Skip to main content

करवाचौथ

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 28/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी, तू कशी दिसत होतीस गं , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? डी.डी.एल.जे मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा. आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो, आणि माझा 'संकष्टी चतुर्थी' चा. जिप्सी
लेखनविषय:

वाचने 2068
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

खूपच छान . फार कमी शब्दात बरेच काही तरी. असे तरुण आणि रसरशीत काव्य लिहिण्यास आम्हास कधी सुचणार बुवा ! करवा चौथ आणि संकष्टी भन्नाटच

मस्त