Skip to main content

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. .

वाचने 59646
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

In reply to by नाव आडनाव

तुमचे अझंप्शन भारी असतात... >>> गलत गलत गलत. वो अझंप्शन नही माय लॉर्ड, खालिस सच है. बस सच.

In reply to by नाव आडनाव

मी ते वाक्य पढविल्यासारखे वाटते असे म्हटले आहे. पढविले आहे असे लिहिलेले नाही. रोहीत वेमुलाच्या कुटुंबाची एकूण पार्श्वभूमी पाहिली तर दिल्लीत येऊन त्याच्या आईने असे वाक्य म्हणणे हे नक्कीच शंकास्पद वाटते.

In reply to by जेपी

लेखनावर फोकस होतो असा लौकिक असलेल्या संकेतस्थळावर व्यक्तीगतपणाची मर्यादा लांछनास्पदपणे ओलांडली गेली आहे. पोस्ट मान्यवरांची असल्यानं त्यावर संपादकीय हस्तक्षेप न होणं स्वाभाविक असलं तरी स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याप्रमाणे, पटत नसेल तर निघा असं कुणीही म्हणतो आणि ती मतस्वातंत्र्याची गळचेपी आहे याचं किमान भानही ठेवत नाही. प्रतिवादात दिलेला पुराव्यासाठी सदस्याची संबंधित व्यक्तींशी ओळख असणं गरजेचं नाही इतकी किमान समज नसलेल्या सदस्यानं, स्वतःचे संस्कार इतक्या प्रच्छन्न आणि बेदिक्कतपणे दाखवण्याची घटना, संकेतस्थळावर एकाच राजकीय पक्षाची भलामण केली जावी असा संकेत देते की काय अशी परिस्थिती आहे. ज्याप्रमाणे देशात, पटत नसेल तर देश सोडा अशी भाषा कोणताही तद्दन करतो त्याचंच हे प्रतिबिंब दिसतं. एनी वे, महाराष्ट्र टाइम्सच्या अग्रलेखातून प्रतिवादात व्यक्त केलेले विचार लाखो लोकापर्यंत पोहोचले आहेत याचा अर्थ किमान कुठे तरी दडपशाहीला शह देण्याचा प्रयत्न होतोयं. सत्ताधारी पक्षाविरोधात कुणीही कितीही सबळ पुराव्यानिशी बोललं तरी ` हातभर भाषणात वितभर खोटं बोलल्यानं काय होतं? इतका निर्लज्ज प्रश्न विचरला जातो आणि पुन्हा सत्तधारी पक्षाची तळी उचलली जाते. अर्थात, असं करतांना खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं, भाषणात व्यक्त केलेल्या भारंभार विचारांवर दोन्ही कडून बोलता येईल, इतका सामान्य विचार सुद्धा केला जात नाही. प्रकाशित होणार्‍या प्रत्येक राजकीय लेखावर अशीच परिस्थिती आहे, चालू आहे ते कोणताही विधीनिषेध न बाळगता दामटून रेटणं हा प्रघात झाला आहे. देशात चाललेल्या दडपशाहीला प्रोत्साहन देण्याचं काम इथले काही सदस्य नेटानं चालवतायंत आणि उघड दिसणार्‍या घटनांना वेगळंच वळण देऊन, वेळ पडली तर सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून स्वतःचा एक कलमी अजेंडा राबवतायंत असं चित्र आहे.

In reply to by विवेक ठाकूर

महाराष्ट्र टाइम्सच्या अग्रलेखातून प्रतिवादात व्यक्त केलेले विचार लाखो लोकापर्यंत पोहोचले आहेत
असतील. मग? लाखो लोकापर्यंत पोहोचले म्हणून ते उथळ आणि पूर्वग्रहदूषित विचार सत्य असतात का?
याचा अर्थ किमान कुठे तरी दडपशाहीला शह देण्याचा प्रयत्न होतोयं.
हहपुवा
सत्ताधारी पक्षाविरोधात कुणीही कितीही सबळ पुराव्यानिशी बोललं तरी ` हातभर भाषणात वितभर खोटं बोलल्यानं काय होतं? इतका निर्लज्ज प्रश्न विचरला जातो आणि पुन्हा सत्तधारी पक्षाची तळी उचलली जाते. अर्थात, असं करतांना खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं, भाषणात व्यक्त केलेल्या भारंभार विचारांवर दोन्ही कडून बोलता येईल, इतका सामान्य विचार सुद्धा केला जात नाही.
सबळ पुरावे? कोठे आहेत ते? आणि खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं हे शब्द तर प्रचंड विरोधाभासी आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिसादात मी दिलेले पुरावे हे मत नसून फॅक्ट्स आहेत आणि तुम्ही काय किंवा सत्ताधारी काय कुणीही ते नामंजूर केलेले नाहीत. तुमच्या विचारसरणीचं तर त्याहून नवल आहे कारण तुम्ही म्हणता `इतक्या मोठ्या भाषणात इतकंच खोटं? कारण तिथे तुम्हाला बोलायची संधीच नाही ! लाखो लोकापर्यंत पोहोचले म्हणून ते उथळ आणि पूर्वग्रहदूषित विचार सत्य असतात का? तुमचे विचार संपूर्ण एकांगी आहेत हे इथला कुणीही सदस्यच काय, तुम्ही स्वतःचं लिखाण शांतपणे वाचलं तरी कळेल. आणि एकांगी विचार हे पूर्वग्रहिताचं दुसरं नांव आहे. अर्थात, संकेतस्थळापेक्षा वर्तमानपत्रातून कैक पटीनं मोठं काम होतं त्यामुळे चिंता नाही. याचा अर्थ किमान कुठे तरी दडपशाहीला शह देण्याचा प्रयत्न होतोयं...हहपुवा दडपशाही चालू आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे. पण वेळ निघून गेल्याशिवाय ते लक्षात येणार नाही असं दिसतंय.

In reply to by विवेक ठाकूर

प्रतिसादात मी दिलेले पुरावे हे मत नसून फॅक्ट्स आहेत आणि तुम्ही काय किंवा सत्ताधारी काय कुणीही ते नामंजूर केलेले नाहीत.
वा! आता तुम्ही जे जे म्हणता ते ते फॅक्ट्स झाले तर.
तुमच्या विचारसरणीचं तर त्याहून नवल आहे कारण तुम्ही म्हणता `इतक्या मोठ्या भाषणात इतकंच खोटं? कारण तिथे तुम्हाला बोलायची संधीच नाही !
संपूर्ण भाषणात सत्याचा अभाव होता हे मटामधील वाक्य, तशाच अर्थाचे तुमचे आधीच्या प्रतिसादातील वाक्य असे जे सरसकटीकरण केले त्यांनीच वरील वाक्य लिहावे हा दैवदुर्विलास!
तुमचे विचार संपूर्ण एकांगी आहेत हे इथला कुणीही सदस्यच काय, तुम्ही स्वतःचं लिखाण शांतपणे वाचलं तरी कळेल. आणि एकांगी विचार हे पूर्वग्रहिताचं दुसरं नांव आहे. अर्थात, संकेतस्थळापेक्षा वर्तमानपत्रातून कैक पटीनं मोठं काम होतं त्यामुळे चिंता नाही.
हा संपूर्ण परिच्छेद तुम्हालाचा लागू होतो. मला नाही.
दडपशाही चालू आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे. पण वेळ निघून गेल्याशिवाय ते लक्षात येणार नाही असं दिसतंय.
मोदी सरकारने आपला पुख्खा बंद केल्याने ढोंग्यांनी काही महिन्यांपूर्वी "असहिष्णुता", "दडपशाही" अशी कोल्हेकुई करून पुरस्कार परतीचे नाटक केले होते ते आठवत असेलच. मोदीद्वेष, भाजपद्वेष, संघद्वेष इ. मुळे सत्य काय आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

वा! आता तुम्ही जे जे म्हणता ते ते फॅक्ट्स झाले तर. माझा आरोप रोहित वेमुल्लाच्या आत्महत्ये संदर्भात बाईंनी केलेल्या विपर्यासाला आहे. त्याबाबतीत दिलेला पुरावा ही फॅक्ट आहे. आणि सरकार ती नामंजूर करु शकलेलं नाही. तुम्ही कदाचित माझा पहिला प्रतिसाद न वाचताच चालू केलं आहे. त्यामुळे मी फक्त फॅक्ट्सवर बोलतो आहे आणि तुम्ही विपर्यास करतायं. संपूर्ण भाषणात सत्याचा अभाव होता हे मटामधील वाक्य, तशाच अर्थाचे तुमचे आधीच्या प्रतिसादातील वाक्य असे जे सरसकटीकरण केले त्यांनीच वरील वाक्य लिहावे हा दैवदुर्विलास! खरा दैवदुर्विलास हा की तुम्ही काय की लेखक काय, इतक्या उघड खोट्या गोष्टीला किरकोळ समजून परत वर `बाकीच्या भाषणातला आवेग पाहा' म्हणतायं. आणि तुम्ही तर त्याही पुढे जाऊन, हक्कभंगाला केराची टोपली दाखवली जाते म्हणालायं ! म्हणजे खोट्याची ना खंत ना खेद परत वर ही मग्रुरी ! हा संपूर्ण परिच्छेद तुम्हालाचा लागू होतो. मला नाही. आता तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचा, म्हणजे कशाचाही विधिनिषेध न बाळगता मुद्दा रेटत राहण्यानं, तो परिच्छेद कुणाला लागू होतो ते कळेल. मोदी सरकारने आपला पुख्खा बंद केल्याने ढोंग्यांनी काही महिन्यांपूर्वी "असहिष्णुता", "दडपशाही" अशी कोल्हेकुई करून पुरस्कार परतीचे नाटक केले होते ते आठवत असेलच. पुरस्काराचा इथे संबंध काय? कुठलीही गोष्ट कुठेही जोडतायं ! मुद्दा लक्षात घ्या. देशभक्ती ही भाजपची प्रायवेट अफेअर नाही, इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला देशप्रेम आहे. त्यामुळे कोर्टाच्या आवारात आणि पोलीस पाहार्‍यात, एखाद्याला मारहाण करणं हे मारणार्‍यांच्या देशभक्तीचं प्रतिक अशी धारणा करुन सत्तेबद्दल दहशत निर्माण करणं मूर्खपणा ठरतो. कारण ते सामान्यांचा व्यवस्थेवरचा आणि सरकारच्या नि:पक्षपातीपणावरचा विश्वास उडवतं. आणि इथंही नेमकं त्याचच प्रतिबिंब दिसतंय हा प्रश्न आहे. त्यावर लगेच, नसेल पटत तर निघा म्हणणं म्हणजे, जर समजत असेल तर, ... पुन्हा तिच चूक होते आहे.

In reply to by विवेक ठाकूर

माझा आरोप रोहित वेमुल्लाच्या आत्महत्ये संदर्भात बाईंनी केलेल्या विपर्यासाला आहे. त्याबाबतीत दिलेला पुरावा ही फॅक्ट आहे. आणि सरकार ती नामंजूर करु शकलेलं नाही. तुम्ही कदाचित माझा पहिला प्रतिसाद न वाचताच चालू केलं आहे. त्यामुळे मी फक्त फॅक्ट्सवर बोलतो आहे आणि तुम्ही विपर्यास करतायं.
स्मृती इराणींनी काहीही विपर्यास केलेला नाही. रोहीत वेमुलाच्या आत्महत्येचा फायदा घेऊन विरोधी पक्षांचे कसे किळसवाणे राजकारण सुरू आहे ते त्यांनी लोकसभेत सप्रमाण दाखवून दिले आहे. परंतु नावडतीचे मीठ अळणी असल्याने तुम्हाला त्यांचे प्रत्येक वाक्य खटकत आहे.
खरा दैवदुर्विलास हा की तुम्ही काय की लेखक काय, इतक्या उघड खोट्या गोष्टीला किरकोळ समजून परत वर `बाकीच्या भाषणातला आवेग पाहा' म्हणतायं. आणि तुम्ही तर त्याही पुढे जाऊन, हक्कभंगाला केराची टोपली दाखवली जाते म्हणालायं ! म्हणजे खोट्याची ना खंत ना खेद परत वर ही मग्रुरी !
समजा ही गोष्ट खोटी असेल (तुमच्या समाधानासाठी तसं एक क्षणभर गृहीत धरू या),तरी मूळ घटनेच्या तुलनेत तिथे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. वेळापत्रक हे अत्यंत बिनमहत्त्वाचे आहे. मुळात रोहीत वेमुलाच्या मृत्युनंतर डॉक्टर तिथे २-३ तासांनी पोहोचले का १२ तासांनी हा मुद्दाच महत्त्वाचा नाही कारण त्याचा मृत्यु खूप आधी झालेला होता. आणि हक्कभंगाबाबत कसली आली आहे मग्रुरी? संसदेचे, विधिमंडळाचे कामकाज कसे चालते हे इतक्या वर्षात समजले नाही का? प्रत्येक अधिवेशनात हक्कभंग, हक्कभंग असा आरडाओरडा विरोधी पक्षांकडून होतो आणि नंतर सर्व काही शांत होते. आजवर असे अनेक हक्कभंग प्रस्ताव आले आणि कचर्‍याच्या टोपलीचे धनी झाले. या प्रस्तावाचेही तेच होणार आहे. आणि हे सांगितले तर ही म्हणे मग्रूरी!
आता तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचा, म्हणजे कशाचाही विधिनिषेध न बाळगता मुद्दा रेटत राहण्यानं, तो परिच्छेद कुणाला लागू होतो ते कळेल.
मुद्दे तुम्हीच रेटत आहात. मी फक्त त्यातील चुकीच्या गोष्टी खोडत आहे.
पुरस्काराचा इथे संबंध काय? कुठलीही गोष्ट कुठेही जोडतायं ! मुद्दा लक्षात घ्या. देशभक्ती ही भाजपची प्रायवेट अफेअर नाही, इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला देशप्रेम आहे. त्यामुळे कोर्टाच्या आवारात आणि पोलीस पाहार्‍यात, एखाद्याला मारहाण करणं हे मारणार्‍यांच्या देशभक्तीचं प्रतिक अशी धारणा करुन सत्तेबद्दल दहशत निर्माण करणं मूर्खपणा ठरतो. कारण ते सामान्यांचा व्यवस्थेवरचा आणि सरकारच्या नि:पक्षपातीपणावरचा विश्वास उडवतं. आणि इथंही नेमकं त्याचच प्रतिबिंब दिसतंय हा प्रश्न आहे. त्यावर लगेच, नसेल पटत तर निघा म्हणणं म्हणजे, जर समजत असेल तर, ... पुन्हा तिच चूक होते आहे.
आधीच्या प्रतिसादात तुम्हीच दडपशाहीचा मुद्दा आणलात. म्हणून मला त्यातील फोलपणा दाखवून द्यावा लागला. त्यासाठी हे ढोंग्यांच्या पुरस्कार परतीच्या नौटंकीचे उदाहरण चपखल होते म्हणून दिले. देशभक्ती हे भाजपची नाही हे मान्य आहे. परंतु देशद्रोह ही मात्र काही ठराविक पक्षांचीच मक्तेदारी आहे हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

देशद्रोह ही मात्र काही ठराविक पक्षांचीच मक्तेदारी आहे हे नक्की >> सिद्ध करा अथवा विधान मागे घ्या.

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही सत्ताधाऱ्यांवर इतके आरोप केले ते सिद्ध केले कि केजरीवाल सारखे आरोपीने स्वताच निर्दोषत्व स्वताच सिद्ध केले पाहिजे ह्या वृत्तीने पळ काढला

In reply to by श्रीगुरुजी

रोहीत वेमुलाच्या आत्महत्येचा फायदा घेऊन विरोधी पक्षांचे कसे किळसवाणे राजकारण सुरू आहे ते त्यांनी लोकसभेत सप्रमाण दाखवून दिले आहे. हाइट! इथे विरोधकांचा काय संबंध? विरोधक राजकारण करतायंत हे खोटं विधान बाईंनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यातली विसंगती आता अंगाशी आलीये. तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचलेलाच नाही हे आता नक्की झालं. समजा ही गोष्ट खोटी असेल (तुमच्या समाधानासाठी तसं एक क्षणभर गृहीत धरू या),तरी मूळ घटनेच्या तुलनेत तिथे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. वेळापत्रक हे अत्यंत बिनमहत्त्वाचे आहे. मुळात रोहीत वेमुलाच्या मृत्युनंतर डॉक्टर तिथे २-३ तासांनी पोहोचले का १२ तासांनी हा मुद्दाच महत्त्वाचा नाही कारण त्याचा मृत्यु खूप आधी झालेला होता. सॉलीड ज्योक ! याला म्हणतात अंधभक्ती. तो जर आधीच गेला होता तर ` वेळीच मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता, एक बच्चेकी माँ बोल रही है, वगैरे भंकस कशाला करायची? यालाच तर नौटंकी म्हणतात. आजवर असे अनेक हक्कभंग प्रस्ताव आले आणि कचर्‍याच्या टोपलीचे धनी झाले. या प्रस्तावाचेही तेच होणार आहे. आणि हे सांगितले तर ही म्हणे मग्रूरी! पुन्हा तेच ! आहो, खोट्याची शरम नाही आणि संसेदेची दिशाभूल केल्यामुळे हक्कभंगाचा ठराव दाखल झालायं तर तुम्ही म्हणतायं `असे किती ठराव आले आणि गेले'...आणखी किती रेटणार? मुद्दे तुम्हीच रेटत आहात. मी फक्त त्यातील चुकीच्या गोष्टी खोडत आहे रोहितच्या आत्महत्ये संदर्भात बाईंची विधानं, समोर आलेल्या पुराव्यांशी विसंगत आहेत इतकी साधी गोष्टच तुमच्या लक्षात येत नाही, खोडणं तर बाजूलाच. आणि पुन्हा विरोधकच त्याचं राजकारण करतायंत ही रेटूगिरी आहे. देशभक्ती हे भाजपची नाही हे मान्य आहे. परंतु देशद्रोह ही मात्र काही ठराविक पक्षांचीच मक्तेदारी आहे हे नक्की शाब्बास ! हेच तर मला दाखवून द्यायचं होतं. भाजप सोडता बाकीचे (तुम्ही फक्त सोयिस्करपणे `ठराविक' शब्द वापरालयं) देशद्रोही. किंवा आगदी सरळ सांगायचं तर जे भाजप च्या विरोधात ते देशद्रोही! एनी वे, तुमची भक्ती सर्वजाहीर आहे त्यामुळे मी थांबतो. बेशरमपणाचं प्रदर्शन करुन एकानं स्वतःच्या विचारांची पातळी दाखवली, पण तुम्ही निदान व्यक्तीगत तरी झाला नाहीत त्याबद्दल आभार.

In reply to by विवेक ठाकूर

तुमच्या सारख्या स्व गवसलेल्या माणसाची अश्या प्रतिसादांतून आणि भौतिक गोष्टींमधून होणारी चिडचिड पाहून अंमळ गंडल्यासारखे झाले मला. मी काय म्हणतो, हे सर्व लोक आहेत हे असेचं आहेत आणि त्यात फरक पडणार नाही याची बेशर्त स्वीकृती करून मुक्तपणे,आनंदाने जगणे अवघड आहे का ?

In reply to by गणामास्तर

जर कुणी अपमान केला तर त्याचा जवाब तसाच देता आला पाहीजे . राजकीय परिस्थिती बद्दल म्हणाल तर उघड दिसणाऱ्या गोष्टींविरूद्ध लिहीणं म्हणजे चिडचिड नाही. स्व गवसलेल्यासाठी जीवन थ्री . डायमेन्शनल चित्रपटासारखं आहे . आपल्याला योग्य वाटेल ते प्रामाणिकपणे करायचं, नाही पटलं इतरांना तर दिलं सोडून .... त्यानं स्व ला काही बाधा येत नाही .

In reply to by विवेक ठाकूर

अच्छा, स्पष्टीकरणासाठी धन्यवाद. तुमच्या प्रतिसादातून स्वर चिडका जाणवला म्हणून शंका वाटली इतकेचं.
आपल्याला योग्य वाटेल ते प्रामाणिकपणे करायचं, नाही पटलं इतरांना तर दिलं सोडून ....त्यानं स्व ला काही बाधा येत नाही .
'दिलं सोडून...' हे जे तुम्ही आत्ता म्हणताय ते तुमच्या वरच्या प्रतीवादांतून जाणवत नाहीये. अर्थात त्याने स्व अबाधित राहतो हे तुम्ही स्वानुभवानेच सांगत असाल आणि तसे असूही शकेल असे गृहीत धरतो.

In reply to by गणामास्तर

स्व गवसलेल्यासाठी जीवन थ्री . डायमेन्शनल चित्रपटासारखं आहे . आपल्याला योग्य वाटेल ते प्रामाणिकपणे करायचं, नाही पटलं इतरांना तर दिलं सोडून .... त्यानं स्व ला काही बाधा येत नाही . गणा मास्तर तुम्हाला समजलेच नाहि सर काय म्हणाले ते पुन्हा वाचा बघु एकदा. काय थ्रि डायमेन्शनल दिसतय ? अरे खुष नका होउ...स्व इतक्या लवकर नसतो गवसत. डोळे तपासा नंबर वाढल्या मुळे थ्रि डायमेन्शनल दिसतय.

In reply to by विवेक ठाकूर

हाइट! इथे विरोधकांचा काय संबंध? विरोधक राजकारण करतायंत हे खोटं विधान बाईंनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यातली विसंगती आता अंगाशी आलीये. तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचलेलाच नाही हे आता नक्की झालं.
विरोधकांचाच संबंध आहे. एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यावर तो दलित आहे हे जाहीर झाल्यावर लगेच राहुल, केजरीवाल इ. मंडळी प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यासाठी तातडीने हैद्राबादला गेले व किळसवाणे राजकारण सुरू झाले. हेच तर स्मृती इराणींनी दाखवून दिल्यावर काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून पळ काढला.
सॉलीड ज्योक ! याला म्हणतात अंधभक्ती. तो जर आधीच गेला होता तर ` वेळीच मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता, एक बच्चेकी माँ बोल रही है, वगैरे भंकस कशाला करायची? यालाच तर नौटंकी म्हणतात.
याच्यात काय जोक आहे आणि कसली अंधभक्ती? उलट तुमचाच अंधद्वेष स्पष्ट दिसतोय. जो तेलंगण पोलिसांनी अधि़कृत अहवाल दिलेला आहे (तेलंगणमध्ये भाजप वा मित्रपक्षांचे सरकार नाही) त्याच्याच आधारावर माहिती दिली तर त्यात कसली आलीय नौटंकी? अंधद्वेष थोडा वेळ बाजूला ठेवलात तर सर्व काही स्पष्ट समजून येईल.
पुन्हा तेच ! आहो, खोट्याची शरम नाही आणि संसेदेची दिशाभूल केल्यामुळे हक्कभंगाचा ठराव दाखल झालायं तर तुम्ही म्हणतायं `असे किती ठराव आले आणि गेले'...आणखी किती रेटणार?
कसलं खोटं आणि कशाबद्दल शरम बाळगायची? शरम बाळगायची तर ती प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणार्‍या काँग्रेस आणि आआपवाल्यांनी बाळगायली हवी. संसदेत दरवर्षी असे अनेक हकभंग प्रस्ताव येतात आणि जातात. आजतगायत एखाद्या हक्कभंग प्रस्तावामुळे काही प्रेक्षणीय घडल्याचे ऐकले नाही. या प्रस्तावाचे देखील तेच होणार आहे ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत आहे. तुमची ते मान्य करायची तयारी नाही. हक्कभंग प्रस्तावासारख्या एखाद्या फुसक्या गोष्टीचा ज्यांना आधार वाटतो आणि असे प्रस्ताव जे गांभिर्याने घेतात ते उद्या लोकसभेत कोणीतरी दंडाला काळी फीत बांधून आले तरी त्याला गांभिर्याने घेतील.
रोहितच्या आत्महत्ये संदर्भात बाईंची विधानं, समोर आलेल्या पुराव्यांशी विसंगत आहेत इतकी साधी गोष्टच तुमच्या लक्षात येत नाही, खोडणं तर बाजूलाच. आणि पुन्हा विरोधकच त्याचं राजकारण करतायंत ही रेटूगिरी आहे.
त्यात काहीही विसंगती नाही. आत्महत्या झाली हीच सर्वात आणि एकमेव गंभीर व महत्त्वाची घटना आहे. डॉक्टर किती वाजता आले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. तपशील बिनमहत्त्वाचा आहे. एखाद्या खुनाचा तपास करताना पोलिस पंचनान्यात "खून झालेल्या स्थळापासून नैऋत्येला अमुक कदमांवर जांभळाचे झाड आहे, वायव्येला तमुक कदमांवर खांब आहे" असले अनेक फालतू व बिनमहत्त्वाचे तपशील असतात. घडलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात अशा तपशीलाला महत्त्व नसते. तसेच इथेही आहे. तुम्हाला हक्कभंग प्रस्तावासारख्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. त्याचप्रमाणे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता आले हे बिनमहत्त्वाचे तपशील देखील तुमच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचे आहेत. वस्तुतः असल्या तपशीलांना अजिबात महत्त्व नसते.
शाब्बास ! हेच तर मला दाखवून द्यायचं होतं. भाजप सोडता बाकीचे (तुम्ही फक्त सोयिस्करपणे `ठराविक' शब्द वापरालयं) देशद्रोही. किंवा आगदी सरळ सांगायचं तर जे भाजप च्या विरोधात ते देशद्रोही!
भाजप सोडता बाकीचे सर्वजण देशद्रोही असे मी म्हटलेले नाही. भाजपच्या विरोधातले सर्वजण ते देशद्रोही असेही मी लिहिलेले नाही. उगाच स्वतःच्या मनाचे व स्वतःला सोयिस्कर असे अर्थ काढू नका.
एनी वे, तुमची भक्ती सर्वजाहीर आहे त्यामुळे मी थांबतो. बेशरमपणाचं प्रदर्शन करुन एकानं स्वतःच्या विचारांची पातळी दाखवली, पण तुम्ही निदान व्यक्तीगत तरी झाला नाहीत त्याबद्दल आभार.
तुमचा भाजपद्वेष देखील जगजाहीर आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हीपण कोणाशी वाद घालताय? ज्यांना स्वाभिमान नाही अशा फालतू लोकांना का महत्व देताय? वाद शहाण्या लोकांशी घालावा. मूर्खांशी घालू नये. ज्यांना आपण मूर्ख आहोत हे मान्यच नाही अशा शतमूर्खांशी तर वाद घालूच नये.

In reply to by बोका-ए-आझम

स्वतःच्या विव्दतेचं आणि संस्कारांचं केलेलं हे बेशरम प्रदर्शन संपादकीय नजरेतून सुटतंय हे केवळ नशीब !

In reply to by विवेक ठाकूर

तुम्ही स्वतःच्या प्रतिसादांचं एकदम perfect वर्णन केलंय इथे!तो विद्वत्ता शब्द थोडा चुकीचा लिहिलाय तो सुधारा आधी!

इराणींनी आपल्या पुस्तकाचा भलताच अर्थ संसदेत सांगितला असे सर्मिला बोस यांचे म्हणणे. लेख बोलीभाषेत नाही पण अभ्यासू जाणकारांचे अडत नसते. http://scroll.in/article/804314/smriti-irani-misrepresented-my-work-in-…

आपण संतुष्ट नाही असे मायावतींनी बोलल्यावर इराणींनी आपला शब्द पाळला नाही. जुमलोंकीसरकारसे और कया उम्मीद.

In reply to by तर्राट जोकर

मला वाटते त्यांनी मायावतींना सांगितले की बसपच्या कार्यकर्त्यांना पाठवा, त्यांच्याकडे शीर देते म्हणून... पण त्या मायाळू असल्याने त्यांनी तसे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पाठवले नाहीत... ;)

In reply to by विकास

फालतू डायलॉगबाजी करण्यासाठी संसद ही एकता कपूरच्या सिरीयलचा सेट नाही एवढे कळत नाही. तरी भगत लोक आपल्याच पक्षाच्या टीन्पाट नेत्यांची तळी उचलतात. थोडा तरी स्वाभिमान बाळगा.

In reply to by तर्राट जोकर

आपले ते भाषण स्वातंत्र्य आणि दुसर्‍याची ती फालतू डायलॉगबाजी का? हे बरं आहे. अर्थात त्यात नवल काहीच नाही... तरी भगत लोक आपल्याच पक्षाच्या टीन्पाट नेत्यांची तळी उचलतात. टिन्पाट आहेत का नाहीत, ते माहीत नाही. पण त्यांच्यामुळे स्युडोसेक्युलर्स आणि स्वयंघोषित विचारवंत यांना सतत बर्नॉल आणि इनो लागते आहे हे पाहून जी मजा येते ना ती त्या पप्पूच्या बाललिलांमुळे पण येत नाही बघा! ;) आणि हो एक गोष्ट नक्की आहे, एकीकडे मोदीभक्त म्हणून हिणावणारे लोकं हे फक्त मोदींच्याच आरत्या ओवाळताना दिसत नाहीत... ... किंबहूना मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. उद्या जर माध्यमांनी तसेच स्युडोसेक्युलर्स आणि स्वयंघोषित विचारवंत यांनी ठरवले की मोदीतला म अथवा मोदी सरकार मधला स आठवडाभर उच्चारायचा देखील नाही, अगदी अनुल्लेख करायचा, तर तुम्हाला मोदी-मोदीसरकार भक्ती-स्तुती काहीच ऐकू येणार नाही. एकदम सोप्पा उपाय आहे, पण तो जमण्यासाठी बर्नॉल आणि इनोचा कमी वापर होणारी प्रकृती असायला हवी, इतकेच काय ते.

In reply to by विकास

हा हा, जोकर तर मी आहे. पण इतर लोकच जास्त प्रयत्न करतात. असो. तुम्हाला काम होण्यापेक्षा नौटंकीबाजी, सर्कसमधे जास्त इंटरेस्ट असेल तर कोण काय करेल? जशी बुद्धी तशी आवड. कोणाला बर्नाल आणि इनो लागतंय हे आपल्या आपण इमॅजिन करुन गुदगुल्या करुन घ्यायची मानसिकता भक्तांमध्ये पसरली आहे. त्यासाठी विरोधकांनी काही करायची गरज नाही. भाजपाकडे निवडणुकीच्या वेळेस तोंड फाटेस्तोवर केलेल्या घोषणा पुरे करता नाकीनऊ येतंय, त्या लपवायला हे बर्नाल, इनोचे फंडे भक्तांमधे पसरवुन मुळ विषयापासून लक्ष भरकटवतात. तुम्ही त्यांची पळी उचला. सामान्य माणसाला तुमच्या सर्कशीत विण्टरेस्ट नाही.

In reply to by तर्राट जोकर

विरोध का आलम यह है भारत में की......... . . . . . . . . . . . . . . . अगर नरेन्द्र मोदी कह दे की शौच के बाद हाथ धोना अनिवार्य है तो..... विरोधी बोलेंगे नही हम तो चाटेंगे

In reply to by तर्राट जोकर

सदस्य झाल्यावर एका वर्षाच्या आत एकदा बॅन होऊन दाखवण्याचं तुमचं कसब अफलातून आहे. कसं जमतं बुवा? इकडे लोक ८-८ वर्षे सदस्य आहेत पण एकदाही बॅन नाही झाले. तुमची गोष्टच वेगळी. बरं झाले ते झाले, परत येऊन सुद्धा फरक नाहीच पडलेला. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती हीच बहुतेक!

In reply to by बोका-ए-आझम

जशास तसे उत्तर दिले की ब्यानची कारवाई होते. भक्तमंडळी किती खालची भाषा वापरतात ते कधी लक्षात येत नाही, विरोधकांनी पलटवार केला की वर्मी लागतो. चालायचेच. इथे सर्वांचेच पाय मातीचे.

In reply to by तर्राट जोकर

तुम्हाला मिपा-विरोधभक्तीरत्न पुरस्कार जाहीर करत आहोत... 'वापसी करायची की नाही ते आपणच ठरवा.

यांना सतत बर्नॉल आणि इनो लागते आहे हे पाहून जी मजा येते ना ती त्या पप्पूच्या बाललिलांमुळे पण येत नाही बघा! ;) खरच आहे. पाच राज्यातल्या निवडणुकांच्या तारखा जस जश्या जवळ येत जातिल ये खुमारि तो और बढने वालि है. आता पर्यंत मिपावर भाजपा साठि गुर्जि, आप साठि नांदेडियन आणि काँग्रेस करता काहि आयडिज किल्ला लढवत होत्या, छान चर्चा होत होति पण आजपर्यंत कम्युनिस्टांतर्फे त्यांचि बाजु मांडायला कोणि नव्हता चला त्याचि कमि पुर्ण झालि. सध्या सगळ्या धाग्यावंर धुमाकुळ घालणार्‍या एका आय डि ने, सगळ्या धाग्यांवर म्हणजे जिथे जातिल तिथे रोहित वेमुला, जेएनयु हे सोबत घेउनच जातात. बरोबर आहे ह्यावेळेस पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा आहेत निवडणुका. मज्जानि लाइफ्....कब कब है निवडणुका

किती प्रतिसादांचे टारगेट आहे? अक्कल, बुद्धी, निर्लज्ज, भगतगण, टिनपाट, पप्पू सगळे आवश्यक ते शब्द येऊन संपादकांच्या हेतूंवर शंका वगैरे साग्रसंगीत झाले. झाले का समाधान?

In reply to by पैसा

अक्कल, बुद्धी, निर्लज्ज, भगतगण, टिनपाट, पप्पू असे ऐकून आहे की आता स्वयंघोषित बुद्धीवादी वाद घालण्याआधी अंतस्थ चर्चा करताना शेवटी, "श्रूती, स्मृती इराणोक्त" असे म्हणू लागले आहेत म्हणून! ;)

In reply to by विकास

=)) =)) =))

हक्कभंग प्रस्ताव प्रेमी विठा यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. आता लोकसभेत ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याविरूद्ध भाजपने हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. हे दोन्ही हक्कभंग प्रस्ताव शेवटी कचर्‍याच्या टोपलीतच जाणार आहेत हेवेसांन.

शेवटी काय, तर "दलीत, अल्पसंख्यांना चिरडुन टाकणे, विरोधकांची मुस्क्टदाबी करणे हा सरकारचा एकमेव अजेंडा आहे" या एक्सीसभोवती सगळं गुर्‍हाळ व्यवस्थीत सुरु आहे. असल्या निर्लज्ज आणि आत्मघातकी राजकारणावर सरकारने तसलाच जालीम उपाय योजावा. काँग्रेसला गांधी घरण्याच्या लीलांवरुन बेजार करावं. मुलायम, लालु, मायावती वगैरे मंडळीकरता सीबीआय सारख्या संस्था उपयोगात आणाव्या. पवार साहेब, नितीशकुमार वगैरे मंडळींना सत्ता, पैसा वगैरे ऑफर करुन खुष ठेवावं. कम्युनीस्टांकरता वेगळं काहि करण्याची गरज नाहि. त्यांचा समाचार उर्वरीत विरोधक घेतीलच. केजरीवाल साहेबांना मात्र शक्य असेल तिथे जोड्याने हाणावं.

In reply to by अर्धवटराव

केजरीवाल साहेबांना मात्र शक्य असेल तिथे जोड्याने हाणावं. ते सध्या अस्वस्थ आहेत. चांगली-वाईट जी काही आहे ती, प्रसिद्धी स्मृतींजीन मिळत आहे त्यामुळे माध्यमांसाठी ते विस्मृतीत गेले आहेत. असे काहीसे वातावरण तयार झालेले आहे.

In reply to by विकास

म्हणजे मोदिंच्या नावाने शंख करायला मोकळे.. शिवाय प्रसिद्धी :) बाटा वगैरे कंपनीचा जोडा असेल तर पूर्ण इव्हेण्टला स्पॉन्सरशीप सुद्धा मिळेल :)

बिहार मध्ये ज्या हत्या होताहेत ते लोक nda चे घटक असल्याने आणि दलित नसल्याने त्यांच्या हत्येच्या निषेधाची गरज नाही,पुण्यवान फक्त खांग्रेसी किंवा त्यांचे सहकारी,त्यांचे भाट । पाव वड्या साठी मारले तर माध्यम व खांग्रेसी भाट शिमगा करतात,तिकडे बिहारी आमदाराने लहान मुलीवर बलात्कार केला तरी गपचिप ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

पाववड्यासाठी लई नका रडू सेनाप्रमुख, शिवसेना आमदाराने लहान मुलीवर बलात्कार केल्याची ही बातमी घ्या. जुनी आहे पण बातमी आहे.

In reply to by तर्राट जोकर

दोन्हि हि घटना घाणेरड्या आणि निषेधार्ह आहेत, पण तजो साहेब सेम निच पणा शिवसेने च्या एखाद्या आमदारने केला म्हणुन पहिलि घटना निंदनिय नाहि ठरत का?

In reply to by होबासराव

अहो ह्यांनी गूगल सर्च करून प्रतिसाद लिहिलाय, त्या बातमीत आमदार नाहीये,पण तो rjd चा आमदार आहे म्हणून हे सेनेच्या आमदाराच्या बातम्या शोधताहेत।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गुगल सर्चला काही समस्या? शिवसेनेचीही बातमी मांडली तर त्रास होतो का? बिहारच्या आमदाराची बातमी तुम्हाला अंतर्ज्ञानाने कळली का? बाकी गुगल सर्चचा उद्देश खालच्या प्रतिसादात दिला आहे.

In reply to by होबासराव

होबासराव, अशा नीच घटनांना राजकिय परिप्रेक्ष्यातून पाहणे हे लोक कधी सोडतील हाच माझा प्रश्न आहे. गावसेनाप्रमुख बिहारी आमदाराच्या कृत्याचा दाखला वडापाव कृत्याच्या बचावासाठी देतात हीच मानसिकता किती नीच आहे?

In reply to by तर्राट जोकर

अशा नीच घटनांना राजकिय परिप्रेक्ष्यातून पाहणे हे लोक कधी सोडतील हाच माझा प्रश्न आहे. एकदम सहमत, पण तजो तुम्हि सुध्दा तेच करताय ना दुसरे उदाहरण देउन. माझ्यासाठि तरि दोन्हि प्रकार सारखेच आहेत. असो.

In reply to by होबासराव

तेच, मी फक्त आरसा दाखवतो म्हणजे मीही तेच करतो असे नाही. आरसा नको असेल तर बाष्कळ प्रतिवाद, सुमार लॉजिक टाळलेले बरे.

In reply to by तर्राट जोकर

मी बचाव केलेला नाही,मी फक्त भाटांचा दुतोंडी पणा दाखविला।ह्यांनी 100 पाववडे मागितले म्हणून सेनेच्या कार्यकर्त्याने मारले म्हणून ओरडणारे,आणि लालू यादव मुलाच्या लग्नाला आख्ख शोरूम बंदुकीच्या जोरावर खाली करायचा ,तेव्हा का नाही विरोध करायचे, इथे भक्त किंवा भाट कितीही ओरडले तरी अजून एक बार मोदी सरकार।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

रे बाब्बा! अशी काय उदाहरणं देताय जणू शिवसेनेत सगले धुतल्या तांदळाचेच. दहशतीच्च्याच जोरावर वाढवलेली शिवसेना दुसर्‍यांच्या दहशतीच्या कम्प्लेणी करते तेव्हा दुतोंडीपणा कशाला म्हणतात ते सोदाहरण कळतं हो.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मग ह्यातरी आमदाराला शिक्षा होईल काय? किंबहुना कोण्यातरी आमदाराला कधीतरी रेपसाठी शिक्षा झाली आहे का?

In reply to by तर्राट जोकर

किंबहुना कोण्यातरी आमदाराला कधीतरी रेपसाठी शिक्षा झाली आहे का? होउ शकत का नाहि होउ शकत. गेले काहि महिने विद्यापिठातिल घटनांमुळे जो दबाव सरकार वर बनवल्या जात आहे त्याच्या निम्मा जरि दबाव / ति उर्जा आपण आशि घटना घडल्यावर जर वापरलि तर सरकार मधिल कोणाचि ताकत नाहि होणार असल्या निच माणसाला वाचवायचि. पण इथे प्रॉब्लेम हा आहे कि प्रत्येक समुहाचे डोके कधि आणि कुठे भडकवायचे आणि त्याचा राजकिय फायदा कसा करुन घ्यायचा हे प्रत्येक राजकिय पक्षाला चांगले माहि झालेय, त्यामुळे त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता फक्त कार्यकर्ता म्हणुनच मिरवतो तो ज्या दिवशि अशा घटनांकडे एक सामान्य माणुस म्हणुन बघेल तो सुदिन. मला तरि दिल्लित झालेले आंदोलन हे भारतिय इतिहासातले पहिले अस उदाहरण वाटत होते जिथे खरच सामान्य माणसाचि उर्जा न्याय मिळण्यासाठि वापरलि होति. पण कालांतराने त्या आंदोलनाचा फायदा एका अश्या धुर्त माणसाने घेतला कि आता लोक अश्या कुठल्या आंदोलनाला पाठिंबा देतिल कि नाहि शंका आहे.

In reply to by होबासराव

मुद्दा होऊ शकते चा नसून झाली का असा आहे. बाकी सहमत अगदी. पक्षाचे कार्यकर्ते माणूस-नागरिक म्हणून वावरतील तो सुवर्णक्षण असेल. अन्यथा अगदी खूनाच्या आरोपातुन शिक्षा भोगुन आलेल्या नेत्याचे कार्यकर्ते जंगी स्वागत करतात ह्या देशात. बाकी तर सार्‍या स्वप्नांच्या बाता सम्जुया.

आता तर दस्तुरखुद्द जे.एन.यु नेच स्मृती इराणी संसदेत खरे तेच बोलल्या असे म्हटले आहे. नक्की काय चालू आहे समजत नाही. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/smriti-irani-was-right-in…

In reply to by गॅरी ट्रुमन

ते होणारच होतं. स्मृती इराणींनी लोकसभेत भाषण करताना सर्व अधिकृत कागदपत्रे बरोबर आणली होती. त्याच्याच आधारावर त्यांनी भाषणात विरोधकांना झोडपून काढलं.

In reply to by विवेक ठाकूर

वरील लिंकमधील खालील परिच्छेद -
On Friday the HRD minister contended in the Rajya Sabha that she had read out from a “verified” document that had been attested by the JNU registrar. The same day the student organiser of the 2014 event in JNU, Anil Kumar, told PTI that the controversial “pamphlet that Smriti Irani was reading in Parliament on Wednesday was not written by me or any of my mates”. He then went on to claim that “the pamphlet she is seen holding in the speech is a colourful one which is never used in any JNU protest due to high printing costs. It is a fake document and the minister is lying”. Anil Kumar was a Ph.D student at the varsity when the event took place in 2014.
आणि http://maharashtratimes.indiatimes.com/nation/smriti-irani-was-right-in… या बातमीतील खालील परिच्छेद -
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) साजऱ्या होणाऱ्या महिषासूर दिनाप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत केलेलं निवेदन योग्यच होतं. त्या काहीही खोटं बोलल्या नाहीत,' असा खुलासा खुद्द जेएनयूच्या प्रशासनानं केला आहे. त्यामुळं इराणी यांना खोटे पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चपराक बसली आहे. जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या देशविरोधी आणि वादग्रस्त कारवायांचा पंचनामा करताना स्मृती इराणी यांनी २०१४ साली विद्यापीठ परिसरात झालेल्या महिषासूर पूजेचा दाखला दिला होता. विद्यार्थ्यांकडून वाटण्यात आलेली आक्षेपार्ह पत्रकंही त्यांनी सभागृहात दाखवली होती. मात्र, जेएनयूच्या काही विद्यार्थ्यांनी ही पत्रकं खोटी असल्याचा दावा केला होता. तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. ही संधी साधत विरोधकांनी इराणी यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. या आरोपांनंतर इराणी यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून कागदपत्रांची सत्यता पडताळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनानं त्याची पडताळणी केली आणि सभागृहात इराणी यांनी दाखवलेली सर्व कागदपत्रे खरी असल्याचं स्पष्ट केलं. जेएनयूचे रजिस्ट्रार प्राध्यापक भूपिंदर जुत्शी यांनी याबाबत माहिती दिली. 'जेएनयूमध्ये गेल्या १५ वर्षांत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाची कागदपत्रे सुरक्षार क्षकांच्या कार्यालयात आहेत. एका डायरीत आम्ही या साऱ्याची नोंद करून ठेवतो. इराणी यांच्या सूचनेनंतर आम्ही त्याची पाहणी केली. तेव्हा इराणी यांनी संसदेत दाखवलेली सर्व कागदपत्रे खरी असल्याचं आढळून आलं,' असं जुत्शी यांनी सांगितलं.
हे दोन्ही परिच्छेद नीट वाचले तर कोण खरे बोलतेय व कोण खोटे बोलतेय हे अगदी उघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अजून एक संदर्भ - JNU Endorses Smriti Irani's Documents, Says Pamphlets Were Put up in Campus याच बातमीतून - “Our University’s internal security records authenticate that such kinds of pamphlets were put up in the campus in 2014. The documents presented by the HRD minister were correct according to our records and the same has been conveyed to the ministry” JNU Registrar Bhupinder Zutshi told Express. Irani while giving clarification about her ministry's stringent action on 'Anti-National' forces, had last week read out a pamphlet in Parliament, which the student oranisers of the event later denied having issued alleging that the minister quoted from "half-cooked facts". “In fact a complaint was also registered regarding the same” Zutshi said further. आता अश्वमुखातून बाहेर आलेल्या या सत्यावर विश्वास ठेवायचा का एशियन एज च्या असत्यकथनावर विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीचा प्रश्न आहे.

जे अफजल आणि इशरत च्या बचावात अपनी जान झोक रहे है ,ते मोदींच्या जाळ्यात अलगद अडकले आहेत, पुढची निवडणूक देशभक्त vs देशद्रोही , कर चले हम फिदा जान ओ तन साथियों अब तुम्हारे हमारे हवाले वतन साथियों आत्ताचे बाकी साथी तर वतन विकायला निघाले आहेत।