मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र

विवेक ठाकूर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ... ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्‍यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे. _________________________________ आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , ( कारण ) ..... ( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते | ................... (तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) , केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||

वाचने 35889 वाचनखूण प्रतिक्रिया 263

In reply to by अर्धवटराव

वैभव जाधव Wed, 04/27/2016 - 02:05
अब ये कौन है भिया? सिद्धा बताओ, डबल सेंच्युरी होना बोलके. वो अम्मी उधर कुछ बक री, इधर कु आप कुछ बोल रे???? पुरावा द्या रे .... नो!

In reply to by वैभव जाधव

अर्धवटराव Wed, 04/27/2016 - 02:36
तो काय आहे हे तुम्हाला माहित नसेल तर सांग्ण्यात काहि अर्थ नाहि, आणि माहित असेल तर सांगण्यात काहि पॉइण्ट नाहि :ड

In reply to by वैभव जाधव

पिलीयन रायडर Tue, 04/26/2016 - 17:58
नाही नाही... हे एकदम ओरिगिनल असावेत! संक्षी / विठा डुआयडी नसावेत.. त्ते जे जे लिहीत आहेत ते त्यांना खरंच मनापासुन वाटतं. ते फारसं लोकांना पटत नाही ही गोष्ट वेगळी. पण हे बेअरिंग असु शकत नाही.

सुबोध खरे Tue, 04/26/2016 - 19:09
बरंच काही वाचलं काहीच समजलं नाही याला पूर्ण म्हणावं कि अपूर्ण? कि व्यवहारी अपूर्णांक? आपली पट्टी काळी दोन पांढरी पाच झेपत नाही सोडून द्यावं. चालु द्या

विवेक ठाकूर Tue, 04/26/2016 - 19:49
अज्ञानाचा अर्थ सत्य न उलगडलेला इतकाच आहे, मंदमती नाही. तस्मात, कुणाचा उपमर्द करण्याचा कदापी हेतू नाही. प्रतिसाद अज्ञानमूलक आहे म्हणजे त्यातून सत्याचे आकलन दिसत नाही. तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे. इतुप्पर कुणाला काय प्रतिसाद द्यायचे ते द्या .

विवेक ठाकूर Tue, 04/26/2016 - 19:49
अज्ञानाचा अर्थ सत्य न उलगडलेला इतकाच आहे, मंदमती नाही. तस्मात, कुणाचा उपमर्द करण्याचा कदापी हेतू नाही. प्रतिसाद अज्ञानमूलक आहे म्हणजे त्यातून सत्याचे आकलन दिसत नाही. तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे. इतुप्पर कुणाला काय प्रतिसाद द्यायचे ते द्या .

In reply to by विवेक ठाकूर

नीलमोहर Tue, 04/26/2016 - 20:34
'तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे.' 'खिदळवायला ' तू अहंकारी ' म्हणायची स्टाईल फार जुनाट झालीये.' - दोन्ही तुमचेच प्रतिसाद, तर मग वर जो 'मी' वाला अर्थ लिहिला होता, जो मुळात तुमच्यासाठी नव्हताच, तो वाचून तुम्हाला राग का आला..

In reply to by नीलमोहर

विवेक ठाकूर Tue, 04/26/2016 - 20:46
लोकांना 'खिदळवायला ' तू अहंकारी ' म्हणायची स्टाईल फार जुनाट झालीये.' ही वस्तुस्थिती आहे. इथली विडंबनं आणि प्रतिसाद त्याचे साक्षी आहेत. अशा प्रकारामुळे चांगल्या चर्चेची वाट लावण्याचा प्रकार इथे कायम चालू असतो. आणि तुम्हाला याची कल्पना नसेल असं वाटत नाही. आणि हे अहंकार म्हणजे नक्की काय याचं स्पष्टीकरण आहे : 'तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे.'

गॅरी ट्रुमन Tue, 04/26/2016 - 21:40
येस, मला पूर्णत्वाचा उलगडा झालेला आहे.
मलापण पूर्णत्वाचा उलगडा झाला आहे :) आणखी कोणकोण आहेत पूर्णत्वाचा उलगडा झालेले?

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Tue, 04/26/2016 - 22:46
तो अस्तित्वाचा स्वभाव आहे. म्हणजे कुणाला कळो न कळो तो पूर्णत्वाशी एकरूपच आहे. प्रतिसाद सरकॅस्टिक असला तरी वस्तुस्थितीशी विसंगत आहे .

बाळ सप्रे Wed, 04/27/2016 - 12:59
संक्षी/ विठा अजून 'तू अहंकारी' या उसळत्या चेंडूला बाजूला सरून वाट द्यायला शिकले नाहीत. सार्‍या मिपाकर गोलंदाजांना या कमजोरीची पूर्ण माहिती आहे... रैना झालाय.. प्रत्येक उसळत्या चेंडूला झेल उडतायत.. (विथ ड्यु रीस्पेक्ट टू रैना)

In reply to by बाळ सप्रे

तर्राट जोकर Wed, 04/27/2016 - 14:00
कसं बोललात. हॅट्स ऑफ टू यु. संक्षी, माझे काही तुमच्याशी वैर नाही, मी तुमचा द्वेष करत नाही किंवा तुम्ही अज्ञानी आहात असा काही दावा करत नाही. इतका काळ जालावर वावरुन तुम्हाला घेरणे, रेवडी उडवणे कोणालाही किती सोपे आहे हे तुमच्या लक्षात येत नाही ह्याचे आश्चर्य वाटते. माझ्या आधी कित्येकांनी सांगून झाले असेल पण तुमच्यात सुधार दिसला नाही. आपमें कुच्छ भी बदला नही है. इतर विषयांवर गप्प राहणारे संक्षी अध्यात्म व ब्रेस्ट कॅन्सरवर पिसाळल्यागत (माफ करा माझ्याकडे अजुन वेगळा शब्द नाही) वाद करत सुटतात हे काही गुपित नाही. मी काही तुम्हाला सल्ला देत नाही फक्त निरिक्षण आहे. इथे अनेक विषयातले इतके ज्ञानी लोक आहेत पण कुणीही आपल्या ज्ञानाचे अवडंबर माजवतांना दिसत नाही, जरी त्यांनी तसे केले तरी ते स्विकारार्ह आहे. पण अध्यात्म विषयात कुणी असे करायला लागला तर तो हास्यास्पद ठरण्याशिवाय काही वेगळे होत नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. अध्यात्मात लोक जेवढे पुढे जातात तेवढे ते अहंकारमुक्त, सहज होत जातात असे ऐकुन बघुन आहे. साधना करणारे शांत होत जातात. ते तर प्रत्यक्ष आयुश्यातले भयंकर अपमानही लावून घेत नाहीत, तुम्ही इथले दोन प्रतिसादाने कळवळून जाता. स्ट्रेन्ज. सतत दुसर्याचे आकलन (सभ्य भाषेत अक्कल) काढणे, ज्ञान काढणे हे डोक्यात जाते. बहोत बार हुवा होगा ये. मैंने बी अपनी बात कह दी. बुरा ना मानो अध्यात्म है.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Wed, 04/27/2016 - 17:08
अहंकार हा फक्त हतबल आणि निरुत्तर झालेल्या पब्लिकनं, आता तोंड लपवायला जागा उरली नाही म्हणून घेतलेला शेवटचा स्टँड आहे. अज्ञानी व्यक्तींनी अहंकारी ठरवल्यानं मला काहीएक फरक पडत नाही. तद्वत, प्रतिसादाला उपप्रतिसाद जोडून तीर मारणं हा केवळ हेल्पलेसनेस आहे. इथे कोण कुठल्या विषयात किती ज्ञानी आहे याचा संबंधच नाही. सत्याचा उलगडा संगणक प्रणालीतल्या झीरो आणि वन सारखा क्लिअरकट आहे. आयदर वन नोज, ऑर डजंट नो. स्वतःची मत ठामपणे मांडणं किंवा दुसर्‍याची मतं समर्पकपणे खोडण्याची क्षमता असणं याला अहंकार म्हणणं हा बालीश प्रतिवाद आहे. इथे प्रत्येकाला अभिव्यक्तीचा समान अधिकार आहे. त्यामुळे वादात कुणी मुद्दाअसून निरुत्तर होत नाही, त्याच्याकडे मुद्दाच राहिलेला नसतो.

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Wed, 04/27/2016 - 17:30
विठामाऊली, तुमचे स्वतःचे प्रतिसाद तुमच्याबद्दल सांगायला पुरेसे आहेत हो. ह्याच प्रतिसादात पहिल्याच वाक्यात दुसर्‍यांना तुम्ही हतबल, निरुत्तर, अज्ञानी म्हणून मोकळे झालात. तुम्ही इतरांना असे ठरवू शकता पण इतरांनी तुम्हाला काहीच म्हणू नये हे अहंकार नाही तर काय? ही तर दंडेलशाही, मेरीगिनो, मैकरुसोकायदा प्रकार आहे. तुम्ही म्हणताय ते खरंच आहे. सत्याचा उलगडा झीरो किंवा वन सारखा आहे. सत्याचा उलगडा झाल्यावर आयदर ऑर सारखे कोणतेही रिपु शेष राहत नाहीत. विशेष व्यक्तिमत्व विलिन होते जीवंतपणीच. स्वतंत्र अस्तित्व राहत नाही पुर्णत्वाचा उलगडा झालेल्याला. पण इथे स्वतःची मत ठामपणे मांडणे, दुसर्‍यांची खोडणे ह्यातून काय दिसतंय? सत्याचा उलगडा झालेल्याला, ब्रह्मतत्व गवसलेल्याला, स्व गवसलेल्याला सर्व जगत आपणच आहोत अशी धारणा मिळते, आपपरभाव मिटतो. असीम दया, करूणा, शांती एवढेच शेष राहते. करुणा, शांती निर्माण व्हायला कारण आहे. आपण आपल्यावर, स्वतःवर प्रेम करतो. कधी कधी दुविधेत फसलो तर दुसरा विरोधी विचार करणार्‍या स्वतःवर चिडत, रागावत नाही, पहिला विचार खोडतो म्हणून संतापत नाही. शांतपणे दोन्ही बाजूंना व्यक्त होउ देतो, शेवटी जे पटतं ते करतो. एका शरिरात आपण अनेक मनं बाळगत असतो. जेव्हा स्व गवसतो तेव्हा सर्व विश्व आपलं शरीर आणि इथले सगळे परस्परविरोधी जीव आपलीच रुपं, आप्लीच मन असतात. अशांवर रागावून, संतापून, त्यांची मते त्यांना अज्ञानी, बेअक्कल, निरुत्तर, मुर्ख म्हणून खोडत नाही. फक्त जे जाणवते ते पुढ्यात ठेवतो. कारण अखिल विश्व हेच आपलं मन, आत्मा आहे हे कळलेलं असतं. त्यालाच तर पूर्णत्वाचा उलगडा होणे म्हणतात. तो अगदी झिरो किंवा वन सारखाच आहे. अधेमधे काहीही नसतं. तुमच्याकडे काही वेगळी थ्योरी असू शकते.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Wed, 04/27/2016 - 18:31
प्रतिसाद त्या अँगलनं पाहा म्हणजे काँटेक्स्ट राहील. बाकी आपपर भाव वगैरे निव्वळ पुस्तकी आणि काल्पनिक आहे. याचा अर्थ वास्ताविकात आपण सर्व एकरूप आहोत , पण जगतांना सत्य गवसलेला नेभळटपणे जगतो ही फार अज्ञानमूलक धारणा आहे. आपण व्यक्ती नसून स्थिती आहेत असा निश्चयात्मक अनुभव असला तरी जगतांना व्यक्ती म्हणूनच जगावं लागतं . दुसऱ्याप्रती अनुकंपा असतेच पण कुणी एक मारली तर दुसरा गाल पुढे करणं याला तुम्ही करूणा समजत असाल तर ती अपेक्षा व्यर्थ आहे . व्यावहारात जशास तसे असा निर्भयपणा नसेल तर सदर व्यक्ती अध्यात्माची ढाल केवळ स्वतःच्या बचावासाठी वापरत असते. एनी वे , तुमचा प्रतिसाद बराच मवाळ आणि बराचसा टू पॉइंट असल्यानं चर्चा होऊ शकली . धन्यवाद !

In reply to by विवेक ठाकूर

विवेक ठाकूर Wed, 04/27/2016 - 18:48
प्रगोनं निमोच्या याच विषयावरच्या पोस्टवर तुकारामांचा एक सुरेख श्लोक दिलायं . दॅट क्लिअर्स एवरीथींग ! सत्य आम्हा मनीं | नव्हे गबाळाचे धनी | देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावयासी बरें ||

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Wed, 04/27/2016 - 22:00
महात्म्यांची वचने आपल्या सोयीने वापरणे नवीन नाहीच. सत्य आम्हा मनीं | नव्हे गबाळाचे धनी | देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावयासी बरें || व्वा! छान. तुकारामांनी म्हटले म्हणजे प्रातःस्मरणीय आणि अनुकरणीयच आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघूया. सत्य आम्हा मनी, म्हणजे सत्य आमच्या मनात आहे, सत्याचा आम्हाला साक्षात्कार झाला आहे. नव्हे गबाळाचे धनी म्हणजे? गबाळ म्हणजे अज्ञानी,लाचार. देतो तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे म्हणजे अचूक उत्तरे, तीक्ष्ण म्हणजे 'बोचणारी' असा अर्थ घेतलात तर गडबड होईल. पुढे व्हावयासी बरे म्हणजे आधीच अचूक उत्तर दिले तर पुढे काही वाईट होत नाही. आम्ही सत्य जाणल्याने कुणी आम्हाला अज्ञानी, गावंढळ समजू नये, आमची उत्तरे अचूक असून पुढे ती उपयोगीच पडतात असा अर्थ असावा. पण कोणी विरोधात बोललं तर त्यास दहापट बोचणारी वक्तव्ये करणे हे नळावरच्या भांडणाचे सूत्र असते. भद्रसभेतल्या गंभीर चर्चेत अशी भाषा शोभत नाहीच तर बोलणार्‍याची पातळी दर्शवते. ह्याच धाग्यावरचे तुमचे सगळे प्रतिसाद वाचून घ्या. तुमच्या मतांच्या विरोधात मत व्यक्त करणार्‍यास आपण काय संबोधून बोलला आहात. तुमची मते खोडून काढणार्‍यास सतत अज्ञानी, बेअक्कल, सत्याची माहीतीच नाही, अनुभवच नाही, चिंतनच नाही असली शब्दसंपदा वापरता. का तर कोणी तुम्हाला 'नेभळट' समजू नये? वेल, कमॉन माऊली. इथल्या चारदोन मुखवट्याआड लपलेल्या चेहर्‍यांनी तुम्हाला बेभळट इत्यादी समजलंही समजा, तर काय मोठं आकाश कोसळणार हे माझ्या आकलनकक्षेच्या बाहेर आहे. यु आर टेकिंग दिस वर्चुअल लाइफ टु सिरीय्सली. हे चिंतेचे कारण होते. कारण जी व्यक्ती फक्त वर्चुअल जगात माहिती आहे, (तुम्ही खरे कोण आहात हे किती लोकांना इथे माहिती आहे हाही प्रश्न आहे म्हणून) तीही फक्त मिपावर आहे, तीने असले वर्चुअल मानापमान मनाला लावून घेणे आश्चर्याचे आहे हेच मी मगाच्पासून म्हणत आहे. बाकी आपपर भाव वगैरे निव्वळ पुस्तकी आणि काल्पनिक आहे. >> हे जर तुमचे मत असेल तर वरचा शांतिमंत्र ज्याचा अर्थ लावण्याची आपण पराकाष्ठा करत आहोत तोही एक पुस्तकी व काल्पनिक मंत्रच झाला. त्या श्लोकाचा अर्थच 'आपपर भाव नष्ट होणे' हा आहे. याचा अर्थ वास्ताविकात आपण सर्व एकरूप आहोत , पण जगतांना सत्य गवसलेला नेभळटपणे जगतो ही फार अज्ञानमूलक धारणा आहे. >> तुम्ही नक्की काय म्हणत आहात. वास्तविकात आपण एकरुप आहोत पण जगतांना वेगळे? सत्य गवसलेला नेभळटपणे जगतो ही धारणा आहे (अज्ञानमूलक इत्यादी नंतर) असे कोणत्या आधारावर आपण मानता ते कळले तर बरे. आपण व्यक्ती नसून स्थिती आहेत असा निश्चयात्मक अनुभव असला तरी जगतांना व्यक्ती म्हणूनच जगावं लागतं . >> आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत आणि त्याचवेळेस आपण व्यक्ती असून वेगळे आहोत हे दोन्ही एकाच वेळेस कसे काय शक्य होते? इट्स बायनरी नो? एक किंवा शून्य? कि सोयिस्कर 'भूमिका' आहे फक्त? दुसऱ्याप्रती अनुकंपा असतेच पण कुणी एक मारली तर दुसरा गाल पुढे करणं याला तुम्ही करूणा समजत असाल तर ती अपेक्षा व्यर्थ आहे . >> वेल. कराटे किंवा कुंगफू चे सूत्र, जे बुद्धांनी आपल्या अनुयायांना आत्मरक्षणासाठी शिकवलं ते माहिती असेलच तुम्हाला. आत्मरक्षा करतांना हल्लेखोराला आपली हानी करण्यापासून रोखणे, त्यास जायबंदी करणे, प्रतिबंधीत करणे हे ते तत्त्व आहे. हल्लेखोराने दोन फटके मारले तर त्याला दहा जीवघेणे फटके मारुन आयुष्यातून उठवा असे नाही. असीम करुणेतूनच अशी तत्त्वे जन्म घेऊ शकतात. तुम्ही आयुष्यात तुम्हाला घातक ठरेल अशी चूक स्वतःच केली, तुमचाच अपमान होईल अशी चूक केली तर स्वतःला काय शिक्षा देता/दिली? व्यावहारात जशास तसे असा निर्भयपणा नसेल तर सदर व्यक्ती अध्यात्माची ढाल केवळ स्वतःच्या बचावासाठी वापरत असते. >> आध्यात्म वायले, व्यवहार वायला. व्यवहार म्हणजे व्यापार. तुम्ही इथे अध्यात्माचा व्यवहार करायला येता? बाकी जशास तसे किंवा त्याच्या दसपट ह्याला आपण निर्भयपणा म्हणत असाल तर बोलणेच खुंटले. निर्भयपणाबद्दल आपण अजुन चिंतन करणे आवश्यक आहे असे वाटते. विठामाऊली, तुमच्याशी लोक अजूनही चर्चा करु जातात ह्याचाच अर्थ लोकांना तुमच्या ज्ञानाबद्द्ल, अधिकाराबद्दल, अनुभवाबद्दल अनादर नाही असा आहे. तुमच्या विरोधात जे काही बोलले जाते ते फक्त आपण दुसर्‍यांना कायम अज्ञानी सम्जत अपमानास्पद बोलत असता म्हणून लोक आता तेवढंच बघतात. ही स्थिती तुम्ही स्वतः बनवली आहे. ह्यात इथल्या सदस्यांचा काही ही हातभार नाही. ही स्थिती नको असेल तरी ती तुम्हालाच सुधारायला लागेल. त्यात कुणीच मदत करु शकत नाही. तुम्हाला नेहमी त्रास देणारे काही सदस्य प्रत्येकाला तस्साच त्रास देत असते तर त्यांच्यात समस्या आहे असे आपण समजले असते तर हरकत नव्हती. असो. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

अभ्या.. Wed, 04/27/2016 - 22:11
सत्य आम्हा मनीं | नव्हे गबाळाचे धनी
गबाळ म्हणजे अज्ञानी लाचार असा अर्थ नसावा जोकरभाव. गबाळ म्हणजे अडगळ, बिनाकामाचा पसारा. एकदा मनात सत्य वसत असले की बाकी अडगळीचे/बिनाकामाच्या गोष्टींचे/अस्ताव्यस्त पसरलेल्या विचारांचे धनी व्हायचे कारणच उरत नाही, अर्थात ही अडगळ अज्ञानाची सुध्दा असेलच म्हणा. . बाकी तुम्हा अधिकारी व्यक्तीमध्येच बोललो, क्षमा असावी.

In reply to by अभ्या..

तर्राट जोकर Wed, 04/27/2016 - 22:28
काय अभ्याभाऊ.. कोण अधिकारी नाही इथे, आपण सगळेच वेगवेगळ्या वाटेचे वाटसरु. बाकी तुम्ही जो अर्थ सांगितला तो भावला, बरंका?

In reply to by अभ्या..

शाम भागवत गुरुवार, 04/28/2016 - 10:43
बरोबर बोलता आहात. धनी म्हणजे मालक असणे. असत्याच्या किंवा अज्ञानाच्या प्रभावाखाली हे माझे ते माझे असे करत संसाराचा गोतावळा जमा करणारा व त्यावर मालकीहक्क गाजवणारा असा माणूस. अशा माणसाने जे काय जमवलेले असते ती गबाळा प्रवृत्ती हे जे त्याने जमवलेले असते ते सर्व इथेच सोडून जायचे असते याचे त्याला थोडेसुध्दा भान नसते म्हणून त्याला गबाळा म्हणले असावे. मी तज्ञ नाही पण असा अर्थ असावा असे वाटले म्हणून लिहिले.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Wed, 04/27/2016 - 22:24
सतत अपमानाचं रडगाणं गायला ही काय शाळा आहे का ? आणि त्याची काळजी घ्यायला संपादक समर्थ आहेत. जसा प्रतिसाद तसं उत्तर येतं . आणि निरूत्तर झालेले अपमानाचा कांगावा करतात. बाकी तुमचे करुणा वगैरे वरचे डाऊट तुकारामांनी क्लिअर केलेतच .

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Wed, 04/27/2016 - 22:34
आता खरेतर तुम्ही निरुत्तर झाला आहात. =)) बाकी संपादकांनी इतरांचा सतत अपमान करणारा एक आयडी उडवून पुरेपूर काळजी घेतली होतीच. तरी निर्लज्जपणाचा कळस की हाकलून दिलेले लोक परत परत येऊन तीच तीच रटरट लावतात.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Wed, 04/27/2016 - 22:45
तर तुमच्या प्रतिसादाला दिलेला पाहिला प्रतिसाद पुन्हा वाचा! आणि त्या भ्रमातच आनंद असेल तरी हरकत नाही .

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर गुरुवार, 04/28/2016 - 11:43
मला निरूत्तर केल्याचा भ्रम झाला असेल तर तुमच्या प्रतिसादाला दिलेले सर्व प्रतिसाद पुन्हा वाचा! आणि त्या भ्रमातच आनंद असेल तरी हरकत नाही =))

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर गुरुवार, 04/28/2016 - 12:33
कोण अमृता?? स्मशानात जाऊन शोध घेतात तीचा? ....आणि हे फक्त एक उदाहरण आहे. तिथे तुमच्याकडे काही उत्तर नाही . बाकी तुमचा आक्षेप माझ्या स्टाईलला आहे आणि तुकारामांच्या इतक्या सरळ अभंगाचा उगीच उलट सुलट अर्थ लावून लेखाच्या विषयाशी असंबद्ध प्रतिसाद देतायं. ज्याला अमृताचा आणि सत्यशोधनाचा संबंधच कळला नाही तो काय प्रतिवाद करणार ?

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर गुरुवार, 04/28/2016 - 13:03
माऊली, बोट ठेवायला एकच उपरोधिक वाक्य घेऊन तुम्ही जितंमयाचे विजयनृत्य करत असाल तर धन्य आहे. बाकी इतक्या गोष्टी विचारल्या, सांगितल्या मी, तिथे तर तुम्ही मौन धरुन बसलात. माझा आक्षेप एवढाच आहे की जे तुम्ही म्हणताय ते तुम्ही वागत नाही. 'बोले तैसा चाले तयाची वंदावी पाऊले' असा आम्हाला संस्कार आहे बुवा. जर तुम्ही तसं वागत नाही तर तुम्ही बोगस आहात हा स्पष्ट अर्थ होतो. डोक्याला ताण देणार्‍या गफ्फा हाणायला काय हो, जरा चुर्चुरित बुद्धी, शब्दसंपदा आणि विचारकौशल्य असले की झाले. पण अंतरीचा भाव 'असेल' तर दिसून येतो, 'मला स्व गवसलाय' अशी दवंडी पिटावी लागत नाही. अधिक काय बोलणे. सतत विरोधकांना अज्ञानी म्हणणे ही ष्टाईल असू शकते? वॉव. बाकी तुकाराम तर फक्त ढाल आहे, पितांबर घसरतंय हे बघून घेतलेली. असो.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर गुरुवार, 04/28/2016 - 16:11
माझे प्रतिसाद तुमच्या 'संतकल्पनेत'बसत नाहीत केवळ इतकाच तुमचा त्रागा आहे. त्यात तुम्हाला वाटतंय तुमची फक्त एकच चूक झाली . बेसिकच माहिती नाही म्हटल्यावर सगळंच चुकत जाणार . उदा . अहं ब्रह्मास्मी व तत्त्वमसि ह्या दोन संकल्पना अनुभवल्याशिवाय ह्या श्लोकाचा अर्थ कसा कळणार? तुम्हाला कल्पनाच नाही की ब्रह्म, तत् आणि पूर्ण हे तीनही एकच सत्याकडे निर्देश करतात. तुम्हाला त्या दोन 'संकल्पना' वाटतात हा तर त्याहून मोठा विनोद आहे . त्या संकल्पना नाहीत, ती वस्तुस्थिती आहे . शिवाय पुढे जाऊन तुम्ही अनुभवाच्या गप्पा हाणता आणि या दोन 'संकल्पना' कळल्याशिवाय श्लोकाचा अर्थ कळणार नाही अशी फेकाफेकी करतायं. हा तुम्ही प्रतिसादात म्हणतायं तसा खरा 'बोगसपणा' आहे ! बाकी अज्ञानाचा अध्यात्मिक अर्थ सत्याचा बोध नसणं इतकाच आहे हे मी आधीच विलिअर केलंय. मूर्ख वगैरे विशेषण तुम्ही स्वतःसाठी स्वतःच शोधलेली आहेत .मी तसं कधीही म्हटलेलं नाही . आता हा श्लोक तरी तुम्हाला कळेल अशी अपेक्षा करतो . भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर गुरुवार, 04/28/2016 - 18:58
घोर अंधार आहे. जागे व्हा. आणि टोचून बोलणे बंद करा. जशास तसे झाले की तुम्ही कळवळता असा अनुभव आहे. चार लोकांना माझे प्रतिसाद अवडले म्हणून तिरमिरलेल्यांनी मला अध्यात्म शिकवू नये एवढंच म्हणून माझं इथलं प्रक्षेपण थांबवतो. धन्यवाद.

In reply to by विवेक ठाकूर

सतिश गावडे गुरुवार, 04/28/2016 - 19:42
तुम्हाला कल्पनाच नाही की ब्रह्म, तत् आणि पूर्ण हे तीनही एकच सत्याकडे निर्देश करतात. तुम्हाला त्या दोन 'संकल्पना' वाटतात हा तर त्याहून मोठा विनोद आहे . त्या संकल्पना नाहीत, ती वस्तुस्थिती आहे .
त्या संकल्पनाच आहेत हो. मानवी आकलनाला मर्यादा आहेत. मात्र काही माणसं आपल्याला झालेल्या आकलनालाच "सत्य" समजतात.

In reply to by सतिश गावडे

वैभव जाधव गुरुवार, 04/28/2016 - 19:51
गावडे सर, आनंदाचा अनुभव येतो म्हणजे नेमकं काय होतं? तुम्हाला आनंदाचा अनुभव नसला तर आनंद नाहीच असं म्हणता येतं का? विचार न करणारं मन कसं असतं ते कधी अनुभवलं आहे का? तेव्हा काय वाटतं ते तो क्षण पार केल्यानंतर समजतं. गाढ झोप लागलेली झोपेतून जागं झाल्यानंतर समजतं जेव्हा आपल्याला उल्हसित वाटतं. अशी स्थिती म्हणजे संकल्पना नाही. तो अनुभव आहे जो व्यक्तिगत असतो. हाच आनंद कायम प्रकारे आणि काशाच्याही शिवाय मिळत असेल तर त्याला पूर्ण, तत् वगैरे नाव आहे. अर्थात जो असा असतो त्याला कसलीच कामना शिल्लक नसते हे मात्र खरे!

In reply to by वैभव जाधव

सतिश गावडे गुरुवार, 04/28/2016 - 20:26
हाच आनंद कायम प्रकारे आणि काशाच्याही शिवाय मिळत असेल तर त्याला पूर्ण, तत् वगैरे नाव आहे.
तेच तर मी म्हणतोय. त्या आनंदाला पूर्ण, तत् म्हणायचं असं आपण ठरवलंय. तो आनंद म्हणजे पूर्ण, तत् अशी संकल्पना आहे.

जेपी Wed, 04/27/2016 - 14:23
200.. जोरदार चर्चा .. अजुन येऊ द्या... आता कुठे विहिरीला पाणी लागल...

चित्रगुप्त Wed, 04/27/2016 - 19:02
'काल' हि जशी एक निव्वळ कल्पना आहे (म्हणे) तश्याच 'पूर्ण' शून्य' वगैरेही कल्पनाच. शांभवी प्राशन केली, वा गांजा-चिलिमीचे च्यार झुरके ओढले की अशी कवने टनावारी सुचतात म्हणे. परंतु अमूक एक गोष्ट वेदात, उपनिषदात, बायबलात वा कुराणात सांगितलेली आहे म्हटले, की मग कुणाची बोलायची टाप नाही.... हे आमचे शांभवी वा गांजा न घेता झालेले मत.

In reply to by चित्रगुप्त

सतिश गावडे Wed, 04/27/2016 - 21:45
>>'पूर्ण' शून्य' वगैरेही कल्पनाच. तत्वज्ञान म्हणा वा अध्यात्म, दोन्ही माणसाने आपल्या परीने आयुष्याचा अर्थ लावण्याचा, जीवनाचे गूढ उकलण्याचा केलेला प्रयत्न आहे. काही व्यक्तीना आपल्याला झालेले आकलन हेच अंतिम सत्य वाटते. यातूनच मग कधी एखादा धर्म, पंथ, वाद किंवा संप्रदाय जन्म घेतो. डोकं शांत ठेवून विचार केला तर लक्षात येतं की आपल्याला खुपच कमी माहीती आहे. आजही "का?" या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. जे लोक आपल्याला सत्य कळले आहे असा दावा करत आहेत, ते स्वत:लाच फसवत आहेत. मी आहे आणि मी माझ्या देहापासून वेगळा आहे ही जाणिवही मलाच होते. या "मी"लाच अध्यात्मात "आत्मा" म्हणतात. ज्ञानदेव हरीपाठात या मी ला एका वैश्विक मी ची अनंत रुपे मानतात. त्या वैश्विक मी ला ते "हरी" म्हणतात. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान | सर्वाघटी पुर्ण एक नांदे || तरीही मी का आहे, मी एका वैश्विक सतचिदानंदाचा अंश असूनही मला दु:ख का होते हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. या प्रश्नाला दिले जाणारे उत्तर "आपण आपल्या खऱ्या स्वरुपाला विसरलो आहोत" ही आपली आपण घातलेली समजूत आहे.

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव Wed, 04/27/2016 - 22:21
जे लोक आपल्याला सत्य कळले आहे असा दावा करत आहेत, ते स्वत:लाच फसवत आहेत.
"आपली समजण्याची म्हणुन एक मर्यादा आहे व त्या पलिकडे आपल्याला काहि समजणार नाहि" हे सत्य ज्याला कळलं तो स्वतःला फसवत नाहि :ड

एस Sat, 04/30/2016 - 00:37
बादवे, एक दुरुस्ती - बौद्धमतात 'शून्यवाद' हा नागार्जुनाने आणला. तो बुद्धाच्या कितीतरी नंतरचा. बाकी चालू द्या.

निराकार गाढव Sat, 04/30/2016 - 12:42
व्वा ! क्काय झ्याक् लेख लिवलाय... आन् चर्चा बी काय रंगलीये ... खरंतर काही अक्षर कळालं नाय... पर म्हनलं आपुन्बी जरा फिरून प्रचिती घेऊन यावं. त्येवढीच ज्ञानात भर... तर लय मज्जा आली... पर चर्चेचा कानामात्रा काय समजला नाय बगा... आता गुर्जेन्ली शिकिविल्याबिगर काय अर्थ लागतो... पर तुमचं चालू द्या... मी जरा अजून फेरफटका मारतो.. तंवर कुणाला काही अर्थ लागला तर सांगा.... काय? .

चित्रगुप्त Sat, 04/30/2016 - 12:58
आज सकाळपासून मी मिपा उघडून असल्या वांझ चर्चा वाचण्याऐवजी घरच्या बगिचाच्या लोखंडी कुंपणाला व्यवस्थित रेजमालने घासून मस्त पेंट लावला. मजाही आली आणि एक अडलेले कामही मार्गी लागले. पूर्ण भरलेल्या पेंटच्या डब्यातून सर्व रंग दुसर्‍या डब्यात ओतल्यावर मूळ डबा रिकामा झाला, आणि रंगकाम झाल्यावर तोही डबा रिकामा झाला. म्हणून म्हणतो असल्या कल्पना बेवड्यांना व गांजेकसांनाच सुचत असाव्यात, भले मग त्या उपनिषदात लिहिलेल्या असोत अथवा आणखी कशात.

In reply to by चित्रगुप्त

mugdhagode Sat, 04/30/2016 - 19:01
अध्यात्म म्हणजे आंधळ्या माणसाने अंधार्‍या खोलीत काळे मांजर शोधणे. ( काळ्या मांजराला जंत काळे होतात की पांढरे ? )

In reply to by mugdhagode

वैभव जाधव Tue, 05/03/2016 - 13:45
आंधळ्या च नाही तर मुक्या, बहिऱ्या आणि एकंदर स्पर्शज्ञान नसणाऱ्या अशा दुर्मिळ कॉम्बिनेशन असलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा (हेलन केलर सारखं जवळ जाणारं उदाहरण) मी आहे ची भावना असते ती कुठल्या बळावर असते त्याला अध्यात्म म्हणतात. शरीरामध्ये जणू काही दडून बसलेला असा तो आत्मा. म्हणजे अधि+आत्म= अध्यात्म. काळ्या कपड्यातला काळा माणूस अत्यंत किर्रर्रर्र अंधारात काळ्या रस्त्याने एकटा निघाला असताना त्याला काहीच दिसत नाही पण तो 'असतो'. हि असण्याची जाणीव विशेष चैतन्यामध्ये म्हणजे माणसामध्ये विचार करु शकत असल्याने जास्त करुन प्रगट आणि प्रगत असते. असो!

विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 12:36
घोर अंधार आहे. जागे व्हा. आणि टोचून बोलणे बंद करा. जशास तसे झाले की तुम्ही कळवळता असा अनुभव आहे. चार लोकांना माझे प्रतिसाद अवडले म्हणून तिरमिरलेल्यांनी मला अध्यात्म शिकवू नये एवढंच म्हणून माझं इथलं प्रक्षेपण थांबवतो. धन्यवाद. अज्ञानाला अध्यात्मात अंधार म्हटलंय. अंधार अनाकलनात आहे हे तुमचे सर्व प्रतिसाद दर्शवतात. त्यात तुमचा प्रतिसाद इतरांना आवडल्यामुळे `हेवा वाटला' हा म्हणजे `सधनाला निर्धनाचा हेवा' प्रकारचा गैरसमज आहे. त्या प्रतिसादा आणि नंतरच्या स्पष्टीकराणांपायीच तर तुमचं अज्ञान उघड झालंय. तुम्हाला अध्यात्म शिकवायचा प्रश्न कुठे येतो? आधी आंधार दूर व्हायला हवा मग समजण्याची पायरी आहे. तुम्ही थांबलात हे तुमच्या दृष्टीनं योग्य आहे कारण अज्ञानमूलक धारणांची दोन उदाहरणं तर वर दिलेली आहेत. पुन्हा पुढची पोलखोल नको असेल तर प्रतिसाद थांबवणं उचित. टोचून बोलणं वगैरेची सुरुवात कुणी केली आहे हे न समजणं म्हणजे पेडगावला जाणं आणि बाजू उलटल्यावर कांगावा करणं आहे.

तर्राट जोकर Tue, 05/03/2016 - 01:32
हा हा हा. तोंडाच्या बंबात शब्दांची लाकडे ज्ञान माझेच, इतरांचे तोकडे श्रेष्ठ मीच पाऊल जरी वाकडे मीच न्याय, माझ्याकडे तागडे. नको, नको म्हणतायत. ;-) तसाही अध्यात्म 'डिस्कशन'चा विषय नाही हे नारशिष्टांना प्लेगृपमधे गेल्यावर कळेलच. नारशिष्टांच्या राज्यात लुड्बूड = मौत को दावत देना. नारेबाबाना...... येतो, बाय बाय, टेक केअर ऑफ इगोज ऑल ऑफ यु.

In reply to by तर्राट जोकर

तोंडाच्या बंबात शब्दांची लाकडे ज्ञान माझेच, इतरांचे तोकडे श्रेष्ठ मीच पाऊल जरी वाकडे मीच न्याय, माझ्याकडे तागडे.
http://freesmileyface.net/smiley/laughing/laughing-019.gif मार्केटयार्ड उठलं! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-032.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

विवेक ठाकूर Tue, 05/03/2016 - 13:42
मार्केट यार्ड खरं तर इथे यथा शास्त्रप्रमाणेनं.. उठलंय! पण तिथे पळता भुई थोडी झाल्यानं इकडे तिकडे पिंका मारुन स्वतःला दिलासा शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Tue, 05/03/2016 - 11:47
अज्ञानाच्या अंधारात विदुषकी चाळे वस्त्रहरण होऊनही पुन्हा माकडचाळे | निर्धनाला कायम ऐश्वर्याचे डोहाळे टाळ्या पिटायाला जमली पोरंबाळे | नार्सिसिझम वगैरे दुबळ्या लोकांचा प्रतिवाद आणि तोंड लपवण्याचा मार्ग आहे. त्यांनी सच्चिदानंद बाबासारखे दिव्य लेख लिहीले आहेत आणि मग त्याचा पश्चात्ताप म्हणून निष्फळ सायकॉलॉजीचा आधार घेतलायं.

चेक आणि मेट Tue, 05/03/2016 - 11:52
तजो, तुम्ही विठांना दिलेले सर्व प्रतिसाद राजकारणाच्या मुद्यावर तुम्हालाही तंतोतंत लागू होतात बरं का!!

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर Tue, 05/03/2016 - 13:30
मी कोणालाही कधीही अज्ञानी म्हटलेले आठवत नाही. जाणीव नाही, अक्कल नाही, माहिती नाही, माकड आहात असे म्हटलेले आठवत नाही. असेल तर सांगा नाहीतर आपले निष्कर्ष गुंडाळून योग्य त्या जागी ठेवा. जय हो.

चेक आणि मेट Tue, 05/03/2016 - 12:14
वक्ता अधिकारेवीण वक्तृत्वाचा करी सीण | वचन जयाचे कठीण | तो येक पढतमूर्ख || दोष ठेवी इतरांसी | तेचि स्वये आपणापासी | ऐसे नकळे जयासी | तो येक पढतमूर्ख || ---दासबोध---चेक आणि मेट(पढतमूर्ख)