क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान
गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते)
गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो.
२००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत.
१) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता
२) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता
३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता
४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता
५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता
६) २०१४ - ?
आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला).
एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही.
यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत.
माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल.
स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.
१) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड
२) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान
३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज
४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका
५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका
७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान
८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका
९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज
१०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान
११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान
१२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड
१३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान
१४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
१५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज
१६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान
१७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका
१८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज
१९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया
२०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका
______________________________________________________________________
२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना
२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना
______________________________________________________________________२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना
______________________________________________________________________वर्गीकरण
वाचने
26012
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुरुजी
हो. ती चूक धागा प्रकाशित
In reply to गुरुजी by viraj thale
अंदाज पंचे
वरील विश्लेषण बरेचसे बरोबर
In reply to अंदाज पंचे by तुषार काळभोर
क्रिकेट पहिल्या सारखा खेळ
१००
तमीम इक्बाल गेल्या काही
In reply to १०० by कपिलमुनी
काल हॉलंड वि. आयर्लॅड मॅच
↓
द.अफ्रिकेचा तर गाशा
In reply to ↓ by चेक आणि मेट
\/ VICTORY
In reply to द.अफ्रिकेचा तर गाशा by चेक आणि मेट
गोली से डर नही लगता,मगर कोहली से लगता है|
अंदाज चुकला,भारतसुद्धा बाहेर
In reply to द.अफ्रिकेचा तर गाशा by चेक आणि मेट
१५ मार्च ते ३ एप्रिल याच
बांगलादेश ला नजर अन्दाज करुन
या स्पर्धेच्या निमित्ताने
Once a minnow always a minnow
आजच्या सराव सामन्यात इंग्लंड
í ½í°£
आज न्युझीलंड कोहली आणि कं ला
आज ७:३० वाजता भारत वि.
न्यूझीलंडविरूद्धची पराभवाची
भारताचा दणदणीत पराभव केलेल्या
गुरुजी कांगारु हरले
In reply to भारताचा दणदणीत पराभव केलेल्या by श्रीगुरुजी
२०-२० षटकांचे सामने असतात
न्युझीलन्ड विजायी
उपांत्य फेरी
इंग्लंडचे लक्ष्य २३०.
उद्या
Proteas gangbanged Poms!
.... And now its payback time
In reply to Proteas gangbanged Poms! by स्पार्टाकस
द.अफ्रिका vs इंग्लंड
खत्तरनाक पाठलाग चाललाय दोनशेतिसाचा
आ.धा. ११ च्या आत हवं होतं.
In reply to खत्तरनाक पाठलाग चाललाय दोनशेतिसाचा by गामा पैलवान
१५ व्या षटकाअखेरीस ...
भलताच अटीतटीचा सामना चालु आहे
इसकू बोलते म्याच
अफ्रिकेचा धुव्वा
अहाहा,
नक्की काय चाललंय हे ?
अली नाही विली बाद!
In reply to नक्की काय चाललंय हे ? by गामा पैलवान
अली नाही विली बाद!
In reply to नक्की काय चाललंय हे ? by गामा पैलवान
जिंकले एकदाचे!
चोकर्स चोकले!
काल दोन्ही अंदाज चुकले.
महिलांचा भारत वि. पाकिस्तान
काल या धाग्यावर कोणीच
पुढील सामन्यात या तिघांपैकी
तो धवन लय बोअर कराय लागलाय
In reply to पुढील सामन्यात या तिघांपैकी by पक्षी
बाकी कालचा विजय भारताचा नसून
In reply to तो धवन लय बोअर कराय लागलाय by जव्हेरगंज
कोहली, जो रूट आणि स्टीव्ह
आफ्रिकेची इंग्लंडकडून झालेली
आफ्रिका व विंडीजने आपापले
पाकडे न्यूझीलंडकडून सुद्धा
मला एक कळत नाही..पाकिस्तान च
In reply to पाकडे न्यूझीलंडकडून सुद्धा by श्रीगुरुजी
न्यूझीलंड ३ सामने जिंकून
In reply to मला एक कळत नाही..पाकिस्तान च by चिनार
bangladesh
रहाणे ला का बाहेर ठेवलय
धोनी चा रहाणे वर वैयक्तिक राग
+११
In reply to धोनी चा रहाणे वर वैयक्तिक राग by viraj thale
इंग्लंडने अफगाणिस्तानला हरवून
What a win!!
हुर्रेर्रेर्रेद्फ्गह्ज्फद्स्स
In reply to What a win!! by चांदणे संदीप
काल जोरदार (नशीबाने??)
धोनी
हम्म
पंड्या!
पंडोबा
In reply to पंड्या! by तुषार काळभोर
सहमत
काय जबरदस्त सामना झाला. फारा
बुमराहची कामगिरी
In reply to काय जबरदस्त सामना झाला. फारा by श्रीगुरुजी