Skip to main content

ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र

लेखक विवेक ठाकूर यांनी रविवार, 24/04/2016 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ... ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्‍यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे. _________________________________ आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , ( कारण ) ..... ( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते | ................... (तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) , केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35967
प्रतिक्रिया 263

प्रतिक्रिया

सर्व धागे वादासठी उत्पन होतात .. वादातच्वाधतात व त्यात्च नष्ट होतात. वादातुन वाद काधला तर वादच उरतो. यात काय वाद ? .... वादमुनींचे वादवास्यौपनिषद

आपला देह ही विश्वाची रेप्लिका आहे, असे म्हणतात u can say a miniature. विश्वाला जाणणे सामान्य माणसाला कठीण आहे, पण तो स्वतःला ध्यानाने observe करु शकतो

In reply to by स्पा

आपला देह ही विश्वाची रेप्लिका आहे, असे म्हणतात
असं कोणं म्हणतं? जे असे म्हणतात ते तसंच आहे हे कशावरुन?

In reply to by स्पा

@स्पा - Mon, 25/04/2016 - 09:26 अनुभव करा ››› +१. मी पांडूशी सहमत आहे. प्रत्यक्षाहुनी कल्पना थोर मुखी रुद्राक्ष, मनी बोर!

In reply to by अत्रुप्त आत्मा

अनुभवाचं कसं आहे, एकदा एखादी गोष्ट मनावर बिंबवली की ती गोष्ट मन सत्य म्हणून स्विकारतं. मुळात सश्रद्ध माणसाचे मन अशा अधिभौतिक अनुभवांच्या बाबतीत सकारात्मक असते. त्यात ती गोष्ट एखाद्या "अधिकारी" व्यक्तीने (authoritative figure) मांडली असल्यास मन त्या गोष्टीचा सहजरीत्या स्विकार करते. आणि तसेच "अनुभव" त्या व्यक्तीलाही येऊ लागतात. याचं अगदी नेहमीचं उदाहरण म्हणजे "मंदिरात गेलं की प्रसन्न वाटतं". लहानपणापासून हेच मनावर बिंबवलं गेलं असल्याने सश्रद्ध माणसाला मंदिरात गेले की असा "अनुभव" येतोच. मलाही येत असे. पुढे निरिश्वरवादी झाल्यानंतर माझ्या मनाचं हे कंडीशनिंग पुसलं गेल्याने मला हल्ली असे अनुभव मुळीच येत नाहीत. उलट त्या मंदिरातील अस्वच्छता (असेल तर) प्रकर्षाने जाणवते. भारतीय अध्यात्म ज्याला "अनुभव" म्हणतं त्याचा मेंदूविज्ञानाच्या दृष्टीकोनातून म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की बेंगळुरूमधील National Institute of Mental Health and Neurosciences मध्ये योग, ध्यानधारणा आणि समाधी अवस्था यावर संशोधन चालू आहे.

In reply to by सतिश गावडे

तुमचा याबाबतचा काय अनुभव गावडे साहेब, पुस्तके तुम्ही बरीच वाचता हे आम्हास समजलेले आहे :)

In reply to by स्पा

तुमचा याबाबतचा काय अनुभव गावडे साहेब
मला हल्ली अनुभव येत नाहीत. :)
पुस्तके तुम्ही बरीच वाचता हे आम्हास समजलेले आहे :)
तुम्हाला योग्य तेच समजलं आहे. मात्र मी पुस्तक वाचून थांबत नाही. त्यावर चिंतनही करतो. :)

In reply to by सतिश गावडे

प्रतिसाद आवडला. पटला.. मलाही कधीच मंदिरात जाऊन शांत किंवा प्रसन्न वाटलं नाही. तुम्ही म्हणता तशी अस्वच्छता आणि इतरच गोष्टी जास्त जाणवतात. एकंदरित आपली मत जी आपण "अनुभवातुन" आली आहेत असं म्हणतो, तो अनुभवच मुळात अ‍ॅबसोल्युट असेलच असं नाही. ते मनाचं कंडिशनिंग असु शकतं.

सोप्पा श्लोक आहे त्याला उगाच गुढ.. गहन आणि इतकं क्लिष्ट का करायचं? मी अजिबात आध्यात्मिक व्यक्ति नाही. हे जे काही प्रश्न तुम्हा लोकांना पडतात आणि इथे त्यावर टेराबायटी चर्चा होतात, त्यात मला काडीचाही रस नाही. अर्धं निम्म तर मला कळतच नाही. साधारणतः जगात असेच लोक जास्त आहेत. आणि मुळ श्लोक त्यांनाही उमजेल असा आहे. जे आहे ते त्याच्या जागी पर्फेक्ट आहे. कमी नाही की जास्त नाही. कितीही स्थित्यंतर होत राहिली तरी हे सगळं पर्फेक्टच असणारे. कमी नाही की जास्त नाही. हा मला लागलेला अर्थ. आता तुम्हाला आकाश आणि आपण देह नसुन काहीतरी वेगळेच आहोत (म्हणजे मी वायला.. माझा देह वायला..) इ थिअरी बद्दल ममत्व आहे. म्हणुन तुम्हाला ह्या श्लोकात आकाश आणि जन्म-मृत्यु इ. दिसलं. पण तो काही सगळ्यांनाच पटेल असा अर्थ नाही. तस्मात..
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे.
असं "तुम्हाला" वाटतंय. तुमचा लेख वाचुन माझा असा समज झालाय की एक मंत्र - अर्थासहित स्मशानात लिहीला जावा अशी कल्पना आहे. आणि आपण तिथे नक्की काय अर्थ लिहीला जावा ह्यावर चर्चा करत आहोत. तो अर्थ सांगण्याची जवाबदारी तुम्हाला दिली आहे का? दिली असल्यास प्लिझ.. कळकळीने एक सांगते.. उगाच काहीतरी अवघड अर्थ सांगु नकात.. आधीच स्मशानात लोकांची मनस्थिती ठिक नसते. तिथे थोडक्यात लोकांचे दु:ख कमी होईल / दु:खाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल असे काहीतरी लिहीणे अपेक्षित आहे. आयुष्याचे तत्वज्ञान-००१ चा पाठ द्यायचा नाहीये. खरं तर ह्यासाठी मुळात हा श्लोक बरोबर आहे का असा मला प्रश्न पडलाय. मला स्वतःला अशा प्रसंगी "नैनं छिंदन्ति... " सारख्या आशयाचा श्लोक जास्त समर्पक वाटला असता. एकंदरीत माणसाच देहच फक्त संपलाय, आत्मा अमर आहे हा संदेश दु:खात असलेल्याला जास्त आधार देईल असे माझे मत. बाकी मलाही वैभव ह्यांचे मत पटते. तुम्हाला तुमच्या पर्सनल चिंतनासाठी अर्थ लावायचाच असेल तर "आकाश" शब्द चुकच आहे. तुम्ही जे घटाचे उदा दिले आहे त्यातही तुम्हाला "अवकाश"च म्हणायचे आहे. निळाईवाले आकाश नाही. आणि जनसामान्यांना तुम्ही ह्या भानगडीत ओढुच नकात. त्यातही वैकुंठ मध्ये गेलेल्यांना तर नकोच नको.. पुन्हा एकदा प्लिझ..

In reply to by पिलीयन रायडर

मी अजिबात आध्यात्मिक व्यक्ति नाही. हे जे काही प्रश्न तुम्हा लोकांना पडतात आणि इथे त्यावर टेराबायटी चर्चा होतात, त्यात मला काडीचाही रस नाही. अर्धं निम्म तर मला कळतच नाही. मग पुढचं कशाला लिहीलंय ? साधारणतः जगात असेच लोक जास्त आहेत. आणि मुळ श्लोक त्यांनाही उमजेल असा आहे. जे आहे ते त्याच्या जागी पर्फेक्ट आहे. कमी नाही की जास्त नाही. कितीही स्थित्यंतर होत राहिली तरी हे सगळं पर्फेक्टच असणारे. कमी नाही की जास्त नाही. हा मला लागलेला अर्थ. `ते' काय आहे याचा शोध म्हणजे आध्यात्म आहे. ते पूर्ण आहे असं श्लोकातच म्हटलंय. तस्मात, तुम्ही `पर्फेक्ट' असा इंग्रजी शब्द लिहून काही नवा प्रकाश पाडलाय असा गैरसमज असेल तर तो काढून टाका. आता तुम्हाला आकाश आणि आपण देह नसुन काहीतरी वेगळेच आहोत (म्हणजे मी वायला.. माझा देह वायला..) इ थिअरी बद्दल ममत्व आहे. म्हणुन तुम्हाला ह्या श्लोकात आकाश आणि जन्म-मृत्यु इ. दिसलं. पण तो काही सगळ्यांनाच पटेल असा अर्थ नाही. मला काय म्हणायचंय हे न कळल्यानं तुम्ही स्वतःचाच गैरसमज उधृत केला आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. असं "तुम्हाला" वाटतंय. मला ते `वाटत' नाही, तो समस्त ज्ञानीजनांचा `अनुभव' आहे. तुमचा लेख वाचुन माझा असा समज झालाय की एक मंत्र - अर्थासहित स्मशानात लिहीला जावा अशी कल्पना आहे. आणि आपण तिथे नक्की काय अर्थ लिहीला जावा ह्यावर चर्चा करत आहोत. तो अर्थ सांगण्याची जवाबदारी तुम्हाला दिली आहे का?...वगैरे म्हणजे तुम्ही लेखसुद्धा नीट वाचलेला नाही ! मला स्वतःला अशा प्रसंगी "नैनं छिंदन्ति... " सारख्या आशयाचा श्लोक जास्त समर्पक वाटला असता. एकंदरीत माणसाच देहच फक्त संपलाय, आत्मा अमर आहे हा संदेश दु:खात असलेल्याला जास्त आधार देईल असे माझे मत. नैनं च्छिंदंती शस्त्राणीपेक्षा हा शांतीमंत्र कमालीचा परिणाम साधतो. पण एकतर तुम्हाला आध्यात्मात `काडीचा रस नाही' असं तुम्ही म्हटलंय आणि जे काम करायचंच नाही त्याबद्दल निरर्थक अशी सविस्तर लांबण लावलीये. बाकी मलाही वैभव ह्यांचे मत पटते. तुम्हाला तुमच्या पर्सनल चिंतनासाठी अर्थ लावायचाच असेल तर "आकाश" शब्द चुकच आहे. तुम्ही जे घटाचे उदा दिले आहे त्यातही तुम्हाला "अवकाश"च म्हणायचे आहे. निळाईवाले आकाश नाही. आणि जनसामान्यांना तुम्ही ह्या भानगडीत ओढुच नकात. त्यातही वैकुंठ मध्ये गेलेल्यांना तर नकोच नको.. पुन्हा एकदा प्लिझ. वैभव यांच्याकडे कालपर्यंत शब्द नव्हता. आज त्यांनी दिलेल्या शब्दांचा विचार केला जाईल. अर्थात, चर्चा न वाचता काय वाट्टेल ते ठोकण्याची तुमची पूर्वापार शैली तुम्हाला लखलाभ. आणि जनहिताची इतकी कळकळ असेल तर वैकुंठात जाऊन, मृत्यूनं व्यथित झालेल्यांना दिलासा देणारं तुमचं ज्ञान तिथे प्लेक्स लावून प्रकाशित कराल तर ते जास्त विधायक होईल .

In reply to by विवेक ठाकूर

अपेक्षित प्रतिसाद! आता आलम दुनियेला अक्कल नाही हे ठरलेले असल्याने बोलायची सोयच नाहीये म्हणा. तुम्ही "ज्ञानीजन".. तुमचे अनुभव म्हणजे सार्वत्रिक.. वैश्विक सत्यच.. तुम्ही म्हणताय की हाच अर्थ आहे तर हाच अर्थ आहे.. तुम्ही म्हणताय हाच मंत्र सगळ्यात भारी तर हाच!! पण लेख न वाचल्याचा आरोप मात्र करु नका राव! वाचलाय मी लेख शिस्तीत.. नेहमीच वाचते.. तुम्ही सुद्धा एकदा वाचुन बघत जावा.. बर असतं ते! बाकी काही असो.. पण आपल्याला कशी आता एकमेकांच्या प्रतिसादाची सवयच झाली आहे नाही?!

In reply to by पिलीयन रायडर

बाय द वे तो 'शांतिमंत्र' आहे बरं का सज्जनहो (पिरा, विठा आणि आपण सगळेच) त्यातून 'शांती' मिळणं अपेक्षित आहे! अवांतर - डायनामाईट शांती नावाचं एक क दर्जाचं प्रकरण आहे. हलकं घ्या.

In reply to by पिलीयन रायडर

खरं तर ह्यासाठी मुळात हा श्लोक बरोबर आहे का असा मला प्रश्न पडलाय.
एवढ्याबद्दल काय वाटले ते लिहिते. अर्थात मी अभ्यासू वगैरे नाही. जे काही थोडंफार डॉक्यात एवढ्या वर्षात शिरलंय त्यावरून बोलते. आदिशंकराचार्यानी आणि अन्य आचार्यांनी यावर बरेच काही लिहून ठेवले आहे. ब्रह्म, माया वगैरे अभ्यास असणारे त्यावर भरपूर चर्चा करू शकतात. सामान्य माणसाच्या दृष्टीने आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे असा आपला समज. मेल्यावर तो देह पंचमहाभूतांच्या स्वाधीन होतो. त्याचे त्याला परत जाते. म्हणजे पूर्णातून आलेले त्याचे त्याला परत मिळते. समुद्रातून ओंजळभर पाणी घेतले तर समुद्र कमी होत नाही. मात्र ओंजळीत तेच समुद्राचे पाणी असते. ते ओंजळीतले पाणी अर्घ्य म्हणून समुद्राला परत दिले म्हणून समुद्रात भरही पडत नाही. तसाच पूर्ण ब्रह्मातून आलेला देह/जीव/आत्मा त्याच्याकडे परत गेला आहे. "ते ब्रह्म" आणि "हा जीवात्मा" इतका चिमुकला अर्थ कोणी घेतला तरी बहुधा पुरेसा व्हावा. बहुधा या थोड्या अर्थाने तो श्लोक तिथे लिहिला असावा. अर्थात आधीच शोकाकुल असलेल्या नातेवाईकांना दु:खावर फुंकर घालणारा "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि" हा श्लोक तिथे जास्त योग्य ठरला असता हे तुझे म्हणणे बरोबर. पण हा श्लोक तिथे असणेही चुकीचे नाही.

आता मज्जा येतेय , यशस्वी कलाकार धाग्यावर आलेले आहेत , आता धागा योग्य मार्गाला लागलेला आहे, निदान २५० होणारच

आता पुढे काहीही नाही . स्वस्थ झोपा. ( सिर्फ इंतजार ! कयामत का . ) इतकं सोपं लिवायचं सोडुन हे संस्कृतावरुन मराठी लोक का अशांत होताहेत?

पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ मला गमलेला अर्थ. "ते ( ईश्वरी तत्व ) एक पूर्णस्वरूप असून तेच माझ्यामध्ये वास करते. जसे पूर्णातून पूर्ण निर्माण होते तसे 'मी' त्या (तत्वा)तून निर्माण झालो अथवा त्यात विलय पावलो (तथापि ) पूर्णात पूर्ण मिळवले किंवा पूर्णातून पूर्ण जरी बाजूला काढले तरी पूर्णच शिल्लक राहते, तद्वत 'मी'ला त्या (तत्वा)तून बाजूला काढता येत नाही. तस्मात, 'मी' त्या ईश्वरी तत्वाचाच अंश असून, मी व ते आपल्यामध्ये पूर्ण आहोत."

शांतता पूर्ण आणि अविभाज्य आहे. पूर्णातून पूर्णच उदयाला येते. तस्मात, देह कालबाधित असला तरी, मी शांतीस्वरुप आणि पूर्ण आहे | देह कालवश आणि शांत झाला तरी केवळ पूर्णत्व शिल्लक राहाते. कारण विश्वव्यापी शांततेत, वृद्धी अथवा क्षय असंभव आहे || ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ ___________________ सर्वांचे आभार !

अजुन एक अप्रतिम लेख संक्षीसर ! ______________________________________________________ अवांतर १: हा श्लोक आठवला की एक जुनी आठवण जागी होते : साधारण दोन एक वर्षापुर्वीची गोष्ट. अमेरिकेत डेस्टिनच्या समुद्र किनार्‍यावर उभा होतो. पांढर्‍या शुभ्र रेतीचा समुद्र किनारा अन समोर पसरलेला अथांग निळाशार बे ऑफ मेहिको. साधारण सुर्यास्ताची वेळ होत आली तेव्हा कमरेइतक्या खोलभर पाण्यात जाऊन उभा राहिलो अन सुर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळभर पाणी हातात घेतले... तेव्हा आठवला हा श्लोक : ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ हे हातात घेतलेले ओंजळभर पाणी हा समुद्रच आहे , अन समोर जो क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग जलधी आहे तो ही समुद्रच आहे , त्या समुद्रातील केवळ ओंजळभर पाणी उचलुन आपण हा आपल्या हातातील समुद्र तयार केला आहे, आणि हे असे ओंजळभर पाणी हातात घेतल्याने समुद्राचे समुद्र असणे काही कमी जास्त होत नाही , समुद्र समुद्रच रहातो! आपले अस्तिव काही असेच आहे , त्या पूर्ण परम्यात्माचा एक छोटासा अंश आपण धारण करुन आहोत तोहि परमात्मा आणि हाही परमात्माच. असा अंश बाजुला केल्याने ना त्याचे असणे कमी जास्त होते ना ह्याचे ! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते !! शिवाय मला हा समुद्र केवळ क्षितिजापर्यंत दिसतोय , पण तो नक्कीच त्याच्याही पार आहे क्षितिजापर्यंत पहाता येणे ही माझ्या डोळ्यांची मर्यादा आहे , समुद्राची नाही तसेच परमात्म्याचे जेवढे 'स्व'रुप मला जाणता येते , तो त्याच्याही पार आहे , जेवढे मी जाणले ते माझ्या आकलन क्षमतेची मर्यादा आहे , परमात्म्याची नव्हे ! आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्र ही केवळ उपमा झाली , एक काळ असा होता जेव्हा समुद्र नव्हता , आज आहे , पुढे कादाचित नसेलही . आपले अस्तित्व तसे नाही आपण आहोतच आहोत ! आता उपमे द्यावे जळ । तरि ते काळांतरी आटेल सकळ । सद्गुरुरुप ते निश्चळ । जाणार नाही ॥ २३ ॥ जे मुळ स्वरुप आहे, त्याला काय उपमा देणार ? तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी । पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥ म्हणौनी सद्‌गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ विचारांची तंद्री भंगली तेव्हा सुर्य क्षितिजाच्या पार गेला होता अन हातातील समुद्र थेंब थेंब करुन त्याच्या मुळ स्वरुपात विलीन झाला होता. क्षणभर मनात विचार आला, 'अरेरे अर्घ्य द्यायचे राहुनच गेले की' अन झटकन विचार पालटला - 'झाले की मित्रा अर्घ्य देवुन ! आता कुठे काय राहिलंय !' आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां । तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥ ________________________________________ अवांतर २: वैकुंठाच्या इथेच अजुन कोठेतरी तुकोबांचा एक अभंग लिहिला आहे , त्याची प्रकर्षाने आठवण झाली !! 2658 जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥1॥ रात्रदिवस रडती कामक्रोधमाया । ह्मणती हायहाय यमधर्म ॥ध्रु.॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानािग्न भरभरां जीवित्वेसी ॥2॥ फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य ध्वनीं बोंब जाली ॥3॥ दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥4॥ तुका ह्मणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥5॥

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमची जी काही वैचारीक बैठक आहे ती पक्की आहे. :) तसेच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, भगवदगीता यातील अचुक संदर्भ देण्याचे कौशल्यही वाखाणण्याजोगे आहे.

In reply to by सतिश गावडे

हा आनिसचा शेर किती सुरेख आहे पाहा. मृत्यूसारख्या अप्रिय विषयावर सुद्धा त्याचा कलाम किती नजा़कतीनं दिलासा देण्याचं काम करतो. मौजो-हवादिसका थपेडा न रहा, हुई कश्ती गर्क के बेडा न रहा, सारे झगडे थे जिंदगानीके आनिस, एक हम न रहे, बखेडा़ न राहा | लाटा आणि वादळाची नांवेला बसणारी थप्पड संपली. नांवच बुडाली म्हटल्यावर सगळं ओझंच संपलं! (सांसारिक विवंचनांच्या रोजच्या आपाधापी आणि ओझ्यातून देहाची नौका मुक्त झाली). ती सगळी उस्तवार जगण्याचा परिणाम होती. आता मीच नाही म्हटल्यावर, सगळा बखेडाच संपला !

In reply to by सतिश गावडे

अप्रतिम प्रतिसाद प्रगो . काही प्रतिसादांनी धाग्याचे सोने झाले!

In reply to by प्रसाद गोडबोले

अमेरिकेचा किनारा, निळंशार पाणी सभोवताली असूनही इतर काहिहि न दिसता तुम्हाला हा श्लोक अठवतो म्हणजे तुम्ही तिसर्‍या पुरुषार्थाला टांग मारुन चौथ्यालाच जवळ करु पाहात आहात असं माझ्या भ्रमित मनाला प्रतित होते आहे.

In reply to by प्रचेतस

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आमचा पुरुषार्थांचा क्रम : धर्म मोक्ष अर्थ काम असा आहे ;) बीचनंतर आम्ही nightown, destin ह्या पब मध्ये गेलो होतो , त्यानंतर McGuires Irish Pub , त्यानंतर आणखी कोठे कोठे ;) पण तिथले 'अणुभव' लिहिले तर आमच्यावर डुख धरुन बसलेले आयडी लगेच आमचा आयडी पुनरेकवार डीलीट करावा असा धोशा लावतील =)))) अवांतर : बाकी मिपावर इतके टनाटनी लेखन होत असताना आपले पुरोगामी मित्र समाजसुधारणा करायला इकडे फिरकले कसे नाहीत ह्याचे आश्चर्य वाटते , कुठे आहेत ते ? आतल्या आत पीठ पाडत आहेत काय =))))

In reply to by सतिश गावडे

मोक्ष म्हणजे चारांतला शेवटचा. तो मिळाल्यानंतर अजून मिळवायचे काहीच शिल्लक राहात नाही म्हणूनच उरते ते शून्यच.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगोसाहेब प्रतिसाद अतिशय उत्तम! तुमच्यामुळे काही अपरिचित श्लोक, अभंग देखील वाचायला मिळतात त्याबद्दल देखील धन्यवाद!!!

श्लोकावरील चर्चा चांगली चाललीय पण हे वाचतो कोण ? आणि वाचल्यावर त्यानुसार बोध घेतो कोण ? आणि बोध घेऊन त्याप्रमाणे आचरण करतो कोण ? मला मागच्या जन्मात पडलेला प्रश्न आताही पडतोय. स्मशानात गेले तरी लोक आपल्यालाही एक दिवस इथे यायचे आहे हे समजून घेत नाहीत. निदान त्यांच्या वर्तणुकीवरुन तरी तसे दिसत नाही. मोबाईलवर बोलणे, चॅटींग सगळे चालूच, अंत्यविधी झाला की लगेच बाजूच्या हॉटेलात जाऊन खाणेपिणे सुरु. हे सगळे नसले तरी अमका कसा गेला, तमक्याचा विधी कसा झाला, शेअरमार्केटच काय झालं ? मोदी आज काय बोलले ? हे सर्व विषय चालूच. त्यामुळे काहीही श्लोक लिहा, लोकांना काही शष्प फरक पडत नाही. खर्‍या अर्थाने या अर्थाने मुढ लोकांनीच मृत्युच्या भयावर विजय मिळवलाय हेच खरे ! विचारवंत विचार करुन करुनच मरतोय रोज !

In reply to by धर्मराजमुटके

तसं भासलं आणि व्यावहारात असंच चालू असलं तरी, लोक मृत्यूच्या नकोश्या विचारापासून चटकन मोकळं व्ह्यायचा मार्ग शोधतात.

In reply to by विवेक ठाकूर

अज्ञानात सुख असते. दुसरं काय. अकाली मृत्यूचे भय सार्‍यांनाच असते. सरासरी आयुर्मानापेक्षा थोडी कमी अधिक वर्ष जगल्यानंतर मृत्यूचे भय नसावे.

In reply to by सतिश गावडे

अज्ञानात शांतीसुद्धा असते. एखाद्या शहाण्या माणसाला कॅन्सरसारखा रोग झाला तर तो दोनदा मरेल. एकदा रोगाचे स्वरूप जाणून विचाराने आणि एकदा शरीराने. तेच अडाण्याला झाले तर तो त्याचा विचार करणार नाही. एकदाच शांतपणे मरेल.

मला संस्कृत येत नाही, आणि अध्यात्म कळत नाही.. पण इथल्या चर्चेवरून कळल्याप्रमाणे
जो है, सो है.. तेरे होने ना होने से घंटा फरक नही पडता..
हा त्या श्लोकाचा अर्थ असावा..

साला, आधीच माणूस स्मशानात गेल्यावर डीप्रेस्ड असतो. त्यात त्याला श्लोकाचा अर्थ सोपा (?) करुन 'ऐ, तू फालतू आहेस. घंटा काही फरक नाही पडत' सांगून कशाला आणखी पिडावा? त्यापेक्षा, श्लोक तसाच विना-सुलभीकरणाचा राहू द्या.. त्याचा अर्थ लावण्यात तेवढाच टाईमपास होईल लोकांचा..

In reply to by चिगो

त्या पेक्षा तू त्याच पूर्णत्वाचा अंश आहेस जे पूर्वीपासून आहे, आज देखील आहे आणि शरीर नसताना देखील असणार आहे म्हणून शरीराबाबत शोक करु नकोस असा सकारात्मक विचार घ्यावा! नको म्हटलं तरी जाणार, जाऊ दे म्हटलं तरी जाणार असं असताना वास्तव वादी विचार व्हावा.

In reply to by वैभव जाधव

दु:ख करणार्‍या माणसाला दु:ख करु द्यावं, रडू द्यावं. उगाच पुर्ण-अपुर्णाचं लफडं मागे लावावंच कशाला त्याच्या?

In reply to by वैभव जाधव

माणूस जवळचं कुणी गेलं की सर्वसाधारणपणे विरहव्यथेच्या (Grief) च्या denial, anger, bargaining, depression and acceptance या पाच अवस्थांमधून जातो. त्याच्याही नकळत. सुरुवातीला आपला माणूस गेला आहे या वस्तूस्थितीचा स्विकार होत नाही. स्विकाराची अवस्था आली की आपण काही करू शकत नाही यामुळे माणूस हताश होऊन प्रचंड चिडचिड होते. पुढे माणूस "जर असं झालं असतं..." या जर तर च्या प्रवाहात गटांगळ्या खातो. त्यातूनही वेळ निघून गेलेली असल्यामुळे आता या जर तर चा काही उपयोग नाही हे लक्षात येऊन माणूस निराश होतो. आणि शेवटी वास्तवाचा स्विकार करून हळूहळू पूर्वपदावर येतो. प्रत्येकाचा या अवस्थांमधून बाहेर पडण्याचा कालावधी वेगळा असतो. अवस्थांचा क्रमही वेगळा असतो. काही वेळा एखादी अवस्था वगळलीही जाते. मात्र हे सारं माणूस दु:ख पचवत असताना होत असताना होत असते हे मात्र खरे.

In reply to by चिगो

=))
ऐ, तू फालतू आहेस. घंटा काही फरक नाही पडत...
सगळ्या चर्चांच सार आहे हे वाक्य!!! म्हणजे कसं एकदम सगळं जमिनीवरच आल्यासारखं वाटतंय! मला फारच आवडला हा प्रतिसाद! अर्थ लावण्यात स्माशानात आलेल्या लोकांचा टाईमपास म्हणे.. अरे काय =))

व्वा क्या बात!! ही चर्चा वाचून मी समाधी घ्यायला मोकळा आता!!

OK

घंटा पूर्ण आहे, त्यामुळे घंट्यातून काय घंटा उत्पन्न होणार? काहीही घंटा केलं तरी, घंटा काही फरक पडत नाही . ॐ घंटा, घंटा, घंटा:

खरं तर प्रतिसाद देणार नव्हतो पण तुमचे भलतेच गैरसमज झालेत, म्हणून लिहीतो. मग हा विचार का येत नाही की त्यांनी अदं आणि इदं च्या ठिकाणी थेट काय आहे तेच नसते का लिहिले? त्यांनी तसे लिहिलेले नाही ह्यातच त्या श्लोकाचा अर्थ स्पष्ट होत आहे. त्या श्लोकाचा शब्दानुवाद आणि त्यावर ओशोंचं भाष्य असं आहे : _______________ ॐ वह पूर्ण है और यह भी पूर्ण है; क्योंकि पूर्ण से पूर्ण की ही उत्पत्ति होती है। तथा पूर्ण का पूर्णत्व लेकर पूर्ण ही बच रहता है। ॐ शांति, शांति, शांति। यह महावाक्य कई अर्थों में अनूठा है। एक तो इस अर्थ में कि ईशावास्य उपनिषद इस महावाक्य पर शुरू भी होता है और पूरा भी। जो भी कहा जाने वाला है, जो भी कहा जा सकता है, वह इस सूत्र में पूरा आ गया है। जो समझ सकते हैं, उनके लिए ईशावास्य आगे पढ़ने की कोई भी जरूरत नहीं है। जो नहीं समझ सकते हैं, शेष पुस्तक उनके लिए ही कही गई है। इसीलिए साधारणतः ॐ शांतिः शांतिः शांतिः का पाठ, जो कि पुस्तक के अंत में होता है, इस पहले वचन के ही अंत में है। जो जानते हैं, उनके हिसाब से बात पूरी हो गई है। जो नहीं जानते हैं, उनके लिए सिर्फ शुरू होती है। _______________ तस्मात, ज्यांना समजलं ते सिद्ध झाले. आणि असे सिद्ध हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही नाहीत. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी विस्तार केला जातो. थोडक्यात, नुसतं वाचून लोकांना सत्य समजलं असतं तर सर्वत्र शांतता आणि सौहार्द दिसला असता, पण वास्तविकता नेमकी विपरित आहे. आता मी म्हणतो की हा जो साधा अर्थ तुम्ही म्हणताय तो सपशेल चुकलेला आहे. जन्म आणि मृत्यू देहाला आहे असे तर त्या श्लोकात कुठेच नाही. मुळात तो श्लोक जन्ममृत्यूबद्दल नाहीच. किंवा तुम्ही म्हणताय त्या आकाशाबद्दलही नाही. तुम्हाला अध्यात्माची शून्य माहिती आहे ते एकवेळ ठीक, पण काँटेक्स्ट न कळवा हे दुर्दैव. सारं अध्यात्म हा अमृताचा शोध आहे. आणि शांतीमंत्र वैकुंठात ज्यानं डिस्प्ले केलायं त्याचं खरं कौतुक आहे. त्या मंत्राचा अर्थ उलगडला तर मृत्यू देहाला आहे याची जाणीव जनसामान्यांना होईल आणि राहत मिळेल असा उद्देश आहे. तस्मात, प्रतिसादातला उर्वरित सर्व भाग केवळ अज्ञानविस्तार आहे हे लक्षात येईल. उदाहरणार्थ : ..... वैभव यांनी म्हटल्याप्रमाणे 'अल्फाजो के परे'. मानवाच्या क्षुद्र आयुष्याचा, त्याच्या रोजच्या कटकटीचा, जगण्यामरण्यासारख्या फालतू गोष्टींचा ह्या महान श्लोकाशी संबंध लावणे हेच मुळातून चुकल्याचे लक्षण आहे. मी तुमच्या ठिकाणी असतो तर हा श्लोक इथे लिहूच नये असे विचारणार्‍याला सांगितले असते. स्मशानासारख्या टेन्स प्रसंगी तर इतका खोल अर्थ कुणी समजून घेणे शक्य वाटत नाही. हा श्लोक अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करणार्‍यांसाठी आहे. जे लोक 'सुख दुखे समे कृत्वा' च्या लेवलला पोचलेत तिथून पुढे ह्या श्लोकाचा अर्थ समजणे सुरु होते. ....वगैरे तरीही प्रतिसाद तुम्ही पुढे म्हटलंय : ....तो म्हणतो हेही पुर्ण आहे तेही पुर्ण आहे, पुर्णातून पुर्ण जन्म घेतं, पुर्णातून पुर्ण घेऊन ही पुर्ण शेष राहतं. आता 'हे' आणि 'ते' ह्याचा अर्थ अनूभूतीशिवाय समजत नाही. ज्याला अनूभुती नाही तो ह्याचा अर्थ कितीही समजून घेण्याचा प्रयत्न करुदेत्, उपयोग नाही. इथे पुन्हा अध्यात्मिक अनाकलानाची किमयागिरीच आहे. `हे' आणि `ते' म्हणजे ज्याला पूर्णत्व म्हणतात ते तत्त्व (अणू रेणू वगैरे नाही) आणि आपण एकच आहोत. तस्मात, पूर्णत्वात उप्तत्ती, स्थिती आणि लय या घटना उघड दिसल्या तरी पूर्णत्वाला त्यानं बाधा येत नाही. हे `पूर्ण तत्त्व' काय आहे याचा शोध म्हणजे अध्यात्म आहे. शब्दांचे अचूक अर्थ लावायची भारीच जबाबदारी घेतली आहे ठाकूरसाहेब तुम्ही अंगावर. गरज नाही हो. बुद्धापासून ओशोपर्यंत अनेक लोक होऊन गेलेत साध्यासोप्या शब्दात आध्यात्मिक वक्तव्याचं प्रकटीकरण करणारे. तुम्ही त्यांच्या पातळीवर स्वतःला समजत असाल तर गोष्ट वेगळी. येस, मला पूर्णत्वाचा उलगडा झालेला आहे. पण तुमच्या अनाकलानाला सीमा नाही हे प्रतिसादातला पुढचा भाग दर्शवतो. अध्यात्म अनुभवावर टिकुन आहे. शब्दांवर, चर्चेवर नाही. अनुभव सर्वोच्च आहे, सर्वोत्तम आहे, अ‍ॅब्सोलुट आहे. त्याला शब्दांच्या कुबड्यांची गरज नाही. उदा. पुन्हा सत्यमेव जयते. ह्याच्याइतकं खोटं वाक्य जगात नसेल. ह्याचा अर्थ मी "सत्य नेहमी जळते" असा सांगितला तर लोक जास्त विश्वास ठेवतील. शेवटी अनुभव प्रमाण सत्यमेव जयते म्हणजे ते `पूर्णतत्व' सदाविजयी आहे. अर्थात, तुम्हाला सत्य म्हणजे काय याचा अनुभवच नाही. आणि त्यामुळे सत्य म्हणजे जनसामान्य समजतात ते `खरं' इतका फक्त `शब्दार्थ' माहिती आहे. "सत्य नेहमी जळते" इतकं भंपक विधान करुन तुम्ही स्वतःचंच हसं करुन घेतलं आहे. आता तुम्हाला कल्पना येईल की ते पूर्णतत्त्व सदाविजयी आहे कारण ते एकच आहे. तिथे हारजित हा प्रश्नच नाही. तरीही अज्ञानाला पारावार नाही म्हणतात ते खरं आहे : 'शब्दांनी अनुभव शेअर केला जातो' हे एक. शब्दांनी अनुभव व्यक्त केला जातो, शेअर करणे अशक्य गोष्ट आहे. व्यक्त झालेला अनुभव ऐकणार्‍याला समजेल, अनुभूत होईलच असे नसते. आधीच माहित असलेली, जाणवलेली, स्मृतीत असलेली, अनुभव घेतलेली गोष्ट शब्दांनी लक्षात येईल. अगदी कधीच माहित नसलेली गोष्ट कशी शेअर केल्या जाईल? एक डॉक्टर दुसर्‍या डॉक्टरला मेडिसीनमधली एखादी किचकट व्याख्या सांगत असेल त्याचा अर्थ एखाद्या सीएला कसा कळेल किंवा वाइअसवर्सा? आपण ते पूर्णत्व आहोत कारण ते पूर्णत्व एकच आहे. त्या पूर्णत्वाशिवाय इतर काहीही नाही, त्यामुळे तो अनुभव साधना आणि आकलनाची कुशाग्रता यांनी येतो. अर्थात, तुम्हाला त्याची सुतराम कल्पना नाही त्यामुळे मेडिसिन आणि फायनान्सची टर्मिनॉलॉजी वगैरे घोळ केला आहे आणि ज्या प्रतिसादकांची आकलनक्षमता तितपतच आहे त्यांना प्रतिसाद भावला आहे. एकदा अज्ञान म्हटल्यावर सगळीकडे तेच दिसणार. पाहा : आकाश पुर्ण कसे? आकाश म्हणजे काय तर अथांग निळाई असे तुम्हाला अपेक्षित आहे असे दिसते. मग पृथ्वीही अथांग आहेच. जिथे मी उभा राहतो तिथे माझ्या खाली पृथ्वी आणि वर आकाश अथांगच आहे. आकाश पृथ्वीला टेकलं की संपतं. (सामान्य जनकल्पना). 'सार्वभौम' ह्य शब्दाचा अर्थ भूमीशी संबंधित आहे. तुम्हाला 'सर्वव्यापक' म्हणायचा असेल तर 'सर्वव्यापक' म्हणा सरळ. पण तेही खरे नाही. घड्यात पाणी भरले तर आकाश कुठे जाते? पाण्याचा अणुरेणुंच्या मधल्या पोकळीत आकाश आहे का? मग अणुरेणुंमधे काय आहे? पाणी? म्हणजे पाणी आणि आकाश असे दोन तत्त्व वेगळी झाली. देह हा काही रिकामा घडा नाही. देह हाच पुर्ण आहे तो पुर्णातच आहे, तो निर्माण झाला, विलिन झाला असे समजणे भ्रम आहे आकाशाचा अध्यात्मिक अर्थ शून्य असा आहे. अमर्याद आणि व्यापक स्पेस ज्यात सर्व निर्मिती स्थिती आणि लय आहे. त्यालाच उपनिषदाचा ऋषी पूर्ण म्हणतोय. तुमच्या अज्ञानाचा कळस इतका आहे की `आकाश पृथ्वीला टेकलं की संपतं. (सामान्य जनकल्पना).' असं तुम्ही म्हटलंय. म्हणजे `सामान्य कल्पना हे फक्त बचावात्मक आहे. आकाश पृथ्वीच्या खाली, वर, अणू रेणूमधे, यत्र-तत्र आणि सर्वत्र आहे. आकाश आणि अवकाश एकच आहेत कारण तो फक्त निर्देश आहे. ते 'सार्वभौम' म्हणजे चराचर व्यापून आहे. अर्थात याचा तुम्हाला ना अनुभव ना चिंतन त्यामुळे आकाशाशिवाय सूर्य देखिल निर्माण होऊ शकणार नाही आणि या लाखो-अरबो ग्रहमालिका फिरुच शकणार नाहीत याची कल्पना देखिल करता आली नाही. मग ते आकाशच पूर्णत्व आहे इतका गहन उलगडा न झाला तर नवल काय? तरीही फेकाफेकीला अंत नाही, कारण पुढे लिहीलंय अहं ब्रह्मास्मी व तत्त्वमसि ह्या दोन संकल्पना अनुभवल्याशिवाय ह्या श्लोकाचा अर्थ कसा कळणार? हा तुमचा अनुभव नाही ! तुम्हाला केवळ शब्द माहिती आहेत. `अहं ब्रह्मास्मी' ही संकल्पना नाही, वस्तुस्थिती आहे आणि `पूर्णमदः पूर्णमिदं' याचा नेमका तोच अर्थ आहे ! `तत्त्वमसि' ही दुसरी संकल्पना नाही. आपणच ते पूर्णत्व आहोत हे सांगायचा फक्त वेगळा बाज आहे. संपुर्णाचा प्रत्यय येत नाही म्हणून उपनिषद लिहलंय? ऐकावे ते नवलच! अहो प्रत्यय आल्याशिवाय का लिहिता येतं? उपनिषद हे शिष्यांचे गुरुंशी झालेले वार्तालाप आहेत ना? की गुरुंनी शिष्यांशी डिस्कस करुन ठरवले की असे असे लिहिले की प्रत्यय येतो ब्वॉ?.....वगैरे अध्यात्मिक ग्रंथांच शून्य वाचन किंवा केवळ शब्दापलिकडे शून्य आकलन इतकंच म्हणता येईल! सर्व धर्मग्रंथ किंवा गुरु-शिष्य संवाद (उदा. भगवद्गीता) सत्याकडेच निर्देश करतात. आणि सिद्ध पुरुषांची वक्तव्य साधकांना युगानुयुगे मार्गदर्शक ठरतात. या वेगळं त्यांचं काही प्रयोजन नाही. ..... श्रीमंतांनी वेळ घालवण्याचं साधन म्हणुन अध्यात्म बघत असाल तर आपण आध्यात्माच्या प्लेगृपमधेही प्रवेश घेतला नाही असे दिसते....माझी भूमिका: .... अध्यात्म कुणाला समजवयाला जाणे पोरकटपणा आहे. त्यामुळे एखाद्याला अध्यात्मातले कळले ते इथे इतरांना 'पटवत' बसणे व इतरांचे विचार मान्य न करणे हा आपणच कसे हुशार आहोत ह्याचा ढिंडोरा पिटण्याचा उद्योग आहे असे माझे मत आहे.... रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍याला पकडून 'घे दिक्षा' असे गळेपडूपणा करणे इज नॉट अध्यात्म अ‍ॅट ऑल. न तुम्हाला अध्यात्माची काही समज ना आकलन, तस्मात संपूर्ण प्रतिसाद बोगस झाला आहे. दिक्षा आणि अनुग्रह हे प्रकार फार जुने झाले याची तर तुम्हाला सुतराम कल्पना नाही. इंटरनेट हे संवादचं माध्यम आहे आणि यावरनं अध्यात्मिक संवाद सुद्धा होऊ शकतो पण ते तुम्हाला समजेल अशी शक्यता नाही. या संकेतस्थळा बाहेरचे माझे असंख्य चाहते माझ्याशी सतत संपर्कात असतात आणि माझं लेखन त्यांना उपयोगी होतं. अर्थात, त्याबद्दल कोणतीही जळजळ न होऊ देता, संपूर्ण प्रतिसाद तुम्ही शांतपणे वाचला असेल तर थोडा फार प्रकाश तुम्हाला आणि इथल्या विरोधकांनाही पडेल हे नक्की.

