शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................
जगाच्या पोशिंद्याचं दुःख
आभाळाला खेटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतीच्या समोर
तुम्ही नाचवता बायका
शेतकऱ्याला द्यायला
नाही म्हणता पैका
शेतकरी झालं उध्वस्त
ते आयुष्यातून उठलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतींना खुशाल देता
मोठमोठ्या संधी
कांद्याचे जरा भाव वाढले
की निर्यातीवर बंदी
असं दुटप्पी वागणं कसं
तुम्हालाच पटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
मेक इन इंडियाचा
केवढा मोठा बोलबाला
तिकडे शेतकरी मात्र
नुसते कष्ट करून मेला
उद्योगपतीची वाढते ढेरी
अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
नफेखोर उद्योगपतीसाठी
केवढा तुमचा आटापिटा
जगाला जगविणारा मात्र
मुदलामध्ये सोसतो तोटा
किती मांडू हिशेब सारा
मन पार विटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
- शामसुंदर महाराज सोन्नर
कविता आवडलीये!
एक नंबर..
https://m.facebook.com
स्वतः लिहलेल्या कविता आवडतील
कविता आवडली...पण,
+१
शेतकरी दु:खी आहे पण म्हणून बाकीची कामं ठेउन त्यांनाच मांडीवर घेउ
अहो भालेराव साहेब,
अनुमोदन
कवितेतली तळमळ प्रामाणीक आणि मनाला भिडणारी आहे
+११
कविता आहे. उपमा आहे त्यामुळे
गांधीजी आठवले. बिहार
अत्यंत जुनाट बुरसट कविता
सहमत. अगदी १००% सहमत. बाकी
कोती मनोवृत्ती आहे राव! तिकडे
अजिबात आवडली नाही....
+1
+11111
ते कसले वेल गेट्तायत सून...
नेहमी प्रमाणे सहमत !
कविता एका पत्रकारांने केली
जेपीभाऊ....
अत्यंत भिकार कविता.
राजकिय हेतूने केलेली कवीता
डीडी किसान
ह्म्म ..
शेतीच केली पाहीजे असे काही सरकारी बंधन नाही ना ? इतका त्रास होतो
भालेराव, कळकळ समजतेय. पण
पिराताई,पण म्हणुन तळतळटाने
ह्याचे
शेतकर्यांसाठी, शेतकरी
क्रेझी चा जागी
अतिशय उत्तम प्रतिसाद
विटेकरांच्या प्रतिसादाला +१
प्रत्येकाचे काम महत्त्वाचे आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
शेतकर्यांचे प्रॉब्लेम्स मोठे
पुढील ३ दुवे पाहावेत१ २ ३
इंडस्ट्रियलायझेशन इतके वाढले
खरंय !!
आँ अच्चं आये का ते शगलं? नै
कुठले सरकार कधी होते मग
कविता
चर्चा कविते वर झाली तर बरय..
ते पण नको
हायला,
धाग्यावर अवांतर आहे पण
आमच्या एका देखण्या एम्बीए
हास्यास्पद कविता आहे.
Pagination