Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 11:54
दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.
  • Log in or register to post comments
  • 35320 views

प्रतिक्रिया

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 13:47

In reply to मी काय म्हणतो? by चिगो

Permalink

हे मत कशावरुन?

'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.' हे मत कशावरुन?
मी स्वतः विदर्भातला आहे म्हणून इथल्या परिस्थितीची मला पूर्ण जाणीव आहे असे मला वाटते, उद. द्यायचं झालं तर अकोल्याचे देता येईल अकोल्यात महापालिका झाल्यावर चंद्रशेखर रोकडे, श्रीकर परदेशी यांसारखे आयुक्त/जिल्हाधिकारी लाभले होते पण करंट्या राजकीय नेतृत्वाने त्यांचा फायदा न करून घेता पाय ओढण्यातच धन्यता मांडली .
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on गुरुवार, 12/10/2015 - 15:56

In reply to मी काय म्हणतो? by चिगो

Permalink

पण विदर्भ स्वतःच्या

पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का?
फार पूर्वी श्रीकांत जिचकार यांचे लेख वाचल्याचे आठवते ज्यात विदर्भातून त्यावेळेला येनाऱ्या पैशातून विदर्भाची वाढ होउ शकनार नाही असे सांगितले होत. मुख्य कारण होते खाणी किंवा इतर नैसर्गिक साधनातून येणाऱ्या उत्पन्नांचा मोठा हिस्सा केंद्रसरकारला द्यावा लागतो. लेख फार जुने आहेत तेंव्हा लिंक नाहीत. काही बाबतीत आकडेवारी तपासून अभ्यास करायला हवा छोटी राज्ये केल्याने विकास होतो का ढोबळ मुद्दे असे बाजूने मुद्दे - छत्तीसगडमधे राबविलेली सार्वजनिक वितरण प्रणाली ही आदर्श मानली जाते. - रायपुर, बिलासापुर ही शहरे लहानपणांपासून बघत आलोय, शहरांचा विकास वेगळ्या राज्यानंतर झपाट्यात झाला. - हैद्राबाद सारख्या शहरात तेलंगणा वेगळा झाल्याने काही थांबले नाही. उलट निर्णयक्षमतेअभावी रेंगाळून पडलेली कामे वेगात पूर्ण झाली. विजेची समस्या सोडवण्यात यश आले. आता पाणी ही मोठी समस्या आहे त्यावर सरकार काय करते बघायला हवे. विरुद्ध मुद्दे - छत्तीसगडमधला नक्षलवाद तसाच कायम आहे. - झारखंडला कित्येक वर्षे स्थिर सरकार लाभले नव्हते. तिथला भ्रष्टाचार. - राजकीय अस्थिरता आणि त्यानिमित्त्याने होऩारी घोडेबाजी.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 12/10/2015 - 13:16

Permalink

उत्तर महाराष्ट्र झालाच पाहिजे.

विदर्भ स्वतंत्र, मराठवाडा स्वतंत्र, मग उत्तर महाराष्ट्रानेच काय घोडं मारलंय? नाशिक, नगर सह उत्तर महाराष्ट्र झालाच पाहिजे. जिल्हे कमी पडत असतील तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याची थोडी जोडतोड करा. म्हणजे धुळे-जळगाव-नंदुरबारच्या भरीला नाशिक, नगर, औरंगाबाद, बुलडाणा उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि औरंगाबादच्या बदल्यात वाशिम यवतमाळ मराठवाड्यात. विदर्भ खूप मोठा आणि मोठ्या मनाचा आहे. एकदोन जिल्हे इकडेतिकडे झाले तर फरक पडत नाही. पण तुळजापूर आणि जोगाईचें आंबें महाराष्ट्राबाहेर जाणार! आहे, त्यावरही उपाय आहे. मराठवाड्याने 'महाराष्ट्र' या नावावर क्लेम सांगावा. मराठवाड्याला आंदोलनाची सवय आहे. अ‍ॅडिक्शनच जणू. बरीच वर्षं झाली एखादं मोठं आंदोलन नाही झालं. तेव्हा होऊन जाऊं दे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on गुरुवार, 12/10/2015 - 14:27

Permalink

कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा

कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!!
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 12/10/2015 - 14:39

In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद

Permalink

आलास भाड्या!!! ये ये असा समोर

आलास भाड्या!!! ये ये असा समोर ये न एक झाडीबोलीतली कविता दे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on गुरुवार, 12/10/2015 - 14:46

In reply to आलास भाड्या!!! ये ये असा समोर by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

हे घे. ऐश करजो

खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते -- स्वामी संकेतानंद शब्दार्थ बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे, मिरगात= मृग नक्षत्रात तऱ्याची पार= तळ्याचा बाँध सब्बल= पहार
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 14:56

In reply to हे घे. ऐश करजो by स्वामी संकेतानंद

Permalink

दिल खुश

दिल खुश कर दिया स्वामीजी आपने ….
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 12/10/2015 - 16:50

In reply to हे घे. ऐश करजो by स्वामी संकेतानंद

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 14:57

In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद

Permalink

आमचेही अनुमोदण (नाकात बोलून)

आमचेही अनुमोदण (नाकात बोलून) पण पाणीपुरी हे राष्ट्रीय खाद्य ठेवले तरच
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 12/10/2015 - 17:33

In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद

Permalink

वाईच, टेकडीपल्याड आमचं बावधान

वाईच, टेकडीपल्याड आमचं बावधान आहे … त्येबी सामील करून घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 12/10/2015 - 15:03

Permalink

सगळे लोक आपल्या विकासाची री

सगळे लोक आपल्या विकासाची री लावून धरतात. आमच्या मुंबईचा कोणी वालीच नाही. ते काही नाही. समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे. आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 12/10/2015 - 15:21

In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे

Permalink

आम्चं

फक्त पिंप्री-चिंचवड वेगळं राज्य झालं पाहिजे.. चिमण्,वल्ली आहेतच फक्त चौराकाकांची वाट पहातोय..
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on गुरुवार, 12/10/2015 - 17:44

In reply to आम्चं by नाखु

Permalink

(राज्य झाल्यानंतर) पिंपरी

(राज्य झाल्यानंतर) पिंपरी-चिंचवड मधून वेगळं करून विशालनगर राज्य झालंच पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 15:25

In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे

Permalink

३५,००० कोटींच बजेट

आमच्या मुंबईचा कोणी वालीच नाही
साहेब मुंबईच बजेट ३५,००० कोटी रुपये इतके आहे जे कि जगातल्या एखाद्या छोट्या देशाइतके आहे, अजून काय पाहिजे ओ तुम्हाला. आधीच डूबाले आली तुमची मुंबई कुटी जानार बाप्पा एव्हडा पैसा घेवून…
मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.
आणि मुंबई चा पैसा मागतेच कोण विदर्भाला स्वःताच्या हक्काचा पैसा पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on गुरुवार, 12/10/2015 - 15:34

In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे

Permalink

आणि मुंबईचा पैसा पुण्यासह

आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.
आम्हाला मुंबई चा पैसा नकोच. आमचा पैसा थेट हम्रीकेतुन येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 12/10/2015 - 15:42

In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे

Permalink

ठिक आहे. मुम्बइने देखिल

ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 16:33

In reply to ठिक आहे. मुम्बइने देखिल by संदीप डांगे

Permalink

मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे

हेहेहे बावाजी कौन अस करायले तुमी , तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना ….
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 12/10/2015 - 20:05

In reply to मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे by महासंग्राम

Permalink

हे पण बघून घ्या न भौ

हे पण बघून घ्या न भौ Today, the collection is up to 98 per cent in residential, commerical and industrial categories. In agriculture, the collection is just 20-25 per cent. - See more at: http://indianexpress.com/article/cities/mumbai/power-tariff-in-maharashtra-will-remain-higher-than-other-states/#sthash.Z90kB1sC.dpuf http://indianexpress.com/article/cities/mumbai/power-tariff-in-maharashtra-will-remain-higher-than-other-states/ पहा विदर्भाची वीज किती स्वस्त आहे आणि किती महाग आणि हे पण पाहून घ्या न If Vidarbha is hived off, Dr. Jichkar says, ``we will have no funds from day one to run the new State.'' ``The region's share is burdened by a deficit of Rs. 2,848 crores and Monopoly Cotton Purchase Scheme, Employment Guarantee Scheme and such activity will immediately cease since we would not have money to pay salaries.'' All available resources - iron ore, surplus power generation, forestry - would not be enough. In this context, Mumbai - and by implication the rest of the State - subsidises Vidarbha's sustenance. ``Mumbai is the door to the temple of development and we cannot allow a division of the Marathi-speaking State,'' says Dr. Jichkar. ``Are we to agree simply because some people raise the issue which is not a people's issue at all? Are Congressmen to back a demand which was not in the party's manifesto in the recent polls to both Assembly and the Lok Sabha?'' Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''. Inadequate development and progress is cited as one reason for demands for separation apart from ``step-motherly treatment'' by the people of the rest of the State. If the Fazal Ali Commission of the 1950s found Vidarbha viable it was on the relative position of other regions of Madhya Bharat, and that cannot be paraded now in support of a separate State, says Dr. Jichkar. ``It is a political demand unconcerned with its viability and it will convert the region into a agriculture State,'' he adds. http://www.thehindu.com/2000/09/09/stories/0209000g.htm
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 12/11/2015 - 09:40

In reply to हे पण बघून घ्या न भौ by सुबोध खरे

Permalink

म्हणूनच वेगळा विदर्भ नको

If Vidarbha is hived off, Dr. Jichkar says, ``we will have no funds from day one to run the new State.''
सहमत आहे सर म्हणूनच वेगळा विदर्भ नको म्हणतोय मी, पण धागा वेगळ्याच लायनीवर चालला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 12/10/2015 - 16:51

In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे

Permalink

मुंबई केंद्रशासित करून टाकावी ;)

केंद्रशासित करून टाकावी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 12/10/2015 - 16:38

Permalink

पुणे

आमचा पुणे पहिल्यापासूनच स्वतंत्र राष्ट्र असल्याने सदर विषयाला पास !
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 16:40

In reply to पुणे by कपिलमुनी

Permalink

पुणे पहिल्यापासूनच स्वतंत्र राष्ट्र

चुकलात मुनीजी पुणे स्वतंत्र विश्व आहे… ज्यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणारे 'पुणेकर' नावाचे प्राणी राहतात
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश पाटील on गुरुवार, 12/10/2015 - 16:52

Permalink

आमास्नी बी आमचा कवठे महांकाळ

आमास्नी बी आमचा कवठे महांकाळ आणि तासगाव तालुका सांगलीस्न येग्ळा करुनशान सोतंत्र राज्य करून द्या... कारन आमच्याकडबी पान्याचा, उसाला आन द्राक्षाला भावाचा, कुस्ती पैल्वानास्नी चांगल शिक्शान आन प्रोत्सानाचा, लावणी आन तमाशाला चांगल्या प्रेक्षकांचा, यष्टी ला वडापचा, आन बुकं शिकलेल्या पोरास्नी नोकरी धन्ध्याचा लय मोठा प्राब्लेम हाय...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/10/2015 - 17:12

In reply to आमास्नी बी आमचा कवठे महांकाळ by सतिश पाटील

Permalink

मी तर म्हणेन एकूणच सांगलीचा

मी तर म्हणेन एकूणच सांगलीचा पूर्वभाग तसाही तोडला तरी कै अडचण नाय. =))
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 12/10/2015 - 17:39

In reply to मी तर म्हणेन एकूणच सांगलीचा by बॅटमॅन

Permalink

ताकारी कराड रोड अजुन

ताकारी कराड रोड अजुन डोसक्याला शॉट हाय का हो गॉथम नरेश? तिकड़े तुमची बॅटमोबिल बी पंचर होईल देवानु =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on गुरुवार, 12/10/2015 - 17:51

In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

लवकर तोडा नायतर आधी

लवकर तोडा नायतर आधी पार्श्वभाग तुटेल! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 12/10/2015 - 17:54

In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

+१

अजूनही तसाच आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/10/2015 - 19:43

In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

ताकारीहून कराडास कधी गेलो नाय

ताकारीहून कराडास कधी गेलो नाय ओ. एकतर एनेचफोरने डिरेक्ट कराड नैतर कोयनेने ताकारी वगैरे, सबब माहिती नाय.
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on गुरुवार, 12/10/2015 - 19:59

In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

ताकारी कराड रस्ता सुधारला आहे

ताकारी कराड रस्ता सुधारला आहे. पण प्रवास कंटाळवाणा आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 12/10/2015 - 19:02

Permalink

पुण्याच्या विकासाची कारणे.

१) १८१८पर्यंत दोन शतके पुणे हे राज्यकर्त्यांचे वसतिस्थान होते. राजधानीच. २) त्यानंतर ब्रिटिशांनी आपला सैनिकी तळ पुण्याला स्थापन केला. सदर्न कमांड्चा विस्तीर्ण पसारा पुण्यात जागोजागी पसरलेला आहे. ३) गेल्या वीस-पंचवीस वर्षांत एका नजाणत्या (म्हणे) राजाने हिंजवडी, मगरपट्टा आणि तत्सम ठिकाणी आय्टी पार्क नावाच्या अद्भुत नगर्‍या स्थापन केल्या. पुणेकर खूप हुशार. पुणे किती भरभराटीला आले आहे पाहा. अगदी इतर कोणी काहीही न करता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 12/11/2015 - 09:01

In reply to पुण्याच्या विकासाची कारणे. by राही

Permalink

उद्या तुमच्या साठी सण च असेल

उद्या तुमच्या साठी सण च असेल राही ताई. आमच्या काकांचा वाढदिवस आहे म्हणजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 12/10/2015 - 19:11

Permalink

ब्रिटीशांची प्रांतरचना चांगली

ब्रिटीशांची प्रांतरचना चांगली होती ;) नसत्या अस्मिता अन नसते प्रॉब्लेम तरी नव्हते :D
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 12/11/2015 - 09:43

In reply to ब्रिटीशांची प्रांतरचना चांगली by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

अनिरुद्ध बापू कोणत्या आधारावर

अनिरुद्ध बापू कोणत्या आधारावर म्हणता आहात तुमी जरा ते तरी कळू देत ब्रिटीशांच्या प्रांतरचना स्वीकारली असती तर आता जो भारत दिस्तोय तो पण नसता दिसला.
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Fri, 12/11/2015 - 13:59

Permalink

विदर्भातील

विदर्भातील बरीच जनता पुणे , मुंबई येथे राहते आहे . जर विदर्भ वेगळा झाला तर त्यांनी कुठे जायचे याचाही विचार झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 12/11/2015 - 15:37

In reply to विदर्भातील by सिरुसेरि

Permalink

म्हणून वेगळे व्हायचे नाही ना

जर वेगळा विदर्भ होणारच नसेल तर कशाला कुठे जाईल
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 12/11/2015 - 17:22

In reply to विदर्भातील by सिरुसेरि

Permalink

कळलं नाही..

हे कळलं नाही..
विदर्भातील बरीच जनता पुणे , मुंबई येथे राहते आहे . जर विदर्भ वेगळा झाला तर त्यांनी कुठे जायचे याचाही विचार झाला पाहिजे.
म्हणजे काय? ही जनता कुणावर जुलूम-जबरदस्ती, धाकदपटशाही करुन राहते का? आपल्या लायकीने आणि लायकीप्रमाणे नोकरी किंवा कामधंदा करतेय ही जनता.. जरा कलम १९ वाचा स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 12/11/2015 - 17:45

In reply to विदर्भातील by सिरुसेरि

Permalink

सध्यासुद्धा

सध्यासुद्धा भारतातल्या झाडून सार्‍या राज्यांतले कित्येक लोक मुंबईत राहातात. त्यांचे काय वाईट झाले आहे? मुंबईतून कोणी कुठे बाहेर जात नाही. उलट इथे येणारेच जास्त आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Fri, 12/11/2015 - 18:45

In reply to विदर्भातील by सिरुसेरि

Permalink

अहो वेगळा देश म्हणत नाहीयेत

अहो वेगळा देश म्हणत नाहीयेत हो ते! राज्य म्हणत आहेत! पुण्या-मुंबईच्या लोकांना काय वाटत असत काय माहित! भारतात कुठेही जाऊ शकतात भारतीय लोक...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/11/2015 - 17:34

Permalink

जांबूवंतराव धोकटे ते देवेंद्र फडणवीस .

व्हाया वेगळा विदर्भ वाले....तीच दारू आणि तीच झिंग.... असो, जोपर्यंत ह्या जगात "मिपा" हे मध्यवर्ती ठिकाण आहे, तोपर्यंत वेगळा विदर्भ असो की तेलंगणा....आपल्याला काही फरक पडत नाही.... "वेगळा विदर्भ आणि हुबळी-धारवाड-बेळगाव सहित महाराष्ट्र, ही राजकीय पक्षांची मतांची कुरणे आहेत." असे आमचे बाबा म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Sat, 12/12/2015 - 14:32

In reply to जांबूवंतराव धोकटे ते देवेंद्र फडणवीस . by मुक्त विहारि

Permalink

मुवि

ते जांबुवंतराव धोटे... धोकटे नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Fri, 12/11/2015 - 18:22

Permalink

विदर्भात एकदा सर्वमत घ्यायला

विदर्भात एकदा सर्वमत घ्यायला पाहीजे, तिथल्या सामान्यांचे मत कळुन येइल. तरी पन तिथली परिस्थीती फारच बिकट असावी, अगदी म्हणजे अगदीच कारण कर्ज आमच्यावर पन असतात, तरी १० गुंठे/अर्धा एकर लय झालच तर ५/६ एकर वाले पोटापुरते तरी उत्पादन काढु शकतात, कर्ज फेडु शकतात पन तिकडे मात्र कितीही जमिन आसली तरी दैव काय साथ देत नाही आन शेवटी नाईलाजाने बिचारा शेतकरी कायतरी बरेवाईट करुन घेतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 12/11/2015 - 19:02

In reply to विदर्भात एकदा सर्वमत घ्यायला by भीमराव

Permalink

बाबू दादा

बाबू दादा सार्वमत घेण्याच्या अगोदर तेथील लोकांना वस्तुस्थिती समजावून देणे हे जास्त आवश्यक आहे.अचाट आणी अफाट आश्वासने दिल्यानंतर ती प्रत्यक्षात आणणे हे सोपे काम नाही. रोजगार निर्मिती करणे किंवा पाण्याची उपलब्धता करणे हे दोन पाच वर्षाचे काम नसते तर दहा ते पंधरा वर्षाचा मोठा कार्यक्रम असतो त्याची तयारी कोणत्याच राजकीय नेत्याची नसते. त्यांना पाच वर्षात आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करायचं असतो कारण पुढच्या पाच वर्षात काय होईल हे कोण सांगू शकेल? उद्या कापूस एकाधिकार खरेदी किंवा रोजगार हमी योजनात पैसे नाहीत म्हणून लोकांचे पैसे देणे सरकारने थकवले तर पूर्वीची परिस्थिती बरी होती असे वाटू लागले तर? मूळ स्वतंत्र राज्य झाल्याने सर्व सामान्य जनतेचा भक्कम असा कोणताही फायदा होत नाही होतो तो फक्त राजकारणी आणी बाबू लोकांचा. तेवढी जास्त पदे निर्माण होतात तेवढे जास्त अधिकार (आणी पर्यायाने जास्त कुरणे) हातात येतात. बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता आंध्र प्रदेश चे विभाजन झाले परंतु त्यात सामान्य माणसाला ना जास्त रोजगार उपलब्ध झाला ना शेतीला जास्त पाणी. पूर्वीच्या आणी आताच्या स्थितीत काहीही बदल झालेला नाही. कोउ राजा होउ हमे का हानी? स्वतंत्र राज्य व्हावे हि तो नेत्यांची इच्छा असते जनतेची नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 12/14/2015 - 16:35

In reply to बाबू दादा by सुबोध खरे

Permalink

बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता

बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता आंध्र प्रदेश चे विभाजन झाले परंतु त्यात सामान्य माणसाला ना जास्त रोजगार उपलब्ध झाला ना शेतीला जास्त पाणी. पूर्वीच्या आणी आताच्या स्थितीत काहीही बदल झालेला नाही.
नक्की का डॉक्टरसाहेब? जर छोटी राज्यं केल्यानी काहीच फरक पडत नसेल, 'Decentralised govt' चा काहीच फायदा नसेल, तर मग अख्खा देश हा एकच राजकीय प्रदेश का असू नये? तुम्हाला असं म्हणत नाही, पण येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय माणूस जणू वेगळा विदर्भ मागून देशद्रोहच करत आहे, असा नूर दिसत आहे. मी मेघालयात आहे. शिलाँग एकेकाळी अक्ख्या आसामची ज्यात तेव्हा आसाम, नागालँड, मेघालय आणि इतर बरीच राज्ये यायची. तरीही 'मेघालय'चा विकास (जो काही झाला असेल तो) ते आसामपासून वेगळा झाल्यावर झाला खर्‍या अर्थाने.. छत्तीसगड आता स्वतःच्या औद्योगिक, आर्थिक विकासावर भर देत आहे, झारखंड पण.. शेवटी त्यांना वेगळं व्हावसं का वाटलं, ह्याचाही विचार करावा की..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Mon, 12/14/2015 - 16:40

In reply to बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता by चिगो

Permalink

येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय

येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय माणूस जणू वेगळा विदर्भ मागून देशद्रोहच करत आहे,
चिगो - असे नाहीये. उलट घ्या काय पाहिजे तो वेगळा विदर्भ असे मत आहे. पण अनुशेष किंवा पुण्या मुंबई च्या नावानी बोटे मोडु नका इतकीच अपेक्षा आहे. मी तर पहिल्याच प्रतिसादात लिहीले होते, मराठवाडा मागत नसले कोणी तरी आधी वेगळा करा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 12/11/2015 - 19:03

Permalink

फुकटचा प्रशासकीय खर्च मात्र

फुकटचा प्रशासकीय खर्च मात्र डोक्यावर बसतो
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 12/11/2015 - 21:37

