क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान
गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते)
गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो.
२००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत.
१) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता
२) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता
३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता
४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता
५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता
६) २०१४ - ?
आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला).
एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही.
यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत.
माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल.
स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.
१) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड
२) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान
३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज
४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका
५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका
७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान
८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका
९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज
१०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान
११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान
१२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड
१३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान
१४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
१५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज
१६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान
१७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका
१८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज
१९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया
२०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका
______________________________________________________________________
२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना
२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना
______________________________________________________________________२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना
______________________________________________________________________वर्गीकरण
वाचने
26012
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
निदान पुढच्या सामन्यात तरी युवराजच्या जागी रहाणेला आणावे.
In reply to काय जबरदस्त सामना झाला. फारा by श्रीगुरुजी
ऑसीज
आता ब गटात उपांत्य फेरीचा
आज ३ वाजता ऑसीज वि. पाकडे हा
↓
आनंदी आनंद
आता रविवारी ऑसीज व भारतातला
न्यूझीलंड
बांगला २०१४ च्या
'अ' गटात आज चक्क विंडीज
सलामी
4 गोलंदाज आणि कोहली इतकीच
जीतम! जीतम!! जीतम!!!
धोनी
जीतम! जीतम!! जीतम!!!
कोहली
कोहली ची इन्निंग्स कमाल होती
धवन-रोहित-रैना
धोनीच्या नशिबावर किती अवलंबून राहणार?
हम्म
In reply to धोनीच्या नशिबावर किती अवलंबून राहणार? by एक सामान्य मानव
मॅच संपल्यावर कोहली मैदानावरच
येस ! मला ते पाहुन २०११
In reply to मॅच संपल्यावर कोहली मैदानावरच by असंका
निव्वळ कोहलीमुळे जिंकलो.
रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा.
In reply to निव्वळ कोहलीमुळे जिंकलो. by श्रीगुरुजी
हहपुवा
In reply to रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा. by असंका
विराटने अफलातून फलंदाजी केली
२००७ च्या पहिल्या विश्वचषक
काल खुप दिवसानंतर...
भारत विरूद्ध न्यूझीलंड
हे बघा आपण काल कसं तरी कन्हत कन्हत जिंकलो.
In reply to भारत विरूद्ध न्यूझीलंड by बोका-ए-आझम
तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी
In reply to हे बघा आपण काल कसं तरी कन्हत कन्हत जिंकलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरी
In reply to तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी by असंका
क्यू आमच्या धाग्यावर येनेसे
In reply to तरी by नाखु
त्ये
In reply to क्यू आमच्या धाग्यावर येनेसे by DEADPOOL
ओके
In reply to त्ये by नाखु
आणि कधीमधी चक्कर टाकायला
In reply to ओके by DEADPOOL
चालेल
In reply to आणि कधीमधी चक्कर टाकायला by DEADPOOL
तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी
In reply to हे बघा आपण काल कसं तरी कन्हत कन्हत जिंकलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर आहे गुरुजी
In reply to तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी by श्रीगुरुजी
त्यातून तो आता १४० च्या आसपास
In reply to तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी by श्रीगुरुजी
नाही सर, अस काही होणार नाही .
जखमी
सगळ्यांनीच कशाला चांगल
रेदिफ वर सारखे सांगतायत की
2-5 minit
In reply to रेदिफ वर सारखे सांगतायत की by असंका
१ बॉल उशिरा
In reply to रेदिफ वर सारखे सांगतायत की by असंका
स्पॉट फिक्सिंग / बेटिंग रोखण्यासाठी नव्हे..
In reply to १ बॉल उशिरा by भाते
New Zealand 153/8
तो रॉय धू धू धूतोय.
चक्क हॅट ट्रिक
शेवटी इंग्लंड सहज जिंकले.
धवन च्या जागी रहाणे येणार
कचराच केला काल किवीजचा !!!
रॉस टेलरला काही वर्षांपूर्वी
In reply to कचराच केला काल किवीजचा !!! by बेकार तरुण
ओह ओके
In reply to रॉस टेलरला काही वर्षांपूर्वी by श्रीगुरुजी
तेही बरोबर आहे. त्यांच्या
In reply to ओह ओके by बेकार तरुण
ट-२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच
विंडीजविरूद्ध आपली प्रथम
. मला सारखं असं फीलिंग येतंय
In reply to विंडीजविरूद्ध आपली प्रथम by श्रीगुरुजी
काय राव गुर्जी!!
In reply to विंडीजविरूद्ध आपली प्रथम by श्रीगुरुजी
टीम इंडिया चांगलं खेळतय
जरा स्कोर बरा वाटला की
In reply to टीम इंडिया चांगलं खेळतय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जरा स्कोर बरा वाटला की
In reply to टीम इंडिया चांगलं खेळतय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत -205
??????????
In reply to भारत -205 by viraj thale
prediction
In reply to ?????????? by दिग्विजय भोसले
१९२/२
In reply to prediction by viraj thale
prediction
In reply to १९२/२ by राघवेंद्र
बॅटिंग पिच आहे,त्यामुळे थोडी
१९२ स्कोर अजून ८ हवे होते.