अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली.
नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा.
थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं. यावेळी ते तिच्या अपयशाचं होतं. प्रेमातल्या आणि जीवनातल्या अपयशाचं ..डेथ सर्टिफिकेट.
वाचने
5079
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबर.
शशक चांगली जमून आली आहे.
:(
जबर्दस्त !!
उत्तम कथा!!
जबरा!!!!!
शशक म्हणून जबरी पण थीम म्हणून
सहमत.
In reply to शशक म्हणून जबरी पण थीम म्हणून by नाना स्कॉच
माझी पात्रता नाही तरीपण
धन्यवाद
In reply to माझी पात्रता नाही तरीपण by बोका-ए-आझम
:(
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार
कथा म्हणून चांगली .....
आवडली कथा मस्त जमली आहे
सततच्या यशामुळे अपयश काहींना
In reply to आवडली कथा मस्त जमली आहे by जगप्रवासी
अगदी
In reply to सततच्या यशामुळे अपयश काहींना by मराठी कथालेखक
:(
सही.
छान जमली आहे... पण म्हणावीशी
जबरी!
धन्यवाद
In reply to जबरी! by भरत्_पलुसकर