होतो अत्रुप्त आत्मा
मग आत्म-मुक्त झालो..
आता कळून आले
मी आत्मबंध आहे.
अतृप्त मूळ माझे
आत्मस्वरूप तेच.
परी मूळबीज म्हणजे
मी आत्म-बंध आहे.
आत्मा बदलता-हा
अतृप्त वर्तमान!
तो भूत काळ त्याचा
प्राचीन बंध आहे.
मी बदलताच असतो
वैविध्य तेच माझे.
या जाणिवेत नुकता,,,
"तो" आत्मबंध आहे.
जाणिव आज झाली
बदलून मीच मजला..
त्या जाणिवेत आता
मी पूर्ण लिप्त आहे.
दिसते स्व रूप त्याचे
जगता जरा स्वतःशी!
शोधीत जात असता
तो एक गंध आहे.
आहे असा मी आज
असतो असाच नेहमी!
ते सत्यरूप असते
इतुका स्वबंध आहे.
ठरवू कशास मग मी?
राहीन-आत्मबंध???
जर मूळरूप त्याचे
तैसे सबंध आहे!
स्विकार आज याचा
केला मी मजं-मतीने
पाहू कितीकं टिकतो!?
"तो" मुक्त छंद आहे!
कळले मलाही काही
सांगून टाकले मी..
घेतो रजा जराशी
तो मूळ छंद आहे!

काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9779
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
Chhaane Kavita..avadli
Aavadli
अत्रुप्तता गेलेली दिसत्ये!
अत्रुप्तता गेलेली दिसत्ये! बाकी शेवटला फोटो बघून रणदीप हुडा चा खिचडी मुव्ही आठवला. =))
आत्म्याइतकीच गूढ कविता !
आत्म्याइतकीच गूढ कविता !
बुवा, घुगऱ्या कुठायत ?
सुंदर कविता !
सुंदर कविता !
मान गये! कविता ओर फोटो दोनों
मान गये! कविता ओर फोटो दोनों को!=))
कविता आवडली
कविता आवडली.
उत्कृष्ट कविता
अत्रुप्ततेकडून त्रुप्तीकडे होणारी वाटचाल मोठ्या खुबीने मांडण्यात कवी यशस्वी झालाय.
कोण त्रुप्ती ?
In reply to उत्कृष्ट कविता by प्रचेतस
कुलकर्ण्यांची थोरली का ?
नाही. ती उजवली. ही धाकटी.
In reply to कोण त्रुप्ती ? by सस्नेह
नाही. ती उजवली.
ही धाकटी.
नाम अगदी सार्थ आहे..
In reply to नाही. ती उजवली. ही धाकटी. by प्रचेतस
नाम अगदी सार्थ आहे..
प्र-चेतस = चेतवून लावितो जो आग तो!
=======================
फट्कागोबा-तवामारात्मबंध

:( :( :(
In reply to नाम अगदी सार्थ आहे.. by अत्रुप्त आत्मा
:( :( :(
'काटा रुते कुणाला ….'
'काटा रुते कुणाला ….' च्या चालीमीटरमधे बसतीय तुमची कविता.
तसे " चार बोतल व्होडका " च्या
In reply to 'काटा रुते कुणाला ….' by पगला गजोधर
तसे " चार बोतल व्होडका " च्या चालीमीटरमधेही बसतीय ही कविता. =))))
केव्हातरी पहाटे
In reply to तसे " चार बोतल व्होडका " च्या by प्रसाद गोडबोले
ची चाल पण ब-यापैकी बसतेय.
छान कविता
छानच कविता
गूढ आणि अर्थपूर्ण.
गेयताही आहे.
एवढं चांगलं लेखन होतंय पण नाव
एवढं चांगलं लेखन होतंय पण नाव सतत बदलल्याने ब्रँड होत नाही.त्यापेक्षा "पराग दिवेकर" नाव /आइडी घ्या आणखी एक नवीन आइडी घेऊन इतर दुत्त --उउउउउलूलू वगैरे स्फुट टाकता येईल.
+१
In reply to एवढं चांगलं लेखन होतंय पण नाव by कंजूस
+१
मला तर हे नवीन 'आत्मबंध' नाव नै आवडलं.
'अतृप्त' मध्ये कशी धार होती. तोच ठेवा हो बुवा!!
धारं म्यान केली परी अंतरात
In reply to +१ by जव्हेरगंज
धारं म्यान केली परी अंतरात आहे
ऐसा कितीही बदलो अंतरी अतृप्त आहे! ;)
'अतृप्त' मध्ये कशी धार होती.
In reply to +१ by जव्हेरगंज
सहमत, आयडी बदलून.....अत्म्यास का बांधून ठेविता?????
हेच म्हणतो
In reply to 'अतृप्त' मध्ये कशी धार होती. by बॅटमॅन
बांधलेले आत्मे झपाटत नाहीत असे कुठे तरी वाचल्याचे आठवते..
बॅटोबा बघ रे सापडला संदर्भ कुठेशीक !!!
अ ते आ प्रवासाचा साक्षी.
मस्त
मस्त
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? ;)
@कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा
In reply to कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? by सतिश गावडे
@कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?>> सूर्याला जैशी असते,आत्मबंधी प्रभा!
जसा यमकात असतो, आत्मू हा उभा
In reply to @कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा by अत्रुप्त आत्मा
जसा यमकात असतो, आत्मू हा उभा
@जसा यमकात असतो, आत्मू हा उभा
In reply to जसा यमकात असतो, आत्मू हा उभा by प्रचेतस
@जसा यमकात असतो, आत्मू हा उभा>>> अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा..
)
(आणि स्वतःच आहे यम-कात हुबा!
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?
In reply to @जसा यमकात असतो, आत्मू हा उभा by अत्रुप्त आत्मा
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?
सूर्याला जैशी असते,आत्मबंधी प्रभा!
जसा यमकात असतो, आत्मू हा उभा
अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा..
आणि स्वतःच आहे यम-कात हुबा!
ये रे तू पाणssssडुब्बा पाणssssडुब्बा
(No subject)
In reply to कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? by सतिश गावडे
=)) =)) =))
In reply to कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? by सतिश गावडे
=)) =)) =))
=)) =)) =))
In reply to कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? by सतिश गावडे
=)) =)) =))
+))==))=))
In reply to =)) =)) =)) by प्रचेतस
=)))==))=))
यमक्या आत्मुस =))
In reply to @कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा by अत्रुप्त आत्मा
यमक्या आत्मुस =))
गुर्जी हे नाव काय तितके भारी
गुर्जी हे नाव काय तितके भारी वाटत नाही हो. उगी कामून चेंजवता?
हो ना राव. अत्रुप्त किंवा
In reply to गुर्जी हे नाव काय तितके भारी by अभ्या..
हो ना राव. अत्रुप्त किंवा अत्रुप्त आत्मा किंवा ... ह्या नावांत जी मजा आहे ती हयात नै.
तुम्ही तर बोलूच नका!
In reply to हो ना राव. अत्रुप्त किंवा by प्रचेतस
एवढं चांगलं वल्ली नाव बदललंत ते?
द्दे मारा!!!
In reply to तुम्ही तर बोलूच नका! by बोका-ए-आझम
द्दे मारा!!!
नै हो.
In reply to तुम्ही तर बोलूच नका! by बोका-ए-आझम
नै हो.
कुठे प्रचेतस आणि कुठे आत्मबंध. :)
है ह्हो!
In reply to नै हो. by प्रचेतस
है ह्हो!
कुठे अवांतर आणि कुठे मूळ. :)
बुवा पाडतात नेहमीच गूळ =))
In reply to है ह्हो! by अत्रुप्त आत्मा
बुवा पाडतात नेहमीच गूळ =))
ऋषीचं कुळ, नदीचं मूळ
In reply to बुवा पाडतात नेहमीच गूळ =)) by प्रचेतस
डोक्यात शिरलेलं खूळ आणि बुवांनी पाडलेला गूळ यांच्या फंदात पडू नये!;)
=)) अगदी अगदी.
In reply to ऋषीचं कुळ, नदीचं मूळ by बोका-ए-आझम
=))
अगदी अगदी.
गुर्जी ...
In reply to गुर्जी हे नाव काय तितके भारी by अभ्या..
राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक,
चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते,
यापुढे जावून, तुम्ही परत जर नाव बदलणार असाल, तर कृपया 'आत्म - मुक्त'
हेही नाव घेवू नका… पुन्हा चड्डी कमरेला बांधणारी नाडी (सुटलेल्या अवस्थेत दादा कोंडके स्टाईल) डोळ्यासमोर येइल.
@राग मानू नका, पण आपले नवे
In reply to गुर्जी ... by पगला गजोधर
@राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक,
चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते,>> ओक्के..नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला आत्म आणि बंध हे ऐकल्यावर बंध म्हणजे तुम्ही म्हणता तसं बांधलेलं हा प्राथमिक अर्थ प्रतीत होतो..हे ठिक आहे..पण आत्म या शब्दानी चड्डी कमरेला बांधणारी नाडी - कशी काय दृष्टीला प्रतीत होते??? हे जरा निराळंच आहे. कॉमन नाही.
आत्म या शब्दानी...
In reply to @राग मानू नका, पण आपले नवे by अत्रुप्त आत्मा
कदचित ''स्वतःचा'', असा अर्थ मझ्या मनःचक्षुसमोर येते. (तुम्ही म्हन्ला ते बी मान्य आहे.)
बुवा, आत्मा अवस्थेतून बाहेर
बुवा, आत्मा अवस्थेतून बाहेर या!
तुम्ही कल्पिता तो आत्मा आणि
In reply to बुवा, आत्मा अवस्थेतून बाहेर by हेमंत लाटकर
तुम्ही कल्पिता तो आत्मा आणि मी कल्पितो तो आत्मा वेगळा आहे लट्टू काका.. धन्यवाद.
आणि पुढील चर्चा करायची-असेल तर खरडवहित या.