Skip to main content

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. .

वाचने 59646
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

विकांतास वेळ काढून या भाषणाचा आस्वाद घेण्यात येईल

अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहित होतील.
कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ
याबाबतीत साशंकता आहे. आता सामान्य माणसाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी मिडीयाच पोहोचवते व आजकाल सत्याच्या अपलापाबद्दल मिडीया व सर्वच राजकीय पक्ष कुप्रसिद्ध असल्याने नक्की कोणती माहिती विश्वासार्ह हे सांगू शकत नाही. दोन्हीकडून या भाषणातील मुद्द्यांवर परस्पर विरोधी गोष्टी वाचायला मिळाल्या आहेत. आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी. त्यामुळे " मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?" याचे उदाहरण म्हणजे हे भाषण म्हणावे ही माझ्यालेखी अतिशयोक्तीच !

In reply to by बाळ सप्रे

मुद्दे चांगले मांडले. खरे की खोटे ह्याची पडताळणी होऊ शकतेच. पुरावेही दाखवले त्यांनी अनेक ठिकाणी... पण
आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी.
ह्यामुळे मी सुद्धा ह्या भाषणाला वस्तुपाठ वगैरे म्हणणार नाही. ते डायलॉग नसते तर खरंच अजुन जास्त भावलं असतं भाषण.

काल रात्री ऐकले हे पूर्ण भाषण ! काय तर बोलल्या स्मृती इराणीबाई ! जबरदस्त ! पहिले भाजपाचे महिला नेतृत्व म्हणून केवळ सुषमा स्वराज्य यांचे नाव समोर येत होते. पण आता स्मृतीबाईंचेही नाव घ्यायला हरकत नाही. रच्याकने माझी ना एक इच्छा आहे, राहुल गांधी , कपिल सिब्बल, सोनिया गांधी , नरेंद्र मोदी, अरूण जेटली, सुषमा स्वराज वगैरे यांनी एका मंचावर चर्चा करावी. व ती पूर्ण चर्चा लाइव्ह असावी .

भाजपच्या अंतर्गत, सुषमा स्वराजेतर गटाला, एक चांगली महिला प्रवक्ता मिळाली, इथे पक्षाचे महिला-प्रतिनिधित्व, म्हणजे मला म्हणावयाचे आहे, की प्रत्येक राजकीय पक्षात काही प्रातिनिधिक नेते असतात. काल्पनिक उदा. रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात सामील केले तर, एखादा पक्ष सांगू शकतो की, आम्ही दलितांना सत्तेत सहभागी केले… मुख्तारअब्ब्बास नक़्वि यांना महत्वाचे पद दिले (पक्षांतर्गत किंवा सरकार मध्ये ) तर, एखादा पक्ष सांगू शकतो की, आम्ही अल्पसंख्यांकाना सहभागी केले… हे अशे प्रकार सर्वच पक्ष करतात, इथे, माननीय स्मृती यांच्या भाषणामुळे, सुषमा स्वराज यांच्यावर असलेली पक्षाचे महिला-प्रतिनिधित्व करण्याचा बोजा बराच हलका झालाय. म्हणजे पूर्वी पक्षाला जिथे स्वराज यांचाच विचार करावया लागत असेल, तिथे आता दुसरा विकल्प सुद्धा त्यांना उपलब्ध झालाय.… म्हणजेच उदा. उद्या जर सुषमाजी स्वराज यांना काही कारणाने काही जबाबदारी घेता आली नाही किंवा पक्षाला त्यांना कार्यबाहुल्यामुळे आणखी जबाबदारी द्यायची नसेल, तर ऑप्शन तयार झालाय… अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे

पूर्वी लोक नेत्यांच्या भाषणांना गर्दी करत. आताचे नेते कैच्या कै बोलतात. ताजे उदाहरण म्हणजे आनंद शर्मा आणि तृणमूल काँग्रेसने या भाषणात जे एन यु मधील दुर्गादेवीच्या अपमानकारक उल्लेखाचा उल्लेख केला म्हणून स्मृतीला धारेवर धरले आहे. बरेच दिवसांनी व्यवस्थित मुद्देसूद भाषण ऐकायला मिळाले. हल्ली अशी भाषणेही दुर्मिळ आहेत. त्यासाठी स्मृतीचे कौतुक.

स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण युट्युबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! स्मृती इराणींचे भाषण अत्यंत जबरदस्त व तडाखेबंद होते. त्यांच्या भाषणामुळे आपण घायाळ होणार हे आधीच ओळखून खांग्रेसींनी आधीच पलायन केले होते. "मला संसदेत बोलून दिले जाणार नाही. माझ्या बोलण्याला ते घाबरतात" असे संसदेबाहेर विनोदी तारे तोडणारे राहुल गांधी या विषयावर संसदेत अजून बोललेच नाहीत. ऑगस्ट २०१५ मध्ये ललित मोदी प्रकरणावरून सुषमा स्वराजांनी असेच आक्रमक व तडाखेबंद भाषण करून खांग्रेसींना घायाळ करून सोडले होते. या भाषणावरून त्या भाषणाची आठवण झाली. मला वाटते की यापुढे कोणत्याही वादग्रस्त प्रश्नावर बोलण्यासाठी भाजपने फक्त या दोघींनाच पुढे करावे. त्यांच्या भाषणापुढे खांग्रेसींची फॅ फॅ उडेल.

स्मृती इराणींचे भाषण चांगले झाले मलाही आवडले होते पण आजच त्यांच्या भाषणातला डॉक्टरांशी संबंधित मुद्दा खोटा असल्याची बातमी वृत्तपत्रात आलीय. त्यामुळे भाषणाचे सादरीकरण उत्तम पण मुद्दे खोटे असे व्हायला नको

In reply to by प्रतापराव

शक्यय ज्युडीशिअल कमिशन सरकारने बसवले आहे, संसद सदस्यांनी मागितले असते तर संसदीय समितीसुद्धा नेमण्याशिवाय नमो सरकारला गत्यंतर राहीले नसते त्यात अशा सर्व बारकाव्यांची चौकशी होऊ शकते. एक मात्र खरे की अपघात स्थळावरील मृतदेह ताब्यात घेण्यास पोलीसांना विरोधकरणे, चौकशीच्या आधीच तपासाची दिशा नव्हे तर राजकीय उद्देशाने कुणाची तरी नावे संशयीत म्हणून जोडायला लावणे हे ही स्पृहणीय नसावे. ह्याच नाही इतरही केसेस मध्ये जमाव पोलीसांना त्यांच्या कामात व्यत्यय आणताना दिसतात ते योग्य नसावे.

In reply to by प्रतापराव

डॉक्टरांच्या मुद्द्याबाबत त्यांना चूक ठरवले जात आहे आणि त्यावरून प्रश्न विचारणे योग्य देखील आहे. पण ती horrific युट्युब क्लिप बघत असताना काही वेगळेच प्रश्न पडले. आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे. त्याला ज्या पद्धतीने फासावरून काढून बेडवर ठेवले होते, ते नक्की कधी झाले? कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी चेक केले त्या आधी साधारण २ तास आधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्या चित्रफितीत किमान एक पोलीस दिसतो पण न्यायालयात सादर केलेल्या पोलीस रिपोर्टप्रमाणे "... an unruly mob of students did not even allow police to take out Vemula's body to carry out the investigation." Police Report जर पोलीस रिपोर्ट पण खरा असेल (अजून पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही) तर मग हा पोलीस तिथे कसा उभा राहू शकला? त्या व्यतिरीक्त आता बाहेर आलेल्या बातमीनुसार तो दलीत नव्हता. दुर्दैवाने त्या असण्या-नसण्याने त्याचा जीव परत येणार नाही. पण हा मुद्दा आपल्याकडे कायद्यामुळे महत्वाचा आहे. कारण दलितांवरील अत्याचाराला वेगळ्या प्रकारे हाताळले जाते. जर हे खरे असले की तो दलीत नाही, तर ह्या कांगावखोर डाव्यांना आणि काँग्रेसला पण, या प्रसंगात समाजात जातियता माजवायला कारणीभूत आहेत म्हणून जाहीर करायला हवे. (तसे अधुनिक जातियतेचे विष पसरवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत)

In reply to by विकास

विकास, माझा अंदाज आहे की रोहितची हत्या झालेली आहे आणि त्याचा मृतदेह नंतर फासावर टांगलेला आहे. हे षड्यंत्र उघड होऊ नये म्हणून पोलिसांना पुढील तपासास अटकाव केला गेला. आ.न., -गा.पै.

स्मृती इराणीं बद्दल सुरुवातीला माझे स्वतः मत हि हेच होते कि दुसरं कोणी तरी शिकलेल माणूस तिथे हवा होता. पण गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेलं काम आणि वेळोवेळी विरोधकांचे पुराव्यासकट केलेली चिरफाड बघून माझं मत बदललंय. काम तर त्या करतातच पण त्यांची राजकीय समज जबरदस्त आहे. आणि कधीही पुराव्या विना बोलत नाहीत. हो. आता शीर कापून ठेवेन इत्यादी भावनेच्या ओघात बोलून गेल्या .. पण ते कधीही "one morning i woke up at night" चांगलंच बाकी ज्यांनी कालच्या भाषणावरून त्यांना "अजुनी नाटक करणारी बाई " वगेर म्हणलं ते बघून खरोखर वाईट वाटलं . कोन्ग्रेस ने खरं तर सदनात हि चर्चा करून जमिनीवर शांत पडलेल्या कुऱ्हाडी वर तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या भाषणाबरोबर अनुराग ठाकूर यांचं भाषण . .आणि काल राज्यसभेत पुन्हा एकदा इराणी आणि जेटली याचं भाषण हि ऐका. जबर उत्तर दिली आहेत

In reply to by अद्द्या

शिकलेला का न शिकलेला (म्हणजे किती उच्चशिक्षीत वगैरे) यावर काहीच नसावे. असे मला वाटते..

सोनिया गांधींपेक्षा नक्कीच जास्त शिकलेल्या आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

हा चीप शॉट आहे. रागा सगळ्याच बाबतीत आणि सोगा हिंदी, शिक्षण इ. बाबतीत 'लो हँगिंग फ्रूट' आहेत. सोगांपेक्षा जास्त शिक्षण (आणि रागांपेक्षा कोणत्याही बाबतीत हुशार) ही काही प्रशंसा होऊ शकत नाही. (हे म्हणजे दुसरीतल्या दोन उजव्या मुलांना डाव्या हाताने लिहायला सांगायचं आणि त्या हस्ताक्षराची तुलना करायची इतपत ढिसाळ आहे.) मनमोहन सिंग, माँटेक सिंग अहलुवालिया, चिदंबरम्‌, कपिल सिब्बल, असे बरेच उच्चशिक्षित लोक दुसऱ्या बाजूला तुलना करायला आहेत. भाजपचे जेटली, जेठमलानीही उच्चशिक्षित आहेत. (आणखीही असतीलच; मला चटकन आठवले नाहीत.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे उच्चशिक्षित प्रकरण जे डावे आणि त्यांच्या जवळची प्रसार माध्यमे आणतात त्यातून मला पुर्विच्या काळातला जातिय वर्चस्व आणायचा प्रकार आढळतो.

In reply to by विकास

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच. जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे. जात जन्मामुळे मिळते, शिक्षण हे कर्तृत्व असतं. जात बदलता येत नाही, शिक्षण (आणि व्यवसाय) बदलता येतात. (स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं.) (आता मी शहाणपणा-wisdom याबद्दल बोलत्ये. यात शिक्षण, औपचारिक प्रमाणपत्रं यांचा संबंध नाही.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे.
सहमत आहे. शिक्षण हे ओव्हररेटेड आहे हा समज धोकादायक आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जात जन्मामुळे मिळते हे फारच पुरातन मत झालं. ;) मी जरा माडर्न इच्चार करतोय. म्हणून कालानुरूप जात म्हणजे काय हे सांगत होतो आणि अजूनही सांगत आहे. स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं यालाच मी नवजातीयतावाद म्हणतोय. जसे कर्ण हा अंगराज झाला तरी त्याला सूतपुत्र म्हणले जायचे. आता सूतपुत्र ही काही जात नव्हती. आता तसेच सतत इराणीबाईंना actor turned ... म्हणणे चालू आहे. त्यावेळेस तसे हिणावणारे पुरूष हे एका बाईबद्दल लिंगभेद करत बोलत आहेत असे म्हणले जात नाही कारण इराणीबाईंची जात ही अ‍ॅक्टींग आहे अस म्हणणे आणि बिंबवणे महत्वाचे असते. तेच त्या मणिशंकर अय्यरंनी "चायवाला" म्हणून पाहीले. त्यावेळेला ते ओबिसी ला हिणावतात असे म्हणले जात नाही. कारण त्यावेळेला मोदींची जात ही चायवाला करणे गरजेचे असते. आता कॉफी प्यायला पण घाबरतात ते सोडा. असे म्हणणार्‍यांमधे स्वतःच्या शिक्षणाचा एक अहंगंड आहे आणि सातत्याने इतरांच्या मनात बिंबवायचे असते की समोरची व्यक्ती ही काही राजकारणी नाही तर कोणी तरी अडाणी आहे. आणि अडाणी का? कारण कोणीतरी जातीने बुद्धीवादी असलेला तसे म्हणतो म्हणून? आणि हा शहाणपणा? बरं गंमत अशी की असल्या चमच्यांचे बर्‍याचदा बॉसेस काही शिकलेले असतात का तर तिथे देखील बोंब... काही माध्यमांचे मालक उच्चशिक्षित नसलेले शेटजी असतात ते वार्ताहारांना (खर्‍या अर्थाने चांगल्या) लायकीप्रमाणे घेतात पण नंतर आपल्याला काय हवे ते मांडायला सांगतात... तसेच सोनिया-राहूल सारख्या शिक्षणाच्या बाबतीत संभ्रम असलेल्यांच्या हाताखाली अय्यर, सिब्बल सारखे काम करतात. जे हवे तसे बोलतात-वागतात. तेंव्हा कमी अथवा झिरो शिक्षण ही जात नसते तर त्यांचे गांधी हे आडनावच जात झालेले असते.. मग "अर्थस्य पुरुषो: दासः" म्हणा अथवा "ब्राम्हणं भोजनं प्रियं" म्हणा काही कारणाने हे नवउच्चजातीय आरत्या ओवाळत स्वतःच्या पोळ्या भाजून घेतात. म्हणूनच त्याला मी नवजातीयता असे म्हणले आहे. जात केवळ जन्मानेच येते असे नाही. केवळ हिंदू आणि हिंदू धर्मातून धर्मांतर केलेल्यांनी पाळलेल्या पक्षि: भारतभरच्या समाजातच आहे असे नाही. सर्वत्रच आहे. ती सध्याच्या काळात समोरच्याला कमी दाखवण्यासाठी वापरलेले एक समाजवादी-साम्यवादी शस्त्र आहे. त्याचा सातत्याने वापर केला जातो, जसा हवा तसा आणि जेथे हवा तेथे...कधी क्लासकॉन्फ्लिक्ट म्हणत तर कधी कास्टकॉन्फ्लिक्ट म्हणत. बेसिकली कॉन्फ्लिक्ट पेटवत ठेवायचे आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या हा उद्योग. असो.

In reply to by विकास

इराणींना रेफर करताना अ‍ॅक्टर टर्ण्ड पॉलिटिशिअन म्हणतात. तसं सोनियांना बार गर्ल टर्ण्ड पॉलिटिशिअन म्हणायला सुरुवात केली वार्ताहरांनी तर लिबरलांची काय रिअ‍ॅक्षन असेल?

In reply to by अनुप ढेरे

इराणीबाई फक्त स्टारप्लस वर बहु होत्या. सोनिया मॅडम ह्या गांधी घराण्याच्या म्हणजे तमाम देशाच्या बहू आहेत! ;) या बहूस नावे ठेवलीत तर तमाम राष्ट्रनिष्ट काँग्रेसजनांचे बाहू फुरफुरतील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.
इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अ‍ॅड होमिनेम" नाही का हो ताई ?
जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे. जात जन्मामुळे मिळते, शिक्षण हे कर्तृत्व असतं. जात बदलता येत नाही, शिक्षण (आणि व्यवसाय) बदलता येतात. (स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं.) (आता मी शहाणपणा-wisdom याबद्दल बोलत्ये. यात शिक्षण, औपचारिक प्रमाणपत्रं यांचा संबंध नाही.)
याबद्दल नक्कीच सहमत. तुम्ही काय म्हणायचंय ते थोडक्यात मुद्देसूद लिहिता हे आवडलं. :)

In reply to by हाडक्या

इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अ‍ॅड होमिनेम" नाही का हो ताई ?
नाही. कारण १. मी अर्धवट मस्करी करत होते. २. बोका-ए-आझम जे म्हणत आहेत त्याला समांतर, पण 'कुठे त्या खातेऱ्यात हात घालायचा' असं म्हणत्ये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.
अभ्यास वाढवा हो ताई असं म्हणालो असतो. पण तुम्ही काय तेवढ्या महत्वाच्या नाहीत. So काय समजायचं ते समजा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काय ताई गम्मत करतायत का. या उच्च शिक्षित लोकांनी देशाचे किती दिवाळे काढले आहे. माहित आहे का? त्या पेक्षा अडाणी बारा, मोठा घोटाळा करू शकणार नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन्ही शॉट चुकीचे हे बरोबर, पण टेनिस मध्ये पहिल्याने चुकीचा शॉट मारला आणि दुसर्‍याने नुसता परतवला तरी परतवलेला शॉट हकनाक चुकीचा दिसतो ! काय म्हणता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मोंटेकसिंग अहलुवालिया हे मंत्री नव्हते. कींबहुना काँग्रेसचे देखील नव्हते कधी. आणि जयंत सिन्हा हे नाव गूगल करा.

In reply to by अनुप ढेरे

बरोबर. पण काँग्रेसच्या मर्जीतले जरूर असावेत. मुद्दा एवढाच होता की कोणाच्याही शिक्षणाची तुलना करायची असेल तर दोन दहावी-बारावी लोकं का निवडावीत? चांगली शिकलेली लोकं निवडावीत. कोणाची रेघ लहान ही स्पर्धा करणं प्रतिगामी आहे. कोणाची रेघ मोठी याची स्पर्धा करावी.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणाची रेघ लहान ही स्पर्धा करणं प्रतिगामी आहे. कोणाची रेघ मोठी याची स्पर्धा करावी.
आदर्श विचार आहे, पण लोकशाहीच्या नाण्याला अधिक कंगोरे असावेत, १) लोकशाहीत सरपंच शाळेच्या मुख्याधापकापेक्षा अधिक, महापौर कॉलेजच्या प्राचार्यापेक्षा अधिक, राज्याचा शिक्षणमंत्री विद्यापिठाच्या कुलगुरुपेक्षा अधिक, केंद्रीय शिक्षण मंत्री युजीसीच्या चेअरमनपेक्षा अधिक शिकलेला असण्याची अपेक्षा करत बसण्यात अर्थ नाही. २) त्याच वेळी राजकारणातल्या लोकांच्या क्षमतांप्रमाणेच मर्यांदांची चर्चा होण्यात गैरही नाही. ३) कुणाला मंत्री नेमायचे हा पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, स्मृती इराणींपेक्षा सुषमा स्वराजांकडे हे खाते आधिक शोभले असते असे मला नेहमीच वाटते, तरीही एकदा मंत्रि केल्या नंतर जास्त राळ उडवण्यात पॉईंट नसावा तरीही राळ उडवली गेली. या बाबतीत छोटी रेष ओढण्याचा खेळ भाजपा समर्थकांनी चालू केलेला नाही ते फक्त चेंडू परतवत आहेत. दोन्ही बाजूला वेगवेगळ्या लेव्हलचे समर्थक असतात ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांच्या त्यांच्या लेव्हलचे चेंडू परतवत असतात.

In reply to by माहितगार

...आणि दाखवायच्याच झाल्या तर आमच्या सोईच्या गोष्टी (आणि सोईच्या नसल्या तर सोईच्या करून मगच) दाखवा :)

मिलिंद धुमाळे यांचा लेख वाचला. रामायण/महाभारत कार्टूनच्या माध्यमातून शिकविले जाणे किंवा हिंदू धर्मातील सण साजरे केले जाणे ह्याला भगवी करण म्हणायचं असेल तर कठीण आहे.

वेमुलाच्या न मिळालेल्या फेलोशिपवरून देखील आरडाओरडा चालू आहे, जणू काही ती मुद्दामून दिली नव्हती. पण आत्ता शोधत असताना टाईम्स ऑफ इंडीया मधे एक वेगळीच बातमी दिसली जी इतर कुठल्या माध्यमांमधे पटकन तरी दिसली नाही... खाली ती बातमी जशीच्या तशी चिकटवत आहे...
HYDERABAD: Four days after his suicide, it has now come to the fore that the delay in disbursement of Rohith Vemula's fellowship money was due to a confusion over two junior research fellowships (JRFs) that he secured during two different years. Vemula used to receive Rs 25,000 every month as fellowship, but this grant stopped in July 2015. In his suicide note, Vemula stated he hadn't received his fellowship money for the past seven months. University officials in a report to the HRD ministry state that Vemula had first qualified for a fellowship for two years between July 7, 2012, and June 6, 2014. He cancelled his course in July 2013 and again qualified for a fellowship in March 2014. Since Vemula had been paid in excess in his first fellowship, UoH had to seek clarification from the UGC on whether "such fellowship can be allowed" and for what period. This, according to them, compounded the confusion.
थोडक्यात त्याची फेलोशिप ही जुल्य २०१२ ते जुने २०१४ होती. पण त्याने त्या कार्यक्रमातून २०१३ मधेच अंग काढले. पण त्याला फेलोशिप मात्र ती ग्रँट संपेपर्यंत म्हणजे जुलै २०१५ पर्यंत मिळालेली होती. पण तो या कार्यक्रमात जवळपास आठ नऊ महीने नसताना (जुलै २०१३ ते मार्च २०१४) देखील त्याला पैसे मिळत होते. त्यामुळे अधिक पैसे आधीच दिले गेले असल्याने नवीन पैशाचे अकाउंटींग कसे करायचे हा प्रश्न होता... हा मुद्दा कुणाच्याही बाबतीत होऊ शकला असता. अमेरीकन विद्यापिठात तर ग्रँट मधेच संपली अथवा समर मधे मिळाली नाही तर मुलांना कुठलीही कामे करावी लागतात...त्याचा गाजावाजा होत नाही. बरं या जागी कुणी अभाविपचा विद्यार्थी असता ज्याला आधीच ९ महीने जास्तीचे पैसे दिले हे बाहेर आले असते तर काय ठणाणा केला असता!

सोनिया गांधींवर यथेच्छ अगदी खालच्या दर्जाची टिका करणार्‍यांना स्मृती इराणींवरची वरच्या दर्जाची टिकाही बिल्कूल सहन होत नाही हे पाहून गंमत वाटते.

In reply to by तर्राट जोकर

खालच्या दर्जाची टिका कृपया व्याख्या आणि सोनियांच्या बाबतीतली उदाहरणे देता का? जर खालच्या दर्जाची टिका असली तर ते अयोग्यच म्हणायला हवे. आणि अ‍ॅक्टर टर्न असे सारखे हिणावणे ही उच्च दर्जाची टिका कशी ते देखील सांगितले तर बरे होईल.

In reply to by विकास

आणि अ‍ॅक्टर टर्न असे सारखे हिणावणे ही उच्च दर्जाची टिका कशी ते देखील सांगितले तर बरे होईल.
आधी एक कन्फेशन - मी 'सांस भी कभी बहू थी' किमान काही आठवडे बघितलं आहे. आता पुढे. १. प्रीती झिंटाचा उल्लेख actor-turned-businessperson असा होतो. व्यक्तीच्या सीव्हीचा सारांश देण्याची ही पद्धत मलातरी चूक वाटत नाही. २. स्मृती इराणीला अभिनेत्री म्हणणं हा मला अभिनयाचा अपमान वाटतो. कॅमेऱ्यासमोर किंवा स्टेजवर उभं राहिलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करते असं मला वाटत नाही. ३. बॉक्सर-टर्न्ड-खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल एकेकाळी बॉक्सर होता हा उल्लेख अपमानव्यंजक वाटतो का? का? ४. अभिनय करणं हे खालच्या दर्जाचं काम वाटतं का? (मला वाटत नाही.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भलतेच बै तुम्ही गंमतीशीर! थांकु थांकू व्यक्तीच्या सीव्हीचा सारांश देण्याची ही पद्धत मलातरी चूक वाटत नाही. राजीव गांधींना पायलट टर्न्ड पंतप्रधान म्हणल्याचे आठवत नाही...अजून एक महत्वाचे आत्ताच्या जॉबसाठी त्याचा काय संदर्भ आहे तिथपर्यंतच सिव्हीचा संबंध असतो. नाहीतर उद्या बालवाडीतला विद्यार्थी टर्न्ड म्हणत खूपच टर्निंग पॉईंट घेत बसावे लागेल. गोविंदा खासदार असताना अथवा वैजंयंतीमालाला देखील असे म्हणले गेले नाही. मला कल्पना आहे की गोविंदाच्या बाबतीत ती बाब गोपनीय ठेवणे महत्वाचे असेल म्हणून बोलले गेले नसेल. पण तो वेगळा मुद्दा झाला. स्मृती इराणीला अभिनेत्री म्हणणं हा मला अभिनयाचा अपमान वाटतो. कॅमेऱ्यासमोर किंवा स्टेजवर उभं राहिलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करते असं मला वाटत नाही. मी त्यांचा अभिनय पाहीलेलाच नाही. त्यामुळे त्या संदर्भात नो कॉमेंट्स. बॉक्सर-टर्न्ड-खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल एकेकाळी बॉक्सर होता हा उल्लेख अपमानव्यंजक वाटतो का? का? विकीवर हबल टेलीस्कोप बद्दल लिहीताना The telescope is named after the astronomer Edwin Hubble. असे लिहीले आहे. The telescope is named after the boxer turned astronomer Edwin Hubble असे नाही. असो. अभिनय करणं हे खालच्या दर्जाचं काम वाटतं का? (मला वाटत नाही.) अजिबात नाही. कुठलेच काम कमी दर्जाचे नसते. कमी दर्जाचे असेलच तर तसे इतरांच्या बाबतीत दाखवणारी वृत्ती... जी (हिन वृत्ती) ही माध्यमे इराणीबाईंच्या बाबतीत सातत्याने दाखवत आली आहेत. कारण त्यांना काहीही करून त्या पॉलिटीशिअन नाहीत हे जनतेच्या डोक्यात बिंबवायचे आहे. तुमच्यासाठी साधे असेल हो, पण तसे नाही केले तर पुढच्या वेळेस अमेठीला काही खरे नाही ही भिती आहे ना!

In reply to by तर्राट जोकर

मुळात दोघींवर (अथवा कोणावरही) अशी खालच्या दर्जाची टिका का करावी ? ( आता ते तिथे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य वगैरे मध्ये येते का ते वेगळे तरीपण तशी टिका अमान्यच ). हे सांगून तुम्हाला विचारतो की इथे एकाची रेघ कमी दाखवून दुसर्‍याची मोठी कशाला दाखवायचीय ? (तुमच्या काही प्रतिसादातून "तुम्ही केलं तेव्हा कसं चाललं मग आता का " असा सूर जाणवला आधीही आणि एका ठिकाणी सुहास म्हात्रेंनी तुम्हाला त्यावर एकाची चूक दाखवून दुसर्‍याच्या चुकीची तीव्रता कमी होत नाही अशा काहीश्या अर्थाचा प्रतिसादही दिला होता. तरीही सांगू पाहतोय ) चांगलं लिहिणार्‍यांसाठीही तटस्थपणे साधा विचार इतका कठीण का असावा ? म्हणजे इराणीबाईंवर केलेल्या आरोपाचं तिनं मुद्देसूद खंडन (ते कितपत बरोबर चूक तो मुद्दा वेगळा ) तेही संसदेसारख्या जबाबदार व्यासपीठावर केलं आणि त्यातल्या मुद्देसूदपणाबद्दल इथे कोणी लिहिलं. यावर इतकं काय व्हावं असं वाटून गेलं. (सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि सध्या सगळीकडे तीच बजबजलेली पाहणारा)

In reply to by हाडक्या

मुळात दोघींवर (अथवा कोणावरही) अशी खालच्या दर्जाची टिका का करावी ? ( आता ते तिथे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य वगैरे मध्ये येते का ते वेगळे तरीपण तशी टिका अमान्यच ). >> सहमत. तीव्रपणे. मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही. कुणाच्याही चुका दाखवून आपल्या चुका जस्टीफाय करणे मला व्यक्तिशः आवडत नाही. पण जेव्हा कोणी असे करतो तेव्हा त्याला त्याच्या पुर्वकर्मांची आठवण करुन त्यांचा दांभिकपणा उघडा पाडणे मला आवडते. भाजपसमर्थकांना असे उघडे पडणे आवडत नाही, त्यांची गेल्या दोन वर्षांपासून "तुम्ही केलं तेव्हा कसं चाललं मग आता का " हीच भूमिका आहे तरी तोच प्रश्न त्यांना विचारला की कळवळतात. मिपावर कुणी काँग्रेससमर्थक नाही, असला तरी इथे पक्षाची बाजू मांडायला येत नाही किंवा ते दुर्लक्ष करतात. भाजपसमर्थकांचे तसे नाही, कुठे कोणी जराशी माचिसची काडी पेटवली तरी अख्खं फायर ब्रिगेड घेऊन पोचतात.(उदा> व्यवच्छेदक लक्षणांचे दोन्ही धागे, बडोदा डायनामाईट प्रतिसादावर काँग्रेसच्या आणीबाणीच्या उल्लेखाचा अतिरेकी, उताविळ, अनावश्यक आग्रह). फारच असुरक्षिततेची भावना. असो. (सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि सध्या सगळीकडे तीच बजबजलेली पाहणारा) >> सेम हीअर.

In reply to by तर्राट जोकर

दिलेल्या प्रतिसादाबद्दल बोलत असाल, तर बार गर्ल या व्यवसायाला कमी लेखताय असं वाटत नाही का? जे स्मृती इराणींना actor turned politician म्हणतात त्यांचंही अभिनेत्री या व्यवसायाबद्दल असंच संकुचित मत असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रे भगवान! ढेरेंचा प्रतिसाद वाचला नव्हता. तरी दोन्ही प्रतिसाद आलेत ते बरेच झाले. असो. सोनिया गांधींबद्दल एकूण भाजपसमर्थकांकडुन ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत ते आठवून आता इराणींबद्दलची टीका सहन होत नाही हे दांभिक आहे. -हे निरिक्षण इथल्या कुठल्याही सदस्याच्या सोनियागांधींबद्दल्च्या टिप्पणीबद्दल नाही-

In reply to by तर्राट जोकर

अश्लाघ्य टीका केली नव्हती. खुद्द नरेंद्र मोदींनी केली नव्हती. मां-बेटे की सरकार वगैरे राजकीय टीका असेल पण मर्यादा सोडून नव्हती. स्मृती इराणींवरही सगळ्या काँग्रेसवाल्यांनी अश्लाघ्य टीका केलेली नाही. ज्यांनी केलीय त्यांची मनोवृत्ती समजून येतेच - कुठलाही पक्ष असला तरीही. मात्र नरेंद्र मोदींबद्दल मौत का सौदागर वगैरे टीका सोनिया गांधींनी केली होती. तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ.

In reply to by बोका-ए-आझम

पुढचा प्रतिसाद लिहण्याआधी शब्दाचे घोळ होउ नये म्हनुन वाक्य नीट मांडतो. सोनिया गांधींबद्दल भाजपसमर्थकांकडुन एकूण ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत बोकाभाऊ, अंगावर यायला लागलं की शब्दांचे खेळ खेळणे, जबाबदार्‍यांपासून पळणे भाजपसमर्थकांसाठी नवीन नाही. तुम्हीही तेच कराल तर कसे चालेल? माझ्या प्रतिसादात नसलेला सगळे भाजपचे लोक असा शब्दसमुह वापरुन तुम्ही तर्काने किल्ला लढवताय. मी सगळे भाजपचे लोक असे म्हटलेच नाही. भाजप म्हणजे निव्वळ नरेंद्रमोदी नाही. प्रत्येक गोष्टीत नरेंद्रमोदी आणल्याशिवाय चैन पडत नाही असे भाजपविरोधकांबद्दल बोलले जाते, भाजपसमर्थकही वेगळं काय करतात?

In reply to by तर्राट जोकर

सोनिया गांधींबद्दल एकूण भाजपसमर्थकांकडुन ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत ते आठवून आता इराणींबद्दलची टीका सहन होत नाही हे दांभिक आहे. -हे निरिक्षण इथल्या कुठल्याही सदस्याच्या सोनियागांधींबद्दल्च्या टिप्पणीबद्दल नाही-
हा असा उल्लेख वाचल्यावर मी दिलेला प्रतिसाद आहे. नंतर तुम्ही दिलेला प्रतिसाद तब्बल अर्ध्या तासाने (११.५७) ला आहे. मधल्या काळात माझा प्रतिसाद प्रकाशित झाला आणि तुम्ही त्यावरून निष्कर्ष काढून मोकळे झालात. बाकी काही नाही, त्यावरून माझं - लोक आपलं मत आधीच बनवतात आणि मग त्या अनुषंगाने माहिती process अाणि interpret करतात - हे म्हणणं सिद्ध होतं.

In reply to by बोका-ए-आझम

मी फक्त माझ्या प्रतिसादावर आलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल, व आपल्याच दोघांमधे होत असलेल्या चर्चेबद्दल बोलत आहे. इतर कुठे काय प्रतिसाद दिला त्याचा संबंध नाही. तुम्ही ज्या पद्धतीने मुद्दा मांडताय व गरज नसलेले तपशील (सगळे पक्षवाले) आणून मूळ मुद्द्याला बगल मार्ताय ते बघून मी बोलतोय. इथे टिका विरूद्ध टिका एवढाच विषय आहे. तीची पातळी दोन्ही पक्षसमर्थक ओलांडतात व तसे केल्याबद्दल एकमेकांविरूद्ध दांभिक आरोप करतात एवढेच निरिक्षण आहे. तुम्ही तिथे मोदी वैगरे आणायचे तसे काही कारण नव्हते. तुमचेच वाक्य तुम्हालाही लागू होतंय. असो.

In reply to by बोका-ए-आझम

तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ. आता तुमच्यावर चीप शॉट केल्याचा आरोप होणार ;) =))

In reply to by बोका-ए-आझम

सहजच "५० करोड की गर्लफ्रेंड" आठवला. ते अश्लाघ्य / असंसदीय/ किंवा पर्सनल नव्हता का बोकाभाउ ?

In reply to by कपिलमुनी

काँग्रेसने केली त्या मानाने तो फारच सौम्य होता. आणि पुन्हा तेच - ती वस्तुस्थिती आहे. बाकी तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?

In reply to by बोका-ए-आझम

बोकाभाऊ.. ते मुद्द्याचे आणि त्यातल्या त्यात "प्रिन्सिपली" कोण बरोबर आहे ते बोलत आहेत. आता तुमचे तितकेच वाक्य पकडून "त्यांनी केले म्हणून यांनी केले ते बरोबर ठरते का?" "भक्त असेल तरच टीका बोचावी का?" असले प्रतिवाद येतील. हे म्हणजे त्यांनी १० वैयक्तीक हल्ले केले की "ते तसलेच आहेत म्हणून सत्तेवर नाहीत" आणि यांनी एक प्रत्युत्तर दिले की "बघा तुमची पण पार्टी चुका करते" असे न संपणारे आणि वरकरणी योग्य पण निरूपयोगी युक्तीवाद सुरू होतात.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?
मी कोणाचाही भक्त नाही.आणि टीका मला बोचण्याचे कारण नाही. तुम्ही अश्लाघ्य टीकेचा उल्लेख केलात म्हणून उदाहरण दिला. एखाद्या स्रीची पैशाशी तुलना कोणत्याही परीस्थिती मधे चुकीचाच! ( किंमत ठरवल्याप्रमाणे) कॉंग्रेसने पातळी सोडली म्हणुन मोदींनी सोडली तर दोघेही चूकच ! दुसऱ्याच्या मोठ्या चुकीमुळे मोदींची चूक योग्य ठरत नाही. जसा मोदींच्या पत्नीचा उल्लेख चुकीचा असेल तर शशी थरुर यांच्या पत्नीचाही उल्लेख चुकीचाच. आता तुम्ही पण मोदींची प्रत्येक गोष्ट बरोबरच म्हणत असाल तर भक्त कोण हे उघड आहे. सनी लिओन वर पेटणारे मिपाकर या प्राईस टॅगींग ला सपोर्ट करतात हे पाहून आश्चर्य वाचले

In reply to by कपिलमुनी

Gujarat Chief Minister Narendra Modi on Monday took potshots at Union Minister Shashi Tharoor's personal life, saying his wife was once his "50-crore-rupee girlfriend", a day after he made a comeback in the Union Cabinet reshuffle. "Wah kya girlfriend hai. Apne kabhi dekha hai 50 crore ka girlfriend? (What a girlfriend? Have you ever seen a 50-crore girlfriend), Modi said at an election rally, in an apparent attack on Tharoor's wife Sunanda Pushkar. "There was a Congress leader who was a minister. He was accused of amassing wealth from cricket. He had said in Parliament that he is not connected to the Rs 50 crore in the lady's name," the BJP stalwart said in an apparent reference to Tharoor in the context of the IPL cricket controversy involving Pushkar in 2010 which led to his resignation as Minister of State for External Affairs minister. Modi, however, did not take any names. "...And then girlfriend becomes wife, we learn some time later...the issues are still not settled and he (Tharoor) is now made a minister," the chief minister said. हा संदर्भ शशी थरुर यांच्यावर २०१० मध्ये आलेल्या कोची टस्कर्स या आयपीएल संघासंबंधित जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते त्यावर होता. तेव्हा सुनंदा पुष्कर यांच्यासाठी थरुर यांनी या संघात १०% sweat equity मागितली होती. ही sweat equity नंतर ५% एवढी निर्धारीत करण्यात आली. त्यानंतर शशी थरुर यांना ते सुनंदा पुष्कर यांना proxy म्हणून वापरत असल्याच्या आरोपावरुन राजीनामा द्यावा लागला. त्यावरून हा शब्दप्रयोग मोदींनी केला. त्यावर थरुर यांची प्रतिक्रिया होती - My wife is worth much more than Modi's imaginary fifty crores. In fact, she is priceless. For Mr.Modi to understand that, he will have to love someone. म्हणजे शशी थरुर यांनाही हा शेरा अपमानास्पद वाटला नव्हता. आता त्या स्त्रीच्या पतीला हा अपमान वाटला नव्हता आणि तुम्हाला वाटतो म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.

In reply to by बोका-ए-आझम

बाकी तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय? >> आपल्याला तुमच्यासारखे हुच्च हुच्च विधानं करता येत नाही पण थोडा कॉमन सेन्स आहे. राहुलजींचे भक्त असले तरच ती टिका बोचावी अन्यथा नाही असे म्हणून तुम्ही शशी थरुर यांच्या पत्नीबद्दलचे मोदींचे उद्गार समर्थनीय ठरवत आहात. शिवाय ते सौम्य का तीव्र हे तुमच्या इच्छेवर ठरतंय. काँग्रेसजनांच्या स्त्रिया ह्या मान देण्यालायक नाहीत हेच तुमच्या विधानातून सूचित होतंय.

विक्षिप्त आदिती, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. मटाचा हवाला देऊन तुम्ही म्हणताय :
>> स्मृती इराणी चक्क फेकंफाक करत होत्या.
रोहितच्या जवळ डॉक्टर पोहोचले नाहीत ही कसली हो फेकंफाक? याची भाऊ तोरसेकरांनी बरोब्बर पिसं काढली आहेत. त्यांच्या लेखाचा सारांश असा की रोहितची आत्महत्या ही राज्य शासनाच्या अखत्यारीत येते. रोहितची बातमी कळल्यावर बाईंनी राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला. ते कामात व्यग्र असल्याने संपर्क होऊ दिला नाही. मग त्यांनी रावांच्या कन्येशी संपर्क साधला. ती खासदार आहे. तिथेही काही माहिती मिळाली नाही. तेव्हा इराणी बाईंनी पोलिसांना कामाला लावलं. तर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप सुरू केला (किंवा अगोदरपासूनच केला होता). त्याचं काय आहे की, सामान्य जनतेला उपरोक्त सारांशातले बिंदू जोडून खरं चित्रं पुरं करता येतं. असोत बाई खोट्या. लोकांना मात्र खऱ्यात रस आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वेमुलाप्रकरण काही काल घडलं नाही. प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास जणू झालाच नाही असे मंत्र्यांच्या उत्तरावरुन वाटले. केंद्रसरकारच्या खात्याला जर संसदेत उत्तर द्यायला लागतंय तर ती जबाबदारी त्यांचीच आहे, राज्यशासनाकडून योग्य माहिती घेणेही. ब्लेमगेम खेळण्यात व त्यामागे लपण्यात उपयोग नाही. मंत्र्यांची उत्तरं जर खात्रीशीर माहितीवर आधारित नसतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची? गृहमंत्र्याचे सईदट्वीटबद्दलची फजिती काही जुनी नाहीच.

In reply to by तर्राट जोकर

तजो, >> मंत्र्यांची उत्तरं जर खात्रीशीर माहितीवर आधारित नसतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची? मलाही नेमकं हेच म्हणायचं होतं. रोहितच्या बाबतीत स्थानिक राज्य शासन उदासीन आहे. म्हणून केंद्र शासनास त्यात लक्ष घालावं लागतंय. आता राज्य शासनाने योग्य माहिती पुरवली नाही म्हणून तेलंगणात राष्ट्रपती राजवट लागू करायची का? की पुरवलेली माहिती बिनमहत्त्वाची (=insignificant) आहे म्हणून दुर्लक्ष करायचं? इराणीबाईंनी दुसरा मार्ग चोखाळला तर एव्हढा गहजब का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भाऊ तोरसेकरांनी बरोब्बर पिसं काढली भाऊ तोरसेकर हे बुद्धीवादी नाहीत. त्यामुळे मधल्याकाळात काही जणांनी चाल खेळून त्यांचे फेसबुकचे अकाउंटपण गोठवून घेतले होते. अर्थात त्याला विचारस्वातंत्र्याची गळचेपी म्हणायच काम नाय! ते बुद्धीवादी नाहीत त्यामुळे त्यांना विचारस्वातंत्र्य नाही! ;)

आत्ता एक लेख वाचनात आला की माध्यमे इराणीबाईंच्या कशी विरुद्ध आहेत ते... त्यातील खालचा भाग खूप बोलका वाटला: In his book The Unforeseen President, John Perry writes: If you say nothing masscom will pillory you. If you dodge it, masscom will chase you. If you do not know the answer, it will place a dunce cap on your head. If you make an error, it will play that sound bite again and again until the whole world is laughing at you. If you misstate something it will mock you endlessly. If you apologise for the mistake it will project you as weak and flip flopping. If you argue you will be portrayed as thin-skinned…if you hit the right answer the masscom geniuses will crucify you for your gall."

राजकारणात शिक्षणाला महत्व जास्त नसते ह्यात तथ्य आहे.मात्र मानव संसाधन ह्या महत्वाच्या मंत्रिपदासाठी साधी पदविधर व्यक्ति भाजपासारख्या राष्ट्रिय पक्षाकडे असु नये हे दुर्दैवाचे आहे.एक काल्पनिक उदाहरण....एखादा गुंड राजकारणात जातो निवडुन येतो.पुर्वायुष्यात पोलिसांकडुन मार खाल्लेला असुनही नंतर ग्रुहमंत्री होउन पोलिसांकडुन सलाम ठोकुन घेतो हे जितके दुर्दैवि असेल तितकेच वरचे उदाहरन दुर्दैवि आहे