In reply to by तर्राट जोकर

न प्रतिवादाची क्षमता. अर्थात, ते मान्य करण्याचा सूज्ञपणा नसल्यानं काही तरी वेळ मारून नेतायं इतकंच. चालू द्या.

In reply to by विवेक ठाकूर

तुमच्यासारखे ज्ञानी असतांना आम्ही काय उजेड पाडणार? तेवढा चिडखोरपणा आवरता आला तर बघा. तुमचं बळंच नेसलेलं आध्यात्मिक पितांबर घसरतं त्याने. शुभेच्छा. =))

In reply to by तर्राट जोकर

त्यानं त्या लेवलच्या सदस्यांची करमणूक होत असेल पण तुम्ही निरुत्तर झालात हे सूज्ञांना लक्षात आलंय.

In reply to by तर्राट जोकर

मी कमॉन.. मी सुज्ञ आहे इतकं तरी मला डिक्लेअर करु द्या!

In reply to by पिलीयन रायडर

काय 'मी मी' लावलं आहेस ? चल, तिकडे 'सूज्ञ' वाल्या खिडकीसमोर लायनीत उभी रहा सरांकडून सुद्न्यपणाचा शिक्का मारून घ्यायला ! बव्लत कुठली !

हेही 'मी' आहे, तेही 'मी' आहे माझ्यातून 'मी'पण निर्माण होते, माझ्यातून 'मी' जरी काढिला अंती 'मी' निरंतर उरतो...... ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

In reply to by विवेक ठाकूर

मला काहीच जमत नाही हो, मी इतरांना काय म्हणणार.. पण तुम्ही का मनाला लावून घेताय, हे तुमच्यासाठी नाही, इन जनरल आहे, तसंही हे आजचं सत्य नाहीय का, जो तो माझेच खरे म्हणत नाही का ?

In reply to by नीलमोहर

अर्थात अज्ञानाला सगळीकडे अहंकारच दिसतो. त्यामुळे सत्याचा उलगडा असंभव होतो . तस्मात, जशी मती तशी गती या न्यायनं अशा प्रतिसादांची रीघ लागणं काही नवं नाही . चालू द्या.