✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 02/25/2016 - 21:34  ·  लेख
लेख
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
बातमी

प्रतिक्रिया द्या
59310 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

धन्यवाद डाॅक...

विजय पुरोहित
गुरुवार, 02/25/2016 - 21:36 नवीन
धन्यवाद डाॅक... उत्तम माहिती...
  • Log in or register to post comments

येस इए काका

होबासराव
गुरुवार, 02/25/2016 - 21:40 नवीन
कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे.
  • Log in or register to post comments

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;)

पगला गजोधर
गुरुवार, 07/07/2016 - 13:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

तुमच्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;)

सचु कुळकर्णी
गुरुवार, 07/07/2016 - 20:02 नवीन
तुमच्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;) ला आमच पण खी खी खी ....;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

;)

पगला गजोधर
Fri, 07/08/2016 - 12:00 नवीन
तुमच्या खी खी खी ला ...... (आम्हाला कितीही राग आलेला असला, तरीही, वरकरणी शांत, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह ) आम्ही उत्तर देऊ कुछ तो लोग कहेंगे .... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

धन्यवाद

सुमीत भातखंडे
गुरुवार, 02/25/2016 - 22:02 नवीन
हा व्हिडीयो शेयर केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

अभ्यासक्रम खरोखरच असे काही

sagarpdy
गुरुवार, 02/25/2016 - 23:30 नवीन
अभ्यासक्रम खरोखरच असे काही शिकवत असेल तर विषय च संपला. बाकी उत्तम, मुद्देसूद भाषण.
  • Log in or register to post comments

धन्यवाद एक्काकाका!

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 00:10 नवीन
पण इथले आदर्श लिबरल त्या १२वी पास आहेत याच मुद्द्यावर अडकून यातले महत्वाचे मुद्दे लक्षातच घेणार नाहीत.
  • Log in or register to post comments

अ गुड परफॉर्मन्स!

तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 00:15 नवीन
इथे मुद्दा कोण्या विशिष्ट पक्षाचा नसून भारतसरकारच्या एका जबाबदार खात्याचा व एका जीव गेलेल्या मुलाचा आहे. इथले अभ्यासू सदस्य या भाषणातला फोलपणा अभ्यासून आपल्या फॅक्टचेकींग वृत्तीचा निष्पक्ष परिचय देतील काय?
  • Log in or register to post comments

आता तुम्हाला समजलं असेलच मी

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 07:20 नवीन
आता तुम्हाला समजलं असेलच मी घासकडवींच्या धाग्यावर जे बोललो होतो ते. एकदा माणसाने मत बनवलं की कोणत्याही घटनेकडे तो त्याच चष्म्यातून बघणार. तुम्ही स्वत:च त्याची सत्यता दाखवून दिलीत. I rest my case.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची

तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 12:29 नवीन
निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची तयारी न दाखवता देशाचे नुकसान झाले तरी चालेल पण भाजपची तळी उचलण्याची प्रवृत्ती सोडणे शक्य होत नाही ही सत्यताही दिसली. इराणींच्या भाषणाने समर्थकांना उन्मादझटका आला, तर विरोधकांमधे त्यांचे अ‍ॅक्ट्रेस असणे, कमी शिकलेले असणे ह्यावरुन नीच टिप्पणी करण्याचा ट्रेंड सुरु झाला. कोणीही त्या जे बोलल्या त्यातले खरेखोटे काय हे तपासण्याच्या फंदात पडले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

खरेखोटे काय हे तपासण्याच्या

चेक आणि मेट
Fri, 02/26/2016 - 12:40 नवीन
खरेखोटे काय हे तपासण्याच्या फंदात पडले नाही.
तुमच्याकडून खोटे काय हे जाणुन घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

राहवले नाही

नाखु
Fri, 02/26/2016 - 12:50 नवीन
म्हणून हा प्रतीसाद प्रपंचः ठी़क बाकीच्यांच जाऊ द्या तुमचं काय "सत्य अन्वेषण" या खंडण उत्तरांबाबत :
  • उप कुलगुरूंच्या नियुक्त्यांबाबत दिलेले स्पष्टीकरण (आरोप रा गां नी केला होता)
  • ऱो वि च्या संदर्भात कुलगुरूंनीच केलेली शिफारस (आणि तेथील खासदारानेच केलेली पत्र शिफारस माहीती.)
  • जे एन यु च्या कर्मचार्यांनी आणि अगदी कामगार संघटनानी दिलेल्या अहवालातील माहीतीचा हवाला देऊन रा गांनी केलेला वस्तुस्थितीचा विपर्यास (रा गा किती प्रगल्भ+दुरदर्शी आहेत आणि त्यांचे सल्लागार नक्की काय सल्ला देतात हा एक वेगळा विषय आहे) रा गा होते उपस्थीत पण सोनीया नव्हत्या त्या मुळे त्यांनी फक्त रा गांचाच उल्लेख केला.
  • अजूनही एकाही मुद्द्याचा प्रतीवाद किंवा ही माहीती खोटी आहे असे एकाही प्रवक्त्यानी सांगीतले नाही. मग नेमके तुमच्याकडे कुठुन माहीती आली आणि असेल तर त्यांचे ठळक मुद्दे तरी खोडून काढा.
इराणी रा गा इतक्या शिकलेल्या नसतील पण सवरलेल्या नक्कीच आहेत. ता क मी भाजपचा अंधळा समर्थक नाही पण निव्वळ भाजपाच आहे म्हणून शिव्या देणारेही पाहिले की.... चांगल्याला चांगले म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

इराणी रा गा इतक्या शिकलेल्या

होबासराव
Fri, 02/26/2016 - 17:12 नवीन
इराणी रा गा इतक्या शिकलेल्या नसतील पण सवरलेल्या नक्कीच आहेत. रागा ग्रॅजुएट आहेत का? राजिव गांधि संजय गांधि फारिन मध्ये जाउन सुद्धा ग्रॅजुएशन कंप्लिट करु शकलेयत का ? अर्नब गोस्वामि ने जेंव्हा रागा ची मुलाखत घेतलि होति तेव्हा डिग्रि दाखवण्यावरुन काहि तरि शो डाउन झाला होता. वरिल प्रश्न जेनुन आहेत आणि मला फार काळा पासुन पडलेयत. राजकिय पद सांभाळताना तुम्हि जर उच्च्शिक्षित असाल तर निश्चितच फायदा होतो पण ते आवश्यक नाहिये. आपल्या पंचायत राजचि व्यवस्थाच मुळात टोपि-टाय अशि आहे. पदाधिकारि - अधिकारि टोपि:- स्थानिक समस्येचि जाण असणारा लोकप्रतिनिधि टायः- शासनाचा प्रतिनिधि ग्रामपंचायतः- सरपंच ह्याला समांतर शासनाचा प्रतिनिधि:- ग्रामसेवक पंचायत समिति:- सभापति बि.डि.ओ. जिल्हा परिषदः- अधक्ष्य सि.ई.ओ. पालक मंत्रि:- कलेक्टर मुख्यमंत्रि प्रधान सचिव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

पण

होबासराव
Fri, 02/26/2016 - 17:23 नवीन
कलेक्टर ऑफिस ला जेंव्हा जनता दरबार भरलेला असतो कलेक्टर साहेब आलेले असतात बाजुला पोलिस अधिक्षक साहेब बसलेले असतात वाट पाहण सुरु असते ति पालकमंत्र्यांचि, मंत्रि येतात्...लगेच कलेक्टर साहेब आपल्या खुर्चितुन उठतात आणि बाजुच्या प्लास्टिक च्या चेअरवर जाउन बसतात आणि त्यांच्या खुर्चिवर पालकमंत्रि बसतात जनतेच गार्‍हाणे एकायला. ह्या गोष्टिचा मि स्वतः साक्षिदार होतो. इथे पालकमंत्रि फक्त ४ थि पास होते. काय वाटत असेल त्या जिल्हाधिकार्‍याला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की

अभ्या..
Fri, 02/26/2016 - 22:26 नवीन
ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की "कलेक्टर, कमिशनर हे जनतेचे सेवक असतात, आमदार, मंत्री हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात सो दे र्रिप्रेझेन्ट्स जनता. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

+१ रे भाई.. हे पटलं.

हाडक्या
Fri, 02/26/2016 - 22:35 नवीन
+१ रे भाई.. हे पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बरोबर..

चिगो
Wed, 03/02/2016 - 17:39 नवीन
"कलेक्टर, कमिशनर हे जनतेचे सेवक असतात, आमदार, मंत्री हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात सो दे र्रिप्रेझेन्ट्स जनता. "
बरोबर.. लोकशाही व्यवस्थेत जनप्रतिनिधींचा मान हा नोकरशाहीपेक्षा जास्त असावा व असतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

उत्तर

प्रदीप
Fri, 02/26/2016 - 18:08 नवीन
अर्नब गोस्वामि ने जेंव्हा रागा ची मुलाखत घेतलि होति तेव्हा डिग्रि दाखवण्यावरुन काहि तरि शो डाउन झाला होता. वरिल प्रश्न जेनुन आहेत आणि मला फार काळा पासुन पडलेयत. येथे पहा. ही बातमी एका वर्तमानपत्रात आली, तिचा स्त्रोत ए. एफ. पी. ही फ्रेंच वृत्तसंस्था आहे! ही बातमी लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीच्या दरम्यान त्या संस्थेने प्रसारीत केली. त्यात ती वृत्तसंस्था म्हणते की " the other [ म्हणजे राहूल गांधी] a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty..." आणि पुढे ..."Often portrayed as a reluctant leader, he gave up a business career to enter politics..." [तथाकथित] नामवंत वृत्तसंस्था सत्याचा किती विपर्यास करू शकते, त्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

political dynasty

होबासराव
Fri, 02/26/2016 - 18:25 नवीन
नशिब dynasty च्या पहिले political वापरले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

राहुल गांधी

विकास
Fri, 02/26/2016 - 19:45 नवीन
राहुल गांधी हार्वर्ड विद्यापिठात शिकायला आले होते पण ऑलमोस्ट लगेचच परत भारतात आले. त्यांची नंतरची बॉस्टनची ट्रीप (एन डी ए च्या काळातली) ही त्यांच्या कथीत ड्रग्ज आणि कथीत अनियमित रोकड जवळ ठेवल्याने गाजली. असे म्हणतात की त्यांना पकडले गेले होते. पण नंतर वाजपेयी सरकारने आपलेच दात आपलेच ओठ म्हणत वजन खर्च करून त्या प्रकरणाची काळजी घेतली... अधिकृत, म्हणजे दि हिंदू मधील्या बातमी प्रमाणे ;) मात्र इतकेच झाले होते.. संदर्भात जालावर भरपूर माहीती मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

बुद्धीगामी प्रतिवाद

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/26/2016 - 02:25 नवीन
या भाषणाचा बुद्धीगामी प्रतिवाद इथे वाचनात आला. - स्मृती इराणी राजीनामा द्या. भाषणात केलेले उल्लेख वस्तुनिष्ठतेसाठी वस्तुपाठ म्हणून दुर्लक्षण्याजोगे आहेत - १. स्मृती इराणी यांचे पती अल्पसंख्य आहेत. २. अमकं फलाणं दिसल्यास शीर कापून देईन. ३. अमकं फलाणं दाखवल्यास राजकारण सोडून देईन. मी संपूर्ण फीत बघितली नाही. जे मोती चटकन सापडले ते लिहिले.
  • Log in or register to post comments

बुद्धीगामी प्रतिवाद ???

अर्धवटराव
Fri, 02/26/2016 - 04:10 नवीन
जागल्याचा प्रतिवाद जर बुद्धीगामी असेल तर... नको.. मी काहि कुठला राजिनामा वगैरे देणार नाहि :) पण एकुणच 'बुद्धीवाद' वगैरे शब्दमंडळीची एकुण सर्कस बघुन या प्रतिवादाला देखील बुद्धीगामी म्हणणं काहि आश्चर्याचं वाटलं नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हीही एक लेख लिहा. मी

मोदक
Fri, 02/26/2016 - 07:58 नवीन
तुम्हीही एक लेख लिहा. मी सर्टिफिकेट देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मग असं करा..

अर्धवटराव
Fri, 02/26/2016 - 08:01 नवीन
ते सर्टीफिकेट पहिले द्या... लेख पाडतोच अकॉर्डींगली. डोक्यालिटी (== बुधीगामी ??) तशीच चालते ना ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आमची

नाखु
Fri, 02/26/2016 - 08:58 नवीन
निषेध पत्रके कायम तयार असतात फक्त कश्याचा निषेध करायचा ते आम्ही शेवटच्या क्षणी+आयत्यावेळी ठरवतो. मोदकच्या प्रशस्तीपत्रकाच्या निषेधावर सहमती असलेल्यांच्या निषेधासाठी काढलेल्या चळवळीला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या आंदोलनातील फुटीर गटाच्या "स्वमतवादीच्या" निवेदनातील मुख्य आणि लक्ष्यवेधी वाक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जागल्याचा प्रतिवाद जर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/26/2016 - 19:16 नवीन
जागल्याचा प्रतिवाद जर बुद्धीगामी असेल तर... नको.. मी काहि कुठला राजिनामा वगैरे देणार नाहि :) पण एकुणच 'बुद्धीवाद' वगैरे शब्दमंडळीची एकुण सर्कस बघुन या प्रतिवादाला देखील बुद्धीगामी म्हणणं काहि आश्चर्याचं वाटलं नाहि.
हा प्रतिवाद निश्चितच अॅड होमिनेम आहे. प्रतिवादात काय चूक आहे हे न दाखवता, "तो नं, तो तसलाच" यात काही दम नाही. असो. आज मटाने ही बातमी छापली आहे. स्मृती इराणी चक्क फेकंफाक करत होत्या. 'स्मृती इराणी लोकसभेत खोटं बोलल्या' या बातमीतली व्हीडीओची क्लिप बघितली. बाईंचा सात्विक संताप सांस-बहू मालिकेला साजेसा आहे. ('टिढीश, टिढीश' इफेक्ट आले असते तर सगळं योग्यच सुरू आहे याचा दिलासाही मिळाला असता. विनोद आहे, त्यावरून गंभीर होऊ नये.) याच मंत्रिमहोदयांनी रोहित वेमुला (आणि त्याच्या इतर चार साथीदारांवर) कारवाईसाठी पाच पत्रं लिहिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

काय खरं अन काय खोटं...??

मार्मिक गोडसे
Fri, 02/26/2016 - 19:48 नवीन
काय खरं अन काय खोटं...??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

४९ मिनिटांच्या भाषणातल्या

श्रीगुरुजी
Fri, 02/26/2016 - 21:22 नवीन
४९ मिनिटांच्या भाषणातल्या असंख्य मुद्द्यांपैकी फक्त ३ मुद्दे खोटे? निदान बाकीचे तरी खरे होते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

कल्पना करतोय कि हे भाषण

तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 22:47 नवीन
कल्पना करतोय कि हे भाषण केजरीवाल यांनी केले असते तर तुम्ही अशाच प्रतिसादाला काय उत्तर दिलं असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/26/2016 - 22:57 नवीन
केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू मांडताहेत अशी कल्पना करून (अशी केवळ कल्पनाच करता येईल म्हणा) जब्बर हसतोय ! =)) किती आशा ठेवली होती या माणसाकडून हे आठवून किती दु:ख होते ते सांगणे कठीण आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असं होऊच शकणार नाही

तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 23:20 नवीन
असं होऊच शकणार नाही ह्याबद्दलचा आपला दुर्दम्य आशावाद भावला. कित्येकांना इराणीसुद्धा असं काही भाषण करतील असं वाटलं नव्हतं. ते एक असो. दिल्ली आपच्या जाहिरातींमधला चिंटुकसा मुद्दा उचलून तांडव करणार्‍या श्रीगुरुजींना आपल्या पक्षाच्या एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

स्मृती इराणी खोटं बोलताहेत

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 23:47 नवीन
हे तुम्हाला कसं माहित? ज्या प्रसारमाध्यमांवर विसंबून आपण आपली मतं बनवतो ती प्रसारमाध्यमं कितपत विश्वासार्ह मानायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

येस सर! जेव्हा प्रसारमाध्यमं

तर्राट जोकर
Sat, 02/27/2016 - 00:06 नवीन
येस सर! जेव्हा प्रसारमाध्यमं आपल्याबाजूची बातमी देतात तेव्हा ती विश्वासार्ह अन्यथा नव्हे हे महत्त्वाचे लॉजिक विसरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हेच तुम्ही म्हणालात

बोका-ए-आझम
Sat, 02/27/2016 - 07:17 नवीन
त्यालाही लागू पडतं तजो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

एका जबाबदार खात्याच्या मंत्री

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/27/2016 - 01:02 नवीन
एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही, ती चित्रफीत परत एकदा पाहून इराणींनी आपल्या सगळ्या मुद्द्यांसाठी कोणते लेखी पुरावे लोकसभेसमोर मांडले आहेत ते पहावे. याशिवाय, अजून एक महत्वाचा मुद्दा जमेस धरावा की, त्या लोकसभेतील भाषणातील सर्व शब्द आणि सर्व दस्त लोकसभेच्या विवरणात नोंदले गेले आहेत आणि त्यांत काही खोटे आढळले तर ते लोकसभेच्या हक्कभंगाचे कारण होतील. असे असले तरी... देशात कोठेही टाचणी पडली तरी त्याबद्दल पंतप्रधानांकडे जाब विचारला जाण्याच्या हल्लीच्या कालात, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याने, लोकसभेत सादर केलेले ते पुरावे खोटे आहेत असे म्हटलेले नाही ("आमचा पत्रव्यवहार असा उघडा पाडून आम्हाला शरम वाटायला का लावलीत?" असे काही जणांनी जरूर म्हटले आहे, पण ते दस्त खोटे आहेत असे कोणीही म्हटलेले नाही.) सोईस्कर माध्यमांमधल्या सोईस्कर बातम्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून राहण्याऐवजी वरच्या वस्तुस्थितीला जास्त महत्व देणे सारासारविवेकाला धरून होईल. आजच्या घडीला, "जो केवळ (विषेशतः, आपल्याला सोईस्कर असलेल्या) माध्यमांवर विसंबला त्याच्या देशाचा कार्यभाग बुडाला" ही म्हण तयार करायला हरकत नाही :) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

थांबा थोडं, इतक्यात निर्णय

तर्राट जोकर
Sat, 02/27/2016 - 01:28 नवीन
थांबा थोडं, इतक्यात निर्णय देणं योग्य नाही. वेमुला प्रकरण सुरुवातीपासून फक्त राजकारनाच्या घोळात आहे. ज्याला जे सोयीचं तितकं उचलून त्याचा उदोउदो करनं सुरु आहे. कोणताही पक्ष यास अपवाद नाही. रोहित च्या आत्महत्येच्या आधीपासून ते आतापर्यंत नीट प्रकरण पुढे आलेले नाही. मी स्वतः ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष ह्याच कारनाने केलं होते की हे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती आहे. आता कळतंय हे तितकं सोपं न राहता फार गुंतागुंतीचं झालंय. सदनात मंत्री देत असलेली माहीती खोटी आहे असे जाहीर होऊनही एंटोनी यांच्यावर काय कारवाई झाली काय हे ठावूक नाही, शिवाय मंत्री 'मला हीच माहीती मिळाली' ह्या कारणाखाली लपतात किंवा माहिती देतच नाहीत. मी भाषण बघितले नाही पण वर्डटूवर्ड स्क्रिप्ट वाचली. सामान्य लोकांना जोश, आवेश, दबंगस्टाईल वनलायनर्स इत्यादी ड्रामा आवडलेला असू शकतो. पण कन्टेन्ट महत्त्वाचे. रोहित व जेएनयु संदर्भातल्या किती प्रश्नांना काय वस्तुनिष्ठ उत्तरं दिलीत व त्याची परिणामकता किती ते तपासणे महत्त्वाचे. आंबेडकर-पेरियार सर्कल, बंडारू दत्तात्रय यांचे पत्र, त्यातला अ‍ॅन्टी-नॅशनल असा उल्लेख, इतर अनेक तपशील याबाबत मुळापासून अभ्यास करुन ही केस समजून घेणे आवश्यक आहे. बाकी, टिकाकारांमध्येही मुद्देसूद अभ्यासाचा ठणठणाट आहे, काही तपशील त्यांच्याच अंगावर उलटतील म्हणून ते लपवत आहेत, भाजपसरकार बदनाम करण्यासाठी अतिनीच पातळीवर उतरुन काहीच्या काही टिका सुरु आहे. भाजपाला अगदी दलितांचे मारेकरी संबोधणे फालतूपणा आहे. त्यांच्या कुठल्याच मताला काही किंमत द्यावी असे आतातरी वाटत नाही, पुढेही वाटणार नाही. त्याचवेळेस इराणींच्या भाषेत अनेक अंडरकरंट दिसलेत ते आहेच. प्रकरणाची सत्यान्वेषीपद्धतीने सोडवणूक न करता आरोपांची आरोपांनी उत्तरे, आरोपांपुरती कातडीबचाव मलमपट्टी असले प्रकार भाषणात आहेत. माहितगार यांचे धागे, तसेच जुन्या बातम्या तपासून मंत्र्यांच्या भाषणाचे फलित मांडतो लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जर इराणी खोट्या बोलल्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/27/2016 - 01:33 नवीन
जर इराणी खोट्या बोलल्या असत्या किंवा त्यांनी पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे खोटी असती तर काँग्रेस अजून गप्प बसली असती असा विश्वास असला तर मग असोच ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

त्याकरता अभ्यास लागतो

तर्राट जोकर
Sat, 02/27/2016 - 02:00 नवीन
त्याकरता अभ्यास लागतो डॉक्टरसाहेब, ऐसा कौन है अब उधर? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सिब्बल , सिंदिया , चिदम्बरम,

अद्द्या
Sat, 02/27/2016 - 11:03 नवीन
सिब्बल , सिंदिया , चिदम्बरम, ?? हे सगळे राजकारणात मुरलेले आणि आणि अभ्यास करून मुद्दे मांडू किंवा खोडू शकतात . पण अजून तरी त्यांनी तसं केलेलं दिसत नाहीये .. कुठल्याश्या न्यूज वर आलं कि त्या खोटं बोलल्या.. पण जर इराणींकडे खोटा रिपोर्ट असेल पोलिसांचा. तरी मला नाही वाटत भाजप ची मंडळी त्यांना तो रिपोर्ट संसदेत मांडू देतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काय हे ? आता कॉंग्रेस

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/27/2016 - 17:01 नवीन
काय हे ? आता कॉंग्रेस तुमच्यावर नाराज झाली आणि त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला तर त्यामागे सबळ कारण आहे असे म्हणावेच लागेल ! मी हे गंभीरपणे म्हणतोय कारण... काँग्रेसमध्ये अभ्यासू असलेले लोक नाहीत असा आरोप आतापर्यंत त्यांच्या कट्टर विरोधकांनीही केलेला नाही =)) संघटनेत अभ्यासू लोक नसताना काँग्रेसने इतकी दशके देशात राज्य केले हे धाडसी विधान करणारे तुम्ही पहिलेच मानव असावेत !!! आता तो अभ्यास राष्ट्र योग्य दिशेने नेण्यासाठी होतो/होत होता की नाही याबद्दल नक्की दुमत आहे, पण ती गोष्ट वेगळी ;) शिवाय, गदारोळ करून कामकाज ठप्प करायला अभ्यास अजिबात लागत नाही, फक्त राज्यसभेत बहुमत असले की कोणतीही असलेली/नसलेली/कल्पित/बनवलेली कारणे पुरतात हे मागच्या चार लोकसभा सत्रावरून स्पष्ट दिसले नसेल तर मग मात्र कठीण आहे. आता इथे तर इराणींनी चक्क सरकारदरबारी नोंद झालेल्या कागदपत्रांसह त्यांचे मुद्दे लोकसभेत मांडले आहेत आणि ते लोकसभेच्या कामकाजाच्या विवरणात नोंदले गेले आहेत. तरीपण काँग्रेसकडून एक साधा चुकार हुंकार/प्रतिसाद नाही !? किंबहुना, चर्चेचा आग्रह धरणारे आणि "मी जे बोलेन ते सरकारला अडचणी आणेल, म्हणून मला बोलून दिले जाणार नाही" असे दावे करणार्‍यांसकट सर्वजण इराणींच्या पहिल्या दोन एक प्रतिवादानंतरच सभात्याग करून सदनाबाहेर गेले, यातली मेख काय बरे ? असो. मी कोणताच झेंडा हाती घेतलेला नाही. पण समोर स्पष्ट दिसणारी आणि छुपी कारणे, वर्तमान आणि भूतकाळातल्या वस्तूस्थितीच्या अभ्यासाने शोधून त्याचा सारासारविवेकाने अर्थ काढणे हा माझा छंद आणि व्यावसायीक कार्याचा भाग आहे. त्यानुसार मी काही निरिक्षणे मांडली आहेत. आता तेच मुद्दे परत परत उगाळण्यात अर्थ नाही. तसेच, सकारात्मक चर्चा करताना (मी किंवा दुसर्‍यांनी) निष्कारण फाटे फोडू नयेत असे मला वाटते. सद्या जेवढे लिहिले आहे तेवढ्यात समजूत पटली तर भले; नाही पटली तरी भले ! कारण, मी जगातील कोणा एकाचे/अनेकांचे मत बदलायला जन्म घेतला आहे असा माझा कधीच दावा नसतो (अत्यंत डोकेखाऊ काम आहे हो ते ;) :) ). तेव्हा इत्यलम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असो. नका वेळ घालवू.

तर्राट जोकर
Sat, 02/27/2016 - 18:03 नवीन
असो. नका वेळ घालवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

दिल्ली आपच्या जाहिरातींमधला

श्रीगुरुजी
Sat, 02/27/2016 - 14:07 नवीन
दिल्ली आपच्या जाहिरातींमधला चिंटुकसा मुद्दा उचलून तांडव करणार्‍या श्रीगुरुजींना आपल्या पक्षाच्या एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही, इतरांनी मुद्देसूद प्रतिसाद दिलेच आहेत. त्यामुळे अधिक लिहीत नाही. स्मृती इराणी आपल्या ४९ मिनिटांच्या भाषणात नक्की काय आणि किती खोटे बोलल्या ते साधार सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

वरच्या प्रतिसादातील पहिला

श्रीगुरुजी
Sat, 02/27/2016 - 14:08 नवीन
वरच्या प्रतिसादातील पहिला प्रतिसाद तजो यांच्या प्रतिसादातील आहे व उर्वरीत प्रतिसाद हे त्याला उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

४९ मिनिटांच्या भाषणातल्या

तर्राट जोकर
Sat, 02/27/2016 - 14:16 नवीन
४९ मिनिटांच्या भाषणातल्या असंख्य मुद्द्यांपैकी फक्त ३ मुद्दे खोटे? निदान बाकीचे तरी खरे होते ना? >> ग्रुजी, तुमच्या ह्या प्रतिसादासाठी आहे ते. आधीच विचारायचे ना कोणते मुद्दे खोटे, तुम्ही बाकीचे खरे होते ना म्हनून विचारताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते विचारलेच आहे वर.

श्रीगुरुजी
Sat, 02/27/2016 - 23:26 नवीन
ते विचारलेच आहे वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ

श्रीगुरुजी
Sat, 02/27/2016 - 14:06 नवीन
केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू मांडताहेत अशी कल्पना करून (अशी केवळ कल्पनाच करता येईल म्हणा) जब्बर हसतोय ! =))
+१ केजरीवाल आणि त्यांच्या बोलभांड टोळीने जेटलींविरूद्ध भ्रष्टाचाराचे (नेहमीसारखेच) बिनबुडाचे आरोप केल्याने जेटलींनी यांच्याविरूद्ध न्यायालयात आपली बदनामी व मानहानी झाल्याचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात केजरीवालांचा बचाव काय तर म्हणे जेटली १ लाखांहून अधिक मतांनी निवडणुक हरल्यामुळे त्यांना सार्वजनिक प्रतिष्ठा नाही (आणि सार्वजनिक प्रतिष्ठाच नसल्यामुळे बदनामी होण्याचा प्रश्नच नाही.). कायदेशीर खटल्यात असा हास्यास्पद आणि तर्कहीन बचाव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

केजरीवालना ते स्वतः

बोका-ए-आझम
Sat, 02/27/2016 - 17:40 नवीन
वाराणसीतून लोकसभेची निवडणूक हरले होते याचा विसर पडलेला दिसतो. डाॅ.आंबेडकर आणि इंदिरा गांधी हेही निवडणुकीत पराभूत झाले होते. हेही ते विसरले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा प्रतिवाद निश्चितच अॅड

हाडक्या
Fri, 02/26/2016 - 22:13 नवीन
हा प्रतिवाद निश्चितच अॅड होमिनेम आहे.
त्या इराणीबाईंबद्दल काडीची सहानुभुती नाही. परंतु तुमचाही प्रथम प्रतिसाद इराणींच्याप्रति "अॅड होमिनेम" असाच नाही का ? म्हणजे तुम्हीपण त्या भाषणातले छिद्रान्वेषण केलेत तसे इतरांच्या बाबतीतही केलेत असं दिसलं नाही इथे (इतरत्र केले असल्यास माहित नाही). इतरांच्याबाबतीत केले नाहीत म्हणून तुम्ही बोलू नव्हे असे म्हणायचे नाही नक्कीच. पण इतरांवर 'अ‍ॅड होमिनेम'चे आरोप करताना स्वतःचे अवलोकन प्रथम जास्त अपे़क्षित आहे. (अगदी हाच दोष श्रीगुरुजींना ही लागू होतो हे वेगळे सांगायची गरज नसावी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदीच वाईड बॉल आहे बै हा.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/26/2016 - 23:01 नवीन
तुमचाही प्रथम प्रतिसाद इराणींच्याप्रति "अॅड होमिनेम" असाच नाही का ?
नाही. इराणींचं भाषण वस्तुनिष्ठ नाही असं मला का वाटतं यासाठी त्यांच्या भाषणातले इमोसनल अत्याचार मुद्दे दाखवले. अॅड होमिनेम म्हणजे - अमका माणूस ना, फालतूच आहे तो. (फालतू या जागी डावा, उजवा, वरचा, खालचा, मधला, असा काहीही शब्द संदर्भानुसार वापरा.)
त्या भाषणातले छिद्रान्वेषण केलेत तसे इतरांच्या बाबतीतही केलेत असं दिसलं नाही इथे (इतरत्र केले असल्यास माहित नाही).
याला व्हॉटअबाऊटरी (मराठीत 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म') म्हणतात. अॅड होमिनेमसारखी ही सुद्धा एक लॉजिकल फॅलसी आहे. पण तुम्हाला हवंच असेल तर हे पहा. रवीश कुमारच्या एनडीटीव्हीवरच्या कार्यक्रमालाही मी दोन दिवसांपूर्वी नावं ठेवलेली आहेत; इमोसनल अत्याचार (हेच शब्द वापरलेले नाहीत) करतो हे ही एक कारण आहेच. त्याचा मूळ मुद्दा पटलेला आहे तरीही. इथे तर इराणी खोटं बोलत आहेत, अर्धसत्य सांगत आहेत अशा बातम्या मुख्य धारेतली माध्यमं प्रकाशित करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा