अर्निंग इट राइट
लेखनविषय (Tags)
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं.
उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात. कार्यालयीन चोर्यांची उदाहरणं म्हणजे, न केलेल्या मेडिकलच्या खर्चाची बिलं दाखवून त्या पैशाचा परतावा घेणे, बसने जाऊन टॅक्सीच्या बिलाचे पैसे घेणे, सेकंड क्लास ने प्रवास करून फर्स्ट क्लासचे पैसे घेणे, कंपनी मोबाईल बिलं भरते म्हणून त्या नंबरवरून बिनधास्त एसटीडी, आयएसडी कॉल करणे, इंटरनेट बेछूट वापरणे, इत्यादी.
'कंपनी देतेय!', 'पण मी एलिजिबल आहे' अशी स्पष्टीकरणं याबद्दल विचारणा केल्यास ऐकायला मिळतात. एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे. पण हे करणा-या माणसाला तो त्याचा हक्क वाटतो. इंग्लिशमधे एक शब्द आहे Integrity; तिचा अभाव या लोकांमधे असतो. चोरी पकडेपर्यंत जरी चोर चोर नसला, तरी त्याच्या मनाला ठाऊक असतं की तो चोर आहे. या लोकांनाही ते ठाऊक असतं, पण जगाला ते कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव करावीशी वाटते. बरं, हे असं करणारी मंडळी बहुतेक वेळा बक्कळ पगार घेणारी मंडळी असतात, कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं. शेवटी जास्त मिळायला लागलं कीच हाव निर्माण होते, कमीच असतं तिथे फक्त गरज असते.
मला लाकूडतोड्याची गोष्ट आठवते अशी उदाहरणं बघितली की. तो सुद्धा सोन्याच्या, चांदीच्या कुर्हाडीसाठी एलिजिबल ठरलाच होता की!, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला तो त्याचा 'हक्क' वाटला नाही. शेवटी वृत्ती असते एकेकाची, आणि ती अशा प्रसंगातून दिसते. असं चोरासारखं वागणार्या व्यक्तीने त्याच्या प्रमोशनची पार्टी अगदी 'हक्काने', दिलदारपणाचा आव आणून दिली तरी त्याचं कौतुक वाटत नाही. पण त्या व्यक्तीच्या १०% पगार असलेल्याने मुलगा पास झाल्याचे वाटलेले पेढेही कौतुकासाठी अधिक 'एलिजिबल' ठरतात.
'Everybody has a Right to Earn; but very few Earn it Right.'
ब्लॉग दुवा
मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
प्रतिक्रिया
आपलं धीरुभाउ पण हेच म्हणायचं
याच आशयाचा डायलॉग आहे.
आणि पैश्याची हव नसेल तर बायका
त्याचा प्रामाणिकपणाशी संबंध
हे प्रवासखर्च आणि बाकीचं काय
एक प्रश्न मनात आला - माणूस
किंवा
मुद्दा बराच पेटला म्हणायचा.
भारीच.
अर्थात काय व्हावं हा ज्याचा
अर्थात काय व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.हाच कळीचा मुद्दा आहे आणि येथेच गल्लत होते आहे. आपल्या बघण्यात इतके निरनिराळे लोक असतात आणि प्रत्येकाचे "जीवनविषयक सूत्र" वेगवेगळे असते. सध्याच्या काळात "आपण आपल्यापुरते आपल्या मतानुसार प्रामाणिक राहणे" हे आणि इतकेच महत्वाचे असते. पण लोकांना हे पटत नाही. ते दुसर्याला आपल्या मतानुसार सुधारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे विचारधारांमध्ये छोटेसे युद्ध सुरू होते. त्यात प्रामाणिकपणाच्या प्रत्येकाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असतात. स्वतःच्या परिघात वावरताना आपण जसे स्वातंत्र्य घेतो तसेच स्वातंत्र्य दुसर्याला दिले तर व्हेज-नॉनव्हेज, हिंदू-मुसलमान असे वादही तयार झाले नसते आणि तेरी कमीज से मेरी कमीज सफेद कैसी टाईप कोण किती % प्रामाणिक आहे याचा विचार करायची गरज भासली नसती.गोष्ट पाळायची म्हटली की त्यात छोटं, मोठं, करायचं नाही. आज ज्यांना पाचशेची अफरातफर छोटी वाटते, त्यांना उद्या (तशाच पैशांच्या सहाय्याने मोठं झाल्यावर) पाच लाख ही मोठे वाटणार नाहीत, मग पाच कोटी, पन्नास कोटी... थांबवायचं असेल तर ते पाचशेलाच. पुढे शक्य नसतं.हे टिपीकल तत्वज्ञान आहे. वरून गोडगोड दिसणारे, भावनांना हात घालणारे. प्रत्यक्षात निरूपयोगी आणि सदासर्वदा अनुसरणे निव्वळ अशक्य. गोष्ट पाळायची म्हटली की त्यात छोटं, मोठं, करायचं नाही प्राणीहत्येच्या विरूद्ध असणारे सर्वचजण दिवसरात्र श्वास घेताना हवेतले जीव जीवाणु मरू नयेत म्हणून जैन धर्मगुरूंसारखे मास्क लावून फिरतात का? मास्क नसताना त्या धर्मगुरूंच्याही हातून ही हत्या होतच असते. आपल्या अन्नासाठी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे झाडांचा जीव घेतोच. रस्त्यावरून गाडी चालवताना कित्येक बेडूक, फुलपाखरे, माश्या मरतात. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो तर जगणे अवघड होईल. त्यामुळे "कोणीही १००% प्रामाणिक नसतो" हे पटले की बरेच प्रश्न पडत नाहीत.+१
अनेथिकल आणि इल्लिगल यात फरक
प्रश्न पडायचेच मोदकशेट.
नोप.. आय अॅम नॉट टॉकिंग
वेल्ला, मराठी लिहिण्या
हो. इंग्लिशबंदी म्हटलेलं का
एक प्रामाणिक शंका. असे मध्येच
आवडतात लिहायला, म्हणून!
नाही.
लेट हिम चुझ द वे टु
दॅट ओनली ना !
व्हाय हिअर देअर नोज पोकिंग
व्हाय हिअर देअर नोज पोकिंग अन्नेसेसरीली? उगाच आपलं हुंगत बसायचं काहीतरी.अहो नवीन काहीतरी शिकायला मिळते. तुम्ही एखादा प्रेझेंटेशनचा कोर्स केला असेल आणि त्यात असले काहीतरी सांगितले असेल तर त्या दृष्टीने आणखी माहिती मिळवता येते. उगाच हुंगत बसत असलो तरी तुमच्याकडे काहीतरी चांगले असणार असा विचार करून हुंगायचा प्रयत्न होता. तुमचा असा पवित्रा असेल तर पुढच्या वेळी नाही विचारणार, काळजी नसावी.असो. शब्दाने शब्द वाढवायचा
दोन्हीपैकी नक्की कशात अडचण
इंग्लिशबंदी म्हटलं नाहीये
हाह !
सगळ्यांनी हलकं घ्या बरं. मी
"आपण आपल्यापुरते आपल्या
मोदकाला अणुमोदन (बरेच
साहेबा
एकूण असं दिसतं की याबाबत आपण
ह्याचं कारण आजुबाजूला सतत
नीती म्हणून बरोबर आहे
तुम्ही नीतिमत्तेला नीतिमत्ता
अर्थात हे समर्थन नाहीच होऊ
फसवणूक न करता - एक्झॅक्टली.
फसवणूक न करता म्हणजे काय?
माझ्या मते
सहमत.
अगदी बरोबर
असमानांची लढाई आहे.
या धाग्यात बर्याच लोकांच्या
सहमत !
गोष्ट १ आणि २
ती पर्सनल दिवा अन सरकारी
थोडा सापेक्ष विचार पण हवा.
''Its my responsibility to
सहमत
आपल्याला कंपनी किंवा सरकार
लैच प्रॅक्टीकल आणि योग्य असा
Pagination