काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं).
(फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते.
तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात :
त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन.
त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं!
तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू.
मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!).
साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला.
वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अॅक्सेप्ट टीप्स.
(तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!)
(केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)

वाचने
52837
प्रतिक्रिया
255
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज बाने मधे १० वर्षापुर्वीचा
हो. ४५० रूपये.
In reply to आज बाने मधे १० वर्षापुर्वीचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
१० वर्षांपुर्वी लैचं हुच्चं
In reply to हो. ४५० रूपये. by प्रचेतस
५५० +tax
In reply to १० वर्षांपुर्वी लैचं हुच्चं by कॅप्टन जॅक स्पॅरो
२०० झाले? वा. सत्कार.
हेलाकाकांना बोलवा. आणखी २००
In reply to २०० झाले? वा. सत्कार. by कॅप्टन जॅक स्पॅरो
विषय काय ठेवावा? कोळसा फुंकुन
In reply to हेलाकाकांना बोलवा. आणखी २०० by आदूबाळ
कोळसा फुंकणे देशाच्या
In reply to विषय काय ठेवावा? कोळसा फुंकुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
हम हाजीर हुये
कोण मानसी?
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
लोल =))
In reply to कोण मानसी? by आदूबाळ
सहमत आहे
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
बायको असताना मानसीपण? शोभत
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
७५० रुपयात तुम्हाला "मानसी"
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
हेला काका कुठे गायबले ?
In reply to ७५० रुपयात तुम्हाला "मानसी" by प्रसाद१९७१
विठा म्हणतात 'तो'आत्मानंद
बैलाच्या डोळ्याच्या
In reply to विठा म्हणतात 'तो'आत्मानंद by मितभाषी
इतका वेळ बारबेक्यु नेशन चा
प्रिय व्यक्ति सोबतचा आनंद
लहान लहान गोष्टीतूनही आनंद
लोल हेलाकाका. एक धागा काढूनच
In reply to लहान लहान गोष्टीतूनही आनंद by हेमंत लाटकर
तुस वशाडी येऊ आदूबाळा!!! :D
In reply to लोल हेलाकाका. एक धागा काढूनच by आदूबाळ
सहमत.
In reply to लहान लहान गोष्टीतूनही आनंद by हेमंत लाटकर
झकास प्रतिसाद !
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही अजुनही "हेला" चा अर्थ
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिरफाड कशाला काय म्हणता.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वत:च्या खिशाला चाट न पडता
:)
In reply to स्वत:च्या खिशाला चाट न पडता by हेमंत लाटकर
रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लो यु ना काका.
In reply to रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
लो यु ना काका.हे पाहिलं नाही काय ? त्यात पुतण्या समाविष्ट नाही... त्यासाठी वेगळा आकार पडेल की काय याची विचारणा करून पहा ;)(हेलाकाकांचा लाडका पुतण्या)
In reply to रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे देवा, परमेश्वरा, करुणाकरा..
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बार-बे-क्यू ?
दोनशे (प्रकाशित आणि कैक
In reply to बार-बे-क्यू ? by खेडूत
बार आवडतो
In reply to दोनशे (प्रकाशित आणि कैक by आदूबाळ
आकडा लावायचाय का?
नको
In reply to आकडा लावायचाय का? by यशोधरा
तोच तर धागाविषय आहे!
In reply to नको by पैसा
बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध
In reply to तोच तर धागाविषय आहे! by कवितानागेश
सारे हॉटेल एक बार, बार्बेक्यू
आपण पत्रा मोडलात म्हणे
In reply to सारे हॉटेल एक बार, बार्बेक्यू by सतिश गावडे
ती एक वेगळीच कथा आहे. :(
In reply to आपण पत्रा मोडलात म्हणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
बरेचं दिवसांत वेगळी कथा ऐकली
In reply to ती एक वेगळीच कथा आहे. :( by सतिश गावडे
थोडक्यात बचावलो. त्याचीच कथा
In reply to बरेचं दिवसांत वेगळी कथा ऐकली by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही
In reply to थोडक्यात बचावलो. त्याचीच कथा by सतिश गावडे