Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Sun, 03/06/2016 - 12:38
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
मेक-अप इंडिया- या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल. वेक अप इंडिया- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल. शिवाय आपल्या वाढदिवसाच्या वगैरे दिवशी मोदींच्या आवाजातील शुभेच्छा सन्देश देईल. एक कप इंडिया- प्रत्येक तालुक्याच्या गावी चहाचे दूकान उघडण्यात येणार असून तेथे रोज सकाळी 4-5 या वेळेत प्रत्येकास एक कप चहा मोफत देणेत येईल. स्वस्त भारत- मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना. या योजनेअन्तर्गत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये ₹1 इतक्या कमी किमतित गहु, तांदूळ इ. सोबत तुरडाळ, उड़ीदडाळ इ. सारखी कडधान्ये आणि डाळी पहावयास मिळतील. फस्त भारत- सर्व भ्रष्टाचारी, गुंड, भेसळखोर लोकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. टेक अप इंडिया- या योजनेत उद्योजकाना शेतकऱ्यांच्या जमीनी कमी भावात उपलब्ध करून दिल्या जातील. फेक अप इंडिया- खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली. या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत- 1. आधार कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. ड्राइविंग लैसेंस 4. शाळा सोडल्याचा दाखला 5. राशन कार्ड 6. रहीवासी दाखला 7. 7/12 उतारा 8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ.
  • Log in or register to post comments
  • 17115 views

प्रतिक्रिया

Submitted by उगा काहितरीच on Sun, 03/06/2016 - 12:58

Permalink

काय राव आता असे पण धागे

काय राव आता असे पण धागे वाचावे लागतील काय मिपावर ? तुम्हाला नाही आवडत मोदी सरकारच्या योजना तर प्रत्येक योजनेविषयी थोडा अभ्यास करून त्या कशा फायदेशीर नाहीत ते स्पष्ट करा. उगात काय असले धागे काढुन फायदा नाही. मी तर संपादक मंडळींना विनंती करेल की हा धागा उडवण्यात यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 03/06/2016 - 13:18

Permalink

मन्नैरहेगा - ही फसलेली योजना

मन्नैरहेगा - ही फसलेली योजना केवळ ती कशी फसलेली आहे हे दाखवण्याच्या शोसाठी ठेवण्यात येईल. आणि निव्वळ शोसाठी ठेवलेल्या गर्लफ्रेंडप्रमाणे तिला ठेवलेलीच आहे तर तिला ३५००० कोटी देऊन 'बघा बघा, तरीही कशी फेल गेली' असं तीन वर्षांनी सिद्ध करून दाखवण्यात येईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 03/06/2016 - 13:27

Permalink

योजनेच्या आयड्या लेखकाच्या,

योजनेच्या आयड्या लेखकाच्या, नाव मोदीचे. आखिर माजरा क्या है? मोदीचे नाव घेतल्याशिवाय काही सादर करायला बंदी आलीय काय? मला वाटले आली एखादी नवीन स्कीम. निदान पोस्टरांचे तरी काम मिळेल. :( . ओ संपादक, उडवा हो. टाइम्पास करायला कन्हैय्या हाय सध्या.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 03/06/2016 - 13:32

Permalink

निषेध!

धागाकर्त्याचे मिपावय ६ महिने १ दिवस. एकाही धाग्यावर १० पेक्षा जास्त प्रतिसाद नाहीत. एका नवलेखकाला लिखाणापासुन परावृत्त करण्याचा निषेध. कृहघ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 03/06/2016 - 13:36

Permalink

हा धागा उडवण्याच्या मागण्या

हा धागा उडवण्याच्या मागण्या का होत आहेत कळत नाही. हलकीफुलकी टिंगल, कोपरखळ्या मारायला काय हरकत आहे? एकीकडे कडवट धाग्यांवर घणाघाती चर्चा होतात त्याचा वीट येतो म्हणून संपादक मंडळाने विडंबन स्पर्धेचा उत्तम उपाय सुचवलेला आहे. त्यातही राजकारण हा विषय आहेच. मग कवितेत गंमतजंमत करायची तशीच इथेही करू की. कोणी जर 'राहुल गांधींच्या भावी योजना' अशी टिंगल करणारा धागा काढला तर तिथेही करू टिंगल. व्हाय सो सीरियस?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 03/06/2016 - 13:44

In reply to हा धागा उडवण्याच्या मागण्या by राजेश घासकडवी

Permalink

सहमत ओ गुर्जी.

सहमत ओ गुर्जी. तुम्ही कधी चुकीचे बोललायत का कधी. कधी कधी फारच असहिष्णू वागतो बघा आम्ही. माझेच चुकले. राहु द्या धागा. वाटल्यास राकुंना परत बोलावून सेपरेट सेपरेट फुसके बार लावले तरी करु टिंगल. हाकानाका.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 03/06/2016 - 13:54

In reply to सहमत ओ गुर्जी. by अभ्या..

Permalink

राकुंचं आणि त्यांच्या शेप्रेट

राकुंचं आणि त्यांच्या शेप्रेट बारांचं नाव काढून तुम्ही अगदी माझ्या वर्मावर बोट ठेवलंत हो! ;) माझंच चुकलं. तुमच्यापुढे साष्टांग नमस्कार आणि सपशेल माफी. ओ संपादक मंडळ भौजी, हे अभ्या.. जे काय म्हंटात ते करा ब्वॉ. मी यांच्या शब्दाबाहेर नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 03/06/2016 - 14:12

In reply to राकुंचं आणि त्यांच्या शेप्रेट by राजेश घासकडवी

Permalink

असो

असो गुरुजी. राकु चीज ही ऐसी है. ;) जरा थोडा वेळ काढून आमच्या शंकेचे http://www.misalpav.com/comment/812700#comment-812700 निराकरण करा ना प्लीज. जरा उत्क्रांतीसाठी अडलाय विषय.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 03/06/2016 - 14:47

In reply to असो by अभ्या..

Permalink

उत्तर दिलेलं आहे.http://www

उत्तर दिलेलं आहे. http://www.misalpav.com/comment/813299#comment-813299
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 03/06/2016 - 15:15

In reply to उत्तर दिलेलं आहे.http://www by राजेश घासकडवी

Permalink

थ्यांक्सलॉट गुरुजी. समजले.

थ्यांक्सलॉट गुरुजी. समजले.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sun, 03/06/2016 - 13:58

Permalink

ओ दारुगडे साहेब अँप ची लिंक

ओ दारुगडे साहेब अँप ची लिंक द्या बरं, डाउनलोड करून घ्यावं म्हणतोय।
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 03/06/2016 - 14:01

Permalink

चांगलं लेखन! satire आवडलं.

चांगलं लेखन! satire आवडलं. धागा उडविण्याची मागणी चुकीची आहे. अजून जरा विस्तृत व जास्त उपहासात्मक लिहायला हवं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 03/06/2016 - 15:25

In reply to चांगलं लेखन! satire आवडलं. by श्रीगुरुजी

Permalink

काय बात है!

सटायरला कुठे तरी वास्तविकतेचा स्पर्श असतो त्याशिवाय ती पटत नाही याची कल्पनाच दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गब्रिएल on Sun, 03/06/2016 - 20:12

In reply to काय बात है! by विवेक ठाकूर

Permalink

आत्ता ! अरारारारा ! विठा तुमी

आत्ता ! अरारारारा ! विठा तुमी गुर्जिंना इरोध कर्ता कर्ता इक्त व्हावून ग्येला की तुमी मोदींची बाजू घ्येऊ र्‍हायलाय हे तुमी ठार इसारला की वो; =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 03/06/2016 - 15:02

Permalink

फेक अप इंडिया !

खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली.
एकदम भारी !
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊंचे भाऊ on Sun, 03/06/2016 - 19:56

In reply to फेक अप इंडिया ! by विवेक ठाकूर

Permalink

+1

मस्त विनोद....!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 03/06/2016 - 16:31

Permalink

टेक अ सेल्फी विथ एनीवन योजना

टेक अ सेल्फी विथ एनीवन योजना - यात आपण फक्त आपला सेल्फी काढायचा, मात्र त्यात कोणतीही इतर व्यक्ती अवतरू शकते. म्हणजे गांधीजींच्या फोटोत त्यांच्या नकळत त्यांच्या नाकाला नाक लावून बसलेली तरुणी येते आणि गांधी म्हणतात, अरे, ही कशी आली इथे? ओबामाच्या फोटोतल्या टीव्हीत मोदी दिसतात, मोदींच्या हेलिकॉप्टरच्या खिडकीत चैन्नई दिसतं... स्टालिनच्या फोटोंमध्ये बरोब्बर उलटं व्हायचं - त्याच्याबरोबर एकेकाळी दिसलेले लोक नाहीसे झाले किंवा निव्वळ त्याच्या मर्जीतून उतरले (हे खरंतर वेगळं आहे का? पण असो.) तर त्याच्याबरोबर काढलेल्या फोटोंमधूनही ते नाहीसे व्हायचे. आपल्याकडे बेरजेचं राजकारण आहे, वजाबाकीचं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 03/06/2016 - 16:54

In reply to टेक अ सेल्फी विथ एनीवन योजना by राजेश घासकडवी

Permalink

राघा ती योजना अशी आहे :

टेक अ सेल्फी योजना : कसाही आणि कुठूनही फोटो काढा त्यात मोदीच दिसले पाहिजेत. ही योजना खरं तर स्मार्ट फोन आल्यापसनं सुरु झाली पण तीची लोकप्रियता स्वतः पंतप्रधानांनी वाढवली. मतदान केल्यावर त्यांनी स्वतःचा सेल्फी मोठ्या दिमाखात प्रसिद्ध करुन जनतेला मतदानाला उद्युक्त केलं. ते करतांना स्वतःच्या खिश्यावरचं कमळ त्यात खुबीनं टिपलं पण लगेच: अरेच्या, हे माझ्या लक्षातच आलं नाही अशी कोलांटी उडी मारली.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 03/06/2016 - 19:57

In reply to राघा ती योजना अशी आहे : by विवेक ठाकूर

Permalink

ह्या न्यायाने एका पक्षाच्या

ह्या न्यायाने एका पक्षाच्या खात्या आणि धुत्या दोन्ही हाताचे पंजे कलम करुन मगचं मतदानाला पाठवलं पाहिजे नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sun, 03/06/2016 - 20:19

In reply to ह्या न्यायाने एका पक्षाच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

कलम नै काय.. कमल.

कलम नै काय.. कमल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 03/06/2016 - 20:26

In reply to राघा ती योजना अशी आहे : by विवेक ठाकूर

Permalink

मतदान केल्यावर त्यांनी

मतदान केल्यावर त्यांनी स्वतःचा सेल्फी मोठ्या दिमाखात प्रसिद्ध करुन जनतेला मतदानाला उद्युक्त केलं.
काय सांगताय? म्हणजे सेल्फी काढली नसती तर लोकांनी मतदान केलंच नसतं की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on Sun, 03/06/2016 - 19:52

Permalink

छान औपरोधिक आहे की हे! ठेवा

छान औपरोधिक आहे की हे! ठेवा धागा, उडवू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 03/07/2016 - 00:15

Permalink

तूरडाळ म्युझियम - अजून काही

तूरडाळ म्युझियम - अजून काही लिहिण्याची गरजच नाही. सिर्फ नामपरीच हम फिदा है!
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 03/08/2016 - 00:34

Permalink

हाहाहा..

दोरुगडे सर, हे आपले 'धोरण' व 'प्रकटन' कुठल्या आधारावर आहे हे सांगता का जरा? सटायरला थोडासा तरी वास्तवाचा स्पर्श असावा की नको? निव्वळच बेसलेस असून कसे चालेल?
मन्नैरहेगा - ही फसलेली योजना केवळ ती कशी फसलेली आहे हे दाखवण्याच्या शोसाठी ठेवण्यात येईल. आणि निव्वळ शोसाठी ठेवलेल्या गर्लफ्रेंडप्रमाणे तिला ठेवलेलीच आहे तर तिला ३५००० कोटी देऊन 'बघा बघा, तरीही कशी फेल गेली' असं तीन वर्षांनी सिद्ध करून दाखवण्यात येईल.
हा घासकवडी सरांचा प्रतिसाद तुमच्या पूर्ण लिखाणापेक्षा अव्वल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Ram ram on Tue, 03/08/2016 - 07:27

Permalink

मनैरहेगा

रा घा जी यंत्राचा शाेध माणसाचे श्रम कमी व्हावे म्हणून लागला आहे, पण यांना मजूर हा मजूरच राहावा असे वाटते. मनरेगा मधील बहुतेक कामे सरकारला फसवुन यंत्राने खेली जातात, कितीही आनलाइन च्या गप्पा मारल्या तरी पाणी मुरतेच, फार दुष्काळाच्या ठिकाणीच खरे मजूर काम करतात, मजूराने पुढे जावु नये यासाठी ही याेजना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 03/08/2016 - 08:00

In reply to मनैरहेगा by Ram ram

Permalink

अगदी बरोबर... ही फसलेली आणि

अगदी बरोबर... ही फसलेली आणि चुकीची योजना आहे असं मोदी सरकार उगाच नाही सांगतंय. आणि म्हणूनच त्यांनी त्या योजनेत ३५००० का कायसे कोटी रुपये घालून ही योजना तरीही फसेल असं दाखवलेलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 08:01

Permalink

प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

घासकड़वींच्या बाबतीत प्रश्नच नाही! वो मंझे हुए लेखक है. मोदींच्या नवनवीन योजना कशा असतात, त्यांची नावे कशी असतात, त्यांचे वृत्तपत्रात वर्णन कसे येते हे लक्षात घेवून मी हे लेखन केले होते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. शिवाय मुळातच या कल्पनेचा जीव लहान. आणखी जास्त लिहिता आलं असतं पण त्यामुळे गम्मत हरवली असती. लिखानामागे रचना आहे- सुरुवात हलक्या-फुलक्या कल्पनेने करून हळूहळू त्यातील उपाहासाचा डोस वाढवत नेणें. मला जे सांगायचं होतं ते शेवटच्या भागात येतं. मी मोदी विरोधक नव्हतो. निवडणुकीच्या वेळी उलट मी त्यांना पाठींबाच दिला होता. मात्र पुढे माझा हळूहळू भ्रमनिरास होत गेला. अर्थात अजूनही मी त्यांच्या हातून चांगलं काही घडेल अशी अपेक्षा सोडलेली नाहिये.
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 03/08/2016 - 12:00

In reply to प्रतिसादांबद्दल आभारी आहे. by डॉ. एस. पी. दोरुगडे

Permalink

प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचं.

प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचय औ.. तुम्ही जे लिहिताय त्यात मला काहीच उपहासात्मक काहीच वाटत नाहीये. उगाच बालिशपणे लिहिल्यासारखे वाटतेय. एखादा मोदी भक्त जरी या धाग्यावर आला, तरी त्याला प्रतिसादाच द्यावा वाटणार नाही इतके कमकुवत आहेत तुमचे मुद्दे. थोडासा जरी वास्तवाचा स्पर्श याला असता तरी हे भारी झाले असते. उगाच स्वतःच्या आयड्या कशाला मोदींच्या नावाने खपवताय? आणि तुम्ही दिलेला हा प्रतिसाद म्हणजे तुमच्या लेखनाचे तुम्हीच केलेले समीक्षण असल्यासारखा आहे. कोण म्हणतो या कल्पनेचा जीव लहान आहे? घासकड़वींनी दिलेल्या प्रतिसादावर एक वेगळा धागा काढला तरी त्यावर चर्चा होऊ शकते इतका तो तगडा आहे. उपहासात्मकही आहेच. प्रोब्लेम कल्पनेचा नाही तर तुमच्या मर्यादेचा आहे. तुम्हाला सुचत नाही म्हणा किंवा तुम्हाला मोदींच्या योजनाविषयी माहितीच नाही म्हणा कारण काहीही असो पण या लिखाणाचा आणि मोदींचा काहीच संबंध नाहीये.
या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत- 1. आधार कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. ड्राइविंग लैसेंस 4. शाळा सोडल्याचा दाखला 5. राशन कार्ड 6. रहीवासी दाखला 7. 7/12 उतारा 8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ.
हे नेमकं कशासाठी लिहलयत तेही सांगून टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 12:20

In reply to प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचं. by निशांत_खाडे

Permalink

असं का? बरं. आणि?

असं का? बरं. आणि?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 15:28

In reply to प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचं. by निशांत_खाडे

Permalink

१. समीक्षा आणि लेखनामागिल

१. समीक्षा आणि लेखनामागिल विचारप्रक्रिया यात फरक असतो. २. कुणासही चिडवावं अथवा त्यांच्या प्रतिक्रिया आजमाव्यात असा उद्देश कधीच नसतो. ३. मोदींच्या योजनांमधील उघड-उघड डिसणाऱ्या गुण-अवगुणांचे बाह्यानुकरण करणे अशी कल्पना होती. त्यामुळे जीव लहान म्हटले. अर्थात त्यातही कल्पनेच्या भरा-या खूप मारता आल्या असत्या (आणखी योजना, त्यांची प्रक्रिया, टेंडर, अनुदान, स्पर्धा, निकाल, मीडिया, प्रचार, सेलिब्रिटी इ.इ.). पण मी ते टाळलं. जी गोष्ट मोजक्या शब्दात मांडणं शक्य असतं ती उगाच ताणायाची का? ४. ह्या लेखनातील वास्तव गोष्टी (अनुक्रमे नाहीत)- मोदी, सेल्फ़ी, महागाई, भ्रष्टाचार, गुंडगिरी, उद्योजक, शेतकरी, थापेबाजी, चहा, ऍप, योजना, कांग्रेस, जमीन, प्रशिक्षण, पुरस्कार, नमो नमः, रिंगटोन इ. इ.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 15:32

In reply to प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचं. by निशांत_खाडे

Permalink

हां, ते शेवटचं राहिलं-

हां, ते शेवटचं राहिलं- सरकारी कामांसाठी खूपशी कागदपत्रे लागतात. त्यावर रोख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 03/08/2016 - 15:46

In reply to हां, ते शेवटचं राहिलं- by डॉ. एस. पी. दोरुगडे

Permalink

आता प्रत्येक वेळी जेव्हा आपण

आता प्रत्येक वेळी जेव्हा आपण लिहाल, त्यावेळी लेखातच असे स्पष्टीकरणहि करत जा. उगाच वाचकांना फसवल्यासारखे वाटायला नको. आपण अर्थ सांगायच्या आधी मी आपला दहा-बारा अर्थ काढून यातला कुठला चपखल बसतो ते तपासात होतो. एवढी विनंती लक्षात ठेवा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 15:52

In reply to आता प्रत्येक वेळी जेव्हा आपण by निशांत_खाडे

Permalink

समझने वालोंको...

ज्या लोकांना समजत (पक्षी: कळत) नाही. त्याच लोकांना स्पष्टीकरण देतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 03/08/2016 - 08:58

Permalink

डॉ. एस पी. तुम्ही बिन्दास

डॉ. एस पी. तुम्ही बिन्दास लिवाहो. ह्यांना विरोध तर सहन होतच नाही, जरा कुठे उपरोध झाला तरी भयंकर दुखतं. तुम्ही आगपेटीची काडी फक्त दाखवाल हे सार्‍या शहरातले पाण्याचे टँकर घेऊन तुमच्या अंगावर ओततील. लैच इन्सिक्युरिटी ब्वा! अशी बेचैनी का आहे काय कळत नाही. मजा तेव्हाच येते जेव्हा आपल्या बोलण्याने समोरचा अंगावर घेऊन घेउन अजून चिडतो आणि थयथयाट करतो. तुम और लिखो. हम समर्थन करते है.
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 03/08/2016 - 12:04

In reply to डॉ. एस पी. तुम्ही बिन्दास by तर्राट जोकर

Permalink

तजो..

तजोशेठ,
ह्यांना विरोध तर सहन होतच नाही, जरा कुठे उपरोध झाला तरी भयंकर दुखतं.
संदर्भ कळेल काय? 'ह्यांना' म्हणजे कुणाला?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 03/08/2016 - 13:44

In reply to तजो.. by निशांत_खाडे

Permalink

मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या

मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या मोदीविरोधात जाणारा एक शब्दही दिसला तर पिसाळल्यागत करतात. झुंडीने हल्ला करतात. एका प्रतिसादावर चार चार लोक प्रतिवाद करतात. वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात. काही सुचले नाही की 'तेव्हा कुठे होतात?' हा फेवरिट प्रश्न काढतात. काहीही करुन कसेही करुन मोदी-भाजप विरोध करणार्‍यास सळो की पळो करुन सोडतात. मोदिंच्या बाबतीत विरोध, खिल्ली, विनोद, आरोप काहीही असो त्यांना फक्त अतिविखारी द्वेषच दिसतो. कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्, नंतर तुम्हाला मोदीविरोधाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणत तोंडावर हात ठेवून बो करत सुटतात. जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात. जणू इथे एक उणादुणा शब्द सिद्ध झाला तर तिकडे दिल्लीत इंद्राचे आसन डळमळीतच होणार आहे. एवढी असुरक्षितता पाहिली आहे का कुठे?
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 03/08/2016 - 15:39

In reply to मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या by तर्राट जोकर

Permalink

खरय. फक्त जालावरच नाही, तर

खरय. फक्त जालावरच नाही, तर सगळीकडेच हे लोक आजकाल बोकाळले आहेत. या दोन चार दिवसात मिपावरील काही धाग्यावर चाललेले घणाघाती वादविवाद पाहिले तर तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य आहे हे मान्यच करावे लागेल. पण मग समजा पूर्ण डोळसपणे एखादा व्यक्ती काही रास्त कारणांसाठी मोदींचे समर्थन करत असेल (अगदीच भक्ती वैगेरे नाही) तर त्याला विरोध करणारे लोकही इतके वरच्या टोकाला का बरे जातात?
  • वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात
  • कुठे वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्
  • जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात
हे तीन मुद्दे मला मोदीभक्त आणि मोदी विरोधक यांच्यात समान वाटतात. दोन्ही गटातले लोकही हेच करतात. मुळात एखाद्या व्यक्तीचे समर्थन करायला किंवा आपल्याला ज्या व्यक्तीचे पटते त्या व्यक्तीवर होणाऱ्या टीकेचे खंडन करायला काहीच हरकत नसावी. तसेच ज्या व्यक्तीचे पटत नाही त्या व्यक्तीवर टीका करण्यातही काहीच तोटा नाही, उलट आपली समज सुकीची आहे की बरोबर यावर काही चांगली चर्चा घडून येते, पण हे मोदींच्या बाबतीत लागू पडत नाही. जिथे मोदींविषयी एखादी चांगली गोष्ट बोलली जाते तिथे विरोधक येउन वाद निर्माण करतात. आणि जिथे मोदींवर थोडीशीही टीका होते तिथे वाद घालायला मोदिभक्त येतात. वरून स्वतःला मोदिभक्त किंवा मोदीविरोधी म्हणवून घ्यायचीही लाज वाटत नाही. तर, मोरल ऑफ द स्टोरी इज 'मोदिभक्त' हा मोदी समर्थनाचा आणि 'मोदीविरोधक' हा मोदि टीकेचा व्यत्यास आहे. म्हणजे "मोदीने कितीही चांगले केले तरी आम्ही टीकाच करू" आणि "मोदीने कितीही वाईट केले तरी आम्ही समर्थनच करू" असल्या अजेन्ड्यांचे दोन ग्रुप सगळीकडे धुडगूस घालतायत.मग माझ्यासारख्या 'भक्त' व 'विरोधक' दोन्ही नसलेल्या एखाद्या माणसाने काहीही मत मांडू नये म्हणजे हे लोक आपले क्लासिफिकेशन करणार नाहीत असा विचार करणे शहाणपणाचे आहे काय? रच्याकने, दोरुगडे साहेबांचा हा लेख मला का आवडला नाही हे मी स्पष्ट केलेच आहे. मग माझ्या तक्रारींचे उत्तर न देता दोरुगडे साहेब म्हणतात कि या 'मोदिभाक्तांचे' काय करावे? आता माझ्या कुठल्या प्रतिसादात असे दिसते कि मी मोदिभक्त आहे? का माझ्या सर्व तक्रारींचे हे एकच उत्तर त्यांना सापडते? मग मी त्यांना चरम मोदी विरोधक म्हटलो तर काय होईल? परत ते मूर्खपणाचे वादविवाद. चारपाच मिपाकर माझ्या बाजूने तर चारपाच मिपाकर त्यांच्या बाजूने. इच्छा नसताना मला मोदी भक्त त्यांच्या घोळक्यात सामील करून घेतील. पाठींबा मिळत आहे हे ओळखून आमीही तिथे घुसुच. हेच चित्र आजकाल सगळीकडे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 16:06

In reply to खरय. फक्त जालावरच नाही, तर by निशांत_खाडे

Permalink

@ निशांत_खाडे साहेब

आधी स्पष्टीकरण देत नाही म्हणायचं आणि ते दिलं की (तरी) तक्रार करायची. मोदीभक्त तुम्हाला कुठे म्हटले आहे? उगाच का ओढवून घेताय?
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 03/08/2016 - 16:21

In reply to @ निशांत_खाडे साहेब by डॉ. एस. पी. दोरुगडे

Permalink

याच धाग्यावर

याच धाग्यावर १२:२० ला आपण दिलेला प्रतिसाद आणि १५:०० ला दिलेले प्रतिसाद मी वाचलेले होते, बाकी जेव्हा आपण स्पष्टीकरण दिलेत तेव्हा मी हा प्रतिसाद लिहित होतो राग येऊ देवू नका. आणि माझे हे प्रश्न तजोशेठ यांना आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Tue, 03/08/2016 - 16:25

In reply to याच धाग्यावर by निशांत_खाडे

Permalink

ठीक.

ठीक.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 03/08/2016 - 17:05

In reply to खरय. फक्त जालावरच नाही, तर by निशांत_खाडे

Permalink

तुमचे सर्व विचार पटले.

तुमचे सर्व विचार पटले. सर्वप्रथम, मोदी काम करत आहेतच. १९९१ नंतर होणारा एक मोठा बदल मोदी आल्यापासून भारतात झालाय. सकारात्मकता वाढलीये, उर्जा वाढलीये. काही केंद्रिय मंत्री जबरदस्त काम करत आहेत. स्वराज, पर्रिकर, प्रभू, गडकरी, गोयल ह्यांची खाती अपेक्षेपेक्षा कैक वेगाने आणि क्षमतेने काम करत आहेत. अनेक चांगले निर्णय घेतले गेले, युपीएच्याही काही योजना रेंगाळत पडलेल्या त्या निगुतीने मार्गी लावल्या गेल्या. त्याचबरोबर काही घुमजावही आहेत. काही प्रकरणं नीट हाताळण्यात कमीही पडले आहेत. सरतेशेवटी मी असे म्हणेन की मागच्या दोन्ही सरकारपेक्षा भाजप हे ३०-४०% तरी अधिक चांगलं काम करत आहेत. अगदी आकाशात उडायच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण चालत होतो, आता धावण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. मागच्या सरकारांनीही बरीच चांगली कामं केलीत, त्यांचे श्रेय त्यांनाही द्यायला हवे, त्यांच्या काळात आपण चालता चालता थांबतो की काय अशी भीती वाटत होती, ती आतातरी नाही. दुसरा मुद्दा. भक्त-विरोधक. कोणी म्हणो न म्हणो हा एक गंभीर प्रश्न आहेच. थोडं मागे जाऊन बघितलं ही सुरुवात मोदीभक्तांनी केली आहे. जालावर आज आहेत तसे व तितके मोदीविरोधक कधीच नव्हते. जे मोदीविरोधक आहेत ते एकेकाळी न्युट्रल होते, कित्येक तर कट्टर काँग्रेसविरोधक होते. अनेकांनी भाजपचे २०१४ साठी कँपेनिंगही केलंय. पण जसे मोदी पंतप्रधान झाले तसे मोदीभक्त पिसाटले, त्यांना हर्षवायु झाला. रोज नवीन नवीन बाता मारल्या जाउ लागल्या, अतिशयोक्तीची परमावधी, तथ्यांना सोयिस्करपद्धतीने मांडून मोदी कसे महान आहेत ह्याचा रातंदिन घोषा लावल्या जाऊ लागला. सोशल मिडियावर फोटोशॉप इमेजेसची रेलचेल होउ लागली. हे तर आहेच पण भाजपशी संबंधित अनेक फ्रिंज एलिमेंट्स नी उचल खाल्ली. विकासाचा मुखवटा घेऊन निवडणूक लढवलेल्या भाजपने ह्या पिलावळींना शांत करन्याबद्दल काहीच केले नाही. उलट तेव्हा तुम्ही कोठे होते चे नारे सुरु केले. हे सगळे बघून माझ्यासारखे न्युट्रल लोक भडकणारच. ते भडकले तर त्यांना खान्ग्रेसी, आप्टार्ड्स, फुरोगामी, इत्यादी लेबलं लावून चिडवले जौ लागले. जो प्रश्न करेल तो कॉन्ग्रेसचा गुलाम आहे अशी मानहानी सुरु झाली. सगळीकडे नुसता बेलगाम धुमाकूळ ह्या भक्तांनी घालायला लागल्यावर, वरुन सरकारची त्यास साथ असल्यावर धुमश्चक्री रोखणार कशी? माझ्यासारख्या न्युट्रल लोकांवर मोदी महानच आहेत हे मान्य करा असा अघोषित दबाव आनला जाऊ. भाजपाला आणले देशाचा विकास करायला, ते सोडून हे मोदींची आरती दिन-रात गाऊ लागले तर कुणाच्याही डोक्यात जानार. शेवटी मोदीही एक माणूस आहेत, त्यांनी जादूगार असावे, मसिहा असावे अशी आमची कल्पना नव्हती. त्यांनाही मर्यादा असणार, ह्या विशालकाय देशाला सांभाळतांना हजार खटपटी, लटपटी, वेगवेगली माणसे, त्यांचे टॅण्ट्रम्स सांभाळायला लागनार हेही समजते. मोदी एकटे काहीच करु शकत नाहीत पण करण्याचे स्फुल्लिंग चेतवू शकतात. त्यांची भाषणे स्फूर्तीदायक असतात. कामही नीट होतंय. पण अशा जमीनीवर पाय असलेल्या व त्याची चांगली जाण असलेल्या नेत्याला हे भक्त लोक उगाच तारणहार, सर्वव्यापी परमेश्वराच्या ठिकाणी ठेवायला लागले तर जमणार नाहीच. मोदींवर गुजरात दंगलीचा आरोप २००२ पासुन सतत चालू आहे, तो आरोपाचा लोड घेणं मोदींनी केव्हाच सोडून दिलंय. पण राजदिप-बरखा द्वयींनी इतकं हॉण्टींग केलंय की विरोधक मोदींबद्द्ल काही बोलला की तो राजदिप-बरखाचेच अपत्य आहे असे समजून तुटून पडतात. असे अनेक मुद्दे आहेत. भक्तांचे प्रतिसाद बघितले की एकाच साच्यातले वाटतात. मिपावर भाजपसमर्थक असले तरी बहुसंख्य लोक विचार, अभ्यास करुन प्रतिसाद देत असतात. हा दर्जा मात्र सोशलमिडीयावर नाही. माझे भाजप समर्थकांना इतकेच म्हणणे आहे की बाबांनो, चूकत नाही असा जगात कोणी माणूस नाही. आपली चूक असेल तर मन मोठं करुन मान्य करायला शिका. इथे कोणी टिका केली तर लगेच भाजपचं सरकार अल्पमतात येऊन पडणार नाही. पाच वर्ष पुर्ण होतील. थोडा आत्मविश्वास ठेवा आणि दुर्लक्ष करायला शिका. वातावरण शांत ठेवाल तर येणार्‍या सर्व टर्म्स तुमच्याच असतील. चांगल्या आणि सत्य बातम्या कुठलाही अभिनिवेश न दाखवता द्या. टिकेवर रिअ‍ॅक्ट होऊ नका, योग्य असेल तिथे रिस्पॉन्स करा. अन्य्था दुर्लक्ष करा. टिकाकारांना उत्तर देऊन तुम्ही त्यांना महत्त्व देताय. काँग्रेसकडून हा एकमेव चांगला गुण घ्या. ते कधीच आक्रस्ताळेपणाने उत्तर देत बसत नाहीत. तुम्ही सरकारला जमत असेल तर जनमत कळवत राहा. त्यायोगे सरकार सकारात्मक वातावरनासाठी प्रयत्न करेल. आम्हीही सहकार्य करु. बाकी काँग्रेस व इतर लोक आपल्या कर्माने मरतील. त्यांची चिंता, राहुल, केजरी यांना प्रत्येक बाबतीत ओढणे उपयोगाचे नाही. देशाने भाजपाला पूर्ण बहुमत दिले आहे. त्याचा अपमान करु नका. जमिनीवर राहा. प्रगती करा. आपोआप लोक डोक्यावर घेतील. आधीच नाचायला लागलेत तर विसरु नका हा भारत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 03/08/2016 - 17:23

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

प्रतिसाद आवडला व पटलाही.

प्रतिसाद आवडला व पटलाही.
टिकाकारांना उत्तर देऊन तुम्ही त्यांना महत्त्व देताय. काँग्रेसकडून हा एकमेव चांगला गुण घ्या. ते कधीच आक्रस्ताळेपणाने उत्तर देत बसत नाहीत.
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 03/08/2016 - 17:34

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 17:43

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

+1000

+1000
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 03/08/2016 - 18:14

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला.
बाबांनो, चूकत नाही असा जगात कोणी माणूस नाही. आपली चूक असेल तर मन मोठं करुन मान्य करायला शिका.
हेच म्हणणं असतं. अगदी साधीशी चूक दाखवली तरी 'ही नाहीच्चे चूक' किंवा 'त्यांनी असंच केलं होतं, तेव्हा का नाही बोललात?' असा प्रतिवाद होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 03/08/2016 - 18:36

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

एखाद्या गोष्टीवर टीका केली

एखाद्या गोष्टीवर टीका केली म्हणजे सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्यासारख डीफेन्सिव होउ नये .. झालेली चूक मान्य करून पुढे होणे.. पण भक्तांना काही चुकतय हा विचारच पण सहन होत नाही.. प्रत्येक गोष्ट जस्टीफाय करायची प्रचंड धडपड चालू असते.. याबाबतीत केजरीवालच निश्चित कौतुक आहे.. ४५ दिवसात सरकार सोडण्याची चूक मनमोकळेपणाने कबूल केली.. अशा गोष्टी आज राजकारणात फार क्वचित दिसतात. (हे कौतुकदेखिल बर्‍याच जणांना सहन होणार नाहीये) पण नशा/उन्माद/विखार इतका वाढलाय की आपापले गाडे रेटणे सुरुच राहाते.. हे ही विसरले जाते की मोदींना ज्यांनी निवडून दिलय त्यांच्यावरसुद्धा आपण चिखलफेक करतोय..
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 03/08/2016 - 19:22

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

लाखो बातो की एक बात

योग्य प्रतिसाद !
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Tue, 03/08/2016 - 20:13

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

कधी नाही ते जोकर शी सहमत :)

कधी नाही ते जोकर शी सहमत :)
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Tue, 03/08/2016 - 21:43

In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर

Permalink

त.जो., प्रतिसाद खूप आवडला.

त.जो., प्रतिसाद खूप आवडला. मोदींचे आंधळे समर्थक (भक्त) आणि आंधळे विरोधक या दोन्ही बाजूंचा वीट आला आहे. पण बांधीव टीकेचा असलेला अभाव हेही एक कारण आहे भक्तांची संख्या आणि तीव्रता वाढायला. काँग्रेस च्या नंतरची पोकळी भरून काढण्याच्या नादात केजरीवाल समर्थक (टार्ड) लोकांनी याला मदतच केली आहे. सध्याच्या राष्ट्रीय राजकारणात जागा म्हणजे मोदींवर उभा दावा अशी भूमिका सुरुवातीच्या थोड्याच कालावधीत आआप ने घेतल्याने याला हातभार लागला आहे असे माझे मत आहे. बांधीव टिकेअभावी सरकारचे फावेल आणि सरधोपट निर्णय घेतले जातील हे कोणीही लक्षात न घेता नुसते बेछुट झाले आहेत. याने भाजपचे काही झाले तर फायदेच होतील त्यामुळे तेही एक डोळा बंद करून आहेत. एकुणात काय, मोदी हे केंद्रस्थान न ठेवता 'सरकार' हे केंद्रस्थानी ठेवून टीका किंवा समर्थन केलं तर बरे राहील. त्यामुळे मोदीही 'मैने' कर दिखाया वरून 'हमने' वर येण्याची परिस्थिती तयार होवू शकते. असो, दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/09/2016 - 00:32

In reply to त.जो., प्रतिसाद खूप आवडला. by इष्टुर फाकडा

Permalink

धन्यवाद. तुमच्या प्रतिसादाशी

धन्यवाद. तुमच्या प्रतिसादाशी बर्‍याच अंशी सहमत. विशेषतः बांधीव टिकेचा अभाव हा मुद्दा आवडला. तसेच केंद्रसरकारला सतत मोदीसरकार म्हणणेही सुरुवाती पासून आवडलेले नव्हते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com