Skip to main content

गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/12/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कलत्या उन्हात, कोण अंगणात? तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण आकाशात? फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण झाडात? झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण उरात? एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण गॅलरीत? असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!
लेखनविषय:

वाचने 10037
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

छान

कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! हे मस्तच

तरल ! असंच म्हणते !

शाळेच्या पुस्तकात पद्मा गोळे नामक कवयित्रिची कविता होती. ती आठवली. छान आहे.

मस्त लिहिली आहे.

मस्त