✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

६ वी क्रिकेट ट-२० विश्वचषक स्पर्धा - २०१६

श
श्रीगुरुजी यांनी
Sun, 03/13/2016 - 15:15  ·  लेख
लेख
क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत. गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते) गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो. २००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत. १) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता २) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता ३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता ४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता ५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता ६) २०१४ - ? आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला). एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही. यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत. माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल. स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे. १) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड २) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान ३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज ४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका ५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड ६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका ७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान ८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका ९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज १०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान ११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान १२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड १३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान १४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान १५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज १६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान १७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका १८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज १९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया २०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका ______________________________________________________________________

२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना

२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना

______________________________________________________________________

२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना

______________________________________________________________________
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25952 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

आफ्रिकेची इंग्लंडकडून झालेली

श्रीगुरुजी
Sun, 03/20/2016 - 18:09 नवीन
आफ्रिकेची इंग्लंडकडून झालेली धुलाई अफगाणिस्तानविरूद्ध देखील सुरू राहिली. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करून २०९ धावा केल्यावर अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक शाहजाद याने रबाडाच्या पहिल्या षटकात १ चौकार व १ षटकार मारून ११ धावा केल्या. नंतर डावाच्या दुसर्‍या व अ‍ॅबॉटच्या पहिल्या षटकात ३ षटकार व १ चौकार मारून २२ धावा केल्या. नंतर डावाच्या तिसर्‍या षटकात रबाडाला १ चौकार व १ षटकार मारून १४ धावा केल्या. पहिल्या ३ षटकानंतर अफगाणिस्तान नाबाद ४७ अशा भक्कम अवस्थेत होते. परंतु नंतर ४ थ्या षटकात मॉरिसने शाहजादचा त्रिफळा उडविल्यावर वेग कमी झाला. शाहजादने ५ षटकार व ३ चौकार मारून केवळ १९ चेंडूत ४४ धावा करून आफ्रिकेला हादरा दिला. आता अफगाणिस्तानला उर्वरीत २० चेंडूत ५४ धावा हव्या असून ५ गडी बाद झाले आहेत. आफ्रिका विजयाच्या मार्गावर आहे.
  • Log in or register to post comments

आफ्रिका व विंडीजने आपापले

श्रीगुरुजी
Sun, 03/20/2016 - 23:30 नवीन
आफ्रिका व विंडीजने आपापले सामने जिंकले. आता गटात विंडीज पहिल्या क्रमांकावर व आफ्रिका दुसर्‍या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान बाहेर गेल्यातच जमा आहे. उद्या संध्याकाळी ७:३० वाजता ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश हा सामना आहे. दोघेही आपला पहिला सामना हरलेले असल्यामुळे उद्या दोघांपैकी जो हरेल त्याचे आव्हान बहुतेक संपुष्टात येईल.
  • Log in or register to post comments

पाकडे न्यूझीलंडकडून सुद्धा

श्रीगुरुजी
Wed, 03/23/2016 - 12:55 नवीन
पाकडे न्यूझीलंडकडून सुद्धा हरले. शेवटी आफ्रिदीचा पडलेला चेहरा बघवत नव्हता. आता ब गटात प्रचंड चुरस आहे. न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत. उर्वरीत चारही संघांना अजूनही संधी आहे. भारताने निव्वळ धावगतीत खूप मार खाल्ला आहे. भारताला कोणत्याही परिस्थिती उर्वरीत २ सामने जिंकावेच लागतील. दोनपैकी एकही सामना हरला तर भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल. अ गटात अफगाणिस्तान आधीच बाहेर पडला आहे. उर्वरीत ४ संघात चुरस आहे. आज दुपारी ३ वाजता अफगाणिस्तान वि. इंग्लंड हा सामना आहे. हा सामना इंग्लंड हरले तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. संध्याकाळी ७:३० वाजता भारत वि. बांगलादेश हा सामना आहे. हा सामना बांगलादेश हरला तर त्यांचे आव्हान पूर्ण संपेल. भारत हरला तर उर्वरीत सामन्यांवर भारताचे आव्हान अवलंबून राहील.
  • Log in or register to post comments

मला एक कळत नाही..पाकिस्तान च

चिनार
Wed, 03/23/2016 - 14:21 नवीन
मला एक कळत नाही..पाकिस्तान च आव्हान अजूनही शाबूत आहे. हे कसं शक्य आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

न्यूझीलंड ३ सामने जिंकून

श्रीगुरुजी
Wed, 03/23/2016 - 14:38 नवीन
न्यूझीलंड ३ सामने जिंकून प्रथम क्रमांकावर आहे. भारत व ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी २ सामने खेळले असून १ विजय व १ हार अशी स्थिती आहे. पाकडे ३ सामने खेळले असून १ विजय व २ पराभव अशी स्थिती आहे. बांगलादेश २ सामने खेळला असून दोन्ही हरले आहेत. पाकड्यांची निव्वळ धावगती (+०.२५४) ऑस्ट्रेलिया (+०.१०८) व भारतापेक्षा (-०.८९५) चांगली असल्याने सध्या ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत. पाकड्यांचा ऑस्ट्रेलियाशी सामना शिल्लक आहे. भारताचे ऑस्ट्रेलिया व बांगला असे दोन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाचे भारत व पाकिस्तान हे दोन सामने शिल्लक आहेत. बांगलाचे भारत व न्यूझीलंड हे दोन सामने शिल्लक आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, बांगला व पाकडे या चारपैकी कोणत्याही २ देशांनी प्रत्येकी २ विजय मिळविले तर उपांत्य फेरीसाठी दुसरा संघ निव्वळ धावगतीवर ठरेल. त्यामुळे पाकड्यांना अजूनही संधी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

bangladesh

viraj thale
Wed, 03/23/2016 - 14:10 नवीन
भारताला बंगलादेशला मोठ्या फरकाने हरवावे लागेल .
  • Log in or register to post comments

रहाणे ला का बाहेर ठेवलय

स्पा
Wed, 03/23/2016 - 14:54 नवीन
रहाणे ला का बाहेर ठेवलय अजूनही कळत नाहीये, कोहली नंतरचा टेक्निकली साउंड प्लेयर म्हणून त्याचाच नंबर लागेल. धवन, रोहीत, हार्दिक, रॆना उगाचच आहेत, यांच्या पेक्षा ही अनेक टॅलेंटेड खेळाडु बाहेर वाट पहात बसलेत, शिखर धवन सारखे नशिब कोणाचेही नसेल, तो का टिम मध्ये आहे हे अजूनही न सुटलेले कोडे आहे
  • Log in or register to post comments

धोनी चा रहाणे वर वैयक्तिक राग

viraj thale
Wed, 03/23/2016 - 15:02 नवीन
धोनी चा रहाणे वर वैयक्तिक राग आहे त्यामुळे काहींना काही कारण सांगून रहाणे ला संघाबाहेर ठेवत आहे त्यामुळे तो सारखा पंड्या ला प्रमोट करत असतो .
  • Log in or register to post comments

+११

नाखु
Wed, 03/23/2016 - 15:12 नवीन
जाणुन बुजून त्याचा फलंदाजी क्रमांकही अस्थिर ठेवलाय "मानाचा (चेसुकीचा) जडेजा आणि पंड्या याला हक्काची जागा दिलीय पण युवीला बळीच बकरा बन्वून रहाणेला घेण्याचा डाव दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale

इंग्लंडने अफगाणिस्तानला हरवून

श्रीगुरुजी
Wed, 03/23/2016 - 19:20 नवीन
इंग्लंडने अफगाणिस्तानला हरवून गटात दुसरे स्थान मिळविले आहे. त्या गटातून विंडीज, इंग्लंड व द. आफ्रिका यांपैकीच दोन संघ उपांत्य फेरीत येण्याची शक्यता आहे. श्रीलंकेची निव्वळ धावगती खूप कमी असल्याने त्यांना खूपच कमी संधी आहे. भारत वि. बांगला सामन्यात बांगलाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली आहे. आजही रहाणेला घेतलेले नाही. मागील संघच कायम आहे.
  • Log in or register to post comments

What a win!!

चांदणे संदीप
Wed, 03/23/2016 - 23:36 नवीन
Memorable ओने! लौ यू टीम इंडिया! लौ यू धोनी! हुर्रेर्रेर्रेद्फ्गह्ज्फद्स्सघ्नन्ह्दर्त्ग्येस्झ्बन्न्कक्ज्क्कुद (हे परत बोलताच काय लिहिता पण येणार नै) आनंदाने वेडा झालेला! Sandy
  • Log in or register to post comments

हुर्रेर्रेर्रेद्फ्गह्ज्फद्स्स

DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 15:27 नवीन
हुर्रेर्रेर्रेद्फ्गह्ज्फद्स्सघ्नन्ह्दर्त्ग्येस्झ्बन्न्कक्ज्क्कुद हे बघा मी लीवल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

काल जोरदार (नशीबाने??)

बेकार तरुण
गुरुवार, 03/24/2016 - 08:51 नवीन
काल जोरदार (नशीबाने??) जिंकली मॅच रहाणेला आता खरच खेळवला पाहिजे. आणी युवराजला अजिबात गोलंदाजी का मिळत नाही हे कळत नाही.
  • Log in or register to post comments

धोनी

तिमा
गुरुवार, 03/24/2016 - 09:13 नवीन
बांगलादेशाच्या विजयात धोनी हाच मोठा अडसर ठरला. धोनीसारखा कप्तान अफगाणिस्तानला मिळाला असता तर काल ते इंग्लंड विरुद्ध आरामात जिंकले असते.
  • Log in or register to post comments

हम्म

बेकार तरुण
गुरुवार, 03/24/2016 - 10:38 नवीन
हम्म एक मात्र आहे, टेस्ट मधुन रिटायर झाल्यापासुन धोनीने कीपींगवर अफाट मेहनत घेतली असावी. आधीपासुन तो चांगलाच कीपर आहे, पण आता तो फारच उत्तम कीपींग करतो आहे. खासकरुन स्पिनर्सच्या बॉलिंगला स्टम्पिंग, अफलातुन !!
  • Log in or register to post comments

पंड्या!

तुषार काळभोर
गुरुवार, 03/24/2016 - 12:58 नवीन
हार्दिक पंड्याच्या शेवटच्या षटकात मॅच गेलीच होती. तीनमध्ये दोन रन लईच किरकोळ होतं. ती मॅच केवळ धोनीच्या नशीबाने जिंकली असं म्हणावं लागेल. आज सकाळी 'माझा'वर पंड्याच्या घरी कसं उत्सवी वातावरण होतं, वगैरे दाखवत होते. तर तो 'पत्रकार' पंड्याच्या भावाला भारतीय संघाविषयी तुला काय वाटतं हे विचारत होता. मॅच पंड्यामुळेच गमावल्यात जमा होती, आणि तिला परत खेचून आणण्यात त्याचा वाटा (२ विकेट असल्या तरी) 'नोबॉल टाकला नाही' इतपतच होता. कारण चौथ्या व पाचव्या बॉलवर उडालेले झेल पंड्याच्या गोलंदाजी कौशल्यामुळे नाही तर त्या दोघा बॅट्समननी मुर्खपणा केल्यामुळे होते. तर शेवटच्या बॉलवर झालेला रनआउट हा धोनीचा होता.
  • Log in or register to post comments

पंडोबा

इरसाल
Mon, 03/28/2016 - 10:45 नवीन
घरापासुन पायी ५ मि.च्या अंतरावर रहातात. त्यादिवशीच्या त्याच्या ओव्हरनंतर काय फटाके फुटले विचारुच नका. आता आला बडोद्यात की जावुन भेटावे म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सहमत

सुमीत भातखंडे
गुरुवार, 03/24/2016 - 13:26 नवीन
आहे. फलंदाजांनी मारलेले ढिसाळ शॉट्स आणि धोनीचं अप्रतिम यष्टीरक्षण यामुळेच ही मॅच जिंकलो. शेवटच्या ओवरमध्ये पंड्याचं श्रेय नो-बॉल न टाकण्यापुरतच.
  • Log in or register to post comments

काय जबरदस्त सामना झाला. फारा

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/24/2016 - 14:53 नवीन
काय जबरदस्त सामना झाला. फारा दिवसांनी असा रोमांचक शेवट पहायला मिळाला. धोनीच्या नेतृत्वगुणांचा कस लागला व तो त्यात पुरेपूर उतरला. सुरूवात चुकीच्या संघनिवडीने झाली. सलामीचे रोहीत व धवन हे दोघेही आधीचे दोन्ही सामने अपयशी ठरले होते. ४ थ्या क्रमांकावर खेळणारा रैना सुद्धा अपयशी होता. तरीसुद्धा तोच संघ खेळविला गेला. आधीच्या सामन्यातील अपयशाने दोन्ही सलामीवीर दबावाखाली होते व त्यामुळे बाद न होता खेळत राहण्याचे धोरण स्वीकारून ते खेळत बसले. त्यामुळे धावगती कमालीची संथ झाली. बांगलादेशची मजबूत फलंदाजी लक्षात घेता भारताने १८० चे लक्ष्य ठेवायला हवे होते. ६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहीत फक्त १८ धावा (१६ चेंडूत) काढून बाद झाला तेव्हा भारत १ बाद ४२ होता. पॉवरप्लेच्या ६ षटकात फक्त ४२ धावा निघाल्या. पाठोपाठ धवन २३ धावा (२२ चेंडूत) काढून बाद झाला. सलामीवीरांनी ३८ चेंडू खेळून फक्त ४१ धावा केल्या. आश्चर्य म्हणजे कोहली सुद्धा अत्यंत संथ खेळत होता. कोहली २४ चेंडूत २४, रैना २३ चेंडूत ३०, धोनी १२ चेंडूत नाबाद १३ व युवराज ६ चेंडूत ३ यांनी निराशा केली. पंड्या, जडेजा व अश्विन यांनी एकत्रित १७ चेंडूत ३२ धावा केल्याने धावसंख्या १४० च्या पुढे पोहोचली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करून फक्त १ वाईड चेंडू टाकला. १४६ धावांचे आव्हान पुरेसे नव्हते. अश्विनने चांगली गोलंदाजी केली. बांगलाचा प्रमुख फलंदाज तमीमचा अत्यंत सोपा झेल बुमराहने सोडल्यावर संताप अनावर झाला. त्याआधी पहिल्या षटकात तमीमचा एक सोपा फटका बुमराहला न अडवता आल्याने १ धावेऐवजी ४ धावा गेल्या होत्या. जेमतेम १४६ धावा हातात असताना प्रत्येक धाव महत्त्वाची असते. इथे तर बुमराहने ३ धावा सोडल्या. तमीमचा सोपा झेल सोडल्यावर अश्विनने जोरदार शिवी हासडली. बुमराहला मैदानावर शिव्या मिळाल्या असणार. सोपा झेल सुटल्याने तो नर्व्हस झाला होता व आत्मविश्वासही डळमळीत झाला असावा. अशा परिस्थितीत धोनीने लगेच त्याला गोलंदाजीस आणायला नको होते. त्याला सावरायला थोडा वेळ द्यायला हवा होता. नर्व्हस अवस्थेत बुमराह ने जे षटक टाकले त्यात तमीम तब्बल ४ चौकार मारून त्याचा आत्मविश्वास अजून डळमळीत करून टाकला. भारत सामना हरला असता तर खापर बुमराहच्या डोक्यावर फुटले असते हे नक्की. सुदैवाने जडेजा व अश्विनने चांगली गोलंदाजी केली. धोनीने अप्रतिम यष्टीरक्षण करून २ यष्टीचित केले. शब्बीर रहमानला ज्या तर्‍हेने धोनीने यष्टीचित केले ते केवळ अफलातून होते. फक्त धोनीच ते करू शकत होता. जगातला इतर कोणताही यष्टीरक्षक ते करू शकणार नाही. नंतर २ षटकात १७ धावा हव्या असताना परत आलेल्या बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करून फक्त ६ धावा दिल्या. शेवटच्या षटकात सामना गेलेलाच होता. परंतु फाजिल उत्साहामुळे मुशफकीर व महंदुल्लाने विकेट फेकल्या व शेवटच्या चेंडूवर नीट योजना आखून धोनीने मुस्तफिजूरला अप्रतिमरित्या धावबाद केले व सामना जिंकला. निदान पुढच्या सामन्यात तरी युवराजच्या जागी रहाणेला आणावे. आता बांगलादेश बाहेर पडला आहे. भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु भारताची निव्वळ धावगती अजूनही पाकडे व ऑसीजपेक्षा कमी आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला ऑसीजला हरवावेच लागेल.
  • Log in or register to post comments

बुमराहची कामगिरी

गामा पैलवान
गुरुवार, 03/24/2016 - 19:01 नवीन
श्रीगुरुजी, >> नंतर २ षटकात १७ धावा हव्या असताना परत आलेल्या बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करून फक्त ६ धावा दिल्या. बुमराहची ही कामगिरी देखील प्रशंसनीय आहे. जर आधी झेल पकडला असता तर त्याच्या या कामगिरीचीही चर्चा झाली असती असं वाटतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

निदान पुढच्या सामन्यात तरी युवराजच्या जागी रहाणेला आणावे.

तुषार काळभोर
गुरुवार, 03/24/2016 - 20:21 नवीन
असहमत! रहाणेला खेळवलंच पाहिजे. पण युवराजच्या जागेवर नको. युवराज जिगरबाज खेळाडू आहे. त्याची डावखुरी गोलंदाजीसुद्धा उपयुक्त आहे. (धोनी ती का वापरत नाहीये कुणास ठाऊक?) ते तीन आयतोबा बसलेत ना जागा अडवून, त्यातले दोन तरी हाकलले पाहिजेत. धवन, रोहित व रैना. (रोहितने अजून चार द्विशतके केली, तरी तो मला आवडणार नाही. द्विशतके करणारे इतर: सचिन, सेहवाग, गेल यांच्याविषयी एक भरोसा असायचा/असतो, की अजून काहीतरी होईल, पण या रोहित दगडाविषयी कणभरही विश्वास नाही. अन् आशासुद्धा नाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ऑसीज

तिमा
गुरुवार, 03/24/2016 - 17:14 नवीन
ऑसीज विरुद्ध मॅच मोहालीला आहे का ? तसे असल्यास भारत हरण्याची शक्यता जास्त. हीच टीम ठेवली तर नक्कीच.
  • Log in or register to post comments

आता ब गटात उपांत्य फेरीचा

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/24/2016 - 20:17 नवीन
आता ब गटात उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया वि. भारत हे दोनच महत्त्वाचे सामने आहेत. या तीनही संघांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. - भारताने ३ सामन्यात २ विजयांसह ४ गुण मिळविले असून निव्वळ धावगती -०.५४६ आहे. - पाकड्यांनी ३ सामन्यात १ विजयासह २ गुण मिळविले असून निव्वळ धावगती +०.२५४ आहे. - ऑसीजने २ सामन्यात १ विजयासह २ गुण मिळविले असून निव्वळ धावगती +०.१०८ आहे. ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामन्यात ३ शक्यता आहेत आणि नंतर भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात देखील ३ शक्यता आहेत. एकूण ९ शक्यता आहेत. १) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळून पाकड्यांचे एकूण गुण ३ होऊन त्यांचे आव्हान संपेल व ऑस्ट्रेलियाचे देखील ३ गुण होतील. अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल. अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ५ गुण व भारताचे ४ गुण होऊन ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ३ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना अनिर्णित राहिल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ६६.६६% आहे. परंतु (१) आणि (अ) होण्याची शक्यता ११.११% आहे. तसेच (१) आणि (क) होण्याची शक्यता देखील ११.११% आहे. म्हणजे या दोनपैकी कोणतेही एक होण्याची शक्यता २२.२२% आहे. २) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी - असे झाल्यास पाकड्यांचे एकूण गुण २ होऊन त्यांचे आव्हान संपेल व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होतील. ऑस्ट्रेलियाची निव्वळ धावगती देखील वाढेल. अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल. अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ५ गुण होऊन सरस धावगतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ६ गुण व भारताचे ४ गुण होऊन ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ३३.३३% आहे. परंतु (१) आणि (क) होण्याची शक्यता फक्त ११.११% आहे. ३) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामन्यात पाकडे विजयी - असे झाल्यास पाकड्यांचे एकूण गुण ४ होऊन त्यांचे आव्हान टिकून राहील व ऑस्ट्रेलियाचे २ गुण होतील. पाकड्यांची निव्वळ धावगती देखील वाढेल. अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल. अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ३ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ४ गुण व भारताचे ४ गुण होऊन कमी धावगतीमुळे भारताचे आव्हान संपुष्टात येईल व ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यापैकी ज्याची धावगती सरस असेल तो उपांत्य फेरीत जाईल. क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना पाकड्यांनी जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ६६.६६% आहे. परंतु (१) आणि (अ) होण्याची शक्यता ११.११% आहे. तसेच (१) आणि (क) होण्याची शक्यता देखील ११.११% आहे. म्हणजे असे होण्याची शक्यता २२.२२% आहे. म्हणजे पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया हा सामना ऑस्ट्रेलिया हरल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया या सामन्याचा तीनपैकी कोणताही निकाल लागला तरी जर भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकला तर भारत १००% उपांत्य फेरीत जाणार. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकावेच लागेल व हा सामना भारत हरला तर भारताचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता १००% आहे.
  • Log in or register to post comments

आज ३ वाजता ऑसीज वि. पाकडे हा

श्रीगुरुजी
Fri, 03/25/2016 - 14:43 नवीन
आज ३ वाजता ऑसीज वि. पाकडे हा भारत, ऑस्ट्रेलिया व पाकड्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. यात पाकडे जिंकले तर त्यांचे आव्हान कायम राहील. ते हरले किंवा सामना अनिर्णित राहिला तर पाकड्यांना बॅगा भराव्या लागतील. दुसरा सामना विंडीज वि. द. आफ्रिका ७:३० वाजता आहे.
  • Log in or register to post comments

↓

चेक आणि मेट
Fri, 03/25/2016 - 15:04 नवीन
युवराजला बाहेर करून उपयोग नाही,कारण त्याची वादळी बॅटींग कधीही बरसू शकते. रोहितला देखील बाहेर करून उपयोग नाही,धवनला बाहेर बसवलं तरी चालेल. रैना,जडेजा यांनासुद्धा बाहेर बसवून उपयोग नाही कारण यांच्याइतके अफलातून क्षेत्ररक्षक टीममध्ये नाहीत.शिवाय जडेज्याची गोलंदाजीही उत्तम आहे. पंड्याला बाहेर करण्यात हरकत नसावी,पण तो बॅटींग चांगली करतो म्हणे! so धवन बाहेर अन् रहाणे आत ही एकच रिप्लेसमेंट योग्य वाटते.
  • Log in or register to post comments

आनंदी आनंद

तिमा
Fri, 03/25/2016 - 18:26 नवीन
पाकडे आणि बांगडे स्पर्धेतून बाहेर फेकले गेल्याचा अतीव आनंद आहे.
  • Log in or register to post comments

आता रविवारी ऑसीज व भारतातला

श्रीगुरुजी
Fri, 03/25/2016 - 21:10 नवीन
आता रविवारी ऑसीज व भारतातला सामना हा नॉकआऊट उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. जो जिंकेल तो उपांत्य फेरीत जाईल. सामना पावसामुळे झालाच नाही तर भारत बाहेर. विंडीजविरूद्ध आफ्रिकेची वाट लागली आहे. आफ्रिकेला २० षटकात फक्त ८ बाद १२२ धावा करता आल्या. याच खेळपट्टीवर भारत वि. न्यूझीलंड हा अत्यंत कमी धावसंख्येचा सामना झाला होता. त्यामुळे अचूक गोलंदाजी केल्यास आफ्रिकेला संधी आहे. मात्र आफ्रिका हरल्यास विंडीजची जागा नक्की होईल व आफ्रिकेसाठी उपांत्य फेरी गाठणे अत्यंत अवघड होईल.
  • Log in or register to post comments

न्यूझीलंड

तिमा
Sat, 03/26/2016 - 19:02 नवीन
बांगलादेशविरुद्ध आजचा न्यूझीलंडचा खेळ पाहिल्यावर, आपल्याला फायनलला पोचलो तरी काही चान्स नाही असे वाटते. स्पिन, फास्ट बोलिंग, बॅटिंग, फिल्डिंग.... सगळ्याच बाबतीत , ती एक परिपूर्ण टीम वाटते.
  • Log in or register to post comments

बांगला २०१४ च्या

श्रीगुरुजी
Sat, 03/26/2016 - 20:08 नवीन
बांगला २०१४ च्या स्पर्धेप्रमाणे याही स्पर्धेत सर्व ४ सामने हरले. उपांत्य फेरीसाठी विंडीज व न्यूझीलंड हे दोन संघ नक्की झालेत. 'ब' गटातून दुसरा संघ उद्याच्या ऑस्ट्रेलिया वि. भारत या सामन्यातील विजेता असेल. 'अ' गटात अजून चुरस आहे. आज इंग्लंड लंकेविरूद्ध जिंकले तर इंग्लंड उपांत्य फेरीत जाईल. पण श्रीलंका जिंकले तर इंग्लंड, आफ्रिका व श्रीलंका या तीनही संघांना अजूनही संधी असेल.
  • Log in or register to post comments

'अ' गटात आज चक्क विंडीज

श्रीगुरुजी
Sun, 03/27/2016 - 18:57 नवीन
'अ' गटात आज चक्क विंडीज अफगाणिस्तानकडून हरले. पण तरीसुद्धा सरस निव्वळ धावगतीमुळे विंडीज प्रथम क्रमांकावर व इंग्लंड दुसर्‍या क्रमांकावर राहून दोघेही उपांत्य फेरीत आले. आता एक उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड वि. इंग्लंड असा होईल. दुसरा सामना आजच्या भारत वि. ऑस्ट्रेलिया या सामन्यातील विजेता विरूद्ध विंडीज असा होईल. भारतीय महिला मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्या. आज विंडीजविरूद्ध फक्त ३ धावांनी पराभव झाल्याने उपांत्य फेरीचा प्रवेश बंद झाला.
  • Log in or register to post comments

सलामी

viraj thale
Sun, 03/27/2016 - 21:59 नवीन
सलामी जोड़ी पुन्हा अपयशी
  • Log in or register to post comments

4 गोलंदाज आणि कोहली इतकीच

स्पा
Sun, 03/27/2016 - 23:07 नवीन
4 गोलंदाज आणि कोहली इतकीच भारतीय टिम उरलेली आहे असे खेदाने वाटते, आज जिंकलो तरी अजिबात आनंद झालेला नाही. शर्मा, धवन आणि रॆना ची पुण्याई अजुन किती बाकी आहे? युवराज ची दयनीय अवस्था बघवत नाही. जडेजा ची अवस्था झाकली मुठ सव्वा लाखाची आहे. शेम आॅन सिलेक्शन कमीटी
  • Log in or register to post comments

जीतम! जीतम!! जीतम!!!

चांदणे संदीप
Sun, 03/27/2016 - 23:42 नवीन
लक्ष्याचा पाठलाग करताना आणि दबावाखाली कस खेळाव याच उत्तम उदाहरण कोहलीने पुन्हा एकदा सादर केल आहे! त्याचबरोबर, या वर्ल्ड कपमध्ये, सुरूवातीला विकेट कवडीमोल भावात फेकून मधल्या फळीवर दबाव कसा आणायचा ह्या कामी रोहित, धवन, रैना यांनी यात सातत्य राखण्यात आजही यश मिळवलं! धोनी परत एकदा विनींग शॉट मारण्यासाठी नशिबवान ठरला, त्यात तो आजिबात चुकला नाही, जरी थोडा मिसहीट वाटत होता शॉट, बाऊंड्रीपार आरामात गेलाच! युवराजकडून आज अनपेक्षितरित्या धोनीने बॉलिंग करवून घेतली. ज्यात, भाऊने आजिबात निराश नाही केले. पहिल्याच बॉलवर धोकादायक ऑसि कॅप्टन स्मीथला बाद केले तसेच मॅक्सवेलला नोबॉलनंतरच्या फ्रीहीट साठी टाकलेला बॉल निव्वळ अफलातून! ऑस्ट्रेलियन प्लेयर्स सुरूवतीच्या सहा ओव्हर्स सोडल्या तर लौकिकाला साजेसा खेळ नाही दाखवू शकले. कोहली पुढे तर निव्वळ हात टेकलेले त्यांनी. एकोणिसाव्या ओव्हरमध्ये तर फिल्डर्सच नव्हते जणू मैदानात. फक्त बॉलर आणि विकेटकीपर एवढीच ऑस्ट्रेलियन टीम दिसत होती! बाकीचे कुठे गेलेले कुणास ठावूक? ;) आज जे बोलेन ते खरे असं होत होत माझ..... त्यामुळे, आजच, भारत वर्ल्ड कप जिंकणार अस बोलून ठेवलयं!! ;) Sandy
  • Log in or register to post comments

धोनी

viraj thale
Sun, 03/27/2016 - 23:45 नवीन
स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार. एम्.एस.धोनी: भावा आमची पण संकष्टी आहे आज विसरु नको
  • Log in or register to post comments

जीतम! जीतम!! जीतम!!!

चांदणे संदीप
Sun, 03/27/2016 - 23:50 नवीन
लक्ष्याचा पाठलाग करताना आणि दबावाखाली कस खेळाव याच उत्तम उदाहरण कोहलीने पुन्हा एकदा सादर केल आहे! त्याचबरोबर, या वर्ल्ड कपमध्ये, सुरूवातीला विकेट कवडीमोल भावात फेकून मधल्या फळीवर दबाव कसा आणायचा ह्या कामी रोहित, धवन, रैना यांनी यात सातत्य राखण्यात आजही यश मिळवलं! धोनी परत एकदा विनींग शॉट मारण्यासाठी नशिबवान ठरला, त्यात तो आजिबात चुकला नाही, जरी थोडा मिसहीट वाटत होता शॉट, बाऊंड्रीपार आरामात गेलाच! युवराजकडून आज अनपेक्षितरित्या धोनीने बॉलिंग करवून घेतली. ज्यात, भाऊने आजिबात निराश नाही केले. पहिल्याच बॉलवर धोकादायक ऑसि कॅप्टन स्मीथला बाद केले तसेच मॅक्सवेलला नोबॉलनंतरच्या फ्रीहीट साठी टाकलेला बॉल निव्वळ अफलातून! ऑस्ट्रेलियन प्लेयर्स सुरूवतीच्या सहा ओव्हर्स सोडल्या तर लौकिकाला साजेसा खेळ नाही दाखवू शकले. कोहली पुढे तर निव्वळ हात टेकलेले त्यांनी. एकोणिसाव्या ओव्हरमध्ये तर फिल्डर्सच नव्हते जणू मैदानात. फक्त बॉलर आणि विकेटकीपर एवढीच ऑस्ट्रेलियन टीम दिसत होती! बाकीचे कुठे गेलेले कुणास ठावूक? ;) आज जे बोलेन ते खरे असं होत होत माझ..... त्यामुळे, आजच, भारत वर्ल्ड कप जिंकणार अस बोलून ठेवलयं!! ;) Sandy
  • Log in or register to post comments

कोहली

नन्द्या
Mon, 03/28/2016 - 03:09 नवीन
आज कोहली, युवराज, धोनी यांच्या फलंदाजीचे जेव्हढे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. बिचारा युवराज, लंगडा होऊन सुद्धा धडाडीने खेळला. स्ट्राईक रेट १०० च्या वर ठेवला. एकूणच तिघेहि जण सामना जिंकायचा या जिद्दीने खेळले. विशेषतः कोहली. नंतर पण त्याने युवराज ची स्तुति केली, प्रेक्षकांचे परत परत आभार्‍ मानले. व्वा!
  • Log in or register to post comments

कोहली ची इन्निंग्स कमाल होती

बेकार तरुण
Mon, 03/28/2016 - 08:55 नवीन
कोहली ची इन्निंग्स कमाल होती !! अजिबात स्लॉग न करता त्याने २ ओव्हर्स मधे सामना संपवला !! मजा आली !!! ऑसी आणि पाकला हारवल्यावर काही वेगळाच आनंद होतो :) रहाणे ला घेतला पाहिजे आता, धवनच्या जागी तरी, धवन आणि शर्मा फक्त भूमिपूजनासाठी आहेत टीममधे रैना पहिला शॉर्ट बॉल येईस्तोवर कर्तो बॅटिंग, शॉर्ट टाकला की मात्र ईमाने ईतबारे वि़केट देउन परत येतो पण धोनी आता टीम बदलणं शक्य नाही, जर युवीच अनफीट ठरला तर बदलावी लागेल.
  • Log in or register to post comments

धवन-रोहित-रैना

तुषार काळभोर
Mon, 03/28/2016 - 09:10 नवीन
रहाणेवर एकतर धोनीचा वैयक्तिक आकस असावा, किंवा तो रवी शास्त्रीचा नावडता असावा. नाहीतर त्या तीन आयतोबांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ सुरू असताना रहाणेला बाहेर बसवून त्यांना आग्रहाने खेळवण्यामागचे प्रयोजन कळत नाही. विराट या पिढीचा तेंडूलकर आहे. (स्वभाव सोडला तर) तो असेपर्यंत आशा शिल्लक असतात.
  • Log in or register to post comments

धोनीच्या नशिबावर किती अवलंबून राहणार?

एक सामान्य मानव
Mon, 03/28/2016 - 11:22 नवीन
आपली टीम उपांत्य फेरीत खेळायला मुळीच लायक नाही. नशीब, विराट, धोनी व काही प्रमाणात नेहरा बस्स...याची मला वाटणारी कारणे .. १. वरील तिघांशिवाय इतर कोणीही खेळाडु कसोटी दर्जाच्या इतर कोणत्याही संघात जागा मिळवु शकेल असे वाटत नाही. माझ्या मते चांगल्या संघात असे किमान ५-६ खेळाडु हवेत. उदा. आपलाच जुना ५०-५० चा २००३ किंवा २०११ चा संघ आठवा. २. ३७ वर्षाचा नेहरा सोडता बाकी एकही गोलंदाज नाही जो ४ षटके टाकु शकेल याची खात्री देता येइल. बरेचदा कामचलाऊ फिरकी गोलंदाज अश्विनपेक्षा बरे वाटतात. ३. विराट, धोनी व काही प्रमाणात युवराज सोडला तर कोणीही फलंदाज माफक आव्हानात्मक खेळपट्टी वा गोलंदाजीसमोर उभाही राहु शकत नाही. (पुण्यातली श्रीलंकेची व २०-२० चषकातील सर्वच सामने) अवांतरः बांगलादेशविरुद्ध्च्या सामन्यात पंड्याच्या षटकाची सर्व तारीफ करत आहेत पण माझ्यामते त्याने सामना घालवला होता. दोन विकेट्तर फलंदाजांच्या मुर्खपणामुळे मिळाल्या. कालसुद्धा त्याने शेवटच्या षटकात १५ धावा दिल्या त्याही ८ नं. फलंदाजाला.. बाकी काय लिहणे?
  • Log in or register to post comments

हम्म

खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 03/28/2016 - 11:56 नवीन
अवांतरः बांगलादेशविरुद्ध्च्या सामन्यात पंड्याच्या षटकाची सर्व तारीफ करत आहेत पण माझ्यामते त्याने सामना घालवला होता. दोन विकेट्तर फलंदाजांच्या मुर्खपणामुळे मिळाल्या. कालसुद्धा त्याने शेवटच्या षटकात १५ धावा दिल्या त्याही ८ नं. फलंदाजाला.. बाकी काय लिहणे? +++111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव

मॅच संपल्यावर कोहली मैदानावरच

असंका
Mon, 03/28/2016 - 11:31 नवीन
मॅच संपल्यावर कोहली मैदानावरच बसला ते दृष्य आयुष्यात विसरणार नाही.... भावना अनावर झाल्या बहुतेक त्याला!!
  • Log in or register to post comments

येस ! मला ते पाहुन २०११

बेकार तरुण
Mon, 03/28/2016 - 12:16 नवीन
येस ! मला ते पाहुन २०११ वर्ल्ड कपला युवीनेहि सेम पोज दिलेली ते आठवलं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

निव्वळ कोहलीमुळे जिंकलो.

श्रीगुरुजी
Mon, 03/28/2016 - 12:55 नवीन
निव्वळ कोहलीमुळे जिंकलो. पहिल्या ४ मधील ३ फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. आणि प्रत्येकवेळी कोहलीलाच खेळावे लागते. युवराज येऊन पडझड थांबवितो व कोहलीला साथ देतो. फारश्या धावा करत नसल्या तरी निदान मोठी भागिदारी तरी करतो. त्यानंतर धोनी व पंड्या थोड्याच पण वेगवान धावा करून जातात. म्हणजे फक्त ४ फलंदाज धावा करताहेत. गोलंदाजीत नेहरा व अश्विन सोडला तर बाकी आनंदच आहे. रोहीतची ४ सामन्यातील कामगिरी - ५,१०, १८, १२ धवनची ४ सामन्यातील कामगिरी - १,६,२३,१३, २ झेल, १ धावबाद रैनाची ४ सामन्यातील कामगिरी - १,०, ३०, १०, ३ बळी, १ झेल,१ धावबाद युवराजची ४ सामन्यातील कामगिरी - ४, २४, ३, २१, १ बळी जडेजाची ४ सामन्यातील कामगिरी - ०, १२, ४ बळी, १ झेल रोहीतने ४ सामन्यात एकूण ४५ धावा, धवनने ४३ व रैनाने ४१ धावा केल्या आहेत. या तिघांना भरपूर संधी दिलेली आहे. निदान उर्वरीत सामन्यासाठी तरी रहाणे, नेगी व हरभजनला संधी मिळावी. रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा. विंडीज फिरकीसमोर नीट खेळत नसल्याने रैनाऐवजी पवन नेगी येऊ शकतो. तो फलंदाजीही बर्‍यापैकी करू शकतो.
  • Log in or register to post comments

रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा.

असंका
Tue, 03/29/2016 - 09:02 नवीन
रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा.
हे बोलल्यावर आता कसं बरं बरं वाटलं असेल नाही? (निदान मला तरी जुने श्रीगुरुजी परत आल्यामुळे बरं वाटलंच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हहपुवा

श्रीगुरुजी
Tue, 03/29/2016 - 12:43 नवीन
हहपुवा असं बरं वाटण्याची संधी रोहीत कायम देत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

विराटने अफलातून फलंदाजी केली

भाऊंचे भाऊ
Mon, 03/28/2016 - 18:03 नवीन
जवळपास दिड दशकांपूर्वीच्या तेंडुलकरची आठवण झाली
  • Log in or register to post comments

२००७ च्या पहिल्या विश्वचषक

श्रीगुरुजी
Mon, 03/28/2016 - 20:20 नवीन
२००७ च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारत पहिला सामना न्यूझीलंडकडून हरला होता. नंतर पाकड्यांना हरविले होते व नंतर उपांत्य फेरीत ऑसीजना हरविले होते. यावेळी साधारण तशीच परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments

काल खुप दिवसानंतर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/28/2016 - 23:20 नवीन
काल खुप दिवसानंतर सचिनची फटकेबाजी विसरता आली. धन्स विराट. जबरा म्याच ओढलास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

भारत विरूद्ध न्यूझीलंड

बोका-ए-आझम
Mon, 03/28/2016 - 23:27 नवीन
अशी फायनल व्हावी आणि आपण न्यूझीलंडकडून हरण्याचा सपाटा तिथेच थांबवावा अशी लई इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

हे बघा आपण काल कसं तरी कन्हत कन्हत जिंकलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/28/2016 - 23:43 नवीन
मला आत्ताच तो विंडीजचा गेल स्वप्नात यायला लागला आहे. नेहराला लै बेक्कार धुनार आहे तो. सध्या नेहरा तर असं ग्राउंडवर वावरतोय जसा याने पाच पन्नास म्याच जिंकून दिल्या आहेत. धोनीला चक्क मार्गदर्शन करतांना दिसतो. बॉलरला मार्गदर्शन करतो, आणि सर्वात कळस म्हणजे क्षेत्ररक्षणही बॉलींग करतांना तो बदलू लागला आहे. तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत. तीच गत युवराजची. अजिबात काँफिडन्स नै, उगं बॉल खात राहतो. काल तो कधी एकदा बाद होतो असं मला झालं होतं. काल चक्क जिंकलो, यावर माझा विश्वास बसत नै ये अजून. बाय द वे, वाट्सपवर मुंबैच्या कोणत्या ज्योतिष मंडळाचा अगदी परफेक्ट कोणकोणत्या सामन्यात विजयी होऊ त्याचं भविष्य फिरत आहे. सालं माझं खेळाडुवर नै पण त्या ज्योतिषांवर लै विश्वास बसला आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा