Skip to main content

बिहारचा प्रवास उलट ?

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 24/11/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय. त्याचे कारण लालूप्रसाद या त्यांच्या दुश्‍मन दोस्तचा अचानक झालेला महाउदय.ज्यांच्या नावाने व चेहऱ्याने निवडणूक लढविली गेली त्या नीतिश यांच्यापेक्षा लालूंचेच जास्त उमेदवार निवडून आले.सगळीकडे उघड झालेल्या माहितीनुसार नीतिश यांच्या अडीच डझन संख्या असलेल्या मंत्रिमंडळापैकी किमान दोन डझन मंत्री जेमतेम बारावीपर्यंत शिकले आहेत. त्यातीलही निम्मे शालान्त परीक्षाही उत्तीर्ण झालेले नाहीत. सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे लालूंचे उपमुख्यमंत्री झालेले पुत्र तेजस्वी हेही जेमतेम नववी पास की नापास आहेत. ज्यांच्याकडे बिहार या बिमारू राज्याच्या आरोग्याची धुरा सोपविली गेली आहे ते लालू यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप अकरावीपर्यंतच प्रताप गाजवू शकले व बारावी नापास आहेत. शिवचंद्रम राम नावाच्या एका महापुरुषाकडे राज्याच्या कला आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, यांनी तर शाळेचे तोंडच पाहिलेले नाही.देशाच्या प्रशासकीय सेवेत बरीच वर्षे याच राज्यांच्या उमेदवारांचा दबदबा होता व आजही तो बऱ्यापैकी कायम आहे. मात्र, त्यांचे राज्यकर्ते जर शालांत परीक्षाही उत्तीर्ण झालेले नसतील तर हा दोष कोणाचा? हा प्रवास उलट तर नाहि चालला ना?????????
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16697
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by अनुप ढेरे

हे माहिती नव्हतं.
सप्टेंबर १९९८ मध्ये मुलायमसिंगांनी हे विधान केले होते. त्यावेळी ते पेपरमध्ये वाचले होतेच आणि बातम्यांमध्येही बघितले होते. त्याचा डायरेक्ट पुरावा सापडला नाही पण त्या विधानाबद्दल मुलायमसिंगांवर बाळासाहेब ठाकर्‍यांनी टिका केली हा दुवा मात्र लगेच सापडला.

In reply to by गॅरी ट्रुमन

अकोल्याचे खासदार यांनीही लालू-मुलायम यांच्या पाकिस्तानला २००० कोटी रुपयांची मदत देण्याच्या मागणीला पाठींबा दिला होता. त्यांनी असा तर्क मांडला होता की शांतता एक तर शत्रुला नामोहरम करून मिळवता येते किंवा पैसे देऊन विकत घेता येते :-) .

आय आय टी यन ने अत्यंत कार्यक्षमतेने चालविलेले एक सरकार माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आहे. गोवा येथे श्री मनोहर पर्रीकर यांचे. विशेषतः घोडे बाजार आणी त्यामुळे भ्रष्टाचार्यांना आलेला माज त्यांनी उतरवून दाखविला आहे. बाकीच्यांबद्दल माहिती नसल्यामुळे पास.

आयआयटी वाले युगपुरुष सर्टिफिकेट वाटप तज्ञ श्रीश्री १२००१ ईमानदार पक्ष वाले दिल्लीत काय करीत आहेत सद्धया? लोकपाल किंवा इतर काही निर्णय त्यांनी उत्तम घेतले असतील पण त्यांचा मुळ पिंड हा मोदी विरोधावर पोसलेला आहे हे मान्य न करणे म्हणजे ताकाला जावुन भांडे लपवणे म्हणवेल काय?

गजेंद्र चौहानचा लॉजिक इथे लावा ! क्वालीफिकेशन महत्वाचा नाही, आधी काम करू द्या ! मग कामावर ठरवा =)) दोन्ही धाग्यांवर वेगवेगळे चष्मे घातलेले आहेत.

In reply to by कपिलमुनी

तुमचं कायतरीच हां मुनिवर... चार्ली हेब्दोची बाजू घेणारे पिंगा गाण्यावर किती दंगा करतात ते पाह्यलं न्हाय का?

पहिली गोष्ट म्हणजे मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीत शिकायची गरजच काय ? प्राचीन भारतीय विद्यापीठे असणाऱ्या बिहार मधे जन्म झाला की बस्स ! सगळं ज्ञान आपोआप मिळते .

श्रीमती राबडी देवी , निरक्षर होत्या , त्यांच्यापुढे असेच आय ए एस अधिकारी झुकत होते , आणि तेही तब्बल पाच वर्षे ! ! त्यामानाने लालुंचे दोन्ही सुपुत्र कमीत कमी आठवी नववी तरी पास झाले आहेत , व नितीशकुमारांच्या मंत्रीमंडळात सामिल झाले आहेत. बिहार राज्याच्या मंद गतीने विकास साधणार्‍या राज्यासाठी आणि तशाच जनतेसाठी ही प्रगती नव्हे काय ? उगाच बोंबाबोंब कशाला ? काल्चक्र उलटे फिरले आहे एव्हढेच ! पुर्वी ' यथा राजा , तथा प्रजा ' असे म्हटले जायचे , आता ' यथा प्रजा , तथा राजा ' असे झाले ! फार काही बिघडले नाही असेच म्हणायचे . इट हॅपन्स ओन्ली इन इंडीया !

स्मृती इराणी शिक्षण मंत्री आहेत ,त्याला तर आक्षेप नवता घेतला तुम्ही, जाऊ द्या शिक्षण आणि कर्तुत्व ह्याचा संबध नसतो

मला एक गोष्ट कळत नाही कि कोणाच्याही शिक्षणाचा एवढा बाऊ का करीत आहेत? श्री नितीश कुमार इंजिनियर असल्याने मुखमंत्री म्हणून त्या पदवीचा त्यांना कितपत फायदा झाला? किंवा केवळ एक उदाहरण म्हणून उद्या जर मी बांधकाम खात्याचा मंत्री झालो तर माझ्या वैद्यकीय एम डी पदवीचा कितपत फायदा होईल. कोणत्याही खात्यात तेथील तज्ञ लोक सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतात. तो सल्ला कसा वापरायचा याची व्यवहार बुद्धी ज्याच्या कडे असेल तो माणूस यशस्वी होऊ शकतो. मुळात आय ए एस माणसे काय सर्वज्ञ असतात? ते लोक हि असाच अनुभव, व्यवहार ज्ञान आणि शहाणपण याचा जास्तीत जास्त चांगला(OPTIMUM) उपयोगच करत असतात. आय ए एस किंवा मोठ्या व्यवस्थापन संस्थांच्या पदव्या हेच शिकवतात कि आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीचा सदुपयोग(OPTIMAL UTILISATION) कसा करायचा. साधे उदाहरण म्हणजे घरात आपल्याला गरम होत असते तेंव्हा आपण थेट पंख्याखाली बसतो.पंखा एकच खोली एकाच पण कोपर्यात बसलो तर वारा लागणार नाही. हे ज्याला कळले, तो यशस्वी व्यवस्थापक, सचिव किंवा मंत्री होऊ शकतो. दुर्दैवाने आज कोणत्याही विद्यापीठात व्यवहार बुद्धी(COMMON SENSE) आणी शहाणपण( WISDOM) शिकवले जात नाही. त्यामुळे माझ्या मते पदवीचा आणी चांगला मंत्री होण्याचा थेट संबंध नाही. काही फरक एवढाच आहे कि तेजस्वी यादव आणी इतर स्वतःच्या कर्तृत्वावर वर आलेले नाहीत तर बापाच्या गादीवर बसले आहेत. त्या गादीचा कसा उपयोग ते करू शकतात यावर त्यांचे यश किंवा अपयश अवलंबून आहे.

साक्षर आणि शिक्षण यात फरक असतो. पण लालूच्या पोरांना कुठले शिक्षण मिळाले आहे, याचा विचार केला पाहिजे. तूर्त बिहारहून मुंबईला येणाऱ्या लोकांची संख्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.

भवितव्याबद्दल जितका मिपाकर विचार करतात ते स्वतः(बिहारीही) करीत नाहीत असे रोचक निरिक्षण आहे.... दैनीक "फुपाटा" मधील राजकारण, विनाकारण शिकरण आणि आपण या लेखातून साभार

प्रवास उलटा खरोखरच चालू झाला की नाही याबद्दल बोलावे असे वाटते. आता जंगलराज परत येउ लागल्याच्या बातम्या यायला सुरवात झाली आहे. ही बघा बातमी. प्रथमच आमदार म्हणुन दिवडुन आलेल्या राजदच्या आमदाराने पोलिस इनस्पेक्टराला जिवे मारण्याची धमकी दिली. अश्या अजुन येउ लागल्याने काल लालुजींनी आमदारांचा वर्ग घेतला आणि कसे वागा सांगीतले.

दारुबंदीचा निर्णय आणि पहिल्या ५ कर्जबाजारी राज्यात नाव नसणे (महाराष्ट्र एक नंबर ) ! किती ही अधोगती !

In reply to by कपिलमुनी

हा निर्णय दिसतो तेव्हढा सरळ नाही. अर्थात सांगुन उपयोग होणार नाही. म्हणुन इतकेच लिहीतो.