Permalink

माझा जुना प्रतिसाद

लेखक महोदयांना आवाहन. अशा विषयांवर नवा त्रोटक चर्चाविषयाचा धागा मांडण्यापूर्वी मिपावर या विषयावरचे जुने धागे नजरेखालून घालावे. काही पूर्णपणे नवे मुद्दे असल्यासच नवा धागा काढावा... तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? href="/node/27093">तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? href="/comment/557371#comment-557371">माझा प्रतिसाद या ठिकाणी च्योप्य पस्ते करतो. तसेच सदर धाग्यावर उत्तम चर्चा झालेली आहे. या विषयात रस असणार्‍यांनी ती आवर्जून वाचावी ही विनंती. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरेल का हे सांगणे तसे अवघडच आहे. यापूर्वी १९९६-९७ मध्ये व २००१ मध्ये आंदोलनांना बऱ्यापैकी जोर होता. या धाग्यावर अनेक अभ्यासू मते मांडण्यात आली आहेत. मी स्वतः अमरावतीकर असल्याने हा विषय फारच जवळचा आहे. इतरांच्या मतांबद्दल आदर दर्शवून मी माझी निरीक्षणे व मते मांडू इच्छितो. सर्वप्रथम विदर्भाला मागासलेला प्रदेश जे म्हंटले जाते त्यामुळे एक चुकीचे चित्र विदर्भाला जवळून न ओळखणाऱ्यांच्या मनात उभे राहते. पायाभूत सुविधा जसे रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण असे अत्यंत महत्त्वाचे निकष लावल्यास विदर्भ कुठल्याही प्रकारे मागासपणाच्या व्याख्येत बसत नाही. उलट या बाबतीत राष्ट्रीय सरासरीच्या वरच असावा. विदर्भाची दशकानुदशके असलेली समस्या म्हणजे शेतीसाठी आवश्यक असणारा पाणीपुरवठा नसणे. शेतजमीन सुपीक असली तरी कोरडवाहू शेती करताना निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा गोरगरीब शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जातो. महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या इतर भागांत राजकीय इच्छाशक्तीमुळे व नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेमुळे जी सिंचनव्यवस्था निर्माण होऊ शकली ती विदर्भात नाही होऊ शकली. त्याखेरीज मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल असे उद्योगधंदे विदर्भात नसणे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मुंबईपासून जवळ असणाऱ्या भागांना मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र जवळ असण्याचा नैसर्गिक लाभ मिळाला तसा तो विदर्भाला मिळाला नाही. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी याबाबतीत दूरदृष्टी दाखवून थोडेबहुत उद्योगधंदे विदर्भाकडे वळवले असते तर आज नक्कीच चित्र वेगळे असते. मध्य भारतातले सर्वात मोठे व्यापारी केंद्र व उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले नागपूर शहर विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी बलस्थान ठरले असते व रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होऊन व नवे रोजगारकेंद्र बनले असते. ज्यायोगे प्रादेशिक असमतोल निर्माण झाला नसता. अनेकांना असे वाटते की आजवर सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्रिपदावर बसणारी व्यक्ती (स्व वसंतराव नाईक) हे विदर्भातले होते तरीही त्याचा विदर्भाला फारसा उपयोग झाला नाही. याबद्दल माझे निरीक्षण असे आहे की मराठी माणूस जसे राष्ट्रीय स्तरावर मोठ्या हुद्द्यावर पोचला की तो जसे स्वतःच्या राज्याला झुकते माप देणे अयोग्य समजतो तसेच विदर्भातला माणूस राज्यस्तरावर पोचल्यावर घडते. स्व वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तो काळ सरून ४ दशके होत आली आहेत. त्यानंतर दीड वर्षांसाठी सुधाकरराव नाईक व युतीच्या काळात नितीन गडकरी यांच्याखेरीज राज्यस्तरावर महत्त्वाचे पद भुषवलेली विदर्भातील व्यक्ती मला तरी स्मरत नाही. त्यातही गडकरी यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले ते काही मुख्यमंत्रिपदावर किंवा केंद्रीय मंत्रिपदावर नव्हते. विदर्भात खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या दोन संधी पहिली १९९१ च्या उदारीकरणानंतर व ९० च्या दशकाच्या शेवटी व गेल्या दशकाच्या सुरुवातीला माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा राज्याकडे चालून आलेल्या ओघाचा न्याय्य हिस्सा विदर्भाकडे वळविण्यास राज्य सरकारे कमी पडली किंवा त्यांची तशी इच्छाशक्ती होती का यावरही साशंकता वाटते. कागदोपत्री दिसणारा आर्थिक अनुशेष तर आहेच पण संधींचा मोठा अनुशेष वर्षानुवर्षे तसाच आहे. बरेचदा असे म्हंटले जाते की मग विदर्भातले नेते यावर आवाज का उठवत नाहीत? यावर एक उदाहरण देतो. २००४ च्या निवडणुकीतील पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारात स्वतः शरद पवार २००३-०४ मधील पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाबद्दल तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते नितीन गडकरी यांना दोष देत होते. कारण विदर्भाचा निधी इतर कारणांसाठी वापरला जात असल्याबाबत त्यांनी आक्षेप घेणारे पत्र राज्यपालांना लिहिले होते व राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांद्वारे सरकारवर त्या बाबतीत बंधन आणले होते. ज्यांना राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून गौरवले जाते तेच असे वागत असतील तर इतर राज्यस्तरीय नेत्यांकडून प्रादेशिक समतोल राखण्याची काय अपेक्षा बाळगायची. वेगळे राज्य झाल्यास नेमका काय बदल होईल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाजगी उद्योगांद्वारे गुंतवणुकीसाठी तुलनेत लहान क्षेत्रफळाचे स्वतंत्र मार्केटींग करता येईल. देशातील इतर औद्योगिक केंद्रांपेक्षा सध्यातरी विदर्भात लागणारा खर्च (जमीनीच्या किमती, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी) तुलनात्मकरित्या कमी राहील. मी २००० साल पूर्वीचे मध्य प्रदेशचा भाग असणारे छत्तिसगढ व नंतरचे छत्तिसगढ जवळून पाहिले आहे. आज त्या भागाची जी प्रगती झाली आहे ती मध्य प्रदेशात राहून नक्कीच झाली नसती. विदर्भ राज्य वेगळे झाल्यास उर्वरित महाराष्ट्रालाही लाभ होईल. गेले काही वर्षे सत्ताधारी इतर भागांतील विकास योजनांना निधी अपुरा पडू लागला की विदर्भाचा अनुशेष भरून काढला जातोय अशी कारणे सांगतात. असले काही कारण तेव्हा उरणार नाही. विदर्भातील सामान्य जनतेचा वेगळ्या राज्याला पाठिंबा नाही असा पण मुद्दा वर आलाय. माझे असे निरीक्षण आहे इतर मराठी जनांप्रमाणेच विदर्भातली जनताही सोशिक आहे. तेलंगाणा वगैरे सारखे हिंसक आंदोलन विदर्भात कधीच होणार नाही. विदर्भाचे वेगळे राज्य झाले तर बहुतांश सामान्य जनतेला समाधानच वाटेल अन नाही झाले तरी आजवर जसे जुळवून घेतले आहे तसे जुळवून घेण्याचा प्रयत्न निरंतर सुरू राहील. बाकी वेगळ्या राज्याची मागणी केल्यास बरेच लोक या प्रकारे आक्षेप घेतात की वेगळा देशच मागितला जात आहे. आजच्या विदर्भाचा भूभाग वेगळ्या राज्यात राहिला काय किंवा महाराष्ट्रात राहिला काय शेवटी एकाच देशात असणार आहे. आंध्र प्रदेश सारखी अविश्वासाची, खुनशीपणाची भावना विदर्भासकट महाराष्ट्रात कुठेही आढळत नाही. विदर्भ महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासूनच मराठी माणसाची सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रतीके एकच होती ती नंतरही एकच राहतील. देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्राची कूर्मगतीने प्रगती होत राहण्यापेक्षा महाराष्ट्र व विदर्भ या राज्यांच्या प्रगतीची घोडदौड होणे व्यापक हिताचे ठरेल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sat, 12/12/2015 - 13:20

Permalink

वर कुठेतरी मुंबईचे लोक खुप

वर कुठेतरी मुंबईचे लोक खुप कष्ट करतात आणि बाकीचे नुसतेच बसुन असतात असा हीणकस प्रतिसाद आला आहे. जर सर्व गोष्टी मुंबईतच उपलब्ध करुन दिल्या तर लोक इथेच येणार ना. फ्लाय ओव्हर्स, मेट्रो, मोनो , सीलिंक, लोकल्स १२ ड्ब्बा त्यांच्यात सतत वाढ, आता तर एसी लोकल्स पण येणार, आयटीचे प्रचंड मोठे एसीझेड्स. मग लोक येणारच रोजगारा साठी. उर्वरीत महराष्ट्राने नुसते बघत बसायचे आणि आळशी म्हणुन हीणवुन घ्यायचे. इथले लोक(सर्व नाही) मात्र आम्ही पैसे कमवतो आणि सर्व गोष्टी विकत घेण्याची ऐपत बाळगतो हा माज करणार. ४ दीवस दुध , भाजीपाला आला नाही तर ह्यांची फे फे उडते. व्हीजन नसलेले नेते मुंबईत बसुन फक्त मूंबईचा विकास बघणार आणि त्याचे बेनेफीशरी ऐट करणार. नशीबाने सर्वच्या सर्व जण मुंबईत येत नाहीत, नाहीतर मूंबईची काय हालत होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 13:41

Permalink

बाकीचे नुसतेच बसुन असतात असा

बाकीचे नुसतेच बसुन असतात असा हीणकस प्रतिसाद आला आहे. असे आपण कुठे वाचलेत? "फ्लाय ओव्हर्स, मेट्रो, मोनो , सीलिंक, लोकल्स १२ ड्ब्बा त्यांच्यात सतत वाढ, आता तर एसी लोकल्स पण येणार, आयटीचे प्रचंड मोठे एसीझेड्स." या गोष्टी गेल्या १५-२० वर्षातील आहेत. मुंबईची प्रगती गेल्या १०० वर्षातील आहे. माझा भाऊ १९८५ साली व्ही जे टी आय मधून विद्युत अभियंता झाला आणी घरापासून ५ किमी अंतरावर कळव्याला सिमेन्स सारख्या कंपनीत लगेच नोकरी मिळाली ३ वर्षात कंपनीची गाडी न्यायला आणायला येत असे. असे असूनही तो स्वतःचा धंदा करायचा म्हणून संध्याकाळी ५ ते रात्री १० आपली मोटार सायकल घेऊन उद्योगात खेपा मारत असे. रात्री १० वाजता मोटार सायकल दुरुस्त करण्यासाठी हार्ड वेअर चे दुकान उघडे असे. लग्न होईपर्यंत आरामाची नोकरी केली आणी नंतर ती सोडून स्वताचा उद्योग सुरु केला आणी आज त्याच्या मालकीचे ३ कारखाने आहेत आणी यात १००% कामगार आणी इंजिनियर मराठी आहेत. सकाळी ९ ते रात्री बारा दुकाने उघडी असतात दिवाळीच्या वेळेस सोमवारची सुटी नसते.मुलुंड मध्ये २४ तास उघडी औषधाची दुकाने ९ ते १० आहेत. मी लष्करी नोकरी सोडून मुंबईत राहायला आलो तेंव्हा माझ्या जन्मगावी( मुलुंड मध्ये) मला एकही डॉक्टर ओळखत नव्हता.कारण वयाच्या १८ वय वर्षी बाहेर गेलेला मी ४१व्या वर्षी परत आलो.( लष्करच्या नोकरीचा मला व्यवसायाच्या दृष्टीने कोणताही फायदा न होता तोटाच झाला) तीन महिने मुलुंड मधील प्रत्येक डॉक्टरच्या दवाखान्यात जोडे झिजवले तेंव्हा माझ्या कडे रुग्ण यायला लागले. एकदा ते यायला लागले. तेंव्हा पासून मौखिक कीर्तीवर माझा दवाखाना चालला आहे. मी कमांडर म्हणून निवृत्त झालो म्हणून घरी बसलो असतो तर कुत्र सुद्धा आला नसतं विचारायला. गेली सात वर्षे उरलेल्या वेळात बसून मी शेअर बाजाराचा अभ्यास केला. "दुसरा" काहीतरी व्यवसाय हवा म्हणून. आमचा चुलत भाऊ पिडीलाईट सारख्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी असून उरलेल्या वेळात (संध्याकाळी ५ ते ९) चामड्याच्या बुटांचे दुकान चालवतो. त्याची पत्नी ते दुकान सकाळी ९ ते ५ पाहते. ही मुंबईची संस्कृती आहे. याला मुंबई पैशाच्या मागे लागली आहे असेही हिणवले जाते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक कामे करतात.ज्यांना जळायचे आहे ते जळत राहतात आणी कामे न करण्याची कारणे देत राहतात. ज्यांना काम करायचे आहे असे अनेक प्रगतीशील शेतकरी, उद्योजक महाराष्ट्रात सर्वत्र दिसतील पण त्यांचा आदर्श ठेवून कष्ट करण्याऐवजी दुसर्याचा मत्सर करणे सोपे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Sat, 12/12/2015 - 18:29

In reply to बाकीचे नुसतेच बसुन असतात असा by सुबोध खरे

Permalink

सहमत

लोटांगण नतमस्तक
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sat, 12/12/2015 - 13:53

Permalink

विद्युत अभियंता झाला आणी

विद्युत अभियंता झाला आणी घरापासून ५ किमी अंतरावर कळव्याला सिमेन्स सारख्या कंपनीत लगेच नोकरी मिळाली
बरेच तरुण अभियंते होतात पण त्याना आसपास नोकरी मिळत नाही. कारण अशा अस्थापनाच नाहीत. धंदा सुरु करायचा तर आसपास तसे कारखाने हवेत. प्रत्येक तरुणात कष्ट करण्याची इछा असते. फक्त मुंबईचेच कष्ट करतात आणि बाकीचे मत्सर करतात हे म्हणणे बरोबर नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com