Skip to main content

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 20/01/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा. स्टीफन किंग किंवा रस्किन बॉंड यांच्या भयकथा , रत्नाकर मतकरी आणि हिचकॉकच्या शेवटी "पंच" असलेल्या भयकथापण घाबरवून टाकणाऱ्या असल्या तरी धारपांची भुतावळ ही पोटात गोळा आणणारी होती. तर आज ही सत्य-नारायणाची आरती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल :) तर ते म्हणजे कुठे ही पुस्तके ऑनलाइन वाचता येतील का हे इथे विचारायचे आहे. मिपावर बरेच भयकथाकार आहेत आणि त्यांना कदाचित याबद्दल माहिती असावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 71487
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

In reply to by किल्लेदार

तुम्ही जीवनाची मूल्यं मृत्यूनंतरच्या आस्तित्वाला चिकटवताय. हे असंच असतं का हा प्रश्न आहे. जीवनाबरोबर आठवणी आणि (पापपुण्याची) जाणीव सुद्धा संपत असावी. तसं असेल तर आत्मा हा एक शुद्ध उर्जेचा प्रकार असावा आणि मानवी जीवनाची मूल्यं त्याला कितपत लागू पडतील?

In reply to by सवंगडी

>>हा 'किल्ल्या' मला कायम किल्ल्या मारत असतो की, "नारायण धारप वाच. मी म्हंटल ,"दे एखादं पुस्तक, तर म्हणतो कसा घे कि विकत…"!
असं करतात? आपण त्यांचं घर उन्हात बांधू हां!!

आमच्याकडे धारपांचि सर्व पुस्तके आहेत. बाजिराव रोड वर एक जण जुनि पुस्तके विकत असतात. सरस्वति मन्दिर पाशि, पण आता असतात कि नाहि ठाउक नाहि. भयकथा वाचायच्या अस्तिल तर चंद्रकांत आणि धनंजय सुद्धा चांगलि मासिके आहेत.

डेलीहंट वर धारपांची बरीच पुस्तकं आहेत. काही काही अगदी ५ रुपयापासून उपलब्ध आहेत. माझी आवडती पुस्तकं: १) चेटकीण २) चंद्राची सावली ३) आनंद महल ४) दस्त ५) ४४० चंदनवाडी (नारायण धारपांचा पंखा) सुमीत भातखंडे

धारप माझे आवडते लेखक आहेत. शिरवळकरांनंतर मी धारपांचा फॅन आहे. मला धारपांना भेटायचे भाग्य देखील मिळाले आहे. आणि त्यांची स्वाक्षरी देखील! धारपांच्या ९०% कथा ह्या परकीय साहित्यावर आधारीत होत्या. विशेषत: त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. स्टीफन किंग आणि बरेच लेखक त्यांचा आधार होते. आणि ते ह्या गोष्टी प्रांजळपणे सांगत देखील. त्यांची खासियत म्हणजे ते मराठीकरण करताना मूळ कथा धरून त्याभोवती भारतीय साज खूप छान चढवायचे. बखळ, बळद, माजघर, ह्या गोष्टी त्यांच्या लिखाणातून सहज यायच्या. १०-१५ वर्षापूर्वीच्या पुणेकरांने हे शब्द माहित होते. आमच्या वाड्याच्या मागे बखळ होती, आणि मी लहान असताना सर्रास लाईटस्‌ गेले की धारपांच्या गोष्टी आठवून पाचावर धारण बसायची. धारपांनी उचललेल्या काही कथा-कादंबर्‍या: लुचाई- सलेमस्‌ लॉट - स्टीफन किंग आनंदमहल- शायनिंग- स्टीफन किंग शपथ- इट‌‌- स्टीफन किंग ( ह्यावर हिंदीमध्ये लिलीपूट, आशुतोष गोवारीकर आणि धारा तेलाच्या जाहितातीतला ’जलेबी’ म्हणणारा मुलगा ह्यांची ’वोह’ नावाची सिरीयल देखील आली होती. त्याचा इंग्लीश टी.व्ही. मूव्ही पण आहे १९९२-९३ बहुतेक. आणि २०१७ मध्ये तो मोठ्या पडद्यावर नवीन पद्धतीत बनत आहे. नंतर रूम नं. १४०८ ( १४०८ नावाचा सिनेमा आहे) ह्यावर त्यांनी स्टोरी पण लिहिली आहे. लवकरच समग्र धारप यादी जाहिर करेन. त्यात विज्ञानकथा, भय/गूढ कथा-कादंबरी, लहान मुलांसाठीच्या कथा, अनुवाद, साहस कथा, सामाजिक कादंबरी ह्या सगळ्यांची माहिती देण्याचा प्रयत्न असेन.

In reply to by अजिंक्य विश्वास

अरे वा तुम्ही ही माझ्यासारखेच त्याना भेटलेले दिसताय. परकीय मूळ हे त्यानी आपल्याकडेही कबूल केलेले होते हे वाचून त्यांच्या दिसखुलास पणा विषयी आनंद वाटला. ते मिस्कील स्वभावाचे गृहस्थ वाटले असा उल्लेख मी इथेच एका प्रतिसादात केला होता. वरील एका टेरर फोटोत आरशातील " ते" हिरवट रंगाचे दिसावयास हवे तरच धारपाना न्याय मिळेल त्या फोटोत!

नुकतीच झी मराठीवर रात्री १०.३० ला सुरु झालेली ग्रहण मालिका धारपांच्या ग्रहण या कथेवरून घेतली असावी असा अंदाज आहे. ग्रहण

मराठी साहित्य online क्वचितच मिळते. आजकाल बरेचजन विकत घेऊन laptop/mobile वर वाचायला तयार आहेत. पण प्रकाशक उदासीन असतात मराठी साहित्य बदल. Google Books वर इतर भाषेचे भरपूर साहित्य मिळते पण मराठीचे फार कमी.

तुमच्या वाचनाचा वेग चांगला असेल तर फक्त 169 रुपयांत Amazon Kindle unlimited ची मेम्बरशिप घेऊन नारायण धारपांची बहुतेक सगळी पुस्तक एका महिन्यात वाचू शकता.

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने 'लुचाई / अनोळखी दिशा खंड १ / २ / ३ ' प्रकाशित केले आहेत. मर्यादित प्रती!! लवकर आपली मागणी नोंदवा. संपर्क - साकेत प्रकाशन - ९८८१७ ४५६०५

धारपांच time travel वर एक पुस्तक का कथा आहे . एक बाई चुकून time travel ने स्वातंत्र पूर्व काळात जाते. तिला परत येता येत नाही पण ती चिठ्ट्या लिहून ठेवते असं काहीतरी आहे. कुणाला आठवते आहे का ?

In reply to by साबु

पळती झाडे या पुस्तकात अशी एक गोष्ट आहे.

धन्य्वाद किल्लेदार... सध्या outlander नावाची एक सिरीज बघतोय नेटफ्लिक्स वर त्यात असेच कथानक आहे . एक बाई १९५४ मधून एकदम १७५४ मध्ये जाते स्कॉटलंड मधून ....ती परत यायचा प्रयत्न करते पण नाही जमत मग तिकडेच लग्न करते आणि तिला परत यावा लागत ..फार मस्त आहे

मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक नारायण धारप यांचे २००८ साली आजच्या दिवशी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली.

धारप. साहित्यातून वगळता न येणारे नाव.

आठवले, मीत्राला उर्मीला मातोंडकरचा नैना पिक्चर बघायला घेऊन जात होतो आम्ही तर तो म्हणाला उगीच पैसे देऊन घाबरायला जायचं काय