काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं).
(फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते.
तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात :
त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन.
त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं!
तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू.
मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!).
साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला.
वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अॅक्सेप्ट टीप्स.
(तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!)
(केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)

वाचने
52836
प्रतिक्रिया
255
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊन
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
ओके!
In reply to प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊन by किसन शिंदे
राजस्थानातले उंट आता बंगलोरला
In reply to दर वेळी सयाजीतल्या त्या by एस
येथे पाहिजे जातीचे खवय्ये
मी काय म्हन्ते
+१ सुरेख
In reply to मी काय म्हन्ते by पैसा
प्रवचन देण्याची ऊर्मी दाबल्या
In reply to मी काय म्हन्ते by पैसा
अवांतर
In reply to प्रवचन देण्याची ऊर्मी दाबल्या by प्यारे१
असे कितीतरी लहान सहान स्वर्ग
In reply to मी काय म्हन्ते by पैसा
धन्यवाद रे!
In reply to असे कितीतरी लहान सहान स्वर्ग by सूड
खरंतर सगळाच प्रतिसाद छान आहे,
In reply to मी काय म्हन्ते by पैसा
+१००
In reply to मी काय म्हन्ते by पैसा
+१
In reply to मी काय म्हन्ते by पैसा
बार्बेक्यु घरातील स्वर्ग......
दिलकष
In reply to बार्बेक्यु घरातील स्वर्ग...... by जयंत कुलकर्णी
वा घरच्या घरी बार्बेक्यू !!
In reply to बार्बेक्यु घरातील स्वर्ग...... by जयंत कुलकर्णी
(पण वासाने बाजुचा गुजराती भडकेल)
In reply to वा घरच्या घरी बार्बेक्यू !! by खटपट्या
अहो तो शाकाहारी आहे. त्याची
In reply to (पण वासाने बाजुचा गुजराती भडकेल) by मुक्त विहारि
तुम्ही पण बाणेदार पणा दाखवा..
In reply to अहो तो शाकाहारी आहे. त्याची by खटपट्या
नवरा सोडून देइन वगैरे
In reply to तुम्ही पण बाणेदार पणा दाखवा.. by जेपी
असेलही.
In reply to नवरा सोडून देइन वगैरे by सतिश गावडे
लै भारी!
In reply to बार्बेक्यु घरातील स्वर्ग...... by जयंत कुलकर्णी
घरोघरी मातीच्याच चुली
बाप्रे !!!
In reply to घरोघरी मातीच्याच चुली by धर्मराजमुटके
"बायडी मुकू पण बिडी न मुकू.
In reply to घरोघरी मातीच्याच चुली by धर्मराजमुटके
.
डेक्कनलाही आहे बार्बेक्यू
मजा आली
खरंच.
In reply to मजा आली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयला !
In reply to खरंच. by प्रचेतस
हो ना! काय हे कंपूबाजांनो?
In reply to आयला ! by विवेक ठाकूर
आयडी बदलून घेऊ देत की!
In reply to हो ना! काय हे कंपूबाजांनो? by यशोधरा
त्या अहंगंडानं पछाडलेल्या
In reply to आयडी बदलून घेऊ देत की! by पैसा
प्रतिसाद काही आवडला नाही.
In reply to त्या अहंगंडानं पछाडलेल्या by एस
साहित्य संमेलनाचा वृ लिहा बरं
In reply to प्रतिसाद काही आवडला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांत.. आचार्य अत्रे सभागृहातून.
In reply to साहित्य संमेलनाचा वृ लिहा बरं by यशोधरा
सहमत आहे.
In reply to प्रतिसाद काही आवडला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्या आयडी बद्दल चर्चा चालू
In reply to सहमत आहे. by एस
आयला! सतीश गावडे आणि प्रचेतस
In reply to आयला ! by विवेक ठाकूर
मी तर
In reply to आयला! सतीश गावडे आणि प्रचेतस by आदूबाळ
बार-बे-क्यू नेशनला पूर्वी
बदलते दर
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
सहमत आहे डाॅ खरे. कमी खाणारे
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
ते सोडून आम्ही "पॉपटेटस"
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
बाबौ! मग मी जाणार नाहीच.
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
लौट के आजा मेरे गीत...
डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो
In reply to लौट के आजा मेरे गीत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
@ डिबी : पुढच्या वेळी मी आणि माझी प्रिय मैत्रीण फक्त !
In reply to सहमत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठाकूर साहेब
In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
सुबोधजी, तुमच्याशी संवाद साधण्यात मजा आहे म्हणून लिहीतो.
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
ठाकूर साहेब
In reply to सुबोधजी, तुमच्याशी संवाद साधण्यात मजा आहे म्हणून लिहीतो. by विवेक ठाकूर
सुबोधजी,
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
मला फँटसी वाचायला खूप आवडतात.
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
तुमच्यासारख्या दुत्त, अरसिक
In reply to मला फँटसी वाचायला खूप आवडतात. by अजया
ते जीवनाचे आरस्पानी सौंदर्य
In reply to तुमच्यासारख्या दुत्त, अरसिक by यशोधरा
तुम्ही फकत अरसिकच नाई तर
In reply to ते जीवनाचे आरस्पानी सौंदर्य by अजया
खूप कामं असतात हो.नवरा
In reply to तुम्ही फकत अरसिकच नाई तर by यशोधरा
आमाला सामान्य काईच समजत नै.
In reply to खूप कामं असतात हो.नवरा by अजया
मला
In reply to आमाला सामान्य काईच समजत नै. by यशोधरा
आधी आरशाचे डाग साफ करा, मग
In reply to मला by सस्नेह
.
In reply to आधी आरशाचे डाग साफ करा, मग by यशोधरा
थोडक्यात तुमाला अस्वच्चच
In reply to . by सस्नेह
यशोधरा काय हे ? आप भी ?
In reply to थोडक्यात तुमाला अस्वच्चच by यशोधरा
साध्या मराठीत बोला बरं सर. मी
In reply to यशोधरा काय हे ? आप भी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ये 'खुदसे' मोहब्बत भी आग जैसी
In reply to साध्या मराठीत बोला बरं सर. मी by यशोधरा
म्हणजे असं की
In reply to साध्या मराठीत बोला बरं सर. मी by यशोधरा
-दिलीप बिरटे >> ये क्या हाल
In reply to म्हणजे असं की by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाम में क्या रखा है
In reply to -दिलीप बिरटे >> ये क्या हाल by यशोधरा
बेतहाशा मुहब्बत करते है जो
In reply to नाम में क्या रखा है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे