Skip to main content

बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 15/12/2014 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते. तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात : . त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन. त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं! तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू. मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!). साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला. वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स. (तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!) (केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 52836
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

आज बाने मधे १० वर्षापुर्वीचा दर का काहीतरी स्कीम चालु होती म्हणे. १०व्या अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त.

बायको बरोबर निवांत बोलण्यासाठी व खुष करण्यासाठी मानसी ₹ 750 जास्तच आहे. त्यापेक्षा लाँग डाईव्ह करत लोणावळ्याला पावसात भिजत कांदे भजी व गरमागरम चहा घेतल्यास मिळणारा आनंद जास्त स्वर्गीय असेल.

In reply to by हेमंत लाटकर

हेला, लोणावळ्याचं एक बरंय. ते म्हणजे जर स्वर्गीय आनंद मिळाला नाही तर प्रत्यक्ष स्वर्गात जाऊन आनंदाचा अनुभव घेण्यासाठी वाट सुधरण्यास असंख्य दरीखोरी तिथे सहज उपलब्ध आहेत. ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by हेमंत लाटकर

बायको असताना मानसीपण? शोभत नाही भारतीय संस्कृतीला. लग्नं नं टिकायच्या कारणांमधलं हे एक.

विठा म्हणतात 'तो'आत्मानंद स्थळकाळ विरहित चिरस्थायी असताना, मग बाह्यपरिस्थिती, व्यक्ती याची गरज काय?

इतका वेळ बारबेक्यु नेशन चा धागा चघळल्या गेल्याबद्दल सदर हॉटेल चालकाने मिपाकरांना खास सवलत दिली पाहिजे . किंबहुना एखादा मोठ्ठा कट्टा स्पॉन्सर तरी केला पाहिजे .

प्रिय व्यक्ति सोबतचा आनंद वगैरे ठिक आहे.. प्रेम असेल तर घरात दोडक्याची भाजी आणि सकाळची थंड पोळी खाताना सुद्धा तो मिळु शकतो.. पण BBQ खरंच अतिमहाग आहे. शाकाहारी लोकांसाठी तर अतिच. मुळात माझ्या कष्टाच्या पैशातुन मी अजिबात वर्थ नसलेले पदार्थ का खावेत? तेच तेच स्टार्टर्स.. आणि मुख्य जेवणही अगदीच सुमार. ह्या लोकांना त्याचा सगळा फोकस केवळ पहिल्या कोर्सवर दिलाय. मग पुढे सुप, भाज्या, रोट्या किंवा अजुन जे काही असेल तर अगदीच सामान्य असतं. मी अगदी आनंदाच्या डोहात जरी असले तरी चार भाज्या बार्बेक्यु करुन खायला १०००/- मी मोजु शकत नाही..

लहान लहान गोष्टीतूनही आनंद मिळू शकतो, त्यासाठी इतक्या महाग BBQ मध्ये जाऊन कष्टाचा पैसा उधळणे बरोबर नाही. आजचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने बचतीला जास्तीत जास्त प्राधान्य दिले पाहिजे.

In reply to by हेमंत लाटकर

लोल हेलाकाका. एक धागा काढूनच टाका. "हॉटेलांवर पैसे उधळण्याची प्रवृत्ती आणि समाजहित". आकडेवारी मी पुरवतो.

In reply to by हेमंत लाटकर

हेला काका (लै वेळची संधी शोधत होतो हेला लिहायची) मुद्दा 'बिंदुगामी' (शब्दसौजन्य यनावाला) आहे. सातशे रुपये उधळणे खुपच आहे. एखाद्या देवासाठी पाच पन्नास रुपयांचं नारळ घेऊन ते फोडुन त्यातलं तीर्थ म्हणुन प्राशन करण्यातला आनंद सोबत खोबरंही प्रसाद म्हणुन खातांना कसला भन्नाट आनंद मिळतो. बार बे क्यु मधे हा आनंद मिळणार नाही. संक्रातीला एखाद्या आजीला नमस्कार केल्यानंतर अचानक त्यांनी मस्त तीळगुळाच्या पापड्यां हातात ठेवल्यावर त्या पापड्या खातांनाचा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. सच्याचा पुढे येऊन फटकावलेला चेंडु जेव्हा सिमारेषेबाहेर जातो त्याचा मिळणारा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. दहा रुपयांच्या रस्त्यावरच्या गाडीवरील पाणी पुरीचा आनंद बार बे क्यु मधे नाही. मैत्रीणीने मस्त डाळिंब, काकडी आणि मस्त फोडणी देऊन आणलेल्या कोशींबिरीचा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. पाचशे रुपयांचा आवडता फसक्लास फुल बाह्यांचा टीशर्ट अंगावर घातल्यानंतर स्वतःकडे पाहात होणार्‍या आनंदाची तुलना बार बे क्यु मधल्या जेवणाला नाही. दीडशे रुपयातली मस्त थाळीतले मेनु पाहुन भरपेट जेवण झाल्यानंतरचा आस्वाद कदाचित बार बे क्यु नेशन मधे नसेल. आनंदाच्या एक नाही हजारो जागा आहेत म्हणुन बार मे क्यु मधे जेवून तृप्त झालेल्याच्या आनंदाची तुलना उगाच याच्या त्याच्याशी करण्यात आणि खुप महागडं आहे असं म्हणन्यात काय मतलब आहे. बार बे क्यु नेशन मधे जेवणार्‍याला ते व्हर्जन आनंदायी वाटत असेल, आणि तो आनंद समजून घेता येत नसेल तर त्या आनंदाची चिरफाड कशाला काय म्हणता. शेर अर्ज है. अभी कदम रखाही था मयखाने मे की आवाज आयी चला जा वापस क्युकी तुझे शराब की नही किसीके दीदार की जरुरत है. -दिलीप बिरुटे (टाईमपासचा मुड असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही अजुनही "हेला" चा अर्थ विस्कटुन सांगितला नाहीत. आम्हालाही "हेला" लिहीताना मजा घेऊ द्या की!!!

स्वत:च्या खिशाला चाट न पडता मित्रांनी दिलेल्या पार्टी मध्ये मिळालेले जेवण तृप्त करणारेच असते.

In reply to by हेमंत लाटकर

अरे, देवा... हेही खरं आहे. पण मित्रांनी मला पैसे मागितले असते तरी मला तितकाच आनंद मिळाला असता काका. तुमची शप्पथ ना काका. लो यु ना काका. आता प्लीज नका ना टाकू गडे उपप्रतिसाद. आपले प्रश्न संपणार नैत हे मला माहिती आहे ना काका. -दिलीप बिरुटे (हेलाकाकाचा पुतण्या) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं मार्क कापता असं लक्षात आलेलं आहे. हेलाकाकांचे कधी कापणार तुम्ही मार्कं? =)) -जॅक स्पॅरो- (हेलाकाकांचा लाडका पुतण्या)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लो यु ना काका. हे पाहिलं नाही काय ? त्यात पुतण्या समाविष्ट नाही... त्यासाठी वेगळा आकार पडेल की काय याची विचारणा करून पहा ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

' लो यु ना काका ' - आदी काळापासून चालत आलेले 'काका पुतण्या' प्रेम इथेही उतू चाललेले पाहून .. काय ते.. डोळे.. मन.. भरून.. वगैरे .. वगैरे ..

In reply to by खेडूत

दोनशे (प्रकाशित आणि कैक हेवनवासी) प्रतिसादांनंतर पीएस्पीओ प्रश्नः Barbeque या शब्दाची फोड बार-बे-क्यू अशी का केली आहे?

In reply to by यशोधरा

फार ओढाताण होईल. आधीच ५०० पार २/३ धागे आहेत बोर्डावर. हे म्हणजे पाल ताणून डायनॉसोर करण्यासारखे होईल.

In reply to by पैसा

तोच तर धागाविषय आहे! बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध बोंबलणारे डु आयडी घेतात तेंव्हा फार आनंद होतो! ;)

In reply to by कवितानागेश

बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध बोंबलणारे डु आयडी घेतात तेंव्हा फार आनंद होतो! ;)
हो गं हो माऊ! अगदी बाडिस.

In reply to by सतिश गावडे

बरेचं दिवसांत वेगळी कथा ऐकली नाही आणि मिपावर सद्ध्या विंट्रेस्टिंग काही येत नाहिये. त्यामुळे सांगु शकतोय्स =)) लागलं नाही ना रे बाबा? टी.टी घेउन टाक घेतलं नसशील तर.

In reply to by सतिश गावडे

वाट पहातो आहोत. तेव्हढीच रक्षण-भक्षण धाग्यात थोडा विरंगुळा (याचा पुणे सातारा रस्ता येथील विरंगुळा या महागड्या हाटेलाशी काहीही संबध नाही आणी जोडू नये). नम्र वाचक नाखु