✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शतशब्दकथा : सर्टिफिकेट

म
मराठी कथालेखक यांनी
Fri, 04/08/2016 - 12:25  ·  लेख
लेख
अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली. नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा. थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं. यावेळी ते तिच्या अपयशाचं होतं. प्रेमातल्या आणि जीवनातल्या अपयशाचं ..डेथ सर्टिफिकेट.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
जीवनमान
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5029 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

जबर.

वेल्लाभट
Fri, 04/08/2016 - 12:30 नवीन
जबर.
  • Log in or register to post comments

शशक चांगली जमून आली आहे.

आतिवास
Fri, 04/08/2016 - 14:30 नवीन
शशक चांगली जमून आली आहे. आवडली - असं म्हणवत नाही, यातच तिचं यश आहे.
  • Log in or register to post comments

:(

पैसा
Fri, 04/08/2016 - 15:55 नवीन
:(
  • Log in or register to post comments

जबर्दस्त !!

चिनार
Fri, 04/08/2016 - 16:05 नवीन
जबर्दस्त !!
  • Log in or register to post comments

उत्तम कथा!!

तुषार काळभोर
Fri, 04/08/2016 - 16:38 नवीन
यानिमित्ताने दर्जेदार शशकचा सिलसिला पुन्हा सुरू व्हावा
  • Log in or register to post comments

जबरा!!!!!

जव्हेरगंज
Fri, 04/08/2016 - 17:35 नवीन
जबरा!!!!!
  • Log in or register to post comments

शशक म्हणून जबरी पण थीम म्हणून

नाना स्कॉच
Fri, 04/08/2016 - 17:44 नवीन
शशक म्हणून जबरी पण थीम म्हणून बोगस वाटली, आत्महतेचे उदात्तीकरण वाटले! :(
  • Log in or register to post comments

सहमत.

खेडूत
Fri, 04/08/2016 - 17:58 नवीन
सहमत. आणि आजच्या दिवशी प्रकाशित करायला नको होती (..असं आपलं माझं मत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

माझी पात्रता नाही तरीपण

बोका-ए-आझम
Fri, 04/08/2016 - 18:52 नवीन
थरथरत्या हाताने त्याने तिचे डेथ सर्टिफिकेट फाईल केले - असा शेवट केला असता आणि ते अपयशाचं वाक्य वगळलं असतं तर अजून effective झाली असती. आहे छानच. वरती आतिवास यांनी म्हटल्याप्रमाणे - छान म्हणवत नाही!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मराठी कथालेखक
Sun, 04/10/2016 - 23:29 नवीन
पण मला मृत्यू आत्महत्येने झालाय आणि आत्महत्या प्रेमातील अपयशातून केली आहे हे सांगायच होतं. शिवाय बाकी स्मिताच्या आजपर्यंतच्या सगळ्या अव्वल यशाच्या पार्श्वभूमीवर "अपयशाचं सर्टिफिकेट" ठळक करायचं होतं. एकाच वाक्यात हे कदाचित नसतं जमलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

:(

रातराणी
Sat, 04/09/2016 - 04:11 नवीन
:(
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार

मराठी कथालेखक
Sun, 04/10/2016 - 23:30 नवीन
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार आणि सणाच्या दिवशी ही कथा प्रकाशित केल्याबद्दल दिलगिरी. पण अचानकच कथानक सुचलं आणि मग लगेच टंकण्याशिवाय राहवलं नाही.
  • Log in or register to post comments

कथा म्हणून चांगली .....

नाखु
Mon, 04/11/2016 - 08:27 नवीन
असेलही पण स्पर्धेत यश मिळवताना (अपयशाचाही सामना करण्याचा कणखरपणा) शिकवण मिळाली नाही..म्हणूनच पट्ली नाही. स्पष्टोक्तीबद्दल माफी
  • Log in or register to post comments

आवडली कथा मस्त जमली आहे

जगप्रवासी
Mon, 04/11/2016 - 17:58 नवीन
आवडली कथा मस्त जमली आहे , सततच्या यशामुळे अपयश काहींना पचवता येत नाहीत त्याच हे उदाहरण म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

सततच्या यशामुळे अपयश काहींना

मराठी कथालेखक
Mon, 04/11/2016 - 18:43 नवीन
सततच्या यशामुळे अपयश काहींना पचवता येत नाहीत
हे तर आहेच. पण परीक्षेतलं/स्पर्धेतलं अपयश आणि प्रेमातलं अपयश यात फरकही आहे. परीक्षेतलं अपयश बहूधा तात्पुरतं असतं, पुन्हा प्रयत्न करुन ते यशात बदलता येतही. पण प्रेमाच्या बाबतीत हे सहसा शक्य होत नाही , म्हणजे तुटलेलं नातं (त्याच व्यक्तीशी) पुन्हा जुळून येत नाही. इथे माझा लिहिण्याचा अर्थ थोडा वेगळा होता. "यशामुळे अपयश पचवता येत नाहीत" यापेक्षा प्रेमातलं अपयश इतकं मोठं झालं की स्वतःच जीवन, ज्या जीवनात तिने खूप यश मिळवलं आहे असं जीवन तिला नकोसं झालं.. आणि मला आत्महत्येचं उदात्तीकरण करायचं तर नाहीच उलट असं सुचवायचं आहे की आत्महत्या करताना निदान हा विचार तरी करावा की आपण आपल्याच आतापर्यंतच्या सगळ्या कतृत्वाचा अपमान करतोय. (बाकी आई-वडील, इतर सोयरे यांचा विचार तर आहेच पण हा ही विचार करावा). निदान जुनं कतृत्व आठवून तरी स्वतःला क्षुद्र मानण्याचा अपराध करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

अगदी

अपरिचित मी
Wed, 04/13/2016 - 09:48 नवीन
सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

:(

पद्मावति
Tue, 04/12/2016 - 01:09 नवीन
:(
  • Log in or register to post comments

सही.

चौथा कोनाडा
Tue, 04/12/2016 - 19:39 नवीन
सही. एकीच्या दुर्दैवी पणाची शशक चांगली उतरलीय.
  • Log in or register to post comments

छान जमली आहे... पण म्हणावीशी

अपरिचित मी
Wed, 04/13/2016 - 09:51 नवीन
छान जमली आहे... पण म्हणावीशी वाटत नाही... वाचून दुखः झाले... !!
  • Log in or register to post comments

जबरी!

भरत्_पलुसकर
Sat, 04/16/2016 - 16:54 नवीन
जबरी!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मराठी कथालेखक
Sat, 04/16/2016 - 17:42 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भरत्_पलुसकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा