Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Sun, 03/06/2016 - 12:38
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
मेक-अप इंडिया- या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल. वेक अप इंडिया- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल. शिवाय आपल्या वाढदिवसाच्या वगैरे दिवशी मोदींच्या आवाजातील शुभेच्छा सन्देश देईल. एक कप इंडिया- प्रत्येक तालुक्याच्या गावी चहाचे दूकान उघडण्यात येणार असून तेथे रोज सकाळी 4-5 या वेळेत प्रत्येकास एक कप चहा मोफत देणेत येईल. स्वस्त भारत- मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना. या योजनेअन्तर्गत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये ₹1 इतक्या कमी किमतित गहु, तांदूळ इ. सोबत तुरडाळ, उड़ीदडाळ इ. सारखी कडधान्ये आणि डाळी पहावयास मिळतील. फस्त भारत- सर्व भ्रष्टाचारी, गुंड, भेसळखोर लोकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. टेक अप इंडिया- या योजनेत उद्योजकाना शेतकऱ्यांच्या जमीनी कमी भावात उपलब्ध करून दिल्या जातील. फेक अप इंडिया- खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली. या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत- 1. आधार कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. ड्राइविंग लैसेंस 4. शाळा सोडल्याचा दाखला 5. राशन कार्ड 6. रहीवासी दाखला 7. 7/12 उतारा 8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ.
  • Log in or register to post comments
  • 17115 views

प्रतिक्रिया

Submitted by इष्टुर फाकडा on Wed, 03/09/2016 - 02:38

In reply to धन्यवाद. तुमच्या प्रतिसादाशी by तर्राट जोकर

Permalink

लोकांचा भाजप पेक्षा मोदींना

लोकांचा भाजप पेक्षा मोदींना जास्त पाठींबा होता हे ओळखून २०१४ च्या निवडणुकीत 'मोदी सरकार' हि शब्दयोजना आणली गेली आणि जी तुफान चालली. तो प्रचाराचा भाग सोडून द्या. पण हल्ली मोदींची भाषणे बघताना त्यांचा 'मी' सतत खटकतो. अर्थात, त्यांच्या मुख्य खात्यातील मंत्र्यांना ते त्यांच्या वाट्याचे श्रेय द्यायला कमी पडत नाहीत असेही जाणवते.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 03/09/2016 - 00:58

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

मोदीविरोधक

जालावर आज आहेत तसे व तितके मोदीविरोधक कधीच नव्हते. संपुर्ण इंटरनेट जाऊंदेत, नुसते मिपा सुरवातीच्या काळापासून खोदून पहा. मोदीविरोधक म्हणून किती लिहीले गेले आहे ते कळेल. किंबहूना मी पुढे जाऊन असे म्हणेन की, जर इतका मोदीविरोध मोदी विरोधकांनी केला नसता, तर कदाचीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील होऊ शकले नसते... :) किंबहूना आता जे कोणी केवळ मतदानापुरते भाजपाचे झाले होते पण वास्तवीक लेफ्ट ऑफ सेंटर आहेत, ते देखील सततच्या मोदी विरोधाला कंटाळले आहेत. याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे जालावर नसून राज्यसभेत आहे, जेथे सगळे अडवले जात आहे. सोनीयाबाई आणि राहूलजींनी पणच केला आहे, की काय वाट्टेल ते होवोत, पण गांधीजींची इच्छा नजिकच्या काळात पूर्ण करणारच! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 03/09/2016 - 14:03

In reply to मोदीविरोधक by विकास

Permalink

इतर मोदीविरोधक जाऊ देत,

इतर मोदीविरोधक जाऊ देत, मिपावरील मोदीविरोधाची काही उदाहरणे देतो. (१) सेल्फीच्या धाग्यावर मोदींचा काहीही संबंध नसताना तिथे मोदी हा विषय आणला गेला आणि सहजच लिहितोय असे दाखवून असेही सुचविले गेले की मोदी सेल्फी काढतात म्हणजे तेही सेल्फी या मनोविकाराचे बळी आहेत. फोन त्यांचा, ते स्वतःची सेल्फी काढतात आणि यात इतरांना काय त्रास होतो हेच समजत नाही. परंतु मोदी हे नावच काहीजणांसाठी इतके त्रासदायक आहे की मोदींची प्रत्येक गोष्ट (अगदी व्यक्तिगत असली तरी) या मंडळींना त्रास होतो. (२) २०१४ च्या निवडणुकीत मोदी मतदान करून बाहेर आल्यावर एका ठिकाणी थांबून एका हातात कमळ घेऊन स्वतःची सेल्फी काढत होते. ते दृश्य माध्यमांनी टिपून सर्वत्र प्रसिद्ध केले. यात मोदींचा काय दोष? परंतु मिपावर असे लिहिले गेले की मोदी मतदान सुरू असताना स्वतःचा प्रचार करीत आहेत. मोदींविरूद्ध निवडणुक आयोगात तक्रारही दाखल झाली व काही काळानंतर निवडणुक आयोगाने तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगून ती फेटाळली. खरं तर त्यांचा सेल्फी काढताना फोटो काढून तो प्रसिद्ध केल्याबद्दल माध्यमांना दोषी ठरवायला पाहिजे. परंतु माध्यमांची चूक असली तरी ती मोदींचीच चूक. (३) ते मतदान केंद्रातून बाहेर येताना एका माध्यमाचा प्रतिनिधी त्यांच्याजवळ गेला व त्याने मोदींना मतदानाबद्दल विचारले. त्यावर त्यांनी काहीतरी उत्तर दिले. हे लगेच त्या वाहिनीने दाखवायला सुरूवात केली. मिपावर एका सदस्याने लगेच लिहिले की मोदींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रात "पत्रकार परीषद" घेऊन नियमांचा/कायद्यांचा भंग केला. "पत्रकार परीषद" म्हणजे नक्की काय हे या सदस्याला माहित नसेल का? ज्या पत्रकाराने मोदींपर्यंत जाऊन प्रश्न विचारला तो दोषी नाही पण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणारे मोदी दोषी आणि मोदींनी न बोलविता स्वतः त्यांच्याकडे धावत जाऊन एक प्रश्न विचारला तर ती म्हणे मोदींनी "पत्रकार परीषद" घेतली! मोदीद्वेषाची कावीळ झाल्यामुळे काही जणांना कोणत्याही विषयात मोदींना ओढूनताणून आणून त्यांच्यावर असंबद्ध टीका केल्याशिवाय राहवतच नाही. आणि अशा टीकेला प्रत्त्युत्तर मिळाले की लगेच नमोभक्त, मोदीभक्त असा गटाणा सुरू होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/09/2016 - 14:38

In reply to इतर मोदीविरोधक जाऊ देत, by श्रीगुरुजी

Permalink

गुरुजी,

गुरुजी, >> फोन त्यांचा, ते स्वतःची सेल्फी काढतात आणि मी त्यांचे नाव घेऊन खोडसाळ कमेंट केली. मी आणि मोदी बघून घेऊ ना? इतरांना काय त्रास होतो हेच समजत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 03/09/2016 - 15:11

In reply to गुरुजी, by तर्राट जोकर

Permalink

जेव्हा तुम्ही सार्वजनिक

जेव्हा तुम्ही सार्वजनिक संस्थळावर लिहिता तेव्हा ते फक्त तुम्ही आणि मोदी यांच्यापुरते मर्यादीत राहत नाही हे समजावे अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/09/2016 - 15:18

In reply to जेव्हा तुम्ही सार्वजनिक by श्रीगुरुजी

Permalink

केजरीवाल यांना शिवी म्हटलेले

केजरीवाल यांना शिवी म्हटलेले योग्य आहे ते कोणत्या अपेक्षेने?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 03/09/2016 - 15:19

In reply to केजरीवाल यांना शिवी म्हटलेले by तर्राट जोकर

Permalink

आता इथे केजरीवाल कोठून आले?

आता इथे केजरीवाल कोठून आले? आधी काहीही संबंध नसताना तुम्ही इथे मोदींना आणलंत आणि आता केजरीवालांना.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/09/2016 - 15:31

In reply to आता इथे केजरीवाल कोठून आले? by श्रीगुरुजी

Permalink

हे हे. असं असतंय ते. आणि लोक

हे हे. असं असतंय ते. आणि लोक मलाच म्हणतात. सार्वजनिक संस्थळावर प्रसिद्ध व्यक्तीबद्दल काहीही बोलणे वक्ता आणि ती व्यक्ती यांपुरते मर्यादित राहत नाही असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला? मी उदाहरण म्हणून तुमचेच वाक्य दिले. प्रश्न बघा, नसते फाटे फोडु नका.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 03/09/2016 - 23:01

In reply to हे हे. असं असतंय ते. आणि लोक by तर्राट जोकर

Permalink

त्या प्रश्नाला उत्तर द्यायची

त्या प्रश्नाला उत्तर द्यायची ही जागा नाही. जिथे हा विषय आला आहे तिथे विचारा.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/09/2016 - 23:42

In reply to त्या प्रश्नाला उत्तर द्यायची by श्रीगुरुजी

Permalink

इथे मोदी वा केजरीवाल हा

इथे मोदी वा केजरीवाल हा प्रश्नच नाही. सार्वजनिक संस्थळावर प्रसिद्ध व्यक्तीबद्दल काहीही बोलणे वक्ता आणि ती व्यक्ती यांपुरते मर्यादित राहत नाही हे तुम्ही ह्याच धाग्यावर म्हटलेले आहे. मी फक्त एवढंच विचारलं की हे फक्त मोदींपुरतं आहे की जनरल आहे. तुम्ही त्याचे उत्तर दिल्यावर जिथल्या तिथे जाऊन प्रतिसाद देईन. बाकी तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 03/09/2016 - 09:14

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

तजो, प्रतिसाद अप्रतिम.

इथे तुम्ही जी maturity दाखवली आहे ती दुर्दैवाने भक्त आणि विरोधक दोघेही दाखवत नाहीत. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Wed, 03/09/2016 - 14:33

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर....

तजो साहेब मिपा वर चे काही आयडी सुबोध खरे,विकास,क्लिंटन,निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी...इत्यादि खरोखरच अभ्यासू आणि निष्पक्ष पद्धतीने विचार करणारे आहेत. गेली ७ वर्षे मी मिपा चा सदस्य आहे आणि मिपा वरील प्रत्येक चर्चा मी बारकाई वाचत असतो. मिपा हे फक्त एक संकेतस्थळ न राहता कोणताही पूर्वग्रह न ठेवता एखाद्या घटनेच्या संदर्भात सर्व बाजू समोर येउन मत बनविण्यात (opinion maker) अत्यंत महत्वाचा घटक आहे असे मला वाटते. उल्लेख केलेल्या आयडींच्या अचूक आणि संयमित प्रतिसादां नंतर कित्येक प्रक्षोभक होऊ घातलेल्या चर्चांचा रोख पूर्णपणे बदलला गेल्याचे प्रत्येक वेळा वाचनात आले आहे. भाजपा प्रणीत सरकार स्थापन होणे हि गेल्या २ वर्षातील घटना आहे,त्या आधी कधीच मोदी/भाजप/संघ समर्थनाचे प्रतिसाद किंवा धागे या आयडींने काढलेले वाचनात आलेले नाही तसेच काँग्रेस आणि त्या पक्षाच्या इतर नेत्यांवर नाहक टीका करणारे प्रतिसाद मोदी पंतप्रधान होण्याच्या पूर्वी सुद्धा कधीच वाचनात आले नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीने प्रतिवाद करताना अशा आयडींना सरसकटीकरण करून मोदी/भाजप समर्थक असा रंग देण्याच्या प्रयत्न करत आहात तो निश्चितच निष्पक्ष वाटत नाही.या अशा आयडींना मोदी/भाजप/संघ समर्थनार्थ प्रतिसाद का द्यावे वाटले याची कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर तुमचा त्रागा बराच कमी होईल हे निश्चित.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 03/09/2016 - 14:57

In reply to कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर.... by lakhu risbud

Permalink

काही आयडी (वरीलपैकीच असतील

काही आयडी (वरीलपैकीच असतील असे नव्हे) "अभ्यासू आणि निष्पक्ष " पासून किंचित आक्रस्तळेपणाकडे झुकल्याचे निरीक्षण नोंदवू इच्छीतो.
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Wed, 03/09/2016 - 15:01

In reply to काही आयडी (वरीलपैकीच असतील by बाळ सप्रे

Permalink

सोदाहरण

वरीलपैकीच असतील असे नव्हे सोदाहरण स्पष्ट केले तर बरे होईल
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 03/09/2016 - 15:25

In reply to सोदाहरण by lakhu risbud

Permalink

इथे आयडी लिहून व्यक्तिगत

इथे आयडी लिहून व्यक्तिगत पातळीवर मला उतरायचे नाही. मी प्रतिसाद/ लेख वाचून माझे मत बनवतो. जे कायम बदलते असू शकते. इतरांनी माझ्या मतावरून मत बनवणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे तुम्हीच प्रतिसाद/ लेखावरून समजा. तुमचे मत वेगळेही असू शकते. (तुम्हालाही जर असेच वाटले तर व्यनिमधून उत्तर मिळू शकेल)
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/09/2016 - 15:17

In reply to कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर.... by lakhu risbud

Permalink

मला इथे कोणाचे नाव घ्यायचे

मला इथे कोणाचे नाव घ्यायचे नाही. तुम्ही वर उल्लेखित आयडींच्या इतर विषयांवरच्या प्रतिसादांबद्दल मी कुठे बोललो नाही, किंवा त्यांच्या विश्वासार्हतेवर काहीही प्रश्नचिन्ह नाही. मुद्दा फक्त भाजप व मोदींशी संबंधित आहे. त्यासंदर्भात होणार्‍या चर्चांना तेवढ्यापुरतं घ्यावं. विशिष्ट आयडीने अमूक एवढ्या बाबतींत नेहमी संतुलित भूमिका घेतली म्हणजे ते आता ह्या बाबतीतही संतुलितच भूमिका घेत आहेत असे मानणे ह्याला शास्त्रिय भाषेत काय म्हणतात ते माहितगार सांगू शकतील. पण असे असु नये असे माझे पर्सनल मत आहे. एक वर्षानंतर... हा धागा आणि त्यामधे केले गेलेला भाजपाचा प्रचार, अतिरंजित दावे, सरकारच्या आरत्या, विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे, आविर्भाव ह्याबद्दल तुम्ही उल्लेखित आयडींनी तुम्ही म्हणता तसे अचूक आणि संयमित प्रतिसाद दिलेले दिसले नाहीत. तेच आपशी संबंधित धाग्यांवर, भाजपच्या धोरणांवर टिका करणार्‍या प्रतिसादांवर हेच आयडी हिरिरीने अभ्यासून प्रतिसाद देतांना, दावे खोडून काढतांना दिसतात. तुम्ही ज्या निष्पक्षतेबद्दल बोलत आहात तो मला तरी दिसत नाही. उदा. आपसेना आणी आप हे वेगवेगळे आहेत ह्याबद्दल बराच वाद लांबला पण तिथे कोणीच मधे पडून श्रीगुरुजींचे दावे निष्पक्षपणे खोडलेले दिसले नाहीत. पण तेच नाना स्कॉच ह्यांनी महागाईवर भाजप सरकार कमी पडले म्हटले तर कोणाकोणाचे किती प्रतिसाद आले ते बघितले. बँकांनी उद्योजकांची कर्जे माफ केली ह्यावर तेच कसे बरोबर ह्याचे उत्तर आले पण कोणाही अभ्यासूंनी त्याबद्दल विरोध केलेला दिसला नाही. हेच करणारे काँग्रेस वा आप सरकार असते तर? कोणाचे कोणाकडे इन्क्लिनेशन असावे ह्याबद्दल प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण त्या इन्क्लिनेशनपायी येणारा शिक्का नको अशी दुटप्पी भूमिका मात्र पटत नाही. निष्पक्ष म्हणवल्या जावे असे वाटत असेल तर प्रत्येक बाबतीत निष्पक्ष असावे. सिलेक्टीव निष्पक्षपणा घेऊ पण त्याचा उल्लेख करु नका हा दांभिकपणा आहे. सरसकट हा अगदी रोजच्या वापरातला शब्द का झाला? कुठल्याही पक्षसमर्थकांप्रमाणे भाजपसमर्थकांमधे अनेक स्तर आहेत, काही खरंच विचार करुन आपल्याच पक्षाला विरोध करणारे आहेत, काही पक्षप्रेमापायी वेडे झालेले आहेत. ह्या दोन्ही टोकांमधेही अनेक प्रकारचे समर्थक आहेत. हे सर्व प्रकारचे समर्थक चर्चांमधे भेटतात. पण जास्त संख्या अशा समर्थकांची आहे जे प.प्रे.वेडे होण्याकडे झुकले आहेत पण शिक्का मात्र आ.पक्षाला विरोध करणार्‍यांचा हवा आहे. मी जेव्हा भक्तांना बोलत असतो तेव्हा खरोखर अभ्यासू असणारांना का झोंबावे? मला इथे कम्युनिस्ट म्हटले गेले, देशद्रोह्याम्चे समर्थक म्हटले गेले, मी अंगाला लावून घेत नाही. कारण मी तसा नाही. पण मी शिक्का मारणार्‍यांना विरोधही करत नाही. व्हाय शुड आय वरी? मला ते माझे सरसकटीकरण केलेले वाटत नाही. मला वाटतं लोकांनी फॅन आणि सपोर्टर ह्यात फरक करायला शिकायला पाहिजे. मी जे बोलतो ते फॅन्ससाठी आहे. सपोर्टरनी अंगाला लावुन घेऊ नये अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 10:19

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by चेक आणि मेट on Tue, 03/08/2016 - 13:31

Permalink

↓

धागा राहू दे मोदीविरोधी,सरकारविरोधी,संघविरोधी गरळ इथे ओकली तरी चालेल. उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर फालतू पिचकार्या मारायची गरज नै.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 15:14

In reply to ↓ by चेक आणि मेट

Permalink

उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर

उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर फालतू पिचकार्या मारायची गरज नै. हे ठरवणारे आपण कोण हो चेमे?? (अशोक सराफच्या अशी ही बनवा बनवी मधील "तुम्ही आमचे कोणssssss?" च्या धरतीवर वाचावे) आयडी वय महिनाभर जेमतेम अन मिजास मालकांची करताय इतके नोंदवतो!
  • Log in or register to post comments

Submitted by चेक आणि मेट on Tue, 03/08/2016 - 21:05

In reply to उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर by नाना स्कॉच

Permalink

↓

हा प्रतिसाद कशाला स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलात? तुम्ही फालतू पिचकार्या मारत नाहीत ना?मग कशाला उपप्रतिसाद देण्याचे कष्ट घेतलेत?
आयडी वय महिनाभर जेमतेम
आयडीच वय महिनाभर आहे,आयडीमागच्या व्यक्तीचं नाही.
मिजास मालकांची करताय इतके नोंदवतो!
अनावाधानाने मला मालक म्हणल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या आयडीचे वय चार महिन्याचे,हे म्हणजे स्वतः अजून रांगत आहात अन् दुसर्याला चालायला येत नाही म्हणून हिणवत आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 21:50

In reply to ↓ by चेक आणि मेट

Permalink

फाट्यावर :)

फाट्यावर :)
  • Log in or register to post comments

Submitted by चेक आणि मेट on Tue, 03/08/2016 - 22:42

In reply to फाट्यावर :) by नाना स्कॉच

Permalink

↓

फाट्यावर मारण्यासाठी "फाट्यावर"असं लिहून प्रतिसाद द्यायची गरज नसते
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 03/09/2016 - 07:40

In reply to ↓ by चेक आणि मेट

Permalink

अहो त्यांच्या id चे वय जरी 4

अहो त्यांच्या id चे वय जरी 4 महिन्याचे असेल तरी ते मिपा कोळून प्यायलेत,त्यांच्या अंगात एखादा जालीय मिस्टर इंडिया आय डी असू शकतो, है कि नाय स्कॉच साहेब।
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/09/2016 - 08:08

In reply to अहो त्यांच्या id चे वय जरी 4 by श्री गावसेना प्रमुख

Permalink

गावसेना प्रमुख दादा,

गावसेना प्रमुख दादा, प्रथम मजला साहेब म्हणल्या बद्दल आभार! ___/\___ बाकी विषयाबद्दल बोलायचे झाल्यास "मांजराने डोळे मिटुन दूध प्यायले तरी.... वगैरे वगैरे" म्हण लागु पड़ते ह्या विषयावर असे वाटते. असो!! चालायचेच!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 15:00

Permalink

या मोदीभक्तांना काय झालय काय?

या मोदीभक्तांना काय झालय काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 03/08/2016 - 16:12

Permalink

आत्ताच ही अवस्था !? अजून

आत्ताच ही अवस्था !? अजून किमान तीन वर्ष आहेत हो...
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 03/08/2016 - 23:12

Permalink

जनसंख्या नियंत्रण योजना -

जनसंख्या नियंत्रण योजना - देशात लोकसंख्येचा स्फोट होऊ नये म्हणून लोकांना कंडोम वापरायला प्रवृत्त करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात कंडोमच्या वापराची मोजमाप आणि त्यात दरवर्षी ५६ टक्के वाढ अनुस्युत आहे. या योजनेची पूर्वतयारी म्हणून सध्या तरुण वर्गाचा कंडोम वापर किती आहे हे तपासून पाहाण्यासाठी फक्त काही विशिष्ट युनिव्हर्सिटीजमध्ये मोजणी चालू आहे. प्राथमिक मोजणीनुसार दररोज फक्त ३००० कंडोम वापरले जातात. छप्पन्न टक्के वाढ होऊन तो आकडा ४६८० वर नेण्यासाठी नोकरशाहीवर दबाव आणण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Wed, 03/09/2016 - 00:47

In reply to जनसंख्या नियंत्रण योजना - by राजेश घासकडवी

Permalink

खिक्क

कंडोम वापरतानाचा सेल्फी काढण्याची सक्ती नाही ना?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/09/2016 - 01:30

In reply to खिक्क by निशांत_खाडे

Permalink

'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय

'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय? ;) मात्र टेक सेल्फी विथ एनीवन योजनेखाली तुम्हाला जर कुठचीही व्यक्ती तुमच्या सेल्फीमध्ये तुमच्याबरोबर हवी असेल तर त्याची सोय होणारच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 03/09/2016 - 03:33

In reply to 'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय by राजेश घासकडवी

Permalink

च्यामारी

'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय? ;)
गुर्जी... धन्य हो =)) =)) =))
मात्र टेक सेल्फी विथ एनीवन योजनेखाली तुम्हाला जर कुठचीही व्यक्ती तुमच्या सेल्फीमध्ये तुमच्याबरोबर हवी असेल तर त्याची सोय होणारच आहे.
याला आणखी खुलवतो म्हटलं तर आमचं सदस्यत्व रद्द व्हायचं =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Wed, 03/09/2016 - 09:18

Permalink

६० वर्षात जमले नाही पण २

६० वर्षात जमले नाही पण २ वर्षात जमले पाहिजे अस कस ?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/09/2016 - 15:22

In reply to ६० वर्षात जमले नाही पण २ by हेमंत लाटकर

Permalink

साठ वर्षात काय जमले नाही

साठ वर्षात काय जमले नाही याबद्दल सांगाल काय लाटकरसर?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/09/2016 - 18:09

Permalink

लोकहो, हा टाइमपासचा धागा आहे.

लोकहो, हा टाइमपासचा धागा आहे. इथेही काय मारामाऱ्या करताय? त्यासाठी इतर धागे आहेतच. आणि तिथे समर्थक आणि विरोधक यांनी चिक्कार घणाघाती चर्चा चालू ठेवलेल्या आहेत. इथे तरी थोडी प्यूअर भंकस चालू द्यात. विनोद आवडला तर हसा आणि सोडून द्या, नाही आवडला तर 'कुछ जम्या नै' म्हणा. पण या युद्धात विनोदबुद्धीचा का बळी देत आहात? थोडी चिलपिल घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/09/2016 - 21:20

Permalink

तडीपार पुनर्वसन योजना -

तडीपार पुनर्वसन योजना - ज्यांना राज्यातून तडीपार होण्याची शिक्षा मिळालेली आहे अशांकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहून त्यांच्या आयुष्याची घडी बसवण्याची व्यवस्था करायची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यांनी चांगली वागणूक दाखवली तर त्यांना बऱ्यापैकी नोकरीही मिळवून देण्याची कलमं त्यात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/10/2016 - 12:17

Permalink

महत्त्वाकांक्षी स्टॉक मार्केट

महत्त्वाकांक्षी स्टॉक मार्केट ऱ्हास योजना - कोण म्हणतं सद्य सरकार उजव्या धोरणाचं आहे? कोण म्हणतं सरकारचं उद्योगपतींशी साटंलोटं आहे? डाव्या धोरणांशी कटिबद्ध राहून कॅपिटॅलिझमचा सर्वनाश करण्यासाठी एका वर्षात स्टॉक मार्केट पंचवीस टक्के उतरवण्याची ही योजना आहे. परकीय शक्ती भारताच्या मार्केटमध्ये पैसे गुंतवून हरामखोर एनजीओंना पैसे देते. त्या गुंतवणुकदारांचं कंबरडं मोडण्यासाठी किंवा त्यांना घाबरवून भारतातल्या उद्योगातले पैसे काढून घ्यायला लावण्याची ही योजना आहे. ४ मार्च २०१५ ते ४ मार्च २०१६ या काळात स्टॉक इन्व्हेस्टर्सचे १४ लाख कोटी रुपये नष्ट करणाऱ्या या योजनेला लाल सलाम!
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sat, 03/12/2016 - 12:12

Permalink

शशी थरूर यांचे बजेटवर भाष्य

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Posted by Unofficial: Subramaniam Swamy on Friday, March 11, 2016
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com