Skip to main content

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/01/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.) स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ? त्याज्ज्य्य नवर्‍याने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्‍यावर जाण्याचे कारणंच काय ????????????????????????????? (असतील तर..) सुज्ञ नवर्‍यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... ==================================================== स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्‍या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" ) इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!

वाचने 36006
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

In reply to by पियुशा

मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

In reply to by स्रुजा

नुसतेच पाॅकाॅ आणलेस का गं? बाकी काय आणि किती आणायचं ते पण ज्ञान देणारा धागा आहे ना मिपावर ;)

जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

In reply to by सतिश गावडे

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

In reply to by अत्रुप्त आत्मा

आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!

In reply to by विजय पुरोहित

आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

In reply to by साती

मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!

In reply to by साती

नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे

In reply to by अजया

सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

In reply to by साती

>>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)

In reply to by साती

आन्दोलन कोनाला करावं लागतं जे डॉमिनेट आहे ते आणि त्यांना ? आम्हीही आमचा कोनाडा करूच ;) -दिलीप बिरुटे

झाडावर सुमारे ३०० एक अनाहितांनी पोती भरभरुन पॉपकॉर्न नेल्याने झाड मोडल्याच्या बातम्या येत आहेत. वृक्षवल्ली अम्हा सोयरी वनचरे.

In reply to by त्रिवेणी

हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

In reply to by अन्नू

मला पण ४ वेळा दिसतंय. नो वरीज... प्रतिसादकर्त्री जाम चिडली आहे पुरुष नामक दुष्ट प्रजातीवर! :(

In reply to by विजय पुरोहित

नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

नवरा असो किंवा बायको,
स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

In reply to by यशोधरा

मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे

In reply to by टवाळ कार्टा

स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

In reply to by साती

दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.