Skip to main content

सॅन बर्नार्डिनोचे अतिरेकी दांपत्य

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 06/12/2015 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
सॅन बर्नार्डिनो हे लॉस अ‍ॅन्जेलिस ह्या महानगराच्या पूर्वेला असणारे एक शहर. इथे २ डिसेंबर रोजी एक अतिरेकी हल्ला झाला. त्यात १४ नागरिक बळी पडले आणि तितकेच जखमी झाले. हल्ला करणारे अतिरेकी म्हणजे पाकिस्तानी वंशाचे नवरा बायको. एक अत्यंत खळबळजनक, अनपेक्षित घटना असे ह्याचे वर्णन करता येईल. दहशतवादी हल्ल्याचा हा अमेरिकेत तरी आजवर न दिसलेला प्रकार आहे. आता हा भविष्यातील अशाच प्रकारच्या घटनांची नांदी आहे का एकमेवाद्वितीय घटना ते काळच सांगू शकेल. ह्यातील एक अतिरेकी सैयद फारुक हा पाकिस्तानी आईबापांचा अमेरिकेत जन्मलेला मुलगा. आईबापांचे वितुष्ट आले आणि ते विभक्त झाले. बाप आईला मारहाण करत असे असेही दिसते आहे. पण इस्लामी मूलतत्त्ववाद वगैरे गोष्टींशी ह्या कुटुंबाचा संबंध असल्याचे आढळलेले नाही. यथावकाश शिक्षण वगैरे पूर्ण करून हा माणूस सॅन बर्नार्डिनो शहरात हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून रुजु झाला. दोन वर्षापूर्वी ह्या माणसाने एका पाकिस्तानी स्त्रीशी लग्न केले. ही बाई म्हणजे तश्फीन मलिक. ही पाकिस्तानी असली तरी दीर्घ काळ सौदी अरेबियात वास्तव्यास होती. ह्यांचे लग्न कसे जमले वगैरे गोष्टी अजून अज्ञात आहेत. ही अत्यंत धार्मिक आणि परंपरावादी होती. सैयद हाही गेले काही वर्षे अत्यंत धार्मिक मुसलमान बनला होता असे त्याचे सहकारी सांगतात. सहा महिन्यापूर्वी ह्या जोडप्याला एक मुलगी झाली. एकंदरीत हे लोक अतिरेकी असतील असा संशयही आला नसता. पण २ डिसेंबरला सैयदच्या ऑफिसचा हॉलिडे पार्टीचा कार्यक्रम होता. आधी प्रशिक्षण आणि नंतर पार्टी असा बेत होता. सैयद त्या कार्यक्रमाला आला. फारसा बोलत नव्हता. मधेच तो तिथून निघाला. काही लोकांच्या मते त्याची काही सहकार्‍यांशी वादावादी झाली आणि तो चिडला होता. पण नंतर तो आला तो आपल्या पत्नीसह आणि पूर्ण शस्त्रसज्ज! आल्याआल्या दोघांनी बेछूट गोळीबार करुन अनेक लोक मारले. पार्टीला ९० लोक आमंत्रित होते आणि निदान ७० ते ८० उपस्थित होते. असले भयंकर घडल्यावर प्रचंड गोंधळ उडाला. लोकांनी पोलिसांना बोलावले. मग ही जोडगोळी आपल्या वाहनातून पळून जाऊ लागली. पोलिसानी पाठलाग केला. मोठा गोळीबार केला आणि ह्या दोघांना ठार केले. ह्या माणसाने तीन पाईप बाँब बनवून तेही त्या पार्टीच्या ठिकाणी लपवले होते. सुदैवाने ते फुटले नाहीत आणि मनुष्यहानी थोडी कमी झाली. नंतर पोलिसांनी ह्या जोडप्याच्या घराची तपासणी केली तेव्हा तिथे अनेक शस्त्रे, बाँब बनवायची सामग्री मिळाली. म्हणजे केवळ कुणीतरी चिडवले म्हणून हे घडले नसावे तर पूर्ण तयारीनिशी ह्या अतिरेकी जोडगोळीने हा कट रचला असावा असे दिसते आहे. ज्या प्रकारच्या बंदुका, गोळ्या, काडतुसे वापरली गेली त्यातली काही कॅलिफोर्नियात बेकायदेशीर समजली जातात त्यामुळे अशी शस्त्रास्त्रे मिळवण्याकरता अन्यही लोकांनी मदत केली असणे शक्य आहे. आयसिस ह्या जगप्रसिद्ध इस्लामी अतिरेकी संघटनेशी ह्या लोकांचे धागेदोरे असावेत असा संशय आहे. १. सहा महिन्यांची मुलगी असूनही तिला वार्‍यावर सोडण्याइतकी निष्ठूरता हे दांपत्य दाखवू शकले. कदाचित आपला सरळमार्गी असल्याचा देखावा पूर्ण व्हायला मदत व्हावी म्हणून एक मूल जन्माला घातले असणे शक्य आहे. २. आता एक गैरमुस्लिम सामान्य अमेरिकन माणूस निरुपद्रवी दिसणार्‍या मुस्लिमावर कसा विश्वास ठेवेल? कुठला मुस्लिम अचानक ज्वालामुखीसारखा उफाळून हल्ला करुन आपल्याला ठार मारणारच नाही अशी खात्री कोण देणार? ३. ह्या फारुकच्या शेजार्‍यांनी असे सांगितले की त्यांना रात्री अपरात्री अनेक लोक त्याच्या गॅरेजमधे सामानाची नेआण करताना दिसत असत. पण काही तक्रार केली तर आपण वर्णद्वेष्टे असल्याचा समज होईल अशा भीतीने त्यांनी काही केले नाही. अशा प्रकारे अपराधीत्वाची भावना सर्वसामान्य अमेरिकन लोकांच्या मनात भरवून देण्यात माध्यमे व सरकार यशस्वी झाले आहे पण अशा ठिकाणी ते घातकही ठरते आहे. ४. ह्या माणसाच्या कुटुंबियांनी साफ कानावर हात ठेवून असा दावा केला आहे की असे काही घडेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती. पण हे कितपत खरे मानायचे ते काळच सांगेल. ५. ह्या दहशतवाद्याच्या घराच्या मालकिणीने पोलिस तपास केल्यावर तात्काळ हे घर पत्रकारांना उघडून दिले. या, हवे तो फोटो व्हिडियो घ्या असे आमंत्रण दिले. अशा प्रकारे त्या अतिरेकी घरातले सगळे सामान अमेरिकन लोकांना बघायला मिळाले. त्यात अनेक गोष्टी ज्यांचा ह्या गुन्ह्यात सहभाग असू शकेल अशा आढळल्या. जसे पासपोर्ट, लायसेन्स, अनेक फोटो. पोलिसांनी इतक्या झटपट तपास कसा पूर्ण केला आणि इतक्या त्वरेने ते घर पत्रकारांना उघडून का दिले गेले हे एक गूढच आहे. ६. सरकारी पातळीवरून हा अतिरेकी हल्ला आहे असे अनेक दिवस सांगितलेच जात नव्हते. प्राथमिक लक्षणे इस्लामी अतिरेकाची दिसत असताना हा एका असंतुष्ट कर्मचार्‍याने आपल्या सहकार्‍यांवर केलेला हल्ला (अर्थात वर्कप्लेस व्हाय्लन्स) असल्याचा दावा केला जात होता. हा सावधपणा म्हणायचा की बोटचेपेपणा हेही अनाकलनीय. ७. ह्या विध्वंसक कार्यक्रमामुळे अतिरेकी इस्लामी जगताचा नक्की काय फायदा झाला? डझनभर माणसे मेली. त्यांचे जवळचे नातेवाईक उध्वस्त झाले. अनेक लोक जखमी झाले. अनेक लोक संतप्त झाले असतील. पण आयसीस वा तत्सम खिलाफत स्थापनेची चळवळ आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ गेली का? माहित नाही. ८. आपल्या अपत्यसंगोपनाची एक उपजत ओढ धर्माच्या अतिरेकी प्रभावाने नष्ट करता येते हे खरे वाटत नाही. केवळ स्वर्गप्राप्ती, ७२ कुमारिका वगैरे कारणे इतकी प्रबळ होऊ शकतात? ९. अरबी लोक भारतीय उपखंडातील मुस्लिमांना तुच्छ मानतात. त्यांना दुय्यम समजतात. तरीही अशा अरबी संघटनेकरता आपले सर्वस्व द्यायची तयारी ह्या जोडप्याने कशी बरे दाखवली?

वाचने 19352
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by ट्रेड मार्क

झालं...? एवढ्या प्रतिसादाचा मूळ मुद्द्याशी काहीही संबंध नाही. मुस्लिम धर्मात भयंकर समस्या आहेत. २५च कशाला १०० टक्के म्हणा. काहीच प्रश्न नाही. पण त्यासाठी हिंदूंना मधे आणायची काय गरज आहे काय? जे लोक हिंदूहितविरोधी बोलत, करत असतील त्यांना आपण हिंदूद्वेष्टे म्हणा. काहीच प्रश्न नाही. जे लोक देशहितविरोधी बोलतात, करतात त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणा. काहीच प्रश्न नाही. जे मुस्लिमांचे लांगूलचालन करतात त्यांना मुस्लिमप्रेमी म्हणा. काहीच प्रश्न नाही. हा संपूर्ण धागा अमरिकेत एका मुस्लिमाने केलेल्या गोळीबाराशी संबंधीत आहे. ओके? त्यात तुम्ही जो प्रतिसाद दिलाय त्यात हिंदूंना 'असेच तसेच' असे म्हणून टोमणे मारायची काय गरज? चला तुमचा प्रतिसाद पुन्हा बघूया.
का आणि किती दिवस आपणच या लोकांना पाठीशी घालणार आहोत? सगळेच मुसलमान अतिरेकी असतात असं नाही पण ते कधी पण बनू शकतात हे मान्य करायला पाहिजे आता. जेव्हा त्यांचा धर्म मध्ये येतो तेव्हा ते आक्रमक होतात. इस्लाम खतरेमे है म्हणलं की एरवी साधे सुधे दिसणारे पण जिहाद वर उतरतात. आत्ता मुसलमानांवर दाखवल्या जाणाऱ्या अविश्वासाला तेच कारणीभूत आहेत. कोणी तथाकथित चांगला मुसलमान या अतिरेक्यांची जाहीर निंदा करतो का? यांचे धर्मगुरू या जिहादींना धर्मातून बेदखल करतात का? उलट लोकमतवर मात्र हे सहज हल्ला करतात आणि आपण त्याचा साधा निषेध ही करत नाही.
ह्याला एकही शंका न उपस्थित करता पूर्ण अनुमोदन. लोकमतवर झालेल्या हल्ल्यासंबंधित धाग्यावर मी माझे योग्य ते मत दिले आहेच.
या उलट हिंदू! आपणच आपल्या लोकांना शिव्या देत बसतो, अर्थात तो शापच आहे आपल्याला. आपल्याला आपल्या धर्माशी काही घेणं नसतं ना अभिमान असतो. उलट आपला धर्म कसा फालतू आहे आणि इस्लाम कसा चांगला आहे हे सांगितलं की कसे आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होतं. दुर्दैव आहे.
इथे हिंदूंचाच उल्लेख करण्याचे काय कारण? मी इथे हे सतत पेस्ट करत आहे कारण आपण अगदी स्वैर पद्धतीने वरील वाक्ये सरळ ठोकून दिली आहेत. त्याची कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही. तुम्हाला केवळ ह्याच विधानांबद्दल विचारले असता आपण फक्त मुस्लिमकेंद्रित प्रतिसाद देत आहात. म्हणजे विधाने हिंदूंकेंद्रित आहेत आणि त्याचे उत्तर म्हणून मुस्लिम केंद्रित प्रतिसाद कसे चालतील?
इथे मी काही हिंदू लोकांबद्दल बोलतोय जे जर मुसलमान विरोधी बोललं की लगेच हिंदूंमध्ये कश्या वाईट गोष्टी आहेत ते सांगतात. जे तुम्ही पण त्याच प्रतिसादात केलंय. तर सुधारणा सरसकट सगळ्या हिंदूंना नको असून फक्त याच परिच्छेदातील पहिल्या वाक्यात सांगितल्याप्रमाणे जे लोक करतात त्यांच्यासाठी हवी आहे. आणि सुधारणा काय पाहिजे तर तुलना नीट तरी करावी,
हिंदूंमधे काय वाईट गोष्टी आहेत हे मी सांगितले कारण तुम्हीच म्हटले कि ह्यांना फक्त आपल्या धर्मात सुधारणा करायचं आठवतं, त्यासाठी उदाहरणं दिलीत. एका मिनिटासाठी मुस्लिमप्रश्न विसरून जा. मी जेव्हा म्हणतो माझ्या धर्मात सुधारणा हवी तेव्हा त्याची तीव्रता किती आहे ते मी माझ्या पातळीवर ठरवणार, त्याचे मूळ कारण आणि उपाय मला समजतात कारण मी हिंदु घरात, समाजात वाढलोय. त्याची फूटपट्टी म्हणून इतर कुठला धर्म का निवडायचा? मी माझ्या धर्मात सुधारणा नाही करू शकत का? माझ्या धर्मात किती टक्के समस्या आहेत हे मी दुसर्‍या धर्माकडे पाहून का ठरवावं? की दुसर्‍या धर्मात तर लोक सरळ माना कापतात, आपण तर फक्त जात-बहिष्कार घालतो. दुसरे तर हात कापतात, आपण तर फक्त तोंडात विष्ठा घालतो. ही तुलना करायची तरी का? हिंदू धर्मातल्या सुधारणा ह्या वेगळ्या पातळीवर आहेत. त्या करणे एक हिंदू म्हणून माझ्यासाठी आजही आवश्यक आहे. मला माझा धर्म व त्याचे लोक सर्वोत्तम पाहिजेत. त्यांचा बेंचमार्क तेच असले पाहिजेत. वर्गातल्या दुसर्‍या मुलाला किती मार्क्स मिळाले ह्यावर आपल्याला किती मिळवायचे हे ठरत नसते. आपल्याला आता ९० मिळाले तर पुढच्यावेळेस ९५ ची तयारी करावी. दुसर्‍याला ४५ मिळतात मग मला ६० मिळाले तरी पुरे असे कोणी करतं का? तेव्हा हिंदूंची धर्म सुधारणा हा माझ्यासाठी वेगळा विषय आहे. त्याचा मुस्लिम धर्माशी संबंध जोडायचे काहीच कारण नाही.
जे चूक आहे त्याला चूक म्हणावं (त्यात धर्म आड आणू नये) आणि सर्वांना समान वागणूक द्यावी एवढंच.
'सर्वांना समान वागणूक द्यावी' म्हणजे काय? हे विधान फक्त बुद्धीभ्रम निर्माण करण्यासाठी आहे. इथे माझ्याच धर्मातल्या काही चालिरीतींबद्दल उल्लेख केला तर जळफळाट होतोय लोकांचा. इथे माझ्याच धर्मातले लोक माझ्याच धर्मातल्या लोकांना समान वागणूक द्यायला तयार नाहीत. कोण्या प्रकारच्या समान वागणूकीची अपेक्षा आहे आपल्याला?
सगळ्याचं म्हणणं एवढच आहे की मुसलमानांनी धर्माच्या नावावर चालू असलेले अत्याचार बंद करावेत.
ह्याला कोणीच विरोध करत नाहीये. प्रश्न विचारांचा आहे. मुसलमानांचे कर्म त्यांच्या धार्मिक विचारसरणीतून, दुराग्रहातून येत आहेत. ते तर बदललेच पाहिजे. पण ते बॉम्ब टाकून किंवा द्वेष-तिरस्कार-संशय ठेवून शक्य नाही. कारण अशाने ते मुख्य समाजापासून अधिकाधिक दूर जाऊन कोंडाळं करून राहतील. हे विचार कधीच मरणार नाहीत, ते नवे नवे अवतार घेऊन बाहेर येतच राहतील. पण त्यासाठी हिंदूंना ओढून आणायचे कारण काय? 'आपले लोक आपल्याच लोकांना शिव्या घालतात' वैगेरे बोलायच्या मागचे खरे कारण काय? शिव्या घालणारे आपले हिंदू लोक कोण आहेत? आपल्याच हिंदू लोकांना म्हणजे कोणाला व नेमक्या कशासाठी शिव्या घालत आहेत? ह्याचा इस्लाम व जगभरातल्या आतंकवादाच्या समस्यांशी नक्की काय संबंध आहे? हेच सतत विचारत आहे. पण तुम्ही पुर्वग्रहदूषित मताने फक्त वितंडवाद घालत आहात. माझ्या ह्या धाग्यावर मी एकाही वाक्यात मुस्लिमांबद्दल काहीच मत मांडलेले नव्हते. तुम्हीच त्यांची हिंदूंशी तुलना करत आहात पहिल्यापासून. ह्या धाग्यावर हिंदूंबद्दल चर्चा व्हायचे काहीच कारण नव्हते. हिंदूधर्मातल्या चालीरीतींवर बोट ठेवणे म्हणजे इस्लामप्रेमी, हिंदूद्वेष्टे असणे हे तुमचे तुम्हीच ठरवून मोकळे झालात. हिंदूंच्या धर्मसुधारणेवर बोलत आहेत पण जिहाद वर "तुम्हाला हवे तसे" बोलत नाही म्हणून इस्लामप्रेमी आहेत हे तुमचे तुम्हीच ठरवून मोकळे झालात. तुम्ही दोन धर्म, दोन संस्कृती वेगळ्या ठेवून विचार करू शकत नाही म्हणून इतरांनीही तसेच करावे असा आपला आग्रह दिसतो. एकतर असे असावे की हिंदूंच्या कुठल्याही सुधारणेला तुमचा पाठिंबा नाही. काही हिंदू लोक चळवळी, आंदोलने करतात ते तुम्हाला मान्य नाही. इस्लाममध्ये जसे कट्टर वातावरण आहे की कुराण, पैगंबर बद्दल कोणी विरुद्ध बोलले की कापले जाते तेच वातावरण तुम्हाला हिंदू धर्मात अपेक्षित असावे. तसे नसेल तर सुधारणावादी हिंदूंबद्दल आकस असण्याचे कारण काय? तुम्ही इथे एक विधान करता त्याची जबाबदारी घ्या. सवंग विधाने करणे तुम्हाला आवडत असेल पण इथे मिसळपावसारख्या सार्वजनिक संस्थळावर पुराव्याशिवाय विधाने करू नये असे इथल्या ज्येष्ठांनीच दंडक घालून दिलाय. ते तुमचे वैयक्तिक मत असेल तर तसे मान्य करा. म्हणजे आम्हालाही तुमच्याबद्दल काय मत बनवावे याचा निर्णय घेता येईल. दुसऱ्या एका धाग्यावर मुसलमानांना बोललं म्हणून तुम्ही चिडलात. बेछूट व्यक्तिगत आरोप करण्यापूर्वी ह्याचा पुरावा द्या. अशाच अर्थाची अनेक विधाने आपण ह्या धाग्यावर माझ्याबाबतीत केली आहेत. एका सदस्याने दुसर्‍या सदस्याबद्दल इतके पराकोटीचे व्यक्तिगत मत बनवणे ह्याला आम्ही शिक्के मारणे म्हणतो. तस्मात् तुमचे शिक्के तुमच्याजवळ ठेवा. इथे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करू नका. बरं दिसत नाही ते. बाकी, ब्रेनवॉश्ड दुनियेबद्दल एक वेगळा धागा काढायला लागेल. आता तेवढा वेळ आणि मूडही नाही. उद्या उस्मानिया युनिवर्सिटीत काय होते ते पाहूया. दोन्ही बाजूने जोरदार षड्डू ठोकणे सूरु आहे. सामान्य जनांचे जीवन दंग्यांच्या भीतीने व्याप्त आहे. एक भारतीय म्हणून मला माझे जे घर जळते आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. अमेरिकेने निर्माण केलेले प्रश्न अमेरिकेने सोडवावेत.

In reply to by संदीप डांगे

हिंदू विषयी बोललो ते या साठी की हिंदू तालिबान म्हणून आपल्यातलेच काही हिंदू ओरडत आहेत ना? असहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार परत करणारे मुख्यतः हिंदूच होते. माझे ते वाक्य त्या हिंदूंना उद्देशून होते ज्यात स्पष्ट म्हणलंय की आपल्यातलेच काही हिंदूंना बदनाम करतात. खरं तर या गोष्टी करणाऱ्या हिंदूंना माझ्या वाक्याचा राग यायला पाहिजे, तुम्हाला कसा काय आला बुवा? अश्या हिंदूंची नावं भंकस बाबांनी वर दिली आहेत. बाकी पण पाहिजे असतील तर कुठल्याही वर्तमान पत्रात, न्यूज मध्ये सापडतील. त्यामुळे मी परत द्यायची गरज मला वाटली नाही. याच तथाकथित हिंदूंना काही वाचाळवीर बोलतात म्हणून असुरक्षित वाटतं पण त्याच लोकांना मुसलमानांनी केलेल्या कत्तली मात्र घाबरवत नाहीत. हे दाखवायचा माझा प्रयत्न होता. माझं विधान सवंग का आहे मला काही कळलं नाही. प्रसाद१९७१, डॉ. खरे, शलभ यांनी तर माझ्याच सुरात सूर मिसळलाय, बाकी पण कोणी माझ्या प्रतिसादाला विरोध केला नाहीये. फक्त तुम्हालाच का बरं सवंग वाटलं? तुम्हीच वर म्हणलंय "इथेच एका हिंदू सदस्याने हिंदूंनाच शिव्या घातल्या पण कोणाला ती विसंगती वाटत नाही. मजेशीर आहे.". बाकी माझ्या मते आपण बोलतो ती बहुतेक सगळीच मतं आपली वैयक्तिक असतात, त्या मतांना बाकी सदस्य/ लोक पाठींबा देतात अथवा विरोध करतात. त्यातूनही संपादक मंडळाला वाटत असेल कि माझा प्रतिसाद या ठिकाणी योग्य नाही तर प्रतिसाद उडवावा. एवढंच छिद्रान्वेषी व्हायचं असेल तर तुम्ही या प्रतिसादात म्हणलय "ते बघण्यास बहुसंख्य भारतीयही उतावीळ असतात तेव्हा भारतीयांची ही दांभिक देशभक्ती कुठे जाते?" मग का बरं समस्त भारतीयांच्या देशभक्तीला दांभिक म्हणताय?
तेव्हा हिंदूंची धर्म सुधारणा हा माझ्यासाठी वेगळा विषय आहे. त्याचा मुस्लिम धर्माशी संबंध जोडायचे काहीच कारण नाही.
यग्जाक्टली: हेच मी पण कधी पासून म्हणतोय. हिंदू धर्मात सुधारणा नकोत असं कोण म्हणतंय? पाहिजेतच! पण मुसलमानांचा विषय काढला की लगेच हिंदूंमध्ये कश्या वाईट चालीरीती आहेत हे इथेच मिपावर कितीतरी वेळा उगाळलं गेलंय. पण ह्यातला बेसिक फरक लक्षात घ्यायला हवा की हिंदूचा (ह्या चालीरीतींचा) धोका हा अंतर्गत आहे. मुसलमानांचा धोका हा बाह्य आहे. मुसलमान फक्त त्यांच्याच विविध पंथांमध्ये जे काय करायचं असेल ते करत असते तर ठीक होतं. पण तेच जेव्हा उर्वरित जगाला वेठीला धरतात तेव्हा त्याचं समर्थन कुठल्याही पातळीवर होवू शकत नाही. सर्वांना समान वागणूक म्हणजे एकच गुन्हा एका मुसलमानानी केला आणि तोच एका हिंदुनी केला तर न्याय सारखा हवा. एक उदा. दादरीमधील मृताच्या घरच्यांना बरीच मदत मिळाली पण मूड्बिद्री मधील घटना तर कित्येक लोकांना माहीतच नाही. बीफ खाण्यावरून एवढा हंगामा करतात पण मुस्लिमबहुल एरिया मध्ये एखादा माणूस पोर्क खाऊ शकतो का?
बेछूट व्यक्तिगत आरोप करण्यापूर्वी ह्याचा पुरावा द्या
"पॅरिस हल्ला" धाग्यात तुम्ही मुसलमान कसे चांगले असतात तुम्हाला किती चांगला अनुभव आला वगैरे लिहिलंत. आमिर आणि शाहरुख धाग्यात उस्फुर्तपणे Snapdeal काढून टाकणाऱ्यांना विरोध करत होतात. तर या http://www.misalpav.com/node/32397 धाग्यामध्ये गुरुजी हज सबसिडी विषयी बोलत होते तर कुंभमेळ्यात कसा सरकार खर्च करते हे पटवून देत होतात. अजून शोधकाम केलं तर अजूनही काही सापडू शकेल. पण तूर्तास एवढेच. त्यामुळे मी काही कोणावर शिक्के मारत नहिये… मी कुठल्या एका व्यक्तीवर काहीच बोललो नव्हतो. आता तुम्ही ते तुमच्यावर ओढून घेतलंत त्याला मी काय करणार? बाकी तुमचा हा प्रतिसाद जपून ठेवायला पाहिजे, पुढे प्रतिवाद करताना कामी येईल.

In reply to by ट्रेड मार्क

आज वेळ नै, खरंच. जौ दे. प्रतिसाद जप्पून ठेवल्लाय... वेळ मिळाला की उत्तर देईनच. बाकी कोणाच्या प्रतिसादाला किती लाईक्स आले ह्यावरून जनमत चाचणी ठरणार असेल तर मज्जाच आहे बॉ....

In reply to by संदीप डांगे

कसली जनमत चाचणी म्हणताय? मी फक्त दाखवलं की बाकी मिपाच्या सदस्यांना माझा प्रतिसाद सवंग वगैरे वाटत नाही फक्त तुम्हालाच वाटतोय. त्यातही काही सदस्यांनी तुम्हाला समजवायचा पण प्रयत्न केलाय. त्यात कसली आलीये जनमत चाचणी? उगाच आपल्याला पाहिजे ते अर्थ काढायचे आणि वाद घालत बसायचं का? बऱ्याच धाग्यांवर साधारणपणे असंच होतंय. उदा. कोलेस्ट्रोल चा धागा… एवढी छान चर्चा चालू होती आणि करायला अजून मुद्दे पण होते. तर तुम्ही फक्त डॉक्टर कसे चुकीचे उपचार करतात त्यावरून वाद घालत बसलात, या खालील प्रतिसाद वाचा. मग बहुतांशी सदस्यांचा इंटरेस्ट संपून जातो आणि चर्चाही संपते. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की काही धाग्यांवर तुम्ही अतिशय मुद्देसूद प्रतिसाद देता उदा. माझी भूमिका. पण काही ठिकाणी मात्र… असो. जरा जास्तच चर्चा झाली. बस झालं आता.

In reply to by ट्रेड मार्क

ठिक आहे, तुम्ही समजत असाल की दोन-तीन जणांनी आपला प्रतिसाद लाईक केला म्हणजे सर्वच मिपासदस्यांना आपले मत पटले, दोन चार जणांनी प्रतिवाद केला की सगळ्यांनाच नाही पटले. असं काही नसतं. मी तरी असं समजत नाही, कोणी लाइ़क केलं तर टणाणा उडत नाही किंवा विरोध दर्शवला तर कोमेजून बसत नाही. कारण माझं मत हे माझं मत आहे. त्याला इतर कुणी समर्थन केलंय म्हणुन तेच बरोबर आहे असं लंगडं समर्थन मला जमत नाही. तुम्हाला जमतं तुम्ही जरूर करा. राहिला विषय इतर धाग्यांवरच्या चर्चा इथे आणण्याचा. तुम्हाला जर काही समस्या असेल तर तिथल्या तिथे बोलत जावा. किंवा इग्नोर मारा. तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. मी माझे मुद्दे मांडतो. ज्याला पटायचे त्याला पटतात, ज्याला पटत नाहीत त्याला नाही. तुम्हाला पटत नाही म्हणून तो मुद्दा इन्वॅलिड-गैरलागू होत नाही. तुम्ही तिथल्या तिथे प्रतिवाद करून माझ्या मुद्द्यातली हवा काढून दाखवा. प्रतिवाद करणार्‍याचे मत मला पटले तर मी ते खुल्या मनाने मान्य करून माझी चूक कबूल करतो. एवढा मोकळेपणा मी ठेवतो. तुम्हाला तुमच्या प्रतिसादांवर भविष्यात माझ्याकडून कुठलेही उपप्रतिसाद नको असतील तर तसे आताच सांगा म्हणजे तसे ध्यानात ठेवायला बरे, म्हणजे न जाणो पुढे अडचणीत आलात तर व्यक्तिगत खोदकाम व संदर्भहिन आरोप करण्याचे तुमचे कष्ट वाचतील. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

तुम्हीच म्हणलात की माझ्या सवंग प्रतिसादाचं बाकी मिपाकरांना काहीच कसं वाटत नाही म्हणून मी त्याला उत्तर म्हणून दाखले दिले. कोणाला आवडलं नाही आवडलं तर तसा मला काही फरक पडत नाही. टनाटन उडायचा तर प्रश्नच नाही ते वय कधीच गेलं. जर का बऱ्याच वेळा मला लोक्स समजावून सांगायचा प्रयत्न करत असतील तर माझ्यापुरतं मी नक्कीच आत्मपरीक्षण करीन की माझे विचार खरंच बरोबर आहेत का नाही. इतर धाग्यांवरची चर्चा इथे आणली गेली कारण तुम्हीच पुरावे मागितलेत. आता सिद्ध करायचं म्हणलं तर दाखले न देत कसं सिद्ध करणार? तुम्हाला प्रतिसाद देण्यापासून मी कोण रोखणार? प्रतिसाद द्या प्रतिवाद करा पण धाग्याशी संबंधीत असावा आणि सेन्सिबल असावा एवढीच अपेक्षा. मी तर म्हणीन प्रतिसाद द्याच वेगवेगळे दृष्टीकोन कळतात. संदर्भहीन आरोप? मी संदर्भ दिले म्हणून तुम्ही म्हणताय की उगाच इतर धाग्यांवरचे संदर्भ कशाला दिले. आणि आता म्हणताय संदर्भहीन आरोप? परस्परविरोधी वाक्य एकाच प्रतिसादात देताय.

In reply to by ट्रेड मार्क

तुम्हाला धीर धरायला सांगितला होता. आज आणि अजून काही दिवस मेगाबायटी प्रतिसाद द्यायला खरंच वेळ नाही. काळजी करू नका. मी उत्तर देइल. जमलं तर एखादा लेख टाकिन मला तुमच्या त्या विशिष्ट विधानामध्ये काय खटकल आणी त्यामागच्या कारणमीमांसेबद्दल. जरा कळ धरा, शक्य असेल तर.

In reply to by संदीप डांगे

पण म्हणजे मी तोपर्यंत प्रतिसाद देऊ नयेत असं तुमचं म्हणणं आहे का? मध्ये तुम्ही किलोबायटी प्रतिसाद दिलात त्याला मी उत्तर दिलं. नको होतं का द्यायला? तुमच्या मेगाबायटी प्रतिसादाच्या किंवा लेखाच्या प्रतीक्षेत.

In reply to by संदीप डांगे

यू ट्यूब वर सर्च मारा महेश भटट् च्या नावाने, ओवेसी पेक्षा जहरी बोलतो हां माणूस. अरुन्धती रॉय, काश्मीर मधे कोणी सांगितले की तो राजकीय पेच आहे? सरळसरळ धार्मिक भावनानी खेळून लोकांना चिथवले जात आहे. ही बाई उघड उघड फुटिरतावाद्याना सपोर्ट करते. एक दोन अन्तर्राष्ट्रीय पुरस्कार मिळाले म्हणुन काय तोंड फाडून बोलावे?

In reply to by भंकस बाबा

मी मागे कुठेतरी वाचले की महेश भट्ट हा कन्वर्ट झालाय म्हणून. दुसर्‍या लग्नावेळी. दुसरी बायको मुस्लीम आहे. आलिया दुसर्‍या बायकोचीच मुलगी.

In reply to by भंकस बाबा

हे लोक हिंदूंचे प्रतिनिधी आहेत? ह्यांच्यामागे किती जनाधार आहे? ह्यांच्या भाषणाला किती शे पब्लिक उभे राहतं? ह्या लोकांच्या वक्तव्यांना नक्की कोण सिरियसली घेतं? जर तुम्ही ह्या व्यक्तिंना हिंदू म्हणून सिरियसली घेताय तर मग मी अशाही हिंदूअभिमानी लोकांची लिस्ट देऊ शकतो ज्यांच्याशी रीलेट होणे तुम्हाला आवडणार नाही. इथेच एका हिंदू सदस्याने हिंदूंनाच शिव्या घातल्या पण कोणाला ती विसंगती वाटत नाही. मजेशीर आहे.

In reply to by संदीप डांगे

वरील सर्व व्यक्ति सेलेब्रिटी लोक आहेत. मुलायम सिंग यादवांचा व् मुस्लिमांचा सपोर्ट घेऊन निवडणुका जिंकतो. अरुन्धती रॉय खुल्या सभेत काश्मीरविषयक प्रक्षोभक मत मांडते. तिचे नशीब की इतके अत्याचार सोसुन देखिल काश्मिरी पण्डितातून अतिरेकी निर्माण झाले नाही. हिन्दू शांत बसतो म्हणुन हे लोक जीभ सैल सोडतात ना? आपले जूने हिंदी चित्रपट काढून बघा , मुस्लिमाचा उदो उदो केलेला दिसेल, पण आताच्या चित्रपटातून मुस्लिम वाईटपण असतात हे दाखवले जाते. मला तर असे वाटते आहे की तुम्ही इतर हिन्दू सदस्याना चिथवत आहात.

तुम्ही आहात असे दाखवता , पण आहे नाही. डांग्याचे संदीप हो!

In reply to by भंकस बाबा

बाबाजी, जरा सांभाळून. एवढा आत्मविश्वास बरा नाही.

In reply to by संदीप डांगे

डांगेजि ,मी फार छोटा सामान्य माणूस आहे आणि वर हिन्दू आहे. जितेंद्र आव्हाड जेव्हा इशरत जहां च्या एनकॉउंटर वर मत देतात तेव्हा रक्त उसळते. इस्लामी दहशतवाद आता पराकोटिला पोहोचला आहे. पवार आणि कोम्पनी ला हेच उमजत नाही आहे. दिवसातून ५ वेळी कर्कश आवाजात भोंगे लावणे ,मदर्शामधुन दिवसभर गाणी वाजवने हां दहशतवाद नाही का? मी स्वतः काही काळ हिन्दू बहुसंख्य भागात राहिलेला आहे. तिथे जेव्हा लाउड स्पीकरवर गाणी लावायचे तेव्हा मी एक्ट्याने जाऊन ते बंद करायला लावले आहेत. कारण मला विश्वास आहे की हे लोक माझ्यावर पाळत ठेऊन भेकड़ हल्ला करणार नाही. मी आता रहात असलेल्या वस्तीत जी मुस्लिम बहुसंख्य आहे तिथे कोणी असा विरोध केलाच तर दुसऱ्या दिवशी लाउडस्पीकरची भिंत त्याच्या घरासमोर उभी केली जाते. पोलिस फ़क्त बघ्यांची भूमिका घेतात. लग्न ,नामकर, चिश्तिचा वाढदिवस, पैगबराचा वाढदिवस, हुसैणचे बलिदान,आमदाराचा वाढदिवस, काहीही कारण चालते

In reply to by भंकस बाबा

जितेंद्र आव्हाड एक पॉलिटिशियन आहे. त्याच्या मतदारसंघातून हिंदू एकगठ्ठा मत देत नाहीत म्हणून तो मुस्लिम मते एकगठ्ठा करण्याचा उद्योग करतो. त्याने भले मुस्लिमांना जवळ केलं असेल पण हिंदूंना दूर लोटलंय असं काही आहे का? त्याने हे म्हटलंय का की 'हिंदूधर्म वाईट इस्लामच चांगला'? कधी भेटा जाउन त्यांना. सांगा तुमचे कर्न्सर्न्स. तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनच थेट घ्या. त्या धंदेवाईक माणसाच्या नावाने हिंदूंवर बिल फाडण्याची काही एक गरज नाही. हो. हे लाउडस्पिकर-भोंगे बंद करायचे आदेश दिलेत न्यायालयाने.

In reply to by संदीप डांगे

डांगेजि, आपण काय बोलत आहात याचे तुम्हाला भान आहे का? मुस्लिमाना कुरवाळने वेगळे व् अतिरेकी म्हणुन मारल्या गेलेल्या माणसाच्या घरी जाऊन त्या माणसावर स्तुतिसुमने उधळने वेगळे. कल्याण मधून चार तरुण अतिरेकी कारवाया करायला इराकला गेले. विचार करा चार तयार झाले पण चारशे पर्यन्त विचार पोहोचवले गेले आहेत. मुंबई पोलिसांनी देखिल या स्लीपर सेलच्या धोक्याचा उल्लेख केला आहे.

हिंदूधर्मातील श्रद्धांमुळे असे दुसर्या कोणाचे इतके जीव घेतले जात नाहीत
माफ़ करा गैरी भाऊ पण सपशेल अमान्य शिवाय निवडणूक विश्लेषण वगैरे वाचुन तुमच्या इम्पीरिकल अन स्टैटिस्टिकल बेस जाणवत असतो तो जाणवला नाही अजिबात! हिंदु असो वा मुसलमान जो धर्म अब्सॉल्युशन क्लेम करतो तो अधोगती कड़े जातो उदाहरण इस्लाम आहेच आहे अरुंधती रॉय ते इतर आपण जी उदाहरणे दिली आहे ती विशिष्ठ राजकीय प्रेरणेने भारलेली व्यक्तिमत्वे असतील किंबहुना आहेत ही अन त्यांनी 'हिंदु धर्म किती वाईट' ह्याची सतत ओरड चालवली असेलही पण म्हणुन त्यांनी 'इस्लाम चं कौतुक कधी केले?' हा संदीप डांगे भाऊ ह्यांचा प्रश्न इनवैलिड होत नाही न? धर्मसुधारणा ह्या विषयात 'अगोदर त्यांना सांगा की !' एप्रोच चालत नाही किंबहुना हिंदुंनी चालवुन घेऊ नये असे मनःपूर्वक वाटते, धार्मिक दहशतवाद हा कड़कपणे हाताळला पाहिजे फ़क्त तो हाताळताना आपला सुंदर धर्म त्या दिशेने चालणार नाही ह्याची काळजी ही घेतली पाहिजे असे वाटते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्येच काये की इस्लामविरुद्ध काय बोलत नाहीत, म्हणून ह्यांच्या पोटात दुखत असावे? हलके घ्या …

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महेश भट्ट यूट्यूब वर मुस्लिमा विषयी काय बोलतो ते पाहा. अरुन्धती रॉय मारे आपल्या भारतीय नेत्यांना काश्मीर प्रश्न कसा हाताळायचा सल्ला देते, पण कधीही कश्मीरी पण्डिताना न्याय मिळावा असे बोलताना दिसत नाही. समाजवादी असणारा मुलायम सिंग आपल्याच माणसाला आजम खानला आवर घालू शकत नाही, अरे त्या मोदिनी खेद तरी व्यक्त केला साक्षी महाराज व् आदत्यनाथच्या बोलन्यावर. मुलायम ते पण करत नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माफ़ करा गैरी भाऊ पण सपशेल अमान्य शिवाय निवडणूक विश्लेषण वगैरे वाचुन तुमच्या इम्पीरिकल अन स्टैटिस्टिकल बेस जाणवत असतो तो जाणवला नाही अजिबात!
तुम्ही नक्की कोणाचे बील माझ्या नावाने फाडत आहात?
अरुंधती रॉय ते इतर आपण जी उदाहरणे दिली आहे ती...
कधी आणि कुठे?

In reply to by गॅरी ट्रुमन

अर्र माफ़ करा! चुकुन गैरी भाऊ लिहिले!! हात जोडून माफ़ी मागतो तुमची :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

फ़क्त तो हाताळताना आपला सुंदर धर्म त्या दिशेने चालणार नाही ह्याची काळजी ही घेतली पाहिजे असे वाटते. हजारदा सहमत बापुसाहेब. पण काही फ्रॅक्चर्ड आयडेन्टीटीग्रस्त आणि कन्फुज्ड आयडोलोजीस्ट, कुत्रा जसा आपल्याच शेपटीच्या मागे धावतो तसे करतात. ह्यांना इस्लाम हिंदूधर्मासारखा करून पाहिजे आणि हिंदू धर्म इस्लामसारखा. अँड दे वाँट बोथ अ‍ॅट द सेम टाइम... ;-)

एक क्वोट वाचला परवा. (बिल मार नामक कॉमेडिअनचा आहे बहुधा) Without religion good people will continue to good things and bad people will continue to bad things. But it takes religion for good people to to do bad things, !

बादवे यावर्षी अमेरिकेत ३५३ मास शूटिंग्ज झालीत (http://shootingtracker.com/wiki/Mass_Shootings_in_2015) म्हणजे जेवढे दिवस झालेत या वर्षातले त्यापेक्षा जास्त.

In reply to by नगरीनिरंजन

प्रत्येक मल्टिपल / सिंगल होमिसाईड म्हणजे मास शूटिंग नव्हे. एका गॅंगने दुसर्‍या गॅंगचे मेंबर टपकवणे याला पण 'मास शूटिंग' म्हणता येणार नाही. (निदान ज्या कंटेक्समध्ये तो शब्द वापरला जातो त्या कंटेक्समध्ये तरी नाही) त्यातल्या अर्ध्याअधिक केस मध्ये एक किंवा शून्य कॅज्युअल्टीज दिसत आहेत. हे म्हणजे भारतातल्या विनयभंगाच्या केसेस गोळा करून 'भारतात इतके इतके सामूहिक बलात्कार होतात' असं म्हणण्यासारखं आहे. अर्थात यामुळे अमेरिकेतल्या गन व्हायोलेन्सची गंभीरता कमी होत नाही.

अवांतर- डोनाल्डभाऊचा भेजा पार सटकला. मुस्लिमांना अमेरिकेत यायचीच बंदी घालणार म्हंटोय. हा माणूस प्रेसिडेंट झाला तर थर्ड वर्ल्ड वॉर नक्की.

In reply to by सायकलस्वार

ट्रंप असे म्हणाला की आपल्याला (म्हणजे अमेरिकन लोकांना) नक्की काय चालले (आपल्या व्हिसा प्रोसेसिंगमधले कच्चे दुवे) आहे हे कळेपर्यंत मुस्लिम लोकांना अमेरिकेत येऊ देता कामा नये. ह्यात सनसनाटी काही बोलून प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याची चाल आहे. बातम्यांच्या हेडलाईन्स मधे आपले नाव येऊ देण्याकरता केलेला प्रयत्न आहे. मुळात हे कितपत व्यवहार्य आहे याबद्दल मला शंका आहे. पण याचवेळी मला असेही वाटते की सँन बर्नार्डिनो इथे आयात केली गेलेली मलिक बाई ही इतकी सहज व्हिसा का मिळवू शकली ह्याबद्दल काही तपासणी केली पाहिजे. कच्चे दुवे तपासले पाहिजेत. पाकिस्तान व सौदी अरेबिया इथे दहशतवादात प्रशिक्षित स्त्री सहज व्हिसा मिळवू शकते त्या प्रक्रियेत कुठेही धोक्याची घंटा वाजत नाही हे परराष्ट्र खात्याकरता लाजिरवाणे व लोकांकरता धोकादायक आहे. ट्रंपचे एक टोक असेल तर ओबामा आणि त्याच्या सहकार्‍यांचे दुसरे टोक आहे. ह्या कृत्य मुसलमानाचे असूच शकत नाही वा ह्या कृत्याचा इस्लामशी काही म्हणजे काआआआआआआआआआआही संबंध नाही हे पुन्हा पुन्हा ठासून ठासून सांगितले जात आहे. ह्या अतिरेकी हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून सरकारी वकील (अ‍ॅटोर्नी जनरल) बाई म्हणाली की जर कुणी मुस्लिमांवर वा इस्लामवर हिंसक टीका केली तर सरकार त्याच्यावर कारवाई करेल. जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सर्वश्रेष्ठ समजले जाते तिथे असे धमकावणे कितपत योग्य आहे?

In reply to by सायकलस्वार

मधे अमेरिकेत मशीदित जाणाऱ्या मुस्लिमावर पाळत ठेवण्यात आली होती. बातमी बाहेर फुटली तेव्हा अभिव्यक्ति स्वातंत्र वाल्या मुस्लिमानि आवाज उठवायला सुरुवात केलि होती. तेव्हा अमेरिकन प्रशासनाने ठाम बजावले ते अभिव्यक्ति स्वातंत्र्य गेले खड्डयात, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. हेच जर आम्ही आझाद मैदानावरील दंगलीच्या आधी जे मशिदीतून विष ओकले जात होते तिथे लक्ष दिले असते तर नामुश्कि टळली असती

In reply to by भंकस बाबा

अमेरिकन मुसलमान लोकांनी केलेला अभिव्यक्तिचा दंगा अन त्याला अमेरिकन सरकार ने दिलेला कड़क इशारा दोन्ही डिटेलवार वाचायला आवडेल म्हणजे स्वतःचा अभ्यास तितका वाढवता येईल ! :)

बाळ-बोध शंका : या शंका निरसनाने धागा त्रिशतकी नक्की होऊ शकतो.
  • या हल्ल्याचा मोदींशी वा त्यांच्या सरकारशी संबंध जोडता येईल का? (अगदी बादरायणही चालेल)
  • त्या अनुषंगाने काही पुरस्कार परत करता येतील का?
  • असहिष्णुता असा थोर प्रकार अमेरिकेत अस्तित्वातच नाही काय?
  • इथल्या काही विचारवंताना त्या जोडप्याकडे पाठवून त्यां दांपत्याच्या पाठीराख्यांचे मतपरिवर्तन करता येईल काय?
  • दांपत्याच्या मुलीचा सांभाळ करण्यास जास्ती लायक कोण कनवाळू ओवेसी की शांतीप्रिय आझमखान?
  • या हल्ल्याचा आपल्याला न आवडणार्या शहराशी संबध जोडून, त्या आड काही चिखलफेक करता येईल का?
  • अश्या धाग्यावर मिपावरील शांती दूत विचारवंत कुठल्या वाळूत चोच(मानेसकट) खूपसून बसलेले असतात ?
यथामती-यथाशक्ती उत्तरे द्यावीत..

बाकी धर्मात आणि इस्लाममधे आजच्या तारखेला असणारा मोठा फरक म्हणजे बाकी धर्म आपल्या धर्मातील, ग्रंथातील काही उतारे आज कालबाह्य झाल्याचे अधिकृतरित्या मान्य करतात आणि धर्मात सुधारणा करु पहातात. उदा. बायबलमधे असे म्हटले आहे की रविवारी जो कुणी काम करेल त्याला ठार मारले जावे (एक्सोडस ३५:२) आज किती लोक अशा प्रकारे रविवारी काम करणार्‍या लोकांना मारताना आढळतात? तीच गोष्ट अस्पृश्यतेची. हिंदू धर्मग्रंथात अस्पृश्यतेचे समर्थन केले आहे. पण भारतात अस्पृश्यता हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु इस्लामचे बंदे कुराणात काही कालबाह्य आहे हे मान्यच करत नाहीत. उलट अरबी शब्दांच्या अर्थाची कसरत करुन जे काही आहे तेच कसे बरोबर आणि सर्वश्रेष्ठ हे सांगण्यात ह्या धर्माचे जाणकार अहमहिका लावतात. विशेषतः मुस्लिमबहुल देशातले. हा ताठरपणा ह्या धर्मातील अतिरेकाला जबाबदार आहे असे वाटते. काही तत्त्वे ज्यात मुस्लिम लोक तडजोड करु इच्छित नाहीत : १. एका स्त्रीची साक्ष ही पुरुषाच्या अर्धी समजली जावी. किंवा दोन स्त्रियांची साक्ष एका पुरुषाच्या बरोबरीची. २. इस्लाम त्याग करणार्‍याला मृत्युदंड दिला जावा. आज बहुतांश मुस्लिम असे मानतात. अगदी अमेरिकेतही असे मानणार्‍यांची संख्या चिंताजनक वाटावी इतकी जास्त आहे. व्यक्तीस्वातंत्र्याला शिरोधार्य मानणार्या संस्कृतीत ही विचारसारणी कशी बसू शकते? ३. इस्लाम वा प्रेषित ह्यांच्यावर टीका, विनोद, चेष्टा केल्यास मृत्यूदंड दिला जावा. १४०० वर्षांपूर्वी असणार्‍या चालीरीती, प्रथा, रुढी, सामाजिक स्थिती हे आजच्यापेक्षा वेगळे होते. परंतू मुस्लिमांच्या लेखी त्यांच्या प्रेषिताचे आयुष्य हे १०० टक्के आदर्श आणि अनुकरणीय आहे. आणि कुणी वेगळे मत व्यक्त केल्यास त्याला पाखंडी समजून कठोर शासन केले जाते. आधुनिक काळात इतकी कडवी भूमिका पाश्चिमात्य संस्कृतीला अनुरुप नाही.

माझं शहर इथे जखमी झालंय! इथे प्रत्येकाचं अंतःकरण त्या विनाकारण मारल्या गेलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांसाठी रडतंय!! ह्या रॅडिकल इस्लामिस्टांचं इथे जे काही व्हायचं ते होणारच आहे! पण तुम्ही उगाच तंडू नका रे बाबांनो! बाकी काही मोजके भिकार*ट अमेरिकाद्वेष्टे वगळता बहुसंख्य जणांनी इथे पाठिंबा आणि सहानुभूती दर्शवली याबद्दल मिपाकरांचे मी लॉस एंजेलिस नागरीकांतर्फे आभार मानतो!

In reply to by पिवळा डांबिस

अरेरे. पिंडांकाकांना स्टॅटिस्टिक्सच्या मिरच्या नको तिथे झोंबल्या वाटते. सत्य कटू असतेच आणि बाटगे जास्त कट्टर असतात ते खोटे नाही. इतरांची शहरेच्या शहरे उध्वस्त केलेल्या व शस्त्रास्त्रांचा बाजार मांडलेल्या देशातल्या नागरिकांनी मग माझं शहर जखमी झालं याचा कांगावा करणे वगैरे म्हणजे असोच.

भिकार*ट अमेरिकाद्वेष्टे का? छान छान! फारच छान! बोलायची लैच अनावर इच्छा होती पण आवरतो तस्मात् असोच!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी 'काही' भिकार*ट अमेरिकाद्वेष्टे असं म्हंटलेलं आहे. तुम्ही जर त्यापैकी नसाल तर तुम्हाला नाराज व्हायचं काय कारण? आणि 'इफ द शू फिट्स', तर मग तुम्हीच विचार करा की प्रसंग काय आणि आपण लिहितोय काय! जर कसाबच्या मुंबई हल्ल्याच्या वेळेस कुणी भारतद्वेष्टं काही लिहिलं असतं तर तुम्हाला काय वेगळं वाटलं असतं?

असो! जाऊ द्या! तुम्हाला ही गैरसमज झाला! आता काही बोलणे इष्ट नाही बहुतेक माझे :)

तश्फीन मलिक बाई ह्या भारतातही आल्याचा संशय आहे.६ ऑक्टोबर २०१३ मधे आपली पायधूळ त्या भारतात आणत्या झाल्या होत्या असा संशय आहे. आव्हाड, अरूंधती अशा कुण्या अतीनिधर्म्याला भेटायला आल्या होत्या की आयसिसकरता नोकरभरती करायला आल्या होत्या ते अद्याप कळलेले नाही. एकंदरीत ही खालमुंडी बाई चांगली पाताळधुंडी होती असे दिसते आहे.

The couple who launched the terror attack in San Bernardino were both radicalized before they met online and had some confirmed connection to ISIS, the director of the FBI revealed today. FBI Director James Comey revealed the new information about the couple, who were killed by police following the deadly shooting, during testimony on Capitol Hill. For the first time since the December 2 attack, Comey made a definitive connection between the couple and ISIS though he was unable to give many details on the nature of that connection. पूर्ण बातमी इथे अजून एक बातमी - Muslim convert who threatened to bomb an MP also asked people to hug him in public Read more

आयओसीएल चा वरिष्ठ अधिकार्‍याला आयसिसशी असलेल्या संबंधांमुळे अट्क. देशात असहिष्णुता वाढलीय हेच खरे आहे.

In reply to by इरसाल

तो बिचारा आयसिस निम्म्या दरात कच्चे तेल विकते ते भारतातल्या हिंदूंना मिळवुन देण्याचा प्रयत्न करत होता पण ह्या असहिष्णु आणि सूड भावनेनी वागणार्‍या सरकारला ते बघवले नाही.