✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आत्मबंध..

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 12/10/2015 - 12:02
होतो अत्रुप्त आत्मा मग आत्म-मुक्त झालो.. आता कळून आले मी आत्मबंध आहे. अतृप्त मूळ माझे आत्मस्वरूप तेच. परी मूळबीज म्हणजे मी आत्म-बंध आहे. आत्मा बदलता-हा अतृप्त वर्तमान! तो भूत काळ त्याचा प्राचीन बंध आहे. मी बदलताच असतो वैविध्य तेच माझे. या जाणिवेत नुकता,,, "तो" आत्मबंध आहे. जाणिव आज झाली बदलून मीच मजला.. त्या जाणिवेत आता मी पूर्ण लिप्त आहे. दिसते स्व रूप त्याचे जगता जरा स्वतःशी! शोधीत जात असता तो एक गंध आहे. आहे असा मी आज असतो असाच नेहमी! ते सत्यरूप असते इतुका स्वबंध आहे. ठरवू कशास मग मी? राहीन-आत्मबंध??? जर मूळरूप त्याचे तैसे सबंध आहे! स्विकार आज याचा केला मी मजं-मतीने पाहू कितीकं टिकतो!? "तो" मुक्त छंद आहे! कळले मलाही काही सांगून टाकले मी.. घेतो रजा जराशी तो मूळ छंद आहे! https://scontent-nrt1-1.xx.fbcdn.net/hphotos-xfp1/v/t1.0-9/12342371_936965349723085_5862105682522929738_n.jpg?oh=7c3a324835df3a34d371ca15b7f5c7cd&oe=56DE5F51

प्रतिक्रिया द्या
9621 वाचन

💬 प्रतिसाद (45)

Chhaane Kavita..avadli

निनाव
गुरुवार, 12/10/2015 - 12:44 नवीन
Aavadli
  • Log in or register to post comments

अत्रुप्तता गेलेली दिसत्ये!

सूड
गुरुवार, 12/10/2015 - 14:31 नवीन
अत्रुप्तता गेलेली दिसत्ये! बाकी शेवटला फोटो बघून रणदीप हुडा चा खिचडी मुव्ही आठवला. =))
  • Log in or register to post comments

आत्म्याइतकीच गूढ कविता !

सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 14:42 नवीन
आत्म्याइतकीच गूढ कविता ! बुवा, घुगऱ्या कुठायत ?
  • Log in or register to post comments

सुंदर कविता !

मितान
गुरुवार, 12/10/2015 - 14:44 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments

मान गये! कविता ओर फोटो दोनों

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 16:09 नवीन
मान गये! कविता ओर फोटो दोनों को!=))
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पैसा
गुरुवार, 12/10/2015 - 16:47 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट कविता

प्रचेतस
गुरुवार, 12/10/2015 - 17:26 नवीन
अत्रुप्ततेकडून त्रुप्तीकडे होणारी वाटचाल मोठ्या खुबीने मांडण्यात कवी यशस्वी झालाय.
  • Log in or register to post comments

कोण त्रुप्ती ?

सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 17:29 नवीन
कुलकर्ण्यांची थोरली का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही. ती उजवली. ही धाकटी.

प्रचेतस
गुरुवार, 12/10/2015 - 17:34 नवीन
नाही. ती उजवली. ही धाकटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

नाम अगदी सार्थ आहे..

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/10/2015 - 19:11 नवीन
नाम अगदी सार्थ आहे.. प्र-चेतस = चेतवून लावितो जो आग तो! ======================= फट्कागोबा-तवामारात्मबंध Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:( :( :(

प्रचेतस
गुरुवार, 12/10/2015 - 19:34 नवीन
:( :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

'काटा रुते कुणाला ….'

पगला गजोधर
गुरुवार, 12/10/2015 - 17:26 नवीन
'काटा रुते कुणाला ….' च्या चालीमीटरमधे बसतीय तुमची कविता.
  • Log in or register to post comments

तसे " चार बोतल व्होडका " च्या

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 12/10/2015 - 17:35 नवीन
तसे " चार बोतल व्होडका " च्या चालीमीटरमधेही बसतीय ही कविता. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

केव्हातरी पहाटे

बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 10:40 नवीन
ची चाल पण ब-यापैकी बसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

छान कविता

शान्तिप्रिय
गुरुवार, 12/10/2015 - 17:35 नवीन
छानच कविता गूढ आणि अर्थपूर्ण. गेयताही आहे.
  • Log in or register to post comments

एवढं चांगलं लेखन होतंय पण नाव

कंजूस
गुरुवार, 12/10/2015 - 17:46 नवीन
एवढं चांगलं लेखन होतंय पण नाव सतत बदलल्याने ब्रँड होत नाही.त्यापेक्षा "पराग दिवेकर" नाव /आइडी घ्या आणखी एक नवीन आइडी घेऊन इतर दुत्त --उउउउउलूलू वगैरे स्फुट टाकता येईल.
  • Log in or register to post comments

+१

जव्हेरगंज
गुरुवार, 12/10/2015 - 18:59 नवीन
+१ मला तर हे नवीन 'आत्मबंध' नाव नै आवडलं. 'अतृप्त' मध्ये कशी धार होती. तोच ठेवा हो बुवा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धारं म्यान केली परी अंतरात

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/10/2015 - 19:14 नवीन
धारं म्यान केली परी अंतरात आहे ऐसा कितीही बदलो अंतरी अतृप्त आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

'अतृप्त' मध्ये कशी धार होती.

बॅटमॅन
गुरुवार, 12/10/2015 - 19:43 नवीन
'अतृप्त' मध्ये कशी धार होती. तोच ठेवा हो बुवा!!
सहमत, आयडी बदलून.....अत्म्यास का बांधून ठेविता?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हेच म्हणतो

नाखु
Fri, 12/11/2015 - 08:45 नवीन
बांधलेले आत्मे झपाटत नाहीत असे कुठे तरी वाचल्याचे आठवते.. बॅटोबा बघ रे सापडला संदर्भ कुठेशीक !!! अ ते आ प्रवासाचा साक्षी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मस्त

एक एकटा एकटाच
गुरुवार, 12/10/2015 - 20:42 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?

सतिश गावडे
गुरुवार, 12/10/2015 - 20:58 नवीन
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? ;)
  • Log in or register to post comments

@कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/10/2015 - 23:01 नवीन
@कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?>> सूर्याला जैशी असते,आत्मबंधी प्रभा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जसा यमकात असतो, आत्मू हा उभा

प्रचेतस
गुरुवार, 12/10/2015 - 23:03 नवीन
जसा यमकात असतो, आत्मू हा उभा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@जसा यमकात असतो, आत्मू हा उभा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/10/2015 - 23:08 नवीन
@जसा यमकात असतो, आत्मू हा उभा>>> अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा.. (आणि स्वतःच आहे यम-कात हुबा! Image removed. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?

सतिश गावडे
गुरुवार, 12/10/2015 - 23:12 नवीन
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? सूर्याला जैशी असते,आत्मबंधी प्रभा! जसा यमकात असतो, आत्मू हा उभा अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा.. आणि स्वतःच आहे यम-कात हुबा! ये रे तू पाणssssडुब्बा पाणssssडुब्बा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/10/2015 - 23:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

=)) =)) =))

प्रचेतस
गुरुवार, 12/10/2015 - 23:14 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

=)) =)) =))

प्रचेतस
गुरुवार, 12/10/2015 - 23:15 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

+))==))=))

वपाडाव
Fri, 12/11/2015 - 16:35 नवीन
=)))==))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

यमक्या आत्मुस =))

सतिश गावडे
गुरुवार, 12/10/2015 - 23:04 नवीन
यमक्या आत्मुस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जी हे नाव काय तितके भारी

अभ्या..
गुरुवार, 12/10/2015 - 21:30 नवीन
गुर्जी हे नाव काय तितके भारी वाटत नाही हो. उगी कामून चेंजवता?
  • Log in or register to post comments

हो ना राव. अत्रुप्त किंवा

प्रचेतस
गुरुवार, 12/10/2015 - 21:56 नवीन
हो ना राव. अत्रुप्त किंवा अत्रुप्त आत्मा किंवा ... ह्या नावांत जी मजा आहे ती हयात नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुम्ही तर बोलूच नका!

बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 01:15 नवीन
एवढं चांगलं वल्ली नाव बदललंत ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

द्दे मारा!!!

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/11/2015 - 07:00 नवीन
द्दे मारा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नै हो.

प्रचेतस
Fri, 12/11/2015 - 07:44 नवीन
नै हो. कुठे प्रचेतस आणि कुठे आत्मबंध. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

है ह्हो!

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/11/2015 - 08:57 नवीन
है ह्हो! कुठे अवांतर आणि कुठे मूळ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुवा पाडतात नेहमीच गूळ =))

प्रचेतस
Fri, 12/11/2015 - 09:00 नवीन
बुवा पाडतात नेहमीच गूळ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ऋषीचं कुळ, नदीचं मूळ

बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 10:19 नवीन
डोक्यात शिरलेलं खूळ आणि बुवांनी पाडलेला गूळ यांच्या फंदात पडू नये!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) अगदी अगदी.

प्रचेतस
Fri, 12/11/2015 - 10:20 नवीन
=)) अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

गुर्जी ...

पगला गजोधर
Fri, 12/11/2015 - 16:43 नवीन
राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक, चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते, यापुढे जावून, तुम्ही परत जर नाव बदलणार असाल, तर कृपया 'आत्म - मुक्त' हेही नाव घेवू नका… पुन्हा चड्डी कमरेला बांधणारी नाडी (सुटलेल्या अवस्थेत दादा कोंडके स्टाईल) डोळ्यासमोर येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@राग मानू नका, पण आपले नवे

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/11/2015 - 17:06 नवीन
@राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक, चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते,>> ओक्के..नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला आत्म आणि बंध हे ऐकल्यावर बंध म्हणजे तुम्ही म्हणता तसं बांधलेलं हा प्राथमिक अर्थ प्रतीत होतो..हे ठिक आहे..पण आत्म या शब्दानी चड्डी कमरेला बांधणारी नाडी - कशी काय दृष्टीला प्रतीत होते??? हे जरा निराळंच आहे. कॉमन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

आत्म या शब्दानी...

पगला गजोधर
Fri, 12/11/2015 - 17:23 नवीन
कदचित ''स्वतःचा'', असा अर्थ मझ्या मनःचक्षुसमोर येते. (तुम्ही म्हन्ला ते बी मान्य आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा, आत्मा अवस्थेतून बाहेर

हेमंत लाटकर
Fri, 12/11/2015 - 19:41 नवीन
बुवा, आत्मा अवस्थेतून बाहेर या!
  • Log in or register to post comments

तुम्ही कल्पिता तो आत्मा आणि

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/11/2015 - 21:24 नवीन
तुम्ही कल्पिता तो आत्मा आणि मी कल्पितो तो आत्मा वेगळा आहे लट्टू काका.. धन्यवाद. आणि पुढील चर्चा करायची-असेल तर खरडवहित या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा