Skip to main content

अवघा महाराष्ट्र सैराटमय

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 28/04/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत. अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल. कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात. अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 67199
प्रतिक्रिया 231

प्रतिक्रिया

गाणी जबरा आहेतच,सिनेमाही असणारच, अजय-अतुल म्हणजे शेवटच.गाणी गावटी आहेतच पण त्यामध्ये एक वेगळी नशा आहे,ती गावटी लोकांनाच जाणवेल. ग्रामीण जीवन जगलेल्यांना/जगत असणार्यांना सिनेमा आवडेल. बाकि नागराजचे सिनेमे वास्तववादी असतात, एखाद्या सामान्या माणसाला उचलून एका दिवसात हिरो बनवण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यात. मोठ्या कलाकारांशिवायही चित्रपट दर्जेदार बनू शकतो हे त्याने दाखवून दिलयं. शहरी राहणीमान असणार्यांना फारसा आवडणार नाही. . . ---( गावटी )

In reply to by प्रदीप साळुंखे

साळुखे साहेब अगदी बरोबर ,आम्हा ग्रामिण आणि शेतकरी लोकांना असे चित्रपट चांगले रिलेट करता येतात.

मस्त गाणी!!! जाम आवडली, "सैराट झालं जी" एक नंबरच!! बाकि, महाराष्ट्र म्हणजे पुणे,मुंबई अशी मानसिकता असणार्यांना काय ढेकळं समजणार नाही पिक्चरमधलं. ▼ ▼ ▼एका आर्चीचा परश्या

पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...होणारे संस्कार हे फॅन्ड्री, टाइमपास, शाळा अशा चित्रपटांतून होतात असं मानणार्‍या पालकांना माझा साष्टांग नमस्कार. दंडवत. तुमचे चरणकमलांचे फोटो जरा मला पाठवा. द्येव्हार्‍यात ठेवीन म्हणतो. तुम्ही (काळजीवाटणार्‍या पालकांना उद्देशून) बालकपालक चित्रपट बघितला काय हो? बघितला असेल तर तुम्ही त्यातून काहीच शिकले नाही असे वाटते. नसेल तर बघून घ्या. पौगंडावस्थेतली पोरं काय काय करतात हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला खरंच जागं आणि मुख्य म्हणजे प्रगल्भ होण्याची गरज आहे. जेव्हा मी दहावीला होतो, अंदाजे १९९५ चा काळ, तेव्हा माझ्या शाळेतली सहावीतली मुलं-मुली एकमेकांना चिठ्ठ्या देत होती हे सोताच्या डोल्यानं बघितल्याव. वीस वर्ष झाली त्याला. तेव्हा कुठे फॅन्ड्री टाइमपास, शाळा होते? तेव्हा तर अधेड उम्रके बेटे, पुलिस इनिस्पेक्टर, बडे बापकी बेटीला पटवत होते, झाडांमधून घिरट्या घालत कवायती करत होते. दोन फुलांना टेकवून सुचित करायच्या हरकती सरेआम पडद्यावर तेही चायागित्त, रंगोली, चित्रहार मधून घरोघरी दिसत होत्या. प्रेमाचं प्रदर्शन आणि शारिरीक संबंधाचे चाळे दाखवणारे चित्रपट तर आठवड्यातून तीनदा दूरदर्शन नामे लोकजागरासाठी वाहलेल्या च्यानलवर लागत होते. ज्या गोष्टींचे उदात्तीकरण केले जाते त्या अनुकरण करु पाहण्याचा पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे. फॅण्ड्रीत एका शॉटमधे हे उत्तम दाखवलंय. जब्या कपड्यांच्या दुकानाबाहेर उभा असतो. तिथल्या मोठ्या पोस्टरवरच्या मॉडेलकडे बघुन स्वतःला तसं बघतो असं दाखवलंय. मुलांमधे हे कुठून येतं हे आपल्या आजूबाजूला इतकं ढळढळीत चालू असतांना त्याच गोष्टी टिपणार्‍या चित्रपटांना दोष देणे हास्यास्पद आहे. हे म्हणजे बलात्काराच्या बातम्या वृत्तपत्रात येतात म्हणून बलात्कार करण्याची प्रेरणा मिळते व असे प्रकार वाढतात असे म्हणणे आहे. संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.

In reply to by तर्राट जोकर

पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे. हेच्च म्हणतो.काही अडल्ट कंटेट वगैरे बघून परिणाम होत असेल थोडाफार पण तो क्षणिक असतो.
संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.
व्हयं!!!! ते अणि काय वो???

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

हे राम. हे अ‍ॅडल्ट कन्टेन्टबद्दल आहे असे का वाटलं तुम्हास्नी. भारतीय हिंदी चित्रपटांमधे प्रेमकहान्या एक मोठा पार्ट व्यापुन आहेत. प्रेमकहान्या हळुवारपणे फुलतात, दोघे जीव एकेमेकांसाठी जान की बाजी लावतात, एकमेकांसाठी अलम दुनियेला ठुकारावुन लावतात. पौगंडावस्थेतल्या कावर्‍याबावर्‍या असलेल्या, आपली ओळख, अस्तित्व वेगळं आहे असे जाणवू लागलेल्या पोरांना त्यांचे संसाराच्या कोलूत खंतावलेले आईबाप समजून घेउ शकत नाहीत, ते त्याला/तीला अजूनही कुक्कूलं बाळ समजून त्यांना पाहिजे तसं वागवायला बघतात, अशावेळेस फक्त त्याला/तीलाच महत्त्व देणारं, तिच्या/त्याच्या भोवती आपलं जग विणणारं, तो/ती म्हणेल तसं वागणारं, खास आपल्यासाठी जगणारं, आपलंच स्वप्नं बघणारं कोणी भेटलं तर हवंच असतं. पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.

In reply to by तर्राट जोकर

I know हे अडल्ट कंटेंट नाहीये, माझा रोख दुसरीकडेच आहे कि अडल्ट कंटेट पाहिल्यावर त्याचा परिणाम हा क्षणिक असतो,म्हणजे त्याचमुळे माणूस बलात्कारी बनतो अशी धारणा चुकीचे आहे.मी थोडं अवांतर केलं होतं.

In reply to by तर्राट जोकर

तजो तुमच्या वरील प्रतीसादाला १००% सहमत अस लिहीणार होतो, पण या प्रतीसादाला १०००% सहमत. म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पालकानी कसे वागु नये याचा एका अर्थी वस्तुपाठच आहे वरील प्रतीसाद.

In reply to by तर्राट जोकर

पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.
का चुकीचं? आणि मुळात लैंगिकता हे आणि हेच कारण आहे. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणं यात काहीच चुकीचं नाहीये. अर्थात लोक जेव्हा प्रत्यक्ष आणि कथा यांच्यातली सीमारेषा विसरतात, तेव्हा गोष्ट गंभीर होते हे खरं आहे. आईवडिलांनी आणि मित्रांनी तेच काम करायला पाहिजे. जमिनीवर आणण्याचं.

In reply to by बोका-ए-आझम

सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी त्या लैंगिक आहेत हे त्यावेळी मनाला माहित नसतं. 'त्यांच्या मुळाशी लैंगिकता आहे' हे विधान तात्विक चर्चेत, विद्वानांच्या सभेत, वैद्यकिय प्रबंधांत योग्य आणि सत्य आहे पण हे किशोरावस्थेतल्या मुला-मुलीला वळत नसतं. ते न उमगणं समजून घ्यावं असं माझं म्हणणं आहे. 'एखाद्या मुलीचा एखाद्या मुलावर क्रश आहे आणि तीने त्या मुलाचा कुठेतरी पडलेला रुमाल आपल्याजवळ खाजगीत गुप्तपणे लपवून ठेवला' ह्या कृतीला आपण 'तीला त्याच्यासोबत ***चेच होते म्हणून तीने असे केले' इतक्या टोकाला नाही नेऊ शकत. काही टप्पे (अर्थात माझे निरिक्षण: सॅम्पल गृप बराच मोठा आहे पण आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे शास्त्रिय आधार नाही) पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींना तर आपल्याला एखादं माणूस आवडतंय हेही कळत नसतं, नुसतं ओढलं जाणं, विचारांमधे गुंतत जाणं, भान हरपणं, हे सगळं आतलं, एकतर्फी, एकटं. ती व्यक्ती गृपमधे, ओळखीत असेल तर नकळत तीला आवडेल असे वागणे, तीची काळजी घेणे, तीच्यासाठी खस्ता खाणे, उपद्व्याप करणे, मदत करणे, स्वतःला व स्वतःचे महत्त्वाचे उद्योग विसरुन तीच्यामागे राहणे हे जरा प्रकट, तरीही अनभिज्ञ. पुरेसं प्रकट त्या व्यक्तीच्या दर्शनाविना कळवळून जाणं, असुरक्षित वाटणं, ती सतत जवळ असावी असं वाटणं, त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणं आणी ते करणंही, ह्यात प्रत्यक्ष तसं व्यक्त करायची गरज भासते. मुलं-मुली प्रेमाची कबूली देतात. एकदा रितसर दोन्हीकडून कबूली झाल्यावर सहवास वाढतो, विश्वास, जवळीक वाढते, अजून अजून जवळ येण्याची तृष्णा वाढते, लैंगिकता ह्या टप्प्यावर जाणवू लागते, आणि ती पुढे चटकन मूर्त रुप घेऊ शकते. लैंगिकता हा एक क्षीण आवेग आहे, अनेक रुपं, पुटं चढवून तो येतो. जसजसा जवळ येतो तशी पुटं गळून पडतात आणि मूळ रुपात भिडतो. आवेग ओसरुन गेल्यावरही ती अधिरता, तो विश्वास, ते प्रेम, ती आपुलकी तशीच राहत असेल तर पुढे संगोपनास आवश्यक ठरते. आईवडिल आणि मित्रांनी जमिनीवर आणायचे म्हणजे काय आणि कसे ते समजले नाही. उपयोग नसतो असा अनुभव आहे. मुळात अशा काही गोष्टी उपटूच नये म्हणून पालकांनी खूप जागरूक (मुलांचे मित्र बनणे इ.) राहावं लागतं आणि ते पालकांना ज म त नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. कारण मुलांचे मित्र बनण्याच्या ऐवजी अनेक महत्त्वाच्या भूमिका चाळीशी-पन्नाशीतल्या पालकांना पार पाडाव्या लागतात. मुलांना काही शिक्षण देण्याअगोदर पालकांना पालक व्हायचे शिक्षण दिले पाहीजे या मतावर मी येऊन पोचलोय. असो. अर्थात काही मुलं आजकाल हे वरचे टप्प्यांच्या फंदात पडत नाहीत असेही निरिक्षण आहे. आजकाल 'फ्रेण्शिप देती का', 'लवशिव देती का' किंवा नुसतंच 'देती का' ह्या तीन प्रश्नाचे टप्पे राहिले आहेत. ठळकपणे आढळत असेल तरी हेही सार्वत्रिक नाही हेही तितकेच खरे.

In reply to by तर्राट जोकर

पालकांना पालक होण्याचं शिक्षण दिलं पाहिजे याच्याशी १००% सहमत. तसं दुर्दैवाने होत नाही. खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.) त्यामुळे या पिढीतल्या लोकांनी आपल्या मुलांबरोबर मित्रत्वाचं नातं निर्माण करायला हरकत नाही. पण त्यासाठी खास प्रयत्न केले जाताहेत का हा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं. मी त्याच्याकडे ब-याच व्यापक दृष्टीने बघतो. शारीरिक आकर्षण हा मुद्दा आहेच पण या अवस्थेत मुलांना त्यांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम भिन्नलिंगी व्यक्तीवर कसा होतोय हेही बघायचं असतं (gratification). त्यांची स्व-प्रतिमा आणि स्व-मूल्य (self-image and self-esteem) या भिन्नलिंगी प्रतिसादांवर अवलंबून असतात. हाही लैंगिकतेचाच एक भाग आहे.

In reply to by बोका-ए-आझम

पौगंडावस्थेतील जाणीवा ह्या लैंगिकच असतात पण तेवढं कळण्याइतकी परिपक्वता त्या वयात नसते. पण आजकाल ती परिपक्वता इंटरनेटमुळे यायला लागली आहे. पौगंडवस्था म्हणजे नेमकं किती वय? याचं संशोधन करून नव्याने त्याची परिभाषा याकाळात ठरवायला हवी.

In reply to by बोका-ए-आझम

खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.) >> तुमचा अंदाज शंभर टक्के योग्य आहे. त्या पिढीच्या पौगंडावस्थेच्या भोवतालात आणि आज ९५ नंतर जन्मलेल्यांच्या भोवतालात भयंकर फरक आहे. तेव्हा आपली पिढी (३५-४५) शाळा व घर इतक्याच परिघात होती. आपला वेळ घरच्यांशी बोलण्यात, कामे करण्यात, खेळण्यात, अभ्यासात जात असे. संपर्काचे साधने कमी असल्याने, आजसारखे इण्टरनेट-मोबाईलने सगळं जग उघडं पडलेलं नव्हतं. शाळा-क्लासेसमुळे फक्त झोपायला जेवायला घरी असा प्रकार नव्हता. आज वातावरण खुप बदललेलं आहे. मुलं ज्यापद्धतीने व वेगाने जगाला एक्पोज होतायत तेव्हा इथून पुढे आईवडिलांचं कठिण आहे असे जाणवतंय. तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं. >> लैंगिकता ही मी पौगंडावस्थेतल्या मुलांच्या दृष्टिकोनातून बघत आहे. तुम्ही दिलेलं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण मान्यच आहे पण हे कोवळ्या, अनभिज्ञ जीवांना कळत नाही हा माझा मुद्दा आहे.

In reply to by तर्राट जोकर

MI SAATVILAA ASTANA MAJHYAPEKSHA VAYANE 2 VARSHE MOTHE ASLELYA MULACHYA CHITTHYA TYACHYA PREYASILA DYAYACHO. THODKYAT KABUTAR HOTO.

हे एक राहिलंच, अस्मादिक तीसर्‍या वर्गात असल्यापासून एकनिष्ठ रामाच्या एकाग्रचित्ताने एका सुंदर बालिकेचे (तीसर्‍या वर्गातली) एकतर्फी प्रेमी होते. अकरावीपतुर एकतर्फी सांभाळलं पण खुलासा झाल्याने प्रियतमेच्या भावबंधांनी सोप्या भाषेत भेटगांठ घेतल्याने प्रकरण थांबले. त्याबद्दल सविस्तर लिविनार, मज्जा होती तीपन एक. आमचे मातोश्री पाटीवर तीचे नाव मी गिरवीत बसल्याचे पाहुन ... असो. ट्रेलर काफी. पिच्चर बादमें.. =))

तर्राट जोकर सेठ, चित्रपट मंजुळे यांचा असला तरी झी मराठी ची निर्मिती आणि मार्केटिंग आहे. काही लोकांमध्ये आर्थिक फायद्या तोट्याबाबत शिक्षण कमी पडत असावं ;) - खरं दुखणं आणि ठसठस वृत्त!

झणाट गाणी!!! मस्त हाईप निर्माण झाली आहे. काय खतरा कडवं हाय हे,किती खोल अर्थ दडलाय. सुलगं ना ऊलगं ना जाळं आतल्या आतल्या दुखनं हे देखनं गं एकलचं हाय साथीला काजळीला ऊजळलं पाजळूनं ह्या वातीला चांदणीला अवताण धाडतुया रोजं रातिला झोप लागना सपानं जागवाया लागलं पाखरुं कसं…. आभाळ पांघरायां लागलं याड लागलं गं याड लागलं गं

"याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे." अंकल.. फारच वहावत गेलात की स्तुती करण्याच्या नादात. झी च्या सर्व मराठी चॅनेल्सवर मिनिटागणीक चाललेल्या जाहिराती पहा. वारेमाप खर्च म्हणजे काय ते दिसेल.

In reply to by श्रीरंग

त्यामुळे स्वतःच्या चॅनेल्सवर ते जाहिरात करणारच. पण त्यासाठी त्या चॅनेल्सना काही उत्पन्न मिळालं असेल असं वाटत नाही. असलं तरी ते transfer pricing स्वरूपातलं असणार. म्हणजे झीच्या एका कंपनीने झीच्याच दुस-या कंपनीला पैसे देणं. एका खिशातून पैसे काढून दुस-या खिशात टाकण्यासारखं.

वर्षानुवर्षे हिंदी चित्रपटांची प्रदर्शनपूर्व हवा अनुभवल्यावर मराठी चित्रपटांची तशी हवा पाहून कौतुक वाटत आहे. आज प्रथमच युट्युबवर सैराटची गाणी पाहतोय. ग्रामीण महाराष्ट्रातला उत्साह छान प्रतिबिंबित केला आहे. सादरीकरणावर जयम सारख्या तेलुगु चित्रपटाचा प्रभाव वाटतोय. वरच्या या प्रतिसादातला मजकूर चेपूवरही वाचला होता. यात केलेला दावा अन मिपावर पूर्वी केला गेलेला एक दावा आठवला - 'वाढत्या वयात शामची आई वाचून मुले साने गुरुजींसारखी बनण्याचा धोका असतो'. अशा भाबडेपणाची गंमत वाटते. सैराटला शुभेच्छा!! बादवे समाजमाध्यमांतून होणार्‍या प्रचारासाठीही भरपूर पैसे खर्च केले जातात जे प्रत्यक्षपणे दिसत नसतात.

In reply to by श्रीरंग_जोशी

वाढत्या वयात शामची आई वाचून मुले साने गुरुजींसारखी बनण्याचा धोका असतो'.
हे लै भारी आहे. हाहापुवा.

याड लागलं , सैराट झालं दोन्ही गाणी प्रचंड आवडली. गेले काही दिवस सतत ऐकतेय. ती सिंफनी खरंच कमाल आहे. या गाण्यांचं मेकींग पाहिल्यापासुन तर ती अजुन जास्त अपील होतायत. मलाही ती मुलगी खूप आवडली. या चित्रपटाच्या प्रोमो मधुन गाण्यांमधुन जो काही " स्टुपिडली इनोसन्स" दाखावण्यात येतोय तो खरा वाटतोय, छान वाटतोय.

पहिल्यांदाच कोणत्यातरी मराठी चित्रपटाची एवढ्या आतुरतेने वाट बघतोय ! खूप शुभेच्छा !!

झिंगाट हे गाणं ऐकून कुठंतरी चाल ऐकल्यासार्‍खी वाटली पण ते लक्षात येत नव्हतं. कोणाला जोगवामधील लल्लाटी भंडार हे अजय अतुलचच गाणं आठवतय का? त्याची आठवण येईल इतपत जवळ जाणारी चाल आहे का?

आपल्याला गाणी आवडली, भारी आवडली. झिंगाट मधला जो ठेका आहे तो जोगवा सारखा आहे. गाण वेगळे आहे पूर्णपणे वेगळ आहे. झिंगाट गाणे मला आवडल ते त्यातल्या शब्दांसाठी. ते तुजसाठी, मजसाठी असले फालतू प्रकार घरी ठेवून तुज्या नावाच इनिशल गोंदल, किंवा उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट, करून दाढी भारी perfume मारून. सर्वसाधारण भाषेतल्या शब्दात आणि तशाच भावनेत लिहलेय. याड लागल मधली सिंफोनी LA मधल्या स्टुडीयोत जाउन रेकॉर्ड करण्यात आली आहे. जगातल्या उत्तम वादकांनी त्यात वाद्ये वाजविली. यु ट्युब वर सुंदर विडोयो आहे. आताच बया का बावरल हे पण मस्त आहे. वर कुणी तरी किशोर अवस्थेतील प्रेमावर टिका केलीय. प्रेम तेंव्हा नाही करायचे तर काय अर्ध्या गवऱ्या मसनात गेल्यावर करायचे. आम्ही तर तेंव्हाच केल होत बा. आज त्या गोष्टी बायकोला सांगताना हसायला येत. नंतर सोडूनही दिल. आमच्यातल्या काहींचे प्रेम प्रकरण शेवटपर्यंत टिकले. लग्नेही झाली नंतर. आजच हिंदू मधे सैराटचा रिव्ह्यू वाचला. 'Sairat is not an easy watch especially for last one hour.But it’s a brilliantly crafted film that demonstrates not just the writer-director’s control over the medium but his acute awareness of and anger towards a system that strangles hope with ruthless cynicism.' ही नकारत्मकता मात्र आवडत नाही. समस्या आहेत कठीण आहेत पण सार संपलय असच नाही. कदाचित त्याचमुळे चित्रपट बघनार नाही.

In reply to by मित्रहो

बघून ठरवा ना! रिव्ह्यू वाचून कशाला मतं बनवता? किशोरवयात प्रेमही करून बघितल्यावरच कळतं... गोष्टी, कविता वाचून कुणी ठरवतं का, करावं की नाही. सहज म्हटलं हं मी हे. तुमचा प्रतिसाद सुरुवातीला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड वाटला आणि शेवटाला एकदम 'सगळ्यांसारखा विचार' वर आला.. म्हणून.

In reply to by वेल्लाभट

फक्त रिव्ह्यू वाचूनच नाही तर त्याचा ट्रेलर पण मला त्याच प्रकारचा वाटला. असो बघून ठरवायला हवे हे खरे. चित्रपट वाइट आहे वगेरे मी अजिबात म्हणत नाही. उलट गाणी आणि ट्रेलरमधली काही दृष्य भारी आवडली. तलावात उडी घेतली हे पडद्यावर कसे दाखवता येउ शकते याचे उत्तम उदाहरण आहे. रिव्ह्यूसुद्धा चित्रपटाची वाहवा करनाराच होता. रिलीजच्या दिवशी हैद्राबादला एका मराठी चित्रपटाचा रिव्हयू इंग्रजी वृत्तपत्रात येणे हीच मोठी गोष्ट आहे.

भारी आहेत गाणी! नागराजचा सिनेमा रिअॅलिस्टिक असतो,पण हिराॅईन मोठी वाटते म्हणजे दहावीला आहे असं वाटत नाही.असो ते महत्वाचं नाही. 2008 पासून नागराज या कथेवर काम करत होता,नाहीतर आजकाल एका महिन्यात मराठी चित्रपट बनवून प्रदर्शित करतात. संगीत अप्रतिम आहे,त्यामुळेच चित्रपट उठावदार दिसेल. नखरे करण्यार्या मोठ्या कलाकारांना असे सिनेमे म्हणजे जोरदार चपराक आहे. टीनेजरचं प्रेम हा प्रसिद्धीचा विषय असला तरी सादकरीण भन्नाट आहे. हॅट्स ऑफ नागराज आणि अजयला.

In reply to by क्रेझी

नकारात्मक पोस्ट टाकणारे सुसंस्कारी आहेत ओ,त्यांची पोरं सनी लिओनी बघत असतील त्याचा ठाव यांना लागणार नाही,पण नको त्या ठिकाणी पचकून सो काॅल्ड वृत्ती दाखवायची सवय असते त्यांना. बाकि, वरणभात सिनेमे पाहण्यापेक्षा हा सैराट तडका लय भारी!!!

In reply to by दिग्विजय भोसले

सैराटची नकारात्मक समीक्षा करणे म्हणजे ज्याला सातबारा काय असतो हे माहित नाही आणि चालला कृषीमंत्री व्हायला,अशातला प्रकार हाय सगळा;-)

In reply to by महासंग्राम

कशाला विचारत आहात? उत्तर तुम्हालाही माहिती आहे. :) एका साध्या चित्रपटावरील चर्चेच्या निमित्ताने आजही लोकांच्या मनात जात किती खोलवर रुतून बसली आहे हे स्पष्ट दिसत आहे. चर्चा उघड उघड दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. मेरा भारत महान !!

In reply to by सतिश गावडे

हो तुमच म्हणन बरोबर आहे गावडे सर पण कलाकृती मध्ये जात कशी येते तेच कळत नाही रच्याकाने काल सैराट पाहिला वरण भात, वरण भात करत फिरणार्यांची लैच ठासली आहे त्यात.

In reply to by महासंग्राम

मै क्या बोल रहा हूँ और तुम क्या बोल रहे हो | मी चित्रपटाची स्तुतीच केली आहे,सरंमजामशाही मलाही पटत नाही. वरणभात म्हणजे बुळबुळीत रोमँटिक सिनेमे असं म्हणायचयं मला, एक सांगू का आमच्या घरी रामदासनवमी साजरी होते,नऊ दिवस दासबोधाचं पारायण होतं तसेच घरातील बरेचजण वारकरी आहेत,मला शास्त्रीय संगीताची आवड आहे.मला वरणभातही खूप आवडतं. बाकि तुमने मेरा आडनाव देखके गलत मतलब निकाला, तसाच मी असतो तर चित्रपटाला विरोध केला असता ना!

In reply to by महासंग्राम

म्हणजे नेमक कायू म्हणायचं आहे तुम्हाला जर स्पष्ट कराल का ???>>>>>>>>>> " तु मला लै आवडतोस" असं स्पष्ट सांगण्याऐवजी " मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे" असे वाकड्यात सांगणारे चित्रपट.

In reply to by महासंग्राम

स्वप्निल जोशीवाले सिनेमे म्हणायचे असेल ... =)) रच्याकने, गेल्या वीस वर्षात सामाजिक आशय असलेले त्याचवेळी तुफान गाजलेले मराठी सिनेमे कोणते ह्याची लिस्ट काढीन म्हणतो यानिमित्ताने. कुणाकडं नाव असतील तर सुचवा.

In reply to by क्रेझी

त्सल्या फॉरवर्ड लिहिणारे स्वतःच्या लहानपणी शाळेत गांधारी बनून फिरत होते का डाउट येतो

सैराट पाहणार आहे. सैराट मध्ये एक गावाकडचा बाज आहे. (शहरात राहून गावठी असलेला) - साहेब..

एवढी काय चर्चा झाली बुवा म्हणुन पाहिलं तर इथेही नेहमीचे कलाकार नेहमीचेच मुद्दे आणताना पाहुन आनंद झाला. उद्या पिक्चर अगदी मनापासुन आवडला नाही तरी म्हणायची चोरी होणार असं दिसतंय एकंदरित!

In reply to by पिलीयन रायडर

अर्रे तुम घबराते कयकू, भारतात शेकड्याने पिच्चर रिलीज होतात, काही गाजतात, काही वाजतात, काही आवडतात काही नाही आवडत. सैराटची हाईप नै आवडत कोणाला तर नै आवडत. आता आवड आवड है, उसमें क्या शर्माना, छुपाना.

In reply to by तर्राट जोकर

नै हो.. इथेच "दुखणे वेगळेच आहे".."गुप्ते, कुलकर्णी नाइतर इनामदारांचेच संगीत आवडणार".."पुण्या मुंबईच्या लोकांना नाहीच आवडणार.." वगैरे वगैरे मतं ऐकुन बिचकायला झालं ना राव! एक साधा पिक्चर.. त्याची २ गाणी.. त्यावरुन मुददा पार जात आणि पुणे-मुंबई वर जाईल असं जन्मात वाटलं नव्हतं... असो.. जोगवाची गाणी आवडली होतीच.. तशीच ही दोन गाणी आहेत.. साधारण एकाच ठेक्याची.. इतकेच साधेसे म्हणणे होते. (तळटीपः- अजय- अतुल ह्यांचे आडनाव माहित नाही. गाव माहित नाही. संगीत फक्त माहिती आहे.)

In reply to by पिलीयन रायडर

काय झालंय ना तै, सोशलमिडियावर चित्रपटाच्या विरोधात दोन प्रवाह आहेत आणि ते ठळक आहेत. एक प्रवाह थेट जातियवादी आहे, त्यात स्पष्टपणे 'मंजुळेला नेहमी मराठ्यांच्याच पोरी दिस्तात का, आमच्या पोरीबाळी रस्त्यावर पडल्यात का' वाला अतिजहरी अपेक्षित थयथयाट आहे. दुसरा प्रवाह सोज्वळ, साजुकतेचा आव आणून 'माजघरी संस्कार हरवले तर' ची कुजबूज काळजी करणारा आहे. त्यात एक क्षीण असा तिसरा प्रवाहही आहे ज्यात 'ह्यॅ, एवढं काय डोक्यावर घेताय, काही क्रांतीकारी नैये त्या चित्रपटात, नेहमीचेच तर आहे सगळं, पोरंपोरी पळून जाण, प्रेमात पडणं, संघर्ष, काय तीर नाय मारलाय मंजुळेने'. असे तीन प्रकट प्रवाह ह्याच विवक्षित चित्रपटाबद्दल (तेही तो न बघताच) निर्माण होतात तेव्हा त्याच्या गंगोत्री कुठे आहेत हे कळणं अवघड नाही. केवळ 'चित्रपट आहे, चांगला आहे वाईट आहे, आवडला, नाही आवडला, झालं' असा अ‍ॅप्रोच नाही. दिग्दर्शक कुठेतरी त्रासदायक काम करत आहे, ते कुणाला त्रासदायक आहे हे कळलं तर दुखणं यागळं आहे हे लक्षात येते. बाकी अजय-अतुल ग्रामीण बाज ठेवतात, महाराष्ट्रीय लोकसंगित म्हणजे कोळीगीते, देवीचा गोंधळ इतकंच नाही हे त्यांच्या संगितातून कळते, ती त्यांची शैली आहे. प्रत्येक संगितकाराची एक शैली असतेच. ए आर रेहमान असो वा हिमेश रेशमिया, की शंकर जयकिशन वा खय्याम, पंचमदा वा इल्लयराजा, एम एम क्रीम. धाटणीबाज संगित असतं. कोणाची आवड कशात असते, नसते हे आपण कोण ठरवणारे? पण खोचक कमेंट्स कळतात. असो.

In reply to by तर्राट जोकर

असेल असेल.. मी सोशल मीडियावर म्हणाल एक ह्या लेखावरच्या प्रतिसादांव्यतिरिक्त काहीही वाचलेले नाही. म्हणुन मला जास्तच आश्चर्य वाटले असेल. अजय अतुल विषयी बोलायचं झालंच तर ते दोघे त्यांच्या कामात अव्वल आहेत ह्यात वादच नाही. त्यांचे "माऊली" गाणे माझे फार आवडते गाणे आहे. पण म्हणुन त्यांच्याविषयी चकार शब्द काढायचा नाही असं नसतं ना. "अप्रतिम" च्या खाली एकही मत आलं तर लोक अंगावर धावुन का येत आहेत ते कळत नाही. तुम्ही नक्की कोणत्या खोचक कमेंट बद्दल बोलताय माहित नाही. पण एकंदरित सगळेच तलवारी घेउन उभे आहेत. पिक्चर/गाणी आवडलेलेही आणि न आवडलेलेही.. असोच..

In reply to by पिलीयन रायडर

ती लोकं गाणी बनवतात, वाजवतात, लोकं ऐकतात, डोक्यावर घेतात, तेंचे पिच्चर हिट होउन तेंना चिक्कार पैसे मिळतात. तलवारबाज नपुंसक तलवारबाजी करतात. चालायचंच. =))

In reply to by तर्राट जोकर

+१ हो तजो.. सहसा तुमच्याशी सहमत व्हायला होत नाही पण इथे अगदी थोडक्यात व्यवस्थित मुद्दा मांडलाय तुम्ही.

In reply to by तर्राट जोकर

असे तीन प्रकट प्रवाह ह्याच विवक्षित चित्रपटाबद्दल (तेही तो न बघताच) निर्माण होतात तेव्हा त्याच्या गंगोत्री कुठे आहेत हे कळणं अवघड नाही.
नै कळ्ळं आमाला. जरा इस्कटून सांगा ना.
केवळ 'चित्रपट आहे, चांगला आहे वाईट आहे, आवडला, नाही आवडला, झालं' असा अ‍ॅप्रोच नाही.
अच्छा म्हणजे लोकांनी त्यांची वाईट्ट वाईट्ट मतं प्रकट करू नयेत अशी तुमची इच्छा आहे तर. फक्त चांगली मतंच प्रकट करूया तर मग. बाकी चित्रपट तर बघणारच. पण टीव्हीवर. कॅप्टन अमेरिका आणि द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी मधेच बजेट संपणार. तेव्हा आमची चित्रपट विषयक मतं तीन महिन्यांनी.

In reply to by पिलीयन रायडर

आईशपथ खरं. हगवणे बंधूंच्या ( हे आडनाव पण खरं आहे) वाड्यात राहायचे ते लहानपणी. कुटुंबाच्या मूळ गावाबद्दल कल्पना नाही.

In reply to by बोका-ए-आझम

पुण्या जवळच्या भूगाव/भूकुम चे असतील ते, आत्ता नाव सूर्यवंशी लावतात त्यांच्यातील बहुतेक लोक. लई मालदार पार्ट्या हायेत, जमिनिंला भाव किती आलाय बघितलं का ?

In reply to by पिलीयन रायडर

काहीही लिहिण्यात अर्थ नाही ती प्रतिक्रिया कुठल्या चष्म्यातून पहिली जाईल याचा नेम नाही बाकी प्रचेतस यांच्याप्रमाणेच मत आहे इंग्लिश चित्रपट पाहणे खूप बरे आणि त्या चित्रपटांवर टीका केली तरी कुणी काही म्हणत नाही