Skip to main content

मोदी सरकारच्या नवीन योजना

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी रविवार, 06/03/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मेक-अप इंडिया- या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल. वेक अप इंडिया- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल. शिवाय आपल्या वाढदिवसाच्या वगैरे दिवशी मोदींच्या आवाजातील शुभेच्छा सन्देश देईल. एक कप इंडिया- प्रत्येक तालुक्याच्या गावी चहाचे दूकान उघडण्यात येणार असून तेथे रोज सकाळी 4-5 या वेळेत प्रत्येकास एक कप चहा मोफत देणेत येईल. स्वस्त भारत- मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना. या योजनेअन्तर्गत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये ₹1 इतक्या कमी किमतित गहु, तांदूळ इ. सोबत तुरडाळ, उड़ीदडाळ इ. सारखी कडधान्ये आणि डाळी पहावयास मिळतील. फस्त भारत- सर्व भ्रष्टाचारी, गुंड, भेसळखोर लोकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. टेक अप इंडिया- या योजनेत उद्योजकाना शेतकऱ्यांच्या जमीनी कमी भावात उपलब्ध करून दिल्या जातील. फेक अप इंडिया- खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली. या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत- 1. आधार कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. ड्राइविंग लैसेंस 4. शाळा सोडल्याचा दाखला 5. राशन कार्ड 6. रहीवासी दाखला 7. 7/12 उतारा 8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17278
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

In reply to by नाना स्कॉच

फाट्यावर मारण्यासाठी "फाट्यावर"असं लिहून प्रतिसाद द्यायची गरज नसते

In reply to by चेक आणि मेट

अहो त्यांच्या id चे वय जरी 4 महिन्याचे असेल तरी ते मिपा कोळून प्यायलेत,त्यांच्या अंगात एखादा जालीय मिस्टर इंडिया आय डी असू शकतो, है कि नाय स्कॉच साहेब।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गावसेना प्रमुख दादा, प्रथम मजला साहेब म्हणल्या बद्दल आभार! ___/\___ बाकी विषयाबद्दल बोलायचे झाल्यास "मांजराने डोळे मिटुन दूध प्यायले तरी.... वगैरे वगैरे" म्हण लागु पड़ते ह्या विषयावर असे वाटते. असो!! चालायचेच!

जनसंख्या नियंत्रण योजना - देशात लोकसंख्येचा स्फोट होऊ नये म्हणून लोकांना कंडोम वापरायला प्रवृत्त करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात कंडोमच्या वापराची मोजमाप आणि त्यात दरवर्षी ५६ टक्के वाढ अनुस्युत आहे. या योजनेची पूर्वतयारी म्हणून सध्या तरुण वर्गाचा कंडोम वापर किती आहे हे तपासून पाहाण्यासाठी फक्त काही विशिष्ट युनिव्हर्सिटीजमध्ये मोजणी चालू आहे. प्राथमिक मोजणीनुसार दररोज फक्त ३००० कंडोम वापरले जातात. छप्पन्न टक्के वाढ होऊन तो आकडा ४६८० वर नेण्यासाठी नोकरशाहीवर दबाव आणण्यात येत आहे.

In reply to by निशांत_खाडे

'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय? ;) मात्र टेक सेल्फी विथ एनीवन योजनेखाली तुम्हाला जर कुठचीही व्यक्ती तुमच्या सेल्फीमध्ये तुमच्याबरोबर हवी असेल तर त्याची सोय होणारच आहे.

In reply to by राजेश घासकडवी

'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय? ;)
गुर्जी... धन्य हो =)) =)) =))
मात्र टेक सेल्फी विथ एनीवन योजनेखाली तुम्हाला जर कुठचीही व्यक्ती तुमच्या सेल्फीमध्ये तुमच्याबरोबर हवी असेल तर त्याची सोय होणारच आहे.
याला आणखी खुलवतो म्हटलं तर आमचं सदस्यत्व रद्द व्हायचं =)) =))

लोकहो, हा टाइमपासचा धागा आहे. इथेही काय मारामाऱ्या करताय? त्यासाठी इतर धागे आहेतच. आणि तिथे समर्थक आणि विरोधक यांनी चिक्कार घणाघाती चर्चा चालू ठेवलेल्या आहेत. इथे तरी थोडी प्यूअर भंकस चालू द्यात. विनोद आवडला तर हसा आणि सोडून द्या, नाही आवडला तर 'कुछ जम्या नै' म्हणा. पण या युद्धात विनोदबुद्धीचा का बळी देत आहात? थोडी चिलपिल घ्या.

तडीपार पुनर्वसन योजना - ज्यांना राज्यातून तडीपार होण्याची शिक्षा मिळालेली आहे अशांकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहून त्यांच्या आयुष्याची घडी बसवण्याची व्यवस्था करायची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यांनी चांगली वागणूक दाखवली तर त्यांना बऱ्यापैकी नोकरीही मिळवून देण्याची कलमं त्यात आहेत.

महत्त्वाकांक्षी स्टॉक मार्केट ऱ्हास योजना - कोण म्हणतं सद्य सरकार उजव्या धोरणाचं आहे? कोण म्हणतं सरकारचं उद्योगपतींशी साटंलोटं आहे? डाव्या धोरणांशी कटिबद्ध राहून कॅपिटॅलिझमचा सर्वनाश करण्यासाठी एका वर्षात स्टॉक मार्केट पंचवीस टक्के उतरवण्याची ही योजना आहे. परकीय शक्ती भारताच्या मार्केटमध्ये पैसे गुंतवून हरामखोर एनजीओंना पैसे देते. त्या गुंतवणुकदारांचं कंबरडं मोडण्यासाठी किंवा त्यांना घाबरवून भारतातल्या उद्योगातले पैसे काढून घ्यायला लावण्याची ही योजना आहे. ४ मार्च २०१५ ते ४ मार्च २०१६ या काळात स्टॉक इन्व्हेस्टर्सचे १४ लाख कोटी रुपये नष्ट करणाऱ्या या योजनेला लाल सलाम!

Posted by Unofficial: Subramaniam Swamy on Friday, March 11, 2016