Skip to main content

माझी पहिली कविता.... "का ग एवढी आवडतेस मला"

लेखक kunal lade यांनी मंगळवार, 08/03/2016 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू तरीही का मन ऐकत नहीं माझ ... का एवढी छान आहेस तू ... का एवढी मनमिळावू , शब्दांत गोडवा तुझ्या,हृदयात प्रेम तू बोलतेस,थोडेसे का होईना लाजतेस... तेव्हा वाटत आवडत असावा मी देखिल तुला... पण तुझ तुलाच ठावुक बाई, तुझ्या मन ओळखन माझ्या अवाक्याबाहेर आहे.... तरीही सतत तुलाच ओळखाण्याच्या प्रयत्नात का असते मन.... तुझा attitude त्रास देतो मला... पण तो नाहीं न दाखवलास की वाटते दूर लोटतेयस मला.... एखादी गोष्ट चार वेळा विचारल्यावर एकदा बोलतेस.... तरीही का सतत विचारावास वाटते तुलाच... ह्या सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच नसणार तुझ्याजवळ... तरीदेखिल मुर्खासारख का विचारावस वाटते तुलाच... सांग ना का ग एवढी आवडतेस मला.......?????
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4899
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

छान. पहिलीच कविता मस्त उतरलिय.

पहिलीच? छान जमलीये. 'माझी पहिली कविता' असा उल्लेख केलेला नसता तरी कविता मला आवडलीच असती. लिहित राहा..

In reply to by अभ्या..

खूपच अप्रतिम. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही जिंकलंत हो रसिक वाचकांना. येऊ द्यात अजूनही अशाच कविता.

In reply to by प्रचेतस

और भी आने दो!

लोल प्रतिसाद! =))
थोडेसे का होईना लाजतेस
असे बरेच पंचेस आहेत कवितेत!! रसग्रहण करायला हात शिवशिवत आहेत, पण नको; आज गिराण आहे! ;) Sandy

दादांनो पोरग नवीन आहे. जरा सांभाळून घ्या.. आणि नवीन कविता हे शीर्षक या साठीच होत.. काही चुका असतील तर सांभाळून घ्या.... अगली बार शिकायत का मौका नाही दुंगा..... आभारी...!!!!!

In reply to by प्रचेतस

@kunal lade >>
प्रचेतस - Tue, 08/03/2016 - 20:51 खरंच जिगर हाय राव. तुम्ही मुरणार बघा मिपावर लवकर.
अट्यंट शमत हाय मी प्र"चेतस सरांशी! प्राचीन काळी मिपावर प्र"चेतस सरांची "नवकवी बचाव(विडंबन सुचाव!) संघटना" होती. मला त्यात काम-दिलंवत प्र"चेतस सरांनी! स्वतःहि ते त्यात अत्यन्त हिरीरीने भाग घेत असत. कित्येक नवकविना सरांनी क्रियाशील पणे मिपाच आध्यात्म शिकीवल होतं. त्यातून अनेकांना मोक्ष-प्राप्ती झाली. वाहुव्वा रे वाहुव्वा! काय दिवस होते टे! आज समद आटावलं!!! तुम्हालाही सरांच्या शिकविण्याचा लाभ होईल. शुभेच्छा तुम्हाला. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@स्वतःहि ते त्यात अत्यन्त हिरीरीने भाग घेत असत. >> पण प्र'चेतस सरांच्या मणाचा मोठ्ठे पणा असा,कि ते तसं स्वतः काही केल्याचं जाहीरपणे कुठेच कधीच सांगत नसत! कित्ती हा विनय!? माझा विनय नावाचा मित्र याचमुळे सरांचा फ्याण झाला. कुंदनजी, तुमच्या नेम/सरनेम चा हि खयाल ठेवतील प्र"चेतस सर! अगदी लाडे लाडे शिकीवतील टुम्हाला. आमचे मायाळू सर! प्र'चेतस सर!

In reply to by अत्रुप्त आत्मा

विनयशील म्हणायचे आहे काय? प्रसिद्धी पराङ्:मुख असल्याने हा मणाचा मोठेपणा आला असावा. सध्या या काव्यप्रकारात ते का लक्ष्य घालीत नाहीत याची आप्ण व्य्क्तीशः चौकशी करणे. बॅट्या संचालीत वल्ली-बुवा प्रतिसाद आस्वादक संघ व कुंथुनाथ संप्रदायाचे अगलतगल गट प्रमुख टका यांच्या संयुक्त मोहिमेचा एक भाग.

In reply to by नाखु

@प्रसिद्धी पराङ्:मुख>> अगदी अगदी!!! हाच टो शब्द! हाच! मग्गाशी मेला कुटं ग्येलता पाणी भराय तो गावेच ना! धन्य वाद णा'खुण.. धन्य वाद!

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे तुमचे अपलं काई तरीचे बुवा. अहो ते नवकवींना चेतवतात म्हणुन तर नवकवींची पुढली कविता बोर्डावर येते.

In reply to by निशांत_खाडे

दीड वर्षापासून आहे मिपा वर पण कधी लिहायचा प्रयत्न केला नाही... आणि अशीच सुचलेली एक कविता कुठेतरी टाकावी म्हणून टाकली... हा म्हणजे वाचनाची आवड आहे म्हणा म्हणून तर सुचले त्याशिवाय कस लिहिणार न....

कविता आवडली तरी काहि प्रश्ण पडलेत. >>> माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू म्हण्जे लढाईच्या आधि राजीनामा दिलात काय? का प्लोट कुणाच्या नावावर आहे आधिच? बाकिचे नंतर विचार्तो.

ती नाही बोलल्यावरच सुचलिये कविता....