✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

स
संजय क्षीरसागर यांनी
Mon, 12/15/2014 - 14:39  ·  लेख
लेख
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते. तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात : . त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन. त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं! तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू. मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!). साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला. वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स. (तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!) (केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
52527 वाचन

💬 प्रतिसाद (255)

प्रतिक्रिया

मग इथे सगळ्यांची डोकी कश्याला

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 14:06 नवीन
मग इथे सगळ्यांची डोकी कश्याला खाता मोगा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

गेल्या दोन वर्षात खास हॉटेलला

संदीप डांगे
Wed, 01/20/2016 - 00:09 नवीन
गेल्या दोन वर्षात खास हॉटेलला जाऊन जेवणे झाले नव्हते. पंधरा दिवसांआधी बायकोला म्हटलं चल बारबेक्यूनेशनला जाऊ, नाशिकमधेही आलंय. तीने नको नको म्हणत शेवटी होकार दिला. गाडी मुंबई-नाक्यावरून वळवली आणि लक्षात आलं जवळंच एसएसके सॉलिटेयर नावाचं नवं लग्जरी हॉटेल आहे, त्यांच्याही सातव्यामाळ्यावरच्या टेरेसवर बारबेक्यु सदृश्य काहीतरी आहे. म्हटलं बाने दूर आहे सिटीसेंटरला, जाइस्तोवर, पार्किन्ग मिळेस्तोवर उशिर होईल. चल इकडेच ट्राय करू. इथे वॅले पार्किंग आहे. गाडी वॅलेवाल्याकडे सोडून आम्ही वर टेरेसवर पोचलो. तर तिथे कुणीच नव्हते. कसे असणार. सोमवार संध्याकाळचे आठ वाजले. कॅप्टन पुढे आला. सगळे टोपी घातलेले शेफ काम करत होते. आम्हाला कुठे टेबलावर बारबेक्यूचे खण दिसले नाही. म्हटले आपली फसगत नाही ना झाली. कॅप्टन बोलला, नाही असे काही नाही, या बसा. मग आम्ही बसलो. वर मोकळे आकाश, वरून छान दिसणारे नाशिक-सिटी-लाइट्स. गुलाबी थंडी. आणि आम्ही चौघंच. मी, बायको, दोन्ही मुलं. बाकी कोणी कस्टमर आले नव्हते. मी कॅप्टनला विचारले, काय रे बाबा, कुणी येते की नाय इकडे खायला. तो म्हणाला साहेब सोमवारी कोण येणार या वेळेला जरा उशिराने येतील लोक. मग ताटात एक एक जबरदस्त वेज-नॉनवेज नमुना यायला सुर्वात झाली. पोट भरेस्तोवर. वेटर आणून अदबीने वाढत होते. मग बुफे झाला. त्यानंतर स्वीट्स टेबलवर सर्व झाले तेही अनलिमिटेड. आइस्क्रिम, मुगाचा हलवा, गुलाबजाम. सगळे जेवण निव्वळ अप्रतिम. मागे बर्‍याच मोठमोठ्या हॉटेल्समधे महागड्या डिशेसच्या नावाखाली गचाळ खाणं खायला लागल्याने आम्ही हॉटेल्स टाळणेच सुरु केले होते. बारबेक्यू नेशन नेहमीचे म्हणून आज ट्राय करायचे ठरवले पण त्याहीपेक्षा हे सरप्राईज मस्तच वाटले. बारबेक्यूपेक्षा कैक पटीने चांगले जेवण होते. संपूर्ण डीनर बाकी कोण कस्टमर आलेच नाही. सगळा क्रू आमच्यासाठी खास बुक केल्यासारखा हजर होता. ते दोन तास अविस्मरणीय राहतील. कारण असे कधी ठरवून घडवून आणायचे तर बरेच पैसे मोजावे लागतील. त्यादिवशी किती लागले? फक्त ५४९ रुपये प्रतिमाणशी. त्यात दोन्ही मुले फ्री.. ते जास्त आवडले. हॉटेल बघता टिपसह ११५० रुपये काहीच नाही. त्यादिवशी हॉटेलचे 'एकासोबत-एक-मोफत' कुपन सोबत नव्हते ही एकमेव (मध्यमवर्गीय) बोच. घरी येतांना दोन मगई मसाला घेतले. ती अचानक ठरलेली डिनर नाइट इतक्या कमी पैशात इतकी जबरदस्त झाली की बस... --वेगळा धागा काढायचा नव्हता पण अनुभव टंकायचा होता----
  • Log in or register to post comments

संक्षी, डॉ. खरे, विठा, डांगे

रेवती
Wed, 01/20/2016 - 01:42 नवीन
संक्षी, डॉ. खरे, विठा, डांगे यांचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments

क्षीरसागर साहेब

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 01/20/2016 - 13:29 नवीन
इथे एकदाच गेलोय, व्हेज खाणार्‍यांसाठि फार काहि पर्याय नाहियेत आणि मांस जळण्याच्या वासाने त्रास हि झालाय.
  • Log in or register to post comments

पुण्यात गेला असाल तर कुठल्या

स्रुजा
Wed, 01/20/2016 - 18:17 नवीन
पुण्यात गेला असाल तर कुठल्या बाने मध्ये जाता त्यावर पण हा फरक पडतो. डेक्कन च्या बाने मध्ये सयाजीवाल्या बाने पेक्षा जास्त पर्याय आहेत. तुम्ही त्यांना सांगु देखील शकता काही भाज्या नसतील तर. डेक्कन वाले तत्परतेने तुमच्यासाठी का होईना देतात आणुन. नगर रोड वर देखील पर्याय बरेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

हम्म.डेक्कन नदीच्या अलीकडच्या

अजया
Wed, 01/20/2016 - 18:40 नवीन
हम्म.डेक्कन नदीच्या अलीकडच्या पुण्यातले!बाने पण तो सवतासुभा पाळून आहेत म्हणजे ;)
  • Log in or register to post comments

पुण्यात डेक्कन नदी आहे ही नवी

रेवती
Wed, 01/20/2016 - 18:42 नवीन
पुण्यात डेक्कन नदी आहे ही नवी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

एक काॅमा काय राह्यला आलीच

अजया
Wed, 01/20/2016 - 19:00 नवीन
एक काॅमा काय राह्यला आलीच पुणेकरीण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लोल

स्रुजा
Wed, 01/20/2016 - 19:01 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

द्विशतकाबद्दल धागाकर्त्याचा

अजया
Wed, 01/20/2016 - 19:09 नवीन
द्विशतकाबद्दल धागाकर्त्याचा हेवनातल्या अप्सरांकडून पुस्प्गुच आणि बानेचं मेनुकार्ड देऊन सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आज बाने मधे १० वर्षापुर्वीचा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/20/2016 - 18:44 नवीन
आज बाने मधे १० वर्षापुर्वीचा दर का काहीतरी स्कीम चालु होती म्हणे. १०व्या अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त.
  • Log in or register to post comments

हो. ४५० रूपये.

प्रचेतस
Wed, 01/20/2016 - 18:45 नवीन
हो. ४५० रूपये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

१० वर्षांपुर्वी लैचं हुच्चं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/20/2016 - 18:53 नवीन
१० वर्षांपुर्वी लैचं हुच्चं आणि महाग होतं की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

५५० +tax

कपिलमुनी
गुरुवार, 01/21/2016 - 21:22 नवीन
असा दर होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

२०० झाले? वा. सत्कार.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/20/2016 - 19:13 नवीन
२०० झाले? वा. सत्कार.
  • Log in or register to post comments

हेलाकाकांना बोलवा. आणखी २००

आदूबाळ
Wed, 01/20/2016 - 19:33 नवीन
हेलाकाकांना बोलवा. आणखी २०० होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

विषय काय ठेवावा? कोळसा फुंकुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/20/2016 - 19:40 नवीन
विषय काय ठेवावा? कोळसा फुंकुन देशाचं भलं होणारे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कोळसा फुंकणे देशाच्या

यशोधरा
Wed, 01/20/2016 - 19:54 नवीन
कोळसा फुंकणे देशाच्या संस्कृतीत बसते का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हम हाजीर हुये

हेमंत लाटकर
Wed, 01/20/2016 - 21:50 नवीन
बायको बरोबर निवांत बोलण्यासाठी व खुष करण्यासाठी मानसी ₹ 750 जास्तच आहे. त्यापेक्षा लाँग डाईव्ह करत लोणावळ्याला पावसात भिजत कांदे भजी व गरमागरम चहा घेतल्यास मिळणारा आनंद जास्त स्वर्गीय असेल.
  • Log in or register to post comments

कोण मानसी?

आदूबाळ
Wed, 01/20/2016 - 21:56 नवीन
कोण मानसी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

लोल =))

अजया
Wed, 01/20/2016 - 22:19 नवीन
लोल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सहमत आहे

गामा पैलवान
Wed, 01/20/2016 - 22:07 नवीन
हेला, लोणावळ्याचं एक बरंय. ते म्हणजे जर स्वर्गीय आनंद मिळाला नाही तर प्रत्यक्ष स्वर्गात जाऊन आनंदाचा अनुभव घेण्यासाठी वाट सुधरण्यास असंख्य दरीखोरी तिथे सहज उपलब्ध आहेत. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

बायको असताना मानसीपण? शोभत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/20/2016 - 23:07 नवीन
बायको असताना मानसीपण? शोभत नाही भारतीय संस्कृतीला. लग्नं नं टिकायच्या कारणांमधलं हे एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

७५० रुपयात तुम्हाला "मानसी"

प्रसाद१९७१
Fri, 01/22/2016 - 16:15 नवीन
७५० रुपयात तुम्हाला "मानसी" मिळतीय आणि तरी तुम्हाला ती महाग वाटतीय हेलाकाका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हेला काका कुठे गायबले ?

ईश्वरसर्वसाक्षी
Fri, 01/22/2016 - 16:19 नवीन
कि नेक्श्ट अणु हल्ल्याचि तयारि करताहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

विठा म्हणतात 'तो'आत्मानंद

मितभाषी
Wed, 01/20/2016 - 23:03 नवीन
विठा म्हणतात 'तो'आत्मानंद स्थळकाळ विरहित चिरस्थायी असताना, मग बाह्यपरिस्थिती, व्यक्ती याची गरज काय?
  • Log in or register to post comments

बैलाच्या डोळ्याच्या

संदीप डांगे
Wed, 01/20/2016 - 23:18 नवीन
बैलाच्या डोळ्याच्या बुबुळाच्या अगदी सेंटरच्या मध्यावरच! दाण्ण्ण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

इतका वेळ बारबेक्यु नेशन चा

उगा काहितरीच
Wed, 01/20/2016 - 23:31 नवीन
इतका वेळ बारबेक्यु नेशन चा धागा चघळल्या गेल्याबद्दल सदर हॉटेल चालकाने मिपाकरांना खास सवलत दिली पाहिजे . किंबहुना एखादा मोठ्ठा कट्टा स्पॉन्सर तरी केला पाहिजे .
  • Log in or register to post comments

प्रिय व्यक्ति सोबतचा आनंद

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/21/2016 - 12:59 नवीन
प्रिय व्यक्ति सोबतचा आनंद वगैरे ठिक आहे.. प्रेम असेल तर घरात दोडक्याची भाजी आणि सकाळची थंड पोळी खाताना सुद्धा तो मिळु शकतो.. पण BBQ खरंच अतिमहाग आहे. शाकाहारी लोकांसाठी तर अतिच. मुळात माझ्या कष्टाच्या पैशातुन मी अजिबात वर्थ नसलेले पदार्थ का खावेत? तेच तेच स्टार्टर्स.. आणि मुख्य जेवणही अगदीच सुमार. ह्या लोकांना त्याचा सगळा फोकस केवळ पहिल्या कोर्सवर दिलाय. मग पुढे सुप, भाज्या, रोट्या किंवा अजुन जे काही असेल तर अगदीच सामान्य असतं. मी अगदी आनंदाच्या डोहात जरी असले तरी चार भाज्या बार्बेक्यु करुन खायला १०००/- मी मोजु शकत नाही..
  • Log in or register to post comments

लहान लहान गोष्टीतूनही आनंद

हेमंत लाटकर
गुरुवार, 01/21/2016 - 13:19 नवीन
लहान लहान गोष्टीतूनही आनंद मिळू शकतो, त्यासाठी इतक्या महाग BBQ मध्ये जाऊन कष्टाचा पैसा उधळणे बरोबर नाही. आजचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने बचतीला जास्तीत जास्त प्राधान्य दिले पाहिजे.
  • Log in or register to post comments

लोल हेलाकाका. एक धागा काढूनच

आदूबाळ
गुरुवार, 01/21/2016 - 15:32 नवीन
लोल हेलाकाका. एक धागा काढूनच टाका. "हॉटेलांवर पैसे उधळण्याची प्रवृत्ती आणि समाजहित". आकडेवारी मी पुरवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

तुस वशाडी येऊ आदूबाळा!!! :D

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/21/2016 - 15:49 नवीन
तुस वशाडी येऊ आदूबाळा!!! :D :D (कृपया हलके घेणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 17:14 नवीन
हेला काका (लै वेळची संधी शोधत होतो हेला लिहायची) मुद्दा 'बिंदुगामी' (शब्दसौजन्य यनावाला) आहे. सातशे रुपये उधळणे खुपच आहे. एखाद्या देवासाठी पाच पन्नास रुपयांचं नारळ घेऊन ते फोडुन त्यातलं तीर्थ म्हणुन प्राशन करण्यातला आनंद सोबत खोबरंही प्रसाद म्हणुन खातांना कसला भन्नाट आनंद मिळतो. बार बे क्यु मधे हा आनंद मिळणार नाही. संक्रातीला एखाद्या आजीला नमस्कार केल्यानंतर अचानक त्यांनी मस्त तीळगुळाच्या पापड्यां हातात ठेवल्यावर त्या पापड्या खातांनाचा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. सच्याचा पुढे येऊन फटकावलेला चेंडु जेव्हा सिमारेषेबाहेर जातो त्याचा मिळणारा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. दहा रुपयांच्या रस्त्यावरच्या गाडीवरील पाणी पुरीचा आनंद बार बे क्यु मधे नाही. मैत्रीणीने मस्त डाळिंब, काकडी आणि मस्त फोडणी देऊन आणलेल्या कोशींबिरीचा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. पाचशे रुपयांचा आवडता फसक्लास फुल बाह्यांचा टीशर्ट अंगावर घातल्यानंतर स्वतःकडे पाहात होणार्‍या आनंदाची तुलना बार बे क्यु मधल्या जेवणाला नाही. दीडशे रुपयातली मस्त थाळीतले मेनु पाहुन भरपेट जेवण झाल्यानंतरचा आस्वाद कदाचित बार बे क्यु नेशन मधे नसेल. आनंदाच्या एक नाही हजारो जागा आहेत म्हणुन बार मे क्यु मधे जेवून तृप्त झालेल्याच्या आनंदाची तुलना उगाच याच्या त्याच्याशी करण्यात आणि खुप महागडं आहे असं म्हणन्यात काय मतलब आहे. बार बे क्यु नेशन मधे जेवणार्‍याला ते व्हर्जन आनंदायी वाटत असेल, आणि तो आनंद समजून घेता येत नसेल तर त्या आनंदाची चिरफाड कशाला काय म्हणता. शेर अर्ज है. अभी कदम रखाही था मयखाने मे की आवाज आयी चला जा वापस क्युकी तुझे शराब की नही किसीके दीदार की जरुरत है. -दिलीप बिरुटे (टाईमपासचा मुड असलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

झकास प्रतिसाद !

मालोजीराव
गुरुवार, 01/21/2016 - 17:22 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही अजुनही "हेला" चा अर्थ

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/21/2016 - 17:36 नवीन
तुम्ही अजुनही "हेला" चा अर्थ विस्कटुन सांगितला नाहीत. आम्हालाही "हेला" लिहीताना मजा घेऊ द्या की!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिरफाड कशाला काय म्हणता.

हेमंत लाटकर
गुरुवार, 01/21/2016 - 17:55 नवीन
चिरफाड कशाला काय म्हणता. दिबि, मी तुलना किंवा चिरफाड करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वत:च्या खिशाला चाट न पडता

हेमंत लाटकर
गुरुवार, 01/21/2016 - 18:16 नवीन
स्वत:च्या खिशाला चाट न पडता मित्रांनी दिलेल्या पार्टी मध्ये मिळालेले जेवण तृप्त करणारेच असते.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 18:21 नवीन
अरे, देवा... हेही खरं आहे. पण मित्रांनी मला पैसे मागितले असते तरी मला तितकाच आनंद मिळाला असता काका. तुमची शप्पथ ना काका. लो यु ना काका. आता प्लीज नका ना टाकू गडे उपप्रतिसाद. आपले प्रश्न संपणार नैत हे मला माहिती आहे ना काका. -दिलीप बिरुटे (हेलाकाकाचा पुतण्या) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/21/2016 - 18:44 नवीन
रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं मार्क कापता असं लक्षात आलेलं आहे. हेलाकाकांचे कधी कापणार तुम्ही मार्कं? =)) -जॅक स्पॅरो- (हेलाकाकांचा लाडका पुतण्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लो यु ना काका.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/21/2016 - 22:44 नवीन
लो यु ना काका. हे पाहिलं नाही काय ? त्यात पुतण्या समाविष्ट नाही... त्यासाठी वेगळा आकार पडेल की काय याची विचारणा करून पहा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(हेलाकाकांचा लाडका पुतण्या)

हेमंत लाटकर
Fri, 01/22/2016 - 16:45 नवीन
(हेलाकाकांचा लाडका पुतण्या) मी देशस्थ तुम्ही कोकणस्थ जमणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे देवा, परमेश्वरा, करुणाकरा..

नीलमोहर
गुरुवार, 01/21/2016 - 20:35 नवीन
' लो यु ना काका ' - आदी काळापासून चालत आलेले 'काका पुतण्या' प्रेम इथेही उतू चाललेले पाहून .. काय ते.. डोळे.. मन.. भरून.. वगैरे .. वगैरे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बार-बे-क्यू ?

खेडूत
गुरुवार, 01/21/2016 - 22:24 नवीन
बार-बे-क्यू ? क्यूं-बे-बार बार????????
  • Log in or register to post comments

दोनशे (प्रकाशित आणि कैक

आदूबाळ
Fri, 01/22/2016 - 00:09 नवीन
दोनशे (प्रकाशित आणि कैक हेवनवासी) प्रतिसादांनंतर पीएस्पीओ प्रश्नः Barbeque या शब्दाची फोड बार-बे-क्यू अशी का केली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

बार आवडतो

पैसा
Fri, 01/22/2016 - 12:48 नवीन
बार आवडतो त्या लोकांच्या सोयीसाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आकडा लावायचाय का?

यशोधरा
Fri, 01/22/2016 - 12:56 नवीन
आकडा लावायचाय का?
  • Log in or register to post comments

नको

पैसा
Fri, 01/22/2016 - 12:59 नवीन
फार ओढाताण होईल. आधीच ५०० पार २/३ धागे आहेत बोर्डावर. हे म्हणजे पाल ताणून डायनॉसोर करण्यासारखे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तोच तर धागाविषय आहे!

कवितानागेश
Sat, 01/23/2016 - 13:37 नवीन
तोच तर धागाविषय आहे! बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध बोंबलणारे डु आयडी घेतात तेंव्हा फार आनंद होतो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध

अजया
Sat, 01/23/2016 - 17:50 नवीन
बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध बोंबलणारे डु आयडी घेतात तेंव्हा फार आनंद होतो! ;)
हो गं हो माऊ! अगदी बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सारे हॉटेल एक बार, बार्बेक्यू

सतिश गावडे
Fri, 01/22/2016 - 20:34 नवीन
सारे हॉटेल एक बार, बार्बेक्यू बार बार !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा