एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो.
पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स. प्रकाशाचे गोळे वगैरे. त्या युद्धाची एकदम मोठी ठळक आठवण म्हणजे गल्लोगल्ली सुरु झालेले पी सी ओ / एस टी डी / आय एस डी चे फोन बूथ. मोबाईल अजून यायचे बाकी होते. म्हणून गल्फ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी संवाद करण्याचा तो महत्वाचा दुवा होता. माझा प्रिय मित्र ओंकार पत्की याचे बाबा सौदी अरबला असायचे. जेंव्हा अमेरिकेने चढाई सुरु केली त्या दिवशी ते सौदीला परत गेले होते. त्यानंतर ओंकार आणि त्याची आई यांची जीवाची घालमेल जवळून पाहिली होती. युद्ध तसे दूरच होते ते जवळ आले होते केवळ ओंकारच्या बाबांमुळे.
नंतर करीअर आणि अभ्यास करताना हे दूरचे युद्ध विसरलो. जवळपास १० वर्षांनी स्वतःचा क्लास चालू केला क्लासमध्ये मुलांना १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामागची कारणे शिकवताना, भारतापुढील परकीय चलनाचे संकट गल्फ युद्धाने वाढले हे सांगताना युद्धाचे आर्थिक परिणाम वाचायला मिळाले. आणि दूरचे युद्ध आर्थिक अंगाने दिसू लागले. एअरलिफ्टमुळे झाले काय की या दूरच्या आणि केवळ आर्थिक बाजू दिसलेल्या युद्धाला माझ्या मनात मानवी स्पर्श मिळाला. आणि गेल्या दहा वर्षात वाचनामुळे कल्पिलेल्या आणि आंतरजालामुळे वाचू किंवा बघू शकलेल्या अनेक गोष्टी अधिक परिणामकारकपणे अनुभवता आल्या. त्यांची दाहकता अंगावर आली. आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत ते जाणवले.
२०१५ च्या एप्रिल मध्ये झालेले "ऑपरेशन राहत", ज्यात येमेनमधून ४६४० भारतीयांना आणि ९६० परदेशी लोकांना बाहेर काढले गेले त्या सुटकेचे आपण सर्व साक्षीदार होतो. आता २४ तास चालणारी माध्यमे आणि त्याशिवाय सोशल मिडियाद्वारा सतत हातात मिळणाऱ्या अपडेट्स यामुळे आपण त्याचा थरार अनुभवू शकलो होतो. पण जेंव्हा संपर्काची साधने तुटपुंजी होती त्या काळात १,७०,००० लोकांना १३ दिवस दिशाहीन आणि नंतरचे ५९ दिवस त्या युद्धकाळात वाळवंटात कसे वाटले असतील त्याची जाणीव एअरलिफ्ट अगदी यथार्थपणे करून देतो.
मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीशी मोझेस बद्दल बोललो होतो. इजिप्तच्या राजदरबारात वाढलेला मोझेस. रामसिस राजाच्या भावासारखा वाढलेला मोझेस. ४०,००,००० लोकांना केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा मोझेस. मग वचनात सांगितलेल्या दुधा मधाच्या प्रदेशापर्यंतची सिनाई च्या वाळवंटातील ४० वर्षाची दिशाहीन, कंटाळवाणी आणि असुरक्षित वाटचाल करणारा मोझेस. अन्न धान्याची टंचाई. अनुयायांचा अविश्वास, त्यांच्या कटकटी सहन करणारा मोझेस. देवाकडून स्पष्ट दिशानिर्देश मिळत नाही म्हणून हतबल झालेला मोझेस. जोशुआ सारख्या मदतनीसांच्या आधारे सर्व अडचणीना पुरून उरणारा मोझेस. यातील अनेक गोष्टी मला रणजीत काट्याल मध्ये दिसल्या.
इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले.
"टिपू सुलतान" जहाज युनोच्या बंदीनंतर वळताना बघितले. ५०० लोक भंगार जहाजात बसून कुवेत बाहेर पडताना बघितले आणि तीन रात्री जागून रडत रडत वाचलेली “लिऑन युरिस” या लेखकाची “बाळ भागवत” यांनी भाषांतरित केलेली “एक्झोडस” ही कादंबरी आठवली. त्यातला "आरी बेन कनान" हा कणखर नायक आठवला. त्यात "आलिया बेत" (homecoming) च्या योजनेंतर्गत दोन आठवड्याच्या रेशनवर ४५०० पेक्षा जास्त ज्यू लोकांना घेऊन आखाती समुद्रात अडकलेल्या “एस एस एक्झोडस” ह्या जहाजावरील प्रवाश्यांची वेदना आणि असुरक्षितता पुन्हा जाणवली. त्यावेळी ब्रिटीश रॉयल एअर फोर्स आणि इतर ब्रिटीश सरकारी संस्थाचे, अजून ज्याला देश म्हणून मान्यता मिळाली नाही पण ज्यांनी महायुद्धाची प्रचंड झळ सोसली आहे त्या व्यक्तीसमूहाशी नियम न तोडता कसे वागावे या बद्दलची घुसमट आणि हतबलता देखील जाणवली.
सगळ्यात शेवटी अम्मानच्या विमानतळावर जाण्यासाठी जॉर्डनच्या वेशीवर भारतीयांच्या बसेस आणि कार्स येतात आणि सीमेवरचा जवान गेट उघडतो तेंव्हा या सुखांतामुळे डोळ्यात आनंदाश्रू आले तरी कुठेतरी याच्या विरुद्ध अत्यंत दुर्दैवी शोकांतिकेचा नायक असलेला तीन वर्षाचा आयलान कुर्दि आणि त्याचे कुटुंबीय आठवून खूप हळहळ वाटली. अम्मानच्या विमानतळावरची भकास चेहऱ्याची गर्दी बघून सिरियन रीफ्युजी क्रायसिस काय असू शकतो, ते दृश्य स्वरूपात जाणवले.
चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पासपोर्ट नसलेल्या लोकांना ओळखायचे कसे? ही समस्या असलेल्या भारतीय दूतावासाचा राग येत नाही. जेवणाच्या वेळी फोन न उचलणाऱ्या कोहली नामक सरकारी कर्मचाऱ्याचा, मलेशियाला जा सांगणाऱ्या सेक्रेटरीचा, कोहलीला टाळणाऱ्या मंत्र्याचा, प्रत्येक माणशी २०० डॉलर घेऊन ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या भंगार जहाजवाल्याचा, युद्ध क्षेत्रात जायला सुरवातीला नकार देणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांचा, अम्मानच्या विमानतळावर "गर्मी मत खाओ, मुझे भी कुछ पता नही" असे अजीजीने सांगणाऱ्या कर्मचाऱ्याचा, सतत कटकट करणाऱ्या जॉर्ज किंवा पूनावालाचा, इतकेच काय शेवटी कुवेती स्त्रीला पाहून भडकलेल्या आणि नंतर भारतीय लोकांची गर्दी पाहून वरमलेल्या इराकी सैनिकाचा; कुणाचाच राग येत नाही. सगळेच त्या परिस्थितीचे बळी वाटतात. कथेच्या नायकाला देखील पळून जाण्याची किंवा हे सगळं सोडून द्यावंसं वाटणं, त्याच्या पत्नीने आधी विरोध नंतर साथ देणं; सगळं नैसर्गिक वाटतं. कटकट्या जॉर्ज शेवटी विमानात बसल्यावरसुद्धा स्वभावानुसार हवाई सुंदरीला, "फर्स्ट क्लासमध्ये कोण बसणार हे कसे ठरवले?" असे विचारतो आणि ही सगळी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या अनेक लोकांची गोष्ट आहे याची खात्री पटते.
अक्षय कुमारचे चाहते हा पिक्चर तर बघतीलच आणि कदाचित निम्रत कौरचे देखील पण आपल्या आजूबाजूला सद्य काळात घडत असणाऱ्या घटनांची भीषणता जाणवून घेण्यासाठी आणि व्यवस्था आपले काम कसे करते, त्यात इच्छाशक्ती आणि भावना किती महत्वाचा भाग पार पाडते ते समजण्यासाठी तर हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा.
वाचने
27974
प्रतिक्रिया
117
मिसळपाव
प्रतिक्रिया
अक्कीमुळेच बघणारेय हा चित्रपट
कोण अक्की?
In reply to अक्कीमुळेच बघणारेय हा चित्रपट by किसन शिंदे
माहितीसाठी गूगल करा. धन्यवाद!
In reply to कोण अक्की? by प्रचेतस
तुम्ही असताना गूगल कशाला?
In reply to माहितीसाठी गूगल करा. धन्यवाद! by किसन शिंदे
जुने धागे वाचा आणि अभ्यास
In reply to तुम्ही असताना गूगल कशाला? by प्रचेतस
आमचा अभ्यास तेव्हढा नाही हो
In reply to जुने धागे वाचा आणि अभ्यास by किसन शिंदे
कोण आहे अक्की? माहीत नाही का
In reply to आमचा अभ्यास तेव्हढा नाही हो by प्रचेतस
अक्की म्हणजे अक्शयकुमार
In reply to कोण आहे अक्की? माहीत नाही का by Anand More
आमच्या अभ्या अगदी बरोबर बोलतो
In reply to अक्की म्हणजे अक्शयकुमार by कट्टप्पा
ते आमचे सर आहेत किसन सर.
In reply to आमच्या अभ्या अगदी बरोबर बोलतो by किसन शिंदे
ओळख आवडली
मस्त ओळख.
तुम्ही खरंच सुंदर लिहलंय...
मस्तं लेख आनंदभाऊ!
लेख वाचून सिनेमा बघावासा
प्रोड्युसर बद्दल काही माहिती
In reply to लेख वाचून सिनेमा बघावासा by अजया
तुमच्याकडूनच का वसूल करु नये?
In reply to प्रोड्युसर बद्दल काही माहिती by Anand More
अक्षय फारसा आवडत नव्हता पण
उत्तम चित्रपट
अतिशय सुरेख लेखं, मोरेसर ...
हो... त्या ओळी मला पण खूप
In reply to अतिशय सुरेख लेखं, मोरेसर ... by पगला गजोधर
सहमत
In reply to अतिशय सुरेख लेखं, मोरेसर ... by पगला गजोधर
अक्षय कुमारचे
स्पेशल २६ राहिलं का लिहायचं ?
In reply to अक्षय कुमारचे by अदि
हो हो
In reply to स्पेशल २६ राहिलं का लिहायचं ? by उगा काहितरीच
छान लिहिलेय!
परिक्षण आवडले.
चिप (चित्रपट परीक्षण) आवडले....
यात बरेच इंग्रजी आणि अरबी
In reply to चिप (चित्रपट परीक्षण) आवडले.... by मुक्त विहारि
मी बॉलीवूडचे सिनेमे बघत नाही...
In reply to यात बरेच इंग्रजी आणि अरबी by Anand More
हा बघाच
In reply to मी बॉलीवूडचे सिनेमे बघत नाही... by मुक्त विहारि
चित्रपटाच्या निमित्ताने
धन्यवाद... माझे बहुतेक लिखाण.
In reply to चित्रपटाच्या निमित्ताने by सतिश गावडे
+१
In reply to चित्रपटाच्या निमित्ताने by सतिश गावडे
कालच पाहिला. चांगला आहे.
आनंद, सिनेमाच्या निमित्ताने
बिकाशेठ, प्रतिसाद ख्हूप आवडला
In reply to आनंद, सिनेमाच्या निमित्ताने by बिपिन कार्यकर्ते
भारतीय नोकरशाहीच्या
In reply to आनंद, सिनेमाच्या निमित्ताने by बिपिन कार्यकर्ते
यशो, माझी भूमिका टिपिकल
In reply to भारतीय नोकरशाहीच्या by यशोधरा
ओके. तुम्हांला मिळालेली
In reply to यशो, माझी भूमिका टिपिकल by बिपिन कार्यकर्ते
थोडं अधिक स्पष्ट करतो... सर्व
In reply to ओके. तुम्हांला मिळालेली by यशोधरा
:)
In reply to थोडं अधिक स्पष्ट करतो... सर्व by बिपिन कार्यकर्ते
दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे
In reply to यशो, माझी भूमिका टिपिकल by बिपिन कार्यकर्ते
जाऊ द्या डॉक्टरसाहेब, त्या
In reply to दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे by डॉ सुहास म्हात्रे
जेद्दाचं माहीत नाही. पण मी
In reply to दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे by डॉ सुहास म्हात्रे
स्वानुभव
In reply to दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादांबद्दल सर्वांचे
आज हा चित्रपट पाहीला. चित्रपट
तीन वर्षापूर्वी बहारिनला
खूप छान चित्रपट ओळख. तुमची
चित्रपट आवडला नाही...
मुळात Airlift या नावासोबतच हा
In reply to चित्रपट आवडला नाही... by ब़जरबट्टू
पटलं..
In reply to चित्रपट आवडला नाही... by ब़जरबट्टू
+१००००००००००००००००००००
In reply to चित्रपट आवडला नाही... by ब़जरबट्टू
कालच हा चित्रपट पाहिला. बरा
मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा
In reply to कालच हा चित्रपट पाहिला. बरा by पिलीयन रायडर
अच्छा असय होय ते!! थॅन्क्यु
In reply to मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा by संदीप डांगे
पिरा छान प्रतिक्रिया…
In reply to कालच हा चित्रपट पाहिला. बरा by पिलीयन रायडर
चित्रपट चांगला आहे, पण बर्याच
पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे
मोरेसाहेब, डोण्ट वरी. पब्लिक
In reply to पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे by Anand More
मला परीक्षण आवडले. बघणार आहे
In reply to पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे by Anand More
सॉरी हां तुमच्या लेखावर काही
In reply to पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे by Anand More
धन्यवाद... :-)
In reply to सॉरी हां तुमच्या लेखावर काही by पिलीयन रायडर
आज airlift पाहिला. आवडला.
वा
माझ्या मते मेध्यू ने
अगदीच अवांतर:
सिनेमा बघितला... खूप काही
माझ्या एका मित्राचे मत आहे की