळसवाणी मानवेतर ताकद अस्तित्वात आहे असे मूळ धरून कथा लिहित असत. पण अशा शक्तींच्या अस्तिवावर आपला विश्वास नाही असे त्यानी गप्पांच्या ओघात सांगितल्याचे स्मरतेय. आता त्या ठिकाणी त्यांच्या मुलाची पॅथोलॉजीकल लॅब आहे.
  • Log in or register to post comments

काका, धारपांचं घर/दुकान टिळक

आदूबाळ
Tue, 01/20/2015 - 20:44 नवीन
काका, धारपांचं घर/दुकान टिळक रस्त्यावर बादशाही बोर्डिंगसमोर होतं का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नाही.

चौकटराजा
Wed, 01/21/2015 - 05:59 नवीन
ते रहात बाजीराव रोडवरच्या एका गल्लीत व बालगंधर्व समोरच्या इमारतीत तळ मजल्यावर दुकान होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बाजीराव रोड वर कुठे?

एकुलता एक डॉन
Fri, 08/18/2023 - 17:01 नवीन
बाजीराव रोड वर कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नारायण धारपांच्या खूप कथा

सौन्दर्य
Tue, 01/20/2015 - 20:09 नवीन
नारायण धारपांच्या खूप कथा वाचल्या, प्रत्येक कथेनंतर कितीतरी दिवस मनावर एक गडद सावट पडलेलं असायचं. जाम भीती वाटत राहायची पण त्याच बरोबर नवीन कथा वाचायची उत्सुकता मात्र गप्प बसू द्यायची नाही. 'लुचाई'वाचल्यावर वाटलेली भीती नुसते 'लुचाई'ची आठवण जरी आली तरी पुन्हा जाणवते. रत्नाकर मतकरींच्या देखील भयकथा, गूढकथा खूप वाचल्या. लायब्ररीत ह्या दोन्ही लेखकांच्या हाताला लागतील तितक्या कथा कादंबर्या वाचून संपवल्या. ह्या सर्व कथा वाचल्याला बराच काळ लोटला, आता पुन्हा एकदा त्यांचे पारायण करायची इच्छा आहे. मी ह्युस्टन (टेक्सास स्टेट)येथे असतो त्यामुळे ही पुस्तके ऑनलाईन (विकत) बुक गंगेवर शोधतो. सर्वच साद-प्रतिसाद उत्तम.
  • Log in or register to post comments

चंद्राची सावली

भाते
Tue, 01/20/2015 - 20:27 नवीन
सहावीत असताना हे पुस्तक (पहिल्यांदा) वाचनालयातुन आणुन रात्री ७ ते १० या वेळात सलग वाचले होते. त्यानंतर या पुस्तकाची अनेकदा पारायणे झाली. पण पुढे त्यांचे लेखन वाचायची हिंमत झाली नाही.
  • Log in or register to post comments

धारपांची जवळपास सर्वच पुस्तके

प्रचेतस
Tue, 01/20/2015 - 23:04 नवीन
धारपांची जवळपास सर्वच पुस्तके वाचली आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक आवडीचे म्हणाजे 'चंद्राची सावली'. धारपांचे बहुधा हे सर्वोत्तम पुस्तक असावे. धारपांच्या कथांमध्ये मात्र तोचतोचपणा कायम जाणवत असतो मात्र तसे असूनही त्यांच्या कथा कायम खिळवून ठेवतात आणि वाचकाला पुढे काय होईल हे अपेक्षित असूनही पुस्तक हातातून सोडवत नाही. वर काही जणांनी धारपांची तुलना मतकरींबरोबर केली जे काहीसे चुकीचे असे वाटते. दोन्ही लेखकांची शैली बर्‍यापैकी भिन्न आहे. धारप हे भयकथाकार म्हणून तर मतकरी हे गूढकथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. धारपांची कथा ही नेहमीच सरधोपट मार्गाने जाते उदा. दुष्टांवर सुष्टांचा विजय तर मतकरी कथेला कायम अनपेक्षित कलाटणी देतात. ह्या दोघांव्यतिरिक्तही मराठीत सुहास शिरवळकरांनी मोजक्याच पण चांगल्या भयकथा लिहिल्या आहेत. सुभाष देशपांडे यांनी 'शाझामचा पंजा' नावाने एक चांगली भयकथा लिहिलेली आहे जी एकेकाळी खूप गाजलेली होती. याखेरीज गजानन क्षीरसागर, यशवंत रांजणकर ह्यांनी देखील काही भयकथा लिहिलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments

सुभाष देशपांडे ह्यांची अजून

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/22/2015 - 03:52 नवीन
सुभाष देशपांडे ह्यांची अजून पुस्तके वाचायला मिळाली नाही ह्या बद्दल खंत वाटते. बाकी धारप व मतकरी तुलना अयोग्य धारपांच्या कथेत वाड्याचे किंवा एखाद्या परिसराचे किंवा व्यक्तीचे त्याच्या सामाजिक व इतर बाबीचे तपशिलावर वर्णन वाचता वाचता आपण कथेत डुबून जायचो , थरार अंगात भिनायला लागतो. अशी पुस्तके रात्री वाचवण्यात खरी गंमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चंद्राची सावली मला तितकेसे

सोन्या बागलाणकर
Fri, 04/03/2020 - 06:53 नवीन
चंद्राची सावली मला तितकेसे आवडले नाही. त्यापेक्षा चेटकीण किती तरी सरस आहे. पण शेवटी पसंद अपनी अपनी :) मला धारपांची ओळख समर्थ सिरीज पासून झाली, त्यातली खास करून "यो अस्माकं द्वेष्टी" आणी "समर्थाचिया सेवका" या दोन गोष्टी वाचून तर अंगावर सरसरून काटा आला होता. लुचाई हे अजून एक जबरदस्त पुस्तक. नारायण धारपांच्या कथाना तितक्या जबरदस्तपणे पडद्यावर फक्त राहिल अनिल बर्वेच प्रस्तुत करू शकतात हे त्यांचा तुंबाड सिनेमा बघून वाटलं. बाकी लोकांनी त्या वाटेला जाऊच नये. तसाही कथा वाचण्यात जी मजा आहे ती चित्रपट बघण्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्राध्यापक वाईकरांची कथा

किल्लेदार
Fri, 04/03/2020 - 17:27 नवीन
मलाही चेटकीण जास्त आवडलं. प्राध्यापक वाईकरांची कथासुद्धा अंगावर सरसरून काटा आणते. समर्थकथा तर उत्तमच. लहानपणी समर्थांची "मृत्यूजाल" ही कथा वाचली आणि भर दुपारीसुद्धा कापरं भरलं. कितीतरी दिवस एक गडद छाया मनावर होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोन्या बागलाणकर

साठे फायकस हे पण एक जबरदस्त

प्रचेतस
Fri, 04/03/2020 - 17:35 नवीन
साठे फायकस हे पण एक जबरदस्त पुस्तक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

'देवाज्ञा' पण

सौंदाळा
Fri, 04/03/2020 - 22:58 नवीन
'देवाज्ञा' पण एक माणूस जे लोक मरणाच्या दारातून परत आले आहेत अशा लोकांना हेरून, संमोहित करून परत त्याच अवस्थेत नेत असतो आणि जीवन आणि मृत्यूच्या मधेच अडकवून स्वतः च्या गैरकृत्यांसाठी वापरत असतो. अशी काहीशी कादंबरी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा