बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय. त्याचे कारण लालूप्रसाद या त्यांच्या दुश्मन दोस्तचा अचानक झालेला महाउदय.ज्यांच्या नावाने व चेहऱ्याने निवडणूक लढविली गेली त्या नीतिश यांच्यापेक्षा लालूंचेच जास्त उमेदवार निवडून आले.सगळीकडे उघड झालेल्या माहितीनुसार नीतिश यांच्या अडीच डझन संख्या असलेल्या मंत्रिमंडळापैकी किमान दोन डझन मंत्री जेमतेम बारावीपर्यंत शिकले आहेत. त्यातीलही निम्मे शालान्त परीक्षाही उत्तीर्ण झालेले नाहीत. सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे लालूंचे उपमुख्यमंत्री झालेले पुत्र तेजस्वी हेही जेमतेम नववी पास की नापास आहेत. ज्यांच्याकडे बिहार या बिमारू राज्याच्या आरोग्याची धुरा सोपविली गेली आहे ते लालू यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप अकरावीपर्यंतच प्रताप गाजवू शकले व बारावी नापास आहेत. शिवचंद्रम राम नावाच्या एका महापुरुषाकडे राज्याच्या कला आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, यांनी तर शाळेचे तोंडच पाहिलेले नाही.देशाच्या प्रशासकीय सेवेत बरीच वर्षे याच राज्यांच्या उमेदवारांचा दबदबा होता व आजही तो बऱ्यापैकी कायम आहे. मात्र, त्यांचे राज्यकर्ते जर शालांत परीक्षाही उत्तीर्ण झालेले नसतील तर हा दोष कोणाचा? हा प्रवास उलट तर नाहि चालला ना?????????
वाचने
16697
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्रिब्युनमधला जुना दुवा
In reply to भारताने पाकिस्तानचे नुकसान by अनुप ढेरे
प्रकाश आंबेडकर
In reply to ट्रिब्युनमधला जुना दुवा by गॅरी ट्रुमन
आधीची सरकारे आयआयटीयन्स चालवत
आय आय टी यन ने अत्यंत
बाकी आयाटियन्स तुम्हाला माहीत नाहीत?
In reply to आय आय टी यन ने अत्यंत by सुबोध खरे
आयआयटी वाले युगपुरुष
गजेंद्र चौहानचा लॉजिक
तुमचं कायतरीच हां मुनिवर...
In reply to गजेंद्र चौहानचा लॉजिक by कपिलमुनी
पहिली गोष्ट म्हणजे मेकॉलेच्या
श्रीमती राबडी देवी , निरक्षर
स्मृती इराणी शिक्षण मंत्री
मला एक गोष्ट कळत नाही कि
सहमत. विरोध योग्य मुद्द्यांवर
In reply to मला एक गोष्ट कळत नाही कि by सुबोध खरे
+१११११११
In reply to मला एक गोष्ट कळत नाही कि by सुबोध खरे
साक्षर आणि शिक्षण यात फरक
बिहारच्या
विश्वहितचिंतक
In reply to बिहारच्या by नाखु
अवांतर चर्चा खुप झाली आहे. आता मुद्याकडे वळा.
बिहारचा उलट प्रवास
हा हा हा
In reply to बिहारचा उलट प्रवास by कपिलमुनी