Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Anand More on Sat, 12/26/2015 - 14:07
लेखनविषय (Tags)
कथा
विनोद
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
विरंगुळा
गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी वॉचमन केबिन मधल्या रेडीओमधून आर एन पराडकरांच्या आवाजातील दत्त भक्ती गीते एकामागून एक ऐकू येऊ लागली की दत्त जयंती आल्याचे मला कळते. मी मुलांना, दत्त दत्त दत्ताची गाय गायीचं दूध वगैरे सांगू लागलो तर मोठा म्हणाला, "आपण म्हशीचं दूध घेतो बाबा, गायीचं इतकं काही खास नसतं असं अम्मा म्हणते." एकंदरीत आपल्या आणि आपल्या मुलांच्या अम्मापुढे कुणाचं काही चालत नाही त्या अत्रीनंदनाला कळले असावे म्हणून त्याने देखील अम्मापेक्षा हम्माच जवळ केली असावी अशी शंका मनाला चाटून गेली. मी मनोमन अवधूताला नमस्कार केला आणि इतर कामांच्या मागे लागलो. पूजा करायला बसलो असताना ही म्हणाली, "आज मला मैत्रिणी कडे जायचे आहे, मार्गशीर्ष गुरुवारची सवाष्ण म्हणून. तेंव्हा तुम्ही बाहेरच जेवा." दत्त महाराज जागृत देव आहेत हे ऐकून होतो पण सकाळच्या नमस्काराला इतक्या लवकर फळ देतील असे वाटले नव्हते. मी जिम चालू केल्यापासून आमच्या घरगुती ऋजुता दिवेकरला प्रचंड उत्साह चढला आहे. त्यामुळे मी सध्या कंदमूळ भक्षण करणाऱ्या ऋषी मुनींच्या हालअपेष्टांचे प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्यामुळे, “आज बाहेर जेवा,” अशी आज्ञा मिळाल्यावर मी प्रचंड खूष झालो. मनातल्या मनात त्या मैत्रिणीच्या घरच्या दिनदर्शिकेत, प्रत्येक दिवस मार्गशीर्षाचा गुरुवार म्हणून छापला जावो अशी प्रार्थना केली. मित्रांना फोन केले पण सगळे लेकाचे कामात बिझी. म्हटलं अरे बाबांनो मी पैसे देतो बिलाचे, पण वर्षाच्या शेवटच्या दिवसात माझे सर्वाहारी मित्र देखील अट्टल मांसाहारी होतात मग त्यांना माझ्या शाकाहारी पार्टीचे कुठून कौतुक असणार. फोन करण्यासाठी मैत्रिणी असण्याइतपत प्रगती मी शालेय आणि नंतरच्या जीवनात केलेली नसल्याने दुपारी जेवण एकट्यानेच उरकत असताना हिचा फोन आला. म्हणाली, "दोन पर्याय आहेत. आज संध्याकाळी एक तर बाजीराव नाहीतर उत्सव. बोला काय बघायला जायचे ते? सासूबाई, माझे आई बाबा, आणि मुलं सगळे येणार आहेत. " मी सटपटलोच. म्हटलं, "अगं! उत्सव काही सहकुटुंब बघण्यासारखा चित्रपट नाहीये. आणि आता कुठल्या थेटरात लागलाय तो ?" (हा शेवटचा प्रश्न नजीकच्या भविष्याच्या तरतुदीसाठी होता). पण माझ्या सर्व मनसुब्यांवर पाणी फिरवत ही म्हणाली, "ओ शशी कपूर! मी जिमखान्यावरच्या डोंबिवली उत्सव बद्दल बोलतेय." मग इतक्या सगळ्या लोकांना एकावेळी भन्साळीचा बाजीराव दाखवायची मोहीम खुद्द बाजीरावाने देखील नाकारली असती आणि, "एकवेळ मी मस्तानीला सोडतो पण हे असलं काही सांगू नका !" असेच तो म्हणाला असता याची उगाच खात्री वाटल्याने मी उत्सवचा पर्याय स्वीकारला. नंतर धाकटा मला सांगत होता की अम्मा म्हणाली की, "बाबांना बाजीरावाचे नाव सांगितले की ते गुपचूप उत्सवला येतील म्हणून." मला तर खात्री आहे की मागल्या जन्मी ही नाना फडणवीस असावी. पण मी मुलांशी आदराने वागत असल्याने सध्या ते फडणवीसांच्या दप्तरी माझे हेर म्हणून रुजू झाले आहेत. संध्याकाळी घरी पोहोचलो तर, पूर्वजन्मीचे फडणवीस, त्यांचे आई वडील, सासू आणि माझे दोन गुप्तहेर सगळे तयार होते. दारातच माझ्या हातात चहाचा कप ठेवला आणि पाच मिनिटात तयार व्हायचे फर्मान सोडून सगळेजण खाली उतरले. कार मध्ये बसताना कार थोडी छोटी झाल्यासारखे वाटले. मी धरून पाच मोठे आणि दोन छोटे, कसे बसे आत कोंबून आमची वरात उत्सवच्या दिशेने निघाली. मुलांना तिथली जत्रेसारखी गर्दी आवडते आणि हिला खरेदीची संधी. मला तर वाटते सध्याच्या या बाजारकेंद्रीत समाजामध्ये खरेदीच्या मिळणाऱ्या अगणित संधी आणि त्या साधण्यासाठी घरोघरीच्या काशीबाईन्नी केलेली चढाईच अनेक आधुनिक बाजीरावांना मस्तानीबद्दल विचार देखील करू देत नसतील. बाजाराने प्रेमाचा गळा घोटला हेच खरे. असे सगळे विचार करत असताना आम्ही जिमखान्याजवळ पोहोचलो. सगळ्यांना गेट जवळ उतरवून मी पार्किंग ची जागा शोधायला पुढे गेलो. पण माझ्या आधी अनेक घरच्या फडणवीसांनी आपापल्या कोतवालाला आणले असल्याने मला पार्किंगला जागाच मिळेना. थोडा थोडा करीत इतका पुढे गेलो की अजून पाच मिनिटे पुढे गेलो असतो तर एक प्रदक्षिणा पूर्ण करून घरीच परत पोहोचलो असतो. शेवटी एका अंधाऱ्या सांदी कोपऱ्यात गाडी उभी केली. तोपर्यंत हिचे लवकर या म्हणून फोन चालू झाले होते. म्हणून मग तिकडून रिक्षा करून पुन्हा उत्सवच्या गेटपर्यंत पोहोचलो.
  • Log in or register to post comments
  • 8729 views
  • मी उत्सवला जातो (भाग २)
  • ‪मी उत्सवला जातो‬ (भाग 3)
  • ‪‎मी उत्सवला जातो‬ (भाग ४)

Book traversal links for मी उत्सवला जातो (भाग १)

  • मी उत्सवला जातो (भाग २) ›

प्रतिक्रिया

Submitted by विवेक ठाकूर on Sat, 12/26/2015 - 14:48

Permalink

छान !

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 12/26/2015 - 15:41

Permalink

खुसखुशीत!

खुसखुशीत!
  • Log in or register to post comments

Submitted by कुसुमिता१ on Sat, 12/26/2015 - 15:49

Permalink

छान

मस्त! खुसखुशित लेखन!
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sat, 12/26/2015 - 15:53

Permalink

मस्तं, खुसखुशीत. पु.भा.प्र.

मस्तं, खुसखुशीत. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 12/26/2015 - 15:57

Permalink

मज्जा!

मज्जा!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sat, 12/26/2015 - 16:27

Permalink

मज्जा आली वाचताना. खुसखूशीत

मज्जा आली वाचताना. खुसखूशीत पद्धतीने लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Sat, 12/26/2015 - 17:04

Permalink

जेव्हा ...

तुम्ही बाहेर जेवा असे आमिष दाखवले .. बहुतेक मोठा फटका बसणार असे वाटत्येय... पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 12/26/2015 - 17:11

Permalink

हाहाहाहा!

पुभाप्र!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 12/26/2015 - 17:27

Permalink

:)पुभाप्र.

:)पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Sat, 12/26/2015 - 18:38

Permalink

मस्तच! पुभाप्र...

मस्तच! पुभाप्र...
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 12/26/2015 - 21:04

Permalink

मस्तच अानंदराव!

पुभाप्र!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 12/26/2015 - 21:29

Permalink

आगरी महोत्सवालापण गेलात?

आगरी महोत्सवालापण गेलात?
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 12/26/2015 - 22:05

In reply to आगरी महोत्सवालापण गेलात? by कंजूस

Permalink

नाही... तेव्हा बाजीराव आला

नाही... तेव्हा बाजीराव आला नव्हता
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 12/26/2015 - 22:23

Permalink

हाहा!

मस्तय!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sun, 12/27/2015 - 05:54

Permalink

मज्जाच!

सुरूवात खुसखुशीत झालीय एकदम, लवकर येउद्या पुढचा भाग. पुभाप्र! - (कोतवाल असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Sun, 12/27/2015 - 10:06

Permalink

हाहाहाहा मस्त! पुभाप्र ...

हाहाहाहा मस्त! पुभाप्र ...
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sun, 12/27/2015 - 10:08

Permalink

चांगलाय

चांगलाय
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 12/28/2015 - 08:26

Permalink

हा हा हा!

लै भारी! (पर्मनंटकोतवाल्)रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Mon, 12/28/2015 - 13:05

Permalink

झक्क्कास

तुमच्या लेखन शैलीचा फॅन झालोय सर :)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 12/28/2015 - 13:39

In reply to झक्क्कास by मी-सौरभ

Permalink

+1

मी पण! :) Sandy
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com