कलत्या उन्हात, कोण अंगणात?
तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण आकाशात?
फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण झाडात?
झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण घरात?
चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण उरात?
एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण गॅलरीत?
असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!
काव्यरस
वाचने
10036
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
वा! जबरदस्त आहे!
छान कविता.
छान कविता
खुप छान कविता.
जबरदस्त
तरल आणि मनस्वी लिहिता आपण.
व्वा !
खूपच छान!
आवडली!
शाळा
अतिशय सुंदर कविता आहे. खुप
सुरेख आहे कविता.
सुंदर.
जवळची वाटली! आवडली कविता.
खूपच छान लिहिताय. :)
वाह