Skip to main content

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. .

वाचने 59646
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

In reply to by प्रतापराव

आणि सदर लेख आणि भाषणाची भलामण करणारे प्रतिसाद त्याचा आदर्श वस्तुपाठ आहेत!

In reply to by प्रतापराव

राजकारणात शिक्षणाला महत्व जास्त नसते ह्यात तथ्य आहे.मात्र मानव संसाधन ह्या महत्वाच्या मंत्रिपदासाठी साधी पदविधर व्यक्ति भाजपासारख्या राष्ट्रिय पक्षाकडे असु नये हे दुर्दैवाचे आहे
परंतू, हया बाईसाहेब त्यांना दिलेले काम चोख बजावत असतील तर ?

In reply to by मार्मिक गोडसे

चांगले भाषण म्हणजे चांगला कारभार असे समिकरण असेल तर प्रश्नच नाहि. बाइंच्या कारभाराला कंटाळुन दोन चार विद्वानांनि राजिनामा दिला होता असे वाचण्यात आले होते.

In reply to by प्रतापराव

हे हे, ह्यांच्या लेखी ते विद्वान म्हणजे कॉंग्रेसचे भाट असतील, काँग्रेसच्या काळात मिळणार्‍या सवलती इराणींनी बंद केल्या म्हणून कांगावा करुन बाहेर पडले.

In reply to by श्रीगुरुजी

विद्वान नव्हते राजीनामा दिल्याने झाले असावेत. तस्मात ध्गा उद्देशावर अज्याबात चर्चा करू नये. गॅलरी प्रेक्षक आसन क्र १०१५

विद्यापिठाच्या चिफ मेडिकल ऑफिसर डॉ राजश्री यांनी, विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर, काही मिनीटात तिथे पोहोचून आणि वैद्यकीय तपासणी करुन संध्याकाळी ७.२० ला तो मृत झाल्याची घोषणा केली. तशी नोंदही त्यांनी विद्यापिठाच्या हेल्थ बुकमधे केली आहे. त्यांनी लगेच कुलगुरुंना तसं कळवलं आणि त्या स्वतः तिथे पहाटे तीन वाजेपर्यंत हजर होत्या. तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला ते माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय. ही वस्तुस्थिती झिकरुल्लाह निशा या विद्यार्थ्यानं स्वतंत्रपणे वेरिफाय केली आहे.
I was the person who called health center immediately after learning that Rohith Hanged in NRS hostel. Within 5 minutes CMO Health center Dr. Rajashree P has reached the spot and she checked the pulses and declared him dead. There were Telangana police also present there. Today MHRD minister lied to entire nation that no doctor and police were allowed to check the dead body till 6:30 AM of next day.
शिवाय विद्यार्थ्याला वेळीच मदत मिळाली असती तर तो रिवाइव होऊ शकला असता वगैरे धादांत खोटी आणि निव्वळ भावनिक वक्तव्य करुन बाईंनी संसदेची (आणि देशाची) पूर्ण दिशाभूल केली आहे. डॉ राजश्रींचं हे स्टेटमंट :
“I am a medical doctor and I have enough experience and competence to examine and determine if a person can be revived. In my opinion, Rohith was dead for probably 2-3 hours by the time he was found,” said Dr P Rajshree, the university’s medical officer.
तस्मात, सदर भाषण म्हणजे लेखकाला वाटला तसा वस्तुपाठ वगैरे काही नाही. हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही. बातमीची लिंक

In reply to by विवेक ठाकूर

विनय ठाकूर, तुम्ही दुवा दिलेला लेख वाचला. त्यावरून इराणीबाई अडचणीत आलेल्या वाटंत नाहीत. त्यांनी पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालाचा हवाला दिलाय. म्हणजे कोणी खोटं बोलत असेल तर ते पोलीस किंवा विद्यापीठाची नोंदवही यांपैकी आहेत. माझा अंदाज परत सांगतो. रोहितची हत्या झालेली आहे आणि ती आत्महत्या म्हणून खपवायचा प्रयत्न चाललाय. अन्यथा स्वत: फासावर गेलेल्या रोहितला टेबलावर आडवं कोणी केलं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शिवाय डॉ राजश्रींचा रिपोर्ट खाली दिला आहे त्यात तशी शक्यता दर्शवलेली नाही. पण मूळ मुद्दा असा आहे.....एका जवाबदार मंत्र्यानी संसदेसमोर बोलतांना, गंभीर आरोप करण्यापूर्वी किमान फॅक्ट्स पूर्णपणे वेरिफाय करायला हव्यात. त्याच्या मृत्यूची नोंद संध्याकाळी ७.३० लाच झाली आहे, अशा वेळी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.३० पर्यंत विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतच मिळाली नाही आणि त्याही पुढे जाऊन, तशी मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता वगैरे बोलणं म्हणजे त्या पदावर त्यांची राहाण्याची त्यांची क्षमताच प्रश्नांकित करते. डॉ राजश्रींनी केलेल्या स्टेटमंटची तीन ठिकाणी नोंद आहे. The entry made by Dr Rajashree in the university health centre record book is also being shared widely online. Her statement on the record book says, she received a call from university's NRS hostel at around 7.20p.m. She immediately rushed to the hostel in the ambulance and found that the body by that time had been kept on the bed. It further reads that she informed the Vice-Chancellor, Dean of Students Welfare (DSW), Registrar immediately. आणि रिपोर्ट मधली नोंद अशी आहे : The document reads: “Body … cold, bloody abdomen, protruding tongue, froth coming out of the mouth.” The entry also says the pupils were dilated, that there was “no heart sound” and no sounds of breathing.

In reply to by विवेक ठाकूर

एक-दोन त्रुटी जरी सापडल्या तरी त्या भाषणाचं महत्व कमी होत नाही. जेएनयु,वेमुलाप्रकरणी सरकारवर होणारी निराधार आगपाखड त्यांनी पुराव्यांसहित जोशपूर्ण आवेशात खोडून काढली आहे.
हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही.
नेत्यांकडे भाषणाची कला असणे कधीही चांगले असते. अहो एका राजकीय पक्ष्याच्या फक्त म्होरक्यानं भाषण केलं कि त्यांचे 12-13 चेले सहज निवडून येतात म्हणजे बघा!!

In reply to by प्रदीप साळुंखे

ज्योक मारतायं काय ? भाषणाचा गाभाच फ्रॉड आहे मग त्या उर्वरित डायलॉगबाजीला (बच्चेकी माँ, विसी कुणी अपाँइट केला, शिर कापून देईन, पदावर राहाणार नाही, स्वतःच्या गंगेतल्या अस्थी काय म्हणतील... वगैरे) काय अर्थ उरतो?

In reply to by प्रदीप साळुंखे

बाई फक्त स्टाईल मारतायंत आणि स्वतःचा टिआरपी वाढवतायंत. त्यांना बाकी कशाशी देणंघेणं नाही हाच तर मुद्दा आहे !

In reply to by विवेक ठाकूर

लेखाचे शिर्शक पाहिल्यास हे ध्यानात येईल की लेखात दिलेल्या चित्रफितीतल्या प्रसंगावरच चर्चा अपेक्षित आहे. तेव्हा त्या मृत्युसंदर्भात, काही मतप्रदर्शन करण्याअगोदर, इतर कोण काय म्हणतो आहे याऐवजी, चित्रफितीत इराणी काय म्हणाल्या ते समजण्यासाठी, ती चित्रफित पाहिली असती तर बरे झाले असते. इतकेच ! मुख्य म्हणजे, कोणत्याही कारणाने, माध्यमातले सोईचे तेवढे उचलणे जमत नसल्याने, आम्ही मूळ पुरावा (जो इथे चित्रफितीच्या स्वरूपात आहे आणि ज्यात बरेच पुरावे आहेत तो) पाहून मतप्रदर्शन केले आहे. इतर फाटे फोडण्याचा मानस/अनुभव/आवड नसल्याने... पास :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रफित तुम्ही धागा काढण्यापूर्वीच खफवर टाकली गेली होती आणि त्याच वेळी ती फार बारकाईनं पाहिली आहे.
आम्ही मूळ पुरावा (जो इथे चित्रफितीच्या स्वरूपात आहे आणि ज्यात बरेच पुरावे आहेत तो) पाहून मतप्रदर्शन केले आहे
तेच तर प्रतापरावांनी वर म्हटलंय : बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !
माध्यमातले सोईचे तेवढे उचलणे जमत नसल्याने...
हे तुम्ही लिहीलं नसतं तर बरं झालं असतं ! कारण त्याचं असं आहे.... नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते. व्यक्ती प्रामाणिक असेल आणि भले वक्तृत्वप्रविण नसेल, तर दुसर्‍याचं अहीत कदापी करणार नाही. पण व्यक्तीच फ्रॉड असेल तर तीचं वक्तृत्व कौशल्य कितीही भूलवो, शेवटी लोकांची फसवूणच होते. अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तस्मात, व्यक्तीची सचोटी, तिच्या वक्तव्यापेक्षा महत्त्वाची आहे. याचा व्यत्यासही तितकाच खरा आहे, जर व्यक्तीची दुटप्पेगिरी उघडकीस आली तर आपसूकच ती अप्रमाणिक आहे हे सिद्ध होतं. तुम्हाला वक्तव्यानं भुरळ घातली आणि आता व्यक्ती अप्रामाणिक आहे हे पुराव्यानिशी शाबित झाल्यावर, ते मान्य करायला जड जातंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे केवळ विडिओ आणि लेखाचं शीर्षक वाचून मत बनवणं हे केवळ अशिक्षित करु शकेल. कारण बाईंकडे वक्तृत्वशैली आहे किंवा नाही हा प्रश्न गौण आहे, बाई प्रामाणिक आहेत किंवा नाही हा मुद्दा आहे. अर्थात, इतका उघड मुद्दा इतरांनाच काय थोडी दिलदारी दाखवलीत तर तुम्हाला सुद्धा मान्य होईल. तरीही केवळ शीर्षकाबद्दल बोलायचं झालं तर मी वरती म्हटल्याप्रमाणे : `हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही '.

In reply to by विवेक ठाकूर

तुमचा प्रतिसाद खूप आवडला. निव्वळ त्यासाठी लॉगिन करुन प्रतिसाद द्यायला आलो. महामहोपाध्याय इराणीदेवींचे भाषण हे फार तर 'खोटे बोल पण रेटून बोल' याचा सुंदर वस्तुपाठ आहे असे म्हणता येईल. असो. बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"अरविंद बरोदब दीड तास" जर "मैफिलीसारखा" रंगत असेल इतर सर्वकाहि (वेल..नॉट लिटरली सर्वकाहि.. फ्यु आर एक्स्म्प्टेड ;) ) पानि कम चाय वाटणारच :ड

In reply to by अर्धवटराव

पेपर वगैरे वाचत असाल तर संसदेचा प्लॅटफॉर्म वापरुन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल, इराणी बाईंविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.

In reply to by विवेक ठाकूर

विषय काय आणि प्रतिसाद काय!
मलाहि नेमकं हेच वाटलं. मूळात लेख काय आणि त्यावर प्रतिसाद काय. पण मग आठवलं... न्यायदानाची हौस एका जन्मात भागत नाहि हेच खरं

In reply to by अर्धवटराव

स्वतः लेखक निरुत्तर आहेत आणि तुम्ही विचारतायं `लेख काय आणि त्यावर प्रतिसाद काय?' तुमचे प्रतिसाद तुम्हाला कळाले तरी पुरे !

In reply to by विवेक ठाकूर

धागा लेखक निरुत्तर आहे कि उपेक्षा करतोय हे कळणं फार अवघड नाहि. आणि रेडेओला कान नसल्यामुळे त्याला प्रतिसाद ऐकुच जात नाहि, त्यामुळे ते कळावे अशी आमचीही अपेक्षा नाहि.

In reply to by अर्धवटराव

स्वतःचे प्रतिसाद स्वतःला कळतायंत का ते आधी वाचून पाहा आणि जमल्यास विषयाला धरुन बोला.

In reply to by विवेक ठाकूर

पुर्वजन्मीचे संस्कार टिकुन राहातात हे जगातल्या कुठल्याच प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकत नाहि. पण मिपाची बात हि कुछ और है.
स्वतःचे प्रतिसाद स्वतःला कळतायंत का ते आधी वाचून पाहा
तुम्हाला तसं वाटणं सहाजीक आहे.
आणि जमल्यास विषयाला धरुन बोला
तुम्हाला हेही वाटणं सहाजीक आहे.

In reply to by विवेक ठाकूर

चालुद्या (मिपाची बँड्विड्थ वापरून) मोफतचे स्वमतांध स्वप्नरंजन आणि स्वपाठ थोपटणे... ही सवय आता सर्वांनाच माहितीची झाली आहे... (इथे कोणी नवीन वाचक असल्यास त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठीच केवळ हा प्रतिसाद प्रपंच. जुने लोक ओळखून आहेतच) अजून कळले नसल्यास : यापुढे जर एखादा वैयक्तीक, असंबंध आणि अतीभरकटलेला असा नसलेला प्रतिसाद आला तर आणि तरच अतीआश्चर्यपूर्वक त्याची दखल घेली जाईल. तशी शक्यता खूप धूसर आहे आणि हे केवळ संशयाचा फायदा देण्यासाठी लिहिले आहे. चला, हे पण जरूरीपेक्षा जास्त महत्व देणे झाले.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जनतेची दिशाभूल केल्याबद्दल इराणी बाईंविरुद्ध सोमवारी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.
याबद्दल कुणाची पाठ थोपटणार?

In reply to by विवेक ठाकूर

पेपर वगैरे वाचत असाल तर संसदेचा प्लॅटफॉर्म वापरुन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल, इराणी बाईंविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.
सर्व राजवटींच्या काळात असल्या हक्कभंग प्रस्तावांना भूतकाळात केराची टोपली नशीबात आली होती आणि यावेळीही केराची टोपलीच नशिबी येणार आहे. असले हजारो हक्कभंग प्रस्ताव आले तरी त्यामुळे कोणालाही शष्प फरक पडत नाही. विश्वास बसत नसेल तर पुढील आठवड्यात या प्रस्तावाचं काय होतंय ते बघा.

In reply to by विवेक ठाकूर

मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याने तो दोषी सिद्ध होतो हा नवीन नियम झालाय हे माहित नव्हतं. शिवाय ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणलाय ते राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटली की ती सत्यच असणार. मग प्रश्नच मिटला!

In reply to by बोका-ए-आझम

बाई काय खोटं बोलल्यात ते वर सप्रमाण दिलंय त्यामुळे दोष तर उघड आहे. आणि तुम्ही तर भलताच ज्योक मारतायं, हक्कभंगाचा ठराव येणं याचा ना खेद ना खंत, वर ठराव आणणारे कोण आहेत? तुम्हाला लेखाचा विषय काय आहे याची तरी कल्पना आहे का? लेखकाच्या मते :
मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ? याचं सदर भाषण हा `वस्तुपाठ' आहे
आणि बाईंच्या मुद्दलातच खोट आहे असा शाबित केलेला प्रतिवाद आहे. तस्मात, विषय काय आहे ते बघून प्रतिसाद द्या.

In reply to by विवेक ठाकूर

आता तो पूर्णपणे निघून गेला. झिकरुल्लाह निशा आणि डाॅ.राजश्री यांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता का? एकदा आयडी बॅन होऊनपण अक्कल आलेली दिसत नाहीये.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हाला वाचता तरी येतं असं वाटत होतं पण तुम्ही तर त्या खालची पातळी देखिल गाठू शकता हे दाखवून दिलं ! इथे व्यक्तींना ओळखण्याचा प्रश्नच येत नाही , पुरावे तर्कशुद्ध आहेत का हे महत्वाचं होतं पण ते बहुदा तुमच्या आवाक्या बाहेर दिसतंय .

In reply to by विवेक ठाकूर

आम्ही गि-हाईक बघून पुडी बांधतो.तुमच्यासारख्या अहंमन्य लोकांना तीच भाषा समजते. काय करणार? सरकारने मानसिक रुग्णांसाठी रुग्णालयं काढली आहेत. पण तुमच्यासारख्या मूर्खांसाठी काहीच ठेवलं नाही. Btw, तुम्हाला स्वाभिमान नाही का हो? एकदा जिथे आयडी बॅन झाला, तिथे परत येणं म्हणजे लाळघोटेपणाशिवाय आणखी काहीही नाही. आणि परत आपल्या मूर्खपणाची हद्द दाखवतात इथे. जाऊ दे. लहानपणीच चांगले संस्कार झाले असते तुमच्यावर तर अशी वेळ आली नसती!

In reply to by बोका-ए-आझम

मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याने तो दोषी सिद्ध होतो हा नवीन नियम झालाय हे माहित नव्हतं. शिवाय ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणलाय ते राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटली की ती सत्यच असणार. मग प्रश्नच मिटला!
जेव्हा काहीच करता येत नसते, आपली बाजू पूर्ण लंगडी असते, आपण पूर्ण उघडे पडलेलो असतो तेव्हातेव्हाच असले हक्कभंग प्रस्ताव आणले जातात. एखाद्या मंत्र्याने एखादी घोषणा अधिवेशन सुरू असताना सभागृहाऐवजी सभागृहाबाहेर केली तर लगेच सभागृहातील आमदारांच्या हक्काचा भंग झाला असा आरडाओरडा करून हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. त्याला अर्थातच काहीही अर्थ नसतो. राज्यसभेत विरोधकांचे बहुमत असल्याने मुद्दाम लोकसभेऐवजी राज्यसभेत हा प्रस्ताव येणार आहे. त्यावरील मतदानात सरकारऐवजी विरोधकांच्याच बाजूने जास्त मते पडणार आहेत. पण त्याने शष्प फरक पडणार नाही. जे भाषण स्मृती इराणींनी लोकसभेत केले तेच भाषण त्यांनी राज्यसभेत केले. परंतु लोकसभेत विरोधकांची हक्कभंग प्रस्ताव आणण्याची हिंमत नाही कारण तो प्रस्ताव तिथे मंजूर होणारच नाही. स्मृती इराणी खरोखरच खोटे बोलल्या याबद्दल विरोधकांची खात्री असती तर प्रस्ताव नामंजूर होणार हे दिसत असूनसुद्धा त्यांनी हक्कभंग प्रस्ताव लोकसभेत सुद्धा आणता आला असता. निदान त्यानिमित्ताने चर्चा होऊन त्यांचा तथाकथित खोटेपणा उघडकीला आणता आला असता. पण ते करायची हिंमत नाही. राज्यसभेत बहुमत असल्याने विरोधक फक्त तिथेच प्रस्ताव आणणार. राज्यसभेत विरोधक असल्याने वाटेल तो प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होणारच आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. निरूद्योगी विरोधकांना त्यामुळे थोडावेळ गारगार वाटेल इतकंच. लोकसभेत जे भाषण अधिकृत रेकॉर्डमध्ये गेले आहे त्याच्याबद्दल कोणताही अधिकृत आक्षेप लोकसभेच्या कामकाजाच्या नोंदीत नसेल. पण राज्यसभेत जर सभापतींनी स्थगन प्रस्ताव चर्चेला घेऊन त्यावर मतदान घेतले तरच त्यावरील आक्षेप कामकाजाच्या नोंदीत येतील. म्हणजे एका सभागृहात त्या भाषणावरील आक्षेप अधि़कृत कामकाजात असतील तर दुसर्‍या सभागृहात तेच भाषण आक्षेपविरहीत असे कामकाजात नोंदले जाईल. एकंदरीत त्यामुळे शून्य फरक पडेल.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्याला नक्की आकडा म्हईत नाही पण तो मेजारिटीत असल्याने हक्कभंग कचर्‍यात जाणार हे नक्की. कारण आपल्या भार्तात व्यक्ति निवडून येत असली तरी पक्ष नावाची एक संस्था जो पर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यन्त सत्दविवेकाने मतदान असंभव .

In reply to by श्रीगुरुजी

नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते.
हे विठांच्या प्रतिसादातलं वाक्य आणि त्यांच्या प्रतिसादांत त्यांनी स्मृती इराणींना लावलेली खोटारडेपणाची लेबलं पहा. यांनी आधीच ठरवून ठेवलेलं आहे की स्मृती इराणी खोटं बोलत आहेत आणि बाकीचे सगळे खरं बोलताहेत. पूर्वग्रहदूषित म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असतं?

In reply to by बोका-ए-आझम

हे फार पूर्वीच लक्षात आले आहे. यांचे विचार पूर्वग्रहदूषित आहेत हे २०१४ पासूनच माहिती आहे. पण यांच्या विचारांशी जे सहमत आहेत ते 'सुज्ञ व विचार करू शकणारे' आणि नाहीत ते 'माथेफिरू' अशी विभागणी त्यांनी केव्हाच करून टाकली आहे.

या भाषणामधल्या (काही ) खोट्या गोष्टी उघड होत आहेत, ज्या स्मृती ईराणी यांनी संसदेत चुकीच्या सांगितल्या आहेत त्याला सुद्धा खोट्याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे का ?

In reply to by कपिलमुनी

बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !
त्यामुळे सदर लेख आणि भाषणाची भलामण करणारे प्रतिसाद सदर विधानाचा आदर्श वस्तुपाठ आहेत!

दुर्गा महिषासुर प्रकरणावर आपले काय मत आहे

In reply to by आरोह

हे मात्र खरे आहे की, अवकाशात फिरणार्‍या तरंगांना पकडण्याची आणि त्यांची उकल करण्याची ताकद असणारा (महा)मानवच, हजारो वर्षांपूर्वी झाला असा दावा असलेल्या त्या महिषासूरमर्दनाच्या प्रसंगाची, यथार्थ उकल करून त्यामागचा योग्य मतितार्थ शोधून काढून, केवळ सकल विश्वाच्या भल्यासाठी, विश्वाच्या माथावर थोपून, विश्वाचे भले करू शकेल; असा विश्वास ठेवायला हरकत नाही.

निष्कर्ष १) स्मृती इराणींचे भाषण मुद्देसूद, पुराव्यासहित, भावनिक आणि आवेशपूर्ण होतं, भाजप मधे काही जेष्ठ नेत्यानंतर त्यांचंही नाव भाषनासाठी घेतलं पाहिजे. २) स्मृती इराणी खोटं बोलत आहे, अपूर्ण माहितीवर बोलत आहेत. संसदेत त्याच्या विरोधात विरोधीपक्ष संसदेत हक्कभंग प्रस्ताव आणत आहेत. ३) हक्कभंग प्रस्ताव आणल्याने काही थोर गोष्ट होणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रश्र आवेशपूर्ण आणि भावनिक बोलण्याचा आहे का खरं बोलण्याचा आहे याचा एकदा विचार करून पाहा .

In reply to by विवेक ठाकूर

संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा मान्य करू विषय भावनिक नाही, त्या खोट्याही बोलल्या असतील पण बोलल्या कशा ते सांगा ना ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचोटी महत्वाची का टिआरपी वाढवायला केलेली भाषणबाजी ? मग सिनेमा आणि संसद यात काय फरक राहीला?

In reply to by विवेक ठाकूर

राजकारणी लोक सर्व सारखेच. मग ते कोणत्याही पक्षाचे असो आपल्याला काही पटतं काही पटतं काही पटत नाही. काही खोटार्ड़े वाटतात आणि कारण नसतांना प्रामाणिक वाटतात. प्रामाणिक वाटलेले लोक आपल्याला कधी पुन्हा खोटार्ड़े वाटतात. आपण नागरिक म्हणून कोणाच्याही मताने वाहून जाऊ नये. विठा तुम्ही तर नैच नै. आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही धागा काढा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता यापुढे काय बोलणार डिबी ? सुजाण समजून घेतील आणि खोटयानां घरी बसवतील तर राजकारणात बदल घडेल . सगळेच सारखे म्हणून करा देशाचं वाटोळं असा दृष्टीकोन ठेवून कसं चालेल ?

In reply to by विवेक ठाकूर

तुमचं माझं मत या लोकांना बदलू शकत नाही. व्यवस्थेत इराणी लोकांनी नाकारली तरी ती आपल्या समोर संसदेत असते. आपल्याला राहुल गांधी पटत नाही, आणि मोदी फेक पंतप्रधान वाटतात तरीही आपण दोघांना स्वीकारतो. बदल ना ते करतात ना बदल हे करतात आपण दगडापेक्षा वीट मऊ स्वीकारतो. आणि नेहमीच आपली फसगत होत असते आपण नागरिक खुप स्वप्नाळु असतो आणि आपल्या वाटेला असं हे सर्व येतं. कशाला आपण इतकं भावनिक व्हायचं ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला इथले काही फेक आयडी पण पटत नाहीत. त्यांना चपला घालून चालू पडायला तर सांगू शकतो की नाही? पण ते परत येतात आणि आपलं नसलेलं ज्ञान झाडतात. अशांचं काय करावं?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेहमीच आपली फसगत होत असते आपण नागरिक खुप स्वप्नाळु असतो आणि आपल्या वाटेला असं हे सर्व येतं. कशाला आपण इतकं भावनिक व्हायचं ?
किमान समोर असलेल्या फॅक्ट्सवरुन आपण मत बनवू शकत नसलो तर मग शिक्षणाचा काय उपयोग? आणि या रितीनं तर परिस्थिती आणखी बिघडत जाईल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा मान्य करू विषय भावनिक नाही, त्या खोट्याही बोलल्या असतील पण बोलल्या कशा ते सांगा ना ?
त्यांच्या ४९ मिनिटांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांपैकी नक्की कोणते व नक्की किती मुद्दे खोटे होते या विचारणेवर अजून योग्य उत्तर आलेले नाही. संपूर्ण ४९ मिनिटांचे भाषण खोटे होते का, त्यात कणभरही खर्‍याचा अंश नव्हता का यावर काहीही उत्तर नाही. त्याऐवजी "इराणी भाषणात फेकंफाक करीत होत्या", "त्या भाषणात खोटे बोलल्या", "बाईंचं भाषण म्हणजे दामटून खोटं बोलण्याचा वस्तुपाठ आहे. " असे सरसकटीकरण केले गेले. अर्थात काही आयडींकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.

सुहास म्हात्रे सर धन्यवाद. तुमच्या धाग्याने काही आय्डी (पुनरुजीवीत प़क्षी लिहिते झाले) हे चांगले झाले. मुद्देसूद चर्चेचे दिवस सरले असे वाटताना ही काळ्या ढ्गाची सोनेरी किनार आवडली. गंमत म्हणजे मुंबईतल्या सेना पराक्रमाविषयी कायदेशीरका धागा निघाला नाही.

अरे रे रे काय कशाला कीस पाडत बसताय एवढा सगळेजण तुम्ही. नेते सुखात अन् समर्थक दुखात

महाराष्ट्र टाइम्सचा हा आजचा अग्रलेख वाचनीय आहे. तो बाईंच्या भाषणामागच्या विदारक वस्तुस्थितीचं यथार्थ वर्णन करतो. सदर लेख मिपावरच्या माथेफिरुंच्या आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे, पण सुज्ञ आणि विचार करु शकणार्‍यांना परिस्थिती नक्की काय आहे याची निश्चित कल्पना येईल.

In reply to by विवेक ठाकूर

सदर लेख मिपावरच्या माथेफिरुंच्या आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे,
काय सांगता हा लेख तुमच्या आवाक्याबाहेर आहे? मला पटत नाही ब्वा!
पण सुज्ञ आणि विचार करु शकणार्‍यांना परिस्थिती नक्की काय आहे याची निश्चित कल्पना येईल.
प्रस्थापितांविरूद्ध लिहण्याची वर्तपानपत्रांची जुनीच खोड आहे ती! मग प्रस्थापित कोणीही असू दे काँग्रेस किंवा भाजप,त्यांना काही फरक पडत नाही,त्यांना त्यांच्या पेप्राचा खप महत्वाचा. सूज्ञ आणि विचार करणारे फार कमी आहेत हो!! नाहितर परत काँग्रेसच निवडून आली असती. काय म्हणता?
बोलबच्चनांच्या भूलथापांना जनता बळी पडते
अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 वर्षाच्या राजवटीतही जनता कायम भूलथापांना बळी पडत होती. काय करणार ना?सूज्ञ आणि विचारी लोकांची कमतरता दुसरं काय?

In reply to by चेक आणि मेट

अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 वर्षाच्या राजवटीतही जनता कायम भूलथापांना बळी पडत होती. काय करणार ना?सूज्ञ आणि विचारी लोकांची कमतरता दुसरं काय?
'इंडीया शायनींग' सारख्या भुलथापांना जनता बळी पडली नाही. 'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले. देशाचे नागरीक चांगलेच सुज्ञ आणी विचारी आहेत. असे बोलून तुम्ही त्यांचा अपमान करीत आहात.

In reply to by मार्मिक गोडसे

'इंडीया शायनींग' सारख्या भुलथापांना जनता बळी पडली नाही. 'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले.
हेच तर मला म्हणायचे आहे, जनता निवळ्ळ बोलबच्चनगिरी आणि भूलथापांना बळी पडते,असे विठा म्हणत होते,त्यावर उपरोधिक प्रतिसाद आहे तो माझा.

In reply to by मार्मिक गोडसे

की सोनियाजींनी त्यांना बळीचा बकरा म्हणून पुढे करुन राहुल गांधींसाठी पार्श्वभूमी तयार करायचं काम केलं? राहुल गांधी हे फक्त एक खासदार होते, मंत्री नव्हते. पण त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्याला, जो त्यांच्याच पक्षाने मांडला होता, त्यावर तीव्र नापसंती दाखवल्यावर लगेच डाॅ.मनमोहन सिंग यांनी थ्परतेने तो कायदा बदलला. त्यावर सोनिया गांधींनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. सरकारला कायद्याचा मसुदा बदलावा लागला. दुस-या एखाद्या खासदाराने असं केलं असतं तर बदलला असता का? याचा अर्थ उघड आहे. सोनिया गांधी या अनभिषिक्त पंतप्रधान होत्या, त्या पदाच्या कुठल्याही जबाबदारीशिवाय. नरेगाचं पूर्ण श्रेय प्रसारमाध्यमांनी सोनिया गांधींना मिळालं, ती योजना संकल्पनास्वरुपात आणणा-या जीन ड्रेझ यांना नाही. ती मसुदास्वरुपात मांडणाऱ्या मनमोहन सिंगनाही नाही. अशी वागणूक पक्षातूनच मिळाल्यामुळे दयानिधी मारन आणि ए.राजा यांच्यासारखे मित्रपक्षांचे मंत्री शिरजोर झाले. डाव्या पक्षांचा जेव्हा पाठिंबा होता तेव्हा त्यांच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष बिमन बोस यांनी अत्यंत उद्दामपणे पंतप्रधानांना - Mind your own business असं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या मर्जीतल्या माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंग यांनाही कुठल्यातरी अमेरिकन अहवालात आलेल्या नुसत्या एका संशयावरून राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं. असे अनेक प्रसंग आहेत. आणि तुम्ही म्हणताय मनमोहन सिंग सरकारने दोन टर्म्स देश चालवला? डाॅ.मनमोहन सिंगनी देश चालवला असता तर फार वेगळी आणि चांगली परिस्थिती असती. जो माणूस पी.व्ही. नरसिंह रावांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं असताना पूर्ण देशाचा चेहरामोहरा बदलू शकला, त्याने स्वतः पंतप्रधान असताना किती जबरदस्त कामगिरी करायला हवी होती? पण तसं घडलं नाही आणि त्याचं कारण उघड आहे - the Super PM called Sonia Gandhi आणि कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नसणारे राहुल गांधी. त्यांचा अपमान यांनी केला. बाकी कोणी काय अपमान करेल?

In reply to by मार्मिक गोडसे

'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले.
'मौनीबाबांनी' चालवले का सुपर पीएम ने चालविले?

In reply to by श्रीगुरुजी

'मौनीबाबांनी' चालवले का सुपर पीएम ने चालविले?
प्रत्येक राजकीय पक्षाची आपली आपली कार्यपद्धत असते. लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या पंतप्रधानाने देशाच्या हितासाठी आपल्या पक्षातील प्रतिनीधींना बरोबर घेवून निर्णय घेतले तर त्यात आक्षेपार्ह काय आहे? एकाधिकारशाही लोकशाहीला मारक असते हे जनतेने दाखवून दिलेले आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या पंतप्रधानाने देशाच्या हितासाठी आपल्या पक्षातील प्रतिनीधींना बरोबर घेवून निर्णय घेतले तर त्यात आक्षेपार्ह काय आहे? ::) इथेच विरोधाभास आहे.

अगदीच वरवर लिहिलेला आणि उथळ स्वरूपाचा लेख आहे. "बिहारमधील पराभव, केंद्र सरकारचे अनेक पातळ्यांवरील अपयश, रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरण, गिरगाव चौपाटीवरील आगीत खाक झालेली 'मेक इन इंडिया'ची प्रतिष्ठा यामुळे नैराश्याच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या नरेंद्र मोदीभक्तांना जेएनयूमधील कथित राष्ट्रदोही घोषणांमुळे उर्जा मिळाली" हे वाक्य अगदीच हास्यास्पद आहे. इराणींच्या भाषणातील तथाकथित असत्य कथनाचे कोणतेही ठोस उदाहरण न देता "भाषणात सत्याचा अभाव होता" असा सरसकटीकरण करणारा अत्यंत उथळ आणि असत्य निष्कर्ष या वृत्तपत्राला शोभणारा नाही. ""Smriti Irani, this is not a serial, this is real life. Bring out the facts, don't fabricate them," हे रोहीत वेमुलाच्या आईचे वाक्य पढविल्यासारखे वाटते. त्याच्या आईने दिल्लीत येऊन अशी पढिक प्रतिक्रिया देणे, केजरीवाल, सोनिया गांधींची भेट घेणे इ. घटनांवरून रोहीत वेमुलाच्या आत्महत्येचा कसा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि कोण यामागे आहेत ते दृग्गोचर होते. आणि यांनी तर मिपावरील सदस्यांची (१) माथेफिरू किंवा (२) सुज्ञ व विचार करू शकणारे अशी थेट दोन भागात विभागणीच करून टाकली आहे. एकतर तुम्ही माथेफिरू तरी आहात किंवा सुज्ञ व विचार करू शकणारे तरी आहात. यापलिकडे तिसरा पर्याय नाही. असला उथळ आणि वरवर काहीतरी लिहिलेला लेख ज्यांना पटतो ते सुज्ञ व विचार करू शकणारे आणि उर्वरीत माथेफिरू ही व्याख्या छान आहे. या व्याख्येप्रमाणे मी व इतर बरेचजण माथेफिरू ठरतात आणि हे सुज्ञ व विचार करू शकणारे ठरतात असे दिसते.