✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

६ वी क्रिकेट ट-२० विश्वचषक स्पर्धा - २०१६

श
श्रीगुरुजी यांनी
Sun, 03/13/2016 - 15:15  ·  लेख
लेख
क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत. गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते) गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो. २००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत. १) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता २) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता ३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता ४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता ५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता ६) २०१४ - ? आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला). एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही. यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत. माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल. स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे. १) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड २) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान ३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज ४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका ५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड ६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका ७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान ८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका ९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज १०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान ११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान १२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड १३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान १४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान १५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज १६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान १७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका १८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज १९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया २०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका ______________________________________________________________________

२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना

२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना

______________________________________________________________________

२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना

______________________________________________________________________
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25952 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी

असंका
Tue, 03/29/2016 - 08:36 नवीन
तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत.
नेहराने प्रत्येक ओवरला सरासरी पाच रन दिल्या. भारतीय आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही कडच्या बोलरमध्ये सर्वोत्तम. स्फोटक उस्मान खवाजाचा बळी त्यानेच मिळवला. त्याला लपवा आणि कल्पना करा ऑस्ट्रेलियाने मग किती रन केले असते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी

नाखु
Tue, 03/29/2016 - 09:13 नवीन
तूर्तास वासरात लंगडी गाय या न्यायापुरताच मेहरा आहे आणि बर्याचदा त्याच्या नावातला मे टंकन दोष होऊन मै असा होतो. पंड्या त्या षटकाची पुण्याई आणि कैफ अजून विसरायला तयार नाही आणि त्याचा र्हास त्यानेच होऊ घातला आहे. जडेजा नक्की कश्यासाठी संघात आहे याची पाहणी करायला सार्क परिषदच बोलवावी लागेल असे दिसते. बाकी नंतर. सौंदाळा भाऊ या निमित्ताने मिपावर लिहू लागलेत हे पाहून बरे वाटले. श्री गुरुजी सध्या तरी या धाग्यावरून धगीकडे जाऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

क्यू आमच्या धाग्यावर येनेसे

DEADPOOL
Tue, 03/29/2016 - 15:20 नवीन
क्यू आमच्या धाग्यावर येनेसे रोकतात हय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

त्ये

नाखु
Tue, 03/29/2016 - 16:52 नवीन
तिकडेच अडकून पडतात आणि या धाग्यावर धावफलक मंदावतो. जाहीराती मार खातात ते वेगळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

ओके

DEADPOOL
Tue, 03/29/2016 - 16:55 नवीन
ओके खाली धावफलक बघणारा नाखु अशी सही करा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आणि कधीमधी चक्कर टाकायला

DEADPOOL
Tue, 03/29/2016 - 16:56 नवीन
आणि कधीमधी चक्कर टाकायला परवानगी द्या, नाहीतर आमचा धावफलक अडकून पडतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

चालेल

नाखु
Wed, 03/30/2016 - 08:33 नवीन
पण जरा जाहीराती मोठ्या आणि या प्रकारच्या असतील तर धाग्या धाग्यानुसार जाहीरातींचे एक पॅकेज तयार करा. तो धागा :सर्फ एक्सेल्,निरमा,घडी डिटर्जंट,पाटणकर काढा,कायमचूर्ण. हा धागा : मौका मौका,डर के आगे जीत,मेन विल बी मेन,कच्चा आम. जाहीराती पंखा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी

श्रीगुरुजी
Tue, 03/29/2016 - 12:54 नवीन
तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत.
काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. नेहराची एकूण कामगिरी ४-०-२०-१ इतकी उत्तम होती. त्याने डावाचे पहिले षटक टाकले व त्यात फक्त ४ धावा दिल्या. दुसरे षटक बुमराहने टाकले व त्यात त्याने १७ धावा दिल्या. तिसरे षटक परत नेहराने टाकले व त्यात त्याने १० धावा दिल्या. पॉवरप्लेमध्ये एका षटकात १० धावा म्हणजे खूप जास्त नाही. ४ थे षटक अश्विनने टाकले व त्यात त्याने २२ धावा दिल्या. ऑसीजने पहिल्या ४ षटकात ५३ धावा केल्या होत्या. त्यात नेहरूच्या २ षटकात फक्त १४ धावा होत्या. ५ वे षटक पुन्हा नेहरूने टाकले व त्यात फक्त २ धावा दिल्या. म्हणजे पॉवरप्लेच्या ६ पैकी ३ षटके नेहरूने टाकली व त्यात त्याने फक्त १६ धावा दिल्या. नंतर परत आल्यावर ४ थ्या षटकातही त्याने फक्त ४ धावा देऊन १ बळी मिळविला. नेहरूने एकूण ४ षटकात फक्त २० धावा देऊन एक बळी घेतला. त्या सामन्यात एकूण ६ गोलंदाजांपैकी नेहरू सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज होता. त्याखालोखाल युवराज होता (३-०-१९-१).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरोबर आहे गुरुजी

बेकार तरुण
Tue, 03/29/2016 - 13:59 नवीन
बरोबर आहे गुरुजी ह्या सीरीज मधे नेहरा चांगली गोलंदाजी करत आहे, वादच नाही. तरीही ३५ - ३६ व्या वर्षी कमबॅक करणं नक्कीच सोपं नाह/, तेही मधले काही वर्ष ईंटरनॅशनल क्रिकेटसाठी विचार पण न केला गेलेला खेळाडु असताना ! पण का कोणजाणे, तो कधीच भरवश्याचा वाटत नाही!! युवी च्या जागी मनिष पांडे हे लॉजिक काही कळत नाही. पण बहुधा १५ च्या संघात म्हणुन बोलवला असावा. आणि रहाणेलाच खेळायला संधी मिळावी ही एक क्रिकेटप्रेमी म्हणुन अधिक आणि एक मराठी माणुस म्हणुन थोडीशी ईच्छा :) गेल च काही सांगता येत नाही, त्याचा दिवस असेल तर तो कोणालाही फोडुन काढतो, आणि नसेल तर कोणालाही फार त्रास न देता तंबुत परत येतो (डावखुरा विरु???). गुरुवारी त्याचा दिवस नसावा अशी अपेक्षा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यातून तो आता १४० च्या आसपास

अद्द्या
Wed, 03/30/2016 - 10:56 नवीन
त्यातून तो आता १४० च्या आसपास वेगाने टाकतोय , "तरुण " असताना कसाबसा १३० पार करायचा . रिवैटल चा डोस जास्ती झालाय बहुदा . पण तरीही. तो वासरात लंगडी गाय शहाणी सारखा प्रकार वाटतोय. बुमरा योर्कर टाकू शकतो चांगले. पण ते तो फक्त शेवटच्या षटकातच का वापरतो हे त्यालाच माहित , पंड्या कैच्याकाय टाकतो. काहीच अर्थ नाही त्याच्या गोलंदाजीला , क्षेत्ररक्षण जबराट आहे त्याचं खरं. राहिला अश्विन. हि सिरीज भारतात चालले म्हणून हा हि चाललाय. राहणे सारखा फलंदाज बाहेर बसवून काय मिळतंय देव जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नाही सर, अस काही होणार नाही .

पक्षी
Tue, 03/29/2016 - 11:08 नवीन
नाही सर, अस काही होणार नाही .... गेल जरी चांगला hitter असला तरी त्याच्या काही मर्यादा आहेत, ज्या धोनी exploit करेल. गेल खूपच clumsy आहे, मागचा पाय जमिनीत गाडून batting करतो. त्याचा "wait n watch" game असतो. त्याच्या comfort zone मधले गोलंदाज(फिरकी) शोधतो आणि धुलाई करतो. माझ्या अंदाज नुसार बुमरा/अश्विन/नेहरा हे गेल ला रोखू शकतील. गेल जडेजा आणि युवी ची धुलाई करू शकतो, ह्यांना गेल समोर आणणे म्हणजे वाघा समोर शेळी सोडण्या सारखं आहे.
  • Log in or register to post comments

जखमी

viraj thale
Tue, 03/29/2016 - 13:30 नवीन
जखमी युवराज च्या जागी पांडे येणार म्हणजे रहाणे ला चान्स नाहीच .
  • Log in or register to post comments

सगळ्यांनीच कशाला चांगल

राहूल.
Tue, 03/29/2016 - 15:57 नवीन
सगळ्यांनीच कशाला चांगल खेळायला हव या विचाराने संघ चालला आहे . बाकीचे येणा-या सामन्यांमधे चांगले खेळतील . आणि तेही नाही जमल तर IPL आहेच की , तिथ बघा कसा सगळ्यांना सूर सापडतो आहे .
  • Log in or register to post comments

रेदिफ वर सारखे सांगतायत की

असंका
Wed, 03/30/2016 - 19:25 नवीन
रेदिफ वर सारखे सांगतायत की कायद्यानुसार अपडेट्स थोडे उशिरा दिले जात आहेत. हे थोडे म्हणजे किती उशिरा असतं?
  • Log in or register to post comments

2-5 minit

अद्द्या
Wed, 03/30/2016 - 22:02 नवीन
2-5 minit
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

१ बॉल उशिरा

भाते
गुरुवार, 03/31/2016 - 09:33 नवीन
स्पॉट फिक्सिंग / बेटिंग रोखण्यासाठी कायद्यानुसार अपडेट १ बॉल उशिरा दिल्या जातात असे मागे इएसपीएन क्रिक इन्फोवर वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

स्पॉट फिक्सिंग / बेटिंग रोखण्यासाठी नव्हे..

तुषार काळभोर
गुरुवार, 03/31/2016 - 16:11 नवीन
बीसीसीआयने बंदी घातली आहे. 'लाईव्ह' अपडेट्स्/क्षणचित्रे फक्त त्यांनी परवाना दिलेल्या वाहिन्यांवर मिळावेत म्हणून. टीव्हीवरील बातम्यांमध्ये सुद्धा फक्त फोटो दाखवले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

New Zealand 153/8

मोहनराव
Wed, 03/30/2016 - 20:41 नवीन
New Zealand 153/8 १० ओव्हरपर्यत चांगले खेळ्त होते.
  • Log in or register to post comments

तो रॉय धू धू धूतोय.

जव्हेरगंज
Wed, 03/30/2016 - 21:33 नवीन
तो रॉय धू धू धूतोय. फायनलात इंग्लंडच गाठ हाय म्हणायचं आपल्याशी !
  • Log in or register to post comments

चक्क हॅट ट्रिक

शाम भागवत
Wed, 03/30/2016 - 21:49 नवीन
फिरकी चालू झाली नी.... चक्क हॅट ट्रिक
  • Log in or register to post comments

शेवटी इंग्लंड सहज जिंकले.

श्रीगुरुजी
Wed, 03/30/2016 - 22:19 नवीन
शेवटी इंग्लंड सहज जिंकले. किवीजची १० षटकात १ बाद ८९ अशी मजबूत स्थिती होती. परंतु त्यांची मधली फळी पूर्ण अपयशी ठरल्याने उर्वरीत १० षटकात तब्बल ७ गडी गमावून जेमतेम ६४ धावा झाल्या. या खेळपट्टीवर १५३ धावा पुरेश्या नव्हत्या. खरं तर १८० धावा सुद्धा पुरेश्या ठरल्या नसत्या. इंग्लंडला रॉय आणि हेल्स ही सलामीची चांगली जोडी मिळाली आहे. नंतर जो रूट व बटलर आहेतच. त्याव्यतिरिक्त मोईन अली व बेन स्टोक्स हे देखील चांगले फलंदाज आहेत. कप्तान मॉर्गन अपयशी आहे. परंतु इतर १० जण चांगले खेळत आहेत. आपण अंतिम फेरीत आलो तर इंग्लंड आपल्याला नक्कीच जड जाईल. मी सुरवातीला इंग्लंडला खिजगणतीतही धरत नव्हतो. परंतु उत्तम सांघिक खेळामुळे ते अंतिम फेरीत पोहोचले आहेत. किवीज हरल्यामुळे वाईट वाटले. परंतु सर्वोत्तम खेळ करणारा संघच जिंकतो व आज इंग्लडने सर्व आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ केला.
  • Log in or register to post comments

धवन च्या जागी रहाणे येणार

viraj thale
Wed, 03/30/2016 - 22:59 नवीन
abpnews.abplive.in/sports/rahane-and-pandey-will-play-semi-final-for-team-india-351118/
  • Log in or register to post comments

कचराच केला काल किवीजचा !!!

बेकार तरुण
गुरुवार, 03/31/2016 - 07:35 नवीन
कचराच केला काल किवीजचा !!! रॉस टेलर एके काळी उत्तर फलंदाजांच्या यादीत यायचा, पण आता त्याचा अगदीच शिखर धवन झाला आहे असं वाटतं आहे !! भरवश्याचा असा अजिबात राहिलेला नाही ! २०११ वर्ल्ड कप (नक्की ना?) मधे पाकींना धुवुन काढलेलं शेवटच आठवत आहे त्यानी, नंतर बहुतेक तरि काहीच खेळलेला नाही उल्लेखनीय आज होप सो आपण विंडीजना हरवु, रच्याकने - पोलार्ड का खेळत नाहिये? (जखमी आहे का नेहमीचीच भांडणे??)
  • Log in or register to post comments

रॉस टेलरला काही वर्षांपूर्वी

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/31/2016 - 11:19 नवीन
रॉस टेलरला काही वर्षांपूर्वी कप्तानपदावरून हटविल्यापासून तो रुसलेलाच आहे. त्या रूसव्याचा त्याच्या खेळावर परीणाम झाला आहे. त्याच्याकडे कसोटीचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले होते. परंतु एकदिवसीय सामन्यांसाठी मॅकलमला कर्णधार केल्यावर तो रागारागाने विंडीजच्या दौर्‍यावर गेलाच नाही व त्याने कसोटी कर्णधारपद देखील नाकारले. डिसेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात त्याने २९० धावांची जबरदस्त खेळी खेळली होती. त्यानंतर तो बहुतेक सर्व सामन्यात अपयशी आहे. तो अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पण सध्या मैदानावर तो अत्यंत निरूत्साही दिसतो. त्याचा खेळ एकेकाळी मला खूप आवडायचा. आता त्याची अवस्था बघवत नाही. २००१ च्या विश्वचषकात पाकड्यांविरूद्ध न्यूझीलंडची अवस्था ४६ षटकात २१० अशी फारशी चांगली नव्हती. पण शेवटच्या ४ षटकात त्याने साऊदीला हाताशी घेऊन तब्बल ९५ धावा चोपल्या होत्या. त्यात उमर गुलची प्रचंड धुलाई झाली होती. असा डाव तो नंतर क्वचितच खेळताना दिसला. तो बहुतेक लवकरच निवृत्त होईल असे वाटते. >>> आज होप सो आपण विंडीजना हरवु, रच्याकने - पोलार्ड का खेळत नाहिये? (जखमी आहे का नेहमीचीच भांडणे??) पोलार्ड, मलिंगा इ. मंडळी आयपीएल साठी स्वतःला तंदुरूस्त ठेवत आहेत. म्हणूनच ते या स्पर्धेत खेळत नाहीत. चुकुनमाकुन या स्पर्धेत खेळताना जखमी झाले तर आयपीएल बुडायचे. म्हणून आजारी असल्याचा बहाणा करून ते स्पर्धेच्या बाहेर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण

ओह ओके

बेकार तरुण
गुरुवार, 03/31/2016 - 11:27 नवीन
ओह ओके हापुसचे आंबे आहेत म्हणजे पोलार्ड आणि मलिंगा. एप्रिल आणि मे मधे फक्त फळणार, बाकी दहा महिने नाही!! असल्या लोकांचा रागहि येतो, पण एवढा पैसा मिळत असेल तर आपण स्वतः कसे वागलो असतो हे ठरवणेहि मुश्कीलच आहे !!! कारण माझ्या माहितीनुसार लंकेच्या खेळाडुंना मागील काही वर्षापासुनचे वेतन मिळाले नव्हते आणि विंडीज बद्दल तर बोलायलाच नको !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तेही बरोबर आहे. त्यांच्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/31/2016 - 11:36 नवीन
तेही बरोबर आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते खूप काही चुकीचे करीत आहेत असे म्हणता येणार नाही. कायदेशीर मार्गाने पैसा मिळत असेल तर तो का नाकारावा? भारताचा मुष्टीयोद्धा विजेंद्रकुमारही आता व्यावसायिक खेळाडू बनला आहे. त्यामुळे तो २०१६ च्या ऑलिम्पिक मध्ये नसेल. तसाच विचार पोलार्ड व मलिंगाही करत असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण

ट-२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/31/2016 - 11:21 नवीन
ट-२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच कोणत्यातरी एका संघाला दुसर्‍यांदा विश्वकरंडक उचाविण्याची संधी आहे. इंग्लंडचा कालचा खेळ बघून यावेळी बहुतेक इंग्लंड विजयी होतील असं वाटत आहे.
  • Log in or register to post comments

विंडीजविरूद्ध आपली प्रथम

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/31/2016 - 18:52 नवीन
विंडीजविरूद्ध आपली प्रथम फलंदाजी आहे. विंडीज पाठलाग करणार असल्याने किमान २०० धावा तरी हव्यात. धवनच्या जागी रहाणे व युवराजच्या जागी मनीष पांडे आत आलाय. मला सारखं असं फीलिंग येतंय की अंतिम सामना विंडीज व इंग्लंड यांच्यात होऊन इंग्लंड जिंकेल. बघूया काय होतंय ते.
  • Log in or register to post comments

. मला सारखं असं फीलिंग येतंय

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 03/31/2016 - 19:00 नवीन
. मला सारखं असं फीलिंग येतंय की अंतिम सामना विंडीज व इंग्लंड यांच्यात होऊन इंग्लंड जिंकेल.
तुमच्या तोंडात शेपूचा रस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काय राव गुर्जी!!

प्रदीप साळुंखे
गुरुवार, 03/31/2016 - 21:55 नवीन
काय राव गुर्जी!! धागाकर्तेच नकारात्मक बोलत असतील तर आम्ही काय करावे ब्रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

टीम इंडिया चांगलं खेळतय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2016 - 19:24 नवीन
३५-० पाच ओव्हर्स. धवन आणि युवी ला बसवलं मला खुप आनन्द झाला. १९० होतीलच. फ्री हिट वर सिक्स काय अफलातून मारलाय रोहितने . क्लास. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जरा स्कोर बरा वाटला की

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2016 - 19:41 नवीन
गेली विकेट.७६/१. जम बसलेला खेळाडू lbw व्हावा हे मला पटत नाही. चेंडूवर नजर बसलेली असते तसाही चेंडू टप्पा पडल्यावर लेगला जात होता फेव्हर मध्ये द्यायला पाहिजे होतं डिसिजन. . नाऊ विराट :) वाचला रन आऊट होता होता. दोन्हीकडून वाचला. अरे फोकलच्या हो तुमच्यावर भरवसा आहे. भाऊ जास्त आक्रमक पणा नको दाखवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जरा स्कोर बरा वाटला की

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2016 - 19:48 नवीन
गेली विकेट.७६/१. जम बसलेला खेळाडू lbw व्हावा हे मला पटत नाही. चेंडूवर नजर बसलेली असते तसाही चेंडू टप्पा पडल्यावर लेगला जात होता फेव्हर मध्ये द्यायला पाहिजे होतं डिसिजन. . नाऊ विराट :) वाचला रन आऊट होता होता. दोन्हीकडून वाचला. अरे फोकलच्या हो तुमच्यावर भरवसा आहे. भाऊ जास्त आक्रमक पणा नको दाखवू. शेवटच्या १० ओव्हर्स राहिल्या १०० अपेक्षित. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत -205

viraj thale
गुरुवार, 03/31/2016 - 19:36 नवीन
भारत -205 वेस्ट इंडीज-178 all out
  • Log in or register to post comments

??????????

दिग्विजय भोसले
गुरुवार, 03/31/2016 - 19:49 नवीन
हे काय???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale

prediction

viraj thale
गुरुवार, 03/31/2016 - 20:09 नवीन
prediction
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले

१९२/२

राघवेंद्र
गुरुवार, 03/31/2016 - 20:42 नवीन
थोडक्यात चुकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale

prediction

viraj thale
गुरुवार, 03/31/2016 - 21:28 नवीन
माझे prediction चूकले असले तरी ट्विटर वर असलेल्य @aslamkhantanoli या माणसाने भारताचा स्कोर 192 परफेक्ट सांगितला होता तोही सामना सुरू होण्याच्या चार तास आधी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

बॅटिंग पिच आहे,त्यामुळे थोडी

दिग्विजय भोसले
गुरुवार, 03/31/2016 - 19:52 नवीन
बॅटिंग पिच आहे,त्यामुळे थोडी चिंता वाटत आहे,त्यांचे 9 जण बॅटिंग करतात.
  • Log in or register to post comments

१९२ स्कोर अजून ८ हवे होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2016 - 20:45 नवीन
गेल आणि स्यामुल गेले लवकर बाद झाले पाहिजे तर सामना आपला. सुरुवात ते हानामारीने करतील आणि भारतीय तंबूत घबराट उडवतील असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हाण तू!!!!

दिग्विजय भोसले
गुरुवार, 03/31/2016 - 21:03 नवीन
हे धतडततडधतडततड बुमराहनं गेलला केलं गुमराह!!!!
  • Log in or register to post comments

Samuels पण गेला.

राघवेंद्र
गुरुवार, 03/31/2016 - 21:14 नवीन
धतडततडधतडततड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले

ते गेलं आलं

जव्हेरगंज
गुरुवार, 03/31/2016 - 21:23 नवीन
ते गेलं आलं आन आल्या आल्या गेलं जिकलीच कि रे! विंढीज १००च्या आत गाश्या गुंढाळणार !
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2016 - 21:34 नवीन
हो आता जिंकलो असं म्हणू या. लेकिन क्रिकेट मे भविष्यवानी करना..... हा फोकलीचा सिमन्स किती झुंजनार आहे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

घाई करू नये!

प्रदीप साळुंखे
गुरुवार, 03/31/2016 - 21:53 नवीन
घाई करू नये! 104/2 --- 12 ओवर्स जोडी चांगली जमलीये,विकेटांची आवश्यकता आहे,नायतर काय खरं नाय,धागा आजच गुंडाळावा लागेल:'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:-(

पक्षी
Fri, 04/01/2016 - 11:41 नवीन
धागा आजच गुंडाळावा लागेल:'(
गुंडाळा धागा आता -:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे

अरे व्वा कोहलीने विकेट घेतली,

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 03/31/2016 - 21:59 नवीन
अरे व्वा कोहलीने विकेट घेतली, पण धोका अजून नाॅट टळींग! ऑलआऊट करणं गरजेचं!
  • Log in or register to post comments

सोपा म्याच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2016 - 22:01 नवीन
सोपा म्याच अवघड होत चालला आहे. गेल लवकर बाद झाला पण चार्ल्स आणि सिमन्स यांनी भारतीयाचे तोंडचे पाणी पळवले होते बदली विराट ने चार्ल्स ची विकेट घेतली आणि म्याच परत आणला असे वाटते
  • Log in or register to post comments

हे आवाज वाढवनो बाॅल

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 03/31/2016 - 22:07 नवीन
हे आवाज वाढव नो बाॅल तुज्या आईची!!!
  • Log in or register to post comments

पंड्या

viraj thale
गुरुवार, 03/31/2016 - 22:08 नवीन
तुझ्या ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा