✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

स
स्वामी संकेतानंद यांनी
Fri, 03/25/2016 - 15:49  ·  लेख
लेख
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली. पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला. तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत! या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा. अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे? आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं --मुनव्वर राना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
27877 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

स्वाम्या,

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/26/2016 - 15:00 नवीन
स्वाम्या, कामं नोत का तुले इचिभना!!! अब्यास कर ना सायच्या!! आईएएस व्हाचं न तुले? बापा काय इषय काळतं रे! इथं लेका मी बी प्रांतवादी सैनिक ठरतो!! तुयं लॉजिक कौन आइकन!!! सब्बन मोठे लोकं रायतेत अटीसा!!
  • Log in or register to post comments

काहून फडफड करून र्‍हायले

ए ए वाघमारे
Sat, 03/26/2016 - 16:29 नवीन
काहून फडफड करून र्‍हायले बाप्पू ! सब्बन मोठे लोकं रायतेत अटीसा!! हे कम सही बोल्ले भाउ. आपन आपलं चुपचाप कोपर्‍यात बसाव, मजा पहाव आनि टाईम आला की हळूचकन एक जोर्दार रट्टा हानाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आपन आपलं चुपचाप कोपर्‍यात

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/26/2016 - 17:00 नवीन
आपन आपलं चुपचाप कोपर्‍यात बसाव, थेच तर नळते न भाऊ!!! आपुन अकोल्याचे लेकरं!आपल्याले दलिंद्री ज्यमत ना न भाऊ!! छाती ले माती अन नेमक्या जागी खुटे हाच आपला तेटरपना!! इकळे नथी मांगून तीर मारनारे भेटले म्हणून येणे सोल्डले अटीसा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

टाईम आला की हळूचकन एक जोर्दार

ए ए वाघमारे
Sat, 03/26/2016 - 17:29 नवीन
टाईम आला की हळूचकन एक जोर्दार रट्टा हानाव. हे नाइ वाचलं वाट्टे तुमी. आता रट्टे हानायचा टाइम आला हेच तं सांगून राहलो मी राजेहो. देवेंद्रभाउ अन नरेन्द्रभाऊ गळबळ करते वाट्टे २०१८त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आलास सायच्या!! अब तुम लढो हम

स्वामी संकेतानंद
Sat, 03/26/2016 - 16:41 नवीन
आलास सायच्या!! अब तुम लढो हम कपडे संभालते है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लढा बाप्पू. आमी हावोत

अभ्या..
Sat, 03/26/2016 - 16:47 नवीन
लढा बाप्पू. आमी हावोत पाठिंब्याला. निंघाला गर्दीत टांगा तर मराठवाडा बी निघन आल्लाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

अभ्या भाऊ

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/26/2016 - 17:06 नवीन
आभारी हाय जनु मंडळ आपले! पर इच्छा नाही आता! ह्या स्वाम्या सारखे मित्र धागे टाकते झाले तर पसरतो बाकी जागी बोलायची इच्छा नसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लाज वाटते का फोकन्या स्वाम्या

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/26/2016 - 17:02 नवीन
लाज वाटते का फोकन्या स्वाम्या!! हरामखोरा मेगाबायटी धागे कहाड़तो अन नेमक्या जागी मले म्हावरे करतं काय चोट्ट्या सायच्या !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

सगळे प्रांतवादी आले म्हणून

संदीप डांगे
Sat, 03/26/2016 - 16:46 नवीन
सगळे प्रांतवादी आले म्हणून आम्हालाही यावंच लागेल. त्या सब्बन मोठ्या लोकाईच्या बैलाला होssssss ज्यांना आपला इथला वावर आवडत नाही त्यांच्या बैलाला होssssss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

काय संदीपान्भो. दोन दिस लेट

अभ्या..
Sat, 03/26/2016 - 16:51 नवीन
काय संदीपान्भो. दोन दिस लेट केलात जणू. लै गिराइक होतं धुळवडीला. कट्टाळून सोडून दिलं. जौ दे. तवा न बोंबलाणार्‍याच्या बैलाला होssssss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आरं बाबा. हिथं नाशकात हाय

संदीप डांगे
Sat, 03/26/2016 - 16:56 नवीन
आरं बाबा. हिथं नाशकात हाय बाकी अजून धुळवड. ती असते पंचमीला. अजून आमची धूळवड सुरुच झाली नाही. तुम्ही चालू ठेवा आम्ही आहोत बोंबा मारायला. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आळवे भांदले सारे ;)

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/26/2016 - 17:08 नवीन
आळवे भांदले सारे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लेख प्रचंड आवडला आहे.

गॅरी ट्रुमन
Sat, 03/26/2016 - 18:43 नवीन
लेख प्रचंड आवडला आहे. महाराष्ट्राचा भाग असण्यापेक्षा स्वतंत्र राज्य केल्यामुळे प्रशासनिक/आर्थिक/सामाजिक फायदे होणार आहेत का एवढाच स्वतंत्र विदर्भ करावा की नाही हे ठरविण्याचा मापदंड हवा. फुकाच्या मराठी बाण्यांना अगदी फाट्यावर मारावे. हे असले बाणे मातोश्री आणि कृष्णकुंज या ठिकाणच्या डेमॉगॉगच्या राजकारणाला साजेसे आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी या असल्या भावनिक लढाईमध्ये न पडलेले श्रेयस्कर. स्वतंत्र विदर्भ झाला तरी भारत-पाकिस्तानसारखी फाळणी थोडीच होणार आहे? विदर्भ हे भारताचेच एक राज्य म्हणून राहणार आहे ना? मग काय फरक पडणार आहे विदर्भाचे वेगळे राज्य झाले तरी?
  • Log in or register to post comments

प्रचंड सहमत. वेगळा न करताही

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 19:06 नवीन
प्रचंड सहमत. वेगळा न करताही विदर्भावर झालेला अन्याय दूर करता आला तर काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

नको नको. वेगळाच करा काय ते

काळा पहाड
Sun, 03/27/2016 - 00:40 नवीन
नको नको. वेगळाच करा काय ते एकदाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे.

हेमंत लाटकर
Sat, 03/26/2016 - 19:51 नवीन
वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे!

हेमंत लाटकर
Sat, 03/26/2016 - 19:55 नवीन
वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे!
  • Log in or register to post comments

वेगळे राज्य आणि वेगळे राष्ट्र

सातारकर
Sun, 03/27/2016 - 14:03 नवीन
वरती बरेच जणांनी अस म्हटलं आहे की वेगळ राज्य मागत आहेत, वेगळ राष्ट्र नाही. मला दोन्ही मधला गुणात्मक (qualitative) फरक जाणून घ्यायचा आहे. व्हिसा लागेल वगैरे माहित आहे, पण बाकीच्या राज्यामुळ प्रगती होत नाही (किंवा बाकीच राज्य करू देत नाही) हा नियम असाच्या असा दोन्हीकड लागू होतोच की. शिवाय त्या जनतेला ठरवूद्या, इतरांनी नको हे देखील काही जणांनी म्हटलं आहे. हाच न्याय काश्मीर ला का लावू नये?
  • Log in or register to post comments

लावायला हरकत नाही पण

स्वामी संकेतानंद
Sun, 03/27/2016 - 15:05 नवीन
लावायला हरकत नाही पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ते भारताला परवडणार नाही असे वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

अस गणित आहे तर

सातारकर
Sun, 03/27/2016 - 16:27 नवीन
म्हणजे भारताला त्रास होउ नये म्हणून आपण तो आपल्या मांडीखाली दाबून ठेवला तरी चालेल अस म्हणण आहे स्वामींच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

माण्डीखाली दाबणे चुकीचा शब्द

स्वामी संकेतानंद
Mon, 03/28/2016 - 18:50 नवीन
माण्डीखाली दाबणे चुकीचा शब्द आहे. आणि राष्ट्र आणि राज्य दोघांचे गणित वेगवेगळे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

हेच तर कन्हैय्या आणि पार्टी

सोत्रि
Sun, 03/27/2016 - 15:16 नवीन
हेच तर कन्हैय्या आणि पार्टी म्हणत होते की मग! पण ते देशद्रोही ठरले. तोच न्याय तुम्हालापण लावावा काय? - (स्वयंघोषीत देशभक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

वाहवा!

स्वामी संकेतानंद
Sun, 03/27/2016 - 15:25 नवीन
वाहवा! सोत्रि आले! फटाके फोड़ूच..पण आमच्या धाग्यातल्या विषयावर पण बोललात तरच! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

विषयावर नाना स्काॅच यांनी जे

सोत्रि
Sun, 03/27/2016 - 17:22 नवीन
विषयावर नाना स्काॅच यांनी जे काही तारे तोडलेत त्याच्याशी सहमत आहेच! -(स्काॅचप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

ह्या स्वामीच्या धाग्यावरच

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 03/27/2016 - 15:33 नवीन
ह्या स्वामीच्या धाग्यावरच सगळे सोयरे अन जुने हुच्चभ्रू पुंड का ब्रे भेटत असावेत असा एक प्रश्न माझ्यासारख्या सालस सज्जन मुलाला पडला आहे म्हणे मी!!
  • Log in or register to post comments

तुले त माहीतच आहे का 'तिकडे'

स्वामी संकेतानंद
Sun, 03/27/2016 - 16:36 नवीन
तुले त माहीतच आहे का 'तिकडे' बी सब चर्चा होत रायते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

भावनिक मुद्दे

मित्रहो
Sun, 03/27/2016 - 16:31 नवीन
मला वाटत भावनिक मुद्द्यांकडे जितके दुर्लक्ष करता येइल ते योग्य. जेंव्हा प्रश्न सोडवायचे नसतात तेंव्हा भावनिक मुद्दे उचलले जातात. १०७ हुतात्मे, मराठी माणसाचे तुकडे हे तसेच भावनिक मुद्दे आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रामुळे आमचा विकास झाला नाही हे विदर्भातल्या राजकारण्यांची ओरड तितकीच चुकीची आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासारखे आहे. वेगळा विदर्भ हे आज काय परिस्थिती आहे आणि काय असावी हे बघून ठरावे. कदाचित महाराष्ट्र राज्य आज बरेच मोठे असेल. ठाणे जिल्हा मोठा होता प्रशासकीय दृष्टीने योग्य नव्हते म्हणून पालघर जिल्हा केलाच ना. तीच गोष्ट चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची. पूर्वी विदर्भातल्या लोकांचे रोटीबेटीचे व्यवहार मध्यप्रदेश, छत्तिसगड, तेलंगणातल्या लोकांशी व्हायचे आजही होतात. फार फरक पडला नाही. इतर महाराष्ट्र सोबत रोटीबेटीचे व्यवहार पूर्वी व्हायचे, आज होतात, पुढेही होत राहतील.तेंव्हा भाषा, संस्कृती असले मुद्दे बाजूला सारुन प्रशासकीय सोय, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था या मुद्द्यांकडे बघून विदर्भ किंवा इतर कुठलेही राज्य बनवताना करायला पाहीजे. राज्य वेगळे झाले म्हणून ना भाषा बदलत ना संस्कृती.
  • Log in or register to post comments

हेच..

चिगो
Mon, 03/28/2016 - 15:00 नवीन
राज्य वेगळे झाले म्हणून ना भाषा बदलत ना संस्कृती.
हेच म्हणतो, भाऊ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

एक अडाणी प्रश्न!

सतीश कुडतरकर
Mon, 03/28/2016 - 17:20 नवीन
एक अडाणी प्रश्न! महाराष्ट्राच्या पश्चिमेला भौगोलिकदृष्ट्या कोकण आहे. मग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर विभागाला पश्चिम महाराष्ट्र का म्हणतात? :-)
  • Log in or register to post comments

कारण कोंकण 'कोंकण' आहे..

स्वामी संकेतानंद
Mon, 03/28/2016 - 18:51 नवीन
कारण कोंकण 'कोंकण' आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा