Skip to main content

तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 03/01/2016 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत! आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता. बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल! आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो. आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी: आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥ होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥ तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥ याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली. आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील. नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत? बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या! आपलाच: deadp

वाचने 19573
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

आमच्या काँग्रेसच्या काळात असं व्हायचं तेंव्हा जनता किती टीका करायची. आता सगळे लबाड संघिष्ट तोंड मिटून बसलेत.

डेडपूल, प्रथमतः डिप्लोमेसी ही काँग्रेस काळात वेगळी अन आता वेगळी आहे हा समज काढून टाका ती एकच लाइन वर आहे अगदी लुक ईस्ट पॉलिसी किंवा आत्ता ची एक्ट ईस्ट पॉलिसी ही विदेशनिती जी ९१ मधे तयार झाली त्याचा एक सबसेट आहे तसेच उदारीकरण अन सब्सिडी कमी करत जाणे हे सुद्धा १९९१ च्या "रावसिंह परिमाणावर(च)" आधारित आहे त्याला माननीय अटलजी ह्यांनी किंवा आत्ता श्रीयुत मोदी ह्यांनी सुद्धा ढलका लावलेला नाही , फ़क्त काँग्रेस काळात ही परिमाणे पाऊल पाऊल realize केली जात होती अन काळाची गरज म्हणुन आत्ताचे सरकार त्या दिशेने धावत आहे इतकेच, उरतो पठानकोट हल्ल्याचा प्रश्न तर गृहमंत्री राजनाथ सिंह ह्यांचे निषेधाचे स्टेटमेंट ऐकल्यास त्यांनी पुर्ण दोष हा "पाकिस्तानी सैन्य" अन आयएसआयला दिलाय, थोडक्यात पाकिस्तानी राज्यकर्त्यांस आर्मी खिजगणतीतही मोजत नाही हे फॅक्ट परत एकदा पुढे आले आहे अन हा हल्ला किंवा मज़ार ए शरीफ मधील वकिलाती वर केलेला गोळीबार हा फ़क्त आपले भारत विरोधवार पोसलेले अस्तित्व दाखवून द्यायचा पाकिस्तान आर्मी अन आयएसआय चा एक डेस्परेट प्रयत्न वाटतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दुसरा परिच्छेद पूर्ण पटला. पहिला परिच्छेदही पटला मात्र काळाची गरज म्हणूनच केवळ सरकार धावतेय हे पटले नाही. असो. मूळ धाग्याचा विषय दुसर्‍या परिच्छेदात आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

+१००

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्हालेच ना बापा... तुमचा परतीसाद मंजे बंदुकीच्या गोयाच हायेत निरा... सुसाट आन् निशान्यावरच!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गृहमंत्री राजनाथ सिंह ह्यांचे निषेधाचे स्टेटमेंट ऐकल्यास त्यांनी पुर्ण दोष हा "पाकिस्तानी सैन्य" अन आयएसआयला दिलाय,>>>>>>>> बापू मग हाही दुट्प्पीपणाच झाला!

हे आणखी एक वाचा - जागता पहारा Friday, January 1, 2016 पठाणकोट हल्ल्याची पार्श्वभूमी आज पहाटे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जिहादी अतिरेक्यांनी हल्ला केला. पाचपैकी चार हल्लेखोर ठार झाले व त्या कारवाईत दोन भारतीय सैनिकही शहीद झाले. एक घातपाती जखमी अवस्थेत सापडला. असा हल्ला झाला, मग तात्काळ सुरक्षा वा गुप्तचरांच्या कामात ढिलाई झाल्याचा सरसकट आरोप सुरू होतो. आजही तसेच झाले तर नवल नाही. कारण जीभ उचलून टाळ्याला वा ओढांना लावली, मग विविध शब्द उच्चारले जात असतात. पण त्याचे नेमके अर्थ बोलणार्‍याला कळतातच असे नसते. मग अशा दिवट्यांना सुरक्षा वा गोपनीयता कशासाठी असते वा तिला कुठून कसा धोका असतो, त्याची अक्कल असायचे काही कारण नसते. पठाणकोट हल्ल्याच्या ज्या बातम्या ब्रेकिंग न्युज म्हणून झळकत होत्या, त्यात सातत्याने टेक्निकल क्षेत्राला धक्का लागलेला नाही, असे सांगितले जात होते. परंतु हे टेक्निकल क्षेत्र म्हणजे काय? तर जिथे लढावू विमाने उभी वा सज्ज करून ठेवलेली असतात, असे अतिशय सुरक्षित क्षेत्र असते. हल्लेखोर त्यालाच लक्ष्य करायला आले असणार, हे वेगळे सांगायला नको. पण प्रचंड विस्तार असलेल्या या तळावर हे सुरक्षित क्षेत्र नेमके कुठे आहे, त्याची माहिती हल्लेखोरांना होती, ही खरी बातमी आहे. अन्यथा आजवर अनेक पोलिस ठाणी वा लष्करी तळावर असे हल्ले झालेले आहेत. पठाणकोटचा हल्ला नेमके लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून झालेला होता. म्हणजेच त्या हल्ल्याची योजना आखणार्‍यांपाशी हवाई तळाचा बारीकसारीक तपशील उपलब्ध होता. म्हणूनच इतका लक्ष्यवेधी हल्ला होऊ शकला. सुदैवाने ठरल्या लक्ष्यापर्यंत जिहादी पोहोचू शकले नाहीत. पण ते सुदैव होते की तशी प्रतिकारक सज्जता होती, म्हणून तो हल्ला हाणून पाडण्यात यश आले? उहापोह त्याचा व्हायला हवा किंवा करायला हवा. नुसतेच हवेत बुडबुडे उडवण्याने मनोरंजन होईल. पण साध्य काहीच होणार नाही. पठाणकोटच का? हल्लेखोरांनी हेच लक्ष्य कशाला निवडले, इथून उहापोह सुरू होतो. हल्ला करणार्‍यांना नेमकी माहिती असल्याशिवाय अशा जागी हल्ला करता येत नाही. म्हणजेच पंजाबमध्ये असलेल्या अनेक लष्करी वा हवाई तळांपैकी पठाणकोट निवडण्याचे कारण तिथली संगतवार माहिती हल्लेखोरांकडे होती. मग ती माहिती त्यांना कधी, कोणी व कशी पुरवली, ही खरी बित्तंबातमी असू शकते. पण नेमकी माहिती असूनही हल्ला फ़सला, म्हणजेच हल्ल्याची शक्यताही तितकीच गृहीत धरून सज्जता राखलेली असणार ना? तर त्याची सुरूवात दोन वर्षापुर्वी झालेली होती. सुशीलकुमार हे नाव आजच्या बातम्यांमध्ये कुठे कानी आले नाही. कोण हा सुशीलकुमार? पठाणकोटच्या याच हवाई तळावरचा एक कर्मचारी सुशीलकुमार याला तब्बल दोन वर्षापुर्वी एका महिलेने सोशल माध्यमातून गाठले. त्या माध्यमातून मैत्री करताना ही महिला त्याच्याशी खुप सलगीने बोलू लागली आणि नंतर त्याच्याकडून माहिती मिळवू लागली. याच तळावरील सायबर सेलची दक्षता सज्ज होती म्हणून सुशीलकुमार व त्या महिलेच्या सोशल माध्यमातील देवाणघेवाणीवर पाळत ठेवली गेली. तो परस्पर या मैत्रिणीला तळावरची गोपनीय माहिती देत असल्याचे उघडकीस आल्यावर स्थानिक पोलिसांना कल्पना देवून सुशीलकुमारला अटक करण्यात आली. कालपरवा असाच एक हवाई दल कर्मचारी रणजित याला अटक झाली होती. त्याला संरक्षण विषयक एका मासिकाची संपादिका म्हणून ब्रिटीश महिलेने आपल्या जाळ्यात ओढले होते. सुशीलकुमारला असेच जाळ्यात ओढून माहिती काढली जात होती. या सुशीलकुमारने तिला पठाणकोट तळाची महत्वपुर्ण माहिती दिली होती. त्यानंतरच त्याला आत्काळ अटक करण्यात आलेली होती. जुलै २०१४ मध्ये त्याला पकडले आणि आज इतक्या महिन्यांनी तिथेच हल्ला झाला. कुठल्याही लष्करी वा हवाई तळावर महत्वाच्या जागा गोपनीय असतात. आधुनिक काळात असे तळ हे एकप्रकारचे किल्लेच असतात. त्या किल्ल्यातल्या अतिशय मोक्याच्या जागा म्हणजे बालेकिल्ला असतो. तशा जागांवर हल्ला केला, मग त्या तळाची भेदकता व सुरक्षा संपुष्टात येत असते. म्हणूनच अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न शत्रू करतो. सुशीलकुमार वा रणजित या हवाई दल कर्मचार्‍यांकडून नेमकी तशीच माहिती मिळवण्याचे प्रयत्न झाले होते. त्यापैकी कुठली माहिती दिली गेली त्याचीही कल्पना भारतीय यंत्रणांना होती. म्हणून अशा जागी हल्ला होण्याची शक्यता गृहित धरलेली असते. किंबहूना दिली गेलेली माहिती वापरली जाऊ नये, म्हणून असलेल्या रचना व सज्जता यात निर्णायक फ़ेरबदल केले जात असतात. बाकी हल्ला टाळणे आपल्या हाती नसते. कारण हल्ल्याची वेळ व जागा शत्रू ठरवित असतो. पण त्यात कुठलेही मोठे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे आपल्या हाती असते. इथेही नेमकी तीच सज्जता असल्याचे दिसून आलेले आहे. आकस्मिक हल्ला करूनही पाचपैकी एकही हल्लेखोर महत्वाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही, किंवा कुठलेही मोठे नुकसान यात होऊ शकले नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. याला गुप्तचर खात्याचे अपयश म्हणता येणार नाही. तर पुरेपुर सज्जता म्हणता येणार नाही. दोन दिवस आधी गुरदासपूर येथील पोलिस अधिकार्‍याचे अपहरण करण्याचे नाट्य रंगलेले होते. अशा काही किरकोळ घटना गेले काही दिवस सातत्याने घडत आहेत आणि त्याची तुलना मोदींच्या लाहोर भेटीशी करता येणार नाही. मुत्सद्देगिरी आणि गुप्तचरांनी परस्परांना शह देण्याच्या कारवाया यात सांगड घालणे अशक्य कोटीतली गोष्ट असते. मात्र ज्या गतीने पठाणकोटचा हल्ला झालेला आहे, त्यातून पाक गुप्तचरांच्या हवालदिल होण्याचे संकेत नक्की मिळतात. सुशीलकुमार वा रणजितला पकडल्यामुळे त्यांना माहिती देणारे नेटवर्क उध्वस्त होत असते. पण त्याच कालखंडात पाकिस्त्तानात अकस्मात भारताच्या पंतप्रधानांनी भेट देण्याची घटना निर्णायक काटशह आहे. पाकचे सेनाप्रमुखच नव्हेत तर गुप्तचर खातेही मोदींच्या लाहोर भेटीविषयी गाफ़ील राहिले. किंबहूना आपल्याला संपुर्ण गाफ़ील ठेवून नवाज शरीफ़ यांनी मोदींना पाकिस्तानात येऊ देतात, याचा पाक गुप्तचर व सेनादलाला धक्का बसलेला आहे. ते नुसते पंतप्रधान मोदींचे धाडस नाही किंवा भारत-पाक संबंधातील महत्वाचे पाऊल नव्हे. भारतीय मुत्सद्देगिरीने आणि गुप्तचर खात्याने पाक सुरक्षा व्यवस्थेला व घातपाती डावपेचांना दिलेला मोठा शह आहे. त्यानंतर पाक गुप्तचर वा भारतद्वेषी सेनाधिकारी मंडळींनी निमूट पराभव मान्य करण्याची अपेक्षा कोणी बाळगू शकत नाही. आजही आपण भारताला शत्रूच मानतो आणि शरीफ़शी दोस्ती केल्याने घातपात थांबणार नाहीत, असे कोणी शब्दात सांगणार नाही. किंबहूना पंतप्रधान शरीफ़ म्हणजे पाकिस्तान नव्हे. त्यांच्याशी संगनमत केल्याने पाकिस्तान निमूट बसेल अशा समजूतीत राहू नका, असे सांगण्याचा हा मार्ग आहे. पाकिस्तान शरीफ़ चालवत नाहीत तर तिथली सेना व गुप्तचर विभाग यांची हुकूमत चालते, हा पठाणकोट हल्यातला खरा संदेश आहे. हा सावल्यांचा खेळ समजून घेता आला तर अकस्मात मोदी लाहोरला कशाला गेले आणि त्यातून काय साधले गेले, त्याला अर्थ लागू शकेल. पण तेवढे करायला आजच्या ब्रेकिंगन्युज पत्रकारितेला वेळ वा संयम आहेच कुठे? ज्यांना मोदींचे धाडस वा त्यातून साधलेला डावपेच समजू शकत नाही, त्यांना पठाणकोट हल्ल्याचे रहस्य कधीच उलगडू शकत नाही. दोन देशात कुठला डाव वा जीवघेणा खेळ चालू आहे, त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही. त्याच्या खोलात गेले तर पठाणकोटचा हल्ला किरकोळ असल्याचे लक्षात येईल. नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही. (अपुर्ण) - भाऊ तोरसेकर

In reply to by बोका-ए-आझम

भाऊ तोरसेकर ह्यांच्याविषयी तितकेसे चांगले मत नाही बोक्या भाऊ माझे तरी, त्यात त्यांना ही शिवसेना शैली सुट करत नाही ओढूनताणुन आवेश जाणवतो लिखाणात , तरीही ह्यावेळी काही मुद्दे अन गाभ्यातला थोडा भाग पटला असे मी म्हणतच होतो तोवर मी
त्याच्या खोलात गेले तर पठाणकोटचा हल्ला किरकोळ असल्याचे लक्षात येईल. नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही.
अन सपशेलच नावड़ते झाले ! विशेष महत्व नाही म्हणता म्हणता ८ माणसे गेली राव आपली, सरकार ची कातड़ी बचावण्याचा केविलवाणा प्रयत्न होऊन गेले पुर्ण लिखाण (माझ्यालेखी तरी) अजुन किती माणसे शहीद झाली म्हणजे हा हल्ला भाऊ तोरसेकरांना महत्वाचा वाटेल असे वाटते??

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

(अवांतर - मी ही तोरसेकरांचे लेख आवडीने वाचायचो,पण सतत एकांगी लेखन आणि कातडीबचाऊ धोरण पाहून मलाही कंटाळा आला.) . . . . पंजाब सरह्द्दीतून आतंकवादी आत घुसले हीच मोठी नामुष्की आहे. पाक सरकारचा या हल्ल्याशी संबंध नाही, तर मग पाक आर्मीवर आपण हल्ला करायला हवा. भारत सरकार आणि पाक सरकारचे संबंध चांगले राहतीलच! बाकि आपली आर्मी आणि त्यांची आर्मी युद्धाचं काय ते बघून घेतलीच?

In reply to by याॅर्कर

(अवांतर - मी ही तोरसेकरांचे लेख आवडीने वाचायचो,पण सतत एकांगी लेखन आणि कातडीबचाऊ धोरण पाहून मलाही कंटाळा आला.)
म्हणजे असे वाटणारा मी एकटा नाही तर.

In reply to by राही

त्यांचे लेखन आवडत नाही हे ठीक आणि रास्त मुद्दा! पण एखाद्याची अथवा त्याच्या लेखनाची लायकी ठरवायचा हक्क असा काय मिळतो आपल्याला? ते एक पत्रकार आहेत, अभ्यासपूर्ण लेखन असते, भले ते कोणाची तळीउचलंत असतील. अप्रत्यक्ष्रीत्या आपणही प्रत्येकजण कोणाची न् कोणाची (आपापल्या अस्मितांची) तळी उचलतच असतो ना? कोणाच्याही लेखनाची योग्यता कशी ठरवतात? - (कसलीच योग्यता नसलेला) सोकाजी टीप: मी भाऊ तोरसेकरांचा भक्त नाही किंवा नातेवाईक नाही.

In reply to by सोत्रि

आपला 'योग्यता' या शब्दाला आक्षेप आहे असे वाटले. हा शब्द त्यांच्या लेखनाचे संदर्भ देण्यासंबंधी होता. कोणत्याही मतासाठी/विधानासाठी आधार संदर्भ द्यायचा तर तो भक्कम आणि तटस्थ हवा असा संकेत आहे. ह्या निकषाला त्यांचे लेखन माझ्या मते उतरत नाही. हे सर्व माझ्या मते आहे हे पुन्हा एकदा. योग्य आणि पात्र ह्या शब्दांतला हा वाद/संदेह/अर्थभेद असावा बहुधा. कोणाचीही लायकी काढण्याचा हेतू कधीच नसतो. पण मतभिन्नता व्यक्त करताना त्याचे कारण सांगतानान काही शब्द वापरावे लागतात. हे स्तुती किंवा निदा/टीका या दोन्हीनाही लागू आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही. आशा आहे तोरसेकरांची योग्य त्या लोकांनी दखल घेतली असेल आणि त्यांना योग्य ते बक्षीस पण मिळालं असेल. कीव येते अश्या लोकांची ... अकलेचे दळभद्री ... बरंच लिहावं वाटतंय पण कोणाबद्दल वाईट चिंतायला नको, म्हणून टाळतो. पैसा माणसाकडून काय काय करवून घेतो ...

In reply to by नाव आडनाव

आशा आहे तोरसेकरांची योग्य त्या लोकांनी दखल घेतली असेल आणि त्यांना योग्य ते बक्षीस पण मिळालं असेल. कीव येते अश्या लोकांची ... अकलेचे दळभद्री ... बरंच लिहावं वाटतंय पण कोणाबद्दल वाईट चिंतायला नको, म्हणून टाळतो.
'असेल' हा तुमचा अंदाज की तुमच्याकडे तसे पुरावे आहेत?
पैसा माणसाकडून काय काय करवून घेतो
पैशाचीच दुनिया आहे ही! आणि पापी पेट का सवाल असतो म्ह्णून पैसा हवा असतो. कुणाला नको असतो?? - (पापी पेट का) सोकाजी टीप: मी भाऊ तोरसेकरांचा भक्त नाही किंवा नातेवाईक नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पण इथे त्यांनी मांडलेला जो मुद्दा आहे - पाकिस्तानी लष्कर हे civilian सरकारपेक्षा बलवान असल्याचा - तो महत्वाचा आहे. भाऊ तोरसेकरांनी मांडलेला असला म्हणून मुद्दा चुकीचा असं तर कुणाचं म्हणणं नाहीये ना? पाकिस्तानी लष्कराची परराष्ट्रनीती ही नेहमीच लोकशाही प्रक्रियेला आव्हान देणारी अशी आहे हा इतिहास आहे, regardless of तोरसेकर. मुळात हा मुद्दा इथे मांडायचं कारण तो मुद्दा स्वतःच आहे,फक्त तोरसेकरांच्या blog वरुन घेतलेला whatsapp forward आलाय म्हणून त्यांचं नाव घेतलं. असो. नवाझ शरीफ मे २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधीला येणार की नाही हे गुलदस्त्यात होतं कारण त्यांना सैन्याने परवानगी दिली नव्हती ही बातमी तर सगळ्यांनी वाचली असेल. कुठल्या देशाचा पंतप्रधान हा दुस-या देशाच्या भेटीसाठी लष्कराच्या परवानगीवर अवलंबून असतो?

In reply to by बोका-ए-आझम

गाववाले थुमी सोता स्वयंभु हाय न भाऊ! त्याहीनं लेख लेला थुमीनं एका पैराग्राफ मधे निपटवले ना! आजकाल त्याहीचे लेख खानं कमी अन सांडलवंड जास्त रायते (अस्सल वर्हाड़ी म्हण थुमी पकडली असन आत्तालोग) मुद्द्यावर बोलायचे झाल्यास, लाहोर बस सर्विस एपिसोड च्या वेळी सुद्धा शरीफ पीएम होते, नंतर कारगिल झालेच! त्यांनी शिस्तीत "मला मुशर्रफ काय करत होता माहीती नव्हते" म्हणले नंतर हे एक पाकिस्तानी व्हिसलब्लोअर म्हणाला, असे काय काय झाले त्यामुळे परत एकदा आपणाला तीच चुक करुन पहिले पाढे पंचावन करणे श्रेयस्कर नसेल असे मत पड़ते आहे म्हणुन आतातरी पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट अन पाकिस्तानी आर्मी हा फरक करणे परवडणार नाही हे माझे वैयक्तिक मत झाले आहे तुर्तास.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट अन पाकिस्तानी आर्मी हा फरक करणे परवडणार नाही हे माझे वैयक्तिक मत झाले आहे तुर्तास.
एक्झॅक्टली. पाकिस्तानी आर्मी व सरकार वेगळे आहे असे भासवत राहणे हे आपल्या भाजअपेयी माऊथपिसेसचा नाईलाज आहे. कारण ते केल्याशिवाय आपली कातडी वाचवता येत नाही. जर पाकिस्तानात आर्मीच पॉवरफुल आहे, तर तुम्ही त्यांच्या आर्मीशीच वाटाघाटी करा ना डायरेक्ट? सत्तेत यायच्या आधी हेच लोक याच पाकिस्तानी हल्ल्यांवरून सरकारवर अश्लाघ्य शब्दांत टीका करीत असत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मूळतः आर्मी आणि सरकार एकाच रचनेचे भाग असले तरी 'तिकडे' आर्मी आणि सरकारमधे काय हनिमून होत असतो आपण बघितले आहे. लाहोर बस सुरु झाली. मग कारगील घडलं. त्या नंतर शरीफ साहेबांची देशाबाहेर गच्छंती झाली. मग त्यांचंं पुनरागमन आणि सत्तेत येणं. यामधे जितकं पाणि वाहुन गेलं आणि नवीव घाट बांधले गेले त्यावरुन परत मासेमारी करावीच लागेल भारताला. एकाच आस्थापनामधले आंतरविरोधी घटक परक्या आस्थापनांतील समदु:खी/समपातळीवरील घटकांशी समन्वय साधुन काहि हातपाय हालवत असतील तर ते स्वाभावीक आहे. राहिला भाग छप्पन इंची छातीचा... तर आपल्याकडे (इतरत्र देखील) शाब्दीक बुडबुडे फोडुन हवाबाजीचं राजकारण नवीन नाहि. त्याचा व्हायचा तो फायदा/नुकसान होईलच.

पाकिस्तानला धडा शिकवा, असे म्हणणार्‍यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो. धडा शिकवायचा म्हणजे नक्की काय करायचं? १)त्यांच्यावर हल्ला करुन युद्ध करायचं ? युद्ध करायचे झाले तर ते स्वबळावर करावे लागेल. कुठलीही महासत्ता मधे पडणार नाही. पडलीच, तर ती पाकिस्तानच्या बाजूने असेल. युद्धाचे भीषण परिणाम सोसायचा दृढनिश्चय, सर्व भारतीय करतील का ? २)त्यांच्या देशांत अतिरेकी कारवाया करायच्या ? की आणखी काही ? यावर वाचायला आवडेल.

In reply to by तिमा

पाकिस्तानच्या आर्थिक नाड़या जरी आवळल्या तरी हे साध्य होउ शकेल. आत्ताच लोढ़ा कमिटिने दिलेल्या अहवालात क्रिकेटमधील बेटिंग अधिकृत करण्याची शिफारस केली आहे. अधिकृत बेटिंग यूरोपियन देशात सर्रोस चालते. या एका निर्णयामुळे सरकारला उत्पन्न तर मिळेलच वर दाउद गैंगचे एक पैसा कमवायचे साधन धोक्यात येईल. सर्वात महत्वाचे पाक कलाकाराना भारतात पूर्ण बंदी. त्याला पठानकोट हल्ल्याचे कारण देखिल दाखवता येईल. यामुळे पाक कलावन्तच पाकच्या भूमिकेचे जाहिरपणे खण्डन करतील. नो पाक अभिनेत्री , नो पाक सिंगर,

In reply to by भंकस बाबा

कश्या काय नाड्या आवळायच्या? २०१२ सालच्या आकड्यानुसार भारत-पाकिस्तान दुतर्फा व्यापार फक्त २.५ बिलिअन डॉलर्स होता. दोघांमध्ये मिळून हा आकडा फारसा मोठा नाही. म्हणजे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल एव्हढा मोठा नाही. पाक कलाकारांना आपल्याकडे अघोषित बंदी तर आहेच. इथे काम करणारे पाकिस्तानी कलाकर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. त्यातही मोठी नावे फारशी नाहीतच. क्रिकेट बेटिंग अधिकृत केल्यावर दाऊद गँगचा पैश्याचा स्रोत आटेल, पण पाकिस्तानवर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. पाकिस्तानमधला एक मोठा गट भारतीय चित्रपट बघण्याच्या विरोधात आहे. सामान्य पाक जनता जरी चोरूनमारून ते बघत असली तरी खुले आम भारतीय चित्रपट सररास दाखवले जातील याची शक्यता कट्टरपंथीयांच्या दहशतीमुळे कमी आहे. पाक दहशतवादामुळे भारताचे पुष्कळ नुकसान होत असले तरी इस्लामी दहशतवादाचा फटका सर्व जगाला बसतो आहे. प्रचंड जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होते आहे. याची मुळे जागतिक राजकारण/अर्थकारणात असून जागतिक पातळीवरच याचे उपाय शोधायला हवेत.

In reply to by मोगा

इश्शं ! आम्ही तर बाई त्या साइडचे! एकदा ठरवुन घ्या काय ते :) मोगा खान्..मोगा देशपांडे का मोगा मौसि इश्शं

In reply to by DEADPOOL

तिकडले पेपर आपण जसे आयेसायच्या नावाने बोंबा मारतो तसे ते RA&W च्या नावाने ओरडत असतात.

In reply to by तिमा

>>युद्धाचे भीषण परिणाम सोसायचा दृढनिश्चय, सर्व भारतीय करतील का ? ग्यासची सबसिडी सोडा असं मोदीसरकार म्हणाले. ते सुद्धा जन्तेला जमलं/पटलं नाही

पाकिस्तानी कलावंत भारतात भरपूर आहेत. जे पडद्यावर दिसतात ते नव्हे तर इतर देखिल. पाकिस्तानला दाऊद ला सांभाळणे गरजेचे आहे कारण तो भारताचा दुष्मनच नाही तर तेथील उद्योगधंद्याचा फायनान्सर देखिल आहे. दाउदचा करोड़ो पैसा पाकी इंडस्ट्रीत गुंतलेला आहे. उद्या जर दाउदचे आर्थिक व्यवहार आवळले तर जी सुरक्षा आज पाकिस्तान त्याला देते तशी देणार नाही.कारण खुडूक कोम्बडी कोणी जास्त वेळ पाळत नसतो. अगदी ज्याला इस्लामी जगताचा शहनशाह मानला होता तो लादेन देखिल पैसा आटल्यावर कुत्र्याच्या मौतीने मेला.

In reply to by भंकस बाबा

दाऊद हा पूर्णपणे पाकिस्तानी गुप्तहेरसंघटनेच्या ताब्यात आहे. ही संघटना त्याला वापरून घेते. उद्या दाऊद मेला तरी पाक लष्कराला फारसा फरक पडणार नाही. तसाही तो आता वृद्ध झाला असेल. कधीतरी मरणारच. त्याच्या मरणाने पाकिस्तानवर संकट कोसळेल असे नाही. इतकेच काय, त्याची गरज/उपयोग संपला की त्याचा काटाही काढला जाऊ शकतो. पण तोपर्यंत कदाचित भारतालाही त्याची गरज उरलेली नसेल. जिवंत मिळाला हातात तर फाशीं देऊन जशास तसा सूड घ्यायचा इतकेच. दाऊदचा पैसा केवळ पाकिस्तानातच आहे असे नाही. भारतात, पूर्व आशियात, पश्चिम आशियात सर्वत्र त्याची गुंतवणूक आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने दाऊद एक प्यादे आहे. वस्तुत: पाक संरक्षणदले, गुप्तहेर एजन्स्या हे भारताविरुद्ध कारवाया आखीत असतात आणि पूर्वी दाऊदकडून त्या पार पाडून घेतल्या जात.

In reply to by राही

दाऊदला मारणे नाही तर त्याच्या आर्थिक व्यवहाराच्या नाड़या आवळणे जरूरी आहे. पठानकोटमधे अतिरेकी घुसण्यामागे अमली पदार्थाची तस्करी सम्बन्ध असण्याची शक्यता आहे. दाउदचे नेटवर्क इथुन पुढे डिस्ट्रीब्यूशनचे काम करते. हे नेटवर्क स्थानिक पोलिसांना माहीत नसणे शक्य नाही. अगदी सट्टेबाजी देखिल स्थानिक पोलिसांना माहीत असते. सोने,अमली पदार्थ,हवाला यांची भारतातील मुळे खोदून काढली तरी दाऊदचे साम्राज्य खिळखिळे होउ शकते. आठवा तो ८०च्या दशकातील काळ! दाउदने आपल्या मार्गातील काटे कसे दूर केले होते? आज कित्येक पोलिस या कामगिरिसाठी मेडल घेऊन बसले आहेत. म्हणजे डबल फायदा!

भारत पाक मुख्य आयातनिर्यात गुजरात बंदरांमधुन होते. मोदीकाका व्यापार चालु देताहेत तर आपण काय करणार ?

In reply to by मोगा

नका ओ मोदीकाकाला मध्ये आणू! गळाभेट घेतायेत ते!

In reply to by DEADPOOL

आता आमचे मोदीकाका २६ जानेवारीपासून राफेल की टोफेल कसलीतरी विमानं आणणार आहेत. .. मग बघाच ! अखंड हिंदुस्तान ! नमो - नगो की जय !

In reply to by मोगा

मोगाजि, संरक्षणसिद्ध नाही राहिले तर तुम्ही तुमच्या चाइनीज फोन वरुन चाईनीज नुडल घरपोच ऑर्डर करु शकाल, ते पण शांगहाईवरुन नाही तर भेंडीबाजारवरुन. तुम्हाला काय फरक पडतो म्हणा? आत्मसन्मान मंजे काय असतं भौ?

In reply to by भंकस बाबा

बीफ खाल्ले , आमचा आत्मसम्मान दुखावला , अशा आरोळ्या ठोकून एका निष्पाप मुसलमानाला नुसत्या दगडानेच ठेचून मारणार्‍या लोकाना राफेलची काय गरज , असा भाबडा प्रश्न आम्हाला पडला . म्हणुन राफेलचा उल्लेख केला. ते आत्मसम्मानी पराक्रमी लोक खरोखरचे अतिरेकी आल्यावर कुठे लपले म्हणे ?

In reply to by मोगा

दंगलित मरणारे मुसलमान निष्पाप असतात तर मग अशाच दंगलित मरणारे हिन्दुनि कोणते पाप केले होते? मोगाजि पाकिस्तानात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेकी नावे मुस्लिम असतात म्हणुन नाहीतर ते हल्ले कोणी त्रिपाठी,चौबे,सिंग वा डिकोस्टा यांनी केले असते तर पाकड्याची प्रतिक्रिया काय असती? उड़त्या शवपेट्यात बसायची तुम्हाला फारच हौस आहे असे दिसते. उद्या युद्ध झालेच तर मोगाना पाठवून दया सीमेवर, तिथे ते चिन्याणा व् पाकड्याना सांगतिल,ए टाइम्प्लीस,सध्या आमच्याकडे सुपरफास्ट विमाने नाहि आहेत, तेव्हा कृपया थोड़ा वेळ दया, पाच दिवसात काय ते राफेल, एफ१६, मिग घेऊन येतो मग लढुया. बाकी तुम्ही नूडल खायच्या तयारीत दिसताय?

In reply to by मोगा

जरा इतिहास तपासा, कोणि किती निष्पाप मारले ते!!!!!!!!!!

एकुण वृत्तांवरून पठाणकोट प्रसंग गांभीर्याने अभ्यासावा असा वाटतो, या निमीत्ताने बाकी चर्चा चालूद्यात पण काही चर्चा प्रतिसाद रचनात्मक तोडग्यापेक्षा उथळपणा कडे झुकलेले नाहीत ना अशी शंका वाटते. त्यात डेडपूल यांच्या या प्रतिसादाचा समावेश होतो. तुमच्या आमच्यापेक्षा अधिक विचार करु शकणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरकारने नेमलेले असतात शत्रुराष्ट्रात काही कारवाई करावयाची झाल्यास ते केवळ सरकारच करु शकते. मोगा यांचा हा प्रतिसाद सुद्धा भडक स्वरुपाचा आहे. सरकारच्या जबाबदार्‍या सरकारच्या असतात, सरकारने जिथे अधिकृतपणे मदत मागितली ती राष्ट्रप्रेमीमंडळींनी उत्साहाने जरुर करावी, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या प्रत्यक्ष कारवाईसंदर्भातल्या जबाबदार्‍या सर्वसामान्यांनी स्वतःच्या डोक्यावर घेणे शक्यही नसते म्हणून त्या संदर्भाने कोणतीही उचकवा उचकवी रास्त ठरत नसावी. बाकी सर्वसामान्यांनी (सिव्हीलीयन्सनी) सुद्धा अशा समस्यांचे अधिकाधीक कंगोरे कसे लक्षात घेतले जाऊ शकतील आणि रचनात्मक तोडगे काय असू शकतील याची अभ्यासपूर्ण चर्चा करणे उत्तमच.

नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत? बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या! एका रोगावर आपण अनेक पॅथींची औषधे घेतो. अहो ! परीणाम तर पहा. मग बोला. काही काळ जाऊ द्या. नमो म्हणजे काही जादुची कांडी आहे का ? कालच म्हणे वजीरेआलम नवाज शरीफ यांनी पठाणकोट संदर्भात मोदींशी चर्चा केली. असे कधी घडले होते ? बोलणी सुरु नव्हती तेव्हा सुध्दा शहीद होतच होते.

In reply to by नितीनचंद्र

. नमो म्हणजे काही जादुची कांडी आहे का ? बाकी सगळं सोडा, स्वतः अपेक्षा वाढवायच्या मग लोकांनी आश्वासनांची आठवण करून द्यायला सुरुवात केली की 'जादूची कांडी आहे?' का असा प्रतिप्रश्न करायचा हे काही पटत नाही. "पाकिस्तानको उसीकी भाषामें जवाब देना चाहिये, ये लवलेटर लिखना बंद करो" असे माननीय नमो साहेबांचेच विधान आहे. आता ह्यालाही ते चुनावी जुमला म्हणत असतील तर धन्य असो. बाकी चालू द्या...

सगळे नुसती नावं ठेवताहेत. पण काय करायला पाहिजे होतं आहे यावर कोणीच काही बोलत नाहीये. मागच्या वर्षात पाकिस्तानबरोबरच्या चर्चा थांबवल्या म्हणून शिव्या घातल्या. मोदी पाकिस्तानात गेले नव्हते तोपर्यंत पण गेले नाही म्हणून लोक्स शिव्या घालत होते. आता गेले तरी शिव्या घालताहेत. एकूण काय फक्त शिव्या घालायच्या हा एकच उद्देश दिसतोय. चूक असेल तेथे टीका करायलाच पाहिजे पण मग नक्की काय चुकलं, ती चूक दुरुस्त करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि बरोबर काय आहे हे सांगण्याची जबाबदारी पण टीका करणार्यांवर येते. ते ती घेत नाहीत. गळाभेट घेतली तर मग अपेक्षा काय होती की मोदींनी गळाभेट घेताना वाघनखं खुपसून शरीफना मारायचा, मग सुपरम्यान सारख जाउन दाऊदला, हाफिजला मारायचं मग स्पायडरम्यान सारखं सगळ्या दहशतवाद्यांना जाळ्यात पकडून भारतात घेवून यायचं? सलमान खुर्शीद आणि इतर काँग्रेसचे मान्यवर पाकिस्तानात जाउन काय बरळून आले त्यावर काही भाष्य केलं नाही कोणी. तृणमूलच्या इद्रीस अलीनी तर मोदींचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. सुशीलकुमार शिंदे म्हणतात भाजपच्या काळात दहशतवादी हल्ले जास्त होतात. यावर इथे कोणाला आक्षेप घेण्यासारखे काहीच वाटत नाही? एकीकडे मोदी मुस्लिमविरोधी आहेत म्हणून बोंबा मारायच्या आणि दुसरीकडे त्यांना दहशतवाद्यांशी संबंध आहेत म्हणायचं! काही शहाणे पत्रकार तर सगळ्यात चुकीचे प्लानिंग असलेली कारवाई आहे म्हणतात. म्हणे लष्कराच्या वरिष्ठ लोकांनी यांच्याकडे येवून हितगुज केलं म्हणे की आर्मीला बाजूला करून NSG ला कारवाई करायचे अधिकार दिले. त्यामुळे कारवाई एवढी लांबली वगैरे वगैरे. नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले म्हणालं की झालं पुढचे प्रश्न विचारायचे नाहीत. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी एवढे सहज पत्रकारांकडे बोलतात का? एवढी मोठी कारवाई चालू असताना अधिकारी जेवण झाल्यावर शतपावली करत करत निवांतपणे येवून पत्रकारांना भेटले आणि नाराजी व्यक्त केली! काहीही हं xx…

In reply to by ट्रेड मार्क

इरिस्पेक्टीव्ह ऑफ (पंजाब) राज्यात आणि केंद्रात सरकारे कुणाची आहेत, इंग्रजी वृत्तपत्रातील बातम्यांवरुन काही त्रुटी जाणवल्या/ सुधारणेस वाव आहे असे वाटले त्या अशा. १) ज्या सीमा भागात कुंपण नाही खास करुन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रातील नद्यांची क्षेत्रे, तेथे थर्मल इमेजींग यंत्रणा आधीच्या (गुरुदासपुर) अतीरेकी हल्ल्याच्या वेळी काम करत नव्हत्या त्या वेळीच अद्ययावत केल्या गेल्या नसाव्यात. यापुढे या बाबत हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेणे. २) सीमा भागात अतीरेक्यांनी वसाहती क्षेत्रात आसरा मिळवला, सीमा भागातील वसाहती आणि रस्ते क्षेत्रात सीसी टिव्ही कॅमेर्‍यांची संख्या आणि गस्त वाढवली जावयास हवी. जेणे करून अतिरेक्यांना आसरा मिळवता येणे दुरापास्त व्हावे ३) सैनिकी विमानतळांना तारे एवजी व्यवस्थीत भिंतींची उपलब्धता ४) डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना सोशलनेटवर्कींग साइट्स , अभारतीय इमेल सेवा, अभारतीय संकेतस्थळे आणि अभारतीय व्यक्तींशी आंतरजालावरून संपर्कास बंदी. ५) पंजाब आणि सीमावर्ती राज्यां मधील ड्रग वापराबद्दल समाजशास्त्रीय अभ्यास आणि ड्रग व्यवहारांवर प्रसंगी इतर राज्यातील पोलीस दले वापरून अधीक कठोर नियंत्रण ६) पठाणकोट प्रसंगापुर्वी राज्य पोलीस दलाचा एसपी लेव्हलचा अधिकारी अतीरेक्यांच्या हाती नि:शस्त्र लागणे आणि सुटणे असे विनोद कोणत्याही स्थितीत भविष्यात होणार नाहीत याची दक्षता घेणे. ६) देशांतर्गत अनधिकृत शस्त्रांची उपलब्धता होणार नाही याची काळजी घेणे (या वेळच्या केसशी संबंध नसला तरीही) ७) पाकीस्तान अनधिकृत शस्त्रांच्या उपलब्धता, ड्रग व्यापार आणि अतीरेकास अर्थपुरवठ्यावर नियंत्रण आणत नाही तोवर पाकीस्तानवर कठोर निर्बंध घालण्याबद्दल आंतरराष्ट्रीय जनमत बनवण्यावर भर देणे.

In reply to by माहितगार

उर्वरीत भारतातही घर आणि वाहन विकताना आणि भाड्याने देताना सर्वसामान्य जनतेने विकत/भाड्याने घेणार्‍यांची नौकरी घेणार्‍यांची माहिती पोलीस दलांकडे अद्ययावत करण्याची द़क्षता घ्यावयास हवी. आस्थापना आणि व्यावसायिकांनी आपल्या परिसरातील रस्तेही कव्हर होतील अशा पद्धतीने सिसी टिव्ही कॅमेरे बसवावेत, सर्वच रेसिडेंशिअल सोसायटीज खासकरून सीमावर्ती राज्यात कंप्युटराईज्ड गेटपास पद्धतींची अंमल बजावणी कंपलसरी करावी.

In reply to by माहितगार

हे जरा जास्तच नाही होत का? अवघा देश तुरुंग बनवायचाय का? संपूर्ण पृथ्वीला चामडे घालण्याऐवजी पायास चप्पल घालणे योग्य असते. पायातच चप्पल घातली नाही तर चामडे कितीही अंथरले तरी चटके बसणारच...

In reply to by संदीप डांगे

सीमा व्यवस्थीत कव्हर करता आल्या नाहीत आणि/किंवा देशांतर्गत अनधिकृत शस्त्रांवर नियंत्रण प्रस्थापीत करता नाही आले तर त्या शिवाय पर्याय नसावा. तुम्ही फक्त पाकीस्तानी अतिरेक्यांचा विचार करता आहात, मी नक्षलवादी ते स्मॉल आर्मसी भारतीय गुन्हेगारात वाढलेली उपलब्धता असे सगळेच लक्षात घेऊन लिहिले आहे. गेटवर मेटल डिटेक्टर ठेवायचा त्या मेटल डिटेक्टरने आवाज केला तरी त्याकडे दुर्लक्ष करावयाचे अथवा कुणातरी रॉबर्ट वड्राला (नमुद करण्याचा उद्देश राजकीय टिका नाही) सवलत द्यायची हे कुठे तरी थांबावयास हवे. खाजगीपणाचे महत्व लक्षात घेऊनही पाकीस्तान आणि चीनने भारताशी ज्या पद्धतीचे छुपे अतिरेकी युद्धतंत्र चालवले आहे त्यास सुरक्षीतता हवी असेल तर खाजगीपणाचे चोचल्यांना कोंबाळण्यात अर्थ नाही.

In reply to by माहितगार

अहो, आपण एखादा छोटासा प्लॉट घेतला तरी प्रथम त्याभोवताली कुंपण घालतो. 47 साली आपण एवढा मोठा देश ताब्यात घेतला तरी त्याला सांस्कृतिक / सामाजिक/ राजकीय / साधे तारांचे कुंपण घालू शकलो नाही आजपर्यंत ! कोपर्यावरती असलेल्या वाण्याकडे सुद्धा आपण आज cctv असलेला पहातो पण आजही आपण सीमाभागात सगळीएकडे cctv बसवू शकलो नाही. लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना !

In reply to by सामान्यनागरिक

हे मार्ग स्वीकारले तर सैन्याच महत्व काही प्रमाणात कमी होइइल... ते कशाला स्व पा कु मारुन घेतील?

In reply to by मोगा

हे मार्ग स्वीकारले तर सैन्याच महत्व काही प्रमाणात कमी होइइल...
ट्रॅफीक सिग्नल लावले तर ट्रॅफीक पोलीस लागणार नाहीत म्हणण्यासारख आहे. केवळ सिसिटीव्ही लावून अफगाणीस्तान आणि इराक-येमेन-सिरीया सगळीकडचा अतीरेक कमी करता यावयास हवा. सुरक्षीतता हा खूप मोठा आणि तर्कसंगत निर्णय घेण्याचा विषय आहे, त्याच्या समतोल विचार विमर्शासाठी असे भावनावश धागे कितपत पुरेसे असू शकतील या बाबत साशंकता वाटते. विषयाच्या स्वंतत्र चर्चेसाठी (अ)सुरक्षीततेचा सांभाळ हा धागा लेख लिहिला पण दुर्दैवाने त्या चर्चा धाग्यास अद्याप प्रतिसाद नाही आणि उपरोक्त प्रकारच्या धाग्यात पुर्णपणे चर्चा होऊ शकणे अवघड वाटते.

In reply to by माहितगार

काहुन जाहिरात करु राह्यले हो? उपरोक्त प्रकारच्या धाग्यात पुर्णपणे चर्चा होऊ शकणे अवघड वाटते>>>>>>>म्हणजे तुमचा धागा ब्येश्ट? पटल नाही ब्वा!!

In reply to by माहितगार

पायात चप्पल घालणे म्हणजे 'योग्य ठिकाणी उपाययोजना करणे जेणेकरून अव्यवहार्य उपाय करायची गरज भासू नये' असे अभिप्रेत होते. जागोजागी मेटल डिटेक्टर व सीसीटीवी कॅमेरे हे दहशतवादी हल्ले वैगेरेंमधे अतिशय कुचकामी आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. तरीही आपण त्याच गोष्टींचा पुरस्कार करत आहात ह्याबद्दल आश्चर्य वाटते. ताजमहाल होटेलवर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यात सीसीटीवी वा मेटल डिटेक्टर असून काय उपयोग झाला? म्हणण्याचे तात्पर्य असे की ज्या गोष्टी प्रत्यक्ष संरक्षणासाठी व्यर्थ आहेत त्यांचा बागुलबुवा उभा करून फक्त आम जनतेस खोट्या सुरक्षिततेची जाणीव होऊ शकते, बाकी काही नाही. चोरी, मारहाण वा शस्त्रांचा अनधिकृत उपयोग ह्यात सीसीटीवीची भूमिका फक्त साक्षीदाराची असते. आजकाल माध्यमांमधून 'सुरक्षेसाठी सीसीटीवी' ही संकल्पना भारतात फार चर्चीली जात आहे, त्यामागे मोठी उद्योजक लॉबी कार्यरत आहे. भारतात सीसीटीवी म्हणजे बॉडीगार्ड्स वा सुरक्षारक्षकांना पर्यायच आहे, सीसीटीवी जणू फायरवॉल आहे अशी काहीशी प्रतिमा बनवली गेली आहे. अमूक ठिकाणी गुन्हा घडला तिथे सीसीटीवीच कसे नाहीत, असून बंद होते, वैगेरे सीसीटीवी वर मुद्दाम भर देणार्‍या बातम्या येतात. त्यामागे अर्थकारण आहे, उपयोगिता नाही. कारण अशा बातम्या आल्या की लगेच स्थानिक राज्यसंस्थांमधे सीसीटीवीची मोठमोठाली टेंडरं निघतात, पास होतात, नळकांडी-कॅम्रे लावले जातात, जनता खुश, पुढारी खुश, कंपन्या खुश. सहा महिन्याचा फ्री-मेन्टेनन्स संपला की कॅमेरे व विषय बंद. खरे तर सीसीटीवी हा अतिआवश्यक, परम-संवेदनशील आवारात गरजेचा आहे, त्यास अखंड मानवी नियंत्रण-सुविधेची जोड आवश्यक असते. प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक फिरू शकत नाही म्हणून एकाच ठिकाणी बसून त्यास सर्व परिसर विनासायास न्याहाळता यावा ह्या उद्देशाने सीसीटीवींची निर्मिती झाली. जिथे समस्या असेल तिथे लगेच कुमक पाठवून परिस्थितीवर नियंत्रण पाठवणे सोपे जाते, मनुष्यबळावरील ताण हलका होतो. ह्यासाठी सीसीटीवी आहेत. आपल्याकडे फक्त कॅमेरे लावले की धन्यता मानतात लोक. तुम्ही जे सर्व आस्थापनांमधे, अगदी रहिवासीसुद्धा, सीसीटीवी लावण्याबद्दल म्हटले आहे. ते जरा अति होतंय असं वाटतं. भारतीयांना मानसिकरित्या अधिकाधिक सुरक्षित वाटावे म्हणून ह्या उठाठेवी आहेत पण कायम वॉर-अलर्टवर असल्यासारखे आयुष्य सर्वच ठिकाणी कायम जगणे मानसिकरित्या घातक नसेल काय? देशाच्या सीमा सर्वोत्तमरित्या सुरक्षित करणे, त्यात अजिबात ढीलाई न करणे ह्या सीमापातळीवरील गैरव्यवहार रोखण्यास योग्य अशा कृती आहेत. देशांतर्गत पोलिस-गस्ती असणे, तक्रारींवर कार्यवाहीची तत्परता असणे, गुप्तहेरांचे विश्वासार्ह व जीवंत जाळे असणे, संदेश-देवाण-घेवाण व निर्णयप्रक्रिया सुटसुटीत, वेगवान असणे, ह्या नेहमीच्याच कृती अधिक कडकपणे राबवणे आवश्यक आहे. शहर कितीही मोठे असो वा छोटे असो, प्रत्येक विभागातली बित्तंबातमी पोलिसांकडे असते. शहरात कोण आले, कोण गेले ह्याबद्दल पोलिस-प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन रेकॉर्ड मेन्टेन करणे, (ह्यासाठी एक सर्वंकष सॉफ्टवेअर तयार करून सर्व ठिकाणच्या मानवी वाहतूकीचा रीअल-टाइम डेटा बघणे. म्हणजे प्रत्येक खाजगी वा सरकारी वाहनाच्या सीटमध्ये बायडीफॉल्ट पर्सन-वेट-सेन्सर लावून वाहनात एकूण किती माणसे आहेत, किती उतरली, किती लोक कुठे गेले, चढले वैगेरे मोठा किचकट प्रोग्राम बनवता येईल, इति कल्पनेच्या भरार्‍या. ह्या प्रणालीबद्दल मागे आराखडा बनवला होता. कधी वेळ मिळाला तर सविस्तर लेख लिहिन.) नागरिकांशी मैत्रीपूर्ण संपर्क ठेवणे ह्याही गोष्टी आवश्यक. माझी सुरक्षिततेची संकल्पना फार सोपी आहे. चित्रपटांमधे उत्तम पार्श्वसंगीत त्याला म्हणतात जे अजिबात जाणवत नाही पण परिणाम साधून जातं. उत्तम सुरक्षा व्यवस्थाही तशाच पार्श्वसंगीतासारखी हवी. माझ्या संकल्पनेत मेटल डिटेक्टर्स, सीसीटीवी, अनावश्यक चेकिंग ह्यांना थारा नाही. गुन्हा घडण्याआधी रोखणे हेच खरे कौशल्याचे काम. सीसीटीवींचे फुटेजेस गोळा करून वर्षानुवर्षे कोर्टाच्या वार्‍या करणे अर्थहिन आहे. बाकी तुमचे पहिल्या प्रतिसादातील सर्व क्रमांकाचे मुद्दे पटले. फक्त उर्वरित भारत व सामान्य नागरिक ह्यांना सुरक्षाव्यवस्थेच्या नावाखाली अनावश्यक मॉनिटर केले जाऊ नये असे वाटते. त्याचे मानसशास्त्रीय परिणाम गंभीर असू शकतात. जॉर्ज ऑरवेल चे '१९८४' ह्याबद्दलच आहे.

In reply to by संदीप डांगे

२४ तास मॉनिटरिंग आणि वरचेवर देखभाल नसेल तर सी.सी.टीवी व्यर्थ आहेत. नागरिकांतला हलगरजीपणा हा एक मोठा शत्रू आहे. लष्कर, निमलष्कर, गुप्तवार्ता विभाग, सगळे आपापल्या परीने काम करतातच पण जागृत आणि सदैव सावधान समाज ही खूप मोठी मदत असू शकते.

In reply to by माहितगार

भाडेकरूंची माहिती का देत नाही लोक ? कधी विचार केला का कुणी ? भाड्याने दिलेल्या घराची घरपट्टी तिप्पट किंवा चौपट असते. त्यामुळे घर भाड्याने दिल्याची माहिती देण्याचे टाळतात लोक. अनेक ठिकाणी लोक भाडे रोखीने घेतात.घर भाड्याने दिल्याचे लपवण्यात हा फायदा असतो. तसेही भाड्याने दिलेल्या जागांपैकी दहा टक्केच जागांची माहिती पालिकेकडे असते. 90 टक्के जागांचा कर चुकविला जातो. जर हा जाचक नियम काढला तर लोक स्वतःहून माहिती देतील. शेवटी सुरक्षा आणि मिळणारा तुटपुंजा कर यात काय महत्वाचे आहे हे ठरवावे.

In reply to by सामान्यनागरिक

करापेक्षा सुरक्षा महत्वाची हे खरे पण शेवटी सुरक्षा ज्यांच्यासाठी आहे त्यांनीही सामाजिक दायित्व म्हणून पदरमोड करण्यास हरकत नसावी नाही